लेखनविषय (Tags)
'आर. डी. मल्हार' ह्या लेखात धागाप्रवर्तकाने ".....असा संगम कोणालाही जमला नाही , जमणार नाही" असे एक धाडसी व विषयावरील पुरेशी माहिती न घेताच विधान केले. त्यावर प्रतिक्रिया देतांना चौकटराजांनी लिहीले .."[आर. डीं]. नीकिती वाद्ये , किती ताल वापरले याला गणतीच नाही".
माझ्या माहितीप्रमाणे आर. डी. ने नेहमीचे केहेरवा, दादरा, खेमटा वगैरे तीन चार तालच वापरले आहेत, 'घर आजा, घिर आये' ह्या त्याच्या पहिल्याच गाण्यात रूपकचा सुंदर वापर आहे. तेव्हा अगणित ताल त्याने वापरलेले नाहीत. बहुधा चौकटराजांना ठेक्यातील अगणित वैविध्ये, अगणित व्हेरिएशन्स म्हणायची असावीत.
वास्तविक कुठल्याही संगीतकाराने किती ताल वापरले ह्यावरून त्याच्या संगीत कारकीर्दीविषयी काहीही बरेवाईट म्हणता येत नाही. निव्वळ वैविध्य आणण्यासाठी कुणी अनेक ताल वापरेल, तर दुसरा कुणी ठराविक एकाददोन तालांतही बहार आणू शकेल. तेव्हा निरनिराळ्य तालांच्या वापरावरून काहीच अनुमाने आपण काढू नयेत.
पण मग ह्यावरून मी सहज विचार करू लागलो--आपण ऐकलेल्या हिंदी व मराठी चित्रपट व इतर सुगम संगीतात विवीध तालांचा कितपत वापर केला गेला आहे? इथे मी ठुमरी, कजरी, होरी, टप्पा इत्यादी उपशास्त्रीय संगीताचा समावेश करत नाही. तर माझ्या माहितीप्रमाणे केहेरवा, दादरा हेच ताल प्रामुख्याने वापरले गेले आहेत. त्याव्यतिरीक्त एकताल, आध्धा (सितारखानी), तीनताल हे 'प्रमुख ताल' आहेतच. तसेच अधूनमधून रूपक, खेमटा, १४ मात्रांची दीपचंदी हेही ऐकू येतात. शंकर जयकिशन व दत्ताराम सोडून झपताल अन्यत्र फारसा कुठे ऐकू मला आलेला नाही. काहीकाही संगीतकारांचे काही विशीष्ट ताल आवडीचे होते-- जसे नौशाद - दादरा, मदन मोहन- रूपक.
संगीतकार प्यारेलाल (लक्ष्मीकांत-प्यारेलाल द्वयींमधील) ह्यांनी काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत आपण ११ मात्रांचा वापर एका गीताच्या अंतर्यात केला आहे, असे विधान केले होते. 'पलकों की छावों मे' चित्रपटातील 'कोई मेरे माथे पे' हे लताने गायिलेले गीत त्यांना अभिप्रेत होते. गीताचा मुखडा ५ मात्रांत आहे, आणि अंतराही ५ मात्रांतच फिरतो आहे असे मलातरी जाणवते. अंतर्याची बांधणी अत्यंत अवघड आहे, हे मात्र निश्चीत. असे गीत देणार्या, ते वाजवणार्या व गाणार्या सर्वांचे कौतुक करावे तितके थोडेच. पण तरीही तिथे ५.५ (अथवा ११) मात्रा नाहीत असे मला दिसते. तेव्हा ११ मात्रांचा दावा चुकिचा आहे.
तेव्हा वर उल्लेखिलेल्या तालांव्यतिरीक्त अजूनही इतर तालांतील गाणी कुणाला माहिती असली, तर इथे कृपया त्यांविषयी लिहावे.
प्रतिक्रिया
धाडसी विधानाचा खुलासा
ताल म्हणताना केवळ ....
+1
आत्ता लगेच उदाहरणे आठवत
चर्चा वाचते आहे
+१
+२
कोणकोणती गाणी हेही सांगा...
समर्पक प्रतिसाद
माझ्या अल्प ज्ञानाप्रमाणे
लई लई भारी धागा, फार जवळचा पण
वा..
होय तो कहरवाच
सही चाललंय... हे असंही काही
आणखी मजेशीर माहिती
गगन सदन तेजोमय
१०० टक्के दादरा
दादरा का केरवा? दादर्यात
असे
समारोप
प्रदीप, एक विनंती... सोदाहरण लिहाच!