Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by शुचि on Fri, 02/08/2013 - 03:38
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव
मत
डिसक्लेमर - कन्या राशीचे लोक व विशेषतः शुक्र ६ व्या घरात पडलेले लोक हे अतिशय व्यग्र व कर्तव्यपरायण असतात. यांच्या प्रेमाची अभिव्यक्ती ही "उपयोगी पडण्याकडे" खूप असते. पण ते रुक्ष नसतात, या ज्योतिषशास्त्राच्या समजूतीवर बेतलेला हा लेख असून ज्यांना ज्योतिषाचे वावडे असेल त्यांनी आताच दुसरा धागा उघडावा. ____________________________________________________________________ एकदा तुझे खूप लाड करायचे आहेत. अगदी मन भरुन, तुझ्या गालांवरुन, कानांवरुन अलगद हाताची बोटे फिरवत, तुझ्याही तनामनाच्या तारा झंकारुन उठाव्यात असे. अन नंतर तुझे पाय चेपून द्यायचे आहेत, तळवे चोळून. आवडेल तुला? आणि हो हे सर्व केव्हा तुला मनसोक्त चांगलं चुंगलं करुन खायला घातल्यानंतर. तू मला अरसिक म्हणणार मला माहीत आहे. कारण तुझ्या प्रेमाची अभिव्यक्ती म्हणजे कामधाम सोडून, कविता वाचणे, सूर्यास्त अनुभवणे व अन्य .... पण ते सर्व "इम्पल्सिव्ह" अगदी मनस्वी, कलंदरपणे. मलादेखील ते सर्व अनुभवायचे आहे रे पण मी पडले "कन्या रास आणि ६ व्या घरात शुक्र" पडलेली प्रेयसी. फारशी काव्यात जगणारी नाही. 'वहावत जाणं" तर मला माहीतच नाही. मी, आपल्या प्रियतम व्यक्तीच्या "उपयोगी" पडण्याकडे कल असलेली. म्हणजे बघ - कोणी मला २ पर्याय दिले की मी तुझी सर्वात लाडकी प्रेरणा बनू शकेन अथवा तुझ्या आयुष्याच्या संध्याकाळी तुझा आधार व तुझी सहचारी बनू शकेन तर २ रा पर्यायच अतिशय आनंदाने निवडणारी. नवरंग सिनेमातील "जमुना" याच अगदी याच पठडीतली. बरेचदा माझं असं वागणं तुला त्रासदायक होतं याचीही मला जाणीव आहे.म्हणजे सकाळी तू लाडात यावं आणि मी तुला आंघोळ, मुखपक्षालनाकरता पिटाळावं हाच आपला नॉर्म (नेहेमीचं). रात्री तुला एखादी गाण्याची अथवा कसेही मैफिल जागवण्याची हुक्की यावी पण माझ्या कर्तव्यदक्षतेमुळे , दुसर्‍या दिवशीच्या रुटीनच्या विवंचनेमुळे आपण तो बेत रद्द करावा हे अनेकदा घडतं. "यु आर नेव्हर इन द मोमेंट" ही तुझी नेहमीची तक्रार आणि त्यावर माझं उत्तर ठरलेलं - "कामंधामं सोडून कोण रमणार कलेत? चल सोड मला चिक्कार पसारा पडलाय" "काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात, क्षितीजाच्या पलीकडे ऊभे दिवसाचे दूत" अशा कर्तव्यपरायणताप्रधान ओळी कुसुमाग्रजांना आमच्यासारख्या लोकांकडे पाहूनच सुचल्या असाव्यात. पण याचा अर्थ असा नाही की मला तुझ्याबरोबर सूर्यास्त अनुभवायचा नाही. मलाही एक कविता तुझ्याबरोबर अनुभवायची आहे, अगदी तुझ्याशी तादात्म्य पावून, त्या कवितेला तुझ्या डोळ्यांतून वाचत. मलाही वाटतं तुझा हात हातात घेऊन,एकदा तरी सूर्यास्त निवांतपणे अनुभवेन. कधीतरी सगळं 'परफेक्ट" असेल, आणि माझ्या लगबगीची जरुरी नसेल. येईल असा दिवस नक्की येईल.
  • Log in or register to post comments
  • 19671 views

प्रतिक्रिया

Submitted by पिवळा डांबिस on Fri, 02/08/2013 - 03:45

Permalink

हम्म!

कठीण आहे.... त्या ६व्या घरातल्या कन्येच्या प्रियकराचं!!!! :(
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Fri, 02/08/2013 - 03:47

In reply to हम्म! by पिवळा डांबिस

Permalink

हाहाहा

हाहाहा :) कठीण काय हो पिडां त्यात? सगळं पर्फेक्ट असेल तर शी कॅन ओपन अप :(
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on Fri, 02/08/2013 - 03:58

In reply to हाहाहा by शुचि

Permalink

हो, पण..

सगळं पर्फेक्ट असेल तर शी कॅन ओपन अप
हो, पण तोपर्यंत "गाढव मेलं वझ्यानं, आन शिंगरू हेलपाट्यानं!!!" त्यापेक्षा 'माझ्याशि मयतरि कर्नार कं?' च्या घाऊक इ-मेल्स पाठवणं जास्त सोपं!!! :)
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Fri, 02/08/2013 - 04:04

In reply to हो, पण.. by पिवळा डांबिस

Permalink

खरंय. शुक्राची उच्चीची रास

=)) खरंय. शुक्राची उच्चीची रास मीन. त्या न्यायाने १२ वे स्थान शुक्रास अधिक लाभदायक. ६ वे हे घर बरोब्बर १८ अंशातून विरुद्ध. त्यामुळे शुक्र येथे थोडा फ्रस्ट्रेट होतोच. बाकी जाणकार अधिक पप्रकाश टाकतीलच. मलातरी "जनाबाई" चे उदाहरण म्हणजे ६ व्या घरातील उच्चीच्या अर्थात मीनेच्या शुक्राचे वाटते. ६ वे घर कारण तिने कामात, रगाड्यात आनंद मिळवला, कविता केल्या, ईश्वराशी तादत्म्य साधले. ६ वे घर हे नोकरी, काम, व्यग्रता आदिचे निदर्शक आहे तसेच अन्य गोष्टी म्हणजे रोग, रिपु वगैरेही याच्या कारकत्वाखाली येतात पण ते अलाहिदा.
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Fri, 02/08/2013 - 04:08

In reply to खरंय. शुक्राची उच्चीची रास by शुचि

Permalink

१८० अंश*

१८० अंश*
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद on Fri, 02/08/2013 - 07:19

In reply to १८० अंश* by शुचि

Permalink

पाहतो

पण शुक्र स्वस्थानाला पाह्तो. त्याचे (शुक्र योग्य नक्षत्रात असेल तर) फायदे मिळणारच. चांगल्या रसिक गोष्टींवर, उंची मद्य, उंची अत्तरे वगैरे वर होईल वगैरे.
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Fri, 02/08/2013 - 07:23

In reply to पाहतो by निनाद

Permalink

धन्यवाद निनाद

प्रत्येक ग्रहाची दृष्टी वेगवेगळी असते ना? शुक्र स्वत;पासून ७ व्या घराला पाहतो का? अ‍ॅस्पेक्ट्स/दृष्टी याबद्दल अजून तितकेसे वाचले नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद on Fri, 02/08/2013 - 07:39

In reply to धन्यवाद निनाद by शुचि

Permalink

७ वी

७ वी दृष्टी बाय डिफॉल्ट येतेच ना. इतर दृष्ट्या मात्र निरनिराळ्या. फक्त एकच ग्रह भाव घेऊन विश्लेषण करणे अवघड वाटते. येथे मनाचा विचार करत आहात, शिवाय सुख म्हणजे चौथा भाव. जोडीदारासंबंधित म्हणजे सप्तम, यात महत्त्वाचा भाव चंद्र आणि त्याला पाहणारे ग्रह यांची स्थिती कळल्या शिवाय कसे काय निष्कर्ष काढावेत? हे तर किमान कळलेच पाहिजे शिवाय बृहस्पती काय अवस्थेत आहे? त्याची दृष्टी कुठे आहे? यावर प्रेमाची गुणवत्ता पाहता येईल. मग ठरवता येईल पसारा प्रेमाने आवरला जातोय की मंगळाचा त्रागा त्यात आहे ते :)
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Fri, 02/08/2013 - 08:53

In reply to ७ वी by निनाद

Permalink

पण थोडंफार जनरलायझेशन करता

पण थोडंफार जनरलायझेशन करता येईलच की :) मला हे शब्दचित्र इतकं स्पेसिफिक नको होतं. जनरलाइज्ड हवं होतं.
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on Fri, 02/08/2013 - 10:18

In reply to ७ वी by निनाद

Permalink

आँ???

चर्चा नक्की कोणत्या भाषेत सुरु आहे तेच कळेना झालय.
  • Log in or register to post comments

Submitted by राही on Fri, 02/08/2013 - 11:09

In reply to ७ वी by निनाद

Permalink

रिपुस्थानचा शुक्र

माझ्या मते सहावे स्थान हे शुक्राला योग्य स्थान नव्हे.ग्रह कितीही उच्चीचा असला तरी स्थानदोष येतोच.दृष्टी,योग महत्त्वाचे आहेतच,तरीही रोगस्थानी पडलेला शुक्र प्रणयाला हीनता आणतो.विषयलोलुपता,लंपटपणा दर्शवतो.
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Fri, 02/08/2013 - 19:25

In reply to रिपुस्थानचा शुक्र by राही

Permalink

मध्यंतरी मी वाचले की

मध्यंतरी मी वाचले की पत्रिकेतील कोणताही योग घ्या, त्याला २ बाजू असतात - सकारात्मक व थोडी नकारात्मक. पैकी ६ व्या घरातील शुक्राची काही ऋण बाजू असू शकेल. नव्हे आहेच. मान्य आहे. पाश्चात्य पद्धतीचे ज्योतिषविषयक लेख वाचताना त्या लोकांचा व्यावहारीक दृष्टीकोन खूप जाण॑वला. एखाद्या स्थानातील ग्रहाची/योगाची/दृष्टीची व्यवहारात काय परिणीती होते ते शिकावयास मिळाले.
  • Log in or register to post comments

Submitted by पुष्करिणी on Fri, 02/08/2013 - 08:00

In reply to १८० अंश* by शुचि

Permalink

हायला, जनाबाई आणि माझं हे

हायला, जनाबाई आणि माझं हे स्थान सेम टू सेम :),
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Fri, 02/08/2013 - 08:22

Permalink

प्रेयसीची जन्मरास मेष आणि

प्रेयसीची जन्मरास मेष आणि लग्नरास वॄश्चिक असेल आणि तिच्या प्रथमस्थानी रवि-मंगळाची युती असेल तर तिच्या प्रियकराच्या कुंडलीत कोणत्याही स्थानी असलेला शुक्र धावतपळत सहाव्या स्थानात येतो. ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Fri, 02/08/2013 - 08:50

In reply to प्रेयसीची जन्मरास मेष आणि by नगरीनिरंजन

Permalink

हाहा!!

=)) हाहा!!
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on Fri, 02/08/2013 - 10:19

In reply to प्रेयसीची जन्मरास मेष आणि by नगरीनिरंजन

Permalink

---/\---

अग्गाग्गाया.......फुटलोय. वारलोय
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Fri, 02/08/2013 - 21:19

In reply to प्रेयसीची जन्मरास मेष आणि by नगरीनिरंजन

Permalink

प्रेयसीची जन्मरास मेष आणि

प्रेयसीची जन्मरास मेष आणि लग्नरास वॄश्चिक असेल आणि तिच्या प्रथमस्थानी रवि-मंगळाची युती असेल
प्रचलित ज्योतिषशास्त्र प्रमाण मानून : त्या बिचार्‍याला रोज आत्महत्या करावीशी वाटत असेल. :D
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Fri, 02/08/2013 - 10:27

Permalink

खिक्

खिक् :) योग्य त्या परिचित व्यक्तीस दुवा फॉरवर्डला आहे ;)
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Fri, 02/08/2013 - 18:12

In reply to खिक् by ऋषिकेश

Permalink

गुंडोपंत की काय? मी

गुंडोपंत की काय? मी गुंडोपंतांचे ज्योतिषविषयक लेख खूप मिस करते.
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Sat, 02/09/2013 - 19:46

In reply to गुंडोपंत की काय? मी by शुचि

Permalink

धोंडोपंत

म्हणायचे आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Sat, 02/09/2013 - 19:52

In reply to धोंडोपंत by वेताळ

Permalink

होय

धोंडोपंतच. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by निशांत५ on Fri, 02/08/2013 - 10:38

Permalink

येउच् द्या मग तो दिवस

येउच् द्या मग तो दिवस
  • Log in or register to post comments

Submitted by अमोल केळकर on Fri, 02/08/2013 - 10:58

Permalink

-

डिसक्लेमर - आवडले अमोल केळकर ( पत्रिका काढून घेण्यासाठी इथे भेट द्या :) )
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 02/08/2013 - 10:58

Permalink

अवघड आहे ब्वॉ या कन्येच्या

अवघड आहे ब्वॉ या कन्येच्या प्रियकराचं =)) अगदी सहमत आहे पिडांकाकांशी.
  • Log in or register to post comments

Submitted by नक्शत्त्रा on Fri, 02/08/2013 - 11:16

Permalink

--मनोबाशी सहमत ...

चर्चा नक्की कोणत्या भाषेत सुरु आहे तेच कळेना झालय.
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Fri, 02/08/2013 - 11:48

Permalink

कन्या प्रभावी स्त्रीचे वर्णन

कन्या प्रभावी स्त्रीचे वर्णन एका ठिकाणी होते, की ती नौकाविहार करत असते, आणि एकीकडे कणसे भाजण्यात मग्न असते! ;) काहिसे असेImage removed.
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Fri, 02/08/2013 - 18:31

In reply to कन्या प्रभावी स्त्रीचे वर्णन by कवितानागेश

Permalink

अगदी योग्य मुद्दा मांडलास

अगदी योग्य मुद्दा मांडलास लिमाऊ. हीच ती कर्तव्यपरायणता, दक्षता, व्यग्रता. मला एक कन्या लग्न/कन्या चंद्र बाई माहीते आहेत. त्यांचं घर टापटीप ठेवणं, एकंदर कामाचा उरक इतका लाजवाब आहे. कुटुंबाच्या इतक्या "उपयोगी" त्या पडल्या आहेते; शी इज अ‍ॅन अ‍ॅसेट!!! अमेझिंग!! कन्या राशीचे गुण खरच अग्नीराशींसारखे भडक (फ्लॅशी) किंवा उठून दिसणारे नसतील पण खूप आहेत, सॉलीड म्हणजे काँक्रीट आहेत, व्यावहारीक आहेत. कन्या रास रॉक्स (झिंदाबाद) :)
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Fri, 02/08/2013 - 20:12

In reply to अगदी योग्य मुद्दा मांडलास by शुचि

Permalink

कर्तव्यपरायणता, दक्षता,

कर्तव्यपरायणता, दक्षता, व्यग्रता. मला एक कन्या लग्न/कन्या चंद्र बाई माहीते आहेत. त्यांचं घर टापटीप ठेवणं, एकंदर कामाचा उरक पण मी काय म्हणते, हे सगळे प्रकार कोणत्याही राशीच्या बाईला सर्वसाधारणपणे करावेच लागतात ना! आजकाल अनेक बायका (त्यात मीही) म्हणत असतात "अगं काय सांगू, मागल्या अठवड्यात वेळच नाही मिळाला, आता अमूक एक गोष्ट करते, पुन्हा पुढचा अठवडा बिझी." त्या सगळ्या कन्या राशीच्या असतात का? हेच पुरुषांच्या बाबतीतही लागू होईल. मला टापटिप, स्वच्छता आवडते, मी घर व्यवस्थित ठेवणे याला प्राधान्य देते (असे समज) पण माझी रास कन्या नाही. पत्रिकेत (किंवा जो कागद आहे त्यावर)तर वृषभ ल्हिलीये. आता काय म्हणावे? हे आणि एवढेच नाही तर आतापर्यंत अमूक एका राशीची लक्षणे टाईप जे जे वाचले/ऐकले आहेत त्यात जवळ्जवळ सगळ्यांना अरे, ही आपली रास नसूनही आपण अमूक एक गोष्ट करतो असे आढळून येईल. एखादी गोष्ट आपल्याला आधी आवडत नाही आणि नंतर एकदम आपल्याला साक्षात्कार होतो की, हैला! मला शिवणकाम आवडत नव्हतं, आता फार आवडतं. ही उदाहरणे आहेत. यामुळे माझा भयंकर गोंधळ उडतो.
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Fri, 02/08/2013 - 20:29

In reply to कर्तव्यपरायणता, दक्षता, by रेवती

Permalink

रेवती मी जे नीरीक्षण केले आहे

रेवती मी जे नीरीक्षण केले आहे त्यात - या कन्या बाईंचा उरक, स्वच्छतेची आवड, टापटीपपणा अक्षरक्षः "पर्फेक्शन" ला पोहोचलेला वाटला मला. तू वृषभ राशीची आहेस मला माहीत आहे. एका लेखात तू लिहीले होतेस हे मला आठवते(विश्वास नसेल तर अजून सांगते तुझा मुलगा सिंहेचा आहे :)) पण कोणास ठाऊक ही वृषभ रास ६ व्या घरात पडलेली असेल. म्हणजे तुझे लग्न ९ = धनु असेल. किंवा कन्येत स्टॅलिअम (बरेच ग्रह एकत्रित पडणे) असेल. तेव्हा एकंदर कन्येचा प्रभाव बघावा लागेल. मला नेहमी वाटते - तू ज्या रीतीने पाकृ लिहीतेस, एकदा तू योगा (सूर्यनमस्कार) नेहमी करत असल्याचा उल्लेख केला होतास, तुझ्यावर कन्येचा प्रभाव असू शकतो. कन्या ही आरोग्यविषयक सतर्क, दक्ष व कर्तव्तनिष्ठ रास आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Fri, 02/08/2013 - 20:29

In reply to रेवती मी जे नीरीक्षण केले आहे by शुचि

Permalink

सॉरी चूकीची स्मायली पडली आहे

सॉरी चूकीची स्मायली पडली आहे :(
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Fri, 02/08/2013 - 21:56

In reply to सॉरी चूकीची स्मायली पडली आहे by शुचि

Permalink

हो. आहे की! सिंह राशीचाच आहे.

हो. आहे की! सिंह राशीचाच आहे. तुला कसे माहित? पळा पळा. आणखी गोंधळ! ;) बाबौ! पत्रिकावाल्यांना बरंच काही कळतं असं वाटायला लागलय. माझा खरंतर विश्वास नव्हता, अजूनही गोंधळ आहे. विश्वास आहे असेही म्हणू शकत नाही. दोन जणांनी आमच्याबद्दल फारशी माहिती नसलेल्यांनी काय काय सांगितलेलेही जणूकाही भूत, भविष्यातले दिसत असावे असे बरोबर सांगितल्याने मला हेरगिरीचा संशय आला होता पण पत्रिका प्रकरणावर विश्वास बसला नव्हता/नाही. त त प प. अवांतर: ते चिंतुकाकाही असंच काही ओळखतात वाटतं.
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Fri, 02/08/2013 - 22:05

In reply to हो. आहे की! सिंह राशीचाच आहे. by रेवती

Permalink

स्वतःची पोस्ट एडिट कशी करता

स्वतःची पोस्ट एडिट कशी करता आली तुला?
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Fri, 02/08/2013 - 22:18

In reply to स्वतःची पोस्ट एडिट कशी करता by यशोधरा

Permalink

माझ्याजागी संपादक व्हायचे

माझ्याजागी संपादक व्हायचे असल्यास तुलाही करता येईल. ;) विनोद सोडून दे. नीलकांत स्वसंपादनाची सुविधा देणार आहे वाटते सगळ्यांना.
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Fri, 02/08/2013 - 22:21

In reply to माझ्याजागी संपादक व्हायचे by रेवती

Permalink

माझ्याजागी संपादक व्हायचे

माझ्याजागी संपादक व्हायचे असल्यास >> LOL! :D केवढी लालूच ती! त्यापेक्षा मी तुलाच सांगेन माझ्या पोस्टी एडिट करायला! कसं? :P
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Sat, 02/09/2013 - 00:02

In reply to माझ्याजागी संपादक व्हायचे by यशोधरा

Permalink

हो. चालेल.

हो. चालेल. :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Fri, 02/08/2013 - 11:55

Permalink

काहींचा शुक्र कुठेही असो माणस

काहींचा शुक्र कुठेही असो माणस फुल्ल्टू गंडलेली असतात.
  • Log in or register to post comments

Submitted by नाना चेंगट on Fri, 02/08/2013 - 12:52

Permalink

गंमतीशीर

गंमतीशीर
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Fri, 02/08/2013 - 13:03

Permalink

मजेशीर

यातले ग्रह राशी याबद्दल आपल्याला काही म्हणायचे नाही, पण एकूण प्रसंग आहे मजेशीर!
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Fri, 02/08/2013 - 13:22

Permalink

माझी आणि कामदेवाची कुंडली एकच

माझी आणि कामदेवाची कुंडली एकच असल्याने मला तशी काय चिंता नाय. फक्त शंकर नावाच्या माणसांपासून मी अंमळ लांब राह्तो.
  • Log in or register to post comments

Submitted by नाना चेंगट on Fri, 02/08/2013 - 13:23

In reply to माझी आणि कामदेवाची कुंडली एकच by परिकथेतील राजकुमार

Permalink

>>>फक्त शंकर नावाच्या

>>>फक्त शंकर नावाच्या माणसांपासून मी अंमळ लांब राह्तो. हायकोडताने परवानगी दिली आहे, घाबरायची गरज नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by इष्टुर फाकडा on Mon, 02/11/2013 - 20:23

In reply to >>>फक्त शंकर नावाच्या by नाना चेंगट

Permalink

खी खी खी

नान्बा फारच जोकी बुवा तुम्ही :)
  • Log in or register to post comments

Submitted by jaypal on Fri, 02/08/2013 - 14:09

Permalink

तेज्याआयला कीती कीती वर्स झाली

म्हनुन सांगु आम्च्या राशीला कन्याच येत न्ह्याय वो :-( वाट बघुन ष्यान शुक्र पार अस्तंगत व्ह्याया आलाया. काय तर उपाय सुचवा शुक्राची वात विजायच्या आत
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Fri, 02/08/2013 - 14:21

In reply to तेज्याआयला कीती कीती वर्स झाली by jaypal

Permalink

सहा नंबर घरात शिफ्ट व्हा..

सहा नंबर घरात शिफ्ट व्हा.. कन्या आणि शुक्र दोन्ही मिळतील ;)
  • Log in or register to post comments
Profile picture for user अग्निकोल्हा

Submitted by अग्निकोल्हा on Fri, 02/08/2013 - 20:10

In reply to सहा नंबर घरात शिफ्ट व्हा.. by ऋषिकेश

Permalink

हा सहा नंबरी शिफ्ट व्हायचा

हा सहा नंबरी शिफ्ट व्हायचा ऑप्शन बहुदा लागु पडणार नाही, कारण कन्या आणि शुक्र एकाच देहात आपलं सॉरी घरात त्यांना नक्किच नकोय ;)
  • Log in or register to post comments

Submitted by दादा कोंडके on Fri, 02/08/2013 - 18:16

In reply to तेज्याआयला कीती कीती वर्स झाली by jaypal

Permalink

हा हा..

काय तर उपाय सुचवा शुक्राची वात विजायच्या आत
फिस्सकन हसलो एकदम. :D
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Fri, 02/08/2013 - 18:18

In reply to हा हा.. by दादा कोंडके

Permalink

+१

मी सुद्धा :)
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Fri, 02/08/2013 - 21:35

Permalink

सहाव्या स्थानातील शुक्र म्हणे

सहाव्या स्थानातील शुक्र म्हणे नोकरीची कधी काळजी वाटू देत नाही. एक नोकरी गेली तर लगेच दुसरी मिळते म्हणे. अजून काय काय करतो सहाव्या स्थानातील शुक्र? आमच्याही सहाव्या स्थानात शुक्र आहे म्हणून म्हटलं. जोडीला जन्मरास सिंह, लग्नरास सिंह, द्वितीय स्थानात शनी मंगळाची युती, सप्तम स्थानात रवी असे एकापेक्षा एक योग आमच्या कुंडलीत आहेत. पूर्वी ज्योतिषांना पत्रिका दाखवली की ते माझ्याकडे "शेवटचे काही दिवस राहिलेत बिचार्‍याचे" अशा नजरेने पाहायचे. म्हणून मग तोडकं मोडकं फलज्योतिष शिकून घेतलं. म्हटलं सालं आहे तरी काय एव्हढ भयानक आपल्या कुंडलीत ते पाहूया तरी. नाही म्हणायला लाभस्थानात असलेल्या राहूचाच काय तो दिलासा आहे मला. लाभस्थानात असलेला राहू शुभ फले देतो म्हणतात. बर्‍या वाईट मार्गाने प्रचंड धनलाभ. एप्रिलमध्ये राहू महादशा सुरु झाली की रोज एक लॉटरीचं तिकीट काढीन म्हणतो. :D
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Fri, 02/08/2013 - 21:45

In reply to सहाव्या स्थानातील शुक्र म्हणे by धन्या

Permalink

शुक्र

माझ्या ६ व्या (वृश्चिक) स्थानात बुध, शुक्र , नेपचुन व मंगळ पडले आहेत. ज्योतिषी माझ्याकडेही अशाच नजरेने बघायचे म्हणजे तुम्ही म्हटल्याप्रमाणे "शेवटचे काही दिवस राहिलेत बिचार्‍याचे" हो :) या शुक्रामुळे नोकरीची विवंचना नसणे हे अक्षरक्षः १००% खरे आहे. एक जाते न जाते तो दुसरी हजर असते. करीअर चे घर वेगळे बरं का ते १० वे. आता तुम्हाला माहेत असेलच. ६ वे हे नोकर-चाकर, नोकरी, लहान प्रणी, शत्रु, रोग स्थान. कामवाल्या बायाही फार चांगल्या मिळतात (भारतात असतेवेळी) मला. वा वा लाभस्थानातील राहू चांगला काय? माझ्या जवळच्या एका व्यक्तीचा आहे. बाकी कन्या व वृश्चिक या २ राशींचे मला फार ममत्व आहे. स्टेलिअम मुळेच असेल.मी असे वाचले आहे की ग्रह म्हणजे ज्योत व तो ज्या राशीत पडतो ती रास म्हणजे कंदील. म्हनजे असं बघा तुमचा शुक्र मंद गुलाबी प्रकाश देतो तो १०=मकर राशीतून. माझा शुक्र हीच प्रभा वृश्चिक राशीतून देतो. अर्थात मकरेच्या अधिपत्याखाली येणारे तुम्हाला रोझी रंगाचे दिसते म्हणजे महत्त्वाकांक्षा, रेप्युटेशन, करीअर वगैरे. बाकी तुम्ही जाणताच. येथे ओपन अप झाल्याबद्दल आपले खूप धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Fri, 02/08/2013 - 21:51

In reply to शुक्र by शुचि

Permalink

आभासी/वास्तव

च्यायला!! व्हर्चुअल(आभासी) जगात ओपन अप नाही व्हायचं तर काय वास्तव जगात. जिथे कोणाचा पायपोस कोणाला नसतो ना समविचारी लोक भेटतात. प्रत्येक जण मुखवटा सांभाळण्यात गर्क :D
  • Log in or register to post comments
Profile picture for user अग्निकोल्हा

Submitted by अग्निकोल्हा on Fri, 02/08/2013 - 22:39

In reply to आभासी/वास्तव by शुचि

Permalink

++१

च्यायला!! व्हर्चुअल(आभासी) जगात ओपन अप नाही व्हायचं तर काय वास्तव जगात. जिथे कोणाचा पायपोस कोणाला नसतो ना समविचारी लोक भेटतात. प्रत्येक जण मुखवटा सांभाळण्यात गर्क smiley
कधि कधि तुम्हि अनपेक्षितपणे फार मोलाच्या गोष्टि बोलुन जाता.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com