✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

प्रयाग राज कुंभ मेळा :भारताचा अक्षय गौरव

D
dr sanjay honkalse यांनी
Mon, 02/04/2013 - 19:48  ·  लेख
लेख
प्रयाग राज कुंभ मेळा :भारताचा अक्षय गौरव.-डॉक .संजय होनकळसे drsanjayhonkalse@gmail.com भारत भूमीत क्वचितच असं कुणी असेल कि ज्याने कुभ मेळ्य़ा बद्दल ऐकल नसेल.साऱ्या जगात कुंभ मेळा एक आश्चर्य जनक उत्सव आहे, ज्यात भारतीय समाज,संस्कृती,धर्म ,वैविध्य संपूर्णपणे समन्वित असत,अस मानल जात. या व्यतिरिक्त कुंभ मेळा आज प्रचंड आर्थिक उलाढालीच, अभ्यासाच ,संशोधनाच साधन व व्यवस्थापनाचा उत्कृष्ट उदाहरण आहे. मी स्वतः माझ्या व्यवस्थापनशास्त्राच्या प्रत्येक वर्गात पंढरीचीवारी, कुंभ मेळा यावर व्यवस्थापन, जागतिक वित्तीय उलाढालीच माध्यम,व Mega/Macro Managementचा उत्कृष्ट नमूना यावर प्रोजेक्ट घेत असतो.कुंभ मेळा आज जगातील प्रचंड आर्थिक उलाढाल असलेल आश्चर्य जनक भारतीय सांस्कृतीच पारंपारिक संम्मेलन आहे , आणि म्हणूनच भारताचा अक्षय गौरव आहे.खरतर अध्यात्मिकांक (Spiritual Quotient )जर स्वीकारला व विकसित केला तर व्यक्तिमत्व विकास व व्यवस्थापन उत्कृष्टपणे साधला जाऊ शकतो या ठाम मताचा मी आहे व त्यानुसार मी त्यावर एक पुस्तक पण लिहिले आहे जे अमेरिकेत प्रकाशित झले आहे MANAGEMENT BY SPIRITUAL QUOTIENT :THE POWER OF FAITH .PUBLISH AMERICA PUBLICATION ) हे अस जागतिक दृष्ट्या आश्चर्य असलेल मेळा , संमेलन भरण्याचे स्थळ ना कुण्या दिग्विजयी राजाची वा शासकीय राजधानी असते ना एखादे वाणिज्य प्रधान ऐश्वर्य नगर असते ते असते भारतातील प्रमुख,पवित्र तीर्थ क्षेत्र होत.तसेच हे संमेलन भरण्याचा समय राजकीय वा सामाजिक आधारावर निर्धारित नसतो तर शास्त्रोक्त पद्धतीनुसार खगोलीय ग्रह,राशी, नक्षत्र,यांच्या विशिष्ट संयोगाधरीत असते.याचा उद्देश भौक्तीक,अध्यात्मिक प्रगती ,व शाश्वत जगत कल्याण साध्य करणे हे आहे. भारतवासी किती धार्मिक व भावूक आहेत याच सर्वोत्तम प्रमाण कुंभ मेळा आहे.जगात कुठेही अशा प्रकारचा व इतका भव्य दिव्य मेळा नाही. याच्या भव्यतेची कल्पनाही इतर राष्ट्र करू शकत नाही.एवढेच नव्हे तर हा मेळावा भरवण्यात ना कुणी उद्योजक,ना आव्हाहन कर्ता, ना संवाद दाता ,ना सभापती ना सभा,ना संचालक वा संचालन,कुठल्याही आमंत्रणवा निमंत्रणाशिवाय आज करोडो भाविक,भारतीय , अनिवासी भारतीय,व परदेशी कुंभ मेळ्याला अत्यंत श्रद्धापूर्वक हजर राहतात व धर्मामृताचा आस्वाद घेतात.या मुळे महाकुंभाला आता " जगत कुंभाचे" (GLOBAL VILLAGE चे) स्वरूप प्राप्त झाले आहे .:"जेथे कैक जण विविध भाषा, संस्कृती,धर्म ,विविध विचारधारा असलेले भाविक एकत्र येतात, कैक जण तर कल्पवास (मेळाव्याच्या ठिकाणी कमीत कमी चाळीस दिवस निवास,साधना, जप तप ,अनुष्ठान करणे).या शतकात तर अनेक परदेशी साधक अत्यंत भाऊक पणे व श्रद्धापूर्वक वर्दी लावतात याचा प्रस्तुत लेखक साक्षीदार आहे.या सर्वामुळे एकजूटतेचा अभाव असलेली"dying race ""म्हणून भारतास हिंणवनाऱ्याना तोंडात बॉट घालण्यास भाग पाडतात. कुंभ मेळ्याचा उल्लेख गरुड पुराण( I -२४०,)रामायण (III ३४-३७),महाभारत( I -२५)ई. मध्ये आढळतो . पौराणिक कथेनुसार एकदा दुर्वास ऋषींनी इंद्राला अमरावतीत (स्वर्गाच्या राजधानीत)भेट देऊन त्याला वैजयंतीमाळ दिली पण त्यास महत्व न देत ती माळ इंद्राने ऐरावत या आपल्या हत्तीच्या गळ्यात घातली ती त्या ऐरावताच्या पायाखाली तुडवली गेली .हे समजल्यावर दुर्वास कोपित झाले व त्यांच्या शापामुळे इंद्राला लक्ष्मीची अवकृपा होऊन दारिद्र्य आले तेंवा इंद्राने महलक्षमी अष्टक रचून लक्ष्मीची कृपा प्राप्त केली व त्यामुळे पुनर्वैभव प्राप्तीसाठी हिमालयाच्या उत्तर क्षीरसागरात सागर मंथनाची तयारी झाली . त्यानुसार स्वयं विष्णूने कूर्मरूप धारण करून मंदार पर्वताला पाठीवर घेऊन, वासुकीरूपी दंडाने मंथन /चर्वण करून पुष्पक, पारिजात, कौस्तुभ, विष, व अमृतकुंभ घेऊन धन्वंतरी प्रकट झाले. त्या अमृतावर हक्क दाखवण्यासाठी सूर असुरांत द्वंद निर्माण झाले ते बारा दिवस ,देवांचे बारा दिवस म्हणजे पृथ्वीवरील बारा वर्ष,चालले. त्यादरम्यान इंद्रपुत्र जयंत तो अमृत कुंभ घेऊन पळाला त्या दरम्यान त्यातील अमृत काही प्रमाणात चार दिवसात चार ठिकाणी पृथ्वीवर सांडले त्या चार ठिकाणी तेंव्हापासून कुम्भ पर्व साजरे केले जाते. ती चार ठिकाणे म्हणजे १- हरिद्वार, २- प्रयागराज , ३-उज्जैन, व ४-नासिक.देवांचे बारा दिवस म्हणजे मानव्सामाजाचे बारा वर्ष , म्हणून दर बारा वर्षांनी त्या त्या ठिकाणी कुंभ भरतो सूर्य, चंद्र, व गुरु अमृतकुंभाचे रक्षण करण्याचे कार्य करीत होते म्हणून हे ग्रह जेंव्हा विशिष्ट राशींमध्ये संयोग करतात तेंव्हा ,बारा वर्षांनी, कुंभ मेळा भरतो. असा संयोग यावर्षी तीर्थराज प्रयाग येथे होत आहे व येथील त्रिवेणी संगमात हा मेळा जानेवारी १४ ते मार्च १० २०१३ या ५५ दिवस भरत आहे. कुंभ पर्व पौराणिक काळापासून जरी साजरे केले जात असले तरी १० व्या शतकात आदि शंकराचार्य यांनी याचे संघटन केले व मेळ्यास संघटनात्मक स्वरूप प्राप्त करून दिले .त्यांनी साधूंचे संघटन केले व कुंभ मेळ्यास प्रतिष्ठा व संघटनात्मक रूप दिले व पुढे हे संमेलन परिपुष्ट होत जाऊन त्याला आजचे महत्व व कीर्ती प्राप्त होउन त्याने विश्वस्वरूप प्राप्त केले आहे .म्हणून या कुंभ पर्वत हजोरो साधू संत यांना दीक्षा दिली जाते, भ्रमाचारी साधू यांना नागा दीक्षा दिली जाते प्रयाग येथे त्रिवेणी संगमामुळे येथील कुंभ पुण्यतर मानला आहे माघ महिन्यात चंद्र सूर्य मकर राशीत राशीत असता सूर्य,चंद्र , गुरु यांच्या इलेक्ट्रो-मग्नेटिक तरांगामुळे त्रिवेणीतील पाणी charged होऊन त्याचे फायदे मिळतात,ठराविक खगोलीय परीस्तीतीत (astronomical situations मुळे )असे electro -magnetic तरंग तयार होतात हे आजच्या शास्त्रीय संशोधनात सिद्ध झाले आहे व त्याच्या परिणामांचा अभ्यास पण होत आहे हे बुद्धीजीवी बुद्धिवादी प्रभुती लक्षात घेतीलच. त्यातूनही याखागोलीय संयोगात मकर सूर्य संक्रमण, मौनी अमावस्या, वसंत पंचमी, व महाशिवरात्र या दिवसांत खगोलीय वातावरण अधिकच भरलेले असते असते त्यावेळी पूर्वापार राजे ,महाराजे स्नान करीत असत त्याला शाही स्नान म्हणतात आजच्या युगात राजेशाही जरी लुप्त झाली असली तर्री यादिवासातील स्नानास आजही शाही सणांच म्हणतात.आज या स्नानाचा मानं साधू संत ,सिद्ध महात्मे घेतात .मुहूर्ताच्या वेळी सर्वसाधूंचे त्यांच्या आखाड्यानुसार मिरवणूक काढून वाजत गाजत स्नान होते (आदि शंकराचार्य यांनी सर्व साधू संत यांचे विविध आखाड्यान मध्ये विभाजन केले,असे आज जवळ जवळ १४ आखाडे आहेत)तसेच संत, महात्मे , यति, किन्नर,सिद्ध, महात्मे या पर्वत एकत्र येतात .जग पर्सिद्ध सिद्ध महावतार बाबाजी( जे परमहंस योगानंद यांच्या "Autobiography of yogi :(मराठीत योगी कथामृत) या जग प्रसिद्ध पुस्तक्द्वारे जगापुढे आले ,ज्यांनी पंतजल योगाचे,आजचे प्रचलित स्वरुप याचे,पुनर रोपण केले,(REF:"महावतार बाबाजी":डॉक संजय होनकळसे:गुरुतत्व प्रकाशन,कोल्हापूर.)यांनी युक्तेश्वर(परमहंस योगानंद यांचे गुरु ) यांना याच कुंभ मेळ्याच्या १८९१ च्या पर्वात दर्शन व उपदेश केला . "तीर्थे कुर्वन्ति साधक: " . आज कित्येक लोकांना येथे गलिच्छ पण जाणवते तसाच काहीसे मत युक्त्श्वारांचे होते त्या बद्दलचे संभाषण व बाबाजींचा उपदेश वाचण्यासारखा आहे जिज्ञासूंनी तो वरील पुस्तकात जरूर वाचवा .प्रस्तुत लेखकांस हरिद्वार,प्रयाग, नासिक व उज्जैन येथ असे शाही स्नान घेण्याचे भाग्य लाभले आहे आज या पर्वामुळे व भारतातील संत महात्मे, सिध्द गुरु,अवतार या मुले भारत आज देवभूमी, पुण्यभूमी epitome of world म्हणून आधात्मिक जगतात मान मिळवून आहे. quantum physics मुळे आज अध्यात्म व शास्त्र यातील दरी कमी होऊ पाहत आहे , देव कण (god particles ) यांचे अस्तित्व आज जग मान्य करीत आहे.अश्या पर्वत, अग्निहोत्र पद्धतीने केलेल्या सोमयाग,वाजपेय यज्ञात असे देवकण निर्माण होत असतात. भारतातील महाराष्ट्रातील संत जयंत आठवले यांच्या शरीरातून देवकण प्रसूत झाले आहेत जग व शास्त्रज्ञ आज ते स्वीकारीत आहेत पहा http://www.spiritualresearchfoundation.org/articles/id/spiritualresearch/spritualscience/sainthood/subtle-picture-hh-jayant-athavale# या विषयावर डॉक. दुर्गेश सामंत व श्रीमती अंजली गाडगीळ यांनी पुणे येथील MIT येथ भरलेल्या ‘Indian Aerobiological Society’ १७ व्या अधिवेशनात संशोधन पत्रिका सादर केली आहे विशाज्ञानाद्धाराच साधन होत आहे. व भारतास मार्ग प्रदीपक बनवीत आहे.विषयांतराचे धारिष्ट्य करण्याचे कारण हेच कि देवत्वाची संकल्पना आता SCIENCE हि मान्य करीत आहे. science हि देवत्वाचं अस्तिव आजही स्वीकारू शकत नसले तरी नाकारू शकत नाहित हे बुद्धिवादी पण बुद्धिमान व्यक्तींनी लक्षात घाव्ये.याचाही पाया भारतातील बोस यांनी गेली शतकाच्या सुरुवातीला घातला हेही महत्वाचे. ( Bose theory of God Particles ) या सर्वामुळे भारत आज मानव जातीच्या विविध समस्यांचे समाधान स्थान बनत आहे.व नित्य आत्मा व अनित्य शरीर या देव दानव रुपी संग्रामातून, आत्म मंथनातून विवेक जागृत करणार अस हे कुंभ पर्व आत्म ज्ञान उद्धाराच साधन होत आहे. व भारतास मार्ग प्रदीपक बनत आहे dr sanjay honkalse -- dr.sanjay honkalse.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धर्म
प्रवास
लेखनप्रकार (Writing Type)
लेख
अनुभव

प्रतिक्रिया द्या
16662 वाचन

💬 प्रतिसाद (74)

प्रतिक्रिया

ह्म्म... हल्ली कुंभ मेळाव्यात

मदनबाण
गुरुवार, 02/07/2013 - 21:06 नवीन
ह्म्म... हल्ली कुंभ मेळाव्यात एकसे एक बाबा मंडळी पाहायला मिळतात. यातल्या काही बाबा मंडळींची नावे सुद्धा अगदी अल्टीमेट असतात्.उदा. हिरोहोंडा बाबा, मोबाईल बाबा, हॅलिकॉप्टर बाबा !
  • Log in or register to post comments

सैनिक का?

धन्या
गुरुवार, 02/07/2013 - 21:25 नवीन
प्रतिसाद मार्मिक आहे म्हणून म्हटलं. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

हा प्रतिसाद मला असल्यास, तो

मदनबाण
गुरुवार, 02/07/2013 - 21:36 नवीन
हा प्रतिसाद मला असल्यास, तो मला समजला नाही. बाकी ज्या बाबां विषयी मी लिहले आहे त्याचे फोटु तुम्हाला पहायला मिळतील. http://daily.bhaskar.com/article/MK-NE-mahakumbh-sadhus-with-queer-names-4150383-PHO.html वरती अकुंनी ज्या ललनांचे फोटो टाकले आहेत,त्या फोटोंचा मूळ स्त्रोत हीच साईट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

आने दो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 02/07/2013 - 21:45 नवीन
बाणा, अजून येऊ दे रे फोटो कुंभमेळ्याचे. Image removed. बर्फानी बाबा. मु.पो.हरयाना. निरंजनी आखाडा. [माहिती आणि छायाचित्र सौजन्य] इलेक्ट्रो-मग्नेटिक तरंग आणि त्रिवेणीतील पाण्याने महाराजांचा रंग बदलला की काय ? [सॉरी हं डॉक्टरसाहेब] (महाराज मला क्षमा करा हं) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

महाकुंभ ही फोटोग्राफर

मदनबाण
गुरुवार, 02/07/2013 - 22:03 नवीन
महाकुंभ ही फोटोग्राफर मंडळींच्या दॄष्टीने देखील पर्वणीच म्हणायला हवी. या कुंभपर्वातील फोटोंचे काही दुवे इथे देतो. http://www.boston.com/bigpicture/2013/01/maha_kumbh_mela.html http://indiatoday.intoday.in/gallery/mahakumbh-naga-sadhus-kumbh-mela-makar-sankranti-sangam-ganga/1/8607.html http://www.telegraph.co.uk/news/picturegalleries/worldnews/7222387/pictures-Hindus-gather-for-the-Kumbh-Mela-in-India-and-Maha-Shivaratri-in-Nepal.html http://www.independent.co.uk/news/world/asia/in-pictures-indias-maha-kumbh-mela-festival-8449731.html?action=gallery
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त दुवे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 02/07/2013 - 22:15 नवीन
बाणा, फोटो भारीच आहेत. महाकाली बाबा, स्नानं, नखं वाढलेले बाबा, शेकोटीला गळ्यात पाय अट्कून हात पाय शेकणारे बाबा, आणि गंगेच्या प्रवाहात घसरुन जीवावर बेतलेले बाबा हे सर्व चमत्कारिक आणि........ असो. भावना नको कोणाच्या दुखवायला. :) बाणा, नाश्कात कुंभमेळा होईल तेव्हा जाऊ आपण हा सोहळा बघायला आणि भरपूर फोटो काढू या भव्य सोहळ्याचे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

तुलाच होता...

धन्या
गुरुवार, 02/07/2013 - 22:11 नवीन
तू नांवे दिलेल्या बाबांवर मार्मिकमध्ये एक लेख आला होता नुकताच. आणि मार्मिकचा फॅनवर्ग वेगळा आहे म्हणून. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

बाणा, नाश्कात कुंभमेळा होईल

मदनबाण
गुरुवार, 02/07/2013 - 22:52 नवीन
बाणा, नाश्कात कुंभमेळा होईल तेव्हा जाऊ आपण हा सोहळा बघायला आणि भरपूर फोटो काढू या भव्य सोहळ्याचे. नागा साधु प्रसन्न होवोत आणि तसा योग जुळुन येवो ! ;) मला नक्कीच आवडेल तुमच्या बरोबर भटकंती करायला आणि फोटु काढायला. :) @धन्या अच्छा,असं हाय काय ! मला मार्मिकच्या लेखा बद्धल ठावूक नव्हते म्हणुन माझा बल्ब पेटला नाही. :)
  • Log in or register to post comments

डॉ. होनसाळे प्रतिवाद करू शकत नाहीत किंवा टाळतायत

संजय क्षीरसागर
Fri, 02/08/2013 - 00:02 नवीन
हे कळायला मार्ग नाही. त्यामुळे
आत्मतत्त्व स्थिर, अपरिवर्तनीय आणि व्यापक आहे त्याचं कोणत्याही प्रकारे मंथन किंवा शुद्धीकरण होऊ शकत नाही याची आपल्याला कल्पना आहे काय? तुम्ही जर वरील विधानचा प्रतिवाद करू शकला नाहीत तर कुंभस्नान व्यर्थ असून तुमचं सर्वसंशोधन निराधार आहे असा निष्कर्ष निघेल.
हा निष्कर्ष योग्य ठरतो. वरील कोणत्याही विधानांचा दाखला न देता देखील कुंभमेळा ही निरर्थक अध्यात्मिक प्रक्रिया आहे हे निश्चीतपणे सांगून माझा या पोस्टवरचा सहभाग संपवतो.
  • Log in or register to post comments

डॉक. संजय होनकळसे मिपावर एकदा

धन्या
Fri, 02/08/2013 - 00:11 नवीन
डॉक. संजय होनकळसे मिपावर एकदा लेख टाकला की त्याकडे पुन्हा ढुंकूनही पाहत नाहीत. त्यामुळे तुम्ही काहीही निष्कर्ष काढला तरी त्यांना शष्प फरक पडत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

अजून एक...

धन्या
Fri, 02/08/2013 - 00:16 नवीन
त्यांचं आडनांव होनकळसे आहे, होनसाळे नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

संजु साहेब

अग्निकोल्हा
Fri, 02/08/2013 - 00:13 नवीन
आत्मतत्त्व स्थिर, अपरिवर्तनीय आणि व्यापक आहे त्याचं कोणत्याही प्रकारे मंथन किंवा शुद्धीकरण होऊ शकत नाही याची आपल्याला कल्पना आहे काय?
आत्मतत्त्व स्थिर, अपरिवर्तनीय आणि व्यापक आहे हे अजिबात पटतं नाही. सविस्तर समजवाल काय ? विनंती करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

आधी तुम्ही आम्हाला आत्मतत्व

धन्या
Fri, 02/08/2013 - 00:19 नवीन
आधी तुम्ही आम्हाला आत्मतत्व म्हणजे काय ते समजावून सांगा. आमची तिथपासून बोंब आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

हेच मलाही माहित करुन घ्यायचं होतं कि मुळात आत्मतत्व म्हणजे काय ?

अग्निकोल्हा
Fri, 02/08/2013 - 00:31 नवीन
आणि सगळ जग इतकं प्रवाही असताना नेमकं तेच कसं स्थिर, अपरिवर्तनीय वगैरे आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

डॉ `होनकळसे' अशी चूक दुरूस्त करतो!

संजय क्षीरसागर
Fri, 02/08/2013 - 00:35 नवीन
त्यांचं संशोधन आणि हा लेख ज्या मुद्यावर आहे त्याविषयी लिहून कुंभस्नानाची व्यर्थता दाखवून देणं इतकाच प्रतिसादाचा हेतू होता. त्यांच्या प्रतिसादावर ती उत्तरं येऊ शकली असती पण आता ते विषयांतर होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

विषयांतर होईल असं वाटत नाही.

धन्या
Fri, 02/08/2013 - 00:43 नवीन
जे मुद्दे तुम्ही डॉ. होनकळसेंच्या प्रतिसादानंतर मांडणार होतात ते मुद्दे तुम्ही आता तुमच्या एका प्रतिसादात सलग लिहा. आणि हो, सुरुवात आत्मतत्व म्हणजे काय इथपासून करा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

कुंभस्नानानं आत्ममंथन होऊ शकत नाही हा मुद्दा आहे

संजय क्षीरसागर
Fri, 02/08/2013 - 01:04 नवीन
आता `आत्ममंथन कसं होतं' हे होनकळसे लिहीत नाहीत तोपर्यंत `आत्मतत्व म्हणजे काय' वगैरे लिहीण्यात मला स्वारस्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

डोक्यावर हात मारुन घेण्याची

धन्या
Fri, 02/08/2013 - 01:42 नवीन
डोक्यावर हात मारुन घेण्याची स्मायली कल्पावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

कल्पना कशाला?

पैसा
Fri, 02/08/2013 - 08:09 नवीन
ही घे. : | :|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

असं करुया...

अग्निकोल्हा
Fri, 02/08/2013 - 01:51 नवीन
बरं आता असं समजुया कुंभस्नानाने उच्चमेचा रवी दक्षिणेत चक्रि होउन व्ययतेला उदान असताना स्वस्थानी पुनरोक्त ठरत असल्याने क्रुतीला समभाग बऊन वसिस्ठा अप्सित श्रुमायाक्ताने अप्रस्तुत ठेऊन आप्तिस्त्राव शुध्दतेतुन क्लिकर्श, मिकर्श, व परामर्श यांयांसखोल नादन व्युरक्तो आत्ममंथन होतं असं होनकळसे (अथवा मी )म्हणत आहे. यावर तुम्हाला काय म्हणाय्चे आहे ते सांगायला सुरुवात करा व आमच काय चुकतय ते हि सांगा ? शुभ काम मे देरि क्यों ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

आमच्या माहितीनुसार मराठी,

धन्या
Fri, 02/08/2013 - 20:51 नवीन
आमच्या माहितीनुसार मराठी, संस्कृत आणि हिंदी या तीनच भाषा देवनागरी लिपी वापरतात. तुम्ही वर देवनागरी लिपीत लिहिलेली काही वाक्ये कुठल्यातरी चौथ्या भाषेतील दिसतात. कुठली आहे ही भाषा? सप्तम स्थानातील रवीला वैतागलेला, धनंजय होनसागर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

तुमच्या माहितीपुढे मी लिटरली पामर असल्याने...

अग्निकोल्हा
Fri, 02/08/2013 - 21:26 नवीन
धनाजीराव मला क्षमा करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

सूज्ञजन हो!

संजय क्षीरसागर
Fri, 02/08/2013 - 11:24 नवीन
संशोधन होनकळसेंचं, त्यांनी स्वतः चार वेळा कुंभस्नान केलंय, वेगवेगळे दाखले दिलेत तेच प्रतिवाद करू शकतील. त्यांना ओपन इनवीटेशन दिलंय त्यामुळे माझ्या तयारीचा प्रश्न नाही. तस्मात डोक्यावर हात मारून किंवा मतीगुंग करणारे असे प्रतिसाद :
कुंभस्नानाने उच्चमेचा रवी दक्षिणेत चक्रि होउन व्ययतेला उदान असताना स्वस्थानी पुनरोक्त ठरत असल्याने क्रुतीला समभाग बऊन वसिस्ठा अप्सित श्रुमायाक्ताने अप्रस्तुत ठेऊन आप्तिस्त्राव शुध्दतेतुन क्लिकर्श, मिकर्श, व परामर्श यांयांसखोल नादन व्युरक्तो आत्ममंथन होतं
देण्यापेक्षा होनकळश्यांना पाचारण करा!
  • Log in or register to post comments

करेक्ट मी इफ आय एम व्राँग

अग्निकोल्हा
Fri, 02/08/2013 - 20:16 नवीन
आत्मतत्त्व स्थिर, अपरिवर्तनीय आणि व्यापक आहे त्याचं कोणत्याही प्रकारे मंथन किंवा शुद्धीकरण होऊ शकत नाही याची आपल्याला कल्पना आहे काय?
हे तुम्हिच होनकळसेंना सार्वजनीक रित्या म्हटलयं (व्यनी/खरड न्हवे).. बरोबर ? याचा अर्थ तुम्हाला आत्मतत्व माहित आहे.. बरोबर ? मग ते सांगा म्हटल्यावर होनकळसे हवेतच कशाला ?
तस्मात डोक्यावर हात मारून किंवा मतीगुंग करणारे असे प्रतिसाद :
का तुम्हाला आत्मतत्व म्हणजे जे काय आहे, ते सांगण्यापेक्षा होनकळसेंना चुकिचे ठरवण्यात जास्त रस आहे ? तसं असेल तर स्पष्ट बोलावे. _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा