✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

गोल्डफिश आणि गेस्टाल्ट

स
संजय क्षीरसागर यांनी
Fri, 08/10/2012 - 12:09  ·  लेख
लेख
माझ्या काल या लेखावर गविचा एक सुरेख प्रतिसाद आहे
स्टीफन हॉकिंग्जच्या द ग्रँड डिझाईन या थरारक पुस्तकात त्याने जगाच्या अस्तित्वाविषयी जे काही विचार मांडले आहेत ते मुळापासून वाचण्यासारखे आहेत. ग्लास बाऊलमधल्या गोल्डफिशला बाहेरचं जग अत्यंत डिस्टॉर्टेड, मेग्निफाईड आणि भलतंच दिसतं. त्याचा तोच पर्स्पेक्टिव्ह आहे. त्याने त्या आभासाशी जुळवून घेतलं आहे. आपणही गोल्डफिश आहोत आणि आपल्याला जे भासतं (काळ म्हणा किंवा स्पेस म्हणा किंवा आणि काही मसण म्हणा) ते आपल्याला भासतं आहे ही वस्तुस्थिती आहे आणि जरी गोल्डफिशने हे परसेप्शन आहे, भास आहे आणि बाऊलबाहेर खरं जग आहे किंवा नाही इत्यादि तात्विक शक्यता कितीही चर्वण केल्या तरी बाऊलमधून जे दिसतंय त्याला खरं मानून जगण्याखेरीज गोल्डफिशला दुसरा ऑप्शनही नाहीये..
गोल्डफिश प्रतिसाद अत्यंत प्रातिनिधिक आहे त्या अनुषंगानं `गेस्टाल्ट' काय चीज आहे ते विशद करणारा हा लेख ________________________ पहिली गोष्ट, "आपण गोल्डफिश आहोत" ही मान्यता आहे, वस्तुस्थिती नाही. तिथेच आलेल्या निरंजनच्या प्रतिसादातून त्या मान्यतेच नेमकं कारण व्यक्त होतं :
आयुष्य क्षणभंगुर आहे हे माहित असूनही एक खेळ म्हणून मला ते खेळायचंय, त्यातले सुख-दु:ख, ताण-तणाव सगळ्याचेच नियम पाळून आणि त्यात इन्व्हॉल्व्ह होऊन. त्यामुळे शरीर म्हणजेच मी एवढे अध्यात्म मला सध्या पुरेसे आहे.
प्रश्न आयुष्य क्षणभंगुर आहे किंवा ते इन्व्हॉल्व्ह होऊन जगण्याचा नाहीये, त्यातली सुख-दु:ख, ताण-तणाव वगळून जगण्याचाय! तिथे गविला प्रतिसाद देताना संदीप खरेच्या या अप्रतिम काव्यपंक्ती उधृत केल्यात : मी जुनाट दारापरि किरकिरा बंदी तो सताड उघड्या खिडकीपरि स्वच्छंदी मी बिजागरीशी जीव गंजवीत बसतो तो लंघून चौकट पार निघाया बघतो ही चौकट लंघून पार निघण्याचं रहस्य एका साध्याशा गोष्टीत लपलंय ती म्हणजे गेस्टाल्ट बदलणं! _______________________ "गेस्टाल्ट" हा गुर्जीएफचा आवडता शब्द! गेस्टाल्टला मराठी प्रतिशब्द नाही; त्याचा अर्थ "दृष्टीचं रूपांतरण" असाये. दृष्टीचं रूपांतरण म्हणजे दृष्टीकोन बदलणं नाही, दृष्टीकोन बदलणं तिच गोष्ट नव्या अ‍ॅंगलनं पाहणंय , तिची अधिक माहिती मिळवणंय, त्यानं ज्ञान वाढेल पण सत्य गवसणार नाही. गेस्टाल्ट चेंज म्हणजे ज्या नजरेनं आपण आतापर्यंत आकार पाहात होतो त्या नजरेनं निराकार पाहणं किंवा जी नजर सदैव समोर रोखलेली होती तिचा रोख वळवून स्वत:ला पाहणंय, जस्ट अ हंड्रेड अ‍ॅंड एटी डिग्री टर्न ऑफ द गेझ! बुद्ध " बात तो आखोंके सामने थी और मैं कहाँ कहाँ ढूंढता फिरा" म्हणतो आणि आपल्याला समोर बघून निराकार दिसत नाही याचं कारण गेस्टाल्ट आहे; दृष्टीला सतत आकार बघण्याची सवय झाल्यामुळे निराकार दिसत नाही. फोटोतलं काचपात्र देह आहे, गोल्डफिश `आपण व्यक्ती आहोत आणि काचपात्रात बंद आहोत' ही आपली धारणाये आणि सतत शरीरातून बाहेरचं जग पाहात असल्यानं ते डिस्टॉर्टेड वाटतय. ही बद्धता `मी जुनाट दारापरि किरकिरा बंदी ' असं वाटायला लावतेय आणि `मी बिजागरीशी जीव गंजवीत बसतो ' असं म्हणायला लावतेय. `तो सताड उघड्या खिडकीपरि स्वच्छंदी' हे आपलं निराकार स्वरुप आहे आणि ज्या क्षणी या धरणेतून आपण मुक्त होतो त्या क्षणी `तो लंघून चौकट पार निघाया बघणारा' बंदी स्वछंद होतो! _______________________ गेस्टाल्ट बदलणं सोपयं: प्रथम ओशो काय म्हणतात ते बघू : ज्याप्रमाणे तुम्ही डोळ्यांनी समोर बघता त्याचप्रमाणे मागे (किंवा स्वतःकडे, म्हणजे बघणार्‍याकडे) देखील बघू शकता. आत्ता या क्षणी तुम्ही समोरची वस्तू बघा आणि त्याच वेळी स्वतःकडे देखील बघायचा प्रयत्न करा. तुम्हाला आता नुसती समोरची वस्तू दिसणार नाही तर तिच्या अवतीभवतीची जागा देखील दिसू लागेल, तुमच्या आणि वस्तुच्यामधलं "अंतर" जाणवायला लागेल, तुमचे विचार थांबतील, तुम्हाला शांत वाटायला लागेल. नजरेला असं बघायची सवय नसल्यामुळे सुरुवातीला जरा अवघड वाटेल पण नुसत्या गेस्टाल्ट चेंजनी मनावरचं दडपण जाऊन हलकं वाटायला लागेल. फक्त ती वस्तू न जाणवता तुमच्या शरीराच्या भोवतालची जागा सुद्धा जाणवू लागेल, हा निराकाराचा बोध आहे. कोणत्याही सिद्ध पुरुषाचे डोळे बघा ( ओशोंचे बघा) ते स्थिर दिसतात, ही स्थिरता नजरेचा गेस्टाल्ट बदलल्यामुळे आलेली आहे... ती नजर एकाच वेळी आकार आणि निराकार दोन्ही पाहातेय. नुकत्याच जन्मलेल्या लहान मुलाचे डोळे कधी पाहिलेत? ते अनाहूतपणे निराकाराशी संपर्क ठेवून असतात, आपण म्हणतो मुलाची नजर अजून स्थिर झाली नाही. हळूहळू मुलाला फोकसिंग शिकवलं जातं (आणि कोणतीही गोष्ट जाणण्यासाठी ते अनिवार्यपणे करायला लागतं), मग त्याचा निराकाराशी संपर्क तुटतो. __________________________ गेस्टाल्ट बदलल्यामुळे जीवनात अनेक परिवर्तनं घडून येतातः कोणत्याही खेळात किंवा नृत्यात प्राविण्य मिळवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं शरीरापासूनचं वेगळेपण जाणवणं, सगळा रियाज फक्त या एका गोष्टीसाठी चालू असतो, बाकी कौशल्य, स्वतःची स्टाइल वगैरे नंतर येतं. गेस्टाल्ट बदलल्यामुळे तुम्हाला आपण शरीरापासून वेगळे आहोत असं जाणवू लागेल, शरीरात एक हलकेपणा जाणवू लागेल. तुम्ही जीवनाकडे आणि कोणत्याही प्रश्नाकडे त्याच्या समग्रतेनं बघू लागाल, निष्कारण डिटेल्समध्ये शिरणं आणि गुंतून पडणं कमी होईल. तुमच्या आकलनाचा आवाका वाढेल, एखादी गोष्ट तुम्हाला सुरुवातीपासून शेवटापर्यंत कळू लागेल. आकारात अडकलोय असं वाटल्यानं निराकाराची सुटका दिसत नाही, ती कळू लागेल, "आता सर्व पर्याय संपले" असं वाटत असताना अचानक नवा पर्याय उपलब्द्ध होइल. ______________________________ सारखे आकार बघायची सवय आणि नजरेनं जवळजवळ पंच्याहत्तर टक्के संवेदना ग्रहण असल्यानं सर्वात जास्त ताण आपल्या डोळ्यांवर आहे (पण आता त्याची इतकी सवय झाली आहे की तो जाणवत नाही); गेस्टाल्ट बदलल्यानं तुमच्या नजरेवरचा आणि पर्यायानी मनावरचा ताण कमी व्हायला लागेल. एकदा तुमचा नजरेचा गेस्टाल्ट बदलला की इतर संवेदनांचे गेस्टाल्ट पण बदलू लागतील, एकण्याचा गेस्टाल्ट हळूहळू बदलायला लागेल; आवाजा बरोबर तुम्हाला शांतता देखील ऐकू यायला लागेल. गाण्याचा किंवा वादनाचा सगळा रियाज कलाकाराला शांतता ऐकू आली नाही तर व्यर्थ होतो; कारण प्रत्येकाचा आवाज जरी वेगळा असला तरी ज्या पडद्यावर सूर उमटातायत ती शांतता एक आहे आणि जो पर्यंत शांततेचा फिल येत नाही तो पर्यंत स्वराला गोडवा नाही; मजा म्हणजे तुम्हाला स्वतःचा आवज गोड वाटायला लागेल! "स्पर्शाचा गेस्टाल्ट बदलणं" अध्यात्मातलं बहुदा सर्वात महत्त्वाचं परिमाण आहे. तुम्ही संवेदनेकडून ज्याला संवेदना होते आहे त्याच्याकडे (म्हणजे स्वतःकडे) वळता. तुम्हाला कळतं की भोग जरी कोणताही असला तरी भोगणारा एकच आहे आणि तो एकदा स्थिर झाला की सगळे भोग सारखे आहेत. ज्ञानी संभोगाचं सुख उपभोगतो असं म्हणतात पण ते तसं नाहीये, त्याला सगळे भोग सारखा आनंद देऊ लागतात, ते `सम' होतात कारण त्याचा गेस्टाल्ट बदललेला असतो. ______________________ `स्वस्मरण' हा गुर्जीएफचा दुसरा आवडता शब्द! ज्या क्षणी तुम्हाला दु:ख, निराशा, ताण-तणाव घेरेल, तुमचा मूड जाईल त्या क्षणी स्वतःला सावरा कारण आपण गोल्डफिश आहोत असं तुम्हाला पुन्हा वाटायला लागलय इतकाच त्याचा अर्थये. समग्रतेनं फक्त समोर पाहा, तुमचा गेस्टाल्ट बदलेल, तुम्ही काचपात्रातून बाहेर पडलेले असाल!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धर्म
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
30757 वाचन

💬 प्रतिसाद (95)

प्रतिक्रिया

तरी म्हंटलं या आठवड्यात अजुन

शिल्पा ब
Fri, 08/10/2012 - 12:41 नवीन
तरी म्हंटलं या आठवड्यात अजुन तुमचा नवा लेख कसा नै आला !
  • Log in or register to post comments

.... वाट पाहूनी जीव

कवितानागेश
Fri, 08/10/2012 - 12:55 नवीन
.... वाट पाहूनी जीव शिणला............ :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

(No subject)

किसन शिंदे
Fri, 08/10/2012 - 12:57 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

काय हे तै...

चिगो
Fri, 08/10/2012 - 13:31 नवीन
ते बिचारे "आपल्यासी जे ठावे, ते दुसर्‍यांसी सांगावे.. अवघे जग शहाणे करुन सोडावे" ह्या वृत्तीने टंकनश्रम घेतात. आपला विशाल, निर-अहंकारी दृष्टीकोन सगळ्यांसमोर मांडतात.. आणि तुम्ही असे ही&ही प्रतिसाद देता? ;-) असो. आज बरेच दिवसांनी एक मिपाकर म्हणून शरम वाटली... :-P हं, चालू द्या..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

चिगो साहेब, हे "ही&ही" प्रकरण

बॅटमॅन
Fri, 08/10/2012 - 17:47 नवीन
चिगो साहेब, हे "ही&ही" प्रकरण काय आहे? मिपाविशिष्ट परिभाषा अजून नीट अवगत नाही झालेली म्हणून विचारतो. अवांतरः मिपावरच्या स्मायल्यांप्रमाणेच परिभाषेचा एक स्वतंत्र धागा काढावा अशी जुन्या धेंडांना विणंती ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

हीन आणि हिणकस .

प्रचेतस
Fri, 08/10/2012 - 19:28 नवीन
हीन आणि हिणकस .:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हीन आणि हिणकस . जसे:

यकु
Fri, 08/10/2012 - 19:32 नवीन
हीन आणि हिणकस .
जसे: उदाहरणार्थ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ऐच्या गावात!!! धन्स हो यकु अन

बॅटमॅन
Fri, 08/10/2012 - 21:17 नवीन
ऐच्या गावात!!! धन्स हो यकु अन वल्ली :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Fri, 08/10/2012 - 13:46 नवीन
संजयजी या लेखासाठी तुंम्हाला ही स्मायली लागेल असं वाट्ट्य,,,,,,,, Image removed. तेंव्हा म्हटलं असू द्या एक भेट अपल्याकडून ;-)
  • Log in or register to post comments

येस! अआ, थँक्स

संजय क्षीरसागर
Fri, 08/10/2012 - 13:55 नवीन
प्रतिस्पर्ध्याचा एकही गोल होऊ शकणार नाही, त्यांनी फक्त नियमात राहून खेळायला हवं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

हॅ हॅ हॅ तुमच्या विरुध्द

नाना चेंगट
Fri, 08/10/2012 - 18:07 नवीन
हॅ हॅ हॅ तुमच्या विरुध्द तुमचे सेल्फगोलच पुरे आहेत, प्रतिस्पर्ध्यांना विशेष काम नसतंच ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

मार्मिक प्रतीसाद.

आत्मशून्य
Fri, 08/10/2012 - 20:34 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

.

dadadarekar
Sun, 10/11/2015 - 16:31 नवीन
गोली हाही नेटच्या फिशट्यान्कात अडकलेला मासाच आहे की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

नेहमीप्रमाणेच काSSही कळले नाही

अन्या दातार
Fri, 08/10/2012 - 18:16 नवीन
प्रथम ओशो काय म्हणतात ते बघू : ज्याप्रमाणे तुम्ही डोळ्यांनी समोर बघता त्याचप्रमाणे मागे (किंवा स्वतःकडे, म्हणजे बघणार्‍याकडे) देखील बघू शकता. आत्ता या क्षणी तुम्ही समोरची वस्तू बघा आणि त्याच वेळी स्वतःकडे देखील बघायचा प्रयत्न करा. तुम्हाला आता नुसती समोरची वस्तू दिसणार नाही तर तिच्या अवतीभवतीची जागा देखील दिसू लागेल, तुमच्या आणि वस्तुच्यामधलं "अंतर" जाणवायला लागेल,
हं. इथपर्यंत जमते. समजा समोर चहाचा कप आहे. अन मग असे अंतर दिसले की मन शांत होण्यापेक्षा अधिकच अस्वस्थ व्हायला लागते. मनात प्रश्न यायला लागतो "तो चहाचा कप आपल्या हातात का नाही??"
  • Log in or register to post comments

हॅहॅहॅ... म्याँव..

अर्धवट
Fri, 08/10/2012 - 21:13 नवीन
हॅहॅहॅ... म्याँव..
  • Log in or register to post comments

तुम्ही जो गोल्डफिशचा फोटो

मदनबाण
Fri, 08/10/2012 - 21:44 नवीन
तुम्ही जो गोल्डफिशचा फोटो दिला आहे त्यात दिसणार्‍या इमारती त्या गोल्ड फिशला उलट्या दिसत आहेत्,वास्तवापेक्षा अगदी उलट्या ! यावरुन मला श्रीमद्‍भगवद्‍गीतेतला १५ वा अध्याय आठवला,त्यातला एक श्लोक इथे देतो. ऊर्ध्वमूलमधःशाखमश्वत्थं प्राहुरव्ययम्। छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्॥१५- १॥ Here the material world is described as a tree whose roots are upwards and branches are below. We have experience of a tree whose roots are upward: if one stands on the bank of a river or any reservoir of water, he can see that the trees reflected in the water are upside down. The branches go downward and the roots upward. Similarly, this material world is a reflection of the spiritual world. The material world is but a shadow of reality. In the shadow there is no reality or substantiality, but from the shadow we can understand that there is substance and reality. In the desert there is no water, but the mirage suggests that there is such a thing as water. In the material world there is no water, there is no happiness, but the real water of actual happiness is there in the spiritual world. The entanglement of this material world is compared here to a banyan tree. For one who is engaged in fruitive activities, there is no end to the banyan tree. He wanders from one branch to another, to another, to another. The tree of this material world has no end, and for one who is attached to this tree, there is no possibility of liberation. The Vedic hymns, meant for elevating oneself, are called the leaves of this tree. This tree’s roots grow upward because they begin from where Brahm is located, the topmost planet of this universe. If one can understand this indestructible tree of illusion, then one can get out of it. संदर्भ :--- Bhagavad Gita As It Is
  • Log in or register to post comments

.

मूकवाचक
Fri, 08/10/2012 - 22:08 नवीन
ऊर्ध्व मूळ ते तेवि खालती कशी पसरली शाखा म्हणती अव्यय भव-वृक्षाते 'अश्वत्थ' असे देखा आणि ऋग्-यजु: साम वेद ते ही चि जयाची पाने तो चि वेद- विद् पुरूष सर्वथा तो त्यासि असा जाणे ऊर्ध्व सहज ते ब्रह्म चि तेथे भव-वृक्षाचे मूळ ह्यास्तव म्हणती 'ऊर्ध्व-मूळ' परि मुळात हा निर्मूळ अनादि माया-योगे पहिले 'महत्' तत्व उद्भवले आणि सर्वथा पुढे वाढता विस्तार पहा चाले अहं मन तशी दहा इंद्रिये पंच विषय तन्मात्रा मग प्रकटती किती आकृती अगणित चित्र-विचीत्रा! संदर्भः स्वामी स्वरूपानंद (पावस) विरचीत श्रीमत् भावार्थ गीता (१५.१)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

इथे दिलेल्या लिंकवर जाउन पान

मदनबाण
Fri, 08/10/2012 - 22:28 नवीन
इथे दिलेल्या लिंकवर जाउन पान क्रमांक १८ आणि ४८५ वाचावे,म्हणजे मी वरचे दिलेले लिखाण दिसुन येईल. http://www.prabhupada.de/eng/Prabhupada%20-%20Bhagavad-gita%20As%20It%20Is.pdf
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मूकवाचक

सुंदर !!

अर्धवटराव
Fri, 08/10/2012 - 22:40 नवीन
:) अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मूकवाचक

सूचना

संपादक मंडळ
Sat, 08/11/2012 - 16:37 नवीन
या धाग्यात व्यक्त केलेल्या मतांबद्दलची आपली मते कृपया गांभीर्यपूर्वक व्यक्त करावीत. अनुभव पटले नाहीत तर तसे मत व्यक्त करावे, पण चेष्टा, थट्टामस्करी कृपया टाळावी. तसेच कोणतीही वैयक्तिक शेरेबाजी टीका-टिप्पणी करू नये.
  • Log in or register to post comments

कोणत्याही सिद्ध पुरुषाचे डोळे

Dhananjay Borgaonkar
Sat, 08/11/2012 - 17:15 नवीन
कोणत्याही सिद्ध पुरुषाचे डोळे बघा ( ओशोंचे बघा) ते स्थिर दिसतात
ओशोला सिध्दी प्राप्त होती? नक्की कुठल्या सिद्धीबद्दल आपण बोलत आहात?
ज्याप्रमाणे तुम्ही डोळ्यांनी समोर बघता त्याचप्रमाणे मागे (किंवा स्वतःकडे, म्हणजे बघणार्‍याकडे) देखील बघू शकता. आत्ता या क्षणी तुम्ही समोरची वस्तू बघा आणि त्याच वेळी स्वतःकडे देखील बघायचा प्रयत्न करा. तुम्हाला आता नुसती समोरची वस्तू दिसणार नाही तर तिच्या अवतीभवतीची जागा देखील दिसू लागेल, तुमच्या आणि वस्तुच्यामधलं "अंतर" जाणवायला लागेल, तुमचे विचार थांबतील, तुम्हाला शांत वाटायला लागेल. नजरेला असं बघायची सवय नसल्यामुळे सुरुवातीला जरा अवघड वाटेल पण नुसत्या गेस्टाल्ट चेंजनी मनावरचं दडपण जाऊन हलकं वाटायला लागेल. फक्त ती वस्तू न जाणवता तुमच्या शरीराच्या भोवतालची जागा सुद्धा जाणवू लागेल, हा निराकाराचा बोध आहे.
ज्यावेळी आपण एखाद्या गोष्टीकडे बघतो तेव्हाच त्यातील अंतर कळतं. नुसतं अंतरच नाही कळत तर आजुबाजुला काय आहे हे देखील दिसतं. त्यामुळे अंतर तर आधीच जाणवत असत बघितल्या क्षणी. मला नक्की कळतच नाहीये तुम्ही काय सांगताय? आणि मला कुठल्याही वस्तुकडे बघुन शांत का वाटेल? infact त्या वस्तु बद्दलचे विचार मनात चालु होतील (आवडती वस्तु असेल तर) मग शांत का वाटेल मला?
कोणत्याही खेळात किंवा नृत्यात प्राविण्य मिळवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं शरीरापासूनचं वेगळेपण जाणवणं
, शरीरापासुन वेगळेपण जर त्यांना जाणवल तर त्याने नक्की काय साध्य होणारे? मला आजिबातच कळत नाहीये तुम्हाला ईथे काय म्हणाचय?
`स्वस्मरण' हा गुर्जीएफचा दुसरा आवडता शब्द
येथे अहं ब्रम्हासी असे सुचित करायचे आहे का? तुमचा हा लेख अध्यात्मावर आहे का?
  • Log in or register to post comments

@ धनंजय

संजय क्षीरसागर
Mon, 08/13/2012 - 01:06 नवीन
ओशोला सिध्दी प्राप्त होती? नक्की कुठल्या सिद्धीबद्दल आपण बोलत आहात?
सिद्धचा अर्थ ज्याला सिध्दी प्राप्त आहेत असा नाही तर ज्याला सत्य गवसलय असा. सत्य हे इतकं सिद्ध (Proved or Obvious) आहे की त्याला कोणत्याही पुराव्याची गरज नाही म्हणून सत्य गवसलेल्याला सिद्ध म्हणतात. त्याचा चमत्काराशी काहीही संबंध नाही.
ज्यावेळी आपण एखाद्या गोष्टीकडे बघतो तेव्हाच त्यातील अंतर कळतं. नुसतं अंतरच नाही कळत तर आजुबाजुला काय आहे हे देखील दिसतं. त्यामुळे अंतर तर आधीच जाणवत असत बघितल्या क्षणी.
आपण ज्या वेळी एखादी वस्तु पाहतो तेव्हा नेमकी प्रक्रिया अशी घडते : जाणीव (जी निराकार आहे) ती त्या वस्तुचं रुप धारण करते (आरश्यात प्रतिबिंब पडावं तशी) आणि मग ती संवेदना मेंदूपर्यंत पोहोचते. मेंदूत पूर्वस्मृती रिट्राइव होऊन त्या संवेदनेचं डिकोडींग होतं आणि आपल्याला कळतं `अरे ही कार आहे' पण ती मालिका तिथेच थांबत नाही मग कारचा मेक, कारचा लूक, कारचा नंबर, आपली कार, मग ती घेतानांचे प्रसंग, तीचा ड्यू असलेला हप्ता, कारचे बरेवाईट अनुभव असं करत आपण कुठल्याकुठे निघून जातो. थोडक्यात वस्तू आणि आपण यातल्या अंतराचं आपल्याला संपूर्ण विस्मरण होतं
मला नक्की कळतच नाहीये तुम्ही काय सांगताय? आणि मला कुठल्याही वस्तुकडे बघुन शांत का वाटेल? infact त्या वस्तु बद्दलचे विचार मनात चालु होतील (आवडती वस्तु असेल तर) मग शांत का वाटेल मला?
दॅट इज द पॉइंट! तुम्ही वस्तुकडे बघता त्यामुळे विचार चालू होतात आणि त्यानं अशांती वाटते. ज्या क्षणी तुमची नजर दुहेरी होते म्हणजे ती वस्तु आणि आपण स्वतः याचा एका वेळी वेध घेते तेव्हा फक्त वस्तु दिसते, विचार थांबतात आणि शांत वाटायला लागतं
शरीरापासुन वेगळेपण जर त्यांना जाणवल तर त्याने नक्की काय साध्य होणारे? मला आजिबातच कळत नाहीये तुम्हाला इथे काय म्हणाचय?
जो शरीरापासून वेगळा तो मनापासून वेगळा कारण मन शरीराचाच भाग आहे आणि अशा स्थितीत तुम्ही सरळ जाणीवेतून कृत्य करता. मेंदूचा उपयोग शिकलेलं कौशल्य वापरायला डेटाबेस म्हणून होतो. विचार तुमचं लक्ष वेधून घेत नाहीत. तुम्ही उत्सफूर्त (Spontanious) होता. म्हणून तर कलाकार अशा उत्सफूर्त क्षणी नवनिर्मिती करु शकतात. इतर वेळी जेव्हा मन पुढे आणि जाणीव मागे असते तेव्हा फक्त रिपीटिशन होतं कारण मेंदूत फक्त स्मृती असते.
`स्वस्मरण' हा गुर्जीएफचा दुसरा आवडता शब्द - येथे अहं ब्रम्हासी असे सुचित करायचे आहे का?
नाही फक्त आपण आहोत (अस्मी) याचं स्मरण, दॅटस ऑल! कारण आपण आहोत ही एकमेव निर्विवाद वस्तुस्थिती आहे
तुमचा हा लेख अध्यात्मावर आहे का?
अर्थात! अध्यात्म इतकं सोपं असेल असं वाटत नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Dhananjay Borgaonkar

गोल्डफिशचा फोटो

चित्रगुप्त
Sun, 08/12/2012 - 01:38 नवीन
गोल्डफिशचा हा जो फोटो आहे, त्यातील त्या गोल्डफिशचा आणि मागील इमरती उलट्या व गोलसर दिसत आहेत, याचा काहीएक संबंध नाही. गोल्डफिश ऐवजी एकादा दगड ठेवला, वा काहीही ठेवले नाही, तरी इमारती अश्याच दिसतील. कॅमेर्‍याने असा फोटो येतो, याचा अर्थ त्यातील गोल्डफिशला वा अन्य कुणाला बाहेरचे जग तसे दिसते, असे मानायचे काहीही कारण नाही.
  • Log in or register to post comments

फोटोत आपल्याला दिसतंय तसं

गवि
Sun, 08/12/2012 - 07:44 नवीन
फोटोत आपल्याला दिसतंय तसं गोल्डफ़िशला दिसत नाही हे खरंच. मूळ प्रतिक्रियेत तो फोटो लिंकवण्यामागे केवळ गोल बाऊलमधला गोल्डफ़िश इतकाच सिंबॉल दाखवायचा उद्देश होता. बाकी गोल्डफ़िशला आतून फोटोतल्यासारखं दिसत नसलं तरी बाहेरचं जग अत्यंत डिस्टॉर्टेड दिसतं यात शंकाच नाही. तुमची चिकित्सा योग्य आहे पण फोटोचा उद्देश गोल्डफ़िश दर्शविणे इतकाच आहे.त्याचा पर्स्पेक्टिव्ह दाखवण्याचा नाही.त्यासाठी कॅमेरा बाऊलमधे बुडवून बाहेरचे फोटो काढावे लागतील. या उदाहरणानेच स्टीफन हॉकिंग्जने द ग्रँड डिझाईन पुस्तकाची सुरुवात केली आहे.त्यात प्रत्यक्ष वापरलेलं चित्रसुद्धा मी काल या लेखावरच्या त्या प्रतिक्रियेत दिलं आहे,तेदेखील इंडिकेटिव्हच आहे.गोल्डफ़िशच्या त्या जगातही तो ऑब्झर्वेशन्सनी नियम ठरवेलच.जग कसं का भासत असेना,हा मुद्दा मुख्य आहे.प्रत्यक्ष ऑप्टिक्स zoology किंवा फोटोग्राफी नव्हे. गोल्डफ़िश हे प्रतीक आहे हो. कदाचित प्रत्यक्षात गोल्डफ़िशची नजर तितकी लांब पाहूही शकत नसेल. शिवाय त्याला असं उलटं आणि लहान दिसत नसून अनियमित आणि मॅग्निफ़ाईड दिसत असेल. तेही बाऊलमधल्या त्याच्या स्थानाप्रमाणे बदलणारं. मानवालाही बाहेरचं विश्व (सौरमालेच्याही बाहेरचं) असंच डिस्टॉर्टेड भासतं. गुरुत्वाकर्षण,चुंबकीय क्षेत्रं वगैरे खूप कारणांनी. बस्स इतकीच तुलना आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

गोल्डफिशचा हा जो फोटो आहे,

मदनबाण
Sun, 08/12/2012 - 14:41 नवीन
गोल्डफिशचा हा जो फोटो आहे, त्यातील त्या गोल्डफिशचा आणि मागील इमरती उलट्या व गोलसर दिसत आहेत, याचा काहीएक संबंध नाही. गोल्डफिश ऐवजी एकादा दगड ठेवला, वा काहीही ठेवले नाही, तरी इमारती अश्याच दिसतील. कॅमेर्‍याने असा फोटो येतो, याचा अर्थ त्यातील गोल्डफिशला वा अन्य कुणाला बाहेरचे जग तसे दिसते, असे मानायचे काहीही कारण नाही. सहमत आहे... माझ्या समजण्यात चूक झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

करेक्ट!

संजय क्षीरसागर
Sun, 08/12/2012 - 17:24 नवीन
गोल्डफिशचा हा जो फोटो आहे, त्यातील त्या गोल्डफिशचा आणि मागील इमरती उलट्या व गोलसर दिसत आहेत, याचा काहीएक संबंध नाही. गोल्डफिश ऐवजी एकादा दगड ठेवला, वा काहीही ठेवले नाही, तरी इमारती अश्याच दिसतील. कॅमेर्‍याने असा फोटो येतो, याचा अर्थ त्यातील गोल्डफिशला वा अन्य कुणाला बाहेरचे जग तसे दिसते, असे मानायचे काहीही कारण नाही.
गोल्डफिशवर फोकस करा, काचपात्रावर नाही आणि मग तुम्हाला कळेल की स्टीफनला काय म्हणायचय. गोल्डफिशला बाहेरचं जग जे तो पाण्याच्या आणि काचपात्राच्या थ्रू बघतोय ते डिसटॉर्टेड दिसतय आणि आपण ते माध्यम विरहित बघतोय म्हणून जसं आहे तसं दिसतय. पण खरा मुद्दा पुढे आहे कारण स्टीफन रुपकात्मक बोलतोय, त्याला म्हणायचय `आपण तो गोल्डफिश आहोत' ... आणि हे परसेप्शन आहे, भास आहे आणि बाऊलबाहेर खरं जग आहे किंवा नाही इत्यादि तात्विक शक्यता कितीही चर्वण केल्या तरी बाऊलमधून जे दिसतंय त्याला खरं मानून जगण्याखेरीज गोल्डफिशला दुसरा ऑप्शनही नाहीये.. आणि मी सांगतोय : "आपण गोल्डफिश आहोत" ही धारणाच चूक आहे, वस्तुस्थिती तशी नाही. फोटोतलं काचपात्र देह आहे, आणि `काचपात्रात बंद आहोत' ही आपली धारणा आहे आणि सतत शरीरातून बाहेरचं जग पाहात असल्यानं ते डिस्टॉर्टेड वाटतय. ही बद्धता `मी जुनाट दारापरि किरकिरा बंदी ' असं वाटायला लावतेय आणि `मी बिजागरीशी जीव गंजवीत बसतो ' किंवा गोल्डफिशला दुसरा ऑप्शनही नाहीये असं म्हणायला लावतेय तुम्ही गेस्टाल्ट बदला, नजरेचा रोख जगाकडून स्वतःकडे वळवा, आहे त्याच जगात तुम्हाला मजा येईल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

फोटोतलं काचपात्र देह आहे, आणि

सोत्रि
Tue, 08/14/2012 - 20:49 नवीन
फोटोतलं काचपात्र देह आहे, आणि `काचपात्रात बंद आहोत' ही आपली धारणा आहे आणि सतत शरीरातून बाहेरचं जग पाहात असल्यानं ते डिस्टॉर्टेड वाटतय. ही बद्धता `मी जुनाट दारापरि किरकिरा बंदी ' असं वाटायला लावतेय आणि `मी बिजागरीशी जीव गंजवीत बसतो ' किंवा गोल्डफिशला दुसरा ऑप्शनही नाहीये असं म्हणायला लावतेय
सादर प्रणिपात _/\_ _/\_ _/\_ तुम्ही पुण्यात असता का? प्रत्यक्ष भेटायला आवडेल. - (गेस्टाल्ट बदलण्याची इच्छा झालेला) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

गेस्टाल्ट ची उदाहरणे

चित्रगुप्त
Sun, 08/12/2012 - 08:30 नवीन
गेस्टाल्ट ची उदाहरणे : तरुणी की वृद्धा ? चौकोनी स्तंभ की गोल स्तंभ ? Image removed. Image removed. चेहरे की पेला ? बदक की ससा ? Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

optical illusions

मन१
Sun, 08/12/2012 - 21:05 नवीन
optical illusions (चित्रभ्रम)म्हणतात ना या प्रकराला. ? भन्नाट आहेत. मागे असेच चित्रभ्रम गुगलून गुगलून पहाय्चे वेड लागले होते. काही हजाराअंच्या संख्येने पाहिलीत ही. पण इथे दिलेला "खांब गोल का चौकोनी" हा आजवरचा सर्वात खतरनात चित्रभ्रम मी पाहिलेला. ह्यापेक्षा भारी फक्त unending stairs हे त्रिमितीशी खेळनारं प्रकरण वाटलं होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

@ चित्रगुप्त आणि गवि

संजय क्षीरसागर
Sun, 08/12/2012 - 12:50 नवीन
= चित्रगुप्तजी तुम्ही दिलेल्या चित्रात दृष्टी विभ्रम आहे, गेस्टाल्ट वेगळं परिमाण आहे. गेस्टाल्ट म्हणजे `आकाराच्या बाहेरुन पाहणं ' आपल्या घरातल्या एखाद्याच गंभीर स्वरुपाचं ऑपरेशन झालय आणि तो क्रिटीकल कंडीशनमधे आयसीयूत असेल तर त्या प्रसंगात आपण पूर्णपणे गुंतलेलो असतो पण सर्जन अत्यंत तटस्थतेनं आणि तरीही संपूर्ण समग्रतेनं परिस्थिती हाताळत असतो कारण तो प्रसंगा बाहेर असतो, प्रसंग तोच आहे पण गेस्टाल्टमधे फरक आहे. पण तीच वेळ जर सर्जनवर आली तर त्याचाही गेस्टाल्ट आपल्यासारखा होतो म्हणून कोणताही सर्जन त्याच्या जवळच्या व्यक्तीच्या गंभीर स्वरुपाच्या ऑपरेशनला दुसरा सर्जन बोलावतो! = गवि
गोल्डफिश हे प्रतीक आहे हो. कदाचित प्रत्यक्षात गोल्डफ़िशची नजर तितकी लांब पाहूही शकत नसेल. शिवाय त्याला असं उलटं आणि लहान दिसत नसून अनियमित आणि मॅग्निफ़ाईड दिसत असेल. तेही बाऊलमधल्या त्याच्या स्थानाप्रमाणे बदलणारं. मानवालाही बाहेरचं विश्व (सौरमालेच्याही बाहेरचं) असंच डिस्टॉर्टेड भासतं. गुरुत्वाकर्षण,चुंबकीय क्षेत्रं वगैरे खूप कारणांनी. बस्स इतकीच तुलना आहे.
= येस, गोल्डफिश हे प्रतिक आहे पण माझा मुद्दा असाये की आपण स्वतःला गोल्डफिश समजतोय तरी वस्तुस्थिती तशी नाही. फक्त गेस्टाल्ट बदलायचा अवकाश आहे, त्यानं जग बदलणार नाही पण आपलं आयुष्य नक्की बदलेल; मजेचं होईल.
  • Log in or register to post comments

@ मदनबाण

संजय क्षीरसागर
Sun, 08/12/2012 - 13:25 नवीन
Similarly, this material world is a reflection of the spiritual world. The material world is but a shadow of reality. In the shadow there is no reality or substantiality, but from the shadow we can understand that there is substance and reality. In the desert there is no water, but the mirage suggests that there is such a thing as water. In the material world there is no water, there is no happiness, but the real water of actual happiness is there in the spiritual world.
किंवा
ऊर्ध्वमूलमधःशाखमश्वत्थं प्राहुरव्ययम्। छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्॥१५- १॥
हे वेगळे संदर्भ आहेत. तुमचं म्हणणं असंय की दिसतय ते जग `अध्यात्मिक जगाचं ' प्रतिबिंब आहे आणि ते भ्रामक आहे (In the shadow there is no reality or substantiality) आणि त्यावरनं आपल्याला कायमस्वरुपी सत्याचं आकलन होतं (but from the shadow we can understand that there is substance and reality) नाही हो, दिसतय ते जग खरं आहे, सुंदर आहे आणि जगायला आणि भोगायला तेच उपलब्ध आहे. गेस्टाल्ट बदलला की `तो निराकार' ज्यात ते प्रकट झालय त्याचा बोध होतो आणि जादू अशीये की त्याच क्षणी आपण खुद्द देखील व्यक्ती दिसत असलो तरी स्वरुपानं निराकार आहोत हे कळतं, त्याला सत्य गवसणं म्हटलय!
  • Log in or register to post comments

.

मन१
Sun, 08/12/2012 - 21:09 नवीन
नाही हो, दिसतय ते जग खरं आहे, असेलही. सुंदर आहे हे सार्वकालिक विधान असू शकत नाही. काय सुंदर? कशा दृष्टीने सुंदर?? जे आहे ते असं आहे. ते सगळच सुंदर किंवा सगळच भयंकर वगैरे नाही. आणि जगायला आणि भोगायला तेच उपलब्ध आहे शत प्रतिशत सहम्त. बाकी अध्यात्म चालु द्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

मदनबाण दादा...

अर्धवटराव
Sun, 08/12/2012 - 13:35 नवीन
मित्रा... व्यक्ती आणि निराकार विरुद्धार्थी शब्द नाहित रे बाबा... किंबहुना निराकरत्व (वगैरे वगैरे) व्यक्तीचं एक लहानसं गुणविषेश आहे बस्स... असो. अर्धवटराव
  • Log in or register to post comments

अजिबात नाही!

संजय क्षीरसागर
Sun, 08/12/2012 - 14:35 नवीन
किंबहुना निराकरत्व (वगैरे वगैरे) व्यक्तीचं एक लहानसं गुणविषेश आहे बस्स... असो.
एकदम उलटं लिहिलय, व्यक्तीमत्व काय संपूर्ण व्यक्त जग निराकारात प्रकट झालय, निराकार व्यक्तीचा लहानसा गुणविषेश नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

तसं असल्याशिवाय...

अर्धवटराव
Sun, 08/12/2012 - 20:49 नवीन
निराकारत्व व्यक्तीत्वाचा एक पैलु नसता तर प्रगटीकरण शक्यच झालं नसतं. आणि प्रगटीकरण झाल्यावर स्वरुप बोधाचे चान्सेस शुण्य असते. व्यक्तीत्व हा शब्द निराकाराच्या विरुद्धार्थी नाहि. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

उलट - सुलट फिरणारी आकृती

चित्रगुप्त
Sun, 08/12/2012 - 19:45 नवीन
उलट - सुलट फिरणारी आकृती (फिरत नसल्यास आकृतीवर क्लिक करा, वा दुवा बघा) : (याविषयी इथे वाचा). Image removed. (विक्कीमिडिया वरून साभार) .........या आकृतीचा प्रस्तुत लेखातील मुद्द्याशी सरळ संबंध नसेलही, तरी अश्या दृष्टीभ्रमाविषयी जाणकारांनी मराठीत लिहून प्रकाश टाकावा, ही विनंती. कारण मलातरी तथाकथित अध्यात्माच्या शाब्दिक अवडंबरापेक्षा प्रत्यक्ष नजरेला दिसणार्‍या गोष्टींमधील सौंदर्य, भ्रम, इ. ची गंमत जास्त भावते.
  • Log in or register to post comments

>या आकृतीचा प्रस्तुत लेखातील मुद्याशी सरळ संबंध नसेलही

संजय क्षीरसागर
Mon, 08/13/2012 - 00:16 नवीन
अजिबात संबंध नाहीये त्यामुळे या विषयीचे प्रतिसाद इथे देऊ नयेत ही विनंती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

गेस्टाल्ट हा शब्द

चित्रगुप्त
Mon, 08/13/2012 - 01:29 नवीन
गेस्टाल्ट हा शब्द या लेखात वापरलेला असल्याने या संकल्पनेची विविध उदाहरणे बघायला मिळाली, आणि त्यातील तत्व समजून घेता आले, तर दृष्यजगताविषयी एकंदरित जाण व्यापक होईल, असे वाटून ही उदाहरणे घेतली आहेत. मी इथे दिलेल्या आकृतींचा जर संबंध नसेल,तर गेस्टाल्ट हा शब्द या लेखात वापरायला नको होता, असे म्हणणे क्रमप्राप्त आहे. एकादा शब्द ओशो , गुर्जिएफ वा अन्य कुणी काही विशिष्ट अर्थाने वापरला, म्हणून त्याचा सर्वसामान्य अर्थ रद्द होत नाही.
  • Log in or register to post comments

गेस्टाल्ट हा शब्द इथे नजरेचं दुहेरी करण या अर्थानं वापरलाय

संजय क्षीरसागर
Mon, 08/13/2012 - 11:04 नवीन
हा लेख चित्रकलेवर नाही आणि
या आकृतीचा प्रस्तुत लेखातील मुद्द्याशी सरळ संबंध नसेलही, तरी अश्या `दृष्टीभ्रमाविषयी' जाणकारांनी मराठीत लिहून प्रकाश टाकावा, ही विनंती.
हे तुम्ही त्या चित्राखाली नमूद केलं आहे. तस्मात अश्या कोणत्याही प्रतिसादाची या लेखावर गरज नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

काय सतत पिरपिर करता ओ तुम्ही

शिल्पा ब
Mon, 08/13/2012 - 11:17 नवीन
काय सतत पिरपिर करता ओ तुम्ही ! सतत आपलं कशाचा न कशाचा किस पाडत रहायचं !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

+१ तो बनता है. अवांतरः पिरपिर

बॅटमॅन
Mon, 08/13/2012 - 11:53 नवीन
+१ तो बनता है. अवांतरः पिरपिर करायचे विषय प्रत्येकाचे वेगळेवेगळे असतात. काहींचे अध्यात्म, काहींचे स्त्रीपुरुष समानता, वैग्रे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

<<पिरपिर करायचे विषय

शिल्पा ब
Mon, 08/13/2012 - 12:01 नवीन
<<पिरपिर करायचे विषय प्रत्येकाचे वेगळेवेगळे असतात. अगदी हेच म्हणणं आहे माझं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

शिल्पातै, माफ कर, पण ह्या

सोत्रि
Tue, 08/14/2012 - 21:07 नवीन
शिल्पातै, माफ कर, पण ह्या लेखावर चाललेली चर्चा पाहता हे असले प्रतिसादच पिरपिर वाटत आहेत. चू, भु.दे.घे. - (गेसॉल्ट बदलून प्रतिसाद दिलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

तरी म्हंटलं , गविंच्या

शिल्पा ब
Wed, 08/15/2012 - 01:11 नवीन
तरी म्हंटलं , गविंच्या प्रतिसादावर प्रतिकूल प्रतिसाद आला तरी अजुन तुमच्याकडुन एकही प्रतिसाद कसा नाही ! बाकी सुखासुखी जगताना इतर प्राण्यांना अन माणसांना माणुसकी दाखवुन जगण्याऐवजी हे असलं कैतरी पाहीलं वाचलं की किव येते. तुमचं चालु द्या. आता मी बोअरलेय अन पोळ्या करायला घेतेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

मला या लेखातून जे समजलंय ते

गवि
Mon, 08/13/2012 - 11:30 नवीन
मला या लेखातून जे समजलंय ते असं: १. आपण कोणत्याही सत्य किंवा भ्रामक जगात असलो तरी आपण आपल्या देहाखेरीज आणि मनाच्याही खेरीज वेगळे आहोत. आणि मन आणि शरीर नसलेले आपण हेच फक्त सत्य आहोत. बाकी सर्व मान्यतेचा भाग. साध्या शब्दात, मी स्वतःपासून स्वतःला अलग करुन माझ्याकडे पाहिलं (तात्विकदृष्ट्या, लिटरली नव्हे) आणि तशाच अवस्थेत नेहमी जगलो तर जगण्यात एक हलकेपणा येईल. कारण आता मी ऑब्जेक्टिव्हली सगळं पाहतोय. मी (शरीर-मनावेगळा) म्हणजेच मी= माझा हा कॉन्शसनेस, इतकंच फक्त सत्य आहे...हा विचार नुसता करुन उपयोग नव्हे तर अनुभवता आला की बाकी सगळं जणू काही "दुसर्‍याच्या बाबतीत चाललंय" असं एंजॉय करता येईल. २. हे सर्व समजणं हा व्यक्तिगत जाणिवेचा भाग आहे. त्यात तार्किकता किंवा त्या विचाराची आवश्यकता किंवा उपयुक्तता (युटिलिटी व्हॅल्यू) पाहू जाता वादविवाद होतील, जाणीव नाही. ३. अध्यात्मिक म्हटल्यावर अशा व्यक्तीकडून जगाच्या भलत्या अपेक्षा असतात. उदा. षडरिपूंना जिंकलेला, समतोल, सामान्य विकारांच्या वर पोचलेला इत्यादि. तसं असण्याची गरज नाही. प्रस्तुत लेखक केवळ हे सर्व स्वतःला बाजूला काढून पहा म्हणजे मजा येईल इतकंच सांगतो आहे. अशा विचारांना तर्क नाही पण पैसा, काल, मन, विचार, कृती हे सर्वच आपल्या स्वतःपेक्षा वेगळं आहे आणि त्यात नक्की गृहीत धरणेबल सत्य म्हणजे फक्त आपण (केवळ अस्तित्व, पर्सन्यालिटी नव्हे ) आहोत.. तर्क किंवा विज्ञानाच्या दृष्टीने या थिअरीत अनेक वादांना किंबहुना फक्त वादांनाच जन्म मिळेल. शब्दांत मांडणं आणि समजावणं कठीण आहे. हा साधारण भूत दिसण्यातला प्रकार आहे. आपल्याला भूत दिसेपर्यंत आपण त्याच्यावर विश्वास ठेवत नाही आणि आपल्याला भूत दिसलं की इतरजण आपल्यावर विश्वास ठेवत नाहीत.
  • Log in or register to post comments

गवि, थँक्स!

संजय क्षीरसागर
Mon, 08/13/2012 - 11:43 नवीन
मायला, हा लेख वाचवायला इतक्या अनंत अडचणी आल्या होत्या की बोलता सोय नाही. तुझ्या प्रतिसादानं लेखाच सार्थक झालं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

तुम्हाला जे म्हणायचंय ते मला

गवि
Mon, 08/13/2012 - 12:13 नवीन
तुम्हाला जे म्हणायचंय ते मला समजलं. ते प्रथमदर्शनी पटण्यासारखं आहे आणि वादविवादांना जन्म देऊ शकेल असं असलं तरी त्यात तथ्यही निश्चित आहे हे कळतं आहे. अर्थातच ते मी फॉलो करु शकेन असं नाही कारण काही गोष्टी धोंड्याप्रमाणे आड येतील. - स्वतःला सर्वापासून वेगळं करण्याचा हा प्रकार आहे. त्यात अपरिहार्यपणे मी माझ्या प्रियजनांपासूनही दूर होतोय. मी वेगळा आहे म्हणण्यामधे आणि बाहेरुन वळून पुन्हा माझ्याकडे पाहण्याच्या प्रक्रियेत मी माझा अत्यंत प्रिय परिवार, बायकोपोरं आणि अन्य जिवाभावाच्या लोकांनाही तसंच बाहेरुन अतएव दुरुन पाहतोय. हेही सर्व त्या आभासाचे भाग असले तरी तसं मान्य करुन मला आनंद मिळत नाही. एकदाच ते मान्य करुन सर्वांपासून दूर चालता होणं असा प्रकार असता तर मला तेही जमवता आलं असतं. पण रोज त्यांच्यासोबत राहून, त्यांच्यात गुंतून पुन्हा दूरस्थपणे स्वतःला आणि पर्यायाने त्यांना पाहात राहणं या गोष्टीसाठी अजून माझी तयारी नाही. -"सत्य असलेला वेगळा मी" काही अज्ञात कारणाने सध्या मानव या रुपात हे सर्व जगत असून त्याचमुळे माझं ते मन (जे असल्याशिवाय प्रत्यक्ष ड्रायव्हिंग फोर्स उपलब्ध नाही म्हणून अपरिहार्य असं मन) उपयुक्ततावादी झालेलं आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीमधे आधी "काय उपेग?" असा प्रश्न विचारायची त्याला सवय झाली आहे. त्यामुळे या सुंदर विचाराचा आणि प्रत्यक्ष जगण्याच्या एका पद्धतीला मी एक पद्धत म्हणूनच पाहणार. अनेक पंथांतला एक आणखी पंथ म्हणूनच पाहणार. आणि यावाचून काय अडतंय किंवा यामुळे "फायदा" काय हेच पाहणार. "मी बिजागरींशी जीव गंजवित बसतो" आणि तो लंघून चौकट पार "निघाया बघतो".. यातला "निघाया बघतो" हा शब्द महत्वाचा आहे. निघाया बघतो.. निघत नाही.. बिजागरींशी जीव गंजवत बसतो ही समजूत झाली. बिजागरीशी बसून त्या लंघू पाहणार्‍याची गंमत बघणे हाही उपक्रम अनेकजण करु शकतात. आय अ‍ॅम इन लॉक्ड इन कंडिशन. सो इज ही.. असं होणं टळण्यासाठी काही अज्ञात मार्गाने मला अधिक वेगळ्या पातळीवर साक्षात्कार व्हायला हवा. तो कसा होईल याचा मार्ग मला माहीत नाही, असला तरी त्यातूनही काही पोटेन्शिअल "फायदा","उपयुक्तता" दिसल्याशिवाय मी तो मार्ग तुडवायला जाणार नाही. तोपर्यंत मी हपीसात जाईन आणि परत येऊन लोळत टीव्ही बघत राहीन. ताण आला की घेईन, काळाचं दडपण आलं की दडपला जाईन, कोणी मेलं की रडीन आणि हसू आलं तर हसीन.. "ताण रिलीज करायचा आहे" हा ताण या सर्व ताणांपेक्षा भयानक असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

"ताण रिलीज करायचा आहे" हा ताण

नगरीनिरंजन
Mon, 08/13/2012 - 13:42 नवीन
"ताण रिलीज करायचा आहे" हा ताण या सर्व ताणांपेक्षा भयानक असतो.
ज्जे ब्बात! आयुष्यातल्या दु:ख, ताण आणि तथाकथित अपयशाला घाबरून स्वतःची काहीतरी समजूत घालायची गरजच काय? आहे ते असं आहे आणि त्याला मला तोंड द्यायचंय असं म्हणणारा त्या नसलेल्या ताणाच्या भीतीने काहीतरी 'लंघून' जाऊ पाहणार्‍यापेक्षा जास्त धैर्यशाली नाही का? तसंही काही काळाने घडून गेलेले सुख असो वा दु:ख, ते त्रयस्थाच्या आयुष्यात घडले असेच स्वप्नवत् वाटते. मग वर्तमानात तरी ते समरसून अनुभवण्यास काय हरकत आहे? खरा मी भलतीकडेच आहे असे एकदा म्हटले की दु:खातला दर्द नाही की सुखातली मजा नाही. मग हे शरीर पाळायचे तरी कशाला फुकटचे? दु:ख टाळून फक्त सुख मिळवायचे म्हटले तरी दु:खा शिवाय सुख किती सपक होईल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

आपण कोणत्याही सत्य किंवा

सोत्रि
Tue, 08/14/2012 - 21:00 नवीन
आपण कोणत्याही सत्य किंवा भ्रामक जगात असलो तरी आपण आपल्या देहाखेरीज आणि मनाच्याही खेरीज वेगळे आहोत. आणि मन आणि शरीर नसलेले आपण हेच फक्त सत्य आहोत. बाकी सर्व मान्यतेचा भाग.
गवि अगदी यथार्थ रसग्रहण लेखाचे! ३-४ वेळा लेख वाचल्यावर साधारण असेच काहीसे (नेमके अगदी असेच नाही) उमगले होते. पण सुरुवातीच्या प्रतिक्रियावाचून, च्यायला, काही घोळ होतोय का म्हणून पुन्हा लेख वाचला आणी मग फक्त संजयजींचे प्रतिसाद वाचत सुटलो, त्यात तुमचा प्रतिसाद आला आणि हायसे वाटले. - (गविपंखा असल्याचा सार्थ अभिमान दाटलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

गवि, क्या बात है साला, इसको बोलते है प्रतिसाद!

संजय क्षीरसागर
Mon, 08/13/2012 - 15:53 नवीन
तुम्हाला जे म्हणायचंय ते मला समजलं. ते प्रथमदर्शनी पटण्यासारखं आहे आणि वादविवादांना जन्म देऊ शकेल असं असलं तरी त्यात तथ्यही निश्चित आहे हे कळतं आहे. अर्थातच ते मी फॉलो करु शकेन असं नाही कारण काही गोष्टी धोंड्याप्रमाणे आड येतील.
पुन्हा धन्यवाद!
- स्वतःला सर्वापासून वेगळं करण्याचा हा प्रकार आहे. त्यात अपरिहार्यपणे मी माझ्या प्रियजनांपासूनही दूर होतोय. मी वेगळा आहे म्हणण्यामधे आणि बाहेरुन वळून पुन्हा माझ्याकडे पाहण्याच्या प्रक्रियेत मी माझा अत्यंत प्रिय परिवार, बायकोपोरं आणि अन्य जिवाभावाच्या लोकांनाही तसंच बाहेरुन अतएव दुरुन पाहतोय. हेही सर्व त्या आभासाचे भाग असले तरी तसं मान्य करुन मला आनंद मिळत नाही. एकदाच ते मान्य करुन सर्वांपासून दूर चालता होणं असा प्रकार असता तर मला तेही जमवता आलं असतं. पण रोज त्यांच्यासोबत राहून, त्यांच्यात गुंतून पुन्हा दूरस्थपणे स्वतःला आणि पर्यायाने त्यांना पाहात राहणं या गोष्टीसाठी अजून माझी तयारी नाही.
आपण कुणापासून दूर होत नाही की कुठे निघूनही जात नाही. ओशोंच एक अप्रतिम वाक्य आहे : `ग्यानी किसिके विरोधमे नही है, बो बस अपने पक्षमे आ गया है!' (अष्टावक्र महागीता) सगळी नाती आणि आप्त जसेच्यातसे आहेत. सगळी कामं चोख होतायत. फक्त पूर्वी आपण सर्वांच्यामधे सापडलो होतो. आता सर्वांना घेरुन आहोत. जास्त संवेदनाशील झालोत पण उगीच भावनिक होत नाही.
-"सत्य असलेला वेगळा मी" काही अज्ञात कारणाने सध्या मानव या रुपात हे सर्व जगत असून त्याचमुळे माझं ते मन (जे असल्याशिवाय प्रत्यक्ष ड्रायव्हिंग फोर्स उपलब्ध नाही म्हणून अपरिहार्य असं मन) उपयुक्ततावादी झालेलं आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीमधे आधी "काय उपेग?" असा प्रश्न विचारायची त्याला सवय झाली आहे. त्यामुळे या सुंदर विचाराचा आणि प्रत्यक्ष जगण्याच्या एका पद्धतीला मी एक पद्धत म्हणूनच पाहणार. अनेक पंथांतला एक आणखी पंथ म्हणूनच पाहणार. आणि यावाचून काय अडतंय किंवा यामुळे "फायदा" काय हेच पाहणार.
सॉलिड फायदा आहे. मन डेटाबेस झालय, विचारांच भावनात आणि भावनांच मूडमधे रुपांतर होत नाहीये. निर्णय सबजेक्टीव न राहता ऑबजेक्टीव झालेत कारण ` सगळी नाती आणि संबंध' आपल्या मान्यता होत्या, आता सगळे सारखे झालेत. तरीही कुठेही कोरडेपणा नाही अत्यंत सक्षमतेनं परिस्थिती हाताळता येतेय. हा पुन्हा ओशोंचा नजरीया पाहा : `वो बीना छुए हुए सबको सम्हाले हुए है!' (अष्टावक्र महागीता)
"मी बिजागरींशी जीव गंजवित बसतो" आणि तो लंघून चौकट पार "निघाया बघतो".. यातला "निघाया बघतो" हा शब्द महत्वाचा आहे. निघाया बघतो.. निघत नाही.. बिजागरींशी जीव गंजवत बसतो ही समजूत झाली. बिजागरीशी बसून त्या लंघू पाहणार्‍याची गंमत बघणे हाही उपक्रम अनेकजण करु शकतात. आय अ‍ॅम इन लॉक्ड इन कंडिशन. सो इज ही..
बट वॉटझ द यूज? अँड हाऊ लाँग वन कॅन हॅव दॅट सोलेस? बिकॉज इट इज जस्ट अ कंपॅरिजन.
असं होणं टळण्यासाठी काही अज्ञात मार्गाने मला अधिक वेगळ्या पातळीवर साक्षात्कार व्हायला हवा. तो कसा होईल याचा मार्ग मला माहीत नाही, असला तरी त्यातूनही काही पोटेन्शिअल "फायदा","उपयुक्तता" दिसल्याशिवाय मी तो मार्ग तुडवायला जाणार नाही.
तो वर सांगितला आहेच
तोपर्यंत मी हपीसात जाईन आणि परत येऊन लोळत टीव्ही बघत राहीन. ताण आला की घेईन, काळाचं दडपण आलं की दडपला जाईन, कोणी मेलं की रडीन आणि हसू आलं तर हसीन.. "ताण रिलीज करायचा आहे" हा ताण या सर्व ताणांपेक्षा भयानक असतो.
येस, हे तर मी देखील करतो पण ताण-बिण काही नाही. आणि ताण रिलीज कुठे करायचाय? ताणाचं मूळ कारण फक्त दूर करायचय. डोंट फाईट वीथ द कॉन्सिक्वन्स जस्ट रिमूव द कॉज... अँड वॉटझ द कॉझ? आपण स्वतःला गोल्डफिश समजतोय!
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

Recent comments

  • भोंदूगिरी...
    1 hour 22 minutes ago
  • खरातचं काय चुकलं? काही नाही…
    1 hour 31 minutes ago
  • भोंदूबाबा ह्याचा नक्की अर्थ…
    8 hours 6 minutes ago
  • छान लेखन !किंमत प्रणाली हे…
    8 hours 10 minutes ago
  • तरी नशिब
    10 hours 11 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: चिनू१९८५
    नोंदणी: Wed, 03/25/2026 - 09:02
  • सदस्य: साधक भूषण
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 19:02
  • सदस्य: दीपक चकवे
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 11:07
  • सदस्य: भूषण तळवेलकर
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 23:18
  • सदस्य: Jayashree15
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 18:55
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा