अज्ञान (Ig) - नोबेल पुरस्कार : विनोदातून विचाराकडे !
पुढच्या महिन्यापासून २०१९चे नोबेल पुरस्कार जाहीर होऊ लागतील. संपूर्ण संशोधक जगताचे त्याकडे लक्ष असते. ते पुरस्कार सन्मानाचे असतात. पण त्यापूर्वीच या महिन्यात एक विचित्र प्रकारचे पुरस्कार आपले लक्ष वेधून घेतात. त्यांचे नाव शीर्षकात दिलेच आहे.
आता वळतो या Ig- नोबेल पुरस्कारांकडे. १९९१ पासून दरवर्षी सप्टेंबरमध्ये हे पुरस्कार अमेरिकेत दिले जातात. मार्क अब्राहम या संपादकाने हा अनोखा उपक्रम चालू केला. हा गृहस्थ एका शास्त्रीय विनोदाच्या मासिकाचा संपादक आहे. हे पुरस्कार उपरोधिक हेतूने दिले जातात. त्यासाठी १० संशोधने निवडली जातात, जी किरकोळ किंवा विचित्र प्रकारची असतात ! या पुरस्कार-संस्थेचे ब्रीदवाक्य असे आहे:
' ही संशोधने लोकांना प्रथमदर्शनी हसवतात पण नंतर विचार करायला लावतात !'
'Ig नोबेल' मधील Ig चा अर्थ आहे 'ignoble' (अज्ञानी).
संशोधन शाखा व निकष:
एकूण १० शाखांमध्ये हे पुरस्कार दिले जातात. त्यापैकी ६ शाखा या खऱ्या नोबेलप्रमाणेच आहेत. याव्यतिरिक्त जीवशास्त्र, अभियंत्रिकी अशा काही शाखा निवडल्या आहेत. यासाठी सादर करायची संशोधने ही विनोदी, विचित्र किंवा काही अनपेक्षित निष्कर्ष काढलेली असावी लागतात. पुरस्काराचा हेतू असा असतो. संशोधक जगतात बऱ्याचदा अतिसामान्य दर्जाचे शोधनिबंध 'पाडले' जातात. त्यांचा लायकीपेक्षा जास्त गाजावाजा केला जातो आणि काहींचे ढोल उठसूठ बडवले जातात. या सगळ्यावर उपरोधिक टीका करणे हा Ig नोबेल चा खरा उद्देश आहे.
मात्र या वरवर विनोदी वाटणाऱ्या उपक्रमाला एक आशेचीही किनार आहे. कधीकधी अशा एखाद्या विचित्र वाटणाऱ्या संशोधनातूनच खऱ्या उपयुक्त संशोधनाला चालना मिळालेली आहे. एक उदाहरण तर अचंबित करणारे आहे. Sir Andre Geim यांना २००० साली Ig-नोबेल दिले होते. पुढे २०१०मध्ये त्यांनाच पदार्थविज्ञानात खरेखुरे नोबेल प्राप्त झाले !! असे हे एकमेव उदाहरण आहे.
पुरस्कार वितरण:
हे सप्टेंबरमध्ये अमेरिकेतील हारवर्ड विद्यापीठात केले जाते. विजेत्यांना माजी खऱ्या नोबेल विजेत्यांच्या हस्ते पुरस्कार दिले जातात. त्यानंतर विजेत्यांना थोडक्यात भाषण करायची संधीही दिली जाते. एकूणच या समारंभात हास्यविनोद आणि टिंगलटवाळी यांची रेलचेल असते.
आता हे सर्व वाचल्यावर वाचकांना उत्सुकता लागली असेल की असली अजब संशोधने नक्की कुठली असतात त्याची. नुकतेच यंदाचे हे पुरस्कार जाहीर झालेले आहेत. तेव्हा त्यातल्याच काहींची ही झलक. फक्त संशोधन-विषय लिहितो; कोणाला मिळाला याला काही आपल्या दृष्टीने महत्त्व नाही.
२०१९ चे पुरस्कार:
१. रसायनशास्त्र: ५ वर्षाचे मूल एक दिवसात अर्धा लिटर लाळ तयार करते.
२. अभियांत्रिकी: बाळांचे लंगोट बदलायच्या यंत्राचा आराखडा.
३. वैद्यकीय: a)पिझ्झा खाण्याने माणसाला मृत्यूचा प्रतिबंध करता येतो.
b) पुरुषाचे डावे अंडाशय उजव्यापेक्षा अधिक गरम असते.
४. अर्थशास्त्र: चलनी नोटांच्या हाताळण्यातून रोगजंतूंचा प्रसार होतो.
५. शांतता: आपल्याला शरीराचा कुठला भाग खाजवायला सर्वात जास्त आवडते? त्याचे उत्तर आहे पायाचा घोटा.
वरील यादी वाचता वाचता तुमची ह ह पु वा झाली असणार याची मला खात्री आहे ! किंबहुना तोच तर या उपक्रमाचा उद्देश आहे.
जर आपण गेल्या २८ वर्षांतील या पुरस्कारांच्या यादीवर नजर टाकली तर आपल्याला एक जाणवेल. बरीचशी संशोधने ही टिंगल स्वरूपाची आहेत. काहींत थोडेफार तथ्य आहे पण त्यांकडे निव्वळ निरीक्षण म्हणून पाहिले जावे. उठसूठ कुठल्याही सामान्य निरीक्षणाला शोधनिबंधाचा दर्जा देता कामा नये, हेच त्यातून ध्वनित होते.
तर असे हे गमतीदार अज्ञान-पुरस्कार. या उपक्रमातून प्रचलित संशोधनातील काही अपप्रवृत्तीना छान चिमटे काढले जातात. यातून बोध घेऊन संशोधकांनी खरोखर गरज असलेलेच संशोधन करावे हा संदेश दिलेला आहे. संशोधन विश्वातील एरवी गंभीर असलेल्या वातावरणावर असे उपक्रम विनोदाची पखरण करतात आणि सामान्य माणसालाही घटकाभर हसवतात.
**********************
वर्गीकरण
प्रतिक्रिया
कुमारजी माझा सेन्स ऑफ ह्युमर कमी असावा बहुधा
शाखा बोला
त्यांना भारतीय संस्कृती म्हणायचे असेल!
होय यात हेटाळणी व्हावी असे संशोधनच दिसले नाही
धन्यवाद !
हा.हा.हा...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मेरा दिल तेरे लिये धड़कता है... :- Aashiquiमजेशीर!
हे बघा एक ...
मी उंदीर नाही पण
हा हा !
विनोदातून विचाराकडे.
हरकत नाही,
एखाद्या प्रयोगासाठी नाही हो.
@जाॅनविक्क
उपक्रम जोरदार आहे.
अनिंद्य,
हो पण सर्वसामान्यांनच्या आयुष्यावर परिणाम करतील अशी
Ig - मिपा पुरस्कार : धाग्यातून अमरत्वाकडे !
कल्पना नामी आहे पण ....
.…
मजा आली वाचायला ........
हा हा !
@गापै आणि डॉ. कुमार१ ...
आयजी कशाला ....
....
Ig- नोबेल पुरस्कार म्हणजे गमतीशीरच प्रकरण आहे :)
टर्मिनेटर,
२०२० पुरस्कार !
😂
भारतीय विद्यापीठात पीएच
मोदीजी
Jointly awarded
May I Know Who Was The First One ?
+१
डी डा
.
धन्यवाद
अछा. कुमार सर आणि शा वि कु सर दोघांना
मला वाटले होते मनमोहन सिंग यांना शांततेसाठी दिले
हा हा !
२०२१ : पुरस्कार सोहळा !
खिक्क...
खरे/खोटे !
शांततेसाठी दिलेले अधिकार
शांततेसाठी दिलेले अधिकार
हेनरी किसिंजर
शांततेसाठी दिलेले अधिकार
अधिकार जागी अधिकांश वाचावे
+१ १
निदान