✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

#मिपाफिटनेस - मी आज केलेला व्यायाम - मार्च २०१७ - कॅलरी चॅलेंज

प
पिलीयन रायडर यांनी
Wed, 03/01/2017 - 02:07  ·  लेख
लेख
1
नमस्कार मंडळी. "मी आज केलेला व्यायाम" या धाग्यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे आणि अनेकांनी यातून प्रेरणा घेऊन व्यायाम सुरू केला आहे. व्यायाम सुरू केलेल्या आणि व्यायामात सातत्य ठेवलेल्या सर्वांचे अभिनंदन. आपण सर्वांनी केलेला व्यायाम पुढीलप्रमाणे - नोव्हेंबर २०१६ - सायकलिंग - ८,०१० किमी आणि रनिंग / वॉकिंग - २४८ किमी. डिसेंबर २०१६ - सायकलिंग - ९,६१३ किमी आणि रनिंग / वॉकिंग - ५४७ किमी. जानेवारी २०१७ - सायकलिंग - १०,७५५ किमी आणि रनिंग / वॉकिंग - ६९५ किमी. फेब्रुवारी महिन्याचे आकडे लवकरच अपडेट करत आहोत. सायकलिंगचे आकडे मोजणारी स्ट्रावा ही साईट सध्या बंद असल्याने सायकलवीरांचे किमी उपलब्ध नाहीत. साईट चालू लागली की आकडे अपडेट करतो आहोतच. या महिन्यापासून दर वेळी एक नवीन मिपाकर आपली 'व्यायामगाथा' घेऊन आपल्या भेटीस येत राहील. नुकताच व्यायाम सुरू केलेल्यांपासून ते भरपूर व्यायाम करणारे आणि महत्वाचे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचा व्यायाम सातत्याने करणारे मिपाकर हा उपक्रम पुढे चालवतील. "टीम #मिपाफिटनेस" या संदर्भात नवीन नवीन कल्पनांवर काम करत आहे आणि व्यायामासंदर्भात अनेक नवीन गोष्टी आपल्या भेटीला येतील. #मिपाफिटनेसच्या अप्रतीम लोगोबद्दल अभ्या.. चे भरपूर आभार..!! मोदक **************************************************************************************
Run

काहीच महिन्यांपुर्वी मी खरं तर "मी आज केलेला व्यायाम" ह्या धाग्यांकडे न फिरकणारी मेंबर होते. माझं आपलं बरं सुखात चाललं होतं. पण नेमकं ते "७ दिवसांचं चॅलेंज" आलं. यंदा हा धागा मी काढण्याचं कारण इतकंच, की एका गोडपदार्थनामधारी आयडीला "बघा, "ही" करु शकते, तर कुणीही करु शकतं!" हे दाखवुन द्यायचं आहे.. फारसं चूकही नाहीये ते =)) तर मंडळी अगदी एक महिन्या पुर्वी मी एक शुन्य व्यायाम करणारा काऊच पोटॅटो होते. आपण व्यायाम केला पाहिजे असं मला दर वेळेस हा धागा आलं की वाटायचं आणि १-२ दिवसात ते ही बारगळायचं. मोदकने मागच्या महिन्यात "ग्रुपसोबत ७ दिवस चॅलेंज" आणलं. अनंत काळा पर्यंत रोज व्यायाम करण्यापेक्षा "७ दिवस" हा आकडा मला सोप्पा वाटला. त्यातही सोबत अजुन २-४ जण असले की त्यांच्या नादाने आपणही करतोच काही ना काही. म्हणुन मग आम्ही मैत्रिणींनी आमचा लिंबुटिंबू हा ग्रुप स्थापन केला. ह्यातल्या सामान्य वाचक, सविता००१, स्रुजा, इशा अगदी नियमित व्यायाम करणार्‍या. ते ही डाएट सांभाळुन. मी त्यामानाने खरंच लिंबुटिंबु होते. पण फक्त "सातच" दिवस व्यायाम करायचाय म्हणुन मी पण सुरुवात केली. प्रामाणिकपणे सांगते, पहिल्या १० मिनिटातच मला "मरते की काय आता ट्रेडमिलवरच" अशी धाप लागायची. २० व्या मिनिटाला मी मोदकला खच्चुन शिव्या घालत असायचे. ३० व्याला ट्रेडमिलवर अक्षरशः अंग टाकलेले आणि पाय आपोआप त्या पट्ट्यावर फिरत आहेत अशी अवस्था. पण ते ५ किमी काही पटकन होताना दिसायचे नाहीत. मला तब्बल ५० मिनिटं लागायची ५ किमी करायला. जिममध्ये आजुबाजुला लोक सलग ३० मिनिटं "धावायचे". ग्रुपमधल्या पोरी ७-८ किमीच्या खाली बोलतच नव्हत्या. इथे मला ५ किमी चालायला जमत नव्हतं. सुरूवातीला दम लागणे, पायात गोळे येणे, पोटात दुखणे, नडगी दुखणे (shin splints) असे प्रकार व्हायचे. पण इथे चर्चा करुन लक्षात आलं की मी वॉर्मअप करतच नाहीये. शिवाय पहिल्या मिनिटापासूनच फुल्ल स्पीडने पळायला सुरुवात करतेय. मग दम लागला की वेग कमी करा, थोड्या वेळाने पुन्हा वाढवा असे खेळ करत बसतेय. इथल्या सूचना लक्षात घेऊन चालायला लागल्यावर लक्षात आलं की स्ट्रेचेस आणि वॉर्मअप करुन सुरूवात केली पायात गोळे येत नाहीत. वेग हळूहळू वाढवत नेला तर शरीरही त्या लयीत चालायला लागते. एकदा लय पकडली की कोणताही अतिरेकी त्रास न होता अगदी पळता सुद्धा येतं. श्वास टिकतो. आणि फुलला तरी नीट बोलता येईल इतपतच दम लागतो. ह्या व्यक्तिरिक्त काही गोष्टींनी अनपेक्षित बराच फायदा झाला. एक तर सावन वर गाणी ऐकणे. तिथे व्यायामासाठी आयत्या प्लेलिस्ट आहेत. जोरजोरात ढीचॅक गाणी लावली की आपोआप चालायला मजा येते. उगाच रडकी गाणी असतील तर एकूणच आयुष्यात काही राम नाही असंच वाटतं. तेव्हा ट्रेडमिलवर फक्त नाचायचं बाकी उरेल अशी गाणी वाजवा. दुसरं एक अ‍ॅप जे मला सामान्य वाचकने सुचवलं ते म्हणजे - C25k ह्या अ‍ॅपमध्ये तुम्ही अजिबात काहीही करत नाही असं समजुन तुम्हाला ५के साठी ट्रेन केले जाते. सोप्पे अ‍ॅप आहे. आठवड्यातले तीन दिवस तुम्ही त्यांनी दिलेल्या वेळापत्रकापमाणे चालणे+पळणे आवश्यक आहे. सुरूवात अगदी सोप्प्या टारगेट पासुन होते. ते ८-९ आठवड्यात तुम्ही ५ किमी पळु शकला इतपत तयारी करुन घेतली जाते. मला ह्याचा भरपुर फायदा होतोय. एक महिन्यापुर्वी मी चालत होते पण अजिबात पळता येत नव्हतं. आता मी ९० सेकंद सलग पळु शकतेय. परत २ मिनिटं चालुन परत ९० सेकंद पळणे असं ४० मिनिटं कोणतीही अतिरेकी धाप न लागता जमायला लागलेलं आहे. असा माझा हा व्यायाम अल्ट्रामॅन कौस्तुभ राडकर आणि मिलिंद सोमण ह्यांच्या चरणी समर्पित! सात दिवसांचं चॅलेंज रडत-पडत-उठत-बसत का होईना, पण केलं आहे. ह्या सात दिवसात कैकदा वाटलं की "जाऊ दे ना, काय फरक पडतो आज नाही गेलं तर. बाकीचे मिळुन करतील चॅलेंज पुर्ण." पण भारतात सकाळी सगळ्या ऑफिसला जायच्या आधी व्यायाम करुन जायच्या आणि व्हॉट्सअ‍ॅपवर अपडेटही यायचे. मग मात्र मी रात्री ८ ला सुद्धा जिममध्ये जाऊन ५ किमी पुर्ण करुन यायचेच. सात दिवसात ठरल्याप्रमाणे ३५ किमी पुर्ण केले. पण जित्याची खोड.. दोन दिवस आराम करु म्हणता म्हणता आठवडा परत घरात बसून काढला! पुन्हा एकदा "काही होत नाही एक दिवस नाही केला व्यायाम तर" ह्या फेजमध्ये जायला सुरूवात झाली. सातत्य काही ठेवता येईना. आणि जोवर ते नसेल तोवर व्यायामालाही काही अर्थ नाही. म्हणुनच ह्या महिन्यासाठी डॉ.श्रीहास ह्यांनी सुचवल्या प्रमाणे चॅलेंजचा पुढचा टप्पा घेऊन आलो आहोत. ह्या महिन्यात आपण ७ दिवसांचे ३ चॅलेंजस घेणार आहोत. ह्यात तुम्ही दोन चॅलेंजच्या मध्ये गॅप घेऊ शकता अथवा सलग २१ दिवसांचे चॅलेंजही घेऊ शकता. कोणतीही सवय लागायला २१ दिवस लागतात. तेव्हा सातत्य येणाच्या दृष्टीने कुणाला २१ दिवस सलग हे चॅलेंज घ्यायचे असेल तर जरूर घ्या! तर चॅलेंज असे की ३० मिनिटं कोणताही व्यायाम प्रकार करुन किमान २०० कॅलरीज जाळणे. सलग ७ दिवसांची ३ किंवा सलग २१ दिवसांचे एक चॅलेंज तुम्हाला घ्यायचे आहे. रोज किती वेळ व्यायाम केला आणि किती तीव्रतेचा केला ह्यावर बरेच काही अवलंबुन आहे. उत्तम आरोग्यासाठी रोज किमान ३० मिनिटं घाम फुटेपर्यंत चांगला व्यायाम करणे आवश्यक आहे. ह्या दृष्टीने कॅलरीजची अट घातलेली आहे. सर्वांच्या सोयीसाठी बहुतांशी केले जाणारे व्यायाम आणि त्यातून जळणार्‍या कॅलरीजचा अंदाज देत आहोत. तुमच्या वय आणि वजनाप्रमाणे हे आकडे बदलतील हे लक्षात घ्यावे. आंतरजालावरून तुम्ही तुमच्या व्यायामासाठी वय आणि वजनाप्रमाणे आकडे मिळवु शकता. आपल्याला अचुक कॅलरीजचा हिशोब मिळवायचा नसून, त्या तीव्रतेचा व्यायाम करायचा आहे. अंदाजे ६५-६८ किलोच्या माणसाने, ३० मिनिटांसाठी केलेल्या व्यायामाची ही आकडेवारी आहे. आंतरजालावरून साभार.
वजन उचलणे - २०० कॅलरी टेनिस - २३२ कॅलरी सायकलिंग (14 – 15.9 mph) - ३३१ कॅलरी पळणे (7.5mph) - ४०० कॅलरी चालणे (3.5 mph) - १३५ कॅलरी सूर्यनमस्कार - ४१७ कॅलरी (एक सून - १३.९ कॅ. एका मिनिटाला एक सून असा हिशोब आहे)
तुम्ही करत असलेल्या व्यायामप्रकारात किती कॅलरीज जळाल्या ह्याचा असाच अंदाज तुम्ही लावु शकता आणि त्या हिशोबाने २०० कॅलरीज जाळण्याच्या दृष्टीने व्यायामाची तीव्रता ठरवु शकता. चला तर मग.. हे नवीन कॅलरीचे चॅलेंज घेऊन कॅलरी जाळूया..!! आपापला व्यायाम नोंदवण्यासाठी केलेली ही गूगल शीट
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
आरोग्य
लेखनप्रकार (Writing Type)
आरोग्य

प्रतिक्रिया द्या
38594 वाचन

💬 प्रतिसाद (132)

प्रतिक्रिया

१२+१२ जोर

वेल्लाभट
Mon, 03/06/2017 - 12:05 नवीन
१२+१२ जोर
  • Log in or register to post comments

माफ करा जरा स्पष्ट लिहितोय ,

माझीही शॅम्पेन
Mon, 03/06/2017 - 12:20 नवीन
माफ करा जरा स्पष्ट लिहितोय , सूर्य नमस्कार हा इतर शरीर ताणण्याचा फक्त एक प्रकार आहे आणि आधुनिक व्यायाम प्रकारात त्याला सर्वोच्च स्थान वेगरे काही नाही. हल्ली काही कारणास्तव (हिंदू संस्कृती , योगा आणि काही) खूप जास्त हाईप झाल्यासारखा वाटतोय , केवळ सूर्य नमस्कार करण हे पुरेसे नाही , शरीरातील सर्व स्नायू योग्य ठिकाणी आणि आणि योग्य प्रमाणात ताण येईल असा परिपूर्ण व्यायाम केला तरच फायदा आहे ... प्रत्येक शरीरसाठी / शरीर रचने प्रमाणे आणि तुम्ही ठेवत असल्येला गोल प्रमाणे व्यायाम प्रकार बदलत जातात , त्यामुळे योग्य फिसिओ चा सल्ला घेण कधीही चांगल , आपण सर्रास 300 रुपये X 2 = 600 रु तिकीट काढून चित्रपट पाहु शकतो पण तेच 600 रु देऊन योग्य सल्ला घेऊ हा विचार सुध्दा शिवत नाही
  • Log in or register to post comments

मीही काहीसा याच मताचा आहे.

वेल्लाभट
Mon, 03/06/2017 - 12:42 नवीन
मीही काहीसा याच मताचा आहे. योगासने हा आयसोमेट्रिक प्रकारातला व्यायाम असून त्याच्या परिणामाविषयी शंका नाही. पण तो आणि तोच श्रेष्ठ किंवा, तेवढं केलं की झालं, बाकी काही करायची गरज नाही इत्यादी युक्तिवाद पटणारे नाहीत. 'चूजिंग द ईझी ऑप्शन' चं हे एक उदाहरण आहे. सेम अ‍ॅज, 'चालण्यासारखा उत्तम व्यायाम नाही'.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन

स्विमिंगने पोट कमी होत नाही,

सूड
Mon, 03/06/2017 - 14:37 नवीन
स्विमिंगने पोट कमी होत नाही, उलट वाढतं, अशा मताचं एक काका मंडळ आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार स्विमिंग भूक वाढवतं आणि मग खाणं वाढल्याने पोट देखील वाढतं. तुमचा तुमच्या खाण्यावर एरवीच ताबा नसेल, तर व्यायामप्रकार कोणताही करा शष्प फरक पडणार नाही हे त्यांना एकदा सांगायचा प्रयत्न केला. मग पुन्हा प्रतिवाद करत बसलो नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

बरोबर केलंस मित्रा. शाब्बास.

वेल्लाभट
Mon, 03/06/2017 - 14:54 नवीन
बरोबर केलंस मित्रा. शाब्बास. तू लक्ष देऊ नकोस. तू चालू ठेव, मुक्तशैली, फुलपाखरू तडाखा... पण तेवढंच तेवढं नको. इतरही यायामप्रकार कर. वैविध्य ठेव. सातत्य ठेव. काठिण्य ठेव. फिटणेस तुझ्या पायाशी लोटांगण घालेल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

पण त्यांचं म्हणणं विचार

वेल्लाभट
Mon, 03/06/2017 - 14:56 नवीन
पण त्यांचं म्हणणं विचार करण्यासारखं आहे रे! तू कधी अंतर्वक्र पोट असलेला मासा बघितलायस? नाही की नाही !? सगळ्या माशांची पोटं फुगीर असतात. काकामंडळ इज राइट बॉस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

तू कधी अंतर्वक्र पोट असलेला

सूड
Mon, 03/06/2017 - 15:44 नवीन
तू कधी अंतर्वक्र पोट असलेला मासा बघितलायस?
असाच विचार करायचा असेल तर अजून मी अंडी देणारा बाप्या देखील पाह्यला नाहीय. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

के

वेल्लाभट
Mon, 03/06/2017 - 16:00 नवीन
के
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

माशांची पोटं फुगीर असतात.

सुबोध खरे
Wed, 03/08/2017 - 10:24 नवीन
माशांची पोटे फुगीर असण्याचे कारण ऐरो डायनॅमिक आकार आहे ज्यामुळे पाण्यात वेगाने पोहताना घर्षण कमीत कमी होऊन वेग वाढेल आणि कमीत कमी ऊर्जा जळेल. जुनीच काय आधुनिक जहाजे आणि पाणबुड्या हि त्याच आकाराच्या असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

जोक्क होता ओ डोक्टर

वेल्लाभट
Wed, 03/08/2017 - 11:59 नवीन
तुम्ही कुठे सिर्यसली माहिती देऊ लागलात! छे बा. मिपावर जोक्क करायची सोयच नई आजकाल. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

=))

मोदक
Wed, 03/08/2017 - 15:33 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

'चूजिंग द ईझी ऑप्शन' चं हे एक

अप्पा जोगळेकर
Wed, 03/08/2017 - 13:16 नवीन
'चूजिंग द ईझी ऑप्शन' चं हे एक उदाहरण आहे. म्हणजे तुम्ही योग किंवा सूर्यनमस्कार हे 'इझी' कॅटेगरीत टाकले आहे का ? पण तो आणि तोच श्रेष्ठ किंवा, तेवढं केलं की झालं, बाकी काही करायची गरज नाही इत्यादी युक्तिवाद पटणारे नाहीत. बाकी काही करायची गरज नाही, तोच श्रेष्ठ असे काही नाही. पण योग हा एक उच्च दर्जाचा व्यायाम प्रकार आहे. बाकी आधुनिक व्यायामाच्या नावाखाली बर्याच जिममधे थोतांड शिकवतात. असे योग क्लासेस मधेही असू शकेल. पण त्याची कल्पना नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

जाउंद्याना आप्पा

वेल्लाभट
Wed, 03/08/2017 - 17:17 नवीन
तुम्हाला फक्त वाद घालायचाय हे कळतंय मला. तुम्ही तुम्हाला वाटतं ते करा, सूर्यनमस्कार घाला की जिम मधे जा किंवा काहीही नको यापैकी. झालं? तुम्ही काय व्यायाम केलात ते सांगा बघू आज
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

तुम्ही काय व्यायाम केलात ते

अप्पा जोगळेकर
गुरुवार, 03/09/2017 - 10:56 नवीन
तुम्ही काय व्यायाम केलात ते सांगा बघू आज जेंव्हा २०० किमीची बीआरएम पूर्ण होईल तेव्हा इथे जाहीर कळवेनच. मधे अर्ध मॅरेथॉन पूर्ण केली तेंव्हा पण इथेच जाहीर कळवले होते. उगा ५-२५ जोर बैठका मारल्या तर त्याची जाहिरात करु नये असे मला वाटते. हे माझे मत फक्त माझ्या स्वतःपुरतेच लागू आहे. इतरांनी हवी तितकी जाहिरात करावी. काही आक्षेप नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

हे माझे मत फक्त माझ्या

वेल्लाभट
गुरुवार, 03/09/2017 - 12:05 नवीन
हे माझे मत फक्त माझ्या स्वतःपुरतेच लागू आहे. इतरांनी हवी तितकी जाहिरात करावी. काही आक्षेप नाही.
हे कबूल केलंत बरं केलंत. नाहीतर उगाच. आणि तसंही हा धागा जाहिरातीसाठी नाही. त्यामुळे इथं कुणीच जाहिरात करायला, तुलना करायला व्यायामाचे आकडे टाकत नाही. तुम्हाला तसं वाटत असल्यास तुम्ही पत्ता चुकलायत. तुम्हाला फक्त तर्क, अंदाज, किंवा हा व्यायाम उत्तम की तो याचा कीस पाडण्या ऐवजी व्यायामाचे आकडे टाका असं सुचवलं तर लगेच वेगळा वास आला. असो. आणिक विषयांतर टाळतो. आगोदरच्याही प्रतिसादात लिहिलं, आताही लिहितो; तुम्हाला वाद घालायचाय हे उघड आहे. आणि मला त्यात रस नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

सध्या फिजिओचा सल्ला घेणे तर

पिलीयन रायडर
Mon, 03/06/2017 - 22:25 नवीन
सध्या फिजिओचा सल्ला घेणे तर शक्य नाही. आणि सुर्यनमस्कार हे मलाही सर्वोच्च व्यायामाचा प्रकार वाटत नाहीत. फक्त ते करायला सोपे आहेत. म्हणजे मला बाकी बरीच आसनं येतात पण योगशिक्षक नसतील तर आपलं आपण करताना नक्की क्रम काय असावा, किती वेळ आसन करावे इ मध्ये फार गोंधळायला होतं. सुन त्या मानाने ठरलेला क्रम असल्याने आणि जवळपास सर्व मुख्य अवयवांना ताण देतील अशा आसनांचा समावेश असल्याने केले जातात. पण अर्थात इतर सर्व प्रकारचे व्यायामप्रकार केले पाहिजेत ह्याच्याशी सहमत. म्हणुन ह्या महिन्यापासुन व्यायाम प्रकाराचे बंधन ठेवलेले नाही. सातत्याने रोज आणि किमान ३० मिनिटे हे ह्या वेळेसचे ध्येय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन

उत्तम.

वेल्लाभट
Tue, 03/07/2017 - 00:22 नवीन
उत्तम. घरच्या घरी करत असलात तर एक साधारण विभाजन स्ट्रेंग्थ ट्रेनिंग - कार्डियो - आराम - स्ट्रेंग्थ ट्रेनिंग - कार्डियो - आराम - कार्डिओ (७ दिवस) असं असू शकतं. सातवा दिवस ऐच्छिक. जे हवं ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

स्ट्रेंग्थ ट्रेनिंग मध्ये घरी

पिलीयन रायडर
Tue, 03/07/2017 - 00:37 नवीन
स्ट्रेंग्थ ट्रेनिंग मध्ये घरी करण्याजोगे व्यायाम कोणते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

लोअर बॉडी

वेल्लाभट
Tue, 03/07/2017 - 01:01 नवीन
लोअर बॉडी बॉडीवेट स्क्वॉट्स, लंजेस, काफ रेजेस, हाय स्टेप अप्स, वॉल सिट अपर बॉडी पुश अप्स, पुश अप ची अनेक व्हेरिएशन्स आहेत त्यापैकी जमतील ती, ट्रायसेप डिप्स, चिन अप्स (बार असल्यास), प्लँक, सिटअप्स, हिप रेजेस, रिव्हर्स प्लँक ब्रिज, गुड मॉर्निंग एक्सरसाइज, असंख्य आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

आज घरी नवर्‍याच्या

पिलीयन रायडर
Wed, 03/08/2017 - 06:52 नवीन
आज घरी नवर्‍याच्या मार्गदर्शनखाली पुशअप्स आणि क्रंचेस करण्याचा प्रयत्न केला. आजवर व्यायामाच्या नावाखाली मी विनोद करत होते असं लक्षात आलं. मला काही हे प्रकार जमले नाहीत. सोफ्यावर पाय ठेवुनही पुशअप्सचा प्रयत्न केला पण स्वत:ला उचलणं जमण्या एवढी शक्ती हातात नाहीचे असंही कळालं. हे जमणार नाही तोवर आपण "फीट" आहोत असं म्हणवणार नाही. म्हणुन बाकी कोणताही व्यायाम केला तरीही रोज १५-२० मिनिटं वर सांगितलेले व्यायाम आलटुन पालटुन करायचे असं ठरवलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

पुश अप चं सोपं व्हर्जन

वेल्लाभट
Wed, 03/08/2017 - 07:58 नवीन
Image removed. पुश अप चं सोपं व्हर्जन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

गंमत म्हणजे मी शेवटी वैतागुन

पिलीयन रायडर
Wed, 03/08/2017 - 09:02 नवीन
गंमत म्हणजे मी शेवटी वैतागुन गुडघे टेकुनच केले पुश अप्स.. आधी आता इथुन सुरुवात करेन मग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

सिक्स पॅक अ‍ॅब्स शॉर्टकट

सूड
Tue, 03/07/2017 - 11:27 नवीन
सिक्स पॅक अ‍ॅब्स शॉर्टकट म्हणून तुनळीवर शोधा. त्याने दाखवलेले बर्पीज वैगरेचे वर्कआऊट चांगले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

सिक्स पॅक अ‍ॅब्स शॉर्टकट

सूड
Tue, 03/07/2017 - 11:28 नवीन
सिक्स पॅक अ‍ॅब्स शॉर्टकट म्हणून माईक चॅंगचे व्हिडिओ* तुनळीवर शोधा. त्याने दाखवलेले बर्पीज वैगरेचे वर्कआऊट चांगले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

एक्झॅक्ट्ली

स्थितप्रज्ञ
Mon, 03/13/2017 - 20:12 नवीन
आयुर्वेदाचं सुद्धा हेच मत आहे. योगासन/सूर्यनमस्कार हे अन्य व्यायामाला पूरक असे प्रकार आहेत. अर्धशक्ती (म्हणजे बगलेत घाम येपर्यंत) दमणूक करणारा व्यायाम करावा असे आयुर्वेदातही सांगितले आहे (कपाळाला घाम आला कि अति व्यायाम झाला असे समजून तात्काळ थांबावे असेहि सुचवले आहे).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन

स्ट्रेचिंग आणि २५ नमस्कार घातले.

चतुरंग
Tue, 03/07/2017 - 20:30 नवीन
सूर्यनमस्कार हा व्यायामाचा सर्वोच्च प्रकार नाही अशी मते वरती वाचली म्हणून जरा गुगलून बघितले तेव्हा एम्डी डॉक्टरांनी केलेला रीसर्च पेपर सापडला. https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC3289222/ त्यांच्या रिसर्चनुसार स्नायूंची ताकद, शरीराची एकूण क्षमता आणि सर्वांग्सुंदर फिटनेस देण्याची क्षमता नमस्कारांमध्ये आहे! कमी जागेत, कोणत्याही साधनाशिवाय आणि कोणत्याही ऋतूत सहज शक्य असल्याने हा व्यायामप्रकार मला आवडतो. अर्थात भरभर चालणे, पळणे किंवा व्यायामशाळेत वजने आणि इतर व्यायामही आवडतात परंतु नमस्कारा बद्दल लोकांचा गैरसमज होऊ नये म्हणून हा प्रपंच! :)
  • Log in or register to post comments

सूर्यनमस्कार हा व्यायामाचा

सुबोध खरे
Wed, 03/08/2017 - 11:49 नवीन
सूर्यनमस्कार हा व्यायामाचा सर्वोच्च प्रकार आहे का ते मला माहित नाही पण तो सुरुवात करणाऱ्या कोणत्याही (आळशी किंवा बैठ्या) माणसाला संपूर्ण शरीराचा चांगला व्यायाम आहे हे नक्की. कारण यात केवळ कॅलरी जाळतात असे नव्हे तर शरीर ताणले जाते आणि कोणत्याही स्नायूचा अति वापर न केल्याने व्यायामाच्या सुरुवातीला अंग आंबणे / स्नायू दुखणे हे बरेच कमी असते. आरंभशूर माणसांचा व्यायाम बंद पडण्याचे हे सर्वात महत्त्वाचे कारण आहे. Surya Namaskar burns about 3.79 calories per minute हे ६३ किलो वजनाच्या माणसासाठी आहे म्हणजे १ तास सूर्यनमस्कार केले तर साधारण २५० कॅलरी जाळल्या जातात पहा :-- http://www.stylecraze.com/articles/calories-does-surya-namaskar-help-to-burn/#gref http://timesofindia.indiatimes.com/articleshow/22326709.cms http://thegeniusofyoga.com/yoga-to-burn-calories-surya-namaskar/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

म्हणजे १ तास सूर्यनमस्कार

अप्पा जोगळेकर
Wed, 03/08/2017 - 13:22 नवीन
म्हणजे १ तास सूर्यनमस्कार केले तर साधारण २५० कॅलरी जाळल्या जातात १ तास सायकल चालवली तर ६००+ कॅलरी जळतील. पण रोज फक्त सायकल चालवणे ऐवजी फक्त सुर्य्नमस्कार अधिक आरोग्यदायी असावे. व्यायामाचा दर्जा ठरवताना कॅलरीच्या पलीकडे सुद्धा बरेच पॅरामीटर असावेत. शिवाय एखाद्या व्यायामाने चयापचय वाढत असेल तर कदाचित नंतर अधिक कॅलरी जळतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

अप्पासाहेब

सुबोध खरे
Wed, 03/08/2017 - 18:17 नवीन
अप्पासाहेब तुम्ही नुसत्या उठाबशा काढल्या तरी सूर्यनमस्कारापेक्षा जास्त कॅलरी जळतील. पण व्यायामाचा मूळ फायदा शरीर तंदुरुस्त आणि निरोगी ठेवणे हा आहे. केवळ वजन कमी करणे हा नव्हे. या दृष्टीने सूर्यनमस्कार हा सर्वांगाचा व्यायाम आहे. पोहणे हा एक असा संपूर्ण अंगाचा व्यायाम आहे. पण स्त्रियांसाठी तो सहजा सहजी करता न येण्यासारखा आहे. कारण अगोदर शॉवर घ्या पोहल्या नंतर शॉवर घ्या शाम्पू लावा, केस वाळवा यातच जास्त वेळ जातो. कोणालाही व्यायाम सुरु करा सांगताना सर्वात सोप्या गोष्टी म्हणजे वेगाने चालणे किंवा सूर्यनमस्कार या आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

न राहवून सांगतो

वेल्लाभट
Wed, 03/08/2017 - 18:25 नवीन
पण रोज फक्त सायकल चालवणे ऐवजी फक्त सुर्य्नमस्कार अधिक आरोग्यदायी असावे.
हा फक्त शब्द जो आहे ना, तो डोक्यातून काढता आला तर बघा. फक्त... काहीच चांगलं नसतं. आणि हे चांगलं असेल, याने कॅलरी जास्त जळत (मला हा शब्दप्रयोग अजिबात आवडत नाही पण तुम्ही वापरलायत म्हणून तसाच परत करतो) असतील... या जर तर तर्कांपेक्षा वाचा या विषयावर. एक आपला सस्नेह सल्ला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

या जर तर तर्कांपेक्षा वाचा या

अप्पा जोगळेकर
गुरुवार, 03/09/2017 - 10:58 नवीन
या जर तर तर्कांपेक्षा वाचा या विषयावर सल्ल्याबद्दल आभार. आम्ही काहीच न वाचताच लिहिले असे वाटल्याबद्दल आभार. थांबतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

बेटर.

वेल्लाभट
गुरुवार, 03/09/2017 - 12:06 नवीन
बेटर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

राजकारण, समाजकारण याप्रमाणे

sagarpdy
गुरुवार, 03/09/2017 - 11:19 नवीन
राजकारण, समाजकारण याप्रमाणे व्यायाम हा देखील केसाची पिसं काढण्याचा उत्तम विषय आहे. जाऊदे त्या 'फक्त' वर - रोज सायकल चालवायला काही हरकत नाही (आठवड्यातून २ दिवस सुट्टी द्या). पण सायकलिंग आधी वॉर्मअप आणि नंतर स्ट्रेचिंग आणि मग हलक्या डंबेल्स ने हात, खांदे, पाठ यांचा थोडा व्यायाम आणि त्यानंतर नंतर १२ सूर्यनमस्कार - अत्यंत वेळ घेऊन (प्रत्येक आसन १०-१५ सेकंद) हे फायदेशीर वाटलेत. तलाव ५-१० किमी अंतरावर असेल तर सायकल ने तिथे जाऊन तासभर स्विमिंग आणि सायकल ने परत असं पण उपयोगी आहेत. अर्थात रोज कार्डिओ करत असू तर आठवड्याला २ दिवस विश्रांती घ्यावी (सोमवार - गुरुवार). आणि भरपूर फळे-प्रथिने असा आहार. असो प्रोजेक्त एन्ड ची काम लागलीयेत, रोज व्यायाम होत नाहीये. काल ४० किमी सायकलिंग, खांदे-ट्रायसेप्स-बायसेप्स-बॅक प्रत्येकी २० चे सेट, ५ नमस्कार आणि थोडी पाय/पाठ स्ट्रेच करणारी योगासनं - उदा पश्चिमोत्तानासन, त्रिकोणासन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

पाध्ये साहेब,

अप्पा जोगळेकर
गुरुवार, 03/09/2017 - 11:47 नवीन
पाध्ये साहेब, हे सगळ सामान्य लोकांसाठी चाललय. तुमच्यासारखे ५० * ७ किंवा महिन्याला ५ घाट वाल्या 'पवनपुत्र' कॅटेगरीतल्या लोकांचे पॅरामीटरच वेगळे हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

@चतुरंग

आषाढ_दर्द_गाणे
गुरुवार, 03/09/2017 - 03:24 नवीन
त्यांच्या रिसर्चनुसार स्नायूंची ताकद, शरीराची एकूण क्षमता आणि सर्वांग्सुंदर फिटनेस देण्याची क्षमता नमस्कारांमध्ये आहे!
संशोधन शोधून काढल्याबद्दल आभार! ह्या संशोधनाचा हेतू उत्तम आहे आणि निष्कर्ष उत्कंठावर्धक आहेत. पण सरतेशेवटी हा उण्यापुऱ्या ७९ वैद्यकीय विद्यार्थ्यांवर केला गेलेला प्रयोग होता. त्यामुळे एकंदर लोकसंख्येकरता संशोधनाचे निष्कर्ष कितपत लागू पडतील ह्याचा विचार झाला पाहिजे. बाकी सूर्यनमस्कार हा एक चांगला आणि सुलभ व्यायाम आहे हे मात्र नक्की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

१५ + १५ जोर २० बैठका

वेल्लाभट
Wed, 03/08/2017 - 00:46 नवीन
१५ + १५ जोर २० बैठका
  • Log in or register to post comments

गेले ३ दिवस व्यायामाला अजिबात

प्रसन्न३००१
गुरुवार, 03/09/2017 - 08:57 नवीन
गेले ३ दिवस व्यायामाला अजिबात वेळ मिळाला नाहीये. फिलिंग गिल्टी :(
  • Log in or register to post comments

हरकत नाही. कम बॅक स्ट्राँगर.

वेल्लाभट
गुरुवार, 03/09/2017 - 12:08 नवीन
हरकत नाही. कम बॅक स्ट्राँगर. फार कमी वेळ असेल तर सर्किट ट्रेनिंगचं लहानसं रूटीन करा. १०-१५ मिनिटात होईल व्यायाम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसन्न३००१

काल स्ट्रेचिंग आणि

चतुरंग
गुरुवार, 03/09/2017 - 19:55 नवीन
१२ सूर्यनमस्कार आज स्ट्रेचिंग + २६ सूर्यनमस्कार
  • Log in or register to post comments

सूर्यनमस्कार

सप्तरंगी
गुरुवार, 03/09/2017 - 20:15 नवीन
मी पूर्वी कधीच सूर्यनमस्कार केले नाहीत, आत्ता मध्ये ४-५ दिवस केले तर सगळ्या स्नायूंवर अति ताण येऊन ते दुखत होते, मग परत सोडून दिले. असे कित्येक दिवसात योगा किंवा सूर्यनमस्कार घालणाऱ्या सगळ्यांचे होते का? सूर्यनमस्कार घालताना घाम किंवा थकवा येत नाही मग वर सांगितल्याप्रमाणे इतक्या कॅलरीज जास्त कश्या काय जळतात?
  • Log in or register to post comments

कोणताही नवीन व्यायामप्रकार सुरु करताना स्नायूंचे वेगळे ग्रुप्स

चतुरंग
गुरुवार, 03/09/2017 - 20:37 नवीन
वापरले जातात आणि व्यायामप्रकारानुसार त्यावर येणारा ताणही वेगवेगळा असतो. सुरुवात सर्वसाधारणपणे ५ नमस्कारांपासून करावी. आधी स्ट्रेचिंग करावे त्याने अंग मोकळे व्हायला मदत होते. शिवाय तुम्ही नमस्कार योग्य प्रकारे करत आहात की नाही हे देखील तपासून घ्यावे अन्यथा वेडावाकडा ताण येऊन स्नायू जास्त दुखतात. ऋजुता दिवेकरचा हा विडिओ बघा. सुरुवातीला त्याप्रमाणे नमस्कार जमणे अवघड आहे परंतु प्रत्येक आसन जितके अचूक करता येईल तितके करावे. अनावश्यक ताण घेऊ नये. https://www.youtube.com/watch?v=BOlydiuO50A
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सप्तरंगी

एक सुधारतो

वेल्लाभट
गुरुवार, 03/09/2017 - 20:48 नवीन
आधी स्ट्रेचिंग
चुकीचं मानतात. आधी वॉर्म अप करून वर्काउट झाल्यानंतर स्ट्रेचिंग करावं, ते हितकारक असतं. The best time to stretch is when the muscles are warm and pliable. This could be during a yoga or pilates class, or just after exercising. - एन एच एस, यु के.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

बरोबर आहे!

चतुरंग
गुरुवार, 03/09/2017 - 21:35 नवीन
मला वॉर्मपच म्हणायचं होतं, चुकून स्ट्रेचिंग म्हंटलं. धन्यवाद! (माझ्याही रोजच्या अप्डेट्स मध्ये मी 'स्ट्रेचिंग' लिहिलंय ते पूर्वलक्षी प्रभावाने 'वॉर्मप' असे वाचावे - इथे मला शिरीष कणेकरांच्या फटकेबाजीतला किस्सा आठवला! :) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

सूर्यनमस्कार तर व्हिडिओ बघताच

सप्तरंगी
Fri, 03/10/2017 - 19:50 नवीन
सूर्यनमस्कार तर व्हिडिओ बघताच केले, ऋजुता दिवेकरचा हा व्हिडिओ पण बघते. कदाचित अंगाला हालचालच नव्हती खूप दिवसात म्हणून तसे होत असावा, walk/ jog करताना सगळे एकाच लयीत सुरु असते त्यामुळे जाणवत नाही पण स्ट्रेच करताना ताण पडतो तेंव्हा हे pains कळतात.. वाढते वय , वजन चा परिणाम असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

मी पण अचानक सुन घातले तर

पिलीयन रायडर
Fri, 03/10/2017 - 19:56 नवीन
मी पण अचानक सुन घातले तर माझंही अंग आंबुन आल्यासारखं झालं. पण २-३ दिवसातच त्रास कमी झाला. वॉर्म अप अकरा. खाली वेल्लाने छान सांगितलंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सप्तरंगी

कॅलरी जाळण्यातील दहा

सुबोध खरे
गुरुवार, 03/09/2017 - 20:28 नवीन
कॅलरी जाळण्यातील दहा गैरसमज http://www.prevention.com/weight-loss/weight-loss-tips/10-calorie-burning-myths-busted/slide/11
  • Log in or register to post comments

घाम येण्याचा आणि कॅलरी

सुबोध खरे
गुरुवार, 03/09/2017 - 20:29 नवीन
घाम येण्याचा आणि कॅलरी जाळण्याचा संबंध नाही पहा https://www.popsugar.com/fitness/Does-Sweating-Mean-Youre-Burning-More-Calories-1655873
  • Log in or register to post comments

व्हेरी गुड डॉक्टर !

वेल्लाभट
गुरुवार, 03/09/2017 - 20:37 नवीन
व्हेरी गुड डॉक्टर !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

वाच्क्ष्हतीये.

स्रुजा
गुरुवार, 03/09/2017 - 21:29 नवीन
वाच्क्ष्हतीये. एक दिवस खाडा झाला तो पकडुन माझा ३ तारखेपासून ५ दिवस व्यायाम झाला आहे. वॉर्म अप आणि स्ट्रेचेस मध्ये माझा ही गोंधळ व्हायला लागलाय. माझं साधारण रुटिन हे जिम मध्ये जाऊन स्ट्रेचेस + २० मिन्स फॅट बर्न मोड मध्ये एलिप्टिकल ( ते स्वतःच रेझिस्टन्स अ‍ॅड्जस्ट करतं - माझ्या हार्टबीट्स प्रमाणे) + विविध वेट्स (३० - ४० मिन्स) असं आहे. एलिप्टिकल प्रमाणे १५५ कॅलरीज तिथे बर्न होतात, वेट्स मधल्या कॅलरीज ची मला मुळीच कल्पना नाही. पण प्रत्येक वेट्स चे २० रीपीटेशन चे ३ सेट्स करते. मात्र नवर्‍याच्या मते मी जे वजन निवडते ते नगण्य (३० - ५० पाऊंड) आहे . पण मला तेवढंच जमतं. अ‍ॅब्ज करताना ५० पाऊंड्स सहज जमतं , लोअर बॉडीचे बेसिकली ४०-५० पर्यंत आरामात करता येतं. हातांचे मात्र ३० च्या वर जाऊ शकत नाही. यात काही सुधारणा किंवा टिप्स असल्या तर द्या प्लीझ,
  • Log in or register to post comments

- जर तुम्ही उचलत असलेलं वजन

वेल्लाभट
Fri, 03/10/2017 - 11:28 नवीन
- जर तुम्ही उचलत असलेलं वजन प्रत्येक सेटच्या शेवटच्या तीन रिपिटिशन्स करताना तुमची कसोटी बघत असेल, तर ते तुमच्यासाठी (त्या व्यायामप्रकारासाठी, त्या वेळेपुरतं) उचित आहे. - तुम्ही म्हणताय तुम्ही २० रिपिटिशन्स चे दोन सेट करता. मी सुचवेन की तुम्ही १२-१५ ची रेप रेंज ठेवून बघा. पुन्हा; वजन असं हवं की १२ रिपिटिशन जायला'च' हव्यात आणि १५ जमवायचा प्रयत्न हवा. - '१५ रिपिटिशन आर्रामात जातात' याचा अर्थ उचलायचं वजन वाढवलं पाहिजे -
लोअर बॉडीचे बेसिकली ४०-५० पर्यंत आरामात करता येतं. हातांचे मात्र ३० च्या वर जाऊ शकत नाही.
सहाजिक आहे. तुमचा क्वॉड मसल हा बायसेप पेक्षा काही पटींनी मोठा आहे त्यामुळे त्याची नैसर्गिक ताकदच मुळात जास्त आहे. आपल्या अख्या शरीराचं वजन सदोदित पेलणा-या या मसलची वजन उचलायची क्षमता किती आहे याचा तुम्ही अंदाज लावू शकता.. आणि महत्वाचा भाग म्हणजे स्क्वॉट्स मधे बरेच मसल वापरले जातात. तुलनेने बायसेप कर्ल्स मधे कमी. त्यामुळे इट इज ऑब्व्हियस टु बी एबल टू लिफ्त मोअर इन स्क्वॉट्स. - व्यायामाच्या बाबतीत दोन व्यक्तींची तुलना करू नका. वजन उचलायच्या बाबतीत दोन व्यायामप्रकारांचीही तुलना करू नका. तुम्ही फक्त दोन वर्कआउट सेशन ची तुलना करा, त्यातही प्रत्येक व्यायामप्रकाराची स्वतंत्रपणे. उदा. गेल्या लेग डे ला स्क्वॉट ४० पाउंड्स १२ रेप्स २ सेट्स असतील तर पुढच्या लेग डे ला ४० चे ४५ होतात ना हे बघा. - प्रोग्रेस किती आहे याला महत्व नाही; ती आहे याला महत्व आहे. ४० चे ४१ पाउंड उचलू शकलात तरी प्रगती करताय. - सर्वात; सर्वात महत्वाचं. एक्सरसाइज करताना फॉर्म कडे लक्ष पहिले द्या. तो चुकला तर मोठे लोचे होऊ शकतात. एकवेळ वजन कमी, रिपिटिशन्स कमी चालतील, पण वजन जास्त घेण्याच्या नादात, किंवा अजून दोन रिपिटीशनच्या मोहात जर फॉर्म चुकलात तर इंजुरी होऊ शकते तेंव्हा फॉर्म कम्स फर्स्ट. (मला माझ्या इन्स्ट्रक्टर ने पहिले २ आठवडे वजन उचलू दिलं नव्हतं. फक्त रिकामा बार घेऊन वर्काउट केले. एकदा फॉर्म बद्दल त्याची खात्री झाली अँड ओनली देन डिड आय हिअर द साउंड ऑप्फ मेटल. ओल्डस्कूलच वाटला होता तो तेंव्हा, पण ते डिसिप्लिन कायम लक्षात राहिलं.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा