✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कमिटी (शतशब्द्कथा )

ख
खेडूत यांनी
गुरुवार, 09/25/2014 - 19:23  ·  लेख
लेख
'कमिटी येनार' म्हटल्यावर सगळी संस्था कामाला लागली. बऱ्याच फाईली हालल्या. कमिटीचा दिवस सणासारखा सजला होता. मिटिंग हॉलमधे लंबगोल टेबल- त्यावर सफेद बेडशिटं टाकालीवती. पाटील सर फाईली ठीक करत होते. काजू बदामाच्या बाउल्समधून थोडे तोंडात टाकून लेव्हल बरोबर करत होते. इतक्यात ''कमिटी आली..'' असा गलका झाला. सदस्यांनी जागा घेतली. फाईली चाचपल्या. पाकीट ओक्के असल्याचं सराईतपणे हेरलं. चेरमनसायाबाकडं बघून कसनुसं हसले. चष्म्याच्या वरून बघत महाजनसाहेब म्हटले "यावेळी संस्थेने प्रगती चांगली केलीय. पण... तेव्हढा टीचिंग स्टाफ आणा जरा '' ''तुमचं मार्गदर्शन असल्यावर काय सर? फुडल्या खेपेला अजून सुधारणा करु !'' कॉलेजचा इनटेक दोनशेने वाढण्यावर शिक्कामोर्तब झालं. भौसाहेब खूष, कर्मचारीबी खूष. दिवाळीचा बोनस लगेचच डीक्लेर झाला !
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
अनुभव

प्रतिक्रिया द्या
4789 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

मस्तं !

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 09/25/2014 - 19:29 नवीन
मस्तं ! कमिटीच्या करामती म्हायत्येत ! काजू बदामाच्या बाउल्समधून थोडे तोंडात टाकून लेव्हल बरोबर करत होते. ह्ये आमिबी घरी पावणेलोकांची वाट पातांना न्हेमीच कर्तो :)
  • Log in or register to post comments

मी पयला .

जेपी
गुरुवार, 09/25/2014 - 19:33 नवीन
मी पयला . 99 शब्द मोजले चुभु द्याघ्या.
  • Log in or register to post comments

पाकीट संस्कृती!

आदूबाळ
गुरुवार, 09/25/2014 - 19:39 नवीन
पाकीट संस्कृती!
  • Log in or register to post comments

पाकीट ओक्के असल्याचं सराईतपणे

विवेकपटाईत
गुरुवार, 09/25/2014 - 19:52 नवीन
पाकीट ओक्के असल्याचं सराईतपणे हेरलं. फुडल्या खेपेला अजून सुधारणा करु ! जास्त आवडले.
  • Log in or register to post comments

आवडली.

एस
गुरुवार, 09/25/2014 - 20:25 नवीन
गेंड्याच्या कातडीच्या व्यवस्थेला असे चिमटे कधीकधी सॉल्लिड लागतात. :-)
  • Log in or register to post comments

कथा आवडली.

आतिवास
गुरुवार, 09/25/2014 - 21:55 नवीन
कथा आवडली. ब-याच 'कमिटी' आठवल्या!
  • Log in or register to post comments

हो अगदी अगदी....

सुहास झेले
Sat, 09/27/2014 - 18:32 नवीन
हो अगदी अगदी.... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

आवडली कथा.

किसन शिंदे
गुरुवार, 09/25/2014 - 21:58 नवीन
आवडली कथा.
  • Log in or register to post comments

मस्त. :)

कवितानागेश
गुरुवार, 09/25/2014 - 22:18 नवीन
मस्त. :)
  • Log in or register to post comments

क्या बात हैं

श्रीरंग_जोशी
Fri, 09/26/2014 - 02:09 नवीन
व्यंगचित्रकाराची नजर जाणवली :-) .
  • Log in or register to post comments

+१

अविनाश पांढरकर
Fri, 09/26/2014 - 09:24 नवीन
मस्त!!!!!
  • Log in or register to post comments

दिवाळीचा बोनस लगेचच डीक्लेर

विजुभाऊ
Fri, 09/26/2014 - 12:01 नवीन
दिवाळीचा बोनस लगेचच डीक्लेर झाला !
या वाक्या इतके स्वप्नवत वाक्य जगाच्या पाठीवर कुठेच नसेल.
  • Log in or register to post comments

मस्तच..

चिगो
Sat, 09/27/2014 - 04:54 नवीन
एकदम मस्त जमलीय..
  • Log in or register to post comments

मस्तच.आवडली कथा.

अजया
Sat, 09/27/2014 - 10:41 नवीन
मस्तच.आवडली कथा.
  • Log in or register to post comments

पण... तेव्हढा टीचिंग स्टाफ

स्पंदना
Sun, 09/28/2014 - 17:44 नवीन
पण... तेव्हढा टीचिंग स्टाफ आणा जरा
:))
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा