✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा

स
संपादक मंडळ यांनी
Wed, 01/07/2015 - 09:59  ·  लेख
लेख
श्री बहुगुणी यांच्या http://www.misalpav.com/node/29851 या धाग्यात लिहिल्याप्रमाणे पहिली ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा दि. १५/१/२०१५ ते २५/०१/२०१५ या कालावधीत घ्यावी असा विचार आहे. ज्यांना भाग घेण्याची इच्छा असेल त्यांनी आपली नावे या धाग्यात द्यावीत. स्पर्धेला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहून राउंड रॉबिन पद्धतीने स्पर्धा घ्यावी का नॉक आउट ते ठरवण्यात येईल, तसेच स्पर्धेची वेळ, इतर नियम याबद्दल लवकरच श्री बहुगुणी इथेच अपडेट देतील. या कल्पक उपक्रमाबद्दल बहुगुणी यांना खास धन्यवाद आणि स्पर्धकांना मनापासून शुभेच्छा!
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
53421 वाचन

💬 प्रतिसाद (409)

प्रतिक्रिया

(No subject)

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 01/12/2015 - 19:52 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

प्रत्येक सामना त्या-त्या

खटपट्या
Fri, 01/09/2015 - 04:35 नवीन
प्रत्येक सामना त्या-त्या दिवशीच्या ड्रॉ नुसार खेळाडूंच्या सोयीने भारतीय प्रमाण वेळेत संध्याकाळी ६ वाजल्यापासून त्याच दिवशी मध्यरात्री १२ पर्यंत संपला पाहिजे.
सामने शनिवारी रविवारी असतील तर ठीक आहे. नाहीतर बाकीच्या दिवशी यावेळेत आम्ही ऑफीसात असू.
  • Log in or register to post comments

खेळाडूंपैकी किती जण भारताबाहेर आहेत?

बहुगुणी
Fri, 01/09/2015 - 06:27 नवीन
खेळाडूंपैकी किती जण भारताबाहेर आहेत? आणि अशांना भारतातील कोणत्या वेळी (भारतातील दिवसा ९-५ हा कालावधी शक्यतो टाळून) खेळता येईल? खटपट्या कॅलिफोर्नियात आहेत असं दिसतं आहे...
  • Log in or register to post comments

हो मला भारतातील रात्री १०:००

खटपट्या
Fri, 01/09/2015 - 06:34 नवीन
हो मला भारतातील रात्री १०:०० नंतर चालेल. आणि शक्यतो कॅलिफोर्नियाच्या शनिवारी किंवा रविवारी ठेवला तर बरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

निराकार गाढव यांचे सर कुठाहेत

आदूबाळ
Fri, 01/09/2015 - 15:55 नवीन
निराकार गाढव यांचे सर कुठाहेत? वो बहुत अच्छा बुद्धीबल खेलते हय अयसी खबर सुलतान को पंहुची हय.
  • Log in or register to post comments

महेश कोण? maheshw

बहुगुणी
Fri, 01/09/2015 - 15:59 नवीन
आतापर्यंत धाग्यात न आलेलं maheshw हे नाव कुणीतरी नोंदवलं आहे. हे सभासद कोण आणि ते भारतात असतात की इतरत्र? इतरत्र असतील तर भारतातील कोणत्या वेळी (भारतातील दिवसा ९-५ हा कालावधी शक्यतो टाळून) त्यांना खेळता येईल? लवकरात लवकर कळवा, म्हणजे ड्रॉ काढता येईल.
  • Log in or register to post comments

आहा! बोर्डावरच सापडले!

बहुगुणी
Fri, 01/09/2015 - 16:05 नवीन
maheshw (महेश प्रभाकर वायंगणकर) बोर्डावरच उपस्थित सापडले! मुंबई-स्थित आहेत असं त्यांच्या प्रोफाईल वरून दिसतंय. ठीक आहे, काही तासांत ड्रॉ काढला जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

धन्यवाद

MaheshW
Fri, 01/09/2015 - 16:31 नवीन
वाट पाहत आहे
  • Log in or register to post comments

प्रत्येक चालीला वेळ १.५ किंवा

आनंद
Fri, 01/09/2015 - 17:23 नवीन
प्रत्येक चालीला वेळ १.५ किंवा २ मि. देण्या पेक्षा २० मि. किंवा ३ं० मि. सामने खेळ्वावेत. चुकुन नेट कनेश्क्न गेल्यास २ मि. वेळ होवुन जाइल आणि चांगला स्पर्धक उगिचच बाद होइल. अधिक महिती साठी www.chess.com ( live chess) बघावे. मी. तिथे andykandy या नावाने आहे. तेथे मी खेळ्लेले गेम बघता येइल व मी किती पाण्यात आहे ते आजमवता येइल. तसेच अजुन कोणी तिथे असेल तर सांगावे.
  • Log in or register to post comments

ड्रॉ

बहुगुणी
Fri, 01/09/2015 - 19:39 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

अर्र, प्रगो, तुमचा प्रतिसाद वाचला नव्हता!!

बहुगुणी
Fri, 01/09/2015 - 19:46 नवीन
मी इतक्यातच ड्रॉ अपलोड केला !! क्षमस्व!
  • Log in or register to post comments

माझा सामना वल्ली यांच्याशी?

आतिवास
Fri, 01/09/2015 - 20:14 नवीन
माझा सामना वल्ली यांच्याशी? सरळ ''बाय'' देऊन टाकावा काय? नको. दहा खेळ्यांत वल्ली जिंकू नयेत - इतकं जमलं तरी खूप झालं म्हणेन! ;-)
  • Log in or register to post comments

अहो मी खूप कच्चा खेळाडू आहे

प्रचेतस
Fri, 01/09/2015 - 20:51 नवीन
अहो मी खूप कच्चा खेळाडू आहे हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

पूर्वी खूप बुद्धीबळ खेळलो आहे

श्रीगुरुजी
Fri, 01/09/2015 - 20:58 नवीन
पूर्वी खूप बुद्धीबळ खेळलो आहे. ३ वर्षे महाविद्यालयाच्या संघात देखील होतो. पण अलिकडे बर्‍याच दिवसात सराव नाही. ऑनलाईन स्पर्धेत सामील व्हायचा मोह होत आहे. परंतु वेळ जमत नाहीय्ये. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

स्पर्धेविषयी सूचना

बहुगुणी
Sat, 01/10/2015 - 02:10 नवीन
    • आधी लिहिल्याप्रमाणे १५ जानेवारीला स्पर्धा सुरू होईल.
    • स्पर्धेचा ड्रॉ वर दिला आहे. एकाच गटात पण दोन विभागांत 'नॉक आऊट' पद्धतीने स्पर्धा घेतली जाईल.
    • प्रत्येक दिवशी दोन सामने होतील.
    • प्रत्येक खेळाडूला विशिष्ट स्पर्धक क्रमांक दिलेला आहे, तो क्रमांक, आणि त्या त्या खेळाडूंचे लॉगिन व पासवर्ड ही सर्व माहिती या तक्त्यात आहे.
    • प्रत्येक दिवशी भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ६ वाजल्यापासून सामने सुरू होतील.
    • उभय खेळाडूंच्या सोयीनुसार सामना संध्याकाळी ६ ते दुसर्‍या दिवशी सकाळी १० पर्यंत केंव्हाही खेळता येईल, पण प्रत्येक सामना सुरू केल्यापासून प्रत्येकी ४० (दोन्ही खेळाडू मिळून ८०) चालीत आणि तीन तासांत संपला पाहिजे. (यामुळे, आंतर्जालाचं कनेक्शन खंडित होऊ शकण्याच्या शक्यता लक्षात घेऊन, प्रति-चाल दोन मिनिटे असे सक्त बंधन राहणार नसले तरीही एकूण वेळेच्या मर्यादेत मात्र सामना संपलाच पाहिजे.
    • एखादा सामना निर्धारित वेळेत बरोबरीत सुटला तर पुनर्युद्ध पुढील तीन तासांत घेण्यासाठी वेळ शिल्लक राहील. पहिला सामना बरोबरीत सुटला तर त्या जोडीमधेच अजून एक सामना घेतला जाईल, आणि तोही बरोबरीत सुटला तर त्या वेळच्या पट-स्थितीत ज्या खेळाडूचे मोहोर्‍यांचे सामर्थ्य आधिक असेल (आधिक मुख्य मोहोरी आणि आधिक प्यादी) त्या खेळाडूस मॉडरेटर विजयी घोषित करतील.
    • स्पर्धेसाठी मॉडरेटर म्हणून पैसाताई काम बघतील, त्यांचे आधीच मनःपूर्वक आभार!
    • स्पर्धकांना खेळण्यासाठी आधिक माहिती इथे आहे.
    • प्रेक्षकांना सामने पहाण्यासाठी माहिती इथे आहे.
    सर्व स्पर्धकांना हार्दिक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

महेश आणि मृत्युंजय

बहुगुणी
Mon, 01/12/2015 - 19:50 नवीन
खटपट्या आणि आनंद यांनी व्यनिमध्ये विचारलं आहे की त्यांचा सामना १७ ऐवजी १८ ला ठेवता येईल का? तुम्हा दोघांची हरकत नसेल तर तुम्ही दोघांनी तुमचा सामना १८ ऐवजी १७ ला ठेवला तर हे सहज शक्य होईल आणि इतर ड्रॉ बदलावा लागणार नाही. कॄपया इथेच होकार कळवा म्हणजे त्यांना कळेल. खटपट्या आणि आनंद: तुम्ही अमेरिकेतील पीएसटी वेळेची विनंती केलीत. महेश आणि मृत्युंजय यांनी त्यांचा सामना १७ ला पूर्ण केला तर तुम्ही १८ ला तुमच्या सोयीने पीएसटी वेळेत खेळा.
  • Log in or register to post comments

काही हरकत नाही

MaheshW
गुरुवार, 01/15/2015 - 12:08 नवीन
मृत्युंजय आपल्याला काही हरकत नसेल तर आपण आपला सामना १७ ला भारतीय वेळे नुसार संध्याकाळी ६ वाजता खेळू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

दुपारी जमेल काय? मी ३ पासुन

मृत्युन्जय
गुरुवार, 01/15/2015 - 16:14 नवीन
दुपारी जमेल काय? मी ३ पासुन सुरु करु शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: MaheshW

वेळेच गणित नाही जमत

MaheshW
गुरुवार, 01/15/2015 - 16:52 नवीन
मला वाटत आपण १८ लाच आपला सामना खेळूया. होणाऱ्या गैरसोयी बद्दल दिलगिरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

१७ ला रात्रे जमेल काय? असे

मृत्युन्जय
Fri, 01/16/2015 - 13:23 नवीन
१७ ला रात्रे जमेल काय? असे निराश नका होउ. वेगवेगळ्या वेळा तर सांगा कुठल्या जमतील ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: MaheshW

मिपाच्या पहिल्या-वहिल्या ऑनलाईन बुद्धीबळ स्पर्धेचे पडघम!

बहुगुणी
गुरुवार, 01/15/2015 - 06:58 नवीन
नमस्कार आणि भारतातील शुभ-सकाळ, मंडळी! मिपाच्या पहिल्या-वहिल्या ऑनलाईन बुद्धीबळ स्पर्धेचे पडघम वाजवतोय! आजचे दोन सामने खालीलप्रमाणे आहेत: १. गणपा आणि निराकार गाढव (स्पर्धक क्रमांक अनुक्रमे १ व २) २. नन्दादीप आणि राजेश के (स्पर्धक क्रमांक अनुक्रमे ११ व १२) खेळाडूंसाठी आणि प्रेक्षकांसाठी सूचना वरती दिलेल्या आहेत. खेळाडूंसाठी लॉगिन व पासवर्ड यांची माहिती या तक्त्यात आहे. सर्व खेळाडूंनी त्यांच्या सामन्याच्या वेळा या तक्त्यात आणि या धाग्यात द्यायला विसरू नका, म्हणजे प्रेक्षकांना सामने पहाणे सोपे जाईल. उभय प्रतिस्पर्धी खेळाडूंना शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

आजच्या सामन्यांच्या वेळा?

पैसा
गुरुवार, 01/15/2015 - 14:48 नवीन
आजच्या सामन्यांच्या वेळा कृपया अपडेट करा मंडळी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

वेळ

आतिवास
गुरुवार, 01/15/2015 - 16:18 नवीन
वल्ली, मी भारतीय वेळेच्या साडेतीन तास मागे आहे. पण आपला सामना रविवारी असल्याने अडचण येऊ नये. तसाही मी दहा मिनिटं टिकाव धरण्याशी मतलब ;-)
  • Log in or register to post comments

मी पण खूप कच्चा खेळाडू आहे हो

प्रचेतस
गुरुवार, 01/15/2015 - 18:01 नवीन
मी पण खूप कच्चा खेळाडू आहे हो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

उपाय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 01/15/2015 - 21:04 नवीन
प्रेक्षक म्हणुन मला लॉगीन करता येत नै ये काही उपाय ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

सामने कधी आहेत?

आनंद
गुरुवार, 01/15/2015 - 22:10 नवीन
सामने कधी आहेत? पहिला सामना बघण्याची उत्सुकता आहे.
  • Log in or register to post comments

बहुगुणी धावा!

पैसा
गुरुवार, 01/15/2015 - 23:04 नवीन
आजच्या दोन्ही सामन्यांच्या वेळा अपडेट मिळालेया नाहीत. आता काय करायचं? एका खेळाडूकडून काही कळलं नाही तर दुसर्‍याला पुढे चाल देता येईल. पण विअर्ड वीक्स वगळून इथे कोणीच अपडेट देत नाहीयेत. प्रेक्षक म्हणून लॉग इन पण करता आलं नाही त्या धाग्यावर.
  • Log in or register to post comments

प्रेक्षक म्हणून लॉग इन करता येतंय, पण....

बहुगुणी
Fri, 01/16/2015 - 07:06 नवीन
प्रेक्षक म्हणून लॉग इन करता येतंय, पण मला लॉगिन केल्यावर मिपा१, मिपा२, मिपा११ वा मिपा १२ यांपैकी कुणीच लॉगिन केलेलं (म्हणजे त्यांचे सामने चालू स्थितीत वा संपलेले) दिसले नाहीत! यांपैकी कुणालाच लॉगिन करता आलं नाही का? प्रेक्षकांसाठी लॉगिन 'MiPa3' आणि password 'Watch' वापरा.
  • Log in or register to post comments

खेळाडूंसाठी

पैसा
Fri, 01/16/2015 - 08:51 नवीन
खेळाडूंसाठी २ लॉग इन विंडो आहेत ना, प्रेक्षकांसाठी कोणती आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

मी खेळायला तयार आहे. भारतीय

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 01/16/2015 - 08:56 नवीन
मी खेळायला तयार आहे. भारतीय प्रमाणवेळ सायंकाळी ९.३० पासुन पुढे. कोणी ह्या वेळेत खेळायला उपलब्ध असेल तर नक्की कळवा.
  • Log in or register to post comments

मलाही तेच कळले नाही.दोन विंडो

अजया
Fri, 01/16/2015 - 08:57 नवीन
मलाही तेच कळले नाही.दोन विंडो दिसतात.पण सामना कसा पहायचा?
  • Log in or register to post comments

जर कोणी तयार असेल तर व्य.नि.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 01/16/2015 - 08:58 नवीन
जर कोणी तयार असेल तर व्य.नि. करा. म्हणजे दिवस ठरवता येईल..
  • Log in or register to post comments

प्रगो

पैसा
Fri, 01/16/2015 - 09:04 नवीन
प्रगो ला पार्टनर नव्हता. गणपा आणी निराकार गाढव ऑनलाईन दिसले नाहीत. पहिल्या मॅचाइवजी तुम्ही दोघे आज खेळू शकता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

चालण्यासारखं आहे. पण रात्री ९

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 01/16/2015 - 09:07 नवीन
चालण्यासारखं आहे. पण रात्री ९.३० ला. जर त्यांना जमत असेल तर सांगा. मी तयार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

ओके

प्रसाद गोडबोले
Fri, 01/16/2015 - 10:46 नवीन
See you IST 2130 hours - Captain Barbosa =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

आय आय फेलो पायरट!!!! २१३०

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 01/16/2015 - 14:24 नवीन
आय आय फेलो पायरट!!!! २१३० अवर्स. ओव्हर अँड औट!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

आपली नावं ड्रॉ मधे दिसत

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 01/16/2015 - 14:29 नवीन
आपली नावं ड्रॉ मधे दिसत नाहीयेत पण. क्या झोलझाल है?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

आरं बाबानो

पैसा
Fri, 01/16/2015 - 14:52 नवीन
तुम्ही बारावे आणि तेरावे आहात. गणपा आणि निराकार गाढव कालपासून आजपर्यंत ऑनलैन न दिसल्याने त्यांच्याऐवजी तुम्ही खेळा म्हटले. बहुगुणी आले की ड्रॉ अपडेट करतील. तोपर्यंत कप्तान मिपा १ आणि निराकार गाढवाच्या जागी प्रगो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

तोपर्यंत कप्तान मिपा १

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 01/16/2015 - 20:24 नवीन
तोपर्यंत कप्तान मिपा १ आणि
निराकार गाढवाच्या जागी प्रगो.
अत्यंत स्फोटक वाक्यरचना. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

निराकार गाढव हे आमच्या

प्रसाद गोडबोले
Fri, 01/16/2015 - 20:28 नवीन
निराकार गाढव हे आमच्या गुरुदेवांचा अगदी निराकार द्वेष करायचे , त्यांच्या जागी मला बसवुन पैसा ताईनी सूड उगवला आहे माझ्यावर गेल्या जन्मीचा . आणि निराकार गाढव कोण आहे हे शोधुन सांग की राव असे दुसर्‍या एका संपादकाला खोदुन खोदुन विचारले तरीही त्याने ते सांगण्याचे टाळले. शगले शंपादक दुश्त आहेत दुश्त दुदूदुदुदुदु :-\
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

अगागागागा!

पैसा
Fri, 01/16/2015 - 20:33 नवीन
प्रगोने गिर्जाकाकूच्या अवतारात मरणाचा गोंधळ घातला होता. आता निराकार गाढवाच्या बुटात पाय घालतो आहे! बाब्बौ!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

९.३० वाजता सुरु करु हो....जरा

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 01/16/2015 - 20:38 नवीन
९.३० वाजता सुरु करु हो....जरा कुत्र्याला फिरवुन आणतो मग खेळु....!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

कुत्र्याला वार्मप करुन घेताय

टवाळ कार्टा
Fri, 01/16/2015 - 20:55 नवीन
कुत्र्याला वार्मप करुन घेताय काय ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

वार्मप मला रे....!!!

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 01/16/2015 - 21:01 नवीन
वार्मप मला रे....!!! प्रगो करायचं का सुरु?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

क्षमस्व......

नन्दादीप
Fri, 01/16/2015 - 12:19 नवीन
मला काल संध्याकाळी आणी आज सकाळी वेळ न मिळाल्याने मी बाद.... क्षमस्व......
  • Log in or register to post comments

दुसरे राजेश?

पैसा
Fri, 01/16/2015 - 13:42 नवीन
राजेश के यांच्याशी काही संपर्क झाला होता का? ते तयार सतील तर आज राखीव दिवस म्हणून खेळू शकाल बहुधा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नन्दादीप

होय तयार आहे मी आज खेळायला.

Rajesh K
Fri, 01/16/2015 - 14:07 नवीन
होय तयार आहे मी आज खेळायला. जर नंदादीप आज सायंकाळी ६ वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार) उपलब्ध असतील तर. कळवा.
  • Log in or register to post comments

हजर..

ब़जरबट्टू
Fri, 01/16/2015 - 19:59 नवीन
आम्ही हजर आहोत. प्रतिस्पर्धी आलेत का हो ?
  • Log in or register to post comments

वियर्ड विक्स..

ब़जरबट्टू
Fri, 01/16/2015 - 20:01 नवीन
आले की कळवा बिगी बिगी... :)
  • Log in or register to post comments

आता काही

ब़जरबट्टू
Fri, 01/16/2015 - 20:09 नवीन
येत नाहीत.. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब़जरबट्टू
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा