याझिदींसाठी प्रार्थना करा कि स्वप्नात त्यांना बायबलमधील देव भेटो!
इसीसच्या आत्मा आढळून आल्याची अधून मधून वृत्ते असतात तरीही त्यांच्या इराक मधील याझिदी मुर्तीपूजकांवरील जुलमांचे मुख्यपर्व संपल्याला जवळपास दहा वर्षे झाली. त्यांच्यावरील छळ काळात मिपावर एक धागा लेख लिहिला होता. इसीसचा हेतु याझिदी कुराणमधील देव स्विकारत नाहीत तो पर्यंत चक्कचक्क पराजित याझिदींचा गुलाम म्हणून वापर करणे होता, याझिदी स्त्रीया आणि कुटूंबांचे पुढे काय झाले? मेदिहा हि गेल्या वर्षी आलेली एक डॉक्युमेंटरी
युरोमेरीकन बायबलदेव सेवी संस्थांनी त्यांना मदतीचा हात देऊ केला नही असे नाही, पण स्वतःचा देव जपुपाहणार्या याझिदींना या मदतीच्या हाता मागे त्यांना बायबलचाच देव खरा असल्याचे पटवण्याची संधी मिळवणे हा हेतु होता अगदी २०१५ मधले व्हॉईस ऑफ अमेरीकाचेच वृत्त उपलब्ध आहे. आता याची पुन्हा का आठवण यावी? तर बर्याचवर्षांनी आज गुगल न्यूज चाळताना "Pray Yazidis will encounter the God of the Bible through a dream or vision if they have no access to a believer who can tell them about Jesus." या गुगल बातम्यांच्या मथळ्यात आलेल्या दिसल्या. एकुण विवीध धर्मीय मिशनरींच्या सगळ्या जगाला शहाणे करण्याच्या चिकाटीचे कौतुक आणि गंमत दोन्ही वाटते. असो. (शेवटच्या वाक्यात सर्कॅझम अभिप्रेत हे वे सा न ल.)
* अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे आणि शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी अनेक आभार.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आत्म्याची गोष्टी
While living, be a dead one चा स्वानुभव.
तुमच्या प्रतिसादावरून
योगायोगाच्या गोष्टी