काळू बाळू
कधीकाळी लहान असताना दूरदर्शनवर काळूबाळूचा तमाशा - वगनाट्य पाहील्याचे आठवते. कदाचीत मुलाखती देखील ऐकल्या असतील. पण विसरून गेलो होतो. आत्ता म.टा. मधे तमाशा कलावंत 'बाळू' कालवश बातमी वाचली. काळू चे २०११ ला निधन झाले आणि ८२ वर्षीय बाळूचे काल निधन झाले... त्यातली माहीती वाचताना लक्षात आले की असे रुढार्थाने माध्यमात प्रसिध्दीत नसलेले कलाकार पण न बोलता समाजासाठी कसे काम करत असतात.
म.टा. मधील बातमीतील काही महत्वाचा भाग खाली चिकटवत आहे...
दरवर्षी ठिकठिकाणच्या यात्रांतून ते तंबू लावून तमाशा फड गाजवायचे. अर्ध शतकाहून अधिक काळ रसिकांवर अधिराज्य गाजविलेल्या या जोडीने तमाशातून अस्पृश्यता, अंधश्रध्दा आणि भ्रष्टाचाराच्या विरोधातही वगनाट्याद्वारे सतत संदेश देण्याचा प्रयत्न केला. अनेक मंदिरे, शाळांना त्यांनी आपल्यापरीने मदतही केली. रयत शिक्षणसंस्थेच्या कवलापूर शाखेलाही भरीव आर्थिक मदत केली, इतकेच नव्हे तर मोफत कार्यक्रम देऊन निधी गोळा करण्यास हातभार लावला. वयाच्या सोळाव्या वर्षापासून 'काळू-बाळूंनी' वगनाट्य पेश करायला सुरुवात केली. हजरजबाबीपणा त्यांच्या अंगाअंगात मुरला होता. त्यामुळेच जमलेल्या तमाशा शौकिनांवर ते लागलीच पकड घ्यायचे. विशेष म्हणजे १९६१ साली त्यांचा दिल्लीत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासमोर वगनाट्याचा कार्यक्रम झाला होता आणि इंदिराजींनी तो पाहून या दोघांचे कौतुक केले. यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई यांनीही त्यांच्या पाठीवर सतत कौतुकाची थाप मारली. १९९८ मध्ये त्यांना राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. तर २००० मध्ये संगीत नाटक अकादमीचा मानाचा पुरस्कार मिळाला. पुणे महापालिकेतर्फे २००५ मध्ये लोकशाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार लाभला. लहान-मोठ्या अनेक सामाजिक व सांस्कृतिक संस्थांचे त्यांना पुरस्कार मिळाले. एकदा तर काळूच्या मुलीचे भाजल्याने निधन झाले. बातमी कळली. पण दोघांनीही आपले दु:ख बाजूला ठेवून आधी ठरल्याप्रमाणे आपले तमाशा प्रयोग सादर केले. अशा कितीतरी महत्वपूर्ण घटना त्यांच्या जीवनात घडल्या.या कलाकार बंधुंच्या जोडीस श्रध्दांजली.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
काळू बाळू या कलाकार बंधुंच्या जोडीस श्रध्दांजली
टिव्हीवर म्हणा किंवा कसाही,
श्रद्धांजली !
श्रद्धांजली.
श्रद्धांजली
+१
गावात लग्नामधुन यांच्या
दूरदर्शनवरच यांचे कार्यक्रम
लहानपणी काळू-बाळू यांचे
काळू बाळू लोकनाटय
संपादकीय