✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

स्पेशल "26" ... (घारापुरी कट्टा!)

अ
अत्रुप्त आत्मा यांनी
Mon, 03/03/2014 - 15:04  ·  लेख
लेख
तो मेरे मि.पा.करों... अब हम देखने जा रहे है... मि.पा. के जाने आउर माने सदश्यों का एक ऐसा रंगीन कट्टा.. एक ऐसा रंगीन नजारा ..जिसमे, "ड्रामा है..ट्रॅssssजिड्डी है... कॉमेडी है" https://lh4.googleusercontent.com/evonK-xthiHvDPFJh6vh8je0XcYWeTcdaO6eWYaJO00=w140-h54-p (ढिश्श..क्लेमरः- धागा आध्यात्मिक असल्यामुळे स्मायल्या भरपूर असणार आहेत! त्यामुळे ऐहिकां'न्नी फिल्टर-लाऊण धागा पहावा..म्हणजे मणा'स त्रास होणार णाही!!! =)) ... ) खरं तर कट्टा ठरल्यापासूनच हा ड्रामा/ट्रॅजिडी/कॉमेडी सुरु झालेलं होतं. ते सगळ घडणार हे नक्कीही होतं.कारण... या विश्वाच्या अखंड पसार्‍यात या भूतलावर इये भाssssरत प्र-देशी अंतरजालावर आत्मभेट झालेल्या काहि व्यक्ति आणि वल्लींचा हा सुदिन ठरलेल्या दिवशी म्हणजे दिनांक १ मार्च रोजी उगवला. अता उगवला का म्हणायचे? तर तो मि.पा.च्या धुडगुसमय गोलार्धावर उगवणार्‍या एका तार्‍यानी ठरवलेला होता. सणमाणणीय (पांडू..शब्द बरोबर आहे ना रे!!! ) कट्टाकिंग मु.वि. म्हणजे, मि.पा.जगता-तील नावाला धरून जगणार्‍या लोकांपैकी एक असे असल्यामुळे कट्टा हा खरोखरच एक मुक्त विहार झाला. आंम्ही पुणेकर मंडळी सक्काळच्या शिव्हगड येक्सप्रेसनी ठरल्या टायमाला गाडीसह निघालो. मी,प्रशांत,वल्ली,चिमी,सौंदाळा,सुडक्या,नादखुळा,धन्या(त्याच्या म हान भाच्यासह ) ,आणि चौ.रा.काका नसले,तरी त्यांच्या जाणिवेसह आंम्ही! =)) असे इकडनं मि.पा.ची पालखी घेऊन निघालो. या कट्ट्यात कुठ्ठेही नीट काहिही खायचं नाही हाच नियम असल्यामुळे पहिली काहि घटिका/पळे गेल्यानंतर गाडीत जे मिळेल ते आणि बाकिच्यांनी आणलेले असेल ते ,चरायला सुरवात झाली. फक्त कर्जतला आमचा 'वडा' झाला. गाडी शिंची १ मिनिटापेक्षा आधिक थांबलीच नाय,हिरमोड केलान मेलीनं! तरी दारावर येणार्‍या भाजिवाल्या सारखा एक वडापाववाला लाभला आणि हिंदि शिनेमातले हिरो/हिरवीण जसे पळत्या गाडीत एकमेकाचा हात 'धरतात',तसा प्रत्येकी एकेक वडापवचा ऐवज मी मिलवला आणि सदश्यांप्रती पोहोचवला! सुडुक आणि सौंदाळा हे मागच्या डब्यात-गेल्यामुळे त्यांना आंम्ही आणि आंम्हाला ते गाडिचे-कल्याण'होइपर्यंत मुकलेलो होतो. पन नंतर गाडी हलकी झाल्यामुळे- ते आंम्हाला जॉइन झाले. आणि जसे ते आले तसे अगोबा-हत्ती आणि धन्या या दोन दुष्टांनी सुडक्याशी युती करून त्याच्या गावाचं नाव सार्थ करत मला छळायला सुरवात केली. :-/ ( तोपर्यंत धन्याचा भाचा अगोबाच्या एकंदर डोक्यावर बसलेला असल्यानी =)) मी सुखी होतो! ) त्यापैकी काहि हल्ले मी 'दुर्लक्ष' - नावाचे मि.पा. हत्यार वापरून निर्जिव केले. पण नंतर थोडी सामुदाइक कत्तल केली. एव्हढे होइपर्यंत हुंबैच्या मंडळींशी मोबली-संधान सुरु होऊन कोण किती वाजेपर्यंत सि.एस.टी.ला येऊन थडकत आहे,याचे वृत्तांत येऊ लागले. मी आपला मुंबै ट्रेन प्रवासात दिसणार्‍या-मुंबैला टिपण्यात गर्क होतो. हि माझी लहानपणापासून अतिशय जवळीक असलेली मुंबई आहे. (याविषयीचा एक वेगळा धागा माझ्या मनात तयार होतो आहे... तो कधितरी मांडेनच!) शेवट आंम्हाला गाडीने अगदी ठरल्या टायमाला म्हणतात,तसे बरोब्बर धा ला सिएसटी'त-पोहोचवले! पुढे येऊन बघतो तर आमचा नवपरिणित लिल्या त्याच्या चेहेर्‍यावरील मूळ आणि अता जिच्याशी विवाह झालेला आहे त्या---लीलेसह एका बॉक्सात चिक्कूच्या वड्या घेऊन मु.वि.न्ना शह द्यायला स्वागताला उभा होता. त्याच्या बरोबर एक होऊ घातलेला मि.पा.कर प्रसाद आपटे हा ही कॅमेर्‍यासह सज्ज होता. आणि पहिला धक्का मिळाला. कोण यावेत ओळखा बरं? अखिल मि.पा.जगताची नाडी-पक्की ठाऊक असलेले मि.ओक! आहे की नै धक्का? ;) नंतर हळूहळू श्री.किसनद्येव-सपत्निक,मकीताई,पिंगू(cstसर्वात पहिला हजर-या दाव्यावर अढळ असलेला आणि मु.विं प्रमाणेच मूळ-नाम सार्थ केलेला :D ),माझिही शॅम्पेन हे सर्व कॅम्पेन मधे आले. तेव्हढ्यात मु.वि.पण हजर झाले,आणि खेळा ला रंग भरू लागला. दिपककुवेत,सौरभ उप्स, आणि आणि आणि शेव्टी आला तो पां डुब्बा!!! =)) आल्या आल्या मी पांडुवरचा मस्तानीचा(खर्‍या नव्हे..प्यायच्या! ) मनातला-राग 'निघण्यासाठी त्याला मनसोक्त कुदवले. त्या दिव्य-प्र-संगा'चे छायाचित्रण प्रशांतनी केल्याचे मी हळुच पाहिले,आणि अजुन कुदविले! =)) मण-शांत झाल्यावर पुन्हा ओळख परेड होऊन आंम्ही मास्तरीण म.कि.ताईंच्या मार्ग-दर्शनाखाली ठेसनातून गेट वे ऑफ इंडिया कडे कूच केली. आंम्हा सर्व इद्यार्थ्यांन्ना मकीताईने एका बसच्या रांगेत धरले. कुणितरी पायाचे अंगठे धरून हुबे र्‍हाऊ का? असा अवाजही टाकला...मगोमाग मि.पा.प्रथेप्रमाणे आपापल्या!!! असा उपआवाजही आला. आंम्ही बशीत बसलो आणि माझ्या-मुंबै चॅनल मधला आवडता डब्बल डेकरचा फोटू त्याच्या समोर हुबे र्‍हाऊन डब्बल-ढेकर देणार्‍या एका माणसासह मिळाला. https://lh5.googleusercontent.com/bZBY8tJb7RpMpao9hJkt-lq11Erc21u9TrI6IgaKfbE=w702-h551-no आणि अजुन एक धक्का म्हणजे या दिवशी शांत आणि उकाडा विरहीत मुंबैच्या रस्त्याच्या मझा घेता आला. बसही विशेष घाई नसल्याप्रमाणे पण योग्य वेळेत आंम्हाला घेऊन गेट वे ला पोहोचली. तोवर तिकडेही काहि धक्के आमची वाट पहात होतेच. धक्के मिळणं हे या कट्ट्याचं खास वैशिष्ठ्यच झालं. कोण असेल ओळखा बरं ??? अगदी कहिही ध्यानी आणि खरोखरच मनी नसताना... लाँच बुकिंग ऑफिसजवळ जमलेल्या मिपाकरात कोण होते??? आपले हजरजबाबी ..हबिबी हबिबीच्या देशातले... प्रभाकर पेठकर काका! :) https://lh4.googleusercontent.com/-zlYoLXVs7Zw/UxMIp6ahyqI/AAAAAAAAChE/QvUrl2krgUg/w702-h527-no/Copy+%25282%2529+of+lahan+cinga+713.jpg हाय कि नै धक्क्यांची शर्यत? आमचा आनंद शतगुणित झाला. (येथुन खालचे तिनही फोटो:-स्पा...) https://lh4.googleusercontent.com/-fF7iJj7TivA/UxQJwBUzg5I/AAAAAAAADJY/1IBKcm-TZ2g/w702-h527-no/DSCN3746.JPG तिथे कंजूसकाका,पण्णासराव(चिरंsssजीव शंभरसह =)) ) आणि इतरही हुंबैकर मि.पा.मंडळी जमली होतीच https://lh4.googleusercontent.com/-Y855prDvUlI/UxQJ0TcGtQI/AAAAAAAADJk/tTLpQ0NDEOg/w702-h527-no/DSCN3747.JPG मग.. मास्तरीणबाई मकीताईने तेथेल्या आणि आम्हा-पोहोचलेल्या-अश्या येथल्या सर्व मि.पा.करांना अता रिंगण धरायला लाऊन मि.पा.वारी आणि मि.पा.ची पालखी.. या संकल्पना घट्ट केल्या. शूक..शूक करून सर्व वारकर्‍यांना आधी गप बसवलं. आणि मग सर्वांना (पुन्हा आपापल्या... ) तोंडानी शाळेतल्या सहलीसारखे 'नंबर' पुकारायला लावले..त्यात मागेपुढे होत होत तिसर्‍या किंवा चवथ्या पायरीला गणसंख्या भरली "२६" ! आणि माझे फिल्मी मन उघड ओरडले... https://lh4.googleusercontent.com/-3f9W4lezUc4/UxMH-HHzz3I/AAAAAAAACgw/cf1LzdM0lJ4/w319-h124-no/special+26.jpg https://fbcdn-sphotos-f-a.akamaihd.net/hphotos-ak-prn2/t1/1375115_805518912810580_257597479_n.jpg अगोबाचं कॅमेरा-लेन्स अश्या पुढच्या तयारीत लक्ष असल्यामुळे कुठलाही खौट बाँम्ब न पडता बाकिचेही सदस्य ओरडले... स्पेशल छब्बीस ! आजुबाजुची लोकं हे तिसर्‍या ग्रहावरचे अशांत-जीव असावे..असा समज करवून घेऊन पुढे सरकत होती. मग तिथे पहिला ग्रुप फोटो झाला. त्यात मी आणि काहि जण पेठकर काकांच्या पुढे जागा धरू लागल्यावर काकांनी, "रहा..माझ्या पुढेच उभे रहा,म्हणजे मला निराळं पोट झाकावं लागणार नाही!!!" =)) असा षटकार लगावला,आणि फोटू काढणार्‍या'ची लेन्स सुद्धा खदखदली! पेठकरकाकांच्या नंतरच्या विशेषतः लेण्यांमधल्या! काहि शिल्प्षटकारांमुळे... आयला नाय..नाय... षटकार शिल्पां'मुळे... (तरी विनोद झाला :D .. जाऊ दे समजून घ्या लोक्स! ) लेण्या हदरून त्यांना अनेक नवे ऐति हासिक आयाम मिळाले! (लेणिच्या डाविकडल्या गाळ्यातले कांकांचे षटाकर ज्यांनी अनुभवले त्याच कट्टेकर्‍यांना घारा पुरी'चे पुण्य-पूर्ण मिळालेले आहे.. ज्यांना पुण्यसंचय "हवा" असेल त्यांनी मला व्य.नि.करावा! ) असो..तिकिटे काढून आंम्ही गेट वे वरून घारापुरीकडे एकदाचे लाँच'लो! आणि मग खरा दंगा सुरु झाला तो लाँचवर! https://lh5.googleusercontent.com/R7nm81iGbUHje0ovK-3uhDR9M-lLy8y0tAPogmtFwKw=w702-h468-no प्राचीन अरबी युद्धात जसं सुरवातीला मुख्य योद्ध्यांची झुंज व्हायची तशी पिंगु-नादखुळा, ओककाका आणि कुणिही!, मी आणि अर्थातच... =)) !!! , लिलाधर आणि पांडू , परत मी आणि पांडु ,शिवाय मी आणि पांडुनी अधिच ठरवलेलं-ऑपरेशन-लिलाधर...अश्या काहि झुंजी होऊन लाँचला युद्धनौकेचं स्व रूप आलं! पण लाँचवर येता-जाता दोन्ही वेळेस खरा दंगा केला तो दोन बालविरांनीच.. धन्याचा भाचा प्रथमेश आणि पन्नासरावांचे-चिरंजीव शंभर! (फोटो:-स्पा..) https://lh3.googleusercontent.com/-Yn_lKjeGINQ/UxQJ9VclmyI/AAAAAAAADJ0/ghmI5X4M5rI/w702-h527-no/DSCN3749.JPG परतीच्या प्रवासात तर वरती डेकवर ह्या दोघांनी त्या कडेला---बसलेल्या फॉरे-नरास आणि नारीस त्यांच्या पायावरनं उड्या मारून अशी प्रक्टीस दिली कि त्यांना आपला तो जुना 'पाय पसरून त्याच्यावर हताची कडी वाढवत उड्या मारायच्या खेळाचा (अंगठा-पाणिच ना हो ते? ) भोज्या सहज होता यावं! मग,मधेच दिपककुवेत यांनी सगळ्यांना चॉकलेटं-लाऊन एकंदरीत 'तह' घडवून आणला. अहो..पण हे सगळं दूर असू द्या, एक घडायचं घडलेलं सांगायचं र्‍हाऊन जायचं कि वो.. ही चाकलेटं येण्याआधीच मकिताई..चिमी..आणि सौ किसनदेव..यांनी "घरनं आणलेले पदार्थ" घेऊन गुप्त चराळ मंडळाची स्थापना लॉचच्या एका बाजूला करून , 'अनाहिता जागृती समाजाची' पताका तिथेही सक्रीय फडकवली. (या चर-काळात तिघिंनाही,..उरलेल्या मि.पा.जगाची जाणिव अजिब्बात नव्हती, ती जाणिव काहि घरगुती आणि खाजगी संवादात गुंतली असावी,असा आमचा नम्र अंदाज आहे! ;) ... ) लाँचिला पोहोचायला बराच येळ लागतोय हे पाहून मग सगळ्यांनी आपाप्ल्या कॅमेर्‍यांसह एकंदरीत "शूटींग" सुरु केले. नावेच्या चार बाजू.. अगोबा...सौरभ..आमचा प्रसाद, पांडू(नवकॅमेर्‍यासह..) ,आणि मी वरच्या मजल्यावरून सभोवतीची टिपा-टिपी सुरु केली. https://lh6.googleusercontent.com/-tfTVSGePmz0/UxMI7LAGygI/AAAAAAAACiQ/opaY4MNKfgM/w702-h527-no/Copy+%25282%2529+of+lahan+cinga+723.jpg https://lh4.googleusercontent.com/-T9HXdi1H0RI/UxMI-RHr53I/AAAAAAAACig/ixk2tguSrpw/w702-h527-no/lahan+cinga+725.jpg https://lh4.googleusercontent.com/-OV--QNDOC7Y/UxMJAkZQ2OI/AAAAAAAACio/l5KHTwOcAzY/w702-h527-no/Copy+%25282%2529+of+lahan+cinga+728.jpg https://lh3.googleusercontent.com/-cCGACi5XXpo/UxMJCPYNB-I/AAAAAAAACiw/pEXkqrq3A5c/w702-h527-no/Copy+%25282%2529+of+lahan+cinga+735.jpg https://lh5.googleusercontent.com/-mpAKo0gYUoE/UxMJDQ--ptI/AAAAAAAACi4/Y6LIJL8Gqvs/w702-h527-no/Copy+%25282%2529+of+lahan+cinga+741.jpg https://lh3.googleusercontent.com/--Y7cndTyq5k/UxMJNBVPwzI/AAAAAAAACjY/eRHGw4Uvdx0/w702-h527-no/Copy+%25282%2529+of+lahan+cinga+746.jpg https://lh3.googleusercontent.com/-Qa3srClzHmk/UxMJObB-zJI/AAAAAAAACjg/a-nK7Fs18aY/w702-h527-no/Copy+of+lahan+cinga+747.jpg https://lh3.googleusercontent.com/-Cfxl9DIvWKw/UxMJV9XECBI/AAAAAAAACj4/tIQvsdJC68U/w702-h527-no/lahan+cinga+752.jpg लाँचिंग पिरियडवर पण्णास यांनी... असेच अजून गेलो तर पेठकरकाकांच्या गावी पोहोचू असा चौकार लावला! आणि होते होते मग...एकदाचे आंम्ही तिकडे पल्याड'ला पोहोचलो. पोहोचल्यावर न थांबता सगळे पुढे निघालो,वाटेतल्या स्टॉलवर कोकणिमेव्याचा अस्वाद घेत मधे एक शॉर्ट खादाडी थांबा ही जाहला. https://lh6.googleusercontent.com/-d9Z9Edh2bQo/UxMJaAweCWI/AAAAAAAACkA/x5BjrO1KeXs/w702-h527-no/lahan+cinga+753.jpg तिथे घरनं आणलेले पदार्थ हे प्रकरण भुकाळलेल्या अनेकांनी एका मोकळ्यास्टॉलवर ठेऊन उडवलं आणि मग अवतरल्या मु.वि.स्पेशल "वड्या" खरोखर तोंडात टाकल्याक्षणी विरघळणार्‍या त्या चॉकलेटवड्या ...आहाहाहा... (फोटो:-वल्ली...) https://lh6.googleusercontent.com/-I1Fg3ifj37o/UxP-eog4rEI/AAAAAAAAawk/PxfZ8ip8L5Q/w702-h468-no/IMG_8313.JPG आंम्ही मु.वि. मु.वि... म्हणतच पायर्‍या चढायला सुरवात केली. वाटेत चहा झाला.(तिथेही पेठकर काकांन्नी चहा आणि चहावाले यावरून ५/६ षटकार लगावले..पेठकर काका ख्रिस गेल आहेत,बाऊंड्य्रा मारतच नाहीत! :D) शेवटी हाश हुश्श..करत येकदाचे वरती पोहोचलो. बघतो तर तिथली मनुष्यवंशाचा पुरावा सिद्ध करणारी काहि माकडे होती. काय लिला चालल्या होत्या!? ;) एका माकडानी तर माझा कोल्ड्रिंकची बाटली पळवली आणि पद्धतशीरपणे झाडावर जाऊन बूच उघडून प्यायली आणि परत बुच मारलं..देखिल! https://lh5.googleusercontent.com/-6cub-UMAoJI/UxMJo1hIHYI/AAAAAAAACkg/jsJ7kn7dT4o/w702-h527-no/lahan+cinga+758.jpg https://lh3.googleusercontent.com/-JVCGPASVA7s/UxMJv3aaWwI/AAAAAAAACkw/eCKwmCYpIQA/w702-h527-no/lahan+cinga+760.jpg यावरून-"बाटली हातात आल्यावर माणसाचं माकड होतं,इतकच सत्य नसून..माकडाचं ही याच गोष्टीनी बाटली असेपर्यंत तरी माणूस होतं" हे डिडक्टीव्हली प्रूव्ह झाल्याचा आणंद ..मज मणाला जाहला! =)) तिकिट काऊंटरवर "भारतीय नागरीकांस तिकिट दरः-१०रु.आणि विदेशी नागरीकांसः-२५० रु. असा राष्ट्रीय-भाव होता. पेठकरकाकांचा अजुन एक षटकार-(आजुबाजुच्या विदेशींन्ना पाहून) हळूच म्हणाले," थोडी तिकिटे जास्त काढा रे... १२५ ला विकू आपण!" अश्या तर्‍हेने तिकिटे काढणे झाले. आणि मग सगळ्यांना जे हवे होते ते सुरु झाले... https://lh3.googleusercontent.com/-Kf35WphyH-c/UxMMaxzWjgI/AAAAAAAACnU/0TW-dTmA1Us/w702-h527-no/lahan+cinga+785.jpg वल्लींच्या नजर आणि बुद्धिनी-लेणी दर्शन! https://lh4.googleusercontent.com/Z5xdjLM8B5uVYgC5R9Zsg83sLBeUZhGe-e3oekUyOBM=w702-h527-no अता मी नजर आणि बुद्धी असं का म्हणतो..हा प्रश्न कुणाला पडत असेल तर..त्यानी एक ट्रीप वल्लीबरोबर करावी..हेच त्याचं एकमेव उत्तर आहे. कारण आपली बुद्धी..भावना कित्तीही सौंदर्यात्मक कलात्मक असली तरी तिला आभ्यासूप्रवृत्तीचे अधिष्ठान नसल्यामूळे..आपल्याला मूर्ती/शिल्पांमधली...दिसते ती फक्त भव्यता..दिव्यता..आणि भग्नता... या सर्व कलाकृतींना असलेला इतिहास,मूर्तीशास्त्र,पुराणकथा याचा आधार हा काहि अंतरज्ञानानी दिसणारा विषय नव्हे. त्यासाठी या विषबद्दल गाढ ममत्वबुद्धी असलेल्या अभ्यासकाची नजर आणि मेंदू बरोबर असावा लागतो... याच नजर आणि मेंदूचे नाव सागर बोरकर..ऊर्फ वल्ली आहे. तो आमच्या बरोबर होता म्हणून हा झाला तो घारापुरी भ्रमंती कट्टा... नाहितर घडली असती ती घारापोरी सहल! अता इथून पुढे मला काहिही बोलणे अशक्य आहे... पुढे बोलतील ते ... वल्लीच! त्यामुळे अता आपण सार्‍यांनी आपले कान आणि मन त्या दिशेनी नेऊ.. वल्लींच्या धाग्याकडे ----- घारापुरीचे शैवलेणे ==================================== लेण्या पहात असताना अजून एक (काहिंना माहित असलेला!) पन आमच्यासाठी धक्काच! विजुभाऊ अवतरले.. आणि अजुन एक धक्का... मु.वि. कंजूस स्पा आणि सौरभ (त्यांना कामं असल्यामुळे..) विसर्जिले! असो! लेणिदर्शनानंतर परतीचा प्रवास हा पार्ट तसा विशेष नसल्यामुळे त्यातल्या विशेषाचे..म्हणजे पंचमपूरीवाला भोजनाचे रिपोर्टींग तेथे आलेले सर्व भो-जनी करतीलच.. (इथेच आंम्हाला सुहास झेले येऊन जॉइन झाले. ) शिवाय बाकि सदस्यांनीही काढलेल्या फोटोंसह यात प्रतिसादी-सहभाग नोंदवावा..विशेषतः कट्टेकर्‍यांच्या फोटोरुपानी! (फोटो:-वल्ली...) https://lh4.googleusercontent.com/-CoLzoLwzPe4/UxQCPMhjnnI/AAAAAAAAbEo/R_rjL58T_Oc/w702-h468-no/IMG_8506.JPG लेण्यांमधले (सर्व) फोटो या धाग्यावर न पाहता ते आपण वल्लींच्याच धाग्यावर माहितीसह पाहू असे सुचवून(आणि काहि फोटो टाकून) मी थांबतो! https://lh3.googleusercontent.com/-DQb55K6fuUA/UxML_kF35NI/AAAAAAAACmE/UcjIzbJbIaw/w702-h527-no/lahan+cinga+774.jpg https://lh5.googleusercontent.com/-Qhq3VnResHA/UxMMSEobO9I/AAAAAAAACm0/fBTy7PnxYbc/w702-h527-no/lahan+cinga+781.jpg https://lh6.googleusercontent.com/FuI9GbYFlnzeFPhJxy7onuM60PjuKuBS3xj5z7PCrAo=w702-h527-no https://lh4.googleusercontent.com/-BLo3tH-59Ik/UxMLqUxLPgI/AAAAAAAAClE/CxkyNOy14Ig/w702-h527-no/lahan+cinga+762.jpg https://lh6.googleusercontent.com/-cakbFAZTvRU/UxML8BBC8TI/AAAAAAAACl8/SFZGLRFYQhU/w702-h527-no/lahan+cinga+773.jpg (सदर धाग्यातले काही(नामनिर्देशित) फोटो हे वल्ली आणि स्पा यांनी काढलेले आहेत...उरलेले माझे. :) ) ===================================
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वावर
संस्कृती
कला
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
26567 वाचन

💬 प्रतिसाद (85)

प्रतिक्रिया

हा स्नेह असाच वृद्धींगत होवो

मुक्त विहारि
Mon, 03/03/2014 - 20:44 नवीन
मिपाकर ते करणारच.... बिंधास्त रहनेका...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

खुसखुशीत भाषेत अतिशय उत्कृष्ट

निनाद मुक्काम …
Mon, 03/03/2014 - 21:20 नवीन
खुसखुशीत भाषेत अतिशय उत्कृष्ट शैलीत लिहिले गेलेला हा वृत्तांत वाचून रतात येउन कट्टा करण्याचे मनात येत आहे त्याबाबत अधिकृत बातमी थोड्याच दिवसात मूवी ह्यांनी आता मिपाचा निवासी कट्टा करण्याचे मनावर घेणे अशी सुचना वजा विनंती आहे. पेठकर काकांच्या सोबत छोटेखानी म्युन्शन कट्टा करायचा आहे ,तुमचा भारतीयांचा एवढा विशाल भव्य कट्टा पाहिल्यावर आता अनिवासी मंडळींनी आपापल्या देशात महाकट्टे आयोजित करावेत आता परदेशात मूवी सारखा कट्टाबहाद्दर कुठून शोधायचा हाच खरा यक्षप्रश्न आहे.
  • Log in or register to post comments

जळवा लेको

भ ट क्या खे ड वा ला
Mon, 03/03/2014 - 21:52 नवीन
शिंची नोकरी आडवी आली. लय भारी इवेन्ट मिस केला वल्लीनच्या लेखाच्या प्रतीक्षेत भ खे.
  • Log in or register to post comments

बादवे, आम्हाला 'गिरिजा' मागील

मस्त कलंदर
Mon, 03/03/2014 - 21:59 नवीन
बादवे, आम्हाला 'गिरिजा' मागील कथा कळलीय. स्पा कडून अधिक खुलाशाच्या प्रतिक्षेत!!
  • Log in or register to post comments

खिक्क!

पैसा
Mon, 03/03/2014 - 22:48 नवीन
असले गोंधळ उडवणारे स्त्रीवेषधारी आयडी काही मंडळींना मस्त शेंड्या लावतात. पण स्पाच्या वाटेला कध्धीच कसे जात नाहीत याचं कोडं आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

माताय मि कसला खुलासा करायचा?

स्पा
Mon, 03/03/2014 - 22:41 नवीन
माताय मि कसला खुलासा करायचा?
  • Log in or register to post comments

S PA चा!!

मस्त कलंदर
Mon, 03/03/2014 - 22:44 नवीन
S PA चा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

मी सांगू? मी सांगू?

कवितानागेश
Mon, 03/03/2014 - 23:08 नवीन
मी सांगू? मी सांगू? :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

मस्त वृत्तांत

खटपट्या
Mon, 03/03/2014 - 22:46 नवीन
मस्त वृत्तांत
  • Log in or register to post comments

घारापुरी सफर कित्येक

प्रचेतस
Mon, 03/03/2014 - 23:11 नवीन
घारापुरी सफर कित्येक वर्षांपासून प्रलंबित होता. आता योग म्हटल्यावर ही संधी सोडायची नाही असेच ठरवले होते. लेण्यांच्या भ्रमंतीसोबतच अजून एक आकर्षण होते ते समुद्रसफरीचे. २०/२५ मिनिटांत घारापुरीला पोहोचू असे वाटत असतांना ही समुद्रसफर तब्बल तासभराची झाल्याने समुद्रसहवास अंमळ जास्त वेळ अनुभवास मिळाला. सोबतीला मिपाकरांच्या मनमुराद गप्पा चालूच होत्या. तासाभरताच घारापुरीच्या जेट्टीवर उतरलो. आम्ही तिघं चौघं आधीच भराभर लेण्यांपाशी पोचल्याने मागे रेंगाळलेल्या मंडळींनी चहापानासाठी थांबा कधी घेतला ते कळलेच नाही. बाकी ह्या लेण्या भग्न असूनही अतिशय अप्रतिम आहेत. इथले मूर्तीभंजन हे इस्लामिक नसून पूर्तुगेझांनी आपल्या बंदूका, तोफा यांचे सरावासाठी लक्ष्य म्हणून ह्या मूर्तींचा वापर केला. हे पूर्णपणे शैव लेणे. ह्या लेणीत विष्णू आणि ब्रह्माला दुय्यमच स्थान दिलेले दिसले. इथल्या लेणीतले जवळपास सर्व द्वारपाल हे आयुधपुरुष शैलीतले वाटतात कारण ह्या द्वारपालांचा हाती शस्त्र अभावानेच असून बहुधा सर्वच एका बटू सोबत उभे आहेत. हे बटू नसून त्यांच्या हातीचे शस्त्र असावे. इथल्या भिंतीवरची शिल्पे अतिशय अप्रतिम आहेत. महायोगी शिव, नटराज, अर्धनारीश्वर, कल्याणसुंदर शिव, गंगाधरशिव, अंधकासुरवधमूर्ती अतिशय प्रत्ययकारी आहे. आणि ती मधली त्रिमुखी असलेली सदाशिवाची मूर्ती. काय कमालीची देखणी आहे ती. उजवीकडच्या उपलेण्यांत योगेश्वर शिव तर डावीकडच्या उपलेण्यांत भैरव, अष्टमातृका आणि स्कंद आहेत. अर्थात आता इथे यावर जास्त काही न लिहिता लेण्यांवरच्या स्वतंत्र वृत्तांतात अधिक लिहिनंच.
  • Log in or register to post comments

कट्ट्याच्या धाग्यावर माझे दोन टाके.

शशिकांत ओक
Tue, 03/04/2014 - 00:13 नवीन
कट्ट्याच्या धाग्यावर माझे दोन टाके 'नाडी-वाडी नंतर आधी तब्बेतीकडे लक्ष द्या ' असा प्रेमळ पण सज्जड दम कोण भरू शकतो ते चाणाक्ष मिपाकर समजून घेतील! मिपाकर घारापुरीच्या लेण्यापहायला जात आहेत असे अचंब्याने मी म्हटले,' मग जरूर जा' असा आदेश मिळाला! लगेच मी तिकीटांची व्यवस्था केली. तोवर वल्लींचा धागा धावत होता. 'हा येतोय, तो येतोय' अशी वर्दी मिळत होती. त्यात आपण येणार म्हटल्यास काहींना विरस वाटायला नको, म्हणून मी प्लॅटफॉर्मवरच अवतरित व्हावे असे वाटले. असो. सीएसटीवर लीलाधर कुटुंबियांनी आणलेल्या कोको चॉकलेट बर्फीच्या चविष्ट वड्यांचा स्वाद तोंडात घोळवतात असता मुक्त विहारींची एन्ट्री अन्य मिपाकरांसोबत झाली. सुरवातीला जुजबी ओळखी करून झाल्या. १११नं. बसमधून सर्व भारताच्या भव्य दरवाज्यापाशी थडकलो. वाटेवर शिरगणतीनुसार तिकिटे काढून झाली. चला, चला, चा तगादा ऐकत एका मोठ्या नावावरून दुसऱ्या करत सगळे सामावले गेले. बोटीचे दोरखंड ढिले झाले व तिने वेग घेतला. पहाता पहाता ताज हॉटेल व अन्य इमारती दूर सरल्या. तरुणांना संकोच वाटू नये म्हणून मी कंजूस यांशी गप्पा मारायला लागलो. त्यांनी वेळोवेळी वडाळा, चेंबूर, बीएआरसी वगैरे किनाऱ्यावरील दिसणारी उपनगरे व ज्या लेण्यापहायला निघालो त्याबेटाची दुरून ओळख करून देताना त्यांच्या अभ्यासू वृत्तीचा परिचय दिला. इतिहासातील काही दाखले व मंदिर रचनांचा काळ यावर त्यांचे विचार कथन करता करता किनारा आला. तासभर कसा पटकन गेला असे वाटले. लुटूपुटूतील रेलगाड़ी मागे टाकून मुक्त विहारींची कोको वडी तोंडात घोळवताच आणखी एक घ्यायला हात पुढे गेला, पण इतरांचा विचार करत हात मागे ओढला. वड्या मस्तच झाल्या होत्या. शिवाय स्वतःहून बनवून आणल्याचे अप्रूप होते. फटाफट पाऊले उचलत गूफेचा चढ चढायला लागलो. दुतर्फा दुकानातील माल खुणावत होता त्याकडे दुर्लक्ष करून शिवाची त्रिमूर्ति दिसली तेंव्हाच थांबलो. असो. मी ही थांबतो. वल्लींचा माहितीपुर्ण धागा वाचायला.
  • Log in or register to post comments

फारच छान

स्पंदना
Tue, 03/04/2014 - 04:26 नवीन
१ वल्लीचा लेण्यांबद्दल माहिती सांगतानाचा चेहरा....सल्युट! २ कोल्ड्रिंक पिणारे माकड...मी सांगितल होतं, गाढव कोल्ड्रिंक प्यायला शिकलेत म्हणुन. ;) उगा मकी होती म्हणुन शिस्तीत जेव्हढे गेले तेव्हढे नग परत अले अस वाटतय. बाकी सगळ्यांना पाहुन फार आनंद झाला.
  • Log in or register to post comments

पेशल

चौकटराजा
Tue, 03/04/2014 - 08:44 नवीन
कट्टा लय पेशल झाल्याला दिसतुय! ते बेनं डबल ढेरकर तेजा फटू लय खास आन त्ये मोट्या व्हड्यांचा क्याटवॉक बी मायंदाळ ! म्या बी वोककाकान आन प्येटकर काकांपरमान आच्च्रर्य भ्येट करनार व्हतो पन र्‍हाईलं . आता प्येटकर ( तेंजा प्येटशांतीचा वेवसाय हाय ना ) काकास्नी भ्येटाया मस्कतात जायला लागनार भ्वोतेक ! बाकी त्ये पनासरावाचा दुप्पट आन धन्यारावाचा सवाशेर यांची कुस्ती लई बाहारी झाली असनार ! ब्वाला मस्तानी ( म्हण्जी दुधातली व्हो ) काटावर आल्याव पांडूनी धीली की कल्टी केली ? आसो . वल्लीशेट ला काई गाईड वाल्याचे पैशे न्हाई तर चा तरी पाजला का न्हाई ? आं ?
  • Log in or register to post comments

नाराज नका होउ....

मुक्त विहारि
Tue, 03/04/2014 - 08:59 नवीन
तुम्हाला भेटायला ते स्वतः पुण्याला येत आहेत, असे खात्र्र्लायक सुत्रांकडून समजले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

मस्त वॄत्तांत !

मदनबाण
Tue, 03/04/2014 - 09:03 नवीन
मस्त वॄत्तांत ! :) पेठकर काकांना कट्ट्यात पाहुन विशेष आनंद झाला. :)
  • Log in or register to post comments

हृद्य भेट

प्रचेतस
Tue, 03/04/2014 - 09:25 नवीन
एक फोटू टाकायचाच राहिला की. शिवपार्वतीच्या लग्नाचे पौरोहित्य करणारे ब्रह्मदेव गुर्जी आणि आजचे काळातील लग्नांचे पौरोहित्य करणारे आत्मु गुर्जी ह्या दोन समव्यावसायिकांच्या अनुपम भेटीचा हृद्य सोहळा याची देही याची डोळा अनुभवता आला. Image removed.
  • Log in or register to post comments

मस्त

मुक्त विहारि
Tue, 03/04/2014 - 09:50 नवीन
झक्कास.... वल्लींच्या तीक्ष्ण द्रुष्टीतून काही म्हणता, काही सुटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

>>दोन समव्यावसायिकांच्या

सूड
Tue, 03/04/2014 - 12:51 नवीन
>>दोन समव्यावसायिकांच्या अनुपम भेटीचा हृद्य सोहळा याची देही याची डोळा अनुभवता आला. तर काय !! तेवढ्यात पण भटजींनी विचारलंनीत त्याला,"ऊच्चा किती भेटली रे !!" ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

बुवांना कदाचित पैशारूपी दक्षिणा भेटली नसेल...

मुक्त विहारि
Tue, 03/04/2014 - 13:02 नवीन
पण ह्या सोहळ्यांत आम्हा सगळ्यांना वल्लींचा सहवास आणि विवाह सोहळ्याच्या वर्णनाचा आनंद मनसोक्त मिळाला. "वल्ली" नावाप्रमाणे वल्ली आहेतच पण शिवाय अवलिया पण आहेत.त्यांच्या ज्ञानाच्या खजिन्यातून किती मोती आणि माणके , निघतील, ते काही सागता येत नाही. ज्यांना वेळ असून पण आळसामुळे, किंवा हट्टीपणामूळे, किंवा त्या लेण्यांत काय एव्हढे बघायचे? अशा विचारामुळे शक्य झाले नाही, ते हतभागी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

@"ऊच्चा किती भेटली रे !!"

अत्रुप्त आत्मा
Tue, 03/04/2014 - 15:16 नवीन
@"ऊच्चा किती भेटली रे !!" Wink>>> =)) आंssssss दुष्ट सुडूक! :-/ आमची परिभाषा उघड क्येली! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

मस्त कट्टा आणि मस्त वृत्तांत

प्रमोद देर्देकर
Tue, 03/04/2014 - 10:27 नवीन
आयला पेठकर काका आणि विजुभाऊ एकत्र हळहळ हो नुसती कट्टा हुकल्याची . कसला रंगीत कट्टा झालाय. मला वाटते की मि.पा. च्या इतिहासातला हा आजपर्यंतचा सगळ्यात मोठा कट्टा. या कट्टयाला आमचे तात्या आले असते तर चार चाँद लागले असते. असो. वाचण खुणा साठवली गेली आहे. जेव्हा जेव्हा ऑफिस मध्ये कंटाळा येईल तेव्हा तेव्हा हा धागा चवीचवीने वाचला जाईल. धन्स
  • Log in or register to post comments

अप्रतिम

सविता००१
Tue, 03/04/2014 - 10:40 नवीन
खल्लास वृत्तांत... मस्तच
  • Log in or register to post comments

ओ मु. वि. षेठ

प्रमोद देर्देकर
Tue, 03/04/2014 - 10:48 नवीन
ओ मु. वि. षेठ इथे काही प्रभृतींची जे नव्याने कट्ट्याला आलेले आहेत त्यांची ओळख तरी द्या. चला सोनेरी अक्षरांत लिहुया

!! इये मराठिचिये नगरी ! मु.वि. झाले कट्टेकरी !!

धन्स
  • Log in or register to post comments

@ जे नव्याने कट्ट्याला आलेले

अत्रुप्त आत्मा
Tue, 03/04/2014 - 21:26 नवीन
@ जे नव्याने कट्ट्याला आलेले आहेत त्यांची ओळख तरी द्या.>>> Image removed. डाविकडूनः-शशिकांत ओक,चिमी,सौ,किसनदेव,मकिताई,मागे किस्ना,शेजारी पिंगू,मधे मी,माझ्या जवळ विजुभाऊ,प्रशांत,त्याच्या मागे सौंदाळा,हिरवा-नादखुळा,मागे पेठकरकाका,त्यापुढे धन्या,नंतर त्याचा भाचा आणि चिं.शंभर..आणि त्यांच्या खोबणीत फक्त ५०,धन्याच्या नागे-प्रसाद अपटे,माझिही शँम्पेन,सूड,वल्ली,लीलाधर,प्रसाद गोडबोले...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर

धन्यवाद...!!!

शिद
Tue, 03/04/2014 - 22:30 नवीन
छान ओळख परेड करुन दिलीत...धन्यवाद...!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

गुरुजी फोटो पहाताना सुद्धा

आनन्दिता
Tue, 03/04/2014 - 23:14 नवीन
गुरुजी फोटो पहाताना सुद्धा तुमच्या जागी अचानक एखादी स्माईली चमकुन जाईल की काय असा वाटतेय... =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@एखादी स्माईली चमकुन जाईल की

अत्रुप्त आत्मा
Tue, 03/04/2014 - 23:57 नवीन
@एखादी स्माईली चमकुन जाईल की काय असा वाटतेय>>> Image removed. ...........Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता

आवो सायेब, ते स्मायल्यांचे

खटपट्या
Wed, 03/05/2014 - 00:17 नवीन
आवो सायेब, ते स्मायल्यांचे ट्रेड शिक्रेट सांगाच आता. (कुठून काढता येवढ्या इसमायल्या ?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

स्पेशल "26" ... (घारापुरी कट्टा!)

विनोद१८
Tue, 03/04/2014 - 20:39 नवीन
...अ.आ. ..छान वृत्तांत लिहीलाय, कट्ट्याला येउ न शकल्यामुळे खन्त वाटली. विनोद१८
  • Log in or register to post comments

अआ, अतिशय सुरेख कट्टा आणि मस्त वृत्तांत

संजय क्षीरसागर
Tue, 03/04/2014 - 22:49 नवीन
एकदम दिलखुष! आणि तुमचं हे टायटल स्पेशल छब्बीस देखिल खुमासदार.
  • Log in or register to post comments

मस्त, मस्त!

drsunilahirrao
Sat, 03/15/2014 - 06:55 नवीन
मस्त, मस्त!
  • Log in or register to post comments

खरं पाहता घारापूरी लेण्या

प्रभाकर पेठकर
Sun, 03/16/2014 - 03:01 नवीन
खरं पाहता घारापूरी लेण्या पाहण्यासाठी हा भरभक्कम स्वदेह दुबळ्या गुडघ्यांच्या आधाराने एवढ्याssssssssss पायर्‍यांवरून लेण्यांच्या पायावर घालावा लागेल ह्याची पुसटशी कल्पना जरी असती तर....... पण एवढे आमचे सौभाग्य कुठले? तिथे पोहोचल्यावरच जाणवले की आपल्या संकोची मनाने परतीचे दोर केंव्हाच कापून टाकले आहेत. एका दमात घारापूरीला हा पाणीपूरी आकाराचा देह पोहोचविणे शक्य नाही, आपले पितळ उघडे पडणार ह्या चिंतेने ग्रासलेले असतानाच कोणीतरी चहाची हाक दिली आणि मी ती संधी सोडली नाही. चांगले वीसेक मिनिटे विश्रांती मिळाली आणि नव्या दमाने, जुन्याच गुडघ्यांनी घारापूरी सर केली. माहीतीपूर्ण सहल झाली. पण दुर्दैवाने स्मृती शक्ती क्षीण असल्याने (हल्ली जरा जास्तच क्षीण झाली आहे) वल्लींनी मनोभावे सांगितलेली सर्व मौल्यवान माहिती अगदी चित्तभावे ऐकली पण तिथेच घारापूरीतच प्रश्नपत्रिका सोडवायला आली असती तर किमान गुणांसाठीही कॉपी करण्यापलीकडे मला पर्याय नव्हता. २६,२७,२८,२९,१ आणि २ पैकी एक दिवस पुण्यात आणि/किंवा एक दिवस मुंबईत कट्टा आयोजन करण्याचा विचार आहे. लवकरच तारीख ठरवितो.
  • Log in or register to post comments

पुण्याच्या कट्ट्याची वाट बघत

यशोधरा
Sun, 03/16/2014 - 13:56 नवीन
पुण्याच्या कट्ट्याची वाट बघत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

.

पोटे
Sun, 03/16/2014 - 13:40 नवीन
तिथे खाली हॉटेलात बिअर मिळते. ती प्यायली नाही का?
  • Log in or register to post comments

पोटे ; पेठकरकाका आणि मी

विजुभाऊ
Wed, 01/14/2015 - 15:11 नवीन
पोटे ; पेठकरकाका आणि मी दोघानी तो मोका साधला
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा