मिथ्या-शास्त्रे - न्या. होम्सचा गमतीदार परिच्छेद
लेखनप्रकार (Writing Type)
ऑलिव्हर वेंडेल होम्स हा १९०२-१९३२ सालापर्यंत यू.एस. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात व्यायाधीश होता. बिंदूगामी पण गमतीदार लिखाण हा त्याचा हातखंडा होता. त्याचा हा परिच्छेद नुकताच वाचला, तो मजेदार आणि मननीय वाटला :
- - - - -
मिथ्या-शास्त्रांबाबत (Pseudo-science)
-
मित्रांनो, सुरुवातीला मी तुम्हाला मिथ्या-शास्त्राची व्याख्या देतो. मिथ्या-शास्त्रांत स्वतःचे खास शब्द (nomenclature) असलेले तंत्र असते. त्याची अशी लवचिक व्यवस्था असते, की त्याच्या बाजूचे किंवा तत्त्वांना जोर देणारे सर्व आधार ग्राह्य धरले जातात, आणि त्याच्या विरोधातले वा त्याचा तत्त्वांच्या विपरित जाणारे सर्व पुरावे वगळले जातात. ते शास्त्र प्रत्यक्षात लागू करून वारेमाप फायदा मिळवणारा असा कुठलासा धंदा नेहमीच असतो. त्याचे प्रचारक आणि व्यावसायिक सामान्यपणे चाणाक्ष लोक असतात. लोकांशी बोलताना ते फार गंभीर असतात; आपापसात हसून डोळे मिचकावत का असेनात. त्यांच्या श्रद्धाळूंच्या गर्दीत कोण कोण असते? बायका आणि बायकोबा (women of both sexes*), मंदबुद्धी कुतूहलग्रस्त, कविस्वप्नाळू आशावादी, घोड्याच्या सौद्यात गंडणारे, नवयुगाची घाई असलेले दानशूर... हे असले लोक असतात. इथेतिथे थोडे धर्मगुरू असतात, त्याहून थोडे वकील, एखादाच डॉक्टर... पण घोड्यांचा जॉकी किंवा पोलीस अन्वेषक जवळजवळ कधीच नसतो. ...
मिथ्या-शास्त्रात सगळे म्हणजे सगळे खोटे नसते. खूपशी सत्ये असतात. कित्येक मूल्यवान सत्येही असतात. ... मिथ्या-शास्त्राच्या व्यावसायिकांना ठाऊक असते की सामान्य मनसिकतेचे असेच असते : एखाददुसर्या तथ्याचा गळ गिळला की मग कुठल्याही फोकांचे लक्तर गिळायला मन उत्सूक असते, इतकेच काय, गळाचा रिकामा आकडादेखील पुरतो. पहिलेवहिले तथ्य पडताळले, की पुढचे सगळे आपल्या कल्पनेतून पुरवण्यात मन तरबेज असते.
- - -
ऑलिव्हर वेंडेल होम्स, मूळ प्रकाशन "द प्रोफेसर ऍट द ब्रेकफास्ट टेबल" पुस्तकात. हा परिच्छेद डॉ. रॉबर्ट कूप यांच्या "द क्वाएट आर्ट : अ डॉक्टर्स ऍन्थॉलॉजी" मध्ये उद्धृत केलेला आहे.
*होम्सच्या काळात उच्च आणि मध्यमवर्गीय स्त्रियांना घरकाम आणि गृहशोभा यावेगळा व्यवसाय करता येत नसे. त्यामुळे त्या ऐतिहासिक संदर्भात "बायका" म्हणजे आजच्या संदर्भात "कर्तृत्व चेचलेले सुशिक्षित" असा मी घेतला आहे. "विमेन ऑफ बोथ सेक्सेस" हे स्पष्टीकरण होम्सला द्यावे लागले. माझ्या नव्या संदर्भाप्रमाणे "बोथ सेक्सेस" असा खुलासा करायची गरज राहात नाही.
प्रतिक्रिया
मिथ्याशास्त्राची काही उदाहरणे
- रामर पिल्लईचे पाण्याला इंधनात बदलू शकणारी वनस्पती.
- काही मानसोपचारतज्ज्ञांचे संमोहनाने मागील जन्माची माहिती काढता येते असे दावे.
- ग्रह तार्यांच्या भ्रमणावर आधारित फलज्योतिष
- फिलाडेल्फिया एक्सपेरिमेंट
- आम्हाला प्रिय एरिक व्हॉन डॅनिकेन, डॉ. ब्रायन वैस, सिल्विया ब्राउन वगैरे प्रभृती
हे सर्व मिथ्याशास्त्राची उदाहरणे मानता येतील ना! यातल्या घोड्याच्या जॉकीचा संदर्भ डोक्यावरून गेला. पोलीस अन्वेषक नसतीलही पण त्यांचे पितामह असावेत काय? आर्थर कॉनन डॉयल तरी नक्की असावेत.जॉकी
बायका" म्हणजे आजच्या संदर्भात
हाहाहा
आयला!
अजून काही निकष
अनुभुती
आणखी एक उदाहरण सुचलं ते
+
किंचित सुधारणा
होमिओपथी
दोन्हींत फरक आहे.
- अनेक छोटी-छोटी दुखणी, आजार, जखमा औषधाशिवायच बरी होतात मग औषधं सरसकटच बंद करावीत का?
- "शेजारचे ते आजोबा वयाच्या नव्वदाव्या वर्षी हॉस्पिटलात औषधोपचार सुरू असतानाच गेले हो. कसली ही निरूपयोगी औषधं!"
- "त्यांचा मेंदू अंतर्गत रक्तस्त्रावामुळे ७५% च्या वर निकामी झाला होता. मेंदूच्या पेशी पुन्हा तयार होत नाहीत. बरं झालं सगळ्यांसाठीच त्या गेल्या ते!" "असं का, मग काय फायदा तुमच्या डॉक्टर असण्याचा आणि महागड्या गोळ्या इंजेक्शनांचा?"
अॅव्हगॅड्रो नंबर आणि होमिओपथीची औषधं बनवण्याची पद्धत या दोन गोष्टी समजल्यानंतर होमिओपॅथीवर विश्वास कसा ठेवायचा? लहानपणी घसादुखीवर आम्हालाही होमिओपॅथीच्या डॉक्टरांकडून गोड गोळ्या दिल्या जायच्या आणि घसा दुखणं दीड-दोन दिवसांत थांबायचं. अलिकडच्या काळात, (गेली अनेक वर्ष) मी फक्त गरम पाणी पिते, अनेकदा काही तासांतच घसा दुखणं थांबतं.+ 100 अदिती
चांगला
अवांतर
अवांतरास प्रतिसाद
मिथ्या
असेच
फोकांचे लक्तर
छान
सध्या त्यांना मी विसरलो
छान
मूळ उतारा पाहिला
मूळ उतार्याबाबत नंदन यांस धन्यवाद
फोका ...
मजेशीर परिच्छेद
गमतीदार परिच्छेद
पंतांच्या ज्योतिषाकडे