श्रद्धांजली - ऋषि कपूर
लेखनप्रकार (Writing Type)
काल इरफान गेला आणि आज सकाळी झोपेतून डोळे उघडेपर्यंत ऋषि कपूरच्या जाण्याची बातमी पुढ्यात उभी होती. आधीच करोनाच्या थैमानाने लोकांचा जीव अगदी मेटाकूटीला आला आहे. आणि त्यातून लागोपाठच्या दोन दिवसांत, दोन उत्तम अभिनेत्यांनी सोडून जाणे लोकांसाठी नक्कीच त्रासदायक ठरत आहे. मेरा नाम जोकरपासून ते अगदी अलीकडच्या द बाॅडीपर्यंत ऋषि कपूरची फिल्मी कारकिर्द, त्याच्या पिढीतल्या इतर कपूर्सपेक्षा नक्कीच उजवी होती.
व्यक्तीशः माझ्यासाठी ऋषि कपूर हा त्याच्या पुर्वार्धापेक्षा उत्तरार्धात अभिनेता म्हणून जितका समोर येत गेला तितकाच तो आवडत गेला. डी-डे, मुल्क, द बाॅडी, दो दुनी चार, कपूर अॅन्ड सन्स त्याच्या उत्तरार्धातल्या अशा अनेक न संपणाऱ्या सिनेमांची यादी घेता येईल, पण यातून माझ्यासाठी कायम स्मरणात राहणारी त्याची भुमिका ही 'रौफ लाला'ची आहे.
गेल्या दशकभरातही त्याचे अनेक सिनेमे आलेत, पण मला अजूनही ऋषि कपूरच्या कमाल अभिनयामुळे अग्निपथमधला त्याने साकारलेला रौफ लालाच आवडतो. अगदी गेल्या आठवड्यातच हा सिनेमा त्यातल्या त्याच्या निगेटिव्ह भुमिकेसाठी पुन्हा पाहिला. २०११ ला धर्मा प्राॅडक्शनचा आलेला अग्निपथ, सुरूवातीला ऋषी कपूरने नाकारला होता. त्याचे कारण त्यालाच ठाऊक असावं. पण त्याआधीची जवळपास चार दशकाची कारकिर्द, बाॅलीवूडचा चाॅकलेटी ब्वाॅय म्हणून मिळालेली उपमा, यातून बाहेर पडून नवीन प्रयोग करण्यासाठी अग्निपथचा रौफ लाला साकारण्याचे त्याने ठरवले.
मुद्राभिनय ही ऋषि कपूरच्या अभिनयातली जमेची बाजू. त्याचा वापर करून रौफ लालाची भूमिका त्याने अक्षरशः जिवंत करून लोकांपुढे आणली. याचा परिणाम असा झाला की, सिनेमा रिलिज झाल्यानंतर जेवढे कौतुक हृतिक आणि संजय दत्तच्या भुमिकेचे झाले, तितकेच किंबहुना किंचित जास्तच कौतुक ऋषि कपूरच्या 'रौफ लाला' या भुमिकेचे झाले होते. अग्निपथमधल्या अनेक प्रसंगामध्ये त्याच्या चेहऱ्यावरचे एक्स्प्रेशन्स बघण्यासारखे आहेत.
गेली पाच दशके आपल्या अप्रतिम अभिनयाने रसिकांच्या मनावर खोलवर ठसा उमटवणाऱ्या या उमद्या नटास भावपूर्ण श्रद्धांजली !!
प्रतिक्रिया
दोन्हीही दु;खद बातम्या.
राज कपूरच्या करिष्म्यातून
श्रद्धांजली
दोन्ही दिग्गज अभिनेते.
आमच्या पिढीचा लाडका ..
_/\_ _/\_
भावपूर्ण श्रद्धांजली
दोघांनाही श्रध्दांजली, ॠषी
__/\__
हेच म्हणणार होतो... ऋषीकपूरची
whistle songs ची श्रध्दांजली
छान आहे !
ऋषी कपूर आणि इरफान - दोघांना श्रद्धांजली