✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

दुस्री

आ
आतिवास यांनी
गुरुवार, 05/15/2014 - 02:00  ·  लेख
लेख
म्या पास. निम्मी, अंक्या, भान्याबी पास. गुर्जी म्हन्लं "आता दुस्रीत". म्या धावत घरी. वराडले, “म्या दुस्रीत ग्येली.” आयनं हसून श्येंगदानं दिलं. आज्जीनं गूळ दिला हातात. आण्णा पेन देनार हायेत. गावभर हिंडून दारात बसली. मंग राम्या, मुक्या, सुर्की दिसली. आगावू हायती दुस्रीची पोरंपोरी. कायबी कराया गेलं की "ए पयलीच्या पोरांनो, मागं व्हा" म्हनत्येत. त्येबी आमच्यावानी साळंला येत्येत; पाडं म्हन्त्येत; गुर्जींची कामं करत्येत; मारबी खात्येत. पन सोताला शाने समजत्येत जादा. म्या म्हन्ली, “लई शानपना नका दावू. म्याबी दुस्रीत हाये आजपासून!” राम्या जीब दावत बोल्ला, “आन्जी दुस्रीत, आमी तिस्रीत!” म्या तिस्रीत जाईल तवा हे चवथीत. म्हंजे आमी कितीबी आब्यास क्येला तरी हेच पुडं?

Book traversal links for दुस्री

  • ‹ मद्दान
  • Up
  • नाटेठोम ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
शिक्षण
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
अनुभव

प्रतिक्रिया द्या
25693 वाचन

💬 प्रतिसाद (62)

प्रतिक्रिया

आन्जी ब्याक!

संग्राम
गुरुवार, 05/15/2014 - 03:04 नवीन
आन्जी ब्याक! >>म्हंजे आमी कितीबी आब्यास क्येला तरी हेच पुडं? ..... निरागस प्रश्न :)
  • Log in or register to post comments

:D

आत्मशून्य
गुरुवार, 05/15/2014 - 03:17 नवीन
:)
  • Log in or register to post comments

आंन्जे ग कसं सांगायच तुला!

स्पंदना
गुरुवार, 05/15/2014 - 04:02 नवीन
:)) आंन्जे ग कसं सांगायच तुला!
  • Log in or register to post comments

एकदम मस्त! आंजे ग आंजे!

यशोधरा
गुरुवार, 05/15/2014 - 06:03 नवीन
एकदम मस्त! आंजे ग आंजे! *dance4*
  • Log in or register to post comments

आन्जी भारीच्चे!

रेवती
गुरुवार, 05/15/2014 - 06:31 नवीन
आन्जी भारीच्चे!
  • Log in or register to post comments

आवडली कथा.

जेपी
गुरुवार, 05/15/2014 - 07:34 नवीन
आवडली कथा.
  • Log in or register to post comments

खासंच

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 05/15/2014 - 07:49 नवीन
खासंच आहे कथा. खूप आवडली.
  • Log in or register to post comments

अतिवस सहेब, चोतिशीच स्तोरि

बालगंधर्व
गुरुवार, 05/15/2014 - 14:34 नवीन
अतिवस सहेब, चोतिशीच स्तोरि अहे. पण मणाला बिहिडली. मला माज बालपण आथवला. अजुन येउ दे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

कय स्तमिन अहे असे लिहिन्यच

टवाळ कार्टा
गुरुवार, 05/15/2014 - 15:43 नवीन
कय स्तमिन अहे असे लिहिन्यच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बालगंधर्व

त्मच म्हन्न क्ळ्ल न्हि. मरठित

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 05/15/2014 - 18:32 नवीन
त्मच म्हन्न क्ळ्ल न्हि. मरठित सन्गा. कोण म्हणतोय रे की, या बेशुद्ध कोलांट्या उड्या आता विनोदी न वाटता लक्ष वेधण्याचा करूण प्रयत्न वाटत आहेत म्हणून ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बालगंधर्व

ह्या गण्ढर्व्हाणा त्येन्च्यी

विजुभाऊ
Fri, 05/16/2014 - 01:44 नवीन
ह्या गण्ढर्व्हाणा त्येन्च्यी स्व्हाक्सरी त्यवडी सूध्द म्हराटीत ल्हिता येत्ये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बालगंधर्व

ति चोप्य पस्ते आहे

आदूबाळ
Fri, 05/16/2014 - 19:37 नवीन
ति चोप्य पस्ते आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

नाय, नाय. "त्य चुप्य प्येयस्त

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 05/16/2014 - 20:31 नवीन
नाय, नाय. "त्य चुप्य प्येयस्त अहे"*. तेम्च इन्गलिश सपेलिन्ग पन ब्यकार अस्नार्च. (बेशुद्ध टाईप करण्याचा त्रास करून घेऊन लोक काय म्हणून स्वतःची फजिती करून घेतात बॉ? ह्याला स्वपिडन टाईपचं सॅडिझम म्हणता येईल का?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

(बेशुद्ध टाईप करण्याचा त्रास

बॅटमॅन
Sun, 05/18/2014 - 14:20 नवीन
(बेशुद्ध टाईप करण्याचा त्रास करून घेऊन लोक काय म्हणून स्वतःची फजिती करून घेतात बॉ? ह्याला स्वपिडन टाईपचं सॅडिझम म्हणता येईल का?)
तुम्हांला मॅसोकिझम म्हणायचं असावं बहुधा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

नाय, नाय !

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 05/18/2014 - 16:01 नवीन
नाय, नाय ! ही निर्बुद्ध टायपिंग करताना "स्वपीडन" करून घेऊन नंतर "स्वतःचे हसे" आणि "दुसर्‍याचे पीडन" करण्यात आनंद समजणारी चोम्प्लिचतेद च्रोनिच "ट्रीप्पल व्हॅम्मी" केस आहे ;) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हा हा हा

बॅटमॅन
Sun, 05/18/2014 - 20:34 नवीन
हा हा हा =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

अर्रर्र

सस्नेह
गुरुवार, 05/15/2014 - 08:09 नवीन
या आंजीच्या व्यथाच वेगळ्या !
  • Log in or register to post comments

आंजी जिंदाबाद!

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 05/15/2014 - 08:45 नवीन
:D आंजी जिंदाबाद! :D
  • Log in or register to post comments

यकदम ब्येस्ट लिवलय बघा...

मदनबाण
गुरुवार, 05/15/2014 - 10:35 नवीन
यकदम ब्येस्ट लिवलय बघा... :)
  • Log in or register to post comments

आंजीच्या पराब्लेम्वर

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 05/15/2014 - 10:50 नवीन
आंजीच्या पराब्लेम्वर माज्याकडं येक आयड्या हाय ! आंजी लई डोस्केबाज हाय. दुस्री-तिस्रि येका वर्सात करून तिला फुडच्या वर्शि यकदम तिस्रीत टाका की वो, अतिवास मॅडम. मंग आंजीला राम्या-मुक्या-सुर्कीला ठेंगा दाकवता यील :)
  • Log in or register to post comments

आजून ये उपाय हाय. रम्या

विजुभाऊ
Fri, 05/16/2014 - 01:46 नवीन
आजून ये उपाय हाय. रम्या मुक्या सुर्कीला यका वर्सात दोन वर्स ठीवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

कुर्पया "यकदम तिस्रीत टाका"

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 05/16/2014 - 10:56 नवीन
कुर्पया "यकदम तिस्रीत टाका" आयवजी "यकदम चौतीत टाका" आसं वाचा. गलतिशे मिस्टेक व्हुवा भाय ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

जबराच..

चिगो
गुरुवार, 05/15/2014 - 10:54 नवीन
म्हंजे आमी कितीबी आब्यास क्येला तरी हेच पुडं?
आन्जे आन्जे.. अगं किती गं दुखः ते तुझं? आतिवास ताईंच्या लेखणीतून उतरलेली आणखी एक सुंदर निरागस आन्जीकथा..
  • Log in or register to post comments

सुरेख

चाणक्य
गुरुवार, 05/15/2014 - 11:08 नवीन
काय मस्त आहे ही पोरगी. आन्जी राॅक्स.
  • Log in or register to post comments

यालाच प्राक्तन म्हणतात.

धर्मराजमुटके
गुरुवार, 05/15/2014 - 11:11 नवीन
म्या तिस्रीत जाईल तवा हे चवथीत. म्हंजे आमी कितीबी आब्यास क्येला तरी हेच पुडं? त्या लहान मुलीचं सोडून द्या हो. पण यालाच प्राक्तन म्हणतात. मी पैलीतून दुस्त्रीत गेलो हयाचा आनंद न मानता तो तिस्त्रीत गेला म्हणून दु:खी होणार्‍यांची संख्या जगात कमी नाहीये.
  • Log in or register to post comments

आंजे, तुला पास झाल्याचं बक्षीस...

एस
गुरुवार, 05/15/2014 - 11:22 नवीन
म्या धावत घरी. वराडले, “म्या दुस्रीत ग्येली.” आयनं हसून श्येंगदानं दिलं. आज्जीनं गूळ दिला हातात. आण्णा पेन देनार हायेत.
आमच्याकडून आंजीला फूल... Image removed.
  • Log in or register to post comments

माताय !! ह्या डबल डिलाईटचं

सूड
गुरुवार, 05/15/2014 - 15:26 नवीन
माताय !! ह्या डबल डिलाईटचं रोप होतं घरी. फोटो पाह्यला नी आठवलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

मस्त!

पैसा
गुरुवार, 05/15/2014 - 11:31 नवीन
सकाळीच वाचलं. आजचा दिवस मस्त जाणार!
  • Log in or register to post comments

(No subject)

ऋषिकेश
गुरुवार, 05/15/2014 - 11:44 नवीन
:)
  • Log in or register to post comments

आंजी द ग्रेट

बॅटमॅन
गुरुवार, 05/15/2014 - 11:54 नवीन
आंजी द ग्रेट =))
  • Log in or register to post comments

आंजी फास झाली !! ब्येस झालं

अजया
गुरुवार, 05/15/2014 - 13:49 नवीन
आंजी फास झाली !! ब्येस झालं.ते फुडं गेल्याले नाफास झालं की तुझ्याच बरोबर गं !
  • Log in or register to post comments

हाहाहा.मस्तच. सुरुवातीला

मृत्युन्जय
गुरुवार, 05/15/2014 - 14:19 नवीन
हाहाहा.मस्तच. सुरुवातीला शतशब्दकथा एक फ्याड वाटले होते. पण सगळ्या कथा एक नंबर भारी आहेत. याचे एक पुस्तक आलेच पाहिजे.
  • Log in or register to post comments

हा हा हा .. सहीये .. साधा सरळ

तुमचा अभिषेक
गुरुवार, 05/15/2014 - 14:27 नवीन
हा हा हा .. सहीये .. साधा सरळ विचार, आंजीस्टाईलने धमाल आणली :)
  • Log in or register to post comments

मस्त...

इशा१२३
गुरुवार, 05/15/2014 - 14:43 नवीन
आंजी भारीच आहे...सुरेख..
  • Log in or register to post comments

एक्दम हल्क फुल्क... खुपच छाण

नित्य नुतन
गुरुवार, 05/15/2014 - 15:13 नवीन
एक्दम हल्क फुल्क... खुपच छाण ...
  • Log in or register to post comments

>>म्या तिस्रीत जाईल तवा हे

सूड
गुरुवार, 05/15/2014 - 15:24 नवीन
>>म्या तिस्रीत जाईल तवा हे चवथीत. म्हंजे आमी कितीबी आब्यास क्येला तरी हेच पुडं? हे मस्त !!
  • Log in or register to post comments

(No subject)

टवाळ कार्टा
गुरुवार, 05/15/2014 - 15:42 नवीन
=))
  • Log in or register to post comments

ऐला!

प्यारे१
गुरुवार, 05/15/2014 - 15:49 नवीन
ऐला! खासच. बाकी 'शरेत' सोत्ताशीच लाव म्हना आन्जीला.
  • Log in or register to post comments

झकास.

बबन ताम्बे
गुरुवार, 05/15/2014 - 16:10 नवीन
आवडली आंजीचा निरागसपणा. "त्येबी आमच्यावानी साळंला येत्येत; पाडं म्हन्त्येत; गुर्जींची कामं करत्येत; मारबी खात्येत.पन सोताला शाने समजत्येत जादा." आमच्यावानी कधी कधी साळंला बुट्टी पण मारते. :-)
  • Log in or register to post comments

त्येबी आमच्यावानी साळंला

हाडक्या
गुरुवार, 05/15/2014 - 16:26 नवीन
त्येबी आमच्यावानी साळंला येत्येत; पाडं म्हन्त्येत; गुर्जींची कामं करत्येत; मारबी खात्येत. पन सोताला शाने समजत्येत जादा. म्या म्हन्ली, “लई शानपना नका दावू. म्याबी दुस्रीत हाये आजपासून!” राम्या जीब दावत बोल्ला, “आन्जी दुस्रीत, आमी तिस्रीत!” म्या तिस्रीत जाईल तवा हे चवथीत. म्हंजे आमी कितीबी आब्यास क्येला तरी हेच पुडं?
हे बाकी शाश्वत सत्य बोलली बघा.. कितीही ठरवलं तरी तिस्रीतल्या लोकांकडे दुर्लक्ष करता येत नाही. आपण केलं तरी ते आपल्याकडे करतील असं सांगता येत नाही. थोडक्यात हा प्रश्न सहजासहजी सुटत नाही..
  • Log in or register to post comments

शी यार... मला पण हेच दु:ख

कवितानागेश
गुरुवार, 05/15/2014 - 16:44 नवीन
शी यार... मला पण हेच दु:ख व्हायचं दरवर्षी. दादा कायम १ वर्ष पुढे! :( ;)
  • Log in or register to post comments

आंजीला म्हणावं, धीर सोडू नगस.

राजेश घासकडवी
गुरुवार, 05/15/2014 - 17:57 नवीन
आंजीला म्हणावं, धीर सोडू नगस. त्येंच्या मागं हायेस ते फकस्त आधी जलमले म्हनून. राम्या, मुक्या, सुर्कीपेक्षाबी लय जोर मारून अभ्यास केलास तर ते ज्यवा त्येंच्या आयला 'मॉं मै बीए पास होगया' म्हनून पेढं देऊन कायतरी न्वाकरी करायला लागतील, त्यवा तू तुजं कायतरी वेगळं चालू ठ्यव. नक्की फु़डं जाशील बग. कारण तेच्यानंतर बी लय अंतर बाकी आस्तं.
  • Log in or register to post comments

किती गोड आहे आंजीचा निरागसपणा

मधुरा देशपांडे
गुरुवार, 05/15/2014 - 18:33 नवीन
किती गोड आहे आंजीचा निरागसपणा. मस्तच.
  • Log in or register to post comments

+१

सखी
Fri, 05/16/2014 - 20:50 नवीन
किती गोड आहे आंजीचा निरागसपणा. मस्तच. हेच म्हणते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मधुरा देशपांडे

आन्जे पोट्टे नुस्त पास होऊन

जयनीत
Fri, 05/16/2014 - 04:03 नवीन
आन्जे पोट्टे नुस्त पास होऊन कसं जमनार? म्हन त्या शाईन्या पोट्टे लोकाईले का ह्या टायामाले म्या फक्त पास झाली, पुढच्या टायमाले वरपास होउन दाखवीन तवाच नावाची आन्जी! कसं?
  • Log in or register to post comments

मस्त, अंजी रॉक्स

ज्ञानोबाचे पैजार
Fri, 05/16/2014 - 12:39 नवीन
मस्त, अंजी रॉक्स
  • Log in or register to post comments

चिंटू प्रमाणेआन्जींसुद्धा आता

मराठे
Fri, 05/16/2014 - 19:32 नवीन
चिंटू प्रमाणेआन्जींसुद्धा आता मूर्त रूप घेऊ लागली आहे.
  • Log in or register to post comments

मस्त

मुक्त विहारि
Fri, 05/16/2014 - 20:33 नवीन
झक्कास...
  • Log in or register to post comments

आंजी लई ग्वाड हाये; पन तिच्या

नगरीनिरंजन
Sat, 05/17/2014 - 23:10 नवीन
आंजी लई ग्वाड हाये; पन तिच्या वरच्या यत्तेत नापासगड्डे पोरं नायत जनू.
  • Log in or register to post comments

ही कथा पण नेहेमीप्रमाणेच

खेडूत
Sun, 05/18/2014 - 09:54 नवीन
ही कथा पण नेहेमीप्रमाणेच आवडली. पु.क.प्र. :)
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा