शीतयुद्धाआधी किंवा त्याच्याही आधी तेलाचा शोध लागेपर्यंत तरी इस्लामी दहशतवाद कुणाला माहिती नव्हता.
म्हणजे गझनीच्या महंमदासारख्या तत्कालीन ओसामा बिन लादेनांनी केवळ युध्देच केली आणि सामान्य जनतेच्या भाजीच्या देठालाही हात लावला नाही असे तुम्हाला वाटत असेल तर तसे वाटायला काहीच आडकाठी नाही.पण ते सत्य परिस्थितीला धरून नाही. हिंदूकुश पर्वताचे नाव कसे पडले यामागेही एक अत्यंत लांछनास्पद आणि रक्तरंजित कहाणी आहे.त्या प्रकाराला तुम्ही काय म्हणणार?त्यात सामान्य माणसांच्या कत्तली झाल्या नाहीत का? मग तो दहशतवाद कसा नाही? तेव्हा कट्टरतावाद आणि दहशतवाद यात तुम्ही नक्की कुठे लाईन काढणार? आणि त्यापेक्षाही अधिक जास्त मूलभूत प्रश्न----तुम्ही म्हणता तिथे ती लाईन काढायची झाली तर मुळात धर्माच्या नावावरील कट्टरतावाद नसेल तर धर्माच्या नावावरील दहशतवाद कुठून येणार?
तर मुळात धर्माच्या नावावरील कट्टरतावाद नसेल तर धर्माच्या नावावरील दहशतवाद कुठून येणार?
तुम्हाला वाटेल त्या पध्दतीने कट्टरतावाद आणि दहशतवाद याच्यात फरक करायचा असेल त्या पध्दतीने केला तरी तो कट्टरतावादही अनेक शतकांपासून आहेच.
तेव्हा अमेरिकेमुळे धर्मावर आधारीत दहशतवाद निर्माण झाला हे म्हणणे कितपत योग्य आहे हे तुम्हीच बघा. अनेकांचा दावा तो असतो.
वरच्या एका प्रतिसादात लादेन सारख्या दहशतवादाच्या अमेरिकेने वापर केला असे म्हणणे मुळात चूक आहे
अमेरिकेने एका धनाढ्य अरब श्रीमंत अरबाचा दहशतवादी आपल्या स्वार्थासाठी बनवला.
खालील कोणतीही लिंक उघडून पहा.
शिया व सुन्नी ह्यांचे रक्तरंजित संघर्ष इराक व इराण युद्धात अमेरिकेने सद्दाम चे हात कसे मजबूत केले ह्याचे काही पुरावे
अनेक अमेरिकन सिनेमातील एक प्रसंग सांगतो
काही वैज्ञानिक प्रयोगशाळेत एखादा प्रयोग म्हणून नवीन जीव किंवा एखादा वैज्ञानिक प्रयोग काही विशिष्ट उद्दिष्ट ठेवून करतात मात्र ऐनवेळी प्रयोगात गडबड होते व प्रयोग त्यांच्यावर उलटतो भलतच त्रांगडे निर्माण होते मग ह्या प्रयोगातून निर्माण झालेल्या भस्मासुराला मारण्यासाठी सिनेमाची उरलेली रीळ खर्ची पडतात ह्या मध्ये जो काही संहार होतो तो सिनेमाची रंजकता वाढवतो , पैसावसूल हिंसाचार
तसेच अमेरिकेचे होते दरवेळी
ह्या संपूर्ण लेखात त्यांची भूमिका मला बायस वाटली
किंबहुना कम्युनिझम ला रोखण्यासाठी अमेरिकेच्या कृत्य योग्य वाटणे हे कल्पनेपलीकडे आहे ह्या न्यायाने अमेरिकेने पाकिस्तानच्या अण्वस्त्र सज्ज होण्याकडे दुर्लक्ष केले पाकिस्तान ने खलिस्तान व काश्मिरी दहशतवादी चळवळीला अमेरिकन पैशातून शस्त्रे दिली ती सुद्धा टुमण ह्यांना पाकिस्तान त्यावेळी
रशिया विरुद्ध लढत किंबहुना जिहाद करत होता म्हणून योग्य वाटत असावी
काट्याने काटा जरूर काढावा पण अमेरिकेच्या बाबतीत अफगाण व इराक चे फसलेले धोरण पाहता
मला राजा व त्यांच्या माकडाची गोष्ट आठवते
राजा झोपला असतांना त्याच्या नाकावरची माशी मारण्यासाठी
माकड तालावर राजाच्या नाकावर उगारतो
आज हे रशिया व चीन व युरोपियन युनियन व आफ्रिकन देश ह्या सर्वांना इराण अमेरिका अण्वस्त्र संधीचे कौतुक व आनंद वाटत आहे किंबहुना अमेरिकेचा प्रबळ राजकीय मित्र युरोपियन युनियन ज्यात ब्रिटन सुद्धा आहे त्यांच्या प्रयत्नाने हि संधी होऊ शकली कधी नव्हे अमेरिका व इयु चा प्रत्येक निर्णयाला विटो देणारे रशिया व चीन ह्यांच्या सहभागाने हि संधी झाली दिला बिनडोक पाने विरोध करणारे रिपब्लिकन पहिले कि हसू येते त्यांच्या चर्चेत फक्त आपण आणि इराण अशी जगात दोनच पार्ट्या आहोत असे समजून त्यांचे डावपेच व चर्चा चालतात इतर देशांचे समूहाचे ह्या बाबतीत काय मत आहे सुद्ध जाणून घ्यावेसे वाटत नाही आणि अशी मानसिकतेचे आपले टुमण साहेब समर्थन करतात हेच गमतीचे आहे
ओबामा प्रशासन फार मोलाचे वाक्य बोलून गेला उद्या ही संधी रीब्लीकन ने सिनेट मध्ये मानली नाही तर जग म्हणजे चीन भारत आपण इराण वर लादलेली बंधने मानतील ह्याची खात्री नाही
ह्यापुढे जाऊन मी म्हणेन उद्या हि संधी झाली नाही व रशियाने इराण व चीन इराण ला अण्वस्त सज्ज होण्यास गुफुप हातभार लावला तर अमेरिका काय त्यांचे वाकडे करणार
अण्वस्त्र सज्ज झाल्यावर अमेरिकेने पाकिस्तान चे काय वाकडे केले
या एका छोट्या मुद्द्यावर -
मला वाटते की १९४७ मध्ये अमेरिकेने पाकिस्तानला समर्थन देणे क्रमप्राप्त होते.तो अमेरिकेच्या राजकारणाचा भाग होता. >>> उलट १९४७/४८ मधे काश्मीरमधल्या वादग्रस्त भागाबद्दल अमिरेकेने भारताला समर्थन दिले होते आधी. ब्रिटिश नेत्यांनी भारताविरूद्ध केलेले लॉबीइंग व नवीन भारत सरकार ने अमेरिकेकडे केलेले दुर्लक्ष यामुळे त्याचा फायदा भारताला घेता आला नाही.
तसेच १९४१ मधे अटलांटिक कराराच्या वेळेस रूझवेल्ट यांनी भारताला फेवरिंग भूमिका घेतली होती. पण चर्चिल ने ते नाकारले. या दोन्ही उदाहरणांवरून असे वाटते की सुरूवातीला अमेरिका भारताला अनुकूल होती. पण भारतानेच जास्त इंटरेस्ट दाखवला नाही. त्याची कारणे योग्य/अयोग्य असतील ती असतील, त्याबद्दल काही म्हणत नाही.
https://en.wikipedia.org/wiki/Atlantic_Charter
"Roosevelt repeatedly brought the need for Indian independence to Churchill's attention, but was repeatedly rebuffed"
अजून एका सोर्स मधूनः
You mentioned India,' he [Churchill] growled.
``|`Yes, I [Roosevelt] can't believe that we can fight a war against fascist slavery, and at the same time not work to free people all over the world from a backward colonial policy.'
१९४८ च्या युनो च्या भारत पाक कमिशन व अमेरिकेची त्यातील भूमिका यावर शोधलेत तर अजून मिळेल, पण दोन संदर्भ देतो
१. माउंटबॅटन यांचे सहकारी नरेन्द्र सिंग सरीला यांनी लिहीलेल्या पुस्तकात याबद्दल माहिती आहे. याच पुस्तकावर मी येथे लेखही लिहीलेला आहे.
http://www.misalpav.com/node/19586
२. या खालच्या लिन्कवरचे पुस्तक जर गूगल मधे दिसले तर २८० पानावर स्पष्ट उल्लेख आहे.
https://books.google.com/books?id=7bREjE5yXNMC&pg=PA328&lpg=PA328&dq=truman+on+punch+and+gilgit+and+india&source=bl&ots=B9E3_XJoFu&sig=tcDBvJ_ycFET0yRFBjop_7HGfbs&hl=en&sa=X&ved=0CDUQ6AEwA2oVChMIwLCZuJu6xwIVBGg-Ch25WwGr#v=onepage&q=truman%20on%20punch%20and%20gilgit%20and%20india&f=false
ते युनोचे कमिशन जे होते त्यात अमेरिकेचा प्रतिनिधी (बहुधा आयसेनहॉवर) होता पण ब्रिटिशांचा नव्हता. त्यांनी स्वतंत्रपणे विचार करून काश्मीर हे पूर्णपणे भारताचा भाग आहे हे मान्य केले होते व हे युद्ध म्हणजे पाकिस्तानचे आक्रमण आहे, हे ही. या मुद्द्यावर अमेरिका व ब्रिटन मधे प्रचंड मतभेद होते. पूँछ व गिलगिट भारताला मिळू न देण्यात ब्रिटन चा इंटरेस्ट होता (अॅटली जास्त).
तसेच १९४१ मधे अटलांटिक कराराच्या वेळेस रूझवेल्ट यांनी भारताला फेवरिंग भूमिका घेतली होती. पण चर्चिल ने ते नाकारले.
हो बरोबर. अटलांटिक कार्टरच्या वेळेस भारताला स्वातंत्र्य द्यावे असे फ्रॅन्कलीन रूझवेल्ट यांचे मत होते पण चर्चिल यांनी त्याला कडाडून विरोध केला. पण यावरून अमेरिकेचा भारताला पाठिंबा होता असे म्हणता येईल का? कारण अनेकदा असे निर्णय त्या वेळचे त्या राष्ट्रांचे हितसंबंध लक्षात घेऊन घेतले जातात.अटलांटिक कार्टर ऑगस्ट १९४१ मधील. त्यावेळी अमेरिकेचा दुसर्या महायुद्धात अधिकृत प्रवेश झाला नव्हता.आणि महायुद्धात इंग्लंडची अवस्था फार चांगली होती असेही नाही.अशा वेळी भारताला स्वातंत्र्याचे मधाचे बोट दाखवून भारतीय सैनिकांचे आणि जनतेचे युध्दासाठी सहकार्य मिळवावे आणि भारतातील कच्च्या मालाचा उपयोग करून घ्यावा असे कारण असू शकेल का?
उलट १९४७/४८ मधे काश्मीरमधल्या वादग्रस्त भागाबद्दल अमिरेकेने भारताला समर्थन दिले होते आधी. ब्रिटिश नेत्यांनी भारताविरूद्ध केलेले लॉबीइंग व नवीन भारत सरकार ने अमेरिकेकडे केलेले दुर्लक्ष यामुळे त्याचा फायदा भारताला घेता आला नाही.
पण यु.एन मध्ये प्रश्न गेल्यानंतर मात्र अमेरिकेची भूमिका भारतविरोधीच होती. त्यापूर्वी अमेरिकेचे भारताला समर्थन असेल तर त्याचा उपयोग आपण करून घ्यायला हवाच होता. यु.एन सुरक्षा परिषदेने ने ऑगस्ट १९४८ मध्ये पास केलेल्या ठरावाप्रमाणे पाकिस्तानला काश्मीरमधून सैन्य मागे घ्यावे आणि मग सार्वमत घ्यावे असे म्हटले होते.म्हणजे भारताने सैन्य काश्मीरातून मागे घ्यायचा त्या प्रस्तावात उल्लेख नव्हता तर सार्वमतात पाकिस्तानच्या बाजूने मत आल्यास अर्थातच भारतीय सैन्य काश्मीरातून मागे घेणे क्रमप्राप्त झाले असते.पण डिसेंबर १९४९ मध्ये कॅनडाच्या ए.जी.एल.मॅकनॉटन (सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष) यांनी सादर केलेल्या प्रस्तावात भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी सैन्य मागे घ्यावे अशी तरतूद होती.ती पाकिस्तानने मानली पण भारताने स्वाभाविकपणे अमान्य केली. हे मॅकनॉटन कॅनडाचे असले तरी अमेरिका आणि कॅनडामधील सख्य लक्षात घेता त्यांच्यावर अमेरिकेचा प्रभाव नव्हताच असे म्हणता येणार नाही.नंतरच्या काळात दोन बाजूंमध्ये एक मध्यस्थ नेमण्यात आला.तो मध्यस्थ होता अमेरिकेचे माजी सिनेटर फ्रॅन्क ग्रॅहॅम.त्यांनीही मॅकनॉटन यांच्याप्रमाणेच प्रस्ताव सादर केले होते आणि ते प्रस्तावही भारताने नाकारले.कुलदीप नय्यर यांच्या "बियाँड द लाईन्स" या आत्मचरित्रात अमेरिकेने काश्मीर प्रश्नी सुरक्षा परिषदेत पाकिस्तानला कसा पाठिंबा दिला आणि त्यामुळे नेहरू कसे फ्रस्ट्रेट झाले होते याचा उल्लेख आहे.
काहीही असले तरी सुरवातीला जर अमेरिकेचा भारताला पाठिंबा होता तर त्याचा उपयोग आपण करून घ्यायलाच हवा होता.या नव्या माहितीबद्दल धन्यवाद.
क्लिंटन यांचे सर्व प्रतिसाद या वेळी जास्तच एकांगी आणि काही तथ्ये उघड न करणारे किंवा टाळणारे वाटले. मी काही रशियाचा भोक्ता नाही हे आधीच स्पष्ट करू इच्छितो. पण यातल्या बर्याचशा मुद्द्यांना सप्रमाण खोडता येईल. 'मार्शल योजना', त्याआधीची 'द ग्रेट गेम', सिसिलीत राजकीय आघाडी उघडणं, नाझी भस्मासूर परस्पर 'रशियन अस्वला'वर कसे उलटेल हे पाहणं, पूर्व युरोपातल्या एका परिषदेत अमेरिकन परराष्ट्रमंत्र्याने जाहीरपणे 'साम्यवाद हा अमेरिकेचा क्रमांक एकचा शत्रू आहे आणि साम्यवादाचा मुळापासून नायनाट करणे हे अमेरिकेचे ध्येय्य आहे' अशी घोषणा करणे, पूर्व युरोपाजवळ अण्वस्त्रे तैनात करणे आणि क्यूबाच्या रूपाने स्वतःच्या अंगणात हेच होतेय याची कुणकुण लागताच थेट अणुहल्ल्याचा इशारा देणे, अशा अनेक बाबी आहेत.
या सर्वांचा सांगोपांग विचार करण्यासाठी अगदी मध्ययुगातील रशियन राजवटीला इतर युरोपिअन राजघराण्यांकडून मिळणारी कुत्सित वागणूक ते आज रशियाने पाकिस्तानविरुद्धच्या भारताच्या ठरावाविरुद्ध मतदान करणे इथपर्यंत इतिहासाचा फार मोठा पट उलगडून पहावा लागेल. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय शह-काटशहाच्या राजकारणातील खाचाखोचा निरपेक्षपणे आणि बारकाईने समजून घेता येणार नाहीत.
आणि भारत स्वतःही हे राजकारण इतरांइतक्याच धूर्तपणे वेळोवेळी खेळत आलाय हेही भान ठेवणे औचित्याचे ठरेल असे मला वाटते.
आपल्याही मताचा आदर आहे पण मिसळपाववर (आणि अन्य कुठेही) मी जे काही लिहितो ते मला योग्य वाटते ते लिहितो--ते भले बहुमतात नसले तरी किंवा त्या बाजूने लिहिणारा मी एकटा असलो तरी.इतर कोणाही मुळे माझ्या मतांमध्ये काना-मात्रा-वेलांटीचाही बदल मला करायची गरज वाटत नाही.त्यामुळे तुम्हाला ही मांडणी एकांगी वाटली तरी परमतसहिष्णूता म्हणून त्या मताचा आदर आहे. पण सो बी इट.
क्लिंटन यांचे सर्व प्रतिसाद या वेळी जास्तच एकांगी आणि काही तथ्ये उघड न करणारे किंवा टाळणारे वाटले.
आपल्या मताचा आदर आहे.
मी काही रशियाचा भोक्ता नाही हे आधीच स्पष्ट करू इच्छितो.
चला या निमित्ताने केवळ अमेरिकेलाच नावे ठेवण्याबरोबर रशियाचेही नाव यायला लागले हे पण काही कमी नाही.
बाकी मार्शल योजना जगात कम्युनिझम या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी खूपच महत्वाची होती. दुसऱ्या महायुध्दात इतके प्रचंड नुकसान झाले होते की जगातील संपत्तीच्या अर्धी संपत्ती एकट्या अमेरिकेत होती. युरोपचे प्रचंड नुकसान झाले होते.आणि ही परिस्थिती कम्युनिझमच्या प्रसारासाठी एकदम योग्य होती.गरीबांना भूलथापा डाव्यांनी नेहमीच दिलेल्या आहेत आणि आपल्याकडे वळवले आहे.धर्म ही अफूची गोळी असेल तर कम्युनिझम म्हणजे गांजा-चरस-हेरॉईन इत्यादी सगळे एकत्र असलेली गोळी आहे. अशावेळी महायुध्दात नुकसान झालेल्या देशांना मदत दिली नाही तर या देशांमध्ये या व्हायरसचा प्रसार होईल ही भिती नक्कीच अमेरिकेला होती आणि मला तरी त्यात काहीही चुकीचे वाटत नाही.
पूर्व युरोपातल्या एका परिषदेत अमेरिकन परराष्ट्रमंत्र्याने जाहीरपणे 'साम्यवाद हा अमेरिकेचा क्रमांक एकचा शत्रू आहे आणि साम्यवादाचा मुळापासून नायनाट करणे हे अमेरिकेचे ध्येय्य आहे' अशी घोषणा करणे,
मला तरी यात काहीही चुकीचे वाटत नाही. आणि रशियातल्या राजवटीचेही अमेरिकेच्या भांडवलशाहीचा समूळ नायनाट करणे हे ध्येय नव्हते का? कम्युनिझम हा मानवजमातीला असलेला कलंक आहे आणि त्याचा मुळापासून नायनाट करणे हे अमेरिकेने ध्येय ठेवले हे चांगलेच झाले. आणि त्याच कारणासाठी मी अमेरिकेला समर्थन देतो कारण कम्युनिझमचा मुळापासून नायनाट व्हावा असे मलाही वाटते.
पूर्व युरोपाजवळ अण्वस्त्रे तैनात करणे आणि क्यूबाच्या रूपाने स्वतःच्या अंगणात हेच होतेय याची कुणकुण लागताच थेट अणुहल्ल्याचा इशारा देणे, अशा अनेक बाबी आहेत.
क्युबापासून अमेरिकेचा किनारा १०० मैलांवर. पूर्व युरोपपासून रशिया सुरू किती मैलांवर होता?असो.
चला या निमित्ताने केवळ अमेरिकेलाच नावे ठेवण्याबरोबर रशियाचेही नाव यायला लागले हे पण काही कमी नाही.
बाकी मार्शल योजना जगात कम्युनिझम या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी खूपच महत्वाची होती. दुसऱ्या महायुध्दात इतके प्रचंड नुकसान झाले होते की जगातील संपत्तीच्या अर्धी संपत्ती एकट्या अमेरिकेत होती. युरोपचे प्रचंड नुकसान झाले होते.आणि ही परिस्थिती कम्युनिझमच्या प्रसारासाठी एकदम योग्य होती.गरीबांना भूलथापा डाव्यांनी नेहमीच दिलेल्या आहेत आणि आपल्याकडे वळवले आहे.धर्म ही अफूची गोळी असेल तर कम्युनिझम म्हणजे गांजा-चरस-हेरॉईन इत्यादी सगळे एकत्र असलेली गोळी आहे. अशावेळी महायुध्दात नुकसान झालेल्या देशांना मदत दिली नाही तर या देशांमध्ये या व्हायरसचा प्रसार होईल ही भिती नक्कीच अमेरिकेला होती आणि मला तरी त्यात काहीही चुकीचे वाटत नाही. तुमचा भयंकर वैचारिक गोंधळ उडालेला दिसत आहे तुमच्या मताशी प्रतिकूल प्रतिसाद देणारे साम्यवादी विचारसरणीस अनकूल आहेत असा तुम्ही ग्रह केलेला दिसतो , माझ्या तर पहिल्याच प्रतिसादात मी रशिया विरीद्ध रशियन सुद्धा चांगले बोलत नाहीत असे लिहिले होते
मुळात रशिया व अमेरिका हे एका माळेची मणी होते , शीतयुद्धात
आणि ह्या दोघांनी एकमेकांच्या विरुद्ध जे मार्ग निवडले त्यात जगातील अनेक देश नाहक भरडले गेले
दोन्ही ह्या बाबत दोषी आहेत तेव्हा समाजवाद संपविण्यासाठी अमेरीकेच्य कोणत्याही कृत्याचे समर्थन करणे राजकीय अपरिपक्वता आहे.
शीतयुद्ध संपल्यावर अमेरिकेने जगभरात अफगाण इराक लिबिया व सिरीया मध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जे धंदे केले किंवा करत आहेत त्याचे समर्थन होऊच शकत नाही.
अमेरिका सध्या भारताच्या जवळ येत असली तरी भूतकाळात त्यांच्या नालायक पणाची किंमत भारताला सोसावी लागली आहे
कम्युनिझम म्हणजे गांजा-चरस-हेरॉईन इत्यादी सगळे एकत्र असलेली गोळी आहे.
ह्या वाक्याचा उपहास म्हणा किंवा विडंबन पण खुद अमेरिकेत रशियाच्या मदतीशिवाय अमली पदार्थाचे विश्व बहरले
रशिया व अमेरिका हे दोन्ही आपल्याजागी सारखेच नालायक आहेत टुमण अनेक ठिकाणी साम्यवाद संपवायला अमेर्केने केलेल्या कृत्याला पूर्णपणे समर्थन देतो व दुसर्या प्रतिसादात
अमेरिकेने पाकिस्तानला भारताविरुद्ध जी काही प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत केली त्यावर टीका करतो
प्रचंड विरोधाभास आहे दोन्ही मध्ये
सध्याची बदलती स्थिती पाहता
रशिया+पाकिस्तान आणि अमेरीका+भारत
अशी समीकरणे पुढे येत आहेत. या सगळ्यामधे रशिया आणि अमेरीकेने पाकिस्तानचा नवा अफगाणिस्तान करू नये. केल्यास त्याचे भारताला गंभीर परिणाम भोगावे लागतील. आखाती देशांबरोबर उत्तम संबंध असूनही भारताला भारतीय उपखंडातच अडकून पडावे लागेल.
प्रतिक्रिया
शीतयुद्धाआधी किंवा त्याच्याही
आणि हो
वरच्या एका प्रतिसादात लादेन
ह्या संपूर्ण लेखात त्यांची
१९४७
...
उलट १९४७/४८ मधे काश्मीरमधल्या वादग्रस्त भागाबद्दल अमिरेकेने भारताला समर्थन दिले होते आधी.याबद्दल अधिक माहिती मिळू शकेल का...१९४८
नव्या माहितीबद्दल धन्यवाद
"मुसलमान तसलेच" एवढाच पॉइंट
+१
क्लिंटन यांचे सर्व प्रतिसाद
पूर्णपणे सहमत.
आपल्याही मताचा आदर आहे
आपल्या मताचा आदर आहे
चला या निमित्ताने केवळ
...
गॅरी ट्रुमनजी, खरंच अतिशय
अमेरिका म्हटल की iron man 3