✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

एस. एस. सी., सी. बी. एस. ई, आय. सी. एस. ई.

व
वारा यांनी
Mon, 01/12/2015 - 12:43  ·  लेख
लेख
पिल्लु ला शाळेत अ‍ॅड्मिशन घेतोय. पण सध्या असलेल्या बर्याच ऑप्शन मधे कन्फ्युज झालोय. १) एस. एस. सी - ट्रेडीशनल अभ्यासक्रम, स्वतः शिकल्यामुळे पुर्ण माहीती आहे. फायदे - ट्युशन आहेत , पुस्तके महीतीतील, गाईड मिळतात, प्रश्नसंच मिळतात, मराठी मिडीयम फी कमी. तोटे - स्पर्धा परीक्षा साठी पुरेसा अभ्यासक्रम नाही, महाराष्ट्राबाहेर अभ्यासक्रम नाही, ईंग्लीश मिडीयम फी जास्त. अ‍ॅड्मीशन प्रोसेस लॉटरी पद्धतीने , कमी जागा विद्यार्थी जास्त. २) सी. बी. एस. ई - दिल्ली बोर्ड , माहीतीतील जवळपास कोणी नाही. फायदे - स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम , भारतभर सर्व मोठ्या शहरात शाळा. तोटे - टुशन मिळत नाहीत, फी जास्त, पुर्ण हिंदी व ईंग्रजी अभ्यासक्रम मराठी विषय नाही, ऑब्जेक्टीव्ह पेपर असतात(एकीव माहीती). ३) आय. सी. एस. ई. - दिल्ली बेस्ड नॉन ग्व्हर्न्मेंट संस्था, पण ईंटर्नॅशनल रेक्ग्नेशन्. शिकवायची पद्धत वेगळी. माहीतीतील जवळपास कोणी नाही. फायदे - स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम, ईंग्लीश विषय(समजणे) चांगला केला जातो. फी वरील दोहोंच्या मधे. तोटे - नॉन ग्व्हर्न्मेंट संस्था त्यामुळे भविश्यातील नुकसान माहीत नाही. आजकाल बरेच लोक (६० ते ८० टक्के %) सि. बी. एस. ई. कडे पळतायत, कारण माहीत नाही. क्रुपया तज्ञांनी मार्गदर्शन करावे. धन्यवाद ईन अ‍ॅडव्हान्स. अवांतर : अभ्यासक्रम तपासतोय पण बरच वेळखाउ काम आहे. सि.बी. एस. ई. ला ९वी मधेच ११वीच गणीत दिसतय.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
शिक्षण
लेखनप्रकार (Writing Type)
सल्ला
माहिती
चौकशी
प्रश्नोत्तरे
मदत

प्रतिक्रिया द्या
41468 वाचन

💬 प्रतिसाद (120)

प्रतिक्रिया

हो ह्या बाबतीत सहमत. सी.बी.एस

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 01/13/2015 - 21:38 नवीन
हो ह्या बाबतीत सहमत. सी.बी.एस.सी. शाळांच्या फिया काहीच्या काही असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैदेही बेलवलकर

नाही हो.माझ्या मुलाची cbse ची

अजया
Tue, 01/13/2015 - 22:30 नवीन
नाही हो.माझ्या मुलाची cbse ची नामवंत शाळा असूनही त्याची दहाविची वार्षिक फी ट्रान्सपोर्टसह तीस हजार पण नाही.दिड हजाराची पुस्तकं.ती शाळेतच मिळतात.बाहेर नाही. मोठ्या शहरांत ही लूटमार चालत असावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

हल्ली त्या इंटरनॅशनल शाळांनी

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 01/13/2015 - 22:43 नवीन
हल्ली त्या इंटरनॅशनल शाळांनी धुमाकुळ घातलाय ना. त्यामधे आहेत एवढ्या फिया. भाचीच्या अ‍ॅडमिशनसाठी सहज हा इंटरनॅशल प्रकार काय आहे हे पहायला गेलेलो. कपाळावर (माझ्याचं) हात मारुन घेतला. कोप्रापासुन नमस्कार केला आणि घरी आलो. ए.सी. क्लासरुम कशाला पाहिजे पिंपरी-चिंचवडमधे? मुंबई वगैरे दमट ठिकाणी ठिक आहे. म्हणे आम्ही इंटरनॅशनल पद्धतीनी मॅनर्स आणि एटीकेट्स वगैरे शिकवतो म्हणे. शाळेचे गुर्जी-गुर्जीणी कधी इंटरनॅशनल सोडा कधी महाराष्ट्राबाहेर गेले असतील का नाही ही शंका. त्या गुर्जीणीला गेल्या गेल्या गुडमॉर्निंग घातला तर साधं हसली सुद्धा नाही, परतफेड सोडा. जाताना शिस्तीत मराठीत धन्यवाद म्हणुन बाहेर आलो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

सॉलिड धंदा आहे

आजानुकर्ण
Tue, 01/13/2015 - 22:21 नवीन
एका मुलाची फी १ लाख ४० हजार? वर्गात ५० मुले पकडली तर फक्त एका वर्गाचे उत्पन्न ७० लाख. मैदानेही नसलेल्या या शाळा असं नक्की काय शिकवतात. बहुतेक शिक्षक तर शिक्षण सेवक व तत्सम प्रकल्पाखाली तासिका बेसिसवर पाचदहा हजार रुपड्यांवर नोकऱ्या करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैदेही बेलवलकर

मला वाटतं फी चा आणि CBSE

सस्नेह
Tue, 01/13/2015 - 22:47 नवीन
मला वाटतं फी चा आणि CBSE pattern चा काही संबंध नसावा. एसेस्सीच्या काही शाळांच्या फीज आणि डोनेशन्स लाखावर असलेल्या माहिती आहेत. झी स्कूल सीरिजच्या शाळा देशभरात वाजवी फीमधे चांगले शिक्षण देताहेत. उद्या लिंक शोधून देते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

ही ती link

सस्नेह
Wed, 01/14/2015 - 11:10 नवीन
http://www.mountlitera.com/center-locater/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

तुझे एक एक प्रतिसाद वाचुन

पिलीयन रायडर
Wed, 01/14/2015 - 11:35 नवीन
तुझे एक एक प्रतिसाद वाचुन अजुनच त्रास होतोय.. कारण एकतर चांगली CBSE शाळा जवळ नाही. आणि ज्या आह्ते त्या खरच भिकार आहेत ग.. तू म्हणतेस त्या पद्धतीने अजिबात काहि होत नसणार तिथे.. स्टाफच तेवढा "महान" आहे... आता कसं व्हावं आमचं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

अगं पुण्यात बाणेरला एक शाळा

सस्नेह
Wed, 01/14/2015 - 11:40 नवीन
अगं पुण्यात बाणेरला एक शाळा आहे असं ऐकलय. नक्की माहिती घेऊन व्यनि करते तुला दोन दिवसात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

+१

असंका
Wed, 01/14/2015 - 11:59 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

मी स.एस.सी. बोर्डातुन शिक्लेय

पदम
Tue, 01/13/2015 - 12:18 नवीन
मी स्वतःसुद्धा एस.एस.सी. बोर्डातुन (शुद्ध मराठी मिडियम) मधुन शिकलोय. आणी ते हि महानगर पालिकेतुन सातवीपर्यन्त त्यानन्तर खाजगि शालेतुन.
  • Log in or register to post comments

http://www.misalpav.com

टवाळ कार्टा
Tue, 01/13/2015 - 12:47 नवीन
http://www.misalpav.com/comment/649817#comment-649817 या प्रतिसादावरुन तर तुम्ही अनाहिता क्याटेगरी वाटलात :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पदम

आवरा..

काळा पहाड
Tue, 01/13/2015 - 12:51 नवीन
आवरा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

मलाहि हेच वाटलं होतं.. की

पिलीयन रायडर
Tue, 01/13/2015 - 12:55 नवीन
मलाहि हेच वाटलं होतं.. की तुम्हाला अनाहितामध्ये यायचय.. तुम्ही तसा प्रतिसादही कुठे तरी दिला होतात...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

हा प्रतिसाद कोणासाठी??

टवाळ कार्टा
Tue, 01/13/2015 - 13:09 नवीन
हा प्रतिसाद कोणासाठी??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

तुमच्यासाठी नाही.. काळजी

पिलीयन रायडर
Tue, 01/13/2015 - 13:13 नवीन
तुमच्यासाठी नाही.. काळजी नसावी...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

बघितले...उग्गाच मला

टवाळ कार्टा
Tue, 01/13/2015 - 13:15 नवीन
:) बघितले...उग्गाच मला अनाहितांच्या विरोधातला बोलतात काही दू...दू...दू मिपाकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

तुम्ही?

पिलीयन रायडर
Tue, 01/13/2015 - 13:17 नवीन
तुम्ही? अनाहिताच्या विरोधात? अनाहिताच्या? विरोधात? छे... शक्यच नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

मेल्या नको तिथं लक्ष तुझं.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 01/13/2015 - 18:55 नवीन
=)) मेल्या नको तिथं लक्ष तुझं. बायकांवरचा तिसरा भाग टाक लौकर!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

धीर धर...तस्ले फोटो नाही

टवाळ कार्टा
Tue, 01/13/2015 - 20:06 नवीन
धीर धर...तस्ले फोटो नाही टाकणार आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

मी स्वतःसुद्धा एस.एस.एल.सी.

यसवायजी
Tue, 01/13/2015 - 22:33 नवीन
मी स्वतःसुद्धा एस.एस.एल.सी. बोर्डातुन (शुद्ध मराठी+कन्नड मिडियम) मधुन शिकलोय. आणी तेही फुक्कट सातवीपर्यन्त त्यानन्तर १४० रू.वार्षीक फी भरुन खाजगि शालेतुन. (चला.. त्या निमित्ताने मी SSLC पास आहे हे सांगून घेतो.) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पदम

मग सीबीएसई चा अभ्यासक्रम

काळा पहाड
Tue, 01/13/2015 - 12:48 नवीन
मग सीबीएसई चा अभ्यासक्रम एसएससी का स्वीकारत नाही? जर फायदा होत असेल तर?
  • Log in or register to post comments

लोल

टवाळ कार्टा
Tue, 01/13/2015 - 12:53 नवीन
लोल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

अगदी भाबडा विचार...

पिलीयन रायडर
Tue, 01/13/2015 - 12:54 नवीन
अगदी भाबडा विचार... CBSE अर्थात स्टेट बोर्डापेक्षा चांगलं आहे.. पण आता नाही आमच्या घराजवळ ती शाळा... अशा केस मध्ये आपण घरी CBSE ची पुस्तकं आणुन मुलांना घरी समजावु शकतो ना.. शाळा जरी घोकंपट्टी करुन घेत असली तरी तीच गोष्ट कळेल अशा पद्धतीने, प्रयोगांमधुन, उदाहरणांमधुन आपण मुलांना सांगु शकतोच.. अजुन एक.. होमी भाभा सारख्या परीक्षांना बसल्यामुळे तसाही मुलं गणित आणि विज्ञानाचा खोलात जाऊन अभ्यास करतात ना? मग स्टेट बोर्डाच्या मुलांना तोही एक पर्याय आहे...
  • Log in or register to post comments

सीबीएसई व एसएससी च्या ८ वी, ९

श्रीगुरुजी
Tue, 01/13/2015 - 12:58 नवीन
सीबीएसई व एसएससी च्या ८ वी, ९ वी व १० वी च्या गणित व शास्त्राच्या पुस्तकांची तुलना करा व स्वतःच ठरवा कोणता अभ्यासक्रम जास अवघड व आव्हानात्मक आहे ते. बादवे, सीबीएसई च्या अभ्यासक्रमात हिंदी व इतिहास-भूगोल हे विषय भयंकर अवघड आहेत. हिंदीतले बरेचसे शब्द कळतच नाहीत. संदर्भाने अर्थ लावावा लागतो.
  • Log in or register to post comments

भयंकर अवघड असं काहीही नाही.मी

अजया
Tue, 01/13/2015 - 14:21 नवीन
भयंकर अवघड असं काहीही नाही.मी स्वतः मुलाचा अभ्यास घेते त्यावरुन सांगू शकते.अशी दोन सायन्सच्या पुस्तकांची तुलना करुन ठरवणे चुकीचे आहे.सुरुवातीपासुन एक अभ्यासक्रम असला की मुलांना बरोबर लिंक लागते.अापण अभ्यास घेत असतानाही सलग वाचत गेले की व्यवस्थित कळते.ही मुलं सुरुवातीपासुन हिंदी शिकत असतात.हिंदी हा अवघड विषय मुलाना वाटत नाही.एकतर फक्त पुस्तकावर आधारित पेपर नसतात.त्यात तेवढ्याच मार्काचा भाग व्याकरण, वाचन,उतारे असं सर्व असतं.शाळांमध्ये आठवीपर्यंत झालेले व्याकरण नंतर परत असते.त्यामुळे अवघड जात नाही. मला स्वतःला त्यांची इतिहास भूगोल पाॅलिटिक्स ही पुस्तकं तसंच फिजिक्स आणि बायोलाॅजीचीही अावडतात वाचायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

धन्यवाद....

वारा
Tue, 01/13/2015 - 13:45 नवीन
सर्व सदस्यांचे मनापासुन धन्यवाद. खाली CBSE च्या अभ्यासक्रमाची लिंक आहे. http://www.cbseguess.com/syllabus/2015/
  • Log in or register to post comments

अहो धन्यवाद काय? काय ठरवलंत?

असंका
Wed, 01/14/2015 - 10:22 नवीन
अहो धन्यवाद काय? काय ठरवलंत? काय विचार केलायत? काय सांगाल की नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वारा

२ जागी फॉर्म भरलेत.

वारा
Wed, 01/14/2015 - 12:19 नवीन
२ शाळांमधे फॉर्म भरलेत. पहीली एस एस सी वाली आहे. पण ८० सिट आणि बरेच फॉर्म आहेत. लॉटरी लागली तर लागली. दुसरी सी. बी. एस. सी. अ‍ॅडमीशन मिळेल अस वाटतय. सी. बी. एस. सी.वाल्या बर्याच शाळांचे फॉर्म भरायच्या तारखा संपल्यात. एस. एस. सी. अजुन काही शाळा चालुच झाल्या नाहीत. एका शाळेत ४० % रिसर्व ४०% भाउबंध आणि राहीलेल्या सिट ईतर लोकांना. म्हणजे सरळ आहे, अ‍ॅड्मिशन नो गॅरंटी. परत रांगेत उभे रहा रात्री पासुन. आय सी एस सी वाले म्हणतात कधीही या अ‍ॅड्मिशन देतो. पण शाळा प्रपोस्ड आय सी एस सी. बाकी ज्या शाळेत अ‍ॅड्मिशन मिळतय ती या वर्शा पासुन सी. बी. एस. सी. झालीय, म्हणजे आधीच्या बॅच एस. एस. सी. झाल्यात. असो प्रोसेस चालु आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

शुभेच्छा !

सस्नेह
Wed, 01/14/2015 - 12:21 नवीन
शुभेच्छा ! *smile*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वारा

शुभेच्छा!! पटकन निर्णय घेतलात

असंका
Wed, 01/14/2015 - 12:47 नवीन
शुभेच्छा!! पटकन निर्णय घेतलात हे बेष्ट!! (... पण शेवटी काय? एस एस सी चांगलं की सी बी एस ई? की शाळा चांगली असणं जास्त महत्त्वाचं? )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वारा

डिट्टो!!!!! अगदी हेच झालं आहे

पिलीयन रायडर
Wed, 01/14/2015 - 13:38 नवीन
डिट्टो!!!!! अगदी हेच झालं आहे.. आम्ही कुठेही फॉर्म भरलेला नाही. बहुदा SSC साठीच भरु. कारण जुन्या शाळांमध्ये शिक्षक चांगले असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वारा

चुकिचि माफि अस्सावी

पदम
Tue, 01/13/2015 - 14:36 नवीन
मी स्वतःसुद्धा एस.एस.सी. बोर्डातुन (शुद्ध मराठी मिडियम) मधुन शिकलेय. आणी ते हि महानगर पालिकेतुन सातवीपर्यन्त त्यानन्तर खाजगि शालेतुन. शाळा मुलुन्डची मराठि विद्यालय.
  • Log in or register to post comments

५वी नंतर..

चिगो
Tue, 01/13/2015 - 15:31 नवीन
५वी नंतर नवोदयच्या परीक्षेला बसवा.. क्लियर झाली तर बारावीपर्यंत पोर सी.बी.एस.ई.त शिकेल. ते पण फुकट.. हाकानाका.. फक्त पोरापासून सात वर्षं दुर रहायला लागेल. दर आठवड्याअखेर भेटू शकता म्हणा.. (नवोदयचा माजी विद्यार्थी) चिगो
  • Log in or register to post comments

चांगली चर्चा चालू आहे.

शिद
Tue, 01/13/2015 - 20:30 नवीन
चांगली चर्चा चालू आहे. सगळ्यांच्या अनुभवांवरून चांगलं मार्गदर्शन मिळतंय. आम्हाला पण लवकरच ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे.
  • Log in or register to post comments

मुलीला शाळेत घालताना शाळा

मितान
Tue, 01/13/2015 - 22:21 नवीन
मुलीला शाळेत घालताना शाळा घराजवळ असणे, मैदान व इतर भौतिक सुविधा चांगल्या असाव्यात, अभ्यासेतर गोष्टींना प्रोत्साहन देणारे वातावरण असावे या किमान अटी होत्या. प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून याचा आग्रह होता. सुदैवाने घरापासून १ कि मी अंतरावर अशीच शाळा आहे. त्या शाळेशी मी गेली १२ वर्षे जोडलेली असल्याने अंतर्गत व्यवस्थापन व शिक्षक माहितीतले आहेत. शाळेत झाडाला निळा जांभळा रंग दिलेला, कधीतरी स्वतःच स्वतःचा गृहपाठ ठरवून करण्याचा इथपासून अनेक नवे प्रयोग व मुलांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले जाते.५ वीपासून सेमी इंग्लिश आहे. मुक्तांगण विज्ञानशोधिका, भास्कराचार्य साठी गणित तयारी, समाज अभ्यासासाठी ७ वीपासून पुढे अभ्याससहली व शिबिरे, पोहणे,जिम्नास्टिक्,अ‍ॅथलेटिक्स, खेळ लायब्रेरी, गायनवादननृत्यचित्र इ स्वतंत्र शिकण्याची सोय, परदेशी भाषा व स्पोकन इंग्लिश लहान वयापासून शिकण्याची सोय हे सगळं असणारी शाळा कोणत्या बोर्डाची हा सवालच नव्हता. स्टेट बोर्ड मराठी माध्यमात मुलगी आणि आम्ही दोघे समाधानी आहोत. दुसरी इयत्तेच्या मानाने प्रगती खूप चांगली आहे. नवे शिकायला आवडते. शाळा खूप आवडते. राहिला इंग्रजीचा मुद्दा. इंग्रजी भाषा म्हणून आवडत असल्याने आम्ही तिला इंग्रजीतूनही गोष्टी वाचून दाखवतो. कार्टून्स ती हिंदी न बघता इंग्रजीतून बघते. अनेक शब्द विचारते. हे सगळं तिला समजतं आणि ती उपयोगातही आणते. हा आत्मविश्वास येण्यात शाळेच्या वातावरणाचा आणि शिक्षकांचा नक्कीच मोठा सहभाग आहे. हे सगळं करताना तिच्या शिक्षणात आमचा सक्रीय सहभाग आम्ही गृहित धरलाय आणि प्रयत्नपूर्वक अभ्यासपूर्वक चार गोष्टी नियमीत करत आहोत. फायदे - शाळा ७ ते १२ असल्याने बाकीचा दिवस हातात आहे. शाळा जवळ आहे. कधीमधी चालत जातो. पुढे तिची ती सायकलवर जाऊ शकेल. घरातले आणि शाळेतले सांस्कृतिक सामाजिक वातावरण फार वेगवेगळे नाही. समविचारी पालक भेटल्यामुळे छान पिअर ग्रुप तयार झालाय. त्यामुळे अभ्यासेतर गोष्टी मिळून करायला मजा येते. मुलांना या वयात शिकायला आवडलं पाहिजे.ती भूक वाढली पाहिजे. स्पर्धा आवाक्यातली वाटली पाहिजे. हे सगळं होतंय. तोटे - शालाबाह्य गटात आम्ही एकटेच एसेसी मराठी वाले असल्याने ही काय बोलते ते तिच्या बरोबरीच्या मुलांना कळत नाही. हिला मात्र आंग्लाळलेलं हिंदाळलेलं मराठी छान समजतं. मग ही त्या भाषेत बोलते. हे पिअर प्रेशर. स्टेट बोर्डाच्या व सी बी एस सी च्या सुट्या वेगवेगळ्या असल्याने इतरांसोबत सुट्टी प्लान करता येत नाही. बराच विस्कळीत झालाय प्रतिसाद. पण हे शेअर करावं वाटलं. एक सल्ला - तुम्हाला आणि तुमच्या मुलाला काय झेपेल आवडेल पटेल तेच करा. ज्या शाळेत मूल किमान १२ वर्ष जाणार आहे ते त्याला बॅटलफील्ड न वाटता कम्फर्ट झोन वाटला पाहिजे. ही गोष्ट आपण पालकांनी पिअर प्रेशर घेऊन करण्याची नाही. कोणतेही बोर्ड असले तरी मुलाच्या विश्वात तुमचा किती प्रभाव आहे, सहभाग आहे यावर मुलांचे व्यक्तिमत्व क्से असेल हे ठरणार आहे. अ‍ॅकॅडमीक हा त्याचा केवळ एक भाग झाला. त्याला संपूर्ण समजण्याची चूक करू नये.
  • Log in or register to post comments

मस्त प्रतिसाद....

मुक्त विहारि
Tue, 01/13/2015 - 23:26 नवीन
"एक सल्ला - तुम्हाला आणि तुमच्या मुलाला काय झेपेल आवडेल पटेल तेच करा. ज्या शाळेत मूल किमान १२ वर्ष जाणार आहे ते त्याला बॅटलफील्ड न वाटता कम्फर्ट झोन वाटला पाहिजे. ही गोष्ट आपण पालकांनी पिअर प्रेशर घेऊन करण्याची नाही." "कोणतेही बोर्ड असले तरी मुलाच्या विश्वात तुमचा किती प्रभाव आहे, सहभाग आहे यावर मुलांचे व्यक्तिमत्व क्से असेल हे ठरणार आहे. अ‍ॅकॅडमीक हा त्याचा केवळ एक भाग झाला. त्याला संपूर्ण समजण्याची चूक करू नये." १००% सहमत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान

१०००% सहमत !!

खटपट्या
Tue, 01/13/2015 - 23:46 नवीन
१०००% सहमत !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

फारसं सहमत नाहीये. १० वी

काळा पहाड
Wed, 01/14/2015 - 01:36 नवीन
फारसं सहमत नाहीये. १० वी पर्यंत सगळी टर्मिनॉलॉजी ही मराठीतून असेल आणि ११ पासून इंग्लिश मधून. अर्थात सेमी इंग्लिश हा काय प्रकार आहे ते माहीत नाही. पण जर गणित/सायन्स मराठी मधून शिकवणार असतील तर पुढे प्रॉब्लेम होवू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान

सेमी ईंग्लीश म्हणजे ५वी किंवा

खटपट्या
Wed, 01/14/2015 - 03:16 नवीन
सेमी ईंग्लीश म्हणजे ५वी किंवा ८वी पासुन गणित आणि विज्ञान हे विषय ईंग्रजीमधून शिकवले जातात. काही शाळात ५वी पासून तर काही शाळात ८वी पासून असे करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

असं असलं तरी उदाहरणार्थ

काळा पहाड
Wed, 01/14/2015 - 10:33 नवीन
असं असलं तरी उदाहरणार्थ युपीएससी ला जाणार्‍या विद्यार्थ्यांना बर्‍याच संज्ञा नव्याने शिकाव्या लागणार. त्यामुळे एकूणच हा प्रकार मर्यादित प्रमाणातच यशस्वी होणार. असे प्रयोग करण्यापेक्षा शिक्षणाचं प्रमाणीकरण करणं इतकं का अवघड आहे हे कुणी सांगेल? देशभर एकच अभ्यासक्रम आणि एकच गुणवत्ता प्रमाण हे ध्येय असायला काय हरकत आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

बर्‍याच संज्ञा नव्याने

असंका
Wed, 01/14/2015 - 10:40 नवीन
बर्‍याच संज्ञा नव्याने शिकाव्या लागणार
शब्दात थोडी गफलत होतीये असं वाटतंय. आपल्याला "संज्ञा" नसून "शब्द" म्हणायचे असावे. माध्यम बदलले म्हणून संज्ञा बदलली असे होत नसावे. आणि नवनवीन शब्द आपण सगळेच नेहेमीच शिकत असतो. मराठी माध्यमातून इंग्रजी माध्यमात जाणार्‍या मुलांना त्याची थोडी जास्त लवकर सवय करून घ्यावी लागेल एवढेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

सहमत. मला स्वतःला सुरुवातीचं

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 01/14/2015 - 09:34 नवीन
सहमत. मला स्वतःला सुरुवातीचं आख्खं वर्ष (डिप्लोमाला असताना) बराचं त्रास झाला होता. न्युमरेटर (अंश) आणि डिनॉमिनेटर (छेद) ह्याच्यात मी किती घोळ घातलाय म्हणुन सांगु? =)) त्रिकोणमिती मधल्या संकल्पनांनी तर डोस्क्याचा भुगा केला होता. आता समभुज त्रिकोण, स्मद्विभुज त्रिकोण, लंबगोल, दंडगोल, त्रिज्ज्या, व्यास वगैरे शब्द वापरायला पण जड जातयं. शिवाय फक्त आमच्या शाळेतल्या मुलांचं नशिब चांगलं म्हणुन आमच्या विज्ञानाच्या बाई खुप छान शिकवायच्या. अभ्यासक्रमात शिकवणं बंधनकारक नसतानासुद्धा पुढे संकल्पनांचा उपयोग कुठे होतोय हे सांगायच्या. बाकी सगळ्या विषयांचा आनंदी-आनंद होता. ना.शा.चा त्या बाईंनी जेवढा नाश केला तेवढा आजच्या राजकारण्यांनीही नै केलेला. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

डिप्लोमाला पहिला महिना लै

यसवायजी
Wed, 01/14/2015 - 13:06 नवीन
डिप्लोमाला पहिला महिना लै त्रास झाला मला. 'सम ऑफ दि नंबर्स' म्हणजे मला वाटायचं की या सगळ्या आकड्यातील काही आकडे घेतलेत कॅलक्युलेशनसाठी. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

+११११११११११११११११११११११११११११

टवाळ कार्टा
Wed, 01/14/2015 - 13:13 नवीन
+११११११११११११११११११११११११११११११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

+१

कपिलमुनी
Wed, 01/21/2015 - 17:09 नवीन
डिप्लोमाला पहिला महिना लै त्रास झाला !
+११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

पिअर प्रेशर चा मुद्दा अत्यंत

असंका
Wed, 01/14/2015 - 10:34 नवीन
पिअर प्रेशर चा मुद्दा अत्यंत योग्य आहे. माझ्या माहितीतील कुणाचीही मुलं मराठी माध्यमाच्या शाळेत जात नाहीत. आणि कुठेही गेलं तरी चित्र बदलत नाहिये. त्यामुळेच आता मराठी शाळेत आपल्या मुलांना आपल्याला मिळाली तशी कंपनी मिळणार नाही, ही भावना जास्त त्रासदायक होतीये... बाकी प्रतिसाद विस्कळीत वाटला नाही....आश्वासक वाटला. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान

सर्व प्रतिसाद वाचले, चांगली

गणेशा
Wed, 01/14/2015 - 17:30 नवीन
सर्व प्रतिसाद वाचले, चांगली माहिती मिळाली, पहिली साठी बहिनीच्या बाळासाठी शाळा फिरतोय पण बर्‍याच गोष्टींचा अडथळा येतोय. फि चे तर सांगु नका .. मला एक कळत नाहिये बरेच जण आपला पाल्य कुठल्या चांगल्या शाळेत जातोय ते म्हणतायेत, पण त्यांनी शाळेचे नाव का सांगितले नाहिये, निदान ज्यांना पुढे अ‍ॅडमिशन घ्यावयाची आहे त्यांना त्याचा फायदा नक्की झाला असता. ---- आता मुळ मुद्दा .. माझ्या मते, ज्या शाळेत स्पोर्ट ला महत्व दिले जाते त्या शाळेत मला माझ्या मुलीला घालायचे आहे. अभ्यासक्रमामुळे जर जास्त तोटे होत असते तर आज एस.एस.सी बोर्ड वाले येथे टाईप करत बसले असते का ? एस.एस.बोर्ड वर सोप्पा म्हणुन खुप धब्बा मारला आहे, मला एक कळत नाही कशाला हवाय अवघड अभ्यास ? सोप्पा अभ्यास करुन बाजुने चित्रकला/संगित/खेळ/आणि इतर गोष्टी शिकण्यासाठी जास्त वेळ देता येत असेन तर ? सी.बी.एस.सी वाईट आहे म्हणत नाही, पण फी परवडते आहे काय ? कमीत कमी ५० हजार. आणि जर येथेच व्यक्तीमत्व घडन होत असेल तर साध्या गरीब लोकांचीमुले व्यक्तीमत्वाविनाच जगणार आहेत काय ? दूसरी गोष्ट .. स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम वगैरे काही नसते.. मग तसे असेन तर लॉजिक जास्त प्रगत होते ते मातृभाषेतील शिक्षणामुळे, मग आपोआप सगळ्या गोष्टी येतात. तरीही एस.एस.सी बोर्ड आणि ईग्लिश मेडीयम पण चांगळे हवे असेन तर कॉन्व्हेंट शाळा चांगल्या असतात असे वाटते. नुकतेच पिंपरीचिंचवड येथील मार एव्हान्युअस आणि निर्मल बेथनी शाळेला भेट दिली शाळा आवडल्या फी १०,००० च्या आत ( १० वी ला पण ), पण नर्सरी पासुन अ‍ॅडमिशन घ्यावे लागते येथे. --- मला तरी मराठी मेडियम शाळाअ आवडते, पण आमच्या घरच्या सगळ्यांचा आग्रह इंग्लिश मेडियम आहे, तसे असेन तर वरील कॉन्व्हेंट मला योग्य वाटते.. चित्रकला/फोटोग्राफी/संगित/खेळ यापैकी मनाला तजेला देणार्‍या गोष्टी जास्त महत्वाच्या आहेत असे मला वाटते. शिक्षण कुठले ही वाईट नसते.. पद्धत वेगळॅए असली तरी आपण कधी ना कधी शिखरावर पोहचतोच असे वाटते. --- मितान तुझ्या मुलीची शाळा कोणती आहे ग ?
  • Log in or register to post comments

सोपा अभ्यासक्रम की अवघड असं

पिलीयन रायडर
Fri, 01/16/2015 - 09:22 नवीन
सोपा अभ्यासक्रम की अवघड असं नाही हो.. शिकणे आणि शिकवण्याची पद्धत.. आपण फार "घोका आणि ओका" कॅटेगरीमध्ये येतो.. कारण परीक्षापद्धतच तशी आहे.. शिवाय "अ‍ॅप्लिकेशन" जमत नाही ते वेगळंच.. बाकी CBSE मध्येही इतर विषयांना प्राधान्य दिलं जात असणारे.. कालच ऑफिसमध्ये ही चर्चा झाली.. तर आमच्यातला सगळ्यात पॅशनेटली काम करणारा, विषयाला समजुन विचार करणारा, कन्सेप्ट क्लिअर असणारा मनुष्य चक्क ICSE चा निघाला. महाराष्ट्रात कदाचित अजुन ते एवढं प्रसिद्ध नाहीये पण उत्तरेकडे लोक अनेक वर्षांपासुन शिकत आहेत.. कुणाला ICSE बद्दल माहिती असेल तर सांगा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

तुम्ही म्हणता ते बरोबर आहे.

गणेशा
Fri, 01/16/2015 - 13:27 नवीन
तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पण मला माझा मुद्दा निट मांडता आला नाही. मला सीबीएससी/बोर्ड/आयसीएससी/मराठी-इंग्रजी/ या पेक्षा थोडे सोप्पे मुद्दे सांगायचे होते या संधर्भातुन. म्हणजे बघा . १. मराठी (एकमेव बोर्ड एस.एस.सी) ही मातृभाषा असल्याने मराठीतुन शिकताना आपण ती भाषा सहज आत्मसात करुन आपले लॉजिक चांगले डेवलप करु शकु , शिवाय लहान वयात .. नमन कमळ बघ .. अश्या सारखे साधे साध्ये वाक्य मुले वाचु शकतील. आणि जास्त वेळ पाठंतरा पेक्षा संकल्पना, आणि वेगळ्या गोष्टी वर पण देता येतील . इंग्रजीच्या विरोधात नाही, पण इंग्रजी लहान मुलांना शिकवताना त्याचे शब्द पाठच करावे लागतात, म्हणजे मराठीत बाराखडी आली की बेसिक वाचन जमते. म्हणजे जा म्हणायचे असल्यास ज ला काना जा. आणि काना मात्रा विरहित शब्द तर लगेच वाचता येतात. इंग्रजीत केजीच्या मुलांना जा ला गो म्हणतात आणो ABCD मधील g आणि o मिळुन गो होतो हे जीओ पाठच करावे लागते. २. मुळात आपले शिक्षण पाठंतर घोका आणि ओका अश्या स्वरुपातील आहे असे जे आपण म्हणता ते बरोबर आहे... या ही पलिकडे जावुन मी म्हण्तो, आपण आपल्या पाल्याला सतत कुठल्या ना कुठल्या रेस ला जोडुन देतो, हे मला चुक वाटते. नर्सरी पासुन घाल cbsc/icse ला. अभ्यासक्रमात कीती विषय , त्यांचा अवघडपणा आपण बघत नाही, मुले हुषार आहेत ते करतील हो ते, शिकवले ही जाईल चांगले पण त्यांना अभ्यास सोडुन वेळ हवा की नको. cbse मध्ये येव्हडे मार्क पाड , नंतर या परिक्षा दे.. नंतर हे कर आणि ते. समजा असे बघा. icse ला १३ विषय आहेत. वर्षात २ महिन्याची सुट्टी पकडली, तर ११ महिने शिल्लक राहतात, म्हणजे १ महिन्याला १ पुस्तका पेक्षा जास्त अभ्यास त्या मुला ला करावयचा आहे, हे मला तरी अति वाटते, भले ते किती ही उच्च शिक्षण आणि पद्धत देवुद्या. फक्त अभ्यासातुन व्यक्तीमत्व घडते ही आपली विचारसरणी चुकीची आहे. अभ्यासात पारंगत होण्यासाठी मग क्लास आले. शाळा आण क्लास यांनी थकुन गेलेले आपले बाळ बघुन पुन्हा आपण त्याला टीव्ही वर कार्टुन लावुन देणार .. जाउद्या थोडा विरंगुळा म्हणुन, फिझिकल अ‍ॅक्टीवीटी चे काय ? शाळेत १ तास त्याला दिलेला असल्याने सगळी जबाबदारी संपत नसते, उलट पुढील अनेक समश्या उभ्या राहतात. ३. समजा मी माझ्या बाळाला जवळचय स्टेट बोर्ड च्या शाळेत घातले, आणि त्याला क्लास ला न घालता, त्या वेळात इतर खेळ आणि गोष्टीत वेळ घालावला, तर ते मला जास्त योग्य वाटते. मला १० वी पर्यंत कीती मार्क आहेत, मी पहिला आलो होतो का मध्यम होतो हे आता कोणॅए विचारात नाही, ६० टक्के १० वी ला आणि ९० टक्के मिळालेला पुढे इंजिनिअरींग नंतर त्या बेस वर पुढे जातो. मान्य त्याची तयारी १० वी पर्यंत होत असेन तर असे म्हणने असते. पण त्याची खरेच गरज नाही असे माझे मत. रेस ला लावण्यापेक्षा व्यक्तीमत्व विकास महत्वाचा, मुले आपोआप मार्ग निवडतात. आणि icse कीती ही चआंगले असुद्या हो १ लाखात नर्सरी ला आणि केजी ला ते असे काय शिकवतात ? ४. फी, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे (माझ्यासाठी तरी) , मला एक कळत नाही, cbse/icse शाळा शहरात जास्त आहेत, मग गावाकडची मुले पुढे येणारच नाहीत का ? तर तसे नाही, आपण म्हणतो तसे शिकवण्याची पद्धत वर अवलंबुन आहे, आणि जर असे असेन तर सीबीएससी/बोर्ड/आयसीएससी/मराठी-इंग्रजी हे मुद्दे गौण ठरतात. आणि जर तसे नसेन तर माझ्या सारखे गावाकडे शिकलेली मुले पुढे या लोकांचय स्पर्धेत मागेच राहणार असेच मानुन चालावे लागणार. १ लाख फी ... ट्युशन्ची फी २५ हजार तरी असेन आणि बसेस आणि इतर खर्च २५ हजार. वर्षाला येव्हडा खर्च अनावश्यक वाटतो मला. ५. जर आपण एखादा हुशार माणुस icse\cbse आहे असे माणुन तो अभ्यासक्रम चांगला माणणार असु तर मग स्टेट बोर्ड मधले पण पण हुषार असतीलच. वयक्तीक उदा. देतो. मी आणि माझी बेस्ट फ्रेंड (दोघे ही मराठी कुटुंबातुन) बिसीएस ला एकत्र अभ्यास करायचो. ती cbse पुणे शरातुन आणि मी एसएससी मराठी गावातुन, दोघे ही टॉपर कॉलेजचे. पण गणित..प्रोग्रॅमिंग आणि एलेक्ट्रोनिक्स मी तीला शिकवायचो आणि थेरॉटीकल विषय ती मला कारण ती जरी हुशार होती ८० % पेक्षा जास्त मार्क होते तरी लॉजिकल विषय ती ला अवघड जायचे मग आपण असे म्हणु शकु का की cbse बोर्ड मध्ये लॉजिक डेवलप करत नाही. तर तसे नाहीये.. प्रत्येक माणसाच्या कुवती वेगळ्या आहेत, २-२ वर्षे कॉलेज ला फेल होणारे , प्रोग्रम्स पण पाठ करणारे आणि लॉजिक शुन्य असणारे पण आज युएस युके मध्ये मोठ्या पगारावर कामाला आहे. का ? कदाचीत स्ट्रगल करण्याची व्रुती असेल त्यांच्यात जास्त जी हुशार मुलात नैराष्य येण्यास कारणीभुत ठरणारी कारणे असतात तशी. बरेच वेगवेगळे उदआ. आहेत. ६. त्यामुळॅ कुठली पद्धत कशी.. कश्यात कुठल्या रेस मध्ये जाता येते .. काय केले तर पुढचे भविष्य बनते हे सगळे आपले विचार असतात, मुलांना संतुलित आयुष्य मिळाले पाहिजे.. अभ्यासा बरोबरच त्यांचे कलागुन .. त्यांचे छंद जोपासण्यासाठी वेळ मिळाला पाहिजे.. आलेल्या अपयशातुन ही पुढे जाण्याची जिद्द त्यांच्यात निर्मान झाली पाहिजे... खेळामुळे त्यांच्ये फिटनेस कडे ही लक्ष राहिले पाहिजे. अभ्यासक्रम मुळे पुढच्या येत्तेत मुलांना पाठवत असेन, पण त्यांच्या कक्षा रुंदवण्याचे कार्य हे संपुर्ण भवताल करत असते.. त्या सर्व गोष्टी>साठी वेळ देता आला पाहिजे. मग सीबीएससी/बोर्ड/आयसीएससी/मराठी-इंग्रजी काही ही असो .. ज्याला पुढे जाता येइल तो जाईनच.. पण शारीरीक्/माणसिक दडपण घेवुन अभ्यासात उत्तुंग राहण्यात पण काही अर्थ नाही, आणि फक्त शारीरीक माणसिक कनखर पण अभ्यासा..ज्ञान याकडे दुर्लक्ष पण योग्य नाही. खुप मोठा आणि विस्कळीत प्रतिसाद असु शकतो.. पुन्हा वर बघुन वाचला पण नाही .. क्षमस्व
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

१. मुद्दा पटला नाही.

पिलीयन रायडर
Mon, 01/19/2015 - 14:33 नवीन
१. मुद्दा पटला नाही. मातृभाषेत संकल्पना चांगल्या कळातात हे मान्य. पण जर सवयच इंग्रजीमधुन शिकायची केली तर ते ही फार अवघड नाही. जसं की मी सेमी इंग्लिशमुळे ८ वी पासुन गणित/ विज्ञान इंग्रजी मधुन शिकले. आता मला कुणी ते मराठीत सांग म्हणालं तर मला सांगता येणार नाही.. मला मराठीतले शब्द वापरताही येणार नाहीत. मुलांना भाषा शिकताना मराठी काय किंवा हिंदी / इंग्रजी काय, सगळंच नवीन.. ह्यात मराठीतला हलकासाच अ‍ॅडव्हान्टेज मिळेल कारण माझ्या मुलाला ती त्यातल्या त्यात जास्त येते. पण त्याला हिंदीसुद्धा बरीच चांगली येते. आणि आता शाळेत ऐकुन ऐकुन थोडिशीच का होईना पण इंग्रजी वाक्यांचीसुद्धा सवय होतेय. अजुन एक मुद्दा असा की ३री नंतर ICSE मध्ये ३री भाषा म्हणून तुम्ही मराठी / संस्कृत / फ्रेंच घेऊ शकता. मी फ्रेंच घेईन. कारण माझं मराठी उत्तम आहे, ३री भाषा म्ह्णुन शिकवल्या जाईल त्यापेक्षा माझ्या मुलाला घरी मी जास्त छान शिकवीन. आजपासुनच.. माझी आई M.A संस्कृत आहे. ती अर्थातच सर्वोत्तम शिक्षक असेल तिच्या नातवासाठी.. मग शाळेनी त्याला फ्रेंच शिकवु देत ना.. जे आपण घरी जास्त चांगल्या पद्धतीनी करुन घेउ शकतो ते आपणच करुन घ्यावं असं माझं मत आहे.. २. इथे तुमचा गैरसमज होतोय. एक तर CBSE / ICSE म्हणजे रेस नाही. ती शिकवण्ञाची जास्त चांगली पद्धत आहे. इथे मुलांना १०-१२ वेगवेगळे विषय नसतात. ते SSC प्रमाणेच असतात. पुस्तकं दोन असतात (Grammer I and II). फरक हा आहे की आपण एक पुस्तक, त्यातले धडॅ, त्या खालचे प्रश्न आणि त्यातुनच पडणारा पेपर असे शिकलो. इथे मात्र असा मामला नाही. तुम्हाला विषय कळला असेल तर तुम्ही पेपर सोडवु शकाल अशी पद्धत. प्रोजेक्टसमधुन शिकणे, एखादी कादंबरी अभ्यासक्रमात असणे, त्यावर वाचुन, समजुन २० मार्कांसाठी लिहु शकणे (जसे की माझ्या मित्राला "चाणक्यनीती" होती. आणि चाणक्याचे पात्र ह्यावर लिहायचे होते..) ही त्यांची शिकण्याची पद्धत आहे. जी मला जास्त योग्य वाटते. आजवर मी मराठी मध्ये सुद्धा कांदबरी वाचुन त्यावर प्रश्नोत्तरे लिहीली नव्हती.. (तुम्ही ही लिंक पहा.. http://www.cisce.org/icse_X_Syllabus.aspx) त्यांना खेळायलाही खुप वेळ दिला जातो. दर वर्षी एक खेळ शिकणे आवश्यक असते. शाळांमध्ये तशा सोयी आहेत. ३. मुळात क्लासला घालायची गरजच नाही.. जर शाळा आणि पालकांचा सहभाग असेल तर आणखीन क्लास कशाला लागतो? आणि % किंवा नोकरी ह्यावर मुलाला जोखायचे कशाला? त्याला जे तो शिकतोय ते समजलं की झालं.. मार्क्स आपोआप येतील, यश आपोआप मिळेल.. SSC मध्ये हे समजलं की नाही हे कळतच नाही.. आम्ही नाही का घोकुन घोकुन शेवटी पास झालोच.. कुठेरई नोकरीला लागलोच.. कसे तरी निभावतोय.. पण जे करतोय ते सगळं कळतय असं अजिबात नाही.. ४. इंग्रजी माध्यमांच्या SSC शाळांची फीस सध्या ३० हजार + आहे. मी जे ISCE शाळा बघत आहे तिची सुद्धा फीस ३० हजारच आहे.. १लाख फिला माझाही विरोध आहे. विनाअनुदानित शाळांना ३०-४० हजार फीस आकारावी लागत असावीच असा माझा कयास आहे. (जागा, शिक्षक इ खर्च धरुन..) ५. मान्य.. शेवटी अभ्यासक्रम ही काय एकमेव गोष्ट नाहीचे.. प्रत्येकाची कुवत, आवड-निवड, परिस्थ्ती इ अनेक गोष्टी महत्वाच्या आहेत. ६. अगदी अगदी.. सगळंच महत्वाचं आहे.. सद्यपरिस्थिती मध्ये मला ICSE योग्य वाटतय.. परवडत आहे.. आनी पालक म्हणुन मी माझ्या मुलाला मदत करु शकेन असं वाटतय.. ह्या उप्पर मार्कांपेक्षा माझा मुलगा विवेकी असावा हे महत्वाचे.. शेवटी शाळा म्हणजे उत्तम माणसे बनवण्याचे कारखाने नव्हेत. माणुस हा घरामधल्या संस्काराने जास्त घडतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा