✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

#मिपाफिटनेस - मी आज केलेला व्यायाम - एप्रिल २०१७

इ
इरसाल कार्टं यांनी
Sat, 04/01/2017 - 15:03  ·  लेख
लेख
नमस्कार मंडळी. "मी आज केलेला व्यायाम" या धाग्यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे आणि अनेकांनी यातून प्रेरणा घेऊन व्यायाम सुरू केला आहे. व्यायाम सुरू केलेल्या आणि व्यायामात सातत्य ठेवलेल्या सर्वांचे अभिनंदन. या उपक्रमाद्वारे दर महिन्याला एक नवीन मिपाकर आपली 'व्यायामगाथा' घेऊन आपल्याला भेटायला येत राहील. या महिन्यात व्यायामाचा अनुभव सांगत आहे "इरसाल कार्ट" वाडा सारख्या एका अर्थाने दुर्गम भागात राहून धावण्याला सुरूवात करून आणि एकट्यानेच परंतु कमालीच्या सातत्याने धावत राहून व नितांतसुंदर फोटो टाकून इरसाल कार्ट्याने ग्रुपवरच्या सर्व सायकलवीरांना रोज इनो घ्यायला लावले आहे. ;) तुमच्याकडेही सांगण्यासारखे कांही असले तर आंम्हाला जरूर व्यनी करा. टीम #मिपाफिटनेस - मोदक, प्रशांत, डॉ श्रीहास. ************************************************ याच आठवड्यात सायकल दामटत पुण्याहून वाड्याला आलो. दोन दिवसात जवळजवळ २०० किमी अंतर पार केले आणि बाईक अँड हाईकची एक अ‍ॅक्टिविटी पूर्ण केली. क्रिकेटही खेळू ना शकणारा मी एवढे अंतर पार कसे करू शकलो हा विचार करत गावातील हापिसातील मित्रमंडळी तोंडात बोटं घालत आहेत. पण या प्रवासामागे लै लांबी ष्टोरी आहे, आज तीच सांगावीशी वाटते. या गोष्टीची सुरुवात होते 'आज मी केलेला व्यायाम' या धाग्यापासून. जवळ जवळ दोन महिन्यांपासून मिपावर दर महिन्याला हा धागा येत होता पण काहीतरी चर्चा असेल म्हणून मी तो वाचण्याचे टाळत होतो. मध्यंतरी याचे विडंबन म्हणून 'आज मी केलेला आराम' हा धागाही येऊन गेला, पण मी तोही वाचला नाही. या धाग्याकडे पुन्हा लक्ष गेले ते जानेवारीच्या अखेरीस. आणि बरेच मिपाकर इथे घाम गळताना बघून (वाचून म्हणा हवं तर) खूप जळायला झालं. खरंतर थंडीच्या या मोसमात मीही मित्रांबरोबर धावण्यासारखे प्रकार केले होते पण अतिशय वेगाने संक्रमित होणाऱ्या आळसापुढे सगळ्यांनी गुडघे टेकले आणि आमचे रोजचे धावणे बारगळले. गावातील एकुलत्या एक जिममध्ये पंचक्रोशीतली अख्खी तरुणाई लोटत असल्यामुळे प्रचंड गर्दी होते त्यामुळे तिथे जायची इच्छा तिसऱ्याच दिवशी उडून गेली आणि पुन्हा सुरु झाले आठ वाजता उठून घाईगडबडीत तयारी उरकून ऑफिसात जाणे आणि दिवसभर खुर्चीत काम करून परतणे, एवढाच दिनक्रम. कधी दोन तीन महिन्यातून केलेला एखादा छोटी ट्रेक आणि रोजचे दोन माजले चढणे उतारणे हाच काय तो व्यायाम. व्यायाम म्हणून काहीतरी करावे असे मनापासून वाटत होते पण श्रीगणेशा काही होत नव्हता. एक तर जोडीला कोणी भिडू मिळत नव्हता त्यात जबरदस्तीने तयार केलेले भिडू त्यांचा आळस वेगाने आपल्यात संक्रमित करतात हा पूर्वानुभव आणि एकट्याने जायचा कंटाळा. हा धागा वाचताना त्याच्या प्रतिसादांमध्ये मिपाकरांचा एक व्हाट्सअप ग्रुपही आहे हे कळले आणि प्रतिसादांमध्येच विनंती केली मला सामावून घेण्याची. लागलीच ग्रुपात सामावून घेतलं गेलं आणि व्यायामासाठी भिडूची गरज उरली नाही. ऑनलाईन एवढे जण भेटले एकदाच. त्यातही बरेच मिपाकर, मग तर अजूनच कल्ला. ग्रुपवर नुसता कल्ला चालू होता. नव्यानेच ग्रुपमध्ये आठवडाभराचे आव्हान स्वीकारण्याची चढाओढ लागली होती. तीन जणांच्या टीम मधून काहींनी रोज ५० किमी तर काहींनी चक्क रोज १०० किमी अंतर सायकलिंगचे आव्हानं स्वीकारले होते. अर्थात मलाही यात सहभागी व्हायचे होते पण एक समस्या होती, सगळी आव्हानं सायकल चालवणाऱ्यांसाठी होती आणि माझ्याकडे सायकल नव्हती. धावणाऱ्यांसाठी काहीतरी करा अशी विनंती केल्यावर मोदक आणि प्रसाद दाते माझ्या मदतीला आले. तिघांनी मिळून आठवडाभर दररोज १० किमी धावण्याचे आव्हान स्वीकारले आणि आमच्या व्यायामाचा श्रीगणेशा झाला. मी, मोदक आणि प्रसाद दातेंनी मिळून रोज पळायला सुरुवात केली. ग्रुपमध्ये सगळेच पेटून उठले होते. आमचे धावणे नियमित चालू असताना तिसऱ्या दिवशी प्रवासात असल्यामुळे मोदकाला धावायला वेळ मिळाला नाही त्यामुळे आमची टीम आव्हानातून बाहेर पडली. आता पुन्हा दोघांनीच मिळून आव्हानं स्वीकारायचे ठरवले आणि ब्रेक न घेता दुसऱ्याच दिवसापासून मी आणि दातेंनी धावायला सुरुवात केली. मी रोज सकाळी नियमीतपणे धावत होतो पण दातेंनी जसा वेळ मिळेल तसे अगदी दुपारीही धावून आमचे आव्हान जिवंत ठेवले. सुरुवातीला सोपे वाटणारे अंतर नंतर नंतर दोघांना भारी पडू लागले. मी आत्ताच धावायला लागलो होतो त्यामुळे लवकर थकत होतो. तरी बरे उन्हाळा सुरु झाला नव्हता. प्रचंड थकायला होत होतं. यावर उपाय म्हणून सलग जास्त न धावत मधले ब्रेक वाढवले. त्यामुळे वेळ वाढला पण ५-७ किमी अंतर धावणे झेपू लागले. आता काही झालं तरी मागे हटवायचे नाही म्हणत दोघेही वेळा सांभाळून पळत होतो. मोदकचे प्रोत्साहन होतेच, दातेंनीही जबरदस्त साथ दिली. एकदा तर चॅलेंज टिकून राहावं म्हणून त्यांनी भर दुपारी कोचीन मध्ये पूर्ण फॉर्मल कपड्यांनिशी लॅपटॉपची बॅग घेऊन तीन किमीचे अंतर धावून पार केले. एवढा सगळा उत्साह भरून वाहत असताना काय बिशाद आमची आळसावण्याची. कधी ५-५ किमी तर कधी ७-३ किमी असे अंतर वाटून घेऊन सलग सात दिवस धावलो आणि आव्हान पूर्ण केलं. आपण आव्हान स्वीकारलं तर कठीण कामही करू शकतो हे तेव्हा नव्याने उमगलं. आता रोज किमान ५ किमी अंतर धावयाचेच असे ठरवून धावणं चालू ठेवलं. कधीतरी दांडी व्हायची पण ग्रुपमधील इतरांचे अटकेपार रोवलेले झेंडे पाहून दुसऱ्या दिवशी नव्या जोशाने धावणं चालू व्हायचं. मधल्या काळात बंधुराजांनाही पिन मारली 'मला सकाळी उठवायला गवारी(गुराखी) लागेल' एवढ्या अटीवर तो आनंदाने तयार झाला. गवाऱ्याची भूमीका मी निभावणार म्हणत दुसऱ्या दिवसापासून त्याला फोन करायला सुरुवात केली. अगदी तिसऱ्या दिवसापासून मी फोन न करताही त्याचेही लांज्यात चालणे सुरु झाले नियमित. इकडे मलाही अजून तीन जण जॉईन झाले. इतरांच्या डोक्यात खूळ घालणं आता जोरात चालू आहे. खरं सांगायचं तर धावताना आपल्याकडे विचित्र नजरेने बघणाऱ्या लोकांमुळे थोडा अवघडलेपणाही जाणवत होता पण आता मलाच त्यांचं हसू येतं. इकडे लोकांना सायकलींचं किती वावडं आहे ते मोदकला सांगितले तेव्हा तो बोलला होता की "पायोनियर व्हा" तेवढं ध्यानात ठेवून हा सगळा प्रवास चालू आहे. अश्यातच एक दिवशी डोक्यात विचार आला कि आपणही सायकल घेऊया. लहानपणापासूनच मनसोक्त सायकल अशी चालवायला मिळाली नव्हती आणि मोठे झालो तेव्हापर्यंत 'वाहतुकीचे' साधन म्हणून सायकल हि संकल्पना पंचक्रोशीतुन हद्दपार झाली होती. त्यामुळे सायकल घेण्याचा विचार कधी डोक्यात आला नव्हता. छोटे बंधुराज मात्र रत्नागिरीतील खेड आणि लांज्यात राहिलेले त्यामुळे त्याने हि कल्पना खूप कधीच सुचवली होती, तिकडे कॉलेज करत असताना त्याने सायकल घेतलीही होती. लगेच हि कल्पना त्याला सांगितली. तोही तयार झाला आणि सायकल घ्यायची हे पक्कं झालं. धावण्याच्या सुरुवात केल्यापासून वजन किती कमी झालं ते नाही बघितलं अजून पण दिवसभराची प्रसन्नता मिळते, आत्मविश्वास दुणावलाय. असंख्य प्रयत्न करूनही झोप ना येण्यामुळं रात्रीच्या निरव शांततेला कंटाळलेला, भर तारुण्यापासून झोपेचे बारा वाजलेला मी आता रात्रीचे दहा वाजले कि पेंगायला लागलोय. शरीराचं घड्याळ पुन्हा सुस्थितीत आलंय. अकारण होणारी छातीतली धडधड थांबलीय. ऍसिडिटी तर पार पळून गेलीय. कधी जाऊ शकलो नाही व्यायामाला तर दिवसभर चुकल्या-चुकल्यासारखं वाटतं. स्वत:लाच नव्याने भेटल्यासारखं वाटतंय. माझ्या या प्रवासातील काही क्षण... 111 माझी धावपट्टी अशी दिसते नकाशात. ग्रुपातले मिपाकर याला 'तलवार' म्हणतात. या तलवारीचे दोन वार मला ४.८ किमीला पडतात. 1 तानसा धरणाकडे जाणारा रस्ता. 3 डावीकडून मी, सागर, सचिन आणि विश्वास. 11 माझ्या जॉगिंग ट्रॅकच्या बाजूला असलेल्या टेकडीवरून दिसणाऱ्या रानवाटा. 22 धुकं पांघरलेल्या या टेकड्या मला केवळ धावण्याच्या सवयीने गवसल्या. 33 आधी ह्याच सूर्याची किरणं खिडकीतून चेहऱ्यावर येईपर्यंत लोट पडलेलो असायचो आता घामेजलेल्या चेहऱ्याने मीच त्याचे स्वागत करतो.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
आरोग्य
प्रवास
लेखनप्रकार (Writing Type)
आरोग्य
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
31143 वाचन

💬 प्रतिसाद (87)

प्रतिक्रिया

छान !

वेल्लाभट
गुरुवार, 04/20/2017 - 15:30 नवीन
छान गोष्टी सुचवल्यात. उत्तम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Dr prajakta joshi

व्यायाम

Dr prajakta joshi
गुरुवार, 04/20/2017 - 15:34 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

वेल्लाभट,

विटेकर
गुरुवार, 04/20/2017 - 16:57 नवीन
वेल्लाभट, मी स्टेप अप चे आव्हान स्वीकारले .... फक्त मी स्टूलावर खाली-वर न करता थेट आमच्या बिल्डिन्गच्या पायर्‍या चढतो .. -१ ते १२ मजले संथ गतीने चढतो आणि लिफ्टने खाली येतो ! एका चक्कर मध्ये २३६ पायर्‍या होतात . तिसर्‍या चक्करला घाम गळायला लागतो आणि सहाव्या चक्करला बनियन पिळता येतो ! सोमवार - १७ एप्रिल ५ फेर्‍या २३६ गुणीले ५ = ११८० मंगळ्वार - १८ एप्रिल ६ फेर्‍या = १६५२ बुधवार १९ एप्रिल ५ फेर्‍या = ११८० गुरुवार २० एप्रिल ४ फेर्‍या = ९४४ (आज संध्याकाळी पण करीन असे आता तरी म्हणतो ) वजनावर मी लक्ष ठेवले नाही अजून पण आता ठेवीन. ०७ जूनला माझा ५० वा वाढदिवस आहे त्या दिवशी ५० फेर्‍या ( सकाळी २५ आणि संध्याकाळी २५ ) असा मानस आहे , हे माझे टार्गेट आहे ! ( तो वर्किन्ग डे आहे , त्या ऐवजी जवळच्या रविवारी) आपला पण कायप्पा समूह करु , माझा क्रमांक - ९८८१४७६०२०
  • Log in or register to post comments

आपला पण कायप्पा समूह करु

सूड
गुरुवार, 04/20/2017 - 17:24 नवीन
आपला पण कायप्पा समूह करु
आमचा आणि वेल्लाकाकांचा ऑलरेडी आहे ओ एक!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

मग त्यातच

विटेकर
Fri, 04/21/2017 - 10:59 नवीन
मग त्यातच आड्वावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

दंडवत

इरसाल कार्टं
गुरुवार, 04/20/2017 - 18:02 नवीन
बिल्डिन्गच्या पायर्‍या चढतो .. -१ ते १२ मजले संथ गतीने चढतो आणि लिफ्टने खाली येतो ! एका चक्कर मध्ये २३६ पायर्‍या होतात . तिसर्‍या चक्करला घाम गळायला लागतो आणि सहाव्या चक्करला बनियन पिळता येतो !
दंडवत स्वीकारा.__/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

नमस्कार !

विटेकर
Fri, 04/21/2017 - 10:53 नवीन
इतके अवघड नाहे हो ! थोडा सवयीचा भाग आहे हा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल कार्टं

विटेकर काका ते समूह वगैरे ठीक

वेल्लाभट
Fri, 04/21/2017 - 08:34 नवीन
विटेकर काका ते समूह वगैरे ठीक आहे पण
हे त्या दिवशी ५० फेर्‍या ( सकाळी २५ आणि संध्याकाळी २५ ) असा मानस आहे
हे जरा टू मच होईल. प्लीज जरा दमाने घ्या असा सल्ला देतो. आणि दररोज इतकं जास्त नको. एक दिवसाची गॅप ठेवलीत तर बरं. तुम्ही करु शकताय, करताय हे भारीच आहे पण अति नको. शेवटी सांधे पण सांभाळायचेत आपल्याला. तरीही, कीप ईट अप ! असं म्हणेनच. पण इतकंही नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

धन्यवाद प्रतिसादाबद्द्ल !

विटेकर
Fri, 04/21/2017 - 10:58 नवीन
त्यात दोन गोष्टी आहेत १. मी जिना फक्त चढतो .. उतरताना लिफ्ट वापरतो , त्यामुळे घुडग्यांवर अनावश्यक ताण येत नाही २. मी अगदी सावकाश जिना चढतो , धाप लागू देत नाही, पण हृद्याचे ठोके नक्की वाढत असतील. ३. दररोजची वाढ अगदी थोडी ... ४-५ मजले ! आज सात फेर्‍या केल्या !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

-१ ते १२ मजले संथ गतीने चढतो

राघवेंद्र
Fri, 04/21/2017 - 00:57 नवीन
-१ ते १२ मजले संथ गतीने चढतो
हे एकदम अशक्य आहे. मी हे कधीच करू शकेल असे वाटत नाही. तुमच्या टार्गेट साठी शुभेच्छा !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

का???? सुरुवात तर करा की..

पिलीयन रायडर
Fri, 04/21/2017 - 02:59 नवीन
का???? सुरुवात तर करा की..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघवेंद्र

अशक्य ?

विटेकर
Fri, 04/21/2017 - 10:52 नवीन
अशक्य नाही पण अवघड नक्की आहे ! धन्यवाद , आपल्या शुभेच्छांसाठी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघवेंद्र

मला सायकल घ्यायची आहे

विटेकर
गुरुवार, 04/20/2017 - 17:03 नवीन
कोणती घेऊ ? महाविद्यालयानंतर गेली ३० वर्षे कसलीच सायकल चालवली नाही. पुण्याच्या रहदारीत चालवायची आहे, जेव्हा एकटा बाहेर पडेन आणि थोडा वे़ळ हाताशी असेल तेव्हा तेव्हा सायकल चलविण्याचा मानस आहे .
  • Log in or register to post comments

सायकल घेताना

स्थितप्रज्ञ
Fri, 04/21/2017 - 09:37 नवीन
हा धागा मदत करेल तुम्हाला ठरवायला. http://www.misalpav.com/node/28858
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

धन्यवाद !

विटेकर
Tue, 04/25/2017 - 12:24 नवीन
धागा फारच सुरेख आहे... पुनश्च धन्स !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्थितप्रज्ञ

गेले १ महिना पुर्ण टाइमपास

पिलीयन रायडर
Fri, 04/21/2017 - 02:58 नवीन
गेले १ महिना पुर्ण टाइमपास केला. आजपासुन वेल्लाकडून प्रेरणा घेऊन स्टेप्स केल्या. आता मी रोज व्यायाम नक्कीच करेन. इथे लिहीन.
  • Log in or register to post comments

क्षणभर विश्रांती

स्थितप्रज्ञ
Fri, 04/21/2017 - 09:33 नवीन
ओव्हरट्रेनिंग म्हणतात ते की काय झाल्यामुळे १० दिवस विश्रांती घेतली. काल परत सायकलिंग चालू केले. आजपासून कचेरीत आणणेही सुरु.
  • Log in or register to post comments

(No subject)

वेल्लाभट
Sat, 04/22/2017 - 21:06 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

आजचा आकडा

विटेकर
Sat, 04/22/2017 - 10:47 नवीन
११ फेऱ्या
  • Log in or register to post comments

(No subject)

वेल्लाभट
Tue, 04/25/2017 - 08:36 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

आज चौदा किमी सायकल चालवली.

एस
Tue, 04/25/2017 - 09:06 नवीन
आज चौदा किमी सायकल चालवली. रोज चालवण्याचा मानस आहे.
  • Log in or register to post comments

मस्त!

इरसाल कार्टं
Tue, 04/25/2017 - 14:19 नवीन
चालूद्या असंच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

मागच्या गुरुवारनन्तर ...

विटेकर
Tue, 04/25/2017 - 12:22 नवीन
२१ एप्रिल - ७ फेर्‍या २२ एप्रिल - ११ फेर्‍या - शनिवारी सुट्टी होती ... ५० फेर्‍या ( एकवेळी २५ ) साठी सराव ! २३ एप्रिल - ६ फेर्‍या २४ एप्रिल - दांडी २५ एप्रिल - ६ फेर्‍या
  • Log in or register to post comments

२६ अप्रिल

विटेकर
Wed, 04/26/2017 - 15:06 नवीन
आज पुन्हा दांडी !
  • Log in or register to post comments

माझीपण.

वेल्लाभट
Wed, 04/26/2017 - 15:25 नवीन
माझीपण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

आज पाच फेर्‍या

विटेकर
गुरुवार, 04/27/2017 - 10:26 नवीन
आज पाच फेर्‍या
  • Log in or register to post comments

काल २५०. शिवाय पुश अप्स,

वेल्लाभट
गुरुवार, 04/27/2017 - 13:36 नवीन
काल २५०. शिवाय पुश अप्स, ट्रायसेप डिप्स, स्क्वॉट्स, बुलवर्कर इत्यादी किरकोळ व्यायाम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

आज पाच फेर्‍या आणि अडिच किमी चालणे

विटेकर
Sat, 04/29/2017 - 13:40 नवीन
आज पाच फेर्‍या आणि अडिच किमी चालणे
  • Log in or register to post comments

छान वाटलं वाचून. मी पण

निनाद आचार्य
Sat, 04/29/2017 - 21:30 नवीन
छान वाटलं वाचून. मी पण प्रयत्न करेन आता.
  • Log in or register to post comments

काल दांडी आणि आज ५ फेर्‍या

विटेकर
Tue, 05/02/2017 - 12:16 नवीन
काल दांडी आणि आज ५ फेर्‍या
  • Log in or register to post comments

आज सहा सुर्य्नमस्कार आणि ८ आसने

विटेकर
Wed, 05/03/2017 - 12:24 नवीन
आज सहा सुर्य्नमस्कार आणि ८ आसने
  • Log in or register to post comments

काका नवीन धाग्यावर टाका ना

वेल्लाभट
Wed, 05/03/2017 - 12:51 नवीन
काका नवीन धाग्यावर टाका ना आता प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

नवीन धागा कुठाय ?

विटेकर
Wed, 05/10/2017 - 16:08 नवीन
तोपर्यन्त इथेच लिवतो ३ मे - ४ फेर्‍या ४ मे - त्रिवेन्द्रमला गेलो होतो , मन्दीर ते हाटेल चालत आलो , साडे तीन किमि.. घाम अने घाम आने घाम , साला घामाने शर्ट आणि प्यान्ट पण ओली ! उगाचच लै व्यायाम केल्यागत वाटले ५ मे - पद्मनाभ स्वामी मन्दिराला २ चकरा .. लैच घाम्यजलो ६ मे - रात्री उशीरा घरी पोचलो .. सकाळी उठून हादडून पुन्हा झोपलो .. दुपारी दोन वाजता अंघोळलो .. व्यायाम ईल्ले ७ मे - सहा चकरा ८ मे - पाच चकरा ९ मे - दांडी १० मे म्हन्जे आज पाच चकरा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

http://www.misalpav.com/node

वेल्लाभट
गुरुवार, 05/11/2017 - 14:40 नवीन
http://www.misalpav.com/node/39655
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

अफाट कामगिरी

II श्रीमंत पेशवे II
Fri, 05/05/2017 - 10:54 नवीन
जबरदस्त .......
  • Log in or register to post comments

आज ११ मे

विटेकर
गुरुवार, 05/11/2017 - 14:01 नवीन
चार फेर्या
  • Log in or register to post comments

हा धागा वाचनमात्र करा हो...

मोदक
गुरुवार, 05/11/2017 - 14:41 नवीन
हा धागा वाचनमात्र करा हो...
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा