✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मनातलं जनांत

ग
गणपा यांनी
Mon, 12/26/2011 - 13:20  ·  लेख
लेख
गेले काही वर्षे मी ब्लॉगबद्दल बरचं ऐकुन होतो. मध्यंतरी दोन एक वर्षांपुर्वी 'स्टार-माझा'ने ब्लॉगर्सची स्पर्धा ही भरवली होती आणि आपल्या मित्रांनी त्यात बक्षिसही पटकावली होती. ते सगळ पाहुन फार कौतुक वाटलं सगळ्यांच. आपलाही एखादा ब्लॉग असता तर असा विचार क्षणभर मनात डोकावून गेला. पण ज्याला चार ओळी धड टंकता येत नाहीत त्याचा ब्लॉग? आणि समजा जरी काढला (त्याला पैशे थोडीच लागतात ;) ) तरी त्यात लिहायचं काय? शाळेत सुद्धा ५-१० मार्कांचं पत्रलेखन आणि निबंध ऑप्शनला टाकणारे आम्ही. माझा ब्लॉग? हौसे खातर थातुर मातुर पाककृत्या करणार्‍या मला आंतरजाला वरील काही स्नेह्यांनी पाककृतींचाच ब्लॉग काढायचं सुचवलं. आज करु-उद्या करू असं करत मी टाळत होतो. कारण मी अनेक ब्लॉग पाहिले होते की जिथे मंडळी उत्साहात सुरवात तर करतात पण मग महिनोंन महिने / वर्षे काही लिहितच नाहीत. माझं ही तसचं काहिस होईल अशी भिती मनात होती. एके दिवशी राजे स्वतःच मला म्हणाला हवं तर मी तुला ब्लॉग बनवून देतो. तु फक्त हो म्हण. त्याचा हा माझ्या वरचा विश्वास माझा मलाच हुरुप देउन गेला. आणि बरोब्बर गेल्या वर्षी याच दिवशी खा रे खा चा जन्म झाला. राजेने लागेल तशी मदत केलीच. प्राजू ताई आणि माझ्या ताईने मला या ब्लॉगसाठी एकदम समर्पक नाव सुचवलं. नाताळची सुट्टी होतीच हाताशी धडाधड सगळ्या जुन्या पाककृत्या टाकण्याचा सपाटा लावला. मित्रं मंडळींना ब्लॉगचं रुप रंग आवडलं. त्यांनी त्यांच्या मित्रांकडे चार कौतुकाचे शब्द काढले. खवय्या तात्याने तर चक्क त्यावर एक लेखच लिहून प्रकाशित केला. एका दिवसात जवळ जवळ ५०० हिट्स् मिळाल्या. एकदम खुश झलो. अहो सामान्य माणुस मी. आपल्या कामाचं कौतुक झालेलं कुणाला नको असतं. :) १०००, १०,०००, २०,००० असे टप्पे पार होत होते. दरम्यान नवीन पाककृती येतच होत्या. आज एका वर्षा नंतर जवळ पास ८० पाककृत्या झाल्या आहेत. आणि तब्बल ४२,६०० हिट्स. यात सर्व मिपाकर, मीमकर, बझकार, अन्य ब्लॉगर्स आणि मायबोलीकरांचा मोलाचा वाटा आहेच. तुम्हा सर्वांचे आभार मानून मला तुमच्या ऋणांतुन मुक्त व्हायचं नाही कारण तुमचा हा लोभ मला असाच हवाय. :) माझ्यासाठी तेच उत्तेजक आहे. नतमस्तक -गणपा हा पदार्थ इथे बरेच वेळा येउन गेल्यामु़ळे इथे पाककृती देत नाहीये. (स्वाती ताईची कृती १ , २ आणि ही सुबक ठेंगणी यांची)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
17219 वाचन

💬 प्रतिसाद (44)

प्रतिक्रिया

..

मी-सौरभ
Mon, 12/26/2011 - 13:27 नवीन
तुमच्या ब्लॉगला 'वाढदिवसाच्या शुभेच्छा'!!
  • Log in or register to post comments

अरे वा ! शुभेच्छा आमच्या पण

पियुशा
Mon, 12/26/2011 - 14:18 नवीन
अरे वा ! शुभेच्छा आमच्या पण :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

हॅपी बर्थ डे

शाहिर
Mon, 12/26/2011 - 13:30 नवीन
अभिनंदन गंपा
  • Log in or register to post comments

सही रे...

मन१
Mon, 12/26/2011 - 13:36 नवीन
भुकेल्या पोटानं असला खादाडीचा ब्लॉग वाचणं शिक्षा असते म्हणून आमेहे तसेही टाळतोच. पण शुभेच्छा आहेतच.
  • Log in or register to post comments

मस्त हो गणपाशेठ. अभिनंदन.

प्रचेतस
Mon, 12/26/2011 - 13:36 नवीन
मस्त हो गणपाशेठ. अभिनंदन.
  • Log in or register to post comments

झकास

विवेक मोडक
Mon, 12/26/2011 - 13:44 नवीन
हार्दिक अभिनंदन बल्लवाचार्य
  • Log in or register to post comments

+१

छोटा डॉन
Mon, 12/26/2011 - 14:12 नवीन
हेच म्हणतो. पुढील कारकिर्दीसाठी भरगच्च शुभेच्छा आणि खुपसारे प्रोत्साहन :) - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक मोडक

शुभेच्छा.

अप्पा जोगळेकर
Mon, 12/26/2011 - 13:48 नवीन
शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

गणपाशेठ, अभिनंदन

सविता००१
Mon, 12/26/2011 - 14:13 नवीन
आणि खूप खूप शुभेच्छा!!!!
  • Log in or register to post comments

अभिनंदन आणि खूप खूप

प्यारे१
Mon, 12/26/2011 - 14:18 नवीन
अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!!!!
  • Log in or register to post comments

झकास !

परिकथेतील राजकुमार
Mon, 12/26/2011 - 14:21 नवीन
अभि चे नंदन रे गणपा :)
  • Log in or register to post comments

अभिनंदन!!

स्मिता.
Mon, 12/26/2011 - 14:23 नवीन
'खा रे खा' ला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

अभिनंदन

सोत्रि
Mon, 12/26/2011 - 14:30 नवीन
गणपाभौ, अभिनंदन हो! - (खवैय्या) सोकाजी
  • Log in or register to post comments

वावावा..

स्वाती दिनेश
Mon, 12/26/2011 - 14:36 नवीन
'खा रे खा' ला पहिल्या वाढदिवसाच्या खूप सार्‍या शुभेच्छा! पाकृंच्या शतकी वाटचालीची वाट पाहत आहेच.. स्वाती
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन

कवितानागेश
Mon, 12/26/2011 - 14:38 नवीन
हार्दिक अभिनंदन
  • Log in or register to post comments

अभिनंदन गणपाशेट.

मृत्युन्जय
Mon, 12/26/2011 - 14:40 नवीन
अभिनंदन गणपाशेट.
  • Log in or register to post comments

छान ब्लॉग आहे

रणजित चितळे
Mon, 12/26/2011 - 14:47 नवीन
मला माहित नव्हते. आत्ताच फॉलो करायला सुरवात केली. आपल्या ब्लॉगला शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

अभिनंदन रे गणपा !! पण ...मालक

सुहास..
Mon, 12/26/2011 - 14:48 नवीन
अभिनंदन रे गणपा !! पण ...मालक अजुन संपले नाही ! अजुन येवु देत !
  • Log in or register to post comments

अभिनंदन

अन्या दातार
Mon, 12/26/2011 - 15:02 नवीन
अशीच वाटचाल चालू राहुदे.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

दिपक
Mon, 12/26/2011 - 15:13 नवीन
अभिनंदन आणि शुभेच्छा रे गणपा!! :-) ४२,६०० तो झांकी है १,०००,०००,००० अभी बाकी है!
  • Log in or register to post comments

अभिनंदन

michmadhura
Mon, 12/26/2011 - 15:16 नवीन
'खा रे खा' ला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन!

साधामाणूस
Mon, 12/26/2011 - 15:31 नवीन
गणपाशेठ अभिनंदन! तुमच्या पाककृतींबरोबरच तुमचा विनयशील स्वभावही आवडतो.
  • Log in or register to post comments

जबरदस्त बल्लवाचार्य

मैत्र
Mon, 12/26/2011 - 15:38 नवीन
एक से एक पदार्थ .. अतिशय डिट्टेलवार आणि उपयुक्त माहिती.. बेश्ट .. खा रे खा ला शुभेच्छा.. असेच अनेक वाढदिवसाचे तिरामिसु, बकलावा, लाडू इ. इ. येत राहोत :) गणपा भौ -- बॅचलर्स चे म्हणून जे पदार्थ आहेत ते सुद्धा बरेच वेळखाऊ आहेत. काही सोपे, कमी वेळ लागणारे पदार्थ टाका ... खूप जणांना उपयोग होईल...
  • Log in or register to post comments

गणपाभाऊ,

प्रास
Mon, 12/26/2011 - 15:44 नवीन
तुम्ही आमच्यासाठी द्रोणाचार्य आहात आणि आम्ही तुमचे एकलव्याच्या भावनेने बनलेले शिष्य आहोत. माझ्यासारख्या नुसत्या खाण्यात हुशार असणार्‍याला तुम्ही स्वयंपाकाकडे ओढलेलं आहे. तुमच्या ब्लॉगच्या साहाय्यानेच आमची चिमुकली (नसलेली) पावले स्वयंपाक घरात पडली आणि तिथेच रमली आहेत. तुमच्या ब्लॉगला ह्याप्पी बड्डे! आणि तुमच्या ब्लॉग-प्रपंचाला आमच्या (म्हणजे माझ्या) हार्दिक शुभेच्छा! :-)
  • Log in or register to post comments

गण्या भो*** लै लै शुभेच्छा

बिपिन कार्यकर्ते
Mon, 12/26/2011 - 15:59 नवीन
गण्या भो*** लै लै शुभेच्छा लेका! नाव काढलंस मित्रा!
  • Log in or register to post comments

अरे वा!

सर्वसाक्षी
Mon, 12/26/2011 - 16:01 नवीन
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन

नंदन
Mon, 12/26/2011 - 16:33 नवीन
अभिनंदन गणपाशेठ, आणि 'खा रे खा'ला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

चिअर्स मेट!

धमाल मुलगा
Mon, 12/26/2011 - 16:38 नवीन
उत्तरोत्तर तुला अनेकानेक पाककृती करायला वेळ मिळो, त्या तू अशाच प्रसिध्द करत राहोस आणि एके दिवशी तरलादलाल.कॉम किंवा संजीवकपूर.कॉम ह्यांचादेखील वाचकवर्ग तुला लाभो अशी श्री शंभूचरणि विनम्र प्रार्थना! :)
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

समीरसूर
Mon, 12/26/2011 - 16:41 नवीन
ब्लॉग सतत चालू ठेवणं आणि त्याला लोकप्रिय बनवणं हे खरच कर्मकठीण आहे. मला अजून जमलेलं नाही. प्रॉब्लेम तोच, काय लिहायचं हेच कळत नाही. एक ब्लॉग माझा मेला या हलगर्जीपणामुळे. त्याचे रीतसर क्रियाकर्म करून मी दुसरा काढला पण त्याची पण अवस्था तशीच आहे. कधी मान टाकेल सांगता येत नाही. आपलं कौतुक याचमुळे वाटतं. चिकाटी फार महत्वाची. आमची चिकाटी अजिबात चिकट नाही; खूपच सैल आहे... जाऊ द्या, तुमचं मात्र अभिनंदन! आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा!!! --समीर
  • Log in or register to post comments

माझं एक स्वप्न आहे.एक दिवस

यकु
Mon, 12/26/2011 - 20:56 नवीन
माझं एक स्वप्न आहे. एक दिवस मला फक्त माझ्याच हातानं तयार झालेल्या पाकृ खायच्या आहेत.. आणि त्यासाठी गंपा भाऊचा ब्लॉग मेन सोर्स आहे. तुमच्या ब्लॉगला वाढ्दिवसाच्या शुभेच्छा! असेच चविष्टपणे वाढत रहा ;-)
  • Log in or register to post comments

सन्माननिय बल्लवाचार्य श्री

मदनबाण
Mon, 12/26/2011 - 21:02 नवीन
सन्माननिय बल्लवाचार्य श्री श्री श्री १००८ गणपासेठ यांच्या 'खा रे खा'ला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!! :) (शुभेच्छु: खादाड आणि मंडळी) ;)
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!

स्वाती२
Tue, 12/27/2011 - 06:09 नवीन
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

गणपाशेट यांना वाढदिवसाच्या

पाषाणभेद
Tue, 12/27/2011 - 06:45 नवीन
गणपाशेट यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. आता खरोखरीची खाण्याची पार्टी पाहीजे. नुसत्या डिशा पाहून लाळग्रंथी सुकून गेल्यात.
  • Log in or register to post comments

गणपाशेट यांना वाढदिवसाच्या

पाषाणभेद
Tue, 12/27/2011 - 06:45 नवीन
गणपाशेट यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. आता खरोखरीची खाण्याची पार्टी पाहीजे. नुसत्या डिशा पाहून लाळग्रंथी सुकून गेल्यात.
  • Log in or register to post comments

अभिनंदन हो ब्लॉगचे मालक...

प्रभो
Tue, 12/27/2011 - 06:52 नवीन
अभिनंदन हो ब्लॉगचे मालक...
  • Log in or register to post comments

अभिनंदन अभिनंदन अभिनंदन

५० फक्त
Tue, 12/27/2011 - 06:53 नवीन
अभिनंदन अभिनंदन अभिनंदन
  • Log in or register to post comments

गंपा.. मला एकदा माझ्या

अर्धवट
Tue, 12/27/2011 - 08:37 नवीन
गंपा.. मला एकदा माझ्या हातानं (मॅगी व चहा सोडून) काही पदार्थ बनवून खायचा आहे अशी महत्वकांक्षा माझ्या मनात निर्माण करणारा माणूस आहेस तू.. माझ्यासारख्या आळशी माणसाच्या मनात असे वेडे विचार सोडायला खूप कर्तुत्व लागतं बाबा..
  • Log in or register to post comments

अभिनंदन गणपा....

प्रसन्न केसकर
Tue, 12/27/2011 - 12:04 नवीन
खा रे खा चा मी फॅन आहे.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

निश
Wed, 12/28/2011 - 10:14 नवीन
मनापासुन अभिनंदन आणि शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

अभिनंदन रे!

पैसा
Wed, 12/28/2011 - 19:15 नवीन
वाढदिवसानिमित्त एखादा नवा शाकाहारी प्रयोग नाही का केलास? (म्हणजे परा खूष झाला असता.)
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन

जाई.
Wed, 12/28/2011 - 22:52 नवीन
हार्दिक अभिनंदन
  • Log in or register to post comments

अभिनंदन अन अजुन पाकृ खास करुन

शिल्पा ब
Wed, 12/28/2011 - 23:38 नवीन
अभिनंदन अन अजुन पाकृ खास करुन व्हेज.. येउ द्या.
  • Log in or register to post comments

आंम्ही मागे म्हंटल्या प्रमाणे

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 12/29/2011 - 00:22 नवीन
आंम्ही मागे म्हंटल्या प्रमाणे आद्य खाद्य साहित्तीक श्री.गणपा भाऊ यांचे व त्यांच्या तश्याच ब्लॉगचे प्रथम वर्षपूर्ती बद्दल हार्दिक अभिनंदन ...व पुढिल वाटचालीस शुभेच्छा :-)
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

विकास
गुरुवार, 12/29/2011 - 00:39 नवीन
अभिनंदन गणपा! तुमच्या रेसिपीज आणि ब्लॉगचे फॅन आहोतच. पण तुम्ही केलेले,हे पदार्थ, नक्की कसे लागतात हे आम्हाला कधी कळणार? :-)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा