✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सिंहीण

च
चेतन सुभाष गुगळे यांनी
गुरुवार, 11/10/2011 - 19:25  ·  लेख
लेख
खरं तर http://www.misalpav.com/node/19536#comment-348648 इथेच कबूल केलं होतं त्याप्रमाणे लिहीणार होतो पण काही कारणास्तव तेव्हा जमलं नाही. आज सायंकाळी आमच्या दारावरील घंटी वाजली. दरवाजा उघडून पाहिले असता कोणी दिसले नाही परंतू आमच्या पत्रपेटीत खालील कागद आढळला. हा कागद वाचताच माझी एक जुनी आठवण जागी झाली. साधारण दोन दशकांपूर्वीची हकीगत आहे. तेव्हाही असाच एक कागद आमच्या पत्रपेटीत आढळला होता. फक्त तेव्हा वक्तृत्व स्पर्धा होती आणि स्पर्धेचे आयोजक होते लायन्स क्लब ऑफ निगडी, पुणे. स्पर्धेसाठी विषय होता जातीयवाद - समस्या आणि उपाय. कागदावरील आवाहनास अनुसरून लगेचच जुळवाजुळव सुरू झाली. दोन दिवसांत भाषण लिहून काढले आणि पुढचा एक आठवडा पाठांतर व सरावात घालवला. स्पर्धेचा दिवस उजाडला. ज्या क्रमाने स्पर्धेकरीता नावे नोंदविली गेली होती त्या क्रमाने एकेक जण पुढे येऊन व्यासपीठावर भाषण करू लागला. ती भाषणे ऐकताच माझा उत्साह मावळला. बहुतेक सर्वांनीच जातीयवादाचा संदर्भ चालु घडामोडींशी जोडला होता. जातीनिहाय आरक्षण ठेवल्यामुळे गुणवत्तेला डावलले जाऊन अपात्र लोकांना संधी मिळत असून त्यामुळेच समस्या निर्माण होत आहेत व यावर उपाय म्हणजे जातिनिहाय आरक्षण पूर्णपणे नष्ट करून गुणवत्ता हा एकमेव निकष ठेवला जावा असाच सर्व स्पर्धकांचा सूर होता. याउलट माझ्या भाषणात मी जातीयवादाचा संबंध प्राचीन काळाशी जोडून त्याकाळी चातुर्वर्ण्य पद्धतीमुळे शूद्र ठरविल्या गेलेल्या जातींवर इतर तथाकथित उच्च जातींकडून कसा अन्याय झाला वगैरे मुद्दे मांडले होते. जातिभेदामुळेच पानिपतच्या लढाईत मराठे अब्दाली पुढे हरले या गोष्टीचेही दाखले माझ्या भाषणात होते. जातिभेद विसरून सर्वांनी एकजुटीने राष्ट्राची प्रगती साधण्याकरिता कटिबद्ध व्हायला हवे हा संदेशही शेवटी होताच. आपले भाषण आऊड ऑफ डेट आहे हे मला जाणवू लागले तसेच इतर स्पर्धकांच्या तूलनेत माझ्या भाषणात अतिशय साधी व अनाकर्षक वाक्ये होती. इथे स्पर्धकांच्या वाक्यांना टाळ्यावर टाळ्या पडत होत्या आणि माझ्या मनावर निराशेचे सावट पडू लागले होते. तरीही, त्याच मनस्थितीत माझे नाव पुकारले गेल्यावर मी व्यासपीठावर गेलो आणि पाठ केलेले भाषण एका लयीत म्हंटले. अपेक्षेप्रमाणेच पूर्ण भाषणा दरम्यान व भाषण संपल्यावरही सभागृहात स्मशान शांतता होती. इतर स्पर्धकांना हंशा व टाळ्या यांचा भरघोस प्रतिसाद देणार्‍या प्रेक्षकांनी माझ्या भाषणाला अतिशय शांत चित्ताने ऐकून घेतले होते. आपला काय निकाल लागणार हे उमजून मी जागेवर जाऊन बसलो. त्यानंतर परीक्षकांनी आपले मनोगत ऐकवायला सुरूवात केली. त्यांच्या दृष्टीने लोकानुनय करण्यासाठी इतर स्पर्धकांनी जी टाळ्याखेचक वाक्ये भाषणात वापरली होती ती केवळ जनक्षोभ भडकविण्याच्या लायकीची होती. स्पर्धेत अशी भाषणे बाद केली जात असल्याने त्यांचा विचार गुणांसाठी केला गेलेला नव्हता. त्यामुळे अगदी अनपेक्षितरीत्या परीक्षकांनी मला त्या स्पर्धेचा विजेता घोषित केले. त्याच दिवशी सायंकाळी आठ वाजता लायन्स क्लबच्या गेट टुगेदर मध्ये मला पारितोषिक स्वीकारण्यासाठी आमंत्रित केले गेले. सायंकाळी मी कार्यक्रमाला निघण्याआधी आई मला म्हणाली, "नेहमीप्रमाणे बोरिंग कपडे घालु नको. तुझ्याकरिता मी नवीन ड्रेस आणलाय तो घालुन जा." हा नवा कोरा ड्रेस म्हणजे गुलाबी रंगाची बॅगी जीन्स पॅन्ट, जिला गुडघ्यावर खिसा, खिशाला एक फ्लॅप, फ्लॅप वर बोटभर लांबीची पट्टी आणि ती पट्टी अडकविण्यासाठी पुन्हा खिशावर एक स्टील ची रिंग आणि या पॅन्ट सोबत भडक काळ्या रंगाचा टीशर्ट, टीशर्ट वर पोटाजवळ अगदी मधोमध कांगारूच्या पोटपिशवीची आठवण व्हावी इतका मोठा खिसा. हा पोशाख बघूनच मला झिणझिण्या आल्या. पण आईच्या मते क्लबातल्या पार्टीत जायचे म्हणजे असाच "मॉडर्न" ड्रेस हवा. शेवटी अनिच्छेनेच मी तो पोशाख परिधान केला. त्यानंतर माझ्या चेहर्‍यावर बळेच कुठलीशी पावडर थोपली गेली आणि कपड्यांवर परफ्युम शिंपडण्यात आले. कहर म्हणजे पायांत हिरव्या पांढर्‍या रंगातील स्पोर्ट शूज. कारण पार्टीत फॉर्मल शूज बरे दिसत नाहीत. अशा प्रकारे एकदाचा मी माझ्या मातोश्रींच्या अपेक्षेप्रमाणे पार्टी ऍनिमल दिसू लागल्यावरच मला घराबाहेर जाऊ देण्यात आले. तर अशा अवतारात मी एकदाचा गेट टुगेदरच्या स्थळी ठीक आठ वाजता पोचलो. अर्थात तेव्हा तिथे चिटपाखरूही हजर नव्हते. साडेआठ नंतर हळूहळू एक एक करून मंडळी येऊ लागली. हे सर्व क्लबचे सदस्य होते. त्यांच्या आपसात गप्पा रंगु लागल्या. माझ्या ओळखीचे कोणीच नसल्याने मला अवघडल्यासारखे होऊ लागले. थोड्या वेळाने एका व्यक्तिने ओरडून सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. हा एक मध्यमवयीने इसम दिसत होता. त्याने हातात एक मोठे कापड घेतले होते. दुसर्‍या हातात सीझ फायर सारखे एक उपकरण होते. अर्थात त्याच्या या वस्तुचे नाव वेगळे होते. त्याच्या म्हणण्याप्रमाणे हे उपकरण त्याच्या वर्कशॉपमध्ये बनले होते आणि आग विझविण्यासाठी सीझ फायरपेक्षा अनेक पटींनी जास्त कार्यक्षम व स्वस्त ही होते. म्हणजे थोडक्यात तो तिथे त्याच्या उत्पादनाची जाहिरात करीत होता. तरी आता वेळ घालवावा म्हणून मी त्याचा उपद्व्याप पाहत होतो. त्याने बराच गाजावाजा करून आधी ते कापड पेटविले आणि डाव्या हातात धरले. नंतर लोकांचे आपल्याकडे पुरेसे लक्ष आहे ह्याची खात्री करून घेत उजव्या हातातील फायर एक्स्टिन्ग्विशरने त्यावर फवारा सोडण्यास सुरूवात केली. भरपूर फवारा सोडूनही ती आग काही आटोक्यात येईना. नंतर त्याच्या डाव्या हाताला चटके बसू लागले. शेवटी लोक ओरडू लागल्यावर त्याने ते जळते कापड खाली फरशीवर सोडले आणि शेवटी त्यास बुटांच्या साहाय्याने विझविले. त्याची फजिती पाहून लोक फिदीफिदी हसत कुजबुजू लागले. एक शॉर्ट फिल्म संपली. चला आता पुन्हा कंटाळवाणी प्रतिक्षा असा विचार करून मी एका रिकाम्या जागी जाउन बसू लागलो तोच मला कोणीतरी "हॅल्लो हॅल्लो" करून बोलावते आहे असे जाणविले. आवाजाच्या दिशेने पाहिले असता, एक तरूणी हात करून मला तिच्या जवळच्या रिकाम्या आसनावर बोलावत असल्याचे दिसले. तिने गरबा/दांडिया खेळताना वापरतात तसा भडक जांभळ्या रंगाचा पोशाख (त्यास चणिया चोली का कायसे म्हणतात. अर्थात हे मला तेव्हा ठाऊक नव्हते) परिधान केला होता. तशाच जांभळ्या रंगाची लिपस्टीक व चेहर्‍यावरही खुपसा मेक-अप केला होता. पापण्या व भुवयांसोबतच डोक्यावरचे केसही रंगविलेले होते. तिच्या आवाजाला एक वेगळाच घोगरा टोन होता (नेमक्या शब्दांत सांगायचं तर तिचा आवाज अगदी राणी मुखर्जीसारखा होता. अर्थात तेव्हा मी राणी मुखर्जीचा आवाज ऐकला नव्हता). त्या अमराठी तरूणीने मला स्वत:च्या शेजारी बसवून हिंदी-इंग्रजी मिश्र भाषेत संवाद सुरू केला जो मी इथे मराठीत देत आहे. ती : हाय. नवीन सभासद का? मी : नाही. वक्तृत्व स्पर्धेत पारितोषिक मिळालेय, ते घ्यायला आलोय. ती : व्वॉव! अभिनंदन! काय विषय होता? मी : जातीयवाद - समस्या आणि उपाय. ती : ???? मी : (घसा खाकरून) जातीय... ती : बरं ते जाऊ दे. आज रात्री काय प्रोग्रॅम आहे? मी : रात्री? आता रात्रच नाही काय? आता दहा वाजेपर्यंत हा कार्यक्रम संपला की सरळ घरी जाऊन झोपणार. ती : (माझ्या डावीकडून स्वत:चा उजवा हात माझ्या उजव्या खांद्यावर ठेवत) बोरिंग! काहीतरीच... ही काय रात्र थोडीच आहे? ही तर सायंकाळ आहे. आणि आताशी सव्वानऊ वाजतायेत. हा कार्यक्रम साडे अकरा आधी संपत नाही. तू काही दहा वाजता घरी पोचू शकत नाहीस. मी : (तिने ज्या पद्धतीने माझ्या खांद्यावर हात ठेवून मला वेढून घेतले होते तो अनुभव मला एकदम नवीनच होता. त्यामुळे अतिशय गडबडून) काय? छे! इतका उशीर. मला घरी रागावतील. मला निघायलाच हवे. (मी उठून उभा राहू लागलो) ती : (हातांनी माझा खांदा दाबून मला खाली बसवत) बस रे! असा कसा जातोस? तुझं प्राईझ नाही का घेऊन जाणार? आणि इतका भितोस काय? साडे अकरा म्हणजे काही उशीर नाही. मी तर त्यानंतर एका डान्स पार्टीला जाणार आहे. इन्फॅक्ट मी तुला तेच विचारणार होते. मला कुणी पार्टनर नाहीये. तू होतोस का माझा डान्स पार्टनर? मी : पण मला दांडिया खेळता येत नाही. ती : (हसत) तूला कोणी सांगितलं मी तिथ दांडिया खेळणार आहे म्हणून? मी : तुमच्या ड्रेस कडे पाहून मला वाटलं तसं... ती : (आणखी मोठ्याने हसत) अरे मला तुम्ही काय म्हणतोस. कॉल मी XYZ (तिने तिचे नाव सांगितले). मी : बरं, पण मला कुठलाच डान्स येत नाही (मला आता तिथून माझी सुटका करून घ्यावीशी वाटत होती). ती : अरे त्यात फारसं काही अवघड नसतं, आणि त्यातूनही काही अडचण आलीच तर मी आहेच की तुझ्याबरोबर. बाय द वे तुझं नाव काय? चे त न खरं तर माझ्या घशाला इतकी कोरड पडली होती की त्यातून एखादा शब्द मोठ्या मुश्किलीने कुजबुजण्याइतपत आवाजातच निघाला असता. अचानक माझा आवाज इतका मोठा कसा झाला? अर्थात मला जास्त वेळ आश्चर्य करावेच लागले नाही कारण पुन्हा तितक्याच मोठ्याने माझ्या नावाचा पुकारा करणारा आवाज आला आणि माझ्यासह इतर अनेकांनी आवाजाच्या दिशेने पाहिले. माझे वडील माझ्याकडे अतिशय रागाने पाहत सभागृहाच्या प्रवेशद्वारातून आत येत होते. मी चटकन त्या तरूणीचा माझ्या खांद्यावरील हात झटकून टाकीत वडिलांपाशी पोचलो. मला घेऊन ते कार्यक्रमाच्या आयोजकांपाशी गेले आणि म्हणाले, "मी चेतनला इथून घेऊन चाललोय." आयोजक उद्गारले, "अहो, असं काय करता? सकाळी स्पर्धेच्या वेळी आमचे सभासद हजर नव्हते. आता सर्वांनाच चेतन त्याचं सकाळचं भाषण ऐकवेल. मग आम्ही त्याला पारितोषिक देऊ." " हे पाहा. तुम्हाला वेळेवर कार्यक्रम सुरू करता येत नाही की संपवता येत नाहीत. तिकडे सगळे त्याची घरी वाट पाहतायेत आणि इथे तुम्ही अजून त्याला थांबवून ठेवायची भाषा करताय. तुमचं बक्षीस बिक्षीस काही नको आम्हाला. हा मी त्याला घेऊन चाललो." माझ्या वडीलांचा उग्र आवेश पाहून आयोजक बावरले. त्यांनी लागलीच पारितोषिकाची ट्रॉफी माझ्या हाती ठेवली आणि मी वडिलांसोबत घरी निघालो. घरी पोचेपर्यंत आणि त्यानंतरही वडील घडल्या प्रसंगाबद्दल काहीच बोलले नाहीत. परंतु जे घडले ते त्यांना निश्चितच आवडले नसणार. त्यानंतर मी ठरविले की जीन्स टीशर्ट असा विदुषकी पोशाख कधीच परिधान करायचा नाही. तेव्हापासून मी पिकनिक असो की पार्टी कायमच कटाक्षाने "फॉर्मल अटायर" परिधान करतो आणि स्पोर्ट शूज ही मॉर्निंग वॉक शिवाय इतर वेळी वापरत नाही.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव

प्रतिक्रिया द्या
73109 वाचन

💬 प्रतिसाद (174)

प्रतिक्रिया

१. तुमच्या आईने कुठल्या

मृत्युन्जय
गुरुवार, 11/10/2011 - 22:27 नवीन
१. तुमच्या आईने कुठल्या दुकानातुन टी शर्ट आणि जीन्स खरेदी केली होती? २. लाय्न्स क्लब्ची मेंबर्शिप कुठे मिळवावी? ३. त्या तरुणीने तुम्हाला केवळ नाचायची विनंती केली होती की त्याबरोबर अजुनही काही ऑफर (पैसे वगैरे) केली होती? ४. तुमच्याकडे तुमच्या भाषणाची प्रत अजुनही आहे काय? ५. सदरहू युवतीची धाकली बहीण किंवा मोठ्या बहिणीची कन्या देखील सिंहीण आहे काय?
  • Log in or register to post comments

उत्तरे

चेतन सुभाष गुगळे
गुरुवार, 11/10/2011 - 23:34 नवीन
१. ठाऊक नाही. २. ठाऊक नाही. ३. नाही. ४. नाही. ५. ठाऊक नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

काय्यं???

अन्या दातार
Fri, 11/11/2011 - 08:57 नवीन
प्र. २. लाय्न्स क्लब्ची मेंबर्शिप कुठे मिळवावी? उ. २. ठाऊक नाही. लायन्स क्लबविषयी इतकी किमान माहितीही सदर 'अभ्यासू' लेखकाला असू नये हे पाहून खेद वाटला असो, चालायचंच. नाहीतरी घडलेल्या प्रकारामुळे त्यांनी लायन्स क्लबला कायमचा राम राम ठोकला असण्याची शक्यता नाकारता येत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

नेहेमीप्रमाणेच

रामपुरी
Fri, 11/11/2011 - 00:14 नवीन
छान करमणूक करणारा लेख... १९९२ मध्ये जीन्स / टि-शर्ट हा एका विशिष्ट वर्गाचाच पोषाख होता हे तुम्हाला कुणी सांगितलं? कि ते पण तुमचं वैयक्तिक मत??? या अनुभवातून नक्की काय सांगायचं आहे? १. मी कधीच असला पोषाख घालत नाही. २. मी नेहेमीच कटाक्षाने "फॉर्मल अटायर" परिधान करतो ३. अर्रर्र थोडक्यात 'चान्स' हुकला ४. मलाही 'चान्स' मिळाला होता पण मी 'त्यातला' नाही ४. आम्ही अगदीच भोटम नाही आम्हाला पण मुली भेटल्यात म्हटलं ५. जीन्स / टि-शर्ट घालणारे सगळेच विदूषक असतात ६. जे "फॉर्मल अटायर" परीधान करतात तेच सज्जन असतात. बाकी सगळे चालू असतात. ७. वरील सर्व ८. वरील सर्व + आणखी बरेच काही :) :) :)
  • Log in or register to post comments

४. मलाही 'चान्स' मिळाला होता

धन्या
Fri, 11/11/2011 - 00:19 नवीन
४. मलाही 'चान्स' मिळाला होता पण मी 'त्यातला' नाही ४. आम्ही अगदीच भोटम नाही आम्हाला पण मुली भेटल्यात म्हटलं
आम्हाला तर लेखाचा रोख वरचे दोन मुद्दे सांगणारा वाटला. अर्थात हे आमचं वैयक्तिक मत आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामपुरी

त्यांचे वय वर्षे 13 होते

विश्वनाथ मेहेंदळे
Fri, 11/11/2011 - 14:42 नवीन
त्यांचे वय वर्षे 13 होते तेव्हा. वरच्या दोन मुद्द्यांना फार अर्थ नाही त्या वयात. तेराव्या वर्षी चान्स घेऊन पण काय केले असते? विशेषत: ते गुगळे होते हे लक्षात घेऊन (म्हणजे सभ्य, सात्विक, नैतिक वगैरे वगैरे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

चुक. त्यांचे वय साडे तेरा

धन्या
Fri, 11/11/2011 - 15:58 नवीन
चुक. त्यांचे वय साडे तेरा होते, तेरा नाही. आणि त्यांनी हा विदा आज दिला. मी प्रतिसाद काल दिला होता. बाकी ते गुगळे होते हे लक्षात घेऊन (म्हणजे सभ्य, सात्विक, नैतिक वगैरे वगैरे) यातल्या शब्दाशब्दाशी सहमत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

उद्देश

चेतन सुभाष गुगळे
Fri, 11/11/2011 - 11:24 नवीन
<<नेहेमीप्रमाणेच छान करमणूक करणारा लेख... >> धन्यवाद. <<या अनुभवातून नक्की काय सांगायचं आहे? >> http://www.misalpav.com/node/19536#comment-348622 इथे महिलांच्या धिटाईविषयी एक शंका व्यक्त केली गेली होती. तिला उत्तर देण्यातून ह्या धाग्याची निर्मिती झाली आहे. (मुख्य उद्देश) << १. मी कधीच असला पोषाख घालत नाही. २. मी नेहेमीच कटाक्षाने "फॉर्मल अटायर" परिधान करतो >> http://www.misalpav.com/node/19536#comment-348629 इथे श्री. यशवंत एकनाथ कुलकर्णी यांनी माझ्या स्वभावाला मीटर्बाज असं विशेषण वापरलंय. माझा स्वभाव असा का घडत गेला याविषयीही या लेखात जाता जाता शेवटच्या ओळींमधून सांगायचा प्रयत्न केला. (दुय्यम उद्देश) याव्यतिरिक्त कुठलाही उद्देश नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामपुरी

साला, काय साधकबाधक चर्चा चालू

धन्या
Fri, 11/11/2011 - 00:15 नवीन
साला, काय साधकबाधक चर्चा चालू आहे या धाग्यावर. असे विचारप्रवर्तक धागे रोज यावेत, लोकांनी हिरिरीने आपली मते मांडावीत आणि धागा प्रवर्तकानेही (आपल्याला सोयीच्या वाटणार्‍या) प्रतिसादांना तितक्याच हिरीरीने उत्तरे दयावीत. मग माय-मराठीला मुळीच मरण नाही.
  • Log in or register to post comments

आता फॉर्मलमधे गुलाबी रंगाचं

पुष्करिणी
Fri, 11/11/2011 - 01:17 नवीन
आता फॉर्मलमधे गुलाबी रंगाचं काही घेउ नका...जीन्स गुलाबी असल्यानं असं झालं असावं कदाचित
  • Log in or register to post comments

चेतनजी आपण मिपावरील सर्वात

पाषाणभेद
Fri, 11/11/2011 - 01:26 नवीन
चेतनजी आपण मिपावरील सर्वात आदर्श व्यक्तिमत्व आहात. आपणाकडून असलेच चांगले चांगले लेख अनुभव वाचायला मिळो व ते लिहायला आपणाला वेळ मिळो या सदिच्छा. बाकी दोन दशकांपुर्वी आम्हीही निगडीत फिरत होतो. आपण भेटले असता तर आमचेही कल्याण भिवंडी झाले असते. आम्हालाही सिंहीणीच्या गुहेत डोकवायला भेटले असते.
  • Log in or register to post comments

गुलाबी पँट? तरी मुलगी

शिल्पा ब
Fri, 11/11/2011 - 02:22 नवीन
गुलाबी पँट? तरी मुलगी तुमच्यावर लाईन मारत होती? गुलाबी पँट घातल्याने पुरुष विदुषकी दिसत असावा..अजुन कोणालाही गुलाबी पँटात पैलं नै. बाकी लैच आगाउ पोरगी होती म्हणा ना!!
  • Log in or register to post comments

ह्यावरून आठवला

मन१
Fri, 11/11/2011 - 07:14 नवीन
ह्यावरून आठवला तो म्हणजे मिपावरील अजून एक दिग्गज लेखक श्रीराम दिवटे ह्यांचा लेख "स्त्रिया सुद्धा गैरफायदा घेतातच"(http://www.misalpav.com/node/16674). लेखन एका वेगळ्याच उंचीवर पोचलेलं दिसत आहे.
  • Log in or register to post comments

तुफान विनोदी किस्सा. हहपुवा

नगरीनिरंजन
Fri, 11/11/2011 - 08:18 नवीन
तुफान विनोदी किस्सा. हहपुवा झाली. श्री. गुगळे यांनी विनोदी लेखनावरचेही आपले प्रभुत्व सिद्ध करून आपल्या टीकाकारांची तोंडे बंद केली आहेत असे म्हणावे लागेल. शिवाय आपल्या भाषणाला अनपेक्षितपणे बक्षीस मिळाले असे म्हणण्यात, गुलाबी पँट आणि काळे लूझर घालून आपण गमतीदार दिसत होतो असे म्हणण्यात आणि कुठेही ती मुलगी आपल्यावर लट्टू झाली होती असा उल्लेख न करण्यात त्यांची नम्रता दिसून येते. हॅट्स ऑफ.
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

चेतन सुभाष गुगळे
Fri, 11/11/2011 - 11:34 नवीन
माझे या संस्थळावरील एक परममित्र जे माझ्या बहुतेक धाग्यांवर (मग भले तो http://www.misalpav.com/node/18987 इतका मोठा का असेना) आवर्जून प्रतिसाद देतात, त्यांचा या धाग्यावर मात्र अजून प्रतिसाद आला नव्हता; आपल्या प्रतिसादाने मात्र त्यांच्या प्रतिसादाची उणीव भरून काढली असेच म्हणतो. आभारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

अचंबित झाले.

चित्रा
Fri, 11/11/2011 - 08:31 नवीन
आईने कपड्यांची तयारी करून दिली. तुम्ही ते कपडे घातले. आईने पावडर लावून दिली. वडिल आणायला आले. तुम्ही त्यांच्याबरोबर खळखळ न करता गेलात. वय काय होते हो तुमचे?
  • Log in or register to post comments

ते अजुनही असेच वागतात

शिल्पा ब
Fri, 11/11/2011 - 08:38 नवीन
ते अजुनही असेच वागतात (असा आमचा संशय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

आश्चर्य

चित्रा
Fri, 11/11/2011 - 08:46 नवीन
लेखकाचे आजवरचे धाडस बघता आश्चर्यचकित होण्यासारखे आहे खरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

वय

चेतन सुभाष गुगळे
Fri, 11/11/2011 - 11:06 नवीन
तेव्हाचे माझे वय वर्षे साडे तेरा फक्त. मी इयत्ता नववीत शिकत होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

@ चेतन जी याउलट माझ्या भाषणात

पियुशा
Fri, 11/11/2011 - 16:58 नवीन
@ चेतन जी याउलट माझ्या भाषणात मी जातीयवादाचा संबंध प्राचीन काळाशी जोडून त्याकाळी चातुर्वर्ण्य पद्धतीमुळे शूद्र ठरविल्या गेलेल्या जातींवर इतर तथाकथित उच्च जातींकडून कसा अन्याय झाला वगैरे मुद्दे मांडले होते. जातिभेदामुळेच पानिपतच्या लढाईत मराठे अब्दाली पुढे हरले या गोष्टीचेही दाखले माझ्या भाषणात होते. जातिभेद विसरून सर्वांनी एकजुटीने राष्ट्राची प्रगती साधण्याकरिता कटिबद्ध व्हायला हवे हा संदेशही शेवटी होताच. आपले भाषण आऊड ऑफ डेट आहे हे मला जाणवू लागले तसेच इतर स्पर्धकांच्या तूलनेत माझ्या भाषणात फक्त साडे-तेरा वर्षाचे असुन तुम्ही अश्या प्रकारचे भाषण स्वतः लिहील ? काय म्हणावे तुमच्या बुद्धीमतेला तोड नाही. आम्ही तर कॉले़जात असताना देखील सर्/म्याम ने तय्यार करुन दिलेले आयते भाषण घोकमपट्टी करण्याकरिता सहज ८-१५ दिवस घालवायचो ( कमाल आहे बुवा तुमची) :) असो .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

आम्ही तर कॉले़जात असताना

गणपा
Fri, 11/11/2011 - 18:47 नवीन
आम्ही तर कॉले़जात असताना देखील सर्/म्याम ने तय्यार करुन दिलेले आयते भाषण घोकमपट्टी...................
आपणही कॉलेजात गेलो होतो हे दाखवीण्याचा क्षीण प्रयत्न... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

गणपा गुर्जी, आपण कालेजात गेलो

५० फक्त
Fri, 11/11/2011 - 20:03 नवीन
गणपा गुर्जी, आपण कालेजात गेलो होतो हे दाखवण्याचा क्षीण प्रयत्न नाही तो, आपल्या कालेजात फक्त सर नव्हते तर म्याव म्हणजे म्याम पण होत्या हे दाखवण्याचा स्त्युत्य उपक्रम आहे तो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

लेख छान आहे... आज मी हापिसात

मदनबाण
Fri, 11/11/2011 - 09:11 नवीन
लेख छान आहे... आज मी हापिसात जीन्स टी-शर्ट घालुन पोहचलोय ! ;)
  • Log in or register to post comments

तुम्ही गोग्गोड असल्याशिवाय

शिल्पा ब
Fri, 11/11/2011 - 09:34 नवीन
तुम्ही गोग्गोड असल्याशिवाय कोणतीही तरुणी जवळ येणार नाही...हात लावणं तर दुरच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

तुम्ही गोग्गोड असल्याशिवाय

मदनबाण
Fri, 11/11/2011 - 09:40 नवीन
तुम्ही गोग्गोड असल्याशिवाय कोणतीही तरुणी जवळ येणार नाही...हात लावणं तर दुरच. हा प्रतिसाद मला असल्यास्,शुक्रवारी हापिसात तुम्हाला आवडती वेशभूषा करण्याची परवानगी असते म्हणुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

बॉरं!! मला वाटलं या लेखाने

शिल्पा ब
Fri, 11/11/2011 - 09:48 नवीन
बॉरं!! मला वाटलं या लेखाने तुम्ही प्रभावित होऊन बदललात की काय!! बाकी एरवी आठवडाभर तुम्हाला हापिसात युनिफॉर्म असतो का? नै, शाळेत असताना आम्हालाही अशीच एक दिवस सुट असायची हे आठवलं म्हणुन विचारलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

बॉरं!! मला वाटलं या लेखाने

मदनबाण
Fri, 11/11/2011 - 09:56 नवीन
बॉरं!! मला वाटलं या लेखाने तुम्ही प्रभावित होऊन बदललात की काय!! आम्ही दुसर्‍यांना प्रभावित करतो... ;) बाकी एरवी आठवडाभर तुम्हाला हापिसात युनिफॉर्म असतो का? नै, शाळेत असताना आम्हालाही अशीच एक दिवस सुट असायची हे आठवलं म्हणुन विचारलं. इतर दिवशी फॉरमल कपडे घालावेत्...शुक्रवारी यात सुट असते, फक्त टी-शर्ट घातला तर तो कॉलरवाला असावा, असे बंधन आहे. या नियमा विषयी कंपनीने मध्यंतरी इंटर्नल सर्व्हेपण घेतला होता.... थोडक्यात पॉलिसी ! पॉलिसी खेळणे... अप्रेझल,प्रमोशन... या वेळी सर्व पॉलिसी फाट्यावर मारण्यात येतात... हे सांगायला हवे काय ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

इतर दिवशी फॉरमल कपडे

मराठी_माणूस
Fri, 11/11/2011 - 10:14 नवीन
इतर दिवशी फॉरमल कपडे घालावेत्...शुक्रवारी यात सुट असते आमच्या कडे पण अशी सुट असते. शुक्रवारी आमच्या कडे झाडुन सगळे , जीन्स , टीशर्ट, स्पोर्टस् शूज अशा गणवेषात येतात, जणू काही तो नियम आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

शुक्रवारी आमच्या कडे झाडुन

मदनबाण
Fri, 11/11/2011 - 10:19 नवीन
शुक्रवारी आमच्या कडे झाडुन सगळे , जीन्स , टीशर्ट, स्पोर्टस् शूज अशा गणवेषात येतात, जणू काही तो नियम आहे. खी खी खी... पाखरं तर अगदी नट्टा-पट्टा करुनश्यान येतात... या दिवशी असे बनुन येण्यासाठी बहुतेक त्या आठवडाभर तयारीच करत असतात ! असा मला दाट संशय आहे. ;) नविन जॉइन झालेली पाखरं... जाउ दे या विषयी मौन बरे ! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

हाहाहा... अगदी अगदी... आम्ही

धन्या
Fri, 11/11/2011 - 10:31 नवीन
हाहाहा... अगदी अगदी... आम्ही तर ज्युनियर पोरांना कामाला लावून या फुड कोर्टमधून त्या फुडकोर्टमध्ये चकरा मारत असतो... काही चांगलं दिसतंय का ते पाहायला ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

पाखरांचे ठीक आहे. पण शिंग

मराठी_माणूस
Fri, 11/11/2011 - 10:51 नवीन
पाखरांचे ठीक आहे. पण शिंग मोडुन वासरात शिरणार्‍या गाईंची (बैलांची सुध्दा) गंमत वाटते. किमान आपल्याला शोभते किंवा नाही हे पण पहात नाहीत. सुट (सवलत ह्या अर्थि) दिलि म्हणजे तिचा उपयोग केलाच पाहीजे असे काही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

पाखरांचे ठीक आहे. पण शिंग

मदनबाण
Fri, 11/11/2011 - 10:55 नवीन
पाखरांचे ठीक आहे. पण शिंग मोडुन वासरात शिरणार्‍या गाईंची खीक... खीखीखी. ;) तरी सुद्धा त्यांना वाटतं की आपण "माल" दिसतो ! ;) उगाच काहीही अंगावर चढवुन मिरवत फिरतात !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

उगाच काहीही अंगावर चढवुन

धन्या
Fri, 11/11/2011 - 11:00 नवीन
उगाच काहीही अंगावर चढवुन मिरवत फिरतात !
अचुक निरिक्षण ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

इतर दिवशी फॉरमल कपडे

धन्या
Fri, 11/11/2011 - 10:28 नवीन
इतर दिवशी फॉरमल कपडे घालावेत्...शुक्रवारी यात सुट असते, फक्त टी-शर्ट घातला तर तो कॉलरवाला असावा, असे बंधन आहे.
बहुतेक सगळ्या येमेन्शीमध्ये असंच असतं रे... मी तुमच्या हापिसात होतो तेव्हाही हा नियम होता आणि आता इकडे दुसर्‍या हापिसातही हाच नियम आहे. बाकी आज कुणी पोरीने तुझ्या डाव्या बाजूने तुझ्या उजव्या खांद्यावर तिचा उजवा हात ठेवला तर ते इथे सांगायला विसरु नको बरे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

बाकी आज कुणी पोरीने तुझ्या

मदनबाण
Fri, 11/11/2011 - 10:32 नवीन
बाकी आज कुणी पोरीने तुझ्या डाव्या बाजूने तुझ्या उजव्या खांद्यावर तिचा उजवा हात ठेवला तर ते इथे सांगायला विसरु नको बरे. हॅहॅहॅ... साहेब. घरी दोन घास सुखाचे जेवायला मिळतात्,त्यावर कशाला गदा आणता ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

*

मदनबाण
Fri, 11/11/2011 - 10:43 नवीन
*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

लेख आवडला आहे.

गवि
Fri, 11/11/2011 - 09:49 नवीन
त्यानंतर मी ठरविले की जीन्स टीशर्ट असा विदुषकी पोशाख कधीच परिधान करायचा नाही. तेव्हापासून मी पिकनिक असो की पार्टी कायमच कटाक्षाने "फॉर्मल अटायर" परिधान करतो आणि स्पोर्ट शूज ही मॉर्निंग वॉक शिवाय इतर वेळी वापरत नाही. याने काही होणार नाही.. जातीचा देखणा लुंगीतही देखणाच दिसतो... त्यामुळे अगदी फॉर्मल अटायर परिधान केलेत तरी एखादी वाघीण पाघळून जवळ येऊन तुमच्या फॉर्मल अटायरचा कंठलंगोट पकडून "ओह कम्मॉन ब्लू आईड टायगर.. लेट मी टीच यू साल्सा.." असं घोगर्‍या आवाजात म्हणेल.. :)
  • Log in or register to post comments

आभारी आहे.

चेतन सुभाष गुगळे
Fri, 11/11/2011 - 11:40 नवीन
<< लेख आवडला आहे. >> धन्यवाद. << याने काही होणार नाही.. जातीचा देखणा लुंगीतही देखणाच दिसतो... >> यावर आता तुमचा एखादा अनुभव इथे मांडा की. << "ओह कम्मॉन ब्लू आईड टायगर.. लेट मी टीच यू साल्सा.." असं घोगर्‍या आवाजात म्हणेल >> पण शंका १. माझे डोळे काळे आहेत. २. शिवाय साल्सा करिता आधी वेटलिफ्टींग शिकावं लागेल ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

यावर आता तुमचा एखादा अनुभव

गवि
Fri, 11/11/2011 - 11:56 नवीन
:) यावर आता तुमचा एखादा अनुभव इथे मांडा की. तामिळनाडूत असताना लुंगी नेसून पिक्चरला जायचो तेव्हा रस्त्यात असंख्य स्वर्नलथा, अन लक्स्मीप्रिया माझ्याकडे बघूही शकायच्या नाहीत.. तेजस्वीपणा.. दुसरं काय? शिवाय साल्सा करिता आधी वेटलिफ्टींग शिकावं लागेल ना? हा हा हा.. तेही खरंच.. पण ती एकदम शेलाट्या बांध्याची स्लिम असेल तर फार प्रॅक्टिस लागू नये.. पण साल्सा म्हणजे मज्जा राव.. आणि शिकताना तर खूपच मज्जा.. ..चुका होतात नं सुरुवातीला..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

>> पण साल्सा म्हणजे मज्जा

विश्वनाथ मेहेंदळे
Fri, 11/11/2011 - 14:59 नवीन
>> पण साल्सा म्हणजे मज्जा राव.. आणि शिकताना तर खूपच मज्जा.. ..चुका होतात नं सुरुवातीला.. अरे व्वा, शिकायला पाहिजे. माणूस हा अनंतकाळचा विद्यार्थी असतो असे म्हणतात. (स्लो लर्नर) विमे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

>>>>>तामिळनाडूत असताना लुंगी

पाषाणभेद
Sat, 11/12/2011 - 00:27 नवीन
>>>>>तामिळनाडूत असताना लुंगी नेसून पिक्चरला जायचो तेव्हा रस्त्यात असंख्य स्वर्नलथा, अन लक्स्मीप्रिया माझ्याकडे बघूही शकायच्या नाहीत.. तेजस्वीपणा.. दुसरं काय? अच्छा! तर तो मानूस म्हंजे तुमी व्हता व्हय? आता भ्येटतो तुमाला आन मंग दावतो काय त्ये. आवो म्या पन तवाच तामिळनाडूत व्हतो. नाय म्हंजे आमच्याकल्ड्या गायी म्हशी चारत चारत ग्येलोथो तिथं. आमच्या कायी गायी म्हशींचे नाव बी स्वर्नलथा, अन लक्स्मीप्रिया, नयनथारा, भुवनेस्वरी हायेत. तवा एक मानूस न्हेमी लुंगी वर करूनशान आमच्या गोठ्यावरून रानात जायाचा. त्येच्यानंतर आमच्यावाल्या गायीम्हशी अशा काय बिथरायच्या बाब्बौ का सांजच्याला दुध काय द्येयाच्या न्हायी. त्यो मानूस तुमी व्हता म्हंजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

(No subject)

शिल्पा ब
Sat, 11/12/2011 - 08:38 नवीन
:D :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

खी खी खी...

गवि
Sat, 11/12/2011 - 14:00 नवीन
खी खी खी... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

हे राहुन गेले होते...

मदनबाण
Fri, 11/11/2011 - 11:49 नवीन
तिच्या आवाजाला एक वेगळाच घोगरा टोन होता (नेमक्या शब्दांत सांगायचं तर तिचा आवाज अगदी राणी मुखर्जीसारखा होता. फाटक्या स्पीकरच आवाज = राणी मुखर्जीसारखा आवाज ! ;)
  • Log in or register to post comments

<< फाटक्या स्पीकरच आवाज =

चेतन सुभाष गुगळे
Fri, 11/11/2011 - 12:15 नवीन
<< फाटक्या स्पीकरच आवाज = राणी मुखर्जीसारखा आवाज ! >> हो पण अशा आवाजात समोरच्याला संमोहित करण्याची जरब असते. अर्थात हे व्यक्तिगत मत आहे. इतरांना पटेलच असे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

<< फाटक्या स्पीकरच आवाज =

किचेन
Fri, 11/11/2011 - 15:03 नवीन
<< फाटक्या स्पीकरच आवाज = राणी मुखर्जीसारखा आवाज ! >> हो पण अशा आवाजात समोरच्याला संमोहित करण्याची जरब असते. अर्थात हे व्यक्तिगत मत आहे. इतरांना पटेलच असे नाही. अरे वा..... अनेकांच्या मते माझाही आवाज राणी मुखर्जी सारखा आहे.याचा आज पहिल्यांदा आनंद होतोय! :) याबद्दल अनेक वर्ष वाटत आलेल्या दुखावर आपण फुंकर घातलीत यासाठी धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

इट्स माय प्लेझर!

चेतन सुभाष गुगळे
Fri, 11/11/2011 - 15:26 नवीन
<< अरे वा..... अनेकांच्या मते माझाही आवाज राणी मुखर्जी सारखा आहे.याचा आज पहिल्यांदा आनंद होतोय! >> चला माझ्या प्रतिसादामुळेही कुणाला आनंद मिळाला तर. टंकनश्रमांचे चीज झाले. << याबद्दल अनेक वर्ष वाटत आलेल्या दुखावर आपण फुंकर घातलीत यासाठी धन्यवाद. >> दु:ख करण्यासारखे त्यात काही नाही. आता उलट त्याबद्दल अभिमानच बाळगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

<<अनेकांच्या मते माझाही आवाज

मोहनराव
Fri, 11/11/2011 - 15:42 नवीन
<<अनेकांच्या मते माझाही आवाज राणी मुखर्जी सारखा आहे.याचा आज पहिल्यांदा आनंद होतोय!>> कोणाला कशाचा आनंद होइल सांगता येत नाही बुवा!!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

व्वा:

परिकथेतील राजकुमार
Fri, 11/11/2011 - 11:51 नवीन
अतिशय प्रभावशाली लेखन. श्री. गुगळे ह्यांच्या लिखाणात कायमच काही ना काही संदेश दिलेला असतो. 'वयात आलेल्या मुलीचीच नव्हे, तर मुलाची देखील काळजी घ्यायला हवी, त्याला जपायला हवे' हे आपल्याला ह्यातून शिकायला मिळते.
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

चेतन सुभाष गुगळे
Fri, 11/11/2011 - 11:56 नवीन
तुमचीच प्रतिक्षा होती. http://www.misalpav.com/node/19708#comment-351524 इथे मी तुमची आठवण काढली आणि तुम्ही अवतीर्ण झालात. बाकी तुमचा नेहमीप्रमाणेच प्रोत्साहनपर प्रतिसाद पाहून अतिशय आनंद झाला. आपला आभारी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा