गुरुजिंचे भावं विश्व! भाग-१२
मागिल सर्व भागः-
http://misalpav.com/node/25298
http://misalpav.com/node/25318
http://misalpav.com/node/25527
http://misalpav.com/node/25626
http://misalpav.com/node/26585
http://misalpav.com/node/26703
http://misalpav.com/node/26846
http://misalpav.com/node/26933
http://misalpav.com/node/27236
http://misalpav.com/node/27525
http://misalpav.com/node/27831
म्हणजे पुढील आयुष्याचे कंकण धाडसानी मनगटावर बांधता येइल...! :)
======================
हम्म्म्म..
मग एकदाचं ते कसंबसं कन्यादान अवरतं.आणि परत आमची आपली पुढल्या गोष्टिंकडे नजर वळते. कंकणबंधनाच्या..सूत्रवेष्टणा'साठी मग तांब्यात सुतगुंडी टाकुन आंम्ही मुलामुलिच्या सजलेल्या करवल्या आणि अश्याच अजून दोन हौशी युवतींना यजमान संघातर्फे पाचारण करतो.आणि त्याही ड्रेस सावरत..मेकअप बरे-आहेत की नाहीत ते पहात स्टेज-धरतात. मग एक नेहमीचा प्रसंग येतो.आंम्ही या चौघींना सूत्रवेष्टणाचा तांब्या त्यातलं सूत्र जास्ती वेष्टं न होइल अश्या रितीनी,वेष्ट्वायला(समजावून) सांगून उभं करतो,आणि फोटुवाल्यांचं नेमकं तिथेच बिनसत!.. त्यांचं ते गुर्जी...ज...............रा,या बाजुनी या बाजुनी हे चालु झालं की आपलं टाळकं बंद पडायच्या बेताला येतं. एरवी आंम्ही मंगळसूत्र/लाजाहोम/सप्तपदीला फोटोकक्षेच्या जवळ जवळ बाहेरनच 'खेळत' असतो. पण इथे बाहेर पडायचं(फोटोवाल्यांसाठी) म्हणजे अंपायरनी स्टेडियम सोडण्यापैकीच! एकतर या पोरी/महिला/मुली..ज्या कोणी तो सूत्रवेष्टणाचा तांब्या फिरवायला येतात,त्या पहिली काहि मिनिटं..मूळ कामापेक्षा - आपला ड्रेस...त्यावरची ती ओढणी...चेहेर्यावरचा 'हलू' पहाणारा मेकप..(आणि..काहि प्रमाणात बटा!!!),हतात केवळ दृष्यमान होण्यासाठीच घेतलेलं रुमाल नामक,फक्त हतात नाचवायच फडकं! यात इतक्या गुंतलेल्या असतात..की वधूवरांच्या माने/कंबरेभोवती फिरवायच्या दोर्याचा गुंता'ची होइल.मग त्यांना आधी तयार करावं लागतं. कुणि कुठे आणि तिथेच्च का उभं रहायचं याची (नसलेली) शास्त्र सांगावी लागतात.
आणि मग विधिला सुरवात होते.वधूवरांना आमने-सामने बसवुन मानेभोवती/कंबरेभोवती वेढे मारणेत येतात.आणि त्याच सूत्रात हळकुंड बांधुन कंकण परस्पर हाती (एकदाचं) चढवून होतं.यातही त्या कंकणाची गाठ बसते ना बसते तोच कडेनी कुणितरी बसक्या अवाजाची म्हातारी नेहमीचा(ठरलेला) चेंडू टाकतेच-" उद्या...एका हतानी सोडायचं असतं हो...कंकण! ह्हॅ ह्हॅ ह्हॅ ह्हॅ!"
हे आज्जीबाईंच 'ह्हॅ ह्हॅ ह्हॅ ह्हॅ' अवरतं नं अवरतं तोच,फोटुवाला आंम्हाला मंगळसूत्रासाठीचं ताटं किंवा चौरंग मस्त "बनवा!" असं सुचवतो. ही फोटोवाल्यांची खास चलाखि असते. मग,"काहि विशेष विधि हे फोटोंसाठी अतीविशेष झालेले असतात,हेच खरं!" अशी आंम्हि(ही) आमच्या मनाची समजूत करवून घेऊन ते ताट अगर चौरंग घेऊन विड्याच्या पानांचं पंचदल किंवा तांदुळाचं अष्टदल अशी वेळेला खेळ(पुढे) मारून नेणारी इनस्टंट कलाकुसर करतो. आणि मग वेळ येते ती मंगळसूत्र वरानी वधूच्या गळ्यात घालण्याची. विवाह संस्कारातला हा सगळ्यात भारी शीन बरं का! आधी आजुबाजुच्या पब्लिक मधनं (हल्ली) काहि हौशी टाळ्या/शिट्ट्या येतात..मग वराला उद्देशून अडकला रे अडकला!!! अशी अरोळी पडते. किंवा मग- बकरं कटलं...!(त्यात मागून कुणितरी) कायमच! असाही अवाज येतो.आणि ह्या हल कल्लोळात आंम्ही आपली त्या मुलाला - "अता हे बघ हां,असा हात तिच्या डोक्यामागून घे आणि चेहेर्या समोर मंगळसूत्र धर बरं!" ........... "हां....छान.अता आधी फोटोग्राफर सांगतिल ते मंत्र ऐकायचे,आणि नंतर मी सांगेन ते म्हणायचे! आणि मंगळसूत्र गळ्यात घालायचं...काय???" वरः-" हो..............!" मग फोटोवाले , "जरा हात इकडे/तिकडे/वर/खाली...हां राइट राइट...नाऊ स्माइल..स्माइल.." असं करत तो वधूच्या चेहेर्यासमोर मंगळसूत्र धरण्याचा खास फोटो घेतात.आणि मग आंम्ही वराकडून ..म्हणा अता, "मांगल्यं तंतू... म्हणवत ते एकदाचं तिच्या गळ्यात घालवून नवर्या मुलासच समज देतो. "आपला जीव जपायची डबल जवाबदारी आपल्यावर बरं का अता!" तेव्हढ्यात ती मग्गाचची अज्जीबाई जवळ येते आणि आंम्हाला, "काय हो गुर्जी? फोटोवाल्यांना एव्हढा वेळ देता...थोडा आंम्हाला सगळ्यांना(???) बोलवायला द्यायचा..की....! कित्ती जणांचा हा विधी बघायचा मिस्स्स्स झाला..असे कसे तुंम्ही?..आं??" म्हणून उगाचच आमच्यावर तोंडसुख घेते. मग तिलाही आंम्ही.."अहो आजी...आजकाल विधिंना वेळ कमी आणि फोटोंना जास्त असच असतं...कुणितरी म्हटलच आहे-हल्ली विधिंचे फोटो नसून,फोटोंचेच विधी असतात!!!... काय?" यावर म्हातारी खौटपणे मग-"अस्सं होय..भारीच म्हणतात..म्हणणारे!" असा उलट दगड हाणून गर्दीत नाहिशी होते.
एव्हढं होता होता..मग गर्दितून कुठून तरी स्टेजच्या जवळ काहि आवाजी डायलॉग ऐकायला येऊ लागतात "अगं.... ती मंगळसूत्राची ओटी अत्ताच ना..???"..."हो नै तर काय उद्या?...जा...जाऊन आण लवकर!"..."आणते...आधी त्या गुर्जिंना सासुकडनं सुनबैच्या पायात ह्या जोडव्या विरोल्या घालायला सांग...चहा पिउन पिऊन विसरलेत..बहुतेक!" असा दुष्श्ष्टपणानी ( :-/ ) तिला आणि आंम्हाला संयुक्त दगड हाणते.आणि आंम्ही सा-वध होण्यापूर्वी मंगळसूत्राचे फोटो चाल्लेले असताना फोटोग्राफरनी ही चर्चा ऐकून सासूबैंसाठी तिथे पाट टाकलेला असतो. मग 'आपण विसरलेलो नसून काळजीपूर्वक अधिच तिथे "व्यवस्था" केलेली होती.' असा अभिनय चेहेर्यावर बाळगत..आंम्ही सासुबाईंना तिथे सूनबाईंना दागिने चढवण्यासाठी स्थानापन्न करून स्टेज खाली सटकतो... ते विवाहहोमाच्या तयारीला.............
आणि मग इथे, गुर्जी आणि यजमान पार्टी,यांच्यातला एक महत्वाचा दुवा (दुवाच तो!) अवतरतो...त्याचं सार्वनाम स्टेज'चं बघणारा पोर्या..गुर्जींचा हेल्पर असं काहिही ठेवलं तरी (कार्यालयातल्या) गुर्जी लोकांना ज्याचं खरं नाव ठाउक असतं...असा तो हा एकच! (हे रत्न...कोकणातलं असेल,तर विशेष तयार असतं.असा आमचा प्र'दीर्घ अनुभव आहे!) याचे आणि गुर्जीलोकांचे काहि खास बंध असतात..मग तो सुरु होतो.
तो:- काकानू....
मी:-(स्टेज'वर वैतागल्या मुळे..) काय रे!!!!!!!!!?
तो:-कुंड आनू???????????
मी:- नको!!!!!!!!!!!!!!!!!
तो:- असां कांय तों.........
मी:- विश्वास..अचरटपणा करू नकोस हां..बिडी मारायला पैसे नाय देणार नायतर
तो:- आं...चिडायचां नाय काकानू,मंग आमी मज्जा कोनाची करनार?
मी:-(भलताच संशय येऊन..) कोनाची करनार? मंजे??????????....मी चिडून ब्लडप्रेशर वाढवून अजिबात मरणार नाहीय्ये...काय समजलास??? होमकुंडं नी बाकिची तयारी घेऊन ये आधी...! अचरट माणूस..ज्जा..........
तो:- जल्ला कांय कल्ला नाय बग काका..का येवडा चिंडतस तें!!!
मी:-(रागानी..) मॅनेजरला हाक मारीन हां..........
तो:- (नीचपणानी...!) ह्ह्या...ह्या..ह्या... अरे काका हतच ठेवलाय ना श्टेजमागं... तुजा कुंड(????)
मी:-श्शी.............. विश्व्या....,अरे किती वेळा सांगितलय तुला? हा एक(तरी) शब्द पूर्ण उच्चारत जा म्हणून! कुंड काय??? आजुबाजुला कुणि ऐकलं तर काय वाटेल? कुंडं म्हणत जा नायतर होमकुंड म्हण.मंजे उच्चार चुकला तरी अर्थ बदलायचा नाही.
तो:- ब्वर..हा घे तुजा होमकुंड..आनी हा लायांचा ताट
मी:-आणि कुंडासमोर वधूवराचे पाट/पुजेचं ताट कोण लावणार??? आज काय विड्याखाली...नकोयत का?..हा अर्थपूर्ण बाण मात्र मग अचूक बसतो...आणि तो कुंडाभोवती रांगोळी कडेला सप्तपदी इत्यादी तयारीला लागल्यावर,मग आंम्ही वधूवरांस एकदाचे पाटावर घेतो...आणि शेला/उपरण्याची गाठ मारायला मुलिची (उखाण्यासह!)सवाष्ण बहीण/लाजाहोमातला हेल्पर कम कानपिळ्या..असा तो-मुलिचा भाऊ/त्याला मुलाच्याकडनं द्यायचा कानपिळीचा मान..असे अनेक पुढचे बाण हताशी घेऊन,,पुढील महत्वाच्या युद्धास तयार होतो...
ते
विवाहहोमाच्या..........विवाहहोम हे एक युद्धच असतं.अनेक बालशत्रू त्या पटांगणात उतरू पहात असतात. हे बालशत्रू मंजे लहान मुलं हे अगदी उघड आहे. ह्यांच्या आया सुद्धा नेमक्या याच वेळी मुलांना नाष्टा वगैरे करवून देऊन कार्यालयाच्या रणभूमीवर हल्ला करायला सोडून देतात. आणि स्वतः..."हिची साडी फक्त इकडच्याच लग्नात 'कशी(काय)' दिसते!?" वगैरे कालातीत चर्चांमधे गुंततात! मग त्यातली काहि मुलं,कुठून तरी अक्षतां मिळवून, त्याचा मारा दिसेल त्याच्यावर करायला सुरवात करतात. तर काहि कार्टी नेमकी आमच्या लाह्यांच्या ताटाकडेही सरकतात. मारामारीच्या प्रांतातलं लाह्या..,हे अत्यंत हार्मलेस साधन असल्याचं त्यांच्या बालबुद्धीला नेमकं लक्षात येतं.या सगळ्या हल्ल्यांमधून कसंबसं नवरामुलगा/मुलिला पाटावर बसवून,आंम्ही मुलिच्या बहिणिला गाठ मारायला बोलवतो. मग तिला आयत्या वेळेस गाठ मारताना घ्यायचा ठरवलेला उखाणा,अत्ता आपल्या गाठिशी नाही...हे अठवतं.आणि मग "गुर्जी..प्लीज तुंम्ही सांगा ना एखादा ठेवणीतला.." अश्या विनंत्या सुरु होतात.मग आंम्ही ............,चं नाव घेऊन,बांधते मंगल गाsssssठ गुर्जी आले मदतीला,कारण नव्हता उखाणा पाsssssठ!!! असा टाइम'बॉम्ब उडवतो... मग फोटुवाल्यांसह सगळे बेजान हसतात,आणि...खेळ पुढे सरकतो! ============== क्रमशः .......
Book traversal links for गुरुजिंचे भावं विश्व! भाग-१२
वर्गीकरण
प्रतिक्रिया
धमाल !
+१
पुर्वार्धात पहिलं लग्न होऊन
मस्त हो गुरुजी!
फुल्टू धमाल.............!!!!!
मस्तच हो गुर्जी. वाचतोय.
मस्त!! आणखी एकदोन 'ठेवणीतले'
इस्पीकचा एक्का
>>>> अर्र्रे... लै वेळा
हाहा , बुव्या पेटलाय
:-)
मस्तच.
मला ही सर्व मालिका कैच्याकै
@मुलीचे वडील वारलेले असल्यास
आई नसल्यास??
@आई नसल्यास??>>> एकट्या
___/\___ मस्त हो गुरुजी!
१) मुलिच्या आईची 'इच्छा'
मी या बाबतीत २ निर्णय यजमानां
+१
@त्यात गुरूजींना मी
या निमित्तानी...आज..आणखि काही थोडेसे:-
मी चालू विवाह संस्कारात काहि बदल केलेले आहेत,ते मांडतो. १) मुलिचे वडील मुलाच्या वडिलांना आमची मुलगी दहा प्रकारच्या दोषांनी रहित असल्याची खात्री देणारा,अभिवचन वजा श्लोक वदवून घेण्याचा विधी, मी काढून टाकलेला आहे. अव्यंगे,अक्लीबे,अपतिते(इत्यादी प्रकारचे..) दशदोष विवर्जिते इमां कन्यां प्रदास्यामी देवाग्नि द्विज संन्निधौ २) शचीपूजनातला श्लोक मुलिला समजाऊन सांगून,बदलवून म्हणवुन घेतो. देवेंद्राणी नमस्तुभ्यं देवेंद्रप्रीय भामिनी विवाहभाग्यमारोग्यं संतती* लाभं च देही मे (हा शब्द बदल, व्याकरण दृष्ट्या बरोबर की चूक..हे मला माहित नाही..पण परिणाम-कारक आहे,हे मात्र नक्की!) *मूळ श्लोकातः- पुत्र लाभं च देही मे..असं आहे! ३)तसेच... विवाहाच्या अदल्या दिवशी संध्याकाळी केला जाणारा, वांङ्निश्चय..हा विधी निरर्र्थक असल्याचं मी सांगून पहातो.ऐकलं..तर फक्त व्याही भेट/सिमांत पूजन आणि नंतर मुलिची पूजा करवून वस्त्र/ओटी/औक्षण..इत्यादी करवून विषय संपवतो. पण याला फारसा पाठिंबा मिळत नाही. हीच गोष्ट रुखवताचे भोजन ह्या संपूर्ण दिखाऊ विधीच्या बाबतीतही घडते.तो तर गैरलागू झालेला विधी आहे.पण तो फोटोत-जाऊन बसलेला असल्यानी...उष्टावण केल्यासारखा करावाच लागतो!आपल्यासारखे पुरोहित जास्त नसतात हो
खरच. आपल्याला सगळे नाही तरी
अवांतर
धाय धाय
कुंतुन कुंतुन अथव्न
अच्रत बव्लत
अच्रत बव्लत
@ह्याचे कॉपीराईट्स चुचू
अत बल्गम्दल्व येतत
एक नंबर विचार आणि उपाय !
मस्त !!!
जबराट लिहिलंय! बुवांचा
बुवेश्वर भटजी.
वाचतीये हो गुरुजी! सगळी फिल्म
खरेच छान समजावून सांगितले आहेत तुम्ही.
सन्माननीय संमं
अहो त्या त्यांच्या मुलीसाठी
अर्रर्र
मस्त चाललीये लेखमाला
मस्त लेखमालेतील
गुर्जी लै तयारीचे हैत.
१)रेवती
प्रतिसाद आवडला
@ त्या जेव्हा पौरोहित्य करतात
+१
प्रचलीत धर्मव्यवस्थेवर समाजाचा आवश्यक असा रेटा पडला,तरच हे घडू शकेल."समाजाचा आवश्यक असा रेटा" हीच खरी लाखाची गोष्ट... मग ती धर्मव्यवस्था असो वा राजकारण !मस्त!