Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by गणपा on गुरुवार, 04/26/2012 - 00:55
लेखनविषय (Tags)
बालकथा
विनोद
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा
काल फोन वर बोलताना लेकीचा मुड छान होता. शक्यतो तिच्या गप्पा ३-४ वाक्यातच संपतात. पण सध्या मे महिन्याच्या सुट्टीचे डोहाळे चालु झालेत. त्यामुळे स्वारी खुशीत होती. शाळेतल्या गमती जमती सांगायला आतुर झाली होती. परवा म्हणे इंग्रजीच्या तासाला बाई 'अ‍ॅबस्ट्रॅक्ट' आणि 'काँक्रिट' नाउन शिकवत होत्या. तिसरीतल्या मुलांना समजेल अश्या शब्दात समजवण्याची बाईंची कसरत चालु होती. तरी जमेल तितकी व्याख्या सोप्पी करत बाई म्हणाल्या की अ‍ॅबस्ट्रॅक्ट नाऊन म्हणजे ज्या गोष्टीं आपल्याला पहाता येत नाही वा वास घेता येत नाही किंवा स्पर्शही करता येत नाहीत त्या. उदा. ब्युटी, हॅप्पीनेस. आणि काँक्रिट नाउन म्हणजे अ‍ॅबस्ट्रॅक्टच्या विरुद्ध. इतक्यात बाईंच वर्गातल्या आर्यकडे लक्ष गेल. त्याच्या टिवल्या-बावल्या चालु होत्या. बाईंनी आवाज चढवत त्याला काँक्रिट नाऊनचे उदाहरण देण्यास सांगीतले. बिचारा एकदम भेदरला. पण जरा डोकं खाजवून म्हणाला की 'टिचर सुसु. We can see, it smell it, and touch it.' आणि मग वर्गात एकच हशा पिकला. थोड्या वेळाने सगळं शांत झाल्यावर आमच्या बाईसाहेबांच्या डोक्यात शंकेची पाल चुकचुकली. ती (मागील काही अनुभव गाठिशी असल्याने) हळुच बाईंच्या जवळ गेली आणि विचारल 'टिचर आपल्या शरिराच्या आतले भाग (हृदय्,मेंदु,हाडं) अ‍ॅबस्ट्रॅक्ट की काँक्रिट?' बाईंनी 'काँक्रिट' अस उत्तर दिल्यावर पुढचा प्रश्न आलाच. 'पण ते आपल्याला दिसतात कुठे? आपण टच पण करु शकत नाही की स्मेलपण घेउ शकत नाही?' बाईंच्या नशिबाने तेवढ्यात तास संपल्याची घंटा झाली. असच एकदा वर्गात भुगोलाचा तास चालु होता. बाईंनी 'ऑर्बिट'ची व्याख्या फळ्यावर लिहिली आणि मुलांना उतरवुन घ्यायला सांगीतली. 'The curved path on which Earth rorates around Sun in a circular motion.' तितक्यात बाहेरुन कुणी तरी आल्याने पाचेक मिनिटाचा गॅप पडला. बाई परत फळ्याकडे आल्या. लेकीचा हात वर झालेला पाहुन बाईंनी विचारल काय शंका आहे? 'टिचर रोटेट ऑर रिव्हॉल्व्ह? रोटेट का मतलब अपने और ही घुमना होता है ना?' बाईंनी निमुट आपली चुक मान्य केली आणि तिच कौतुक केल. लेकचीचे विमान एकदम सातवे आसमाँ में. :) एकदा गणिताच्या तासाला असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आकडे लिहिण चालु होतं. बाई पुस्तकात पाहुन आकडे लिहित होत्या. सगळ्या संख्या चार आकडी होत्या. पण पुस्तकातल पाहुन फळ्यावर उतरवताना बाईंनी एका चार आकडी संख्येतला एक आकडा खाउन टाकला. मुलांनी स्वतःची अक्कल लावून ती तिन आकडी संख्या सगळ्यात खाली लिहिली. मुलांचा अभ्यास तपासताना बाईंनी सगळ्या मुलांच उत्तर (पुस्तकातल्या उत्तराला प्रमाण मानुन) चुक दिल. (त्यांनी स्वतः घातलेला घोळ त्यांच्या गावी नव्हता.) पण नेहमी प्रमाणे लेकीला रहावल नाही. बाईंची चुक नजरेस आणुन दिली. म्हणे जर तुम्ही पुस्तकातला प्रश्न दिला असेल तर तुम्ही एक आकडा गाळलाय. आणि जर तुमच्या मनाच गणित घातलं असेल तर आमच उत्तर बरोबर आहे. बाईंनी काही न बोलता पाठ फिरवली आणि त्यांची चुक दुरुस्त केली. बाई साधं थँक्यु पण नाही म्हणाल्या ही तीची खंत तिने मला बोलुन दाखवली. :) सध्या सगळ्या बाईंच्या चुका काढण्याचा नवा छंदच तिला जडलाय. हिंदीचा तास चालु होता. बाई फळ्यावर एक वाक्य लिहित होत्या 'और उसने डंडा उठाया |' शक्यतो हिंदी मध्ये बरेच वेळा ड खाली टिंब येते अस गेल्या वर्षी व्याकरणात शिकवल होत. ही बया परत उभी राहिली आणि बाईंची शाळा घेतली. हीची ख्याती माहित असल्याने बाईंनी पुस्तक उघडल आणि धडा चाळुन पाहिला. डंडा खाली टिंब दिसत नसल्याची खात्री करुन मग बाईंनी असा काही लुक दिला लेकीला की तिचे सारे तारे जमीं पर आले. ;)
  • Log in or register to post comments
  • 20555 views

प्रतिक्रिया

Submitted by पाषाणभेद on गुरुवार, 04/26/2012 - 01:05

Permalink

लेक घरी येवून तुमचा गृहपाठ

लेक घरी येवून तुमचा गृहपाठ घेते की नाही?
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणी on गुरुवार, 04/26/2012 - 13:06

In reply to लेक घरी येवून तुमचा गृहपाठ by पाषाणभेद

Permalink

हा हा हा

मी गणपाला मागेच सांगीतले आहे की तुझा "डोक्यावर केस आहेत" असा आत्ताचा फोटो काढून ठेव म्हणून.
  • Log in or register to post comments

Submitted by जेनी... on गुरुवार, 04/26/2012 - 01:13

Permalink

सहि आहे लेक ..रीअलि शाळेतले

सहि आहे लेक ..रीअलि शाळेतले दिवस आठवले ..विनाकारन ..एखादा शब्द पकडुन बाईना आनि गुर्जिना त्रास द्यायला जाम आवडायच मलाहि ..;) तुमच्या लेकिचं नाव कळेल का .....?? माझ्याकडुन खुप खुप शुभेच्छा तीला ....:) (चौकस बुद्धि पूढे लयि कामि येते मुलिन्च्या :P )
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on गुरुवार, 04/26/2012 - 01:15

Permalink

मुलीचा कल पाहून तिला योग्य दिशा द्या, ती नांव काढेल!

कल शोधण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तिचं लक्ष सतत कोणती गोष्ट वेधून घेते हे पाहणं. हे फक्त मुलांना पैश्याची समज येण्यापूर्वीच होऊ शकतं आणि ती तिसरीत असल्यानं हीच योग्य वेळ आहे. She has an analytical mind with a great faculty of simplyfying & applying the things learnt & that is very rare. ती जे आत्मसात करेल त्याचं सोनं करेल, अशी संधी गमावू नका. काहीही हवं असेल तर व्य. नि. करा.
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on गुरुवार, 04/26/2012 - 01:17

Permalink

लेक हुशार आहे हो...

लेक हुशार आहे हो... बिचार्‍या बाई..! :-)
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on गुरुवार, 04/26/2012 - 01:48

Permalink

गणपा, लेक जबरदस्त तल्लख आहे!

एकदम सलाम! (आणि हो, हा जुना शतकी धागाही आठवला.)
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on गुरुवार, 04/26/2012 - 20:50

In reply to गणपा, लेक जबरदस्त तल्लख आहे! by बहुगुणी

Permalink

+१

असेच म्हणतो. मला देखील तोच धागा आठवला पण तुम्ही आधीच दुवा दिला होता! :-)
  • Log in or register to post comments

Submitted by पिंगू on गुरुवार, 04/26/2012 - 02:49

Permalink

लेकीचे आणखी किस्से असतील.

लेकीचे आणखी किस्से असतील. काही किस्से चेपुवर पाहिले आहेतच.. :) - पिंगू
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on गुरुवार, 04/26/2012 - 04:10

Permalink

भारी चौकस पोरगी आहे हो!!

भारी चौकस पोरगी आहे हो!! किस्से एकदम धमाल आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on गुरुवार, 04/26/2012 - 05:53

Permalink

खर सांगु? तुम्हाला आम्हाला

खर सांगु? तुम्हाला आम्हाला तिच कौतुक आहे म्हणुन हुषार, पण त्या बाईंना विचारा, त्या म्हणतील 'ती ना ती गणपाची लेक, फार अक्कल पाजळते'. या असल्या शेर्‍या पासुन तिने हर्ट होउ नये अशी तिची मनोधारणा बनवा. जेव्हढी हुषार आहे तेव्हढीच मनान दणकट बनवा. मला विचाराल तर पोर अगदी दृष्ट लागण्याएव्हढी तल्लख आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on गुरुवार, 04/26/2012 - 06:21

In reply to खर सांगु? तुम्हाला आम्हाला by स्पंदना

Permalink

'ती ना ती गणपाची लेक, फार

'ती ना ती गणपाची लेक, फार अक्कल पाजळते'. सहमत आहे.;) आजकाल मी मुली असणार्‍यांशी फार म्हणजे फार प्रेमानं वागते. त्यांना खूष ठेवते. काही वर्षांनी हुंड्यात जरा डिस्काऊंट मिळेल म्हणून.;) बाकी त्या बाईंनी थ्यांक्यू तरी म्हणायला हवं होतं. ते मलाही खटकलं.
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on गुरुवार, 04/26/2012 - 11:21

In reply to 'ती ना ती गणपाची लेक, फार by रेवती

Permalink

बाप रे

काय 'दूरदृष्टी ' हो ही.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on गुरुवार, 04/26/2012 - 13:27

In reply to बाप रे by रमताराम

Permalink

काय 'दूरदृष्टी ' हो

काय 'दूरदृष्टी ' हो ही. खीखीखी... ख्या ख्या ख्या... ;) आज्जीच ती ! 'दूरदृष्टी ' असायचीच तिच्याकडे ! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on गुरुवार, 04/26/2012 - 18:22

In reply to बाप रे by रमताराम

Permalink

आपला मुलगा चांगल्या घरी पडावा

आपला मुलगा चांगल्या घरी पडावा असे सगळ्या आईवडीलांना वाटते.;)
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Fri, 04/27/2012 - 08:02

In reply to आपला मुलगा चांगल्या घरी पडावा by रेवती

Permalink

आपला मुलगी चांगल्या घरी पडावी

आपला मुलगी चांगल्या घरी पडावी असे सगळ्या आईवडीलांना वाटते. ;) हे असे हवे हो... ;)
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Fri, 04/27/2012 - 08:13

In reply to आपला मुलगी चांगल्या घरी पडावी by मदनबाण

Permalink

दिवस बदलले हो बाणा!

दिवस बदलले हो बाणा!
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Fri, 04/27/2012 - 08:17

In reply to दिवस बदलले हो बाणा! by रेवती

Permalink

दिवस बदलले हो बाणा! दिवस तसेच

दिवस बदलले हो बाणा! दिवस तसेच फक्त मुली बदलल्या आहेत ! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on गुरुवार, 04/26/2012 - 06:24

Permalink

होय रे बाबा!

पोरांचं काही सांगता येत नाही हल्लीच्या! कधी टेंपोत बसवतील त्याचा नेम नाही... :)
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on गुरुवार, 04/26/2012 - 06:40

In reply to होय रे बाबा! by पिवळा डांबिस

Permalink

अगदी!! आमच्यावेळी हे असं

अगदी!! आमच्यावेळी हे असं नव्हतं!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 04/26/2012 - 06:59

Permalink

शाब्बासकी द्या आमच्या वतीनं.

लेक हुशार आहे. अस्संच तिला चौकस ठेवा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल on गुरुवार, 04/26/2012 - 09:41

Permalink

इ बबो...............

मिर्‍या........गणपाचे डोके....... आमी नाय जा. बाकी अपर्णाअक्षयशी पूर्णता सहमत.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on गुरुवार, 04/26/2012 - 09:53

Permalink

भावी संपादक.

व्वा...! पाऊलावर पाऊल का? म्हणजे लवकरच (माझ्या सत्तर-पंचाहत्तरीत), मिपावर (निदान) संपादक व्हायची तिला फुल्ल संधी आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on गुरुवार, 04/26/2012 - 10:00

Permalink

तू ओककाकावाली नाडी बघून नाव

तू ओककाकावाली नाडी बघून नाव ठेवलेलंस का काय मुलीचं...?????
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on गुरुवार, 04/26/2012 - 10:18

Permalink

एकदम धमाल.

एकदम धमाल.
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on गुरुवार, 04/26/2012 - 10:21

Permalink

हा हा हा! जबर्‍या!

हा हा हा! जबर्‍या!
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on गुरुवार, 04/26/2012 - 10:26

Permalink

गणपाशेठ तुमचे काही खरे नाही.

गणपाशेठ तुमचे काही खरे नाही. लेक चांगलीच वात आणणार आहे तुम्हाला तुम्ही परतल्यावर :)
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on गुरुवार, 04/26/2012 - 10:31

Permalink

बेश्ट!

तिला नेहमी चांगले शिक्षक मिळू दे ह्या शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on गुरुवार, 04/26/2012 - 11:24

Permalink

एक नंबर

पोरगी खट आहे एकदम. आपले बरोबर असेल तर मास्तरणीलादेखिल (प्लीज नोट, मास्तर म्हटलेले नाही; देअर इज डिग्री ऑफ डिफरन्स. मास्तर म्हटले तर तीव्रता बरीच कमी होते.) न घाबरता चूक तिच्या पदरात (आय मिन ओढणीत.... जाऊ दे पर्स मधे) घालते म्हणजे लैच शूर आहे राव. तुमचं काही खरं नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by सानिकास्वप्निल on गुरुवार, 04/26/2012 - 12:12

Permalink

हा हा हा हा

भारी हुशार आहे ओ लेक :)
  • Log in or register to post comments

Submitted by स्मिता. on गुरुवार, 04/26/2012 - 13:13

Permalink

हा हा हा...

लई भारी पोरगी आहे तुमची लेक! मागे तो 'आय लव्ह यू' चा किस्सा आणि आता हे... घरात सगळ्यांची शिकवणी घेत असणार :)
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on गुरुवार, 04/26/2012 - 13:18

Permalink

छान !! अवांतर : मास्तरीणी चा

छान !! अवांतर : मास्तरीणी चा फोटो उपलब्ध होवु शकतो का ;)
  • Log in or register to post comments

Submitted by चिगो on गुरुवार, 04/26/2012 - 13:23

Permalink

भारी..

तल्लख आणि हुषार तर आहेच तुमची लेक, पण धाडसी पण आहे.. च्यायला, आपल्यात मास्तर/मास्तरणीला अक्कल शिकवायची किंवा काढायची हिम्मत नव्हती.. ( काळ बदललाय म्हणतात तो हाच.. ;-)) आणखी किस्से येऊ द्यात लेकीचे, गणपाभौ..
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणी on गुरुवार, 04/26/2012 - 13:26

In reply to भारी.. by चिगो

Permalink

आणखी किस्से येऊ द्यात लेकीचे, गणपाभौ..

गणपाला अडचणीत आणण्याचा डाव दिसत आहे हा. ;)
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on गुरुवार, 04/26/2012 - 13:25

Permalink

खीखीखी धमाल अनुभव !

खीखीखी :) धमाल अनुभव ! :)
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on गुरुवार, 04/26/2012 - 13:39

Permalink

धन्यवाद मंडळी. आधी म्हटलं

धन्यवाद मंडळी. आधी म्हटलं टाकु की नको ईथे. उगाच स्वःतच्या लेकीच्या हुशारीची टिमकी वाजवतोय असं वाटायला नको. पण मग म्हटल असे मजेशीर किस्से आपल्या लोकांत शेयर करायचे नाहीत तर अजुन कुठे. :) सर्वांचे मनःपुर्वक आभार. लेकीला तुमच्या शुभेच्छा आणि कौतुक कळवतो. :)
  • Log in or register to post comments

Submitted by मेघवेडा on गुरुवार, 04/26/2012 - 13:41

Permalink

दणकट! एवढ्याश्या वयात इतका

दणकट! एवढ्याश्या वयात इतका चौकसपणा पाहून कौतुक वाटतं.. मास्तरणी टरकून असणार!
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on गुरुवार, 04/26/2012 - 14:14

Permalink

बेष्ट... तिला हा लेख आणि

बेष्ट... तिला हा लेख आणि सार्‍या प्रतिक्रिया वाचून दाखवल्यावर तिचा काय प्रतिसाद मिळतो तेही लिही रे... :)
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on गुरुवार, 04/26/2012 - 19:28

In reply to बेष्ट... तिला हा लेख आणि by भडकमकर मास्तर

Permalink

आत्ताच तिला लेख आणि सगळ्या

आत्ताच तिला लेख आणि सगळ्या प्रतिक्रिया वाचुन दाखवल्या. खुश झाली एकदम सगळ्यांच कौतुक ऐकुन. पण जाता जाता माझी चुक काढलीच तिने. "बाबा तु पण ना.. मी मुव्ह नव्हते म्हणाले काही. रिव्हॉल्व्ह म्हणाले होते. अर्थ रिव्हॉल्व्ह्ज अराउंड सन." असो... गपगुमान वर बदल केले आहेत. :(
  • Log in or register to post comments

Submitted by यकु on गुरुवार, 04/26/2012 - 19:30

In reply to आत्ताच तिला लेख आणि सगळ्या by गणपा

Permalink

___/\____!!!! =)) =))

___/\____!!!! =)) =)) =)) भन्नाट दिसतेय छोटी.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Fri, 04/27/2012 - 06:36

In reply to आत्ताच तिला लेख आणि सगळ्या by गणपा

Permalink

ह्ये . काढली ना विकेट?

ह्ये . काढली ना विकेट?
  • Log in or register to post comments

Submitted by चिगो on Fri, 04/27/2012 - 11:22

In reply to आत्ताच तिला लेख आणि सगळ्या by गणपा

Permalink

ढिचक्यॅ ऽ ऽ व ऽ ऽ..

"बाबा तु पण ना.. मी मुव्ह नव्हते म्हणाले काही. रिव्हॉल्व्ह म्हणाले होते. अर्थ रिव्हॉल्व्ह्ज अराउंड सन."
अय्याय गं... मेलो मी. काय भन्नाट छोकरी आहे हो.. माझं नुस्तं कौतूकच नाही, तर सलामही कळवा.. :-)
  • Log in or register to post comments

Submitted by अमृत on गुरुवार, 04/26/2012 - 14:20

Permalink

म्हणुनच म्हणतात

'Child is father of man' :-) अमृत
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on गुरुवार, 04/26/2012 - 15:36

Permalink

हा हा हा

येवढी हुशार आहे म्हणजे नक्की आईवरती गेली असणार. हो की नै रे गंपा ?
  • Log in or register to post comments

Submitted by जेनी... on गुरुवार, 04/26/2012 - 22:53

In reply to हा हा हा by परिकथेतील राजकुमार

Permalink

हेहेहे पटलं खरच मनापासुन

हेहेहे पटलं खरच मनापासुन पटलं आईवरच गेलि असनार ......:) स्त्री पक्षाचा ( जातीचाहि चालेल :P) विजय असो ;)
  • Log in or register to post comments
Profile picture for user सोत्रि

Submitted by सोत्रि on Fri, 04/27/2012 - 08:55

In reply to हा हा हा by परिकथेतील राजकुमार

Permalink

हलकट्ट ...

परा, तु हलकट्ट आहेस.... हा प्रतिसाद मला द्यायचा होता, तु आधिच टाकलास, म्हणून तु हलकट्ट आहेस ;) - (हलकट) सोकाजी अवांतरः गणपाभौ, मस्त! लेक नाव काढील हो तुमचे !
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल on गुरुवार, 04/26/2012 - 16:14

Permalink

गणपाशेट

बाटली पोचवली नाय वाट्ट ?
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on गुरुवार, 04/26/2012 - 18:27

Permalink

छान छान छान

छान छान छान... अश्याच आणखी गमती जमती लिहित रहा.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on गुरुवार, 04/26/2012 - 21:02

Permalink

हाहाहा!

पोट्टी तुझ्या डोळ्यासमोर तारे चमकवेल कधीतरी! मोठी होईल तसं जास्त लक्ष ठेव रे बाबा!
  • Log in or register to post comments

Submitted by sneharani on Fri, 04/27/2012 - 12:03

Permalink

मस्त

मस्त किस्सा! येऊ देत अजुन असे किस्से!! ;) :)
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Fri, 04/27/2012 - 12:41

Permalink

हिच्या वेळी हिच्या आईनी काय

हिच्या वेळी हिच्या आईनी काय खाल्ल होतं हो???
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com