✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

संस्कृत सुभाषिते

श
शरद यांनी
Sat, 03/21/2015 - 21:20  ·  लेख
लेख
आजपासून काही संस्कृत सुभाषितांचा परिचय करून देण्याचा विचार आहे. घाबरू नका. ही शाळेत शिकलात तशी "नीतीशतका"तील उपदेशात्मक नसतील. आपले मनोरंजन नक्कीच करतील याचा भरोसा देतो. मागे आपण आदीमाता व शिवशंभू यातील संवाद पाहिला होता (आठवत नाही ? ह्ररकत नाही. ही लिन्क http://www.misalpav.com/node/24338) त्यांच्याच संसारातील एक पर्व. शंकराने हालाहल कां प्राशन केले ? एक शक्यता अत्तुं वाञ्छति वाहनं गणपतेराखुं क्षुधार्त: फणी तं च् क्रौञ्चपते:शिखौ; स गिरिजासिंहोऽपि नागाननम् !! गौरी जन्हुसुतामसूयति कलानाथं कपालानलो निर्विण्ण:स पपौ कुटुम्बकलहादीशोऽपि हालाहलम् !! शंकराच्या गळ्यातला भुकेला नाग गणपतीचे वाहन असलेल्या उंदराला खाऊं इच्छित आहे. पण नागाचेही काय खरे नाही. कार्तीकेयाचे वाहन जो मोर तो नागाला गिळंकृत करावयास टपलेला आहेच. पार्वतीचे वाहन सिंह, त्याचे लक्ष गणपतीचे डोके असलेल्या हत्तीकडेच लागलेले. पार्वती गंगेचा मत्सर करत आहे तर कपाळावरचा अग्नी चंद्राचा ! बोला. असल्या गृहकलहाला वैतागलेला "महादेव" हालाहल पिणार नाही तर काय करणार ? कवींनी आदीमातेला काशीपुराधिश्वरी का केले ? तिची प्रार्थना करतांना "भिक्षां देही कृपावलंबन करि माताअन्नपूर्णेश्वरी" असे कां म्हटले ? अगदी साधे कारण. त्यांनी शंकराच्या घरांत डोकावून पाहिले, काय दिसले तेथे ? स्वयं पंञ्चमुख: पुत्रौ गजाननषडाननौ दिगंबर: कथं जीवेदन्नपूर्णा न चेद्गृहे ? !! घरांत खाणारी तोंडेच जास्त हो. स्वत: घरधनी पंचमुखी, दोन मुले; त्यातील एकाला तोंड हत्तीचे तर दुसर्‍याला सहा तोंडे आणि त्यात भर घालावयाला हा गृहस्थ दिगंबर ! आता घरात "अन्नपूर्णा" आहे म्हणूनच संसार चालला आहे नां !! शंकराचा निवास पृथ्वीवर. तेव्हा कवींनी त्याच्या घरांत जास्त वेळा डोकवावे हे उचितच पण म्हणून क्षीरसागरातील विष्णूची सुटका झाली असे समजू नका. जगन्नाथपुरीच्या देवळातील विष्णूची मूर्ति लाकडाची आहे. का बरे ? उत्तर कवींकडेच मिळणार एका भार्या प्रकृतिमुखरा चञ्चला च द्वितीया पुत्रस्त्वेको भुवनविजयी मन्मथो दुर्निवार: !! शेष: शय्या शयनमुदधौ वाहन: पन्नगारि: स्मारं स्मारं स्वगृहचरितं दारूभुतो मुरारि: !! या "वैभवभूषित वैकुंठेश्वर" गृहस्थांचेही हाल काही कमी दिसत नाहीत. एक बायको, सरस्वती, ती बडबडी, दुसरी लक्ष्मी, ती चंचल. एक मुलगा, मदन, तो सर्व जगाला जिंकण्याचा उपद्व्याप करीत बसलेला, झोपायाला शय्या कसली ? ती शेष नागाची, शयनमंदिर म्हणजे समुद्र व वाहन नागांचा शत्रु गरुड ! हे ग्रुहसौख्य आठवून आठवून विष्णूने "काष्टवत" होणेच पत्करले. त्रिखंडात कोठेही जा (बिचार्‍या) नवर्‍याचे नशिव साले फुटकेच. असो या घ्ररच्या कटकटींना जरा बाजूला ठेवून जरा हलकेफुलके बघु या. मराठीत छेकापन्हुतीवरच्या लेखावरील (http://www.misalpav.com/node/15896 ) प्रतिसादात श्री बॅटमन यांनी संस्कृतमधील उदाहरणाबद्दल विचारले होते. आज एक उदाहरण देतो. बदल म्हणून कै.ल.गो.विंझे यांनी केलेला काव्यानुवाद देत आहे. या पाणिग्रहलालिता, सुसरला, तन्वी, सुवंशोद्भवा गौरी, स्पर्शसुखावहा, गुणवती, नित्यं मनोहारिणी !! सा केनापि हता; तया विरहितो गन्तुं न शक्तोऽस्म्यहं रे भिक्षो ! तव कामिनी ? न हि न हि ! प्राणप्रिया यष्टिका! !! "जी हस्ते कुरवाळिली,सरल जी तन्वी सुवंशातली गौरी, अन् गुणवान्, मनोहर सुखस्पर्शा सदा लाभली नेली ती कुणिशी ! तिच्याविण न मी जाऊं शके सत्वर !" "कां भिक्षो ! तव कामिनी ?" " नच तसें, काठी प्रिया सुंदर !" ( या वेळी संस्कृत शब्दांचे अर्थ दिलेले नाहीत. गरज आहे कां?) आज इथेच थांबू. शरद
  • संस्कृत सुभाषिते -२

Book traversal links for संस्कृत सुभाषिते

  • संस्कृत सुभाषिते -२ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वाङ्मय
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
32348 वाचन

💬 प्रतिसाद (89)

प्रतिक्रिया

मजा आली!

पैसा
Sat, 03/21/2015 - 22:42 नवीन
सगळीच सुभाषिते जाम मजेशीर आहेत! शंकराच्या गृहकलहाबद्दलचे आणि अन्नपूर्णेबद्दलचे माहीत होते. पुन्हा आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments

मस्त सुभाषिते.

प्रचेतस
Sat, 03/21/2015 - 23:09 नवीन
मस्त सुभाषिते.
  • Log in or register to post comments

मस्त, मजा आली.

विवेकपटाईत
Sun, 03/22/2015 - 13:27 नवीन
मस्त, मजा आली.
  • Log in or register to post comments

येऊ द्या

तिमा
Sun, 03/22/2015 - 13:41 नवीन
या आवडत्या विषयावरील लेखमाला कधी संपूच नये असे वाटते. तेंव्हा लिहितच रहा.
  • Log in or register to post comments

आवडलं.

विशाखा पाटील
Sun, 03/22/2015 - 16:28 नवीन
आवडलं.
  • Log in or register to post comments

हही हही हही!

अत्रुप्त आत्मा
Sun, 03/22/2015 - 17:18 नवीन
हही हही हही! समांतर;- खाटुक कसा नै अवतरला अजुन या धाग्यावर? :-\
  • Log in or register to post comments

वा मस्त ओळख सुभाषितांची

सांगलीचा भडंग
Sun, 03/22/2015 - 19:17 नवीन
वा मस्त ओळख सुभाषितांची शाळेत असतात एक श्लोक होता तो आठवला . पूर्ण नाही माहिती पण शेवट आठवतो आहे पण साधारण " रामाभिषेके … …… ठंठं ठठंठं ठठठं ठठंठ: ". भांड्याचा आवाज येतो जिन्यावरून पडताना असा काही तरी अर्थ होता
  • Log in or register to post comments

रामाभिषेके जलमाहरन्त्या,

बॅटमॅन
Mon, 03/23/2015 - 11:00 नवीन
रामाभिषेके जलमाहरन्त्या, हस्ताच्च्युतो हेमघटो युवत्या:| सोपानमार्गेण करोति शब्दं, ठंठं ठठंठं ठठठं ठठंठ: || हा तो श्लोक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सांगलीचा भडंग

राजा भोजाच्या विदूषकाच्या गोष्टीत हाच श्लोक

साती
Mon, 03/23/2015 - 11:49 नवीन
भोजस्य भार्या जलमाहरन्ति कराच्च्युते चंदनं हेमपात्रं सोपानमार्गे प्रकटोती शब्दं ठा ठं ठठ ठं ठ ठ ठं ठ ठं ठः असा वाचला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

बरोबर. या श्लोकाचे असे २-३

बॅटमॅन
Mon, 03/23/2015 - 12:04 नवीन
बरोबर. या श्लोकाचे असे २-३ पाठभेद आहेत. हाच श्लोक "भोजस्य भार्या मदविव्हला सा" अशा प्रस्तावनेसकट वाचलेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

ऊर्दुतील आगळे उदाहरण

रमेश आठवले
Tue, 03/24/2015 - 03:11 नवीन
एकदा एका उर्दु कवि सम्मेलनात (मुशायरा) एका हिंदू कविला डिवचण्यासाठी -वो मजहब काफिर ही जो बंदे नही इस्लाम के- असा अंतरा ( शेवटची ओळ ) असलेला शेर ऐकवण्याची फर्माईश करण्यात आली . त्यावर त्याने हा शेर ऐकवला. --- लाम के मानिंद है गेह्सू मेरे घनश्याम के वो मजहब काफिर ही जो बंदे नही इस लाम के --- श्री कृष्णाचे ( कुरळे) केस हे( उर्दू अक्षर) ل (उर्दू उच्चार -लाम) च्या सारखे आहेत ( म्हणून) या लाम चे जे बंदे नाहीत ते काफिर आहेत असे ऐकवून बाजी उलटवली. मानिंद=सारखे गेह्सू =केस काफिर = नास्तिक, बंदे=दास
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हा ऐकला होता अगोदर. लयच भारी

बॅटमॅन
Tue, 03/24/2015 - 12:41 नवीन
हा ऐकला होता अगोदर. लयच भारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले

भारी !

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 03/24/2015 - 18:05 नवीन
भारी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले

ठंठं ठठंठं ठठठं ठठंठ: ||

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 03/26/2015 - 11:50 नवीन
ठंठं ठठंठं ठठठं ठठंठ: ||
अशाच प्रकारचे अजुन एक सुभाषित आहे ना , ते दे की लुलु लल्ल्लुलु लललल्लु ल्लूल्लू ... असे काही तरी आहे ना ते सुभाषित ? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

जम्बुफलानि पक्वानि पतन्ति

प्रचेतस
गुरुवार, 03/26/2015 - 12:20 नवीन
जम्बुफलानि पक्वानि पतन्ति विमले जले | कपिकम्पितशाखाभ्यो गुलुगुग्गुलुगुग्गुलु ||. वानरांनी जांभूळववृक्षाच्या फांद्या गदागदा हलवल्यामुळे पक्व झालेली जांभळे पाण्यात पडून 'गुलु गुग्गुलु गुग्गुलु' असा आवाज येत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

मी ऐकलेली या सुभाषिताची

बाळ सप्रे
Wed, 04/01/2015 - 12:22 नवीन
मी ऐकलेली या सुभाषिताची व्हर्जन्स खालीलप्रमाणे.. जंबुफलानि पक्वानि पतन्ति विमले जले | तानि मत्स्या न खादन्ति जालगोलकशंकया || जंबुफलानि पक्वानि पतन्ति विमले जले | तानि मत्स्या न खादन्ति जलमध्ये डुबुक डुबुक ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

हेच ते सुभाषित काय हो?

बॅटमॅन
गुरुवार, 03/26/2015 - 13:11 नवीन
चेष्टालुशब्दांश्च मिपाकराणाम् श्रुत्वा हि कोपेन महत्तरेण आत्मा अतृप्तो प्रकरोति शब्दम् लुल्ल्लुल्लुलुल्लू लुलुलू लुलुल्लः || ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

.. ..

प्रचेतस
गुरुवार, 03/26/2015 - 13:31 नवीन
=)) .. =)) .. =)) ते फक्त 'अतृप्तो' च्या ऐवजी 'अत्रुप्तो' असं पाह्यजे बघ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

बरोबरे, फक्त तृ असेल तर

बॅटमॅन
गुरुवार, 03/26/2015 - 13:33 नवीन
बरोबरे, फक्त तृ असेल तर संस्कृताप्रमाणे वृत्तात बसतं, त्रु असेल तर नाही म्हणून तृ लिहिलं इतकंच. बाकी काही असलं तरी आपण उच्चार त्रु असाच करतो म्हणा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अगदी अगदी.

प्रचेतस
गुरुवार, 03/26/2015 - 13:35 नवीन
अगदी अगदी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

@लुल्ल्लुल्लुलुल्लू लुलुलू

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 03/26/2015 - 14:08 नवीन
@लुल्ल्लुल्लुलुल्लू लुलुलू लुलुल्लः || >>> Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अजून एक सुभाषित दुदु दुदु आणि

सूड
गुरुवार, 03/26/2015 - 14:20 नवीन
अजून एक सुभाषित दुदु दुदु आणि दुत्त दुत्त वर पाह्यजे राव!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हलकट सुडूक्,बदकाचं हडूक!

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 03/26/2015 - 14:25 नवीन
हलकट सुडूक्,बदकाचं हडूक! :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

यावेळेस मराठी.

बॅटमॅन
गुरुवार, 03/26/2015 - 14:44 नवीन
जिलबि अवडते हो आत्मयाची जयाला दुडुदुडुदुडु धावे, अग्निवेताळ आला खिखिखिखिखिखि हासे, चेष्टवी आत्मयासी दुदुदुदुदुदु तेणे नाम आले तयासी || दुत्तदुत्त महादुत्त शालखी चेशता कले | तेने आनंद त्या होई, आतमू पलि तो लले || ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

एकच नंबर !!

सूड
गुरुवार, 03/26/2015 - 15:03 नवीन
एकच नंबर !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

जिलबि अवडते हो आत्मयाची जयाला

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 03/26/2015 - 15:12 नवीन
जिलबि अवडते हो आत्मयाची जयाला .........Image removed. दुडुदुडुदुडु धावे*, अग्निवेताळ आला खिखिखिखिखिखि हासे, चेष्टवी आत्मयासी दुदुदुदुदुदु तेणे नाम आले तयासी || Image removed. दुत्तदुत्त महादुत्त शालखी चेशता कले | Image removed. तेने आनंद त्या होई, आतमू पलि तो लले || Image removed.
मेलो...मेलो रे हराम्या शब्दखाटुका! Image removed. काय खोकलिच्याची वृत्तकळा आहे रे भगवंता! ======================================= * - सदर ओळीस अत्यंत हुबेहुब अनुसरणारा बालं'आगोबाचा एक रांग'डा फोटु आठवला! =)) व्ह्त्साप ग्रुपवरी जो आला होता! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

सदर ओळीस अत्यंत हुबेहुब

बॅटमॅन
गुरुवार, 03/26/2015 - 15:19 नवीन
सदर ओळीस अत्यंत हुबेहुब अनुसरणारा बालं'आगोबाचा एक रांग'डा फोटु आठवला!
पुनरेकवार पोस्टवणे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@पुनरेकवार पोस्टवणे >>> जी

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 03/26/2015 - 15:21 नवीन
@पुनरेकवार पोस्टवणे >>> =)) जी सर! ह्वस्तपी या! देतोच तिकडे! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

यावच्छक्य अवश्य पिंगवतो.

बॅटमॅन
गुरुवार, 03/26/2015 - 15:23 नवीन
यावच्छक्य अवश्य पिंगवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

जिलबि अवडते हो आत्मयाची जयाला

सूड
गुरुवार, 03/26/2015 - 15:45 नवीन
जिलबि अवडते हो आत्मयाची जयाला दुडुदुडुदुडु धावे, अग्निवेताळ आला
जिलब्या पाडत असलेले तांब्याधिपति आणि त्यांच्या मोहाने दुडूदुडू धावत येणारे त्यांचे परममित्र आठवले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

थांब हो दुष्ट सुडुका,तुला आज

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 03/26/2015 - 15:49 नवीन
=)) थांब हो दुष्ट सुडुका,तुला आज लावितोच एक हाड्डुक्का! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

थांब हो दुष्ट सुडुका,तुला आज

सूड
गुरुवार, 03/26/2015 - 16:21 नवीन
थांब हो दुष्ट सुडुका,तुला आज लावितोच एक हाड्डुक्का!
ऑ? माझ्याकडच्या हाडकाने एकच रट्टा घालेन पाठीत!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@ ऑ? माझ्याकडच्या हाडकाने एकच

अत्रुप्त आत्मा
Fri, 03/27/2015 - 00:41 नवीन
@ ऑ? माझ्याकडच्या हाडकाने एकच रट्टा घालेन पाठीत!!>> वाट बघा! :P माझि पाठ आहे टणक हडुकाचा तुझ्या होइल सं गणक!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

दुडुदुडुदुडुदुडु हा शब्द

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 03/26/2015 - 15:59 नवीन
दुडुदुडुदुडुदुडु हा शब्द चुकला आहे. तो शब्द दुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदु असा आणि साधारण तिप्पट लांबीचा पाहिजे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

वृत्तात बसत नाही ओ. नायतर

बॅटमॅन
गुरुवार, 03/26/2015 - 16:06 नवीन
वृत्तात बसत नाही ओ. नायतर घाटलो अस्तो मगाच्यानच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

विच्छेद टाकायचा मधे एखादा

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 03/26/2015 - 16:15 नवीन
=)) विच्छेद टाकायचा मधे एखादा =)) पण अक्षर किमान १८ वेळा लागोपाठ आलं नाहीतर फाउल मानतात ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हम्म, आर्यावृत्तात कदाचित

बॅटमॅन
गुरुवार, 03/26/2015 - 16:19 नवीन
हम्म, आर्यावृत्तात कदाचित करता येईलही अशी रचना....पण पाहिले पाहिजे. तूर्त तत्त्वतः तरी अशी रचना करता येईल हे नक्की जाणा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

शब्दखाटुक हा गुर्जींचा शब्द

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 03/26/2015 - 15:56 नवीन
=)) शब्दखाटुक हा गुर्जींचा शब्द अचुक आहे....बॅ बॅ बॅ !!! दु दु दु दु...!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

केवळ भारी

सविता००१
गुरुवार, 03/26/2015 - 15:26 नवीन
भन्नाट हसतेय :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

बट्टमणाच्या गिर्वाणबाजीने

सस्नेह
गुरुवार, 03/26/2015 - 15:34 नवीन
बट्टमणाच्या गिर्वाणबाजीने निर्वाण प्राप्त जाहले आहे +))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सविता००१

चेष्टालुशब्दांश्च मिपाकराणाम्

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 03/26/2015 - 17:30 नवीन
चेष्टालुशब्दांश्च मिपाकराणाम् श्रुत्वा हि कोपेन महत्तरेण आत्मा अतृप्तो प्रकरोति शब्दम् लुल्ल्लुल्लुलुल्लू लुलुलू लुलुल्लः ||
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

एतत् खलु चपखलुलुलुम्

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 03/26/2015 - 20:21 नवीन
खलु चपखलुलुलुम् =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

खाटुकालुशब्दांश्च वा घुळ

अत्रुप्त आत्मा
Fri, 03/27/2015 - 00:51 नवीन
खाटुकालुशब्दांश्च वा घुळ कराणाम् तुकडा हि कापेन पृथक्करेण खाटुक प्रसवे दु- दू करोति शब्दम् हुहुहू हुहुहू हुहुहू ह्हा ह्हा हा ह्हा ह्हा! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

आहाहाहा. क्या बात शरद सर. एकच

बॅटमॅन
Mon, 03/23/2015 - 10:59 नवीन
आहाहाहा. क्या बात शरद सर. एकच नंबर. संस्कृतातल्या छेकापन्हुतीकरिता अनेक धन्यवाद!!!!
  • Log in or register to post comments

असेच गंमतीशीर

साती
Mon, 03/23/2015 - 11:56 नवीन
'मन्ये मत्कुणशंकया' 'तक्रं शक्रस्य दुर्लभं' आणि एक समस्यापूर्तीचा- कुणाला काय हवे ते सांगणारा माधवदाघयानम्' म्हणजे पराक्रमी पुरुषाला -मानम् पंडिताला -धनम् प्राण्यांना-वनम् पुरोहिताला- धनम् मोराला- घनम् चालणार्याला- यानम् आणि सगळ्यांनाच- माधवदाघयानम्- म्हणजे रणरणत्या उन्हात (शाकारलेल्या) वाहनातून प्रवास!
  • Log in or register to post comments

मत्कुणशंकया आणि माधवदाघयानम्

बॅटमॅन
Mon, 03/23/2015 - 12:07 नवीन
मत्कुणशंकया आणि माधवदाघयानम् हे दोन्ही श्लोक जमल्यास पेस्टवावेत ही इणंती. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

मत्कुणशंकया आठवतोय

साती
Mon, 03/23/2015 - 12:18 नवीन
कमले कमला क्षेते हरःक्षेते हिमालये क्षीराब्धौच हरिक्षेते मन्ये मत्कुणशंकया (शेते की क्षेते काय आठवत नाही) माधवदाघयानम् कुठे लिहिलेला मिळेल का बघायला हवे. आम्हाला रत्नागिरीत पोखरणकर गुरुजी म्हणून पाचवी ते दहावी संस्कृत दहावीयला होते. पाचवीपासून टिळक विद्यापीठाच्या पीठाच्या परीक्षा असत ना! तर ते गुरुजी शिकवायच्या धड्यासुभाषितांव्यतिरिक्त इतकं काय काय शिकवित की विचारू नका. सगळी प्रसिद्धं संस्कृत नाटके वगैरे थोडक्यात शिकविली होती. आम्ही दळिद्र्यांनी मेडिकलला जाताच त्या वह्या अग्निला स्वाहा केल्या. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

शेते

पैसा
Mon, 03/23/2015 - 12:21 नवीन
कमले कमला शेते असं आहे ते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

अजून एक आठवला

पैसा
Mon, 03/23/2015 - 12:24 नवीन
असारे खलु संसारे, सारं श्वसुर मंदिरं हिमालये हरः शेते, हरि: शेते पयोनिधौ।।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

यस्स, मलाही हाच माहिती होता.

बॅटमॅन
Mon, 03/23/2015 - 12:34 नवीन
यस्स, मलाही हाच माहिती होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा