कबुतरे............
लेखनविषय (Tags)
कबुतरांचा उपयोग. असाही.....
बर्याच लोकांच्या कबुतरावरच्या एका काथ्याकुटावरच्या प्रतिक्रिया वाचून करमणूक झाली पण त्याच वेळी एका वाचलेल्या लेखाची आठवण झाली. त्याच्याच आधारावर ही माहीती.
जर आपण इराणच्या इस्फहान प्रांतात गेलात व जर आपल्याला रस्त्याने प्रवास करायचा प्रसंग आला तर आपल्याला वाहनाच्या खिडकितून ठराविक अंतरावर काही मनोरे उभे दिसतील. या मनोर्यांची आता पडझड झाली आहे. हे मनोरे माती व विटांनी बांधलेले आहेत. पहिल्यांदा आपल्याला असे वाटण्याचा संभव आहे की हे जुन्या काळातील टेहळणी बुरुज असतील पण याला बंदुकांसाठी असतात तसे झरोके नाहीत हे लक्षात येते व आपण अजुनच गोंधळून जातो, विचार करायला लागतो. अशा ओसाड प्रदेशात जेथे ना शहर, ना लोकवस्ती तेथे कोण कशाला असले टेहळणी बुरुज उभे करेल ? बरे गंमत म्हणजे जर टेहळणी बुरुज असतील तर एवढ्या जवळ कोण उभे करेल ? कारण याची उंची आहे जवळ जवळ ३० ते ४० फूट. हे धान्य साठवायची कोठारे असतील का ? शक्यता नाकारता येत नाही. का प्राचीन विट भट्ट्या असाव्यात? का दुपारच्या उन्हात झळींपासून संरक्षण करुन मस्त पैकी झोप काढायच्या या श्रीमंतांच्या जागा असाव्यात ? पण नंतर कळाले ते फारच वेगळे होते.
पण सतराव्या शतकात एका जर्मन माणसाने इराणमधे प्रवास केला आणि त्यावर एक पुस्तक लिहिले त्याचे नाव आहे "The Travels of Olearius in Seventeenth Century" या पुस्तकात त्याने इराणच्या कलिंगडाचे आणि बागांचे फारच गोडवे गायले आहेत. या पुस्तकात हे मनोरे म्हणजे कबुतरांसाठी बांधलेली घरे आहेत याचा उलगडा होतो. ही बांधली गेली १५०० सालात शहा अब्बासच्या काळात. कबुतरांसाठी घरे बांधण्या एवढा हा राजा कोमल ह्रद्याचा होता असा गैरसमज करून घेऊ नका. हा एक बुद्धिमान व शास्त्रीय दृष्टिकोन असलेला राजा होता. ही कबुतरखाने हजारो कबुतरांना आसरा द्यायची. इराणमधे त्या काळात ३००० पेक्षा जास्त असले मनोरे उभे केले गेले होते. एका परदेशी प्रवाशाने तर म्हटले, "जनतेची घरेही एवढी चांगली असती तर बरे झाले असते.” काही राजांनी तर कबुतरांच्या शिकारीवर बंदीही घतली होती. या कबुतरखान्याची रचना मोठी वैशिष्ठ्यपूर्ण असायची. याची बाहेरची भिंत कच्च्या विटांची व त्याच्या गिलाव्यासाठी चुना व जिप्सम वापरण्यात येई. मोठ्या कबुतरखान्या्चा व्यास ७० फूटापर्यंत असायचा तर उंची साठ फुटापर्यंत व ही शेतांमधे उभी केली जायची. कबुतरांची हत्या करायला बंदी असल्यामुळे ती खाण्यासाठी पाळायचा प्रश्नच नव्हता. मार्को पोलोनेही कबुतरांना या भागात फार मानतात त्यामुळे ती खाल्ली जात नाहीत असे म्हटले आहे.
या कबुतरांसाठी एवढे सगळे करायचे खरे कारण होते त्यांची विष्ठा. हे कबुतरखाने त्यांच्या विशिष्ठ रचनेमुळे ही विष्ठा गोळा करण्यासाठी वापरले जायचे. या विष्ठेत नत्राचे प्रमाण खूप असते त्यामुळे ज्या जमिनीत नत्र कमी असते त्याच्या साठी ही विष्टा म्हणजे वरदानच ! शिवाय यात फॉस्फरसचे प्रमाणही खूप असते. थोडक्यात हे त्यावेळचे एक चांगले NPK खत होते असे म्हणायला हरकत नाही.
हेच खत इस्फहानमधे फळांच्या झाडाला, काकड्यांच्या वेलांना व कलिंगडाला घालत असत. त्या काळात एका झाडा्ला ९०० ग्रॅम एका वर्षाला घालत असत. म्हणजे एका हेक्टरला साधारणत: १७०० किलो खत लागे. या खताने पीकाचे उत्पन्न दुप्पट होई असे लिहून ठेवलले आहे. कोणीतरी हा प्रयोग सध्या करायला हरकत नाही. हिशेब केला तर एका मोठ्या कबुतरखान्यात त्या काळी साधारणत: ५ ते ७ हजार कबुतरे निवास करत असावीत असे गृहीत धरुयात. एक कबुतर वर्षाला साधारणत: २७५० ग्रॅम विष्टा तयार करते हे गृहीत धरले ( हॅनसेनने मोजलेले आहे) तर वर्षाला १६५०० किलो खत तयार होत असे. सर्व साधारण परिस्थितीत हे खत १८००० झाडांना पुरत असे म्हण्जे जवळ जवळ २४ एकर जमिनीला.
ही विष्टा चामडे कमविण्याच्या उद्योगातही वापरले जायची कारण पाण्यात मिसळल्यावर त्याचे अमोनियम क्लोराईड तयार व्हायचे ज्याने कातडे मऊ पडते. ही विष्ठा बंदूकीची दारू तयार करण्यासाठीही वापरली जायची. या दारूत त्या काळी ७५ % पोटॅशियम नायट्रेट, १० % सल्फर, आणि १५ % कार्बन असतो. त्या काळात पोटॅशियम नायट्रेट इराणमधे फक्त याच विष्ठेतून मिळायची सोय होती.
कबुतरखान्यात कबुतरांना अन्न मिळत नसे ते त्यांना बाहेरून आणावे लागे. ही कबुतरे फक्त रात्रीच या इमाततीत आसर्याला येत. या इमारतीचे चित्र जर आपण बघितलेत तर आपल्याला दिसेल की विटांच्या जाळीत बसण्यासाठी अत्यंत योग्य अशी जागा कबुतरांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. कबुतरांची विष्टा सरळ मधे एका हौदात पडेल अशी याची रचना आहे जेथे ती वाळे. हा हौद वर्षातून एकदा उघडला जाई व आतील खत विक्रीला काढण्यात येई. याचा दर साधरणत: पाच किलोला चार ब्रिटिश पेन्स असा असे. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त कबुतरे निवार्या ला येतील असे वास्तूशास्त्र या इमारतीत वापरले गेले आहे व ते प्रत्यक्ष बघायला मजा येईल.
कोणी जाणार असेल तर हा कबुतरखान जरूर बघून यावा.
:-)
एरिक हान्सेन यांच्या लेखावर आधारित. फोटोही त्यांनीच काढलेले आहेत.
एरिक हान्सेन यांचा हा लेख आर्मकोवर्ल्डमधे छापून आलेला आहे.
जयंत कुलकर्णी
बिचार्या कबुतरांना जरा बरे वाटेल आता................:-)

प्रतिक्रिया
मस्तच
अरे वा
अरे देवा
या हिशेबावरून आठवले
हा हा...
म्हणजे आम्ही नतद्रष्ट,
ऐकावे ते नवलंच.
वाह!
जयंतकाका या लेखाबद्दल धन्यवाद
एखाद्या शेतात प्रयोग करायला
मिपा वरचे
मस्त माहिती.
जयंतकाकांचे लेख वाचणे म्हणजे
+१
विचित्र विश्व
मनोरंजक आणि उपयुक्त माहिती
पिकतं तिथं...
उत्तम माहिती.
जयंत सर, माहितीपुर्ण लेखन
क्या बात हैं!!
इजिप्त मध्ये...
माहितीपुर्ण लेख...
अतिशय वेगळी माहिती!
कबुतर जा जा जा !!!
शाह अब्बास
शाब्बास.
जबरा ...माहिती मुळ लेखात अणि
अरे वा! शाब्बास राही!
छान माहीती. लेख अन राहीचा
भारी माहीती.
नविन माहिती ,,,मस्त एकदम
अच्छा लगता है !
अरे हो
भारीच.
मस्त !!!