✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

गोफ

ऋ — ऋषिकेश, Fri, 12/14/2007 - 23:54
  • गोफ - २

Book traversal links for गोफ

  • गोफ - २ ›

प्रतिक्रिया द्या
29159 वाचन

💬 प्रतिसाद (52)

हि एक..

प्राजु
Sat, 12/15/2007 - 00:00 नवीन
मनातल्या त्या क्षणाला शब्दरूप येईल का? शब्दामध्ये बांधला तर त्याला अर्थ येईल का? - प्राजु.
  • Log in or register to post comments

..

ऋषिकेश
Sat, 12/15/2007 - 00:05 नवीन
शब्द जितके वेगळे तितकेच ते वेंधळे मनातला सारा अर्थ शब्दातच मावेल का
  • Log in or register to post comments

हा घ्या प्रतिसाद

केशवसुमार
Sat, 12/15/2007 - 00:05 नवीन
चारोळीला चारोळीतून प्रतिसाद येईल का? प्रतिसादाला प्रतिसाद पण चारोळित राहील का?
  • Log in or register to post comments

:)

ऋषिकेश
Sat, 12/15/2007 - 00:06 नवीन
चारोळीला चारोळीतूनच प्रतिसाद येतो आहे साद चारोळीतून घातल्यावर दुसरी का अपेक्षा आहे?
  • Log in or register to post comments

जळ्ळं,

विसोबा खेचर
Sat, 12/15/2007 - 00:07 नवीन
आम्हाला काव्यातली एक ओळही लिहिता येत नाही याचा खेद वाटतो नाहीतर आम्हालाही आमच्या परिने हा गोफ विणता आला असता! :) असो, खेळ चालू द्या. आम्ही येथील चारोळ्या वाचू आणि आम्हाला उत्तम वाटलेल्या चारोळीला सव्वा अकरा रुपये बक्षिस देऊ! :) तात्या.
  • Log in or register to post comments

काय तात्या

देवदत्त
Sat, 12/15/2007 - 00:11 नवीन
काय तात्या , फक्त सव्वा अकराच? बघा जरा बक्षिस वाढवता येते का? ... मी ही प्रयत्न करतो मग ;) (कवितेतील ’वि’ न कळणारा पण बक्षिस लोभी) देवदत्त
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

वाहव्वा

आजानुकर्ण
Sat, 12/15/2007 - 00:09 नवीन
चहा आणि भजी सोबत खाल्ली मिरची टपरीवर बसायला वापरली होती खुर्ची (कशी आहे?) (सव्वा अकरा रुपये क्याश ओन्ली)
  • Log in or register to post comments

उत्तम!

विसोबा खेचर
Sat, 12/15/2007 - 00:10 नवीन
(कशी आहे?) उत्तम आहे! (सव्वा अकरा रुपये क्याश ओन्ली) Done! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

चारोळीला

प्राजु
Sat, 12/15/2007 - 00:09 नवीन
चारोळीला चारोळीतून प्रतिसाद आला आहे.. एका वीणीतून दुसरी वीण.. गोफ छान विणला आहे... - प्राजु.
  • Log in or register to post comments

पुढे चालू

आजानुकर्ण
Sat, 12/15/2007 - 00:12 नवीन
खुर्चीचा खिळा नको तिथं रुतला माझा जीव मात्र भजीमध्ये गुंतला
  • Log in or register to post comments

साद

केशवसुमार
Sat, 12/15/2007 - 00:13 नवीन
मी तिला साद दिली आणि भलतीच ओ आली तिच्या ऐवजी बाप येता पळता भुई थोडी झाली
  • Log in or register to post comments

बाप

आजानुकर्ण
Sat, 12/15/2007 - 00:14 नवीन
तिच्या बापाला पाहता सुरू होतात जुलाब ती मात्र डोक्यामध्ये माळते लाल गुलाब (ही चारोळी उडवू नका प्लीज. ही आमची सर्वोत्कृष्ट कलाकृती आहे.)
  • Log in or register to post comments

चारोळी

मनोज
Sat, 12/15/2007 - 00:15 नवीन
मन आणि क्षण यमक छान जुललय मलाही अता चारोळीच गमक कळलयं आपलाच, (यमक्या) मन्या
  • Log in or register to post comments

:))

ऋषिकेश
Sat, 12/15/2007 - 00:15 नवीन
प्रत्येक सादेला हवा तो प्रतिसाद.. यासाठी पूर्वपुण्याईच हवी नाहितर आपण म्हणत बसतो श्लोक... आणि समोरून ऐकु येते शिवी
  • Log in or register to post comments

थोडी वेगळी..

प्राजु
Sat, 12/15/2007 - 00:15 नवीन
गोफ विणता विणता धागे मनाचे जुळतिल का? मिसळ चाखता चाखता वाद्-विवाद संपतिल का? प्राजु (निखळ अस्वादासाठी आलेली)
  • Log in or register to post comments

वाद संपतील, पुन्हा सुरू होतील! :)

विसोबा खेचर
Sat, 12/15/2007 - 00:20 नवीन
गोफ विणता विणता धागे मनाचे जुळतिल का? मिसळ चाखता चाखता वाद्-विवाद संपतिल का? नक्की संपतील, मात्र पुन्हा सुरूही होऊ शकतील बरं! मात्र मनाचे धागे तसेच जुळलेले राहतील याची खात्री आहे!:) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

शिवी

बेसनलाडू
Sat, 12/15/2007 - 00:16 नवीन
शिवी म्हणजेच ओवी असते असाच इथला बाज आहे आपल्या ओवीभांडाराचा असा अनेकांना माज आहे (शिवराळ)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

ऐकू येता

आजानुकर्ण
Sat, 12/15/2007 - 00:17 नवीन
ऐकू येता शिवी आम्हीही मूठ वळतो कानाखाली बसल्यावर खरा अर्थ कळतो
  • Log in or register to post comments

शिवी आणी

प्राजु
Sat, 12/15/2007 - 00:18 नवीन
शिवी आणी ओवी दोहोंत जरा फरक आहे ओवी असेल तर स्वर्ग शिवी असेल तर नरक आहे.. - प्राजु.
  • Log in or register to post comments

नाते

ऋषिकेश
Sat, 12/15/2007 - 00:19 नवीन
गोफ आनि मिसळप्रेमींचे नाते आगळेच आहे भरपूर भांडूनही सार्‍याची वीण एकमेकांतच गुंतली आहे
  • Log in or register to post comments

चारोळी

आजानुकर्ण
Sat, 12/15/2007 - 00:19 नवीन
चारोळी म्हणजे चार ओळी एकाखाली एक मी घेतो क्याच बरोबर तू फक्त फेक ही मस्त झाली ना.
  • Log in or register to post comments

खाज

मनोज
Sat, 12/15/2007 - 00:20 नवीन
माला आहे माज मूळी नाही लाज सोडुन काम काज चारोळ्याइची खाज आपलाच, मन्या
  • Log in or register to post comments

शिवी

केशवसुमार
Sat, 12/15/2007 - 00:20 नवीन
आमची शिवी शिवी आणि त्यांच्या शिव्या श्लोक आहेत नाव बदलून लिहणारे इथे बरेच (बाराचे नव्हे!) लोक आहेत
  • Log in or register to post comments

नको करू

प्राजु
Sat, 12/15/2007 - 00:21 नवीन
नको करू माज.. चारोळ्या लिही खास.. मिसळ खाऊन झाल्यावर.. मनापासून हास.... - प्राजु.
  • Log in or register to post comments

मुठी

बेसनलाडू
Sat, 12/15/2007 - 00:21 नवीन
मुठी वळवणे, कान तापणे सज्जनतेचे लक्षण काय? विडंबनांची विष्ठा म्हणते रात्री केले भक्षण काय? ()बेसनलाडू
  • Log in or register to post comments

:)

विसोबा खेचर
Sat, 12/15/2007 - 00:37 नवीन
विडंबनांची विष्ठा म्हणते रात्री केले भक्षण काय? छानच! आम्हाला विडंबनाइतकीच ही चारोळीही आवडली! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

मिसळ

आजानुकर्ण
Sat, 12/15/2007 - 00:22 नवीन
कांदा, कोथिंबीर, रस्सा, फरसाण युक्त अशी सगळ्यांनाच आवडते इथे पावाबरोबर मिसळ दुसर्‍याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं स्वतःच्या डोळ्यातलं शोधावं लागतं मुसळ जमली नाही बॉ
  • Log in or register to post comments

साला आपला पण एक प्रयत्न!

विसोबा खेचर
Sat, 12/15/2007 - 00:23 नवीन
तात्याला आता तुरुंगात पाठवा, त्याच्या अपंग आईला घरबसल्या रडवा! असो..
  • Log in or register to post comments

चोरोळ्यां

प्राजु
Sat, 12/15/2007 - 00:24 नवीन
चोरोळ्यांची बरसात.. अशी काही बरसावी.. भांडणे सारी संपून.. मिसळपूरी'त रमावी.. (इथे मिसळ आणि पूरी असा अर्थ नव्हे.. कोल्हापूर सारखे मिसळपूर..)
  • Log in or register to post comments

चोरोळ्या

आजानुकर्ण
Sat, 12/15/2007 - 00:26 नवीन
हा समर्पक शब्द आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

मिसळपुरी..

विसोबा खेचर
Sat, 12/15/2007 - 00:31 नवीन
शब्द आवडला! :) (मिसळपुरीकर) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

नको वळू

प्राजु
Sat, 12/15/2007 - 00:28 नवीन
नको वळू मुठी अन नको तापवू कान मनासारखे न घडे सगळे हेची असुदे भान... प्राजु.
  • Log in or register to post comments

लघुत्तम

आजानुकर्ण
Sat, 12/15/2007 - 00:30 नवीन
एक दोन आला फोन
  • Log in or register to post comments

सतत मुठी

ऋषिकेश
Sat, 12/15/2007 - 00:31 नवीन
सतत मुठी वळवणे अन ते कान तापवणे दुसरं तिसरं काहि नसून मिसळीची चव बिघडवणे
  • Log in or register to post comments

हम्म

आजानुकर्ण
Sat, 12/15/2007 - 00:34 नवीन
तिचं माझं लग्न म्हणजे फक्त संसार थाटणे मी पळतो पुढे अन तिच्या हातात लाटणे
  • Log in or register to post comments

आपण सारे

प्राजु
Sat, 12/15/2007 - 00:35 नवीन
आपण सारे मिसळवासी.. नको ते छोले भटुरे.. कशाला खावे नको ते जे पोटात गुरगुरे.... - प्राजु.
  • Log in or register to post comments

:-)

ऋषिकेश
Sat, 12/15/2007 - 00:38 नवीन
तिचं माझं लग्न म्हणजे मिळून मिसळून वागणे तिने मस्तपणे खाणे अन मी भांडी विसळून झोपणे :))
  • Log in or register to post comments

ही ही ही

देवदत्त
Sat, 12/15/2007 - 01:00 नवीन
मस्त आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

लाटणे,

प्राजु
Sat, 12/15/2007 - 00:38 नवीन
लाटणे, भांडी, रवी, पळ्या फेका फेकी ची मजा यात.. कधी होते नवरा बायकोत कधी तात्याच्या हाटेलात.. - प्राजु.
  • Log in or register to post comments

क्या बात है..

देवदत्त
Sat, 12/15/2007 - 01:01 नवीन
मजा येतेय वाचायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

तात्याचा पाय,

विसोबा खेचर
Sat, 12/15/2007 - 00:43 नवीन
तात्याचा पाय, नेहमीच गोत्यात भरा त्याला पोत्यात अन दळा त्याला जात्यात!
  • Log in or register to post comments

हा हा...

प्राजु
Sat, 12/15/2007 - 00:45 नवीन
तात्या.. सह्हि.. धागा धागा विणूनी असे दृढ होत जावे नाते.. नव्या चारोळी सह भेटेन उद्या सध्या आपला निरोप घेते... - प्राजु.
  • Log in or register to post comments

बाय बाय, टाटा!

विसोबा खेचर
Sat, 12/15/2007 - 00:47 नवीन
नव्या चारोळी सह भेटेन उद्या सध्या आपला निरोप घेते... बाय बाय, टाटा! उद्या तुला नवी भांडणे वाचायला मिळोत हीच शुभकामना! :)) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

:) टी पी

मुक्तसुनीत
Sat, 12/15/2007 - 01:03 नवीन
निरोप कसला माझा घेता जेथे राघव तेथी सीता देता देता एके दिवशी दे हाता शरणांगता
  • Log in or register to post comments

निरोप

ऋषिकेश
Sat, 12/15/2007 - 01:23 नवीन
निरोप देणे... निरोप घेणे किती बरे हे जीवघेणे सतत जवळ असणार्‍याला दूर दूर जाताना पाहणे
  • Log in or register to post comments

भंकस !

मुक्तसुनीत
Sat, 12/15/2007 - 03:21 नवीन
येणे जाणे देणे घेणे नवे सूर अन नवे तराणे आता पुरे तुझे हे बहाणे आता कैसे येणे आता खुंटले येणे :-)
  • Log in or register to post comments

पुन्हा नव्याने

ऋषिकेश
Sat, 12/15/2007 - 03:33 नवीन
सूर नवे अन नवे तराणे भंकसही इथली चवीने घेणे जूने सारे मिटवूनी आता पुन्हा नव्याने मिसळ चापणे
  • Log in or register to post comments

बरोबर

बेसनलाडू
Sat, 12/15/2007 - 03:41 नवीन
नवे नाव अन नवे बहाणे नवेनवेसेच सोंग घेणे मिटवामिटवी कशाकशाची? कशाकशाची लाज वाटणे? (निर्लज्ज)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

पुढे चालू

मुक्तसुनीत
Sat, 12/15/2007 - 03:38 नवीन
जरा चुकीचे जरा बरोबर फितुर जाहले तुजला अंबर श्रीपाद वल्लभ दत्त दिगंबर विरु बसंती जय नि गब्बर !
  • Log in or register to post comments

अजून पुढे

ऋषिकेश
Sat, 12/15/2007 - 03:42 नवीन
श्रीपाद, वल्लभ, दत्त, दिगंबर विरु, बसंती, जय नि गब्बर ! आपण आठ मिळूनी टाकू मेंढिकोटचा डाव जब्बर! ;)))
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा