मागील भागः
एलियनायटीसेलिया भाग ४
एलियनायटीसेलिया भाग ३
एलियनायटीसेलिया भाग २
एलियनायटीसेलिया भाग १
आता मार्कची ड्यूटि संपली होती आणि तिथे दुसरा कंट्रोलर आला होता. तो फारच विचित्र होता स्वभावानी! तो होता अर्धा मराठी, अर्धा पंजाबी, आणि लहानपणापासून फ्रान्समधे राहिलेला, आनंद राजवीर सिंग त्याचं नाव! मला पाहुन वसकन म्हटला 'येस्सस... व्हात दु यु वान्त'..
तो आनंद थोडासा सणकीच होता. तो वंशानी जरी भारतीय असला तरी कट्टर फ्रेंच होता. त्यामुळे त्याला इंग्रजांबद्दल राग असावा असं मला वाटायचं. मी काही दिवस त्याचं निरीक्षण केल्यानंतर तसं डेव्हला विचारलं, त्यानी सांगितल्यावर समजलं, त्याचा राग इंग्रजांवर नसून इंग्रजीवर होता. झालं असं की तो वंशानी भारतीय, आई-वडील अगदी मस्त इंग्रजी बोलायचे, पण हा लहानाचा मोठा झाला फ्रान्समधे, त्यामुळे इंग्रजी फारसं येतच नव्हतं. पण आपल्या विषयात जाम हुशार, त्यामुळे इंग्लंडात नोकरी अगदी सहज मिळाली. आता प्रश्न आला भाषेचा, कारण बहुतांश ब्रिटीशांना एकच भाषा येते आणि याला अडीच भाषा येत असून पुन्हा संवादात अडथळा. अडीच भाषा म्हणजे, फ्रेंच उत्तम यायचं, आणि मराठी, पंजाबी आणि इंग्लीश अर्ध-अर्ध! पुन्हा याचे इंग्लीश म्हटल्यावर उच्चाराचा वांदा! त्यामुळे तो काही ओरडून म्हणाला नाही मला, पण मला तसंच वाटलं; आई बहुदा पुण्याची असावी! मी लगेच त्याला "बोन्जूर" घातलं, बोन्जूर म्हणजे फ्रेंच लोकांचा रामराम! मग तो लगेच नीट, प्रेमानी बोलायला लागला, "बोन्जूर! सो, हाऊ ज्दू यु ज्दू? व्हात आर यू ज्दूईंग हिअर ऑन सॅतर्दे?". मग मी त्याला काय काय झालं ते सांगितलं आणि त्या सकाळच्या ऑब्झर्व्हेशन्सचा लॉग मला पाठवण्याची विनंती केली. "व्हात्स बिग दील अबाऊत इत? आय कान हेल्प यू विज्थ ज्द ज्देता रिदक्शन ऑफ ज्द ज्देत फ्रॉम ज्द लित्ल वन!" "अरे वा, हा तर एकदम मदत करायला तयार आहे तर!", त्याच्या त्या जकारयुक्त फ्रेंच हेलांतून अर्थाचा मागोवा काढत मी विचार केला. त्यानी मला लव्हेल टेलिस्कोपच्या सकाळच्या सत्राचे सगळे लॉग्ज इमेल केले आणि मी पुन्हा त्या छोटू टेलिस्कोपकडे गेले. तिथला सगळा डेटा माझ्या मशीनवर कॉपी केला आणि परत आले. आता आनंद महाराजांनी एक पुस्तक काढून हातावर ठेवलं, "हे गे मॅन्युअल, यात सगलं नीत लिहिलं आहे. तेक युअर ताईम तू रिद्यूस ज्द देता आन्ड गिव मी अ शाऊत इफ यू नीद माय हेल्प." "थ्यँक्स अ लॉट. आणि खरंच तुला दोन वाक्य का होईना मराठीत नीत आपलं, नीट बोलता येतात.", असं म्हणून मी परत आपल्या जागेवर गेले.
पहिल्यांदा लॉग्ज तपासले, इमेलमधे ज्या नवीन एक्स-रे सोर्सचा उल्लेख केला त्याची आणि आम्ही जो नवा सोर्स पाह्यला त्याची पोझिशन जवळजवळ एकच होती, ते दोन्ही एकच सोर्स असावेत असा संशय येण्याइतपत! मग मी छोटू टेलिस्कोपचा "देता" कसा रीड्यूस करायचा यासाठी ते पुस्तक उघडलं. फार काही कठीण नव्हतं. आवश्यक ती सॉफ्टवेअर्स घेतली आणि सुरू केलं. पण आता मात्र वेळ लागत होता. मग मी आधी एक इमेल केला ज्यांनी तो एक्सरे सोर्स पाहिला होता त्यांना, होजेला, आम्ही जी काही निरीक्षणं केली होती त्यांची माहिती पाठवली आणि लवकरच डेटा रीड्यूस करुन पाठवते याचं आश्वासनही दिलं. होजेही नवा सोर्स सापडल्यामुळे आज हापिसातच होता. त्याचाही लगेच थ्यँक्यूचा इमेल आला. तो फारच खूष झाला असणार. त्याला स्वतःलाच आपल्याला नवा सोर्स मिळाल्याचा आनंद होता वर आता न मागता "रेडीओ"मधला डेटा मिळत होता. जर सरधोपट मार्गानी गेला असता तरी त्यात कमीतकमी एखादा दिवसतरी जातोच. आज रात्रीपासून त्याला काही वेळ दुसर्या रेडिओ टेलिस्कोपवर मिळालेला होताच. त्यामुळे आता मला थोडी उसंत होती डेटा रिडक्शन करण्यासाठी आणि जबाबदारी हलकी झाल्यासाअखं वाटत होतं!
चुकत-माकत या नव्या दुर्बीणीच्या डेटावर काम सुरू झालं, तेवढ्यात पुन्हा एकदा कंप्यूटरच्या कंसोलवरची घंटा किणकिणली, नवं इमेल आलं होतं. आता काय त्रास आहे म्हणून जाऊन पाहिलं तर निरुपमचं इमेल होतं, काल तू भांडून गेलीस, मला वाईट वाटलं. मी एवढं तुटेपर्यंत ताणायला नको होतं वगैरे! मलातरी कुठे ताणायचं होतं, मी ही त्याला मलापण वाईट वाटल्याचं सांगितलं. वातावरणातला तणाव एकदम निवळला आणि आमचा इमेल संवाद पुन्हा पूर्वीसारखा सुरू झाला. आणि अचानक त्याचं इमेल आलं, "मला माहित नाही तू माझ्याबद्दल काय विचार करतेस ते! पण मला असं वाटतंय की मी तुझ्या प्रेमात पडलोय." काय बोलावं, काय करावं मला काही सुचलंच नाही. मी तशीच थिजले जागच्याजागी! थोड्या वेळानी त्या धक्क्यातून बाहेर पडले आणि त्याला लिहिलं, "मला तू बर्याच दिवसांपासून आवडतोस. पण बोलावं का न बोलावं असा संभ्रम होता. मी इथे, इंग्लंडमधे आणि तू तिकडे भारतात. हे कसं चालेल मला माहित नव्हतं. अजून साधारण तीनेक वर्ष तरी माझी पीएच.डी. चालेल आणि त्यापुढे मला कुठे नोकरी मिळेल मला माहित नाही. आणि मला आत्तातरी असं वाटत नाही की लग्न करुन, फक्त दोघांना एकाच ठिकाणी नोकरी मिळत नाही म्हणून मी माझा व्यवसाय सोडून देणार नाही. तू नीट विचार कर, मुलीला फक्त 'आपण आवडतो' म्हणून लगेच "they both lived happily ever after" म्हणण्याएवढे पोरकट आपण दोघेही नाही आहोत!". त्याचं लगेचच उत्तर आलं, "ते तर मलाही माहित आहे. आणि लग्न झालं म्हणून स्वतःचं शिक्षण, व्यावसायिक आयुष्य सगळं विसरुन, घरात बसणारी मुलगी मलाही चालणार नाही. आपल्याकडे "पुढे काय" याचा विचार करायला अजून जवळजवळ तीन वर्ष आहेत."; आता मात्र मी संपूर्ण हवेतच होते. थोड्या वेळानी तो ऑफिसमधून घरी गेला. खरंतर आता मला काम करायचा प्रचंड कंटाळा आला होता. आता मला बाहेर जाऊन त्या थंडीतल्या स्वच्छ हवेत बागडावसं वाटत होतं. पण शब्द दिला होता.
परत डेटा रिडक्शन करायला लागले. बरचसं काम संध्याकाळी चारच्या सुमारास संपलं. आता फक्त ते सगळे आकडे एका आकृतीत बंदिस्त करायचे होते. पण आता फार झालं असं वाटलं. ते सगळे आकडे भरले एका फाईलमधे, ते काय आकडे आहेत, अशी सगळी माहितीपण टाईप केली आनी दिली त्या सोर्सवाल्या, होजेला, पाठवून! त्याच्याकडून थोड्या वेळात धन्यवादाचा इमेला आला आणि मी थोडी शांत बसले. तेवढ्यात कोणीतरी बाहेरुन चालत येतंय असा आवाज आला. कोणीतरी मुलगी असणार, कारण पेन्सिल हील्स वाजत होते बाहेर! यावेळेला कोण आलं इकडे? तेवढ्यात माझ्या ऑफिसचं दार उघडलं. त्या मोठ्या खोलीत मी दाराच्या बरोब्बर दुसर्या टोकाला, दाराकडे पाठ करून बसायचे. आज संपूर्ण इमारतीतच शुकशुकाट होता. आता कोण असेल असा विचार येतो न येतो तोच मागून एक अत्यानंदी आवाज आला, "हे सन्हिता, आय पास्ड द ड्रायव्हिंग टेस्ट! नाऊ आय कॅन ड्राईव्ह!". जेनी! लगेचच उठून मी ब्रिटीश पद्धतीनी, मिठी मारून, तिचं अभिनंदन केलं. तिला झालेला आनंद दिसतच होता तिच्या चेहर्यावर! आता मला कारणही मिळालं होतं आणि कंपनीही, आनंद व्यक्त आणि साजरा करायला! आम्ही लगेच ठरवलं आता संध्याकाळी जेवायला पबमधे जायचं. "पण एक मिनिट!", माझ्या डोक्यातला शंकासूर कधीही शांत बसत नाही, "आपल्याकडे कार कुठे आहे, एवढ्या थंडी-वार्यात चालत जायचं?". "हाहाहा, मी त्याची सोय आधीच केली आहे. टेस्ट पास झाले म्हणून आईनी तिची गाडी दिली मला, मी माझी घेईपर्यंत!" जेनी तयारीनिशी आली होती. "ठीक आहे मग, धमाल करु, आपण. पण आता घरी जाऊ या, मी दमल्ये खूप आणि तुला काही सांगायचंय मला!"
मी माझा पसारा आवरला आणि तिच्या गाडीकडे जायला लागलो. तिला आधीपासून निरुपम ऐकून माहित होताच. मी तिला काय काय झालं ते सांगितलं. "वाव! दॅट्स ग्रेट! आज तू नाही म्हणालीस तर बघ, आज तुला माझाबरोबर 'सेलिब्रेट' करायला लागणारच!", आता हिला काय म्हणानार? "ते सगळं ठीक आहे गं, पण तू दारु पिणार आणि मीपण! मी तर लायसन्स मिळाल्यापासून कधी गाडी चालवलीपण नाही आहे. आपण तिथे पबमधे दारु प्यायली तर परत कशा येणार?" माझी शंका रास्त होती. "ठीक आहे काही हरकत नाही. आपण आधी होम्स चॅपलला जाऊ, तिथल्या दुकानात आपल्याला वाईन मिळेलच. मग पबमधे जाऊन जेवू आणि मग घरी येऊन बाटली उघडता येईल?" आता का-कू करायला काही जागाच नव्हती. जेनीचा प्लॅन फुलप्रूफ होता. आम्ही घरी आलो, डेव्ह आणि मिंगपण घरी होते त्यांनाही सांगितलं. संध्याकाळी सगळ्यांनी पबमधे जेवायला जायचं ठरवलं. मी सकाळी फार लवकर उठले होते त्यामुळे आता दमल्यासारखं झालं होतं. दिवसभर डोक्यालाही फार त्रास करवून घेतला होताच आणि शिवाय रात्री घरी आमची पार्टी किती वेळ चालेल याचीही कल्पना नव्हती. जेवायला जाण्यासाठी अजून दीडेक तास होता, मी म्हटलं, "मी तासभर आराम करते. साडेसहाला निघायचंय, सव्वासहापर्यंत मी येते खाली." या सगळ्या गोंधळात मी माईकच्या ऑब्झर्व्हेशन्सबद्दल आणि त्या नव्या एक्सरे सोर्सबद्दल विसरूनच गेले होते. सगळ्यांना तात्पुरता बाय करून मी वर पहिल्या मजल्यावर, माझ्या खोलीत आले. बॅग भिरकावून दिली एका कोपर्यात, पडदे ओढून खोलीत रात्र केली आणि दिवाणावर झोकून दिलं स्वतःला! बरं वाटलं आडवी झाल्यावर, कधी डोळा लागला समजलंच नाही. आणि थोड्या वेळानी काचेवर टकटक आवाज येताहेत असं वाटलं.
क्रमशः
प्रतिक्रिया
21 Sep 2008 - 5:56 pm | सुनील
हा भागही छान उतरलाय.
त्या आनंदशी मराठीत बोलणं झालं की नाही कधी?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
21 Sep 2008 - 6:02 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
>> त्या आनंदशी मराठीत बोलणं झालं की नाही कधी?
हो आजच भाग लिहिला तेव्हा! बाकी आपल्या आंद्या, आनंदयात्रीशी, मी मराठीतच बोलते.
ते पात्र खोटं आहे, आणि आंद्याच्या हलकट्टपणाचा बदला म्हणून त्याला इथे घुसडला आहे! :-D
21 Sep 2008 - 7:19 pm | सुनील
ते पात्र खोटं आहे, आणि आंद्याच्या हलकट्टपणाचा बदला म्हणून त्याला इथे घुसडला आहे!
अस्सं आहे काय? हा "पिंट" माझ्या लक्षातच आला नाही!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
21 Sep 2008 - 9:49 pm | आनंदयात्री
काही लोकांचा मराठी आंतरजालावर आपापले उद्योग (देशा - परदेशातुन), क्लासेस सोडुन वावरण्याचा एकमेव मोटो आंद्याला विरोध करणे हाच्च आहे. पण हा आंद्या अशा हजार विरोधकांना खांद्यावर घेउन वावरतो हे विसरु नका.
आपलाच,
आंद्या अंतरकर
*संस्कृत आणी शुद्धलेखन आमचे ऍड्रिनलिन आहे*
21 Sep 2008 - 10:08 pm | इनोबा म्हणे
काही लोकांचा मराठी आंतरजालावर आपापले उद्योग (देशा - परदेशातुन), क्लासेस सोडुन वावरण्याचा एकमेव मोटो आंद्याला विरोध करणे हाच्च आहे. पण हा आंद्या अशा हजार विरोधकांना खांद्यावर घेउन वावरतो हे विसरु नका.
साला, आपला आंद्या अंतरकर आहेच नंगा फकीर!
(दूनियादारी फाट्यावर मारणारा) इन्या मारझोडकर
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
21 Sep 2008 - 11:01 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
पण हा आंद्या अशा हजार विरोधकांना खांद्यावर घेउन वावरतो हे विसरु नका.
काय हो अंतरकर महाशय, तुमचा हजार विरोधकांना घेऊन वावरणारा खंदा खांदा आहे तरी किती मोठा?
(गणिती) अदिती
22 Sep 2008 - 1:19 am | अभिज्ञ
हा आंद्या सिंग च तर एलियन नव्हे?
:)
(साशंक) अभिज्ञ.
(आंद्या ह.घे. रे बाबा. ;))
22 Sep 2008 - 6:31 am | विसोबा खेचर
पण हा आंद्या अशा हजार विरोधकांना खांद्यावर घेउन वावरतो हे विसरु नका.
शाब्बास रे आंद्या! शोभलास खरा माझा शिष्य! माझी भाषा आता सर्रास बोलू लागलास! :)
एक लहानशी सुधारणा - वरील वाक्य,
पण हा आंद्या अशा हजार विरोधकांना अंगाखांद्यावर बाळगून असतो हे विसरु नका.
असं हवं होतं! म्हणजे थोडा अधिक पंच येतो... :)
लग रहो....
आपला,
(खुद्द मिपावरच अनेक विरोधक लाभलेला! परंतु त्यांनाही बिनधास्त फाट्यावर मारणारा) तात्या अभ्यंकर.
--
मिपावरचे काही विरोधक पुण्यात कट्ट्यांना वगैरे भेटतात परंतु येथे मात्र नावं बदलून तात्याला शिव्या घालतात! :)
अन्य काही संस्थळांवरची मंडळी तात्याद्वेषापायी स्वतंत्र ब्लॉग काढू लागली आहेत! :)
22 Sep 2008 - 3:39 pm | इनोबा म्हणे
बाकी काही म्हणा, कट्टे करणार्यांवर एका 'अंमळ वेडझव्या'सदस्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून 'ग्रुपीझम'च्या गोळ्या झाडणारा 'संत' ही ही आहे इथे.
कट्टे करणारांनो जरा सांभाळून बरं का! काही विशष्ट लोकांच्या नावाचा जयजयकार नाही केला तर तुम्ही 'ग्रुपीझम' करत आहात हे लक्षात ठेवा.
(असल्या हजार आंडू पांडूना कोलणारा) इन्या कोलंबस
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
21 Sep 2008 - 6:00 pm | अवलिया
थोड्या वेळानी काचेवर टकटक आवाज येताहेत असं वाटलं.
भास झाला की आले एलीयन?
ढण्टडण...
उत्तम
पुढील भाग लवकर येवु द्या
नाना
21 Sep 2008 - 6:53 pm | अभिज्ञ
कथेला चांगली गती आहे.
हा भाग सुध्दा उत्तम जमलाय.
वाचायला मजा येतय अन कुठेहि बोर होत नाहि हे खास.
अभिज्ञ.
22 Sep 2008 - 12:31 pm | टारझन
आज्जे ... लै झकास लिवलय ... काय माहित मी काल "स्पेसिज-३" पाहिला म्हणून की काय ... पण तुझी कथा वाचताना समरस झालो होतो ... बाकी जर कोणी तुझ्या सारखे १००० जण खांद्यावर बसवत असेल तर मला पण बोलव ... माझं इवलंस वजन पण पेलेल खांदेकरी .... :) पाहुया १००१ लोक्स घेतो का ? (अरेच्चा पण तो विरोधक म्हंटला नाही का ? स्वारी स्वारी .. मी असेच गम्मतीने राइट मारायची म्हणून म्हंटलं व्हतं ... आनंद आहे आम्हाला )
पण आज्जे .. गरज लागली की नातवाला ऑऑऑव्वॉऑवॉवॉवॉव् करून आवाज दे बरं
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
21 Sep 2008 - 6:57 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
छान लिहिता ताई. सर्व भाग वाचले.
22 Sep 2008 - 11:38 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
छान लिहिता ताई. सर्व भाग वाचले.
काका, एकदा स्वतःला काका म्हणवता, एकदा मला ताई म्हणता .... मला आता थोडी समुपदेशनाची गरज आहे.
21 Sep 2008 - 7:19 pm | राघव
हां... आता कसे जरा बरे वाटले! :D मस्त उतरलाय हा भाग पण!!
..आणि थोड्या वेळानी काचेवर टकटक आवाज येताहेत असं वाटलं.
वा वा.. एलियन्सनी एण्ट्री घेतली का काय? 8>
येऊ द्यात पुढचा भाग... वाट बघतोय :)
(उत्सुक) मुमुक्षु
21 Sep 2008 - 7:22 pm | शितल
आदिती,
मस्त लिहीत आहेस.
आणि लवकर लवकर दुसरे भाग वाचायला देत आहेस हे उत्तम आहे.
:)
21 Sep 2008 - 7:31 pm | इनोबा म्हणे
मस्त चालू आहे. एलियन केव्हा येणार याची उत्सुकता आहे.
ते पात्र खोटं आहे, आणि आंद्याच्या हलकट्टपणाचा बदला म्हणून त्याला इथे घुसडला आहे!
हलकट सांप्रदायाचे संस्थापक श्री श्री आनंदयात्रीजी उर्फ ह.भ.प. आंद्या हलकट्ट यांचा विजय असो!
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
21 Sep 2008 - 7:54 pm | उर्मिला००
आदिती,या भागाचा शेवट अगदी वाचनास आतुर करणारा,उत्कन्ठावर्धक आहे.लाजवाब!!!!!!!!
21 Sep 2008 - 8:06 pm | ब्रिटिश टिंग्या
>>आणि थोड्या वेळानी काचेवर टकटक आवाज येताहेत असं वाटलं.
एलियन आला वाट्टं ;)
असो, छान लिहीते आहेस!
पुढच्या भागाची वाट बघत आहे!
>>हलकट सांप्रदायाचे संस्थापक श्री श्री आनंदयात्रीजी उर्फ ह.भ.प. आंद्या हलकट्ट यांचा विजय असो!
हो हो! विजय असो! विजय असो!
- ब्रिटिश टिंग्या
21 Sep 2008 - 8:30 pm | आनंद
मस्त कथा, वेगही चांगला आलाय, ईतके टेकनिकल डिटेलस असलेली कथा होर्सेस माउथ कडुन एकताना मजा येतेय्.खरच चालु असल्यासारखे वाटतय.
सुरवातिला वास्तव व आता कल्पना यांचा मेळ छान जमलाय.
(जयंत नारळीकरांच्या कथांचा पंखा -आनंद)
21 Sep 2008 - 9:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कथा कथन वेग घेत आहे. हाही भाग झकास झालाय.
जकारयुक्त फ्रेंच हेल तर लै भारी. :)
21 Sep 2008 - 9:40 pm | आनंदयात्री
दिस भाग इज आल्सो वेरी गुद !!
आय एम प्राउद ऑफ यु दॅत यु आर कंतिन्युइंग दि ग्रेत हलकत परंपरा ऑफ योर गुरु आंद्या हलकत :)
-
आनंद राजविर सिंग
कंत्रोलर
(छोतु दुर्बिन)
म्यांचेस्तर, युनियन किंगदम !!
*संस्कृत आणी शुद्धलेखन आमचे ऍड्रिनलिन आहे*
22 Sep 2008 - 11:20 am | विजुभाऊ
काही लोकांचा मराठी आंतरजालावर आपापले उद्योग (देशा - परदेशातुन), क्लासेस सोडुन वावरण्याचा एकमेव मोटो आंद्याला विरोध करणे हाच्च आहे. पण हा आंद्या अशा हजार विरोधकांना खांद्यावर घेउन वावरतो हे विसरु नका.
आपलाच,
आंद्या अंतरकर
आन्द्या खान्देकरी म्हंटले तर बरे होईल.
"खन्द्या आन्द्याचा खान्दा"
तिरडी बान्धा रे तिरडी बान्धा रे
द्या त्याला खन्द्या आन्द्याचा खान्दा रे खान्दा रे....
::::::हलकट्ट आन्द्याचा विजुभाऊ असो
तुमची प्यान्ट ढील्ली होत असेल तर जाडी कमी झाल्याची तारीफ करू नका, हे मान्य करा की प्यान्टची नाडी ज्योतिषा कडे विसरलात
22 Sep 2008 - 11:40 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
आंदू,
द म्हणताना ज जोड त्याला, म्हणजे तुझं नाव आनंज्दयात्री, असं ....
आणि आपण छोटू नाही मोठ्या दुर्बिणीसाठीच तैनात केलेले आहात, आणि हुशारही आहात (तेव्हा आता तरी जरा बरे वागा!)
(ष्टुरी टेलर) अदिती
22 Sep 2008 - 11:47 am | आनंदयात्री
>>(तेव्हा आता तरी जरा बरे वागा!)
म्हणजे काय हो ? आमच्याबद्दल काही तक्रार आहे का तुमची ?
*संस्कृत आणी शुद्धलेखन आमचे ऍड्रिनलिन आहे*
21 Sep 2008 - 10:55 pm | नंदन
अर्थात वेली गुद. हा भागही आवडला.
अवांतर - आनंद राजवीर सिंग 'जे जे जगी जगते तया' कसे म्हणेल, हा विचार करतो आहे :)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
22 Sep 2008 - 12:48 am | मृदुला
चारही भाग वाचले. चांगले चालले आहेत. याचे वेगाने पुढचे भाग यावेत. :-)
याचा फ्रेंच उच्चार 'त्खैब्यां' असा आहे असे वाटते.
22 Sep 2008 - 9:43 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
की काय जे आहे ते काय आहे? मला फ्रेंचमधलं बोन्जूर आणि मेस्सी सोडून बाकी काही येत नाही. हा, फ्रेंच लोकांच्या उच्चाराची थोडी खिल्ली उडवता येईल बोलतानाही, पण त्यापुढे नाही ....
मदत, मदत, मदत.
अदिती
22 Sep 2008 - 2:40 am | रेवती
दु:ख काय असतं हे जाणून घे.
पुढचे भाग लवकर लवकर लवकर टाक.
रेवती
22 Sep 2008 - 6:10 am | प्राजु
संहिता,
तुझ्या या लेखनाचा पहिला भाग वाचल्यानंतर पुढचे भाग वाचले गेलेच नाहीत माझ्याकडून. बरीच कारणं आहेत. वेळ नव्हता मिळत पुरेसा.. आणि बरीच. त्यातलं एक कारण म्हणजे मला क्रमशः लेखनाचा कंटाळा येतो.
आज सगळेच भाग वाचले. छान झाले आहेत सगळे. उत्कंठावर्धक आहेत. पुढचे सगळे लेखन कमितकमी भागांत म्हणजे कमितकमी क्रमशः मध्ये लिहायचा प्रयत्न करशील का?
लेखन शैली तुझी आवडली मला. आणि मुख्य म्हणजे फोटोग्राफ्स सगळे छान आहेत.
अभिनंदन.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
22 Sep 2008 - 7:49 am | घाटावरचे भट
कथेचा फ्लो उत्तम जमला आहे, एलियन एवढ्यात नाही आला तरी चालेल....सगळ्यांना पात्रांना नीट एस्टॅब्लिश करा एलियन येण्यापूर्वी ;)...
बाकी सगळं जबरीच...लवकरात लवकर पुढचे भाग टाका ही विनंती!!!
--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
22 Sep 2008 - 8:52 am | मदनबाण
यम्मी ताई हा भाग पण छान झाला आहे,पुढील भागत काय याची उत्सुकता आहे.
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
22 Sep 2008 - 9:57 am | बिपिन कार्यकर्ते
मस्तच गं यमे...
कथा वेग घेते आहे. तू भागही पटापट टाकते आहेस, मजा येतेय. आणि तुझ्या फ्रेंच बद्दल काय बोलावे? ते ज्दू, ज्दूईंग वगैरे थोरच...
बिपिन.
22 Sep 2008 - 11:43 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
आणि तुझ्या फ्रेंच बद्दल काय बोलावे? ते ज्दू, ज्दूईंग वगैरे थोरच...
तुमचा खेळ होतो, पण आमचा जीव जातो! ते फ्रेंच लोकं बोलायला लागले की एवढा त्रास होतो ना समजून घेताना! आज बदला घेता आला ... पण दुर्दैव, त्या लोकांना मराठी येत नाही माझं दु:ख समजून घेण्यासाठी... :-d
22 Sep 2008 - 10:56 am | ऋचा
४-५ भाग एकदम वाचले. मस्त झालेत :)
एलियन आले का ग?
ते दार वाजवून येतात का? :?
>>हलकट सांप्रदायाचे संस्थापक श्री श्री आनंदयात्रीजी उर्फ ह.भ.प. आंद्या हलकट्ट यांचा विजय असो!
विजय असो! विजय असो! :D
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
22 Sep 2008 - 11:16 am | मेघना भुस्कुटे
आंद्या चमकतोय! आंद्या हलकट्ट यांचा विजय असो...
यमे, मस्त चाललं आहे. येऊ द्या लवकर.
22 Sep 2008 - 11:17 am | ऋषिकेश
वा वा वा!
मसालेदार कथेत आता तर "प्रेमळ" फोडणी देखील.. कथा चहुअंगाने बहरतेय..
फक्त आता एलियन येऊ दे नाहितर शेवटी सांगु नको की मीच एलियन होते म्हणून ;)
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
22 Sep 2008 - 11:42 am | मनस्वी
हा पण भाग झकास!
मनस्वी
*डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.*
22 Sep 2008 - 12:09 pm | प्रभाकर पेठकर
वा... मस्त आहे लेखन. आवडते आहे.
मसालेदार कथेत आता तर "प्रेमळ" फोडणी देखील.. कथा चहुअंगाने बहरतेय
'तो'च तर एलियन नाही नं?
22 Sep 2008 - 12:16 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
>> 'तो'च तर एलियन नाही नं?
नाही हो काका, परत आल्यावर मी लग्न केलं त्याच्याशी! एवढं लांबचं सासर नाही शोधलं मी!
22 Sep 2008 - 12:29 pm | स्वाती दिनेश
अदिती,हा भाग पण मस्त!! पुढे काय? ची उत्सुकता फार ताणू नको बरं..:)
स्वाती
22 Sep 2008 - 6:18 pm | अनामिक
पहिला भाग वाचला होता... त्यानंतर वाचने जमले नाही... आज सगळे भाग वाचताना मज्जा आली... मस्त जमलेत सगळेच भाग... तू ('तू'च म्हणतो) वर कुठेतरी लिहलेस कि आनंद हे खरे पात्र नहिये... असं असेल तर मला वाटतं कि तसे करण्याची काहिच गरज नव्हती... म्हणजे तू लिहलेच एवढे छान कि त्या आनंदमूळे काहि फरक पडला नसता.
पुढचे भाग लवकर येऊ दे आता!
अनामिक