✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

एका महिन्यात १०% परतावा देणारे शेअर्स शोधता येऊ शकतात का?

य
युयुत्सु यांनी
गुरुवार, 04/01/2021 - 14:42  ·  लेख
लेख
नमस्कार मिपा मंडळी, बरोबर २ वर्षापूर्वी दर महा १०% परतावा शक्य आहे का? हा लेख मी मिसळपाववर लिहीला होता. त्यावर बरीच धूळ उडाली. मला काही आह्वाने दिली गेली. पण मी माझ्या स्वतःवरच्या ठाम विश्वासाने माझी वाटचाल आणि संशोधन इथे न येता चालूच ठेवले. सांगायला आनंद वाटतो की मार्च २०२० मध्ये माझा ट्रेडींग पोर्ट्फोलिओ ६०% तोट्यात जाउनही आज माझी मान ताठ आहे. याचे कारण माझा स्वतःवरचा विश्वास. असो. या कालावधीत मी पूर्णपणे माझी दोन तंत्रे विकसित केली. ही तंत्रे अशी - ० स्मार्ट मनी फुट प्रिंट - महाजनो येत गतः स पन्थः या सुप्रसिद्ध श्लोकातून प्रेरणा घेऊन स्मार्ट मनी कोणत्या दिशेने जातो आहे हे फक्त OHLC डेटा वरून ओळखण्याचे तंत्र. या तंत्राने FII, DII प्रमोटर्स कुठे खरेदी करत आहेत याचा शोध घेता येतो. तंत्र गुंतागुंतीचे असून मराठीत वा इंग्लीश्मध्ये समजावायचा उत्साह मला सध्या तरी नाही. कारण यासाठी मी ChartAlert आणि R ही दोन सॉफ्टवेअर्स वापरतो. Daily, Weekly आणि Monthly टाईमफ्रेमवर NIFTY 500 मधिल समभाग अभ्यासून मग ते खरेदीसाठी निवडले जातात. ० प्राईस डेव्हीएशन प्रोफाईल - समभागाची किंमत रास्त आहे की नाही हे ठरवणे. ब-याच आपण महाग अथवा अवाजवी किंमतीला समभाग खरेदी करतो. स्मार्ट मनी फुट प्रिंट तंत्राने सुचवलेला एखादा स्टॉकची किंमत अवाजवी वाढलेली असू शकते आणि ते धोक्याचे असते. या तंत्रावर मी मिडीयमवर लिहिलेला लेख जिज्ञासूनी जरूर वाचावा. ज्यांना याचा स्वत:च्या जबाबदारीवर फायदा घ्यायचा असेल त्यांनी माझा फेसबुक समूह अवश्य जॉईन करावा...
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
अर्थव्यवहार
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
39558 वाचन

💬 प्रतिसाद (99)

प्रतिक्रिया

व्वा...!

प्रचेतस
गुरुवार, 04/01/2021 - 14:48 नवीन
व्वा...! म्हणजे ही तुमच्या फेसबुक समूहाची जाहिरात आहे तर..
  • Log in or register to post comments

:)

युयुत्सु
गुरुवार, 04/01/2021 - 14:51 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

माफ करा .. पण एक कळले नाही ..

अमर विश्वास
गुरुवार, 04/01/2021 - 15:24 नवीन
माफ करा .. पण एक कळले नाही .. तुमच्याकडे दरमहा १०% परतावा देणारी जादूची कांडी असूनही तुमचा पोर्टफोलिओ ६०% लॉस मध्ये कसा काय गेला ?
  • Log in or register to post comments

जादूची कांडी एकतर मार्च २०२०

युयुत्सु
गुरुवार, 04/01/2021 - 15:27 नवीन
जादूची कांडी एकतर मार्च २०२० नंतर सापडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमर विश्वास

दूसरे असं की माझा ट्रेडींग

युयुत्सु
गुरुवार, 04/01/2021 - 15:30 नवीन
दूसरे असं की माझा ट्रेडींग पोर्टफोलिओ अनेक प्रयोगांची आणि तंत्राची खिचडी झाला आहे. मी शक्यतो तोट्यात शेअर्स विकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

मार्च २०२० नंतर माझा

अमर विश्वास
गुरुवार, 04/01/2021 - 15:33 नवीन
मार्च २०२० नंतर माझा पोर्टफोलिओ देखील खाली आला होता ... पण मे २०२० मध्ये तो पूर्वपदावर आला ... कुठलीही जादूची कांडी ना फिरवता
  • Log in or register to post comments

स्मार्ट मनी फुट प्रिंट हे

सतिश गावडे
गुरुवार, 04/01/2021 - 18:51 नवीन
स्मार्ट मनी फुट प्रिंट हे तंत्र विकसित करण्यासाठी तुम्ही जे संदर्भग्रंथ अभ्यासलेत त्यांची नावे देऊ शकाल का?
  • Log in or register to post comments

मी कोणतेही संदर्भग्रंथ यासाठी

युयुत्सु
गुरुवार, 04/01/2021 - 19:43 नवीन
मी कोणतेही संदर्भग्रंथ यासाठी आधार म्हणून वापरलेले नाहीत. ही कल्पना ११०% माझी स्वत:ची आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

ही खूपच चांगली गोष्ट आहे.

सतिश गावडे
गुरुवार, 04/01/2021 - 20:04 नवीन
ही खूपच चांगली गोष्ट आहे. मात्र संदर्भग्रंथ तुम्ही वापरले नाहीत आणि तंत्र गुंतागुंतीचे असून मराठीत वा इंग्लीश्मध्ये समजावायचा उत्साह तुम्हाला सध्या तरी नाही. थोडक्यात या धाग्याचा तुमचा उद्देश आपल्या तंत्राची जाहिरात करुन मासे गळाला लावणे इतकाच आहे असे म्हणण्यास भरपूर वाव आहे. असो, त्यातूनही कुणाला फायदा होणार असेल तर ती ही चांगली गोष्ट आहे. (बाकी कोणाला फायदा होईल वा ना होईल मात्र तुम्हाला फायदा होईल असे म्हणण्यास भरपूर वाव आहे. ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

थोडक्यात या धाग्याचा तुमचा

युयुत्सु
Fri, 04/02/2021 - 08:50 नवीन
थोडक्यात या धाग्याचा तुमचा उद्देश आपल्या तंत्राची जाहिरात करुन मासे गळाला लावणे इतकाच आहे असे म्हणण्यास भरपूर वाव आहे. असो, त्यातूनही कुणाला फायदा होणार असेल तर ती ही चांगली गोष्ट आहे. (बाकी कोणाला फायदा होईल वा ना होईल मात्र तुम्हाला फायदा होईल असे म्हणण्यास भरपूर वाव आहे. ;) )
माझा तुम्हाला उद्देश कळला नाही आणि दोन वर्षांपूर्वी लोकांनी माझ्यावर जसा संशय घेतला, तसेच तुम्ही करत आहात याचे दू;ख झाले. पण परत एकदा सांगतो की मला लोकांकडून पैसे गोळा करायची काहीही गरज नाही आणी मी जे कमवत आहे त्यात मी आणि माझे कुटुंबिय सुखी आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

माझा तुम्हाला उद्देश कळला

सतिश गावडे
Fri, 04/02/2021 - 10:31 नवीन
माझा तुम्हाला उद्देश कळला नाही
शक्यता आहे, मात्र एखादी व्यक्ती शेयर मार्केटमधील एखाद्या तंत्राबद्दल सूतोवाच करुन नंतर आपल्या वैयक्तिक समूहाचे सदस्य होण्याचे आवाहन करते तेव्हा त्यात काही सुप्त हेतू आहे असा संशय नक्कीच येतो. असो, मी तुमचा मिडीयमवरील लेख वाचून तो प्रॉमिसिंग वाटल्यानंतरच तुमच्याकडे संदर्भग्रंथांची विचारणा केली होती. मात्र तुम्ही विकसीत केलेले तंत्र ही सर्वस्वी तुमची बौद्धिक मालमत्ता असल्याने त्याबद्दल लिहावे की न लिहावे हा तुमचा निर्णय असेल. मात्र जेव्हा मिसळपावसारख्या मंचावर जेव्हा लेखन होते तेव्हा एखाद्या गोष्टीचे केवळ सूतोवाच करून आपल्या वैयक्तिक समूहात सामील होण्याचे आवाहन न करता त्यात काही ठोस वाचायला मिळावे ही अपेक्षाही अवाजवी नसावी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

तुमची बौद्धिक मालमत्ता

युयुत्सु
Fri, 04/02/2021 - 10:51 नवीन
तुमची बौद्धिक मालमत्ता असल्याने त्याबद्दल लिहावे की न लिहावे हा तुमचा निर्णय असेल.
या एक मुद्दा आहेच. पण त्याहीपेक्षा तंत्र गुंतागुंतीचे असल्याने ते मराठीत आणणे सध्या तरी अशक्य आहे. पण आपण मिडीयमवरील लेख वाचलात याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

माझ्या मित्राचे धोरण

चौकटराजा
गुरुवार, 04/01/2021 - 20:22 नवीन
माझा एक मित्र १९७६ सालापासून आहे ! त्याने स्टेट बँकेत नोकरी करता करता पैसे साठवून सुमारे २५ वर्षापूर्वी पुणे स्टॉक एक्सचेंज ची ब्रोकर मेंबरशिप घेतली. त्याने स्वतः कधी ट्रेडिंग केले नाही .फक्त कमिशनवर समाधान मानले. ट्रेडिंगच्या नादाला लागून अनेक लोक श्रीमंत व अनेक कफल्लक होताना त्याने पाहिले . मी एकदा त्याच्या ओफिसमध्ये गेलो असताना तो मला म्हणाला " त्या ट्रेडिंग वाल्या खुर्च्या पुढे मांडल्यात बघ ! मला कमिशन वाली मागची खुर्चीच प्रिय आहे ! "
  • Log in or register to post comments

त्यांनी तुम्हाला सांगितले

गणेशा
गुरुवार, 04/01/2021 - 20:57 नवीन
त्यांनी तुम्हाला सांगितले नसेल, कमिशन वालेच खुप जास्त कमावतात.. मी सब ब्रोकर होण्याच्या हालचाली केल्या अलीकडे, तरी लाखो(४० लाखाच्या पुढे )रुपये आधी लागतात असे कळल्यावर विचार करायची गरज उरली नाही.. ते तेव्हडे सोप्पे हि नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

आता सोपे नाही ..

चौकटराजा
गुरुवार, 04/01/2021 - 21:42 नवीन
आता मेंबरशीप मिळणे देखील सोपे नाही .. सगळे २५ वर्षापूर्वी त्याला जमले मात्र !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

छान!

तुर्रमखान
Fri, 04/02/2021 - 14:49 नवीन
पॅसिव्ह ब्रोकर असणं ठीकच पण शेअर्सट्रेडींग करून दुसर्‍याला फायदा करून देण्याच्या ध्यासाने झपाटलेल्यांच मला भयंकर कौतुक आहे. यात ट्रेनींग देणारे, तुमच्या नावाने ट्रेडींग करणारे, फेसबूकपेज-युट्युब चॅनल काढणारे सगळे येतात. यांच्या ज्ञानदानाच्या सेवाभावी वृत्तीने माझे डोळे भरून येतात. शून्यापासून सुरवात करून ज्ञान मिळवण्याच्या अश्या कुठल्या पायरीवर त्यांना असा साक्षात्कार होत असेल की जो वेळ ट्रेडींग करणं, मार्केटचा आभ्यास करणं यात घालण्यापेक्षा लोकांची शाळा घेतल्यावर जास्त पैसे सुटू शकतील? की निव्वळ मानवजातीचं (यात टार्गेट ऑडीयन्सची भाषा, प्रांत, लिंग अशी विभागणीसुद्धा केली जाते) कल्याण करण्याची वृत्ती जागृत होते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

"की निव्वळ मानवजातीचं (यात

युयुत्सु
Fri, 04/02/2021 - 15:58 नवीन
"की निव्वळ मानवजातीचं (यात टार्गेट ऑडीयन्सची भाषा, प्रांत, लिंग अशी विभागणीसुद्धा केली जाते) कल्याण करण्याची वृत्ती जागृत होते?" अनेक वर्षांपूर्वी (~२५) अमेरीकेतील श्री० सुनील देशमुख यांनी मराठी साहित्याला पारितोषिके देण्यासाठी १ कोटी रुपयांची ठेव स्वरुपात देणगी देण्याचे जाहिर केले, तेव्हा माधव गडक-यांनी यात काही तरी काळबेरे असावें तेव्हा ही लक्ष्मी स्वीकारावी का असा प्रश्न उपस्थित केला होता. त्याची आठवण झाली. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुर्रमखान

कळलं नै...

तुर्रमखान
Fri, 04/02/2021 - 19:01 नवीन
हे दार्तूत्व आवडतं क्षेत्र म्हणजे कला-साहित्य वगैरेंसाठी असू शकतं. पण, मी लोकांना दोन रुपये कसे मिळवावेत? हे ज्ञान दोन पैश्यात विकतो हे लॉजिक कळलं नै. ज्या व्यक्तीला शेअर मार्केट मधून पैसे कसे कमवायचे हे माहीत आहे ती व्यक्ती तुलनेने अत्यंत कमी पैश्यात दुसर्‍यांना पैसे कसे मिळवायचे हे शिकवतात. यात मात्र नक्की काहितरी गोम असते. यात मनुक्षस्वभाव म्हणून जनरल अवेअरनेस वाढावा म्हणून सोशल साईटवर धागे काढणारे येत नाहीत. पण आधिच्या प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे आर्थिक फायदा मिळवणारे येतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

तुमचा मिडीयमवरील लेख वाचला.

आंद्रे वडापाव
Fri, 04/02/2021 - 09:37 नवीन
तुमचा मिडीयमवरील लेख वाचला. लेख आवडला. अनुभवांती आपल्याला आलेल्या संकल्पना/हायपोथॅसिस जरूर मिसळपाव वर लिहा, वाचायला आवडतील माझ्या सारख्याला
  • Log in or register to post comments

आपण मिडीयमवरील लेख वाचलात

युयुत्सु
Fri, 04/02/2021 - 10:53 नवीन
आपण मिडीयमवरील लेख वाचलात याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंद्रे वडापाव

तंत्र गुंतागुंतीचे असल्याने

आंद्रे वडापाव
Fri, 04/02/2021 - 11:21 नवीन
तंत्र गुंतागुंतीचे असल्याने ते मराठीत आणणे सध्या तरी अशक्य आहे.
माझ्या सारख्या वाचकांना तुम्ही तंत्र नाही सांगितले तरी चालेल. तुम्ही तुम्हाला अनुभवांती लक्षात आलेले पॅटर्न/हायपोथॅसिस स्वरूपात, इथे मिपावर लेख लिहून टाकले, तरी वाचकांना काहीतरी चांगलं वाचायला मिळेल. उदा. Hdfc bank चा डेली प्राईस स्टॅंडर्ड डेव्ह +- २.५ च्या रेंज मध्ये बहुतेक वेळा असतो, हे माझे वैयक्तिक निरीक्षण... जे कोणी एस आय पी मोड सारखे दर महिन्याला एखादा शेअर लॉंग टर्म साठी जमा करत असेल, तर त्याने जेव्हा किंमत विकली सरासरीच्या खाली 2.5 टक्के किंमत आल्यावर खरेदी केली तर् त्याचा थोडा अजून फायदा होण्याची शक्यता आहे... अश्या स्वरूपाचे तुमचे अनुभव/निरीक्षण/पॅटर्न वाचायला आवडेल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

प्रयत्न नक्की करेन.

युयुत्सु
Fri, 04/02/2021 - 11:46 नवीन
प्रयत्न नक्की करेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंद्रे वडापाव

आपण मिडीयमवरील लेख वाचलात

युयुत्सु
Fri, 04/02/2021 - 10:54 नवीन
आपण मिडीयमवरील लेख वाचलात याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंद्रे वडापाव

"अकस्मात वा जाहली जेथ गर्दी

युयुत्सु
Tue, 04/27/2021 - 09:28 नवीन
"अकस्मात वा जाहली जेथ गर्दी तिथे चवकशी जा करायास आधी" - झेंडूची फुले मनाच्या श्लोकाच्या विडंबनातील हा श्लोक स्टॉकमार्केटला चपखल लागू पडतो. जिथे खरेदी मोठ्याप्रमाणात होत आहे, तिथे मोहरा वळवल्यास फायदेशीर व्यवहारांची शक्यता हमखास वाढते. यासंदर्भात माझा मिडीयम वरील नवा लेख अवश्य वाचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंद्रे वडापाव

यासंदर्भात माझा मिडीयम वरील

युयुत्सु
Tue, 04/27/2021 - 09:29 नवीन
यासंदर्भात माझा मिडीयम वरील नवा लेख अवश्य वाचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

तुमचा दुसरा लेख , मिडीयम वरील

आंद्रे वडापाव
Tue, 04/27/2021 - 10:11 नवीन
तुमचा दुसरा लेख , मिडीयम वरील वाचला, चांगला आहे. तुम्ही असेच डेटा वापरून लेख लिहीत रहा, चांगलं वाटतं कोणी असे अभ्यासपूर्वक लेख लिहिले की ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

छान अभ्यास. अभ्यास करून

आग्या१९९०
Tue, 04/27/2021 - 10:50 नवीन
छान अभ्यास. अभ्यास करून प्रत्यक्ष वापरून बघीन. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

आग्या१९९०, आंद्रेवडापाव,

युयुत्सु
Tue, 04/27/2021 - 10:55 नवीन
आग्या१९९०, आंद्रेवडापाव, मनःपूर्वक धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

तुमचा मिडीयमवरील लेख वाचला.

आंद्रे वडापाव
Fri, 04/02/2021 - 09:37 नवीन
तुमचा मिडीयमवरील लेख वाचला. लेख आवडला. अनुभवांती आपल्याला आलेल्या संकल्पना/हायपोथॅसिस जरूर मिसळपाव वर लिहा, वाचायला आवडतील माझ्या सारख्याला
  • Log in or register to post comments

या.....!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 04/02/2021 - 10:11 नवीन
पुन्हा एकदा आपले मिपावर स्वागत. बाय द वे, मिपाशिवाय करमत नाही हे खरं आहे, काही लोक इथे लॉगीन नसुनही मिपाच्या इत्यंभूत घटनांवर लक्ष ठेवून असतात, वाचत असतात आणि म्हणतात, बरेच दिवस झाले मिपा पाहिलं नाही. सहज आठवलं म्हणून पाठवलं -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

पुन्हा एकदा आपले मिपावर

युयुत्सु
Fri, 04/02/2021 - 10:55 नवीन
पुन्हा एकदा आपले मिपावर स्वागत.
मनःपूर्वक धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दर महा १०% परतावा शक्य आहे का

सुबोध खरे
Fri, 04/02/2021 - 13:17 नवीन

दर महा १०% परतावा शक्य आहे का?

१००० रुपयाचे एक महिन्यात १० टक्के प्रमाणे म्हणजे एका वर्षात रुपये ३१३८, दोन वर्षात ९८५०, तीन वर्षात ३०९१२, ४ वर्षात ९७०००, ५ वर्षात ३ लाख ५ हजार सहा वर्षात ९ लाख ५५ हजार सात वर्षात ३० लाख आणि आठ वर्ष १ महिन्यात एक कोटी रुपये होतात याचे कोष्टक खाली दिलंय https://www.thecalculatorsite.com/finance/calculators/compoundinterestcalculator.php हायला आठ वर्षात आपले कोट्यवधी लोक कोट्याधीश होणार असतील तर अगोदर श्री युयुत्सु याना अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिकच द्यायला पाहिजे आणि काही वर्षांनी अर्थशास्त्राचे युयुत्सु पारितोषिक जाहीर करायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments

डॉ० सुबोध खरे

युयुत्सु
Fri, 04/02/2021 - 15:43 नवीन
डॉ० सुबोध खरे अरे व्वा! तुम्ही अजुन आहात तर... :) पण तुमच्या खोडसाळ प्रतिक्रियेमुळे आनंद झाला. आता चुकल्यासारखे वाटणार नाही. या धाग्याचे शीर्षक एका महिन्यात १०% परतावा देणारे शेअर्स शोधता येऊ शकतात का? असे आहे. तुमच्या उपस्थितीमुळे आता नेहेमीसारखि मौज येणार हे नक्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

खोडसाळ प्रतिक्रिया?

सुबोध खरे
Fri, 04/02/2021 - 19:12 नवीन
खोडसाळ प्रतिक्रिया? मी तुम्हाला १००० रुपये देतो आठ वर्षात त्याचे आपल्याच कोष्टकाप्रमाणे १ कोटी रुपये होतील. तुम्ही त्यातले ७० लाख ठेवा आणि मला ३० लाख द्या. आपल्या ज्ञानाची किंमत माझ्या लाभापेक्षा जास्त असणार हे मी मुळात मान्यच केले आहे. कराराचा मुद्रांक शुल्क आणि इतर खर्च माझा. काय म्हणताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

काय म्हणताय?

युयुत्सु
Fri, 04/02/2021 - 19:31 नवीन
काय म्हणताय? मला तुमच्या उथळपणे केलेल्या ऑफर मध्ये जरा देखिल इंटरेस्ट नाही. पण तुमचा हटवादीपणा आणि खोडसाळपणा तुमच्या पदरात (आता माझ्या खर्चाने ) घालायची इच्छा मात्र नक्की आहे (सार्वजनिक व्यासपीठ असल्याने संयम बाळगला आहे). वेळ मिळाला की पुण्याला मला येऊन भेटा. मग सविस्तर बोलू. तुमचा जायचा यायचा खर्च मी करेन. काय म्हणताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

अरेच्या

सुबोध खरे
Fri, 04/02/2021 - 19:42 नवीन
अरेच्या मी साधं गणितीय कोष्टक दिलंय ज्यात "तुम्ही" म्हणताय त्याप्रमाणे दरमहा १० % परतावा मिळाल्यास आठ वर्षे एक महिन्यात एक हजाराचे १ कोटी होतात. यात खोडसाळपणा काय बुवा? तुम्हाला झेपत नसेल तर तसं प्रामाणिकपणे कबुल करण्याचं धारिष्ट्य तरी दाखवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

तुमचा यायचा जायचा खर्च करायची

युयुत्सु
Fri, 04/02/2021 - 19:48 नवीन
तुमचा यायचा जायचा खर्च करायची दाखवली आहे. तुम्ही यायचं धारिष्ट्य दाखवा. मग मी कबूल करायचा प्रश्न निकालात निघेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

पुण्याला जायचा यायचा खर्च

सुबोध खरे
Fri, 04/02/2021 - 20:08 नवीन
पुण्याला जायचा यायचा खर्च करण्याची फडतूस तयारी कसली दाखवता आहात? तो मला सहज परवडतो जे आहे ते समोर आहे. त्याबद्दल बोला अन्यथा सोडून द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

मला पण तुमच्या फडतूस ऑफरमध्ये

युयुत्सु
Fri, 04/02/2021 - 20:22 नवीन
मला पण तुमच्या फडतूस ऑफरमध्ये रस नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मार्च २०२० मध्ये माझा

सुबोध खरे
Fri, 04/02/2021 - 13:27 नवीन
मार्च २०२० मध्ये माझा ट्रेडींग पोर्ट्फोलिओ ६०% तोट्यात जाउनही कोणतेही ट्रेडिंग न करता माझा पोर्टफोलिओ काल ०१ एप्रिल रोजी ३० टक्के वर होता. म्हणजेच ९० % वाढ एक वर्षात. यात कोणतेही तंत्र किंवा गुपित नाही. चांगले समभाग घेतलेले होते. ते केवळ लॉक डाऊन मुळे पडले होते. ते वर आले कारण मुळात ते समभाग चांगलेच होते. याच मार्च २०२० महिन्यात विकत घेतलेले समभाग मला १०० % च्या वर परतावा देऊन गेले. उदा २३ मार्च २०२० रोजी मी ७२५ रुपयाला घेतलेले लार्सन अँड टुब्रो चे समभाग काळ १४४४ ला बंद झाले आहेत. हेच ८ फेब्रुवारी ला १५०० च्या वर होते. बाकी चालू द्या
  • Log in or register to post comments

डॉक्टरसाहेब .. एकदम बरोबर ...

अमर विश्वास
Fri, 04/02/2021 - 14:03 नवीन
डॉक्टरसाहेब .. एकदम बरोबर ... बरोब्बर एक वर्षांपूर्वी (३ एप्रिल २०२०) निफ्टी ८०८३ अंकांवर बंद झाला आज (४ एप्रिल २०२१) ला निफ्टी १४८६७ वर आहे ... एका वर्षात ८४% वाढ थोडक्यात काय कुठलाही ऍनालिसिस न करता निफ्टी मधले शेअर्स घेतले असते तर एका वर्षात ८४% वाढ मिळाली असती .. दरमहा दहा टक्क्यांचे काय घेऊन बसलात ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

जाउ द्या ना बाळासाहेब

राजेंद्र मेहेंदळे
Fri, 04/02/2021 - 17:13 नवीन
रिस्क है तो इश्क है असा स्वभाव असेल तर बिटकॉईन, फ्युचर ऑप्शन्स्, बँक निफ्टी, मार्जिन मध्ये खेळा, कुठे १० टक्के घेउन बसलायत??दिवसाला २०० टक्के कमवाल किवा गमवाल. नपेक्षा पी पी एफ्,म्युचुअल फंडच्या एस आय पी आहेतच गरीबाला
  • Log in or register to post comments

दिवसाला २०० टक्के कमवाल किवा

युयुत्सु
Fri, 04/02/2021 - 17:46 नवीन
दिवसाला २०० टक्के कमवाल किवा गमवाल.
अतिलोभो न कर्तव्यः लोभं नैव परित्यजेत|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

जर Index fund मधे असते तरी

स्वराजित
Fri, 04/02/2021 - 18:05 नवीन
जर Index fund मधे असते तरी पोर्ट्फोलिओ आज उत्तम परतावा दिला असता , बाजाराचे आणि technical analysis चे ज्ञान नसले तरी
  • Log in or register to post comments

जुगार आणि मानसिकता

चौकटराजा
Fri, 04/02/2021 - 21:52 नवीन
शेअर बाजार हा काही लाभांश मिळविण्यासाठी नसतो हे तेथील प्रथम तत्व आहे ! लाभांश नाही मग धंदा कसला ? तर जुगाराचा ! शेअर बाजार हा जुगारच असतो सबब गुंतवणूक ही धोक्याची ठरू शकते असा इशारा देखील दिलेला असतो. मी ज्यातून गेलो आहे त्यावरून सांगतो की कॅल्क्युलेटेड रिस्क ची एक स्थिती सोडली तर जीवन एक जुगार " हे गीत अगदी सत्य आहे मग त्यामुळेच तर नो रिस्क नो गेन हा विचार पुढे आलेला आहे. मानवी मन हे दारुड्यासारखे असते .दारुडा सुख आले तर आनंद म्हणून दारू पितो ,दुःख आले तर ते विसरण्यासाठी पितो. शेअर बाजारात आपण जी लाईन धरली आहे ती यश देते आहे म्हणून आणखी पैसे लावले जातात. व तोटा झाला ते तो भरून काढण्यासाठी पुन्हा हिरीरीनं पैसे लावले जातात. दीर्घ काळ चालेल अशी कोणतीही थिअरी कोणत्याच धंद्यात नसते ! शेअर बाजार ही त्याला अपवाद नाही .सबब १००० चे १ कोटी ८ वर्षात ही ऑफर फक्त एकच जन स्वीकारू शकेल पण त्यालाच आपण अनादी अनंत म्हणतो ना ?
  • Log in or register to post comments

सहमत व्हावं लागतंय...

तुर्रमखान
Fri, 04/02/2021 - 22:20 नवीन
'शेअर्स म्हणजे जुगार कसा नाही' याने प्रत्येक ट्रेनर आपल्या ट्रेनींगची सुरवात करतो. म्हणूनच तर शेअर्स ट्रेडींग करून लाखो रुपये मिळवण्यापेक्षा काही शे रुपये नियमीत मिळाले तर बरे असा विचार करत असावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

माकडचाळे

भुजंग पाटील
Sat, 04/03/2021 - 01:44 नवीन
मला आठवतेय, रशीयात एक माकडीण स्टॉक लिहिलेल्या चिट्ठ्या निवडायची. जी चिट्ठी येईल त्या कंपनीचा शेअर ९५% इन्व्हेस्ट्मेंट गुरूंच्या पोर्ट्फोलीयो पेक्षा चांगला परफॉर्मन्स द्यायचा. असे सलग आठ वेळा त्या माकडीणीने करून दाखवले होते. सापडली लिंकः https://www.dailymail.co.uk/news/article-1242575/Lusha-monkey-outperforms-94-Russia-bankers-investment-portfolio.html तात्पर्यः financial knowledge does not play a great role in giving forecasts to how the market will change.
  • Log in or register to post comments

मूर्खासारखी दिलेली आह्वाने

युयुत्सु
Sat, 04/03/2021 - 07:48 नवीन
लोक हो, एक कायम स्वरूपी घोषणा करणे आवश्यक आहे. म्हणजे मूर्खासारखी दिलेली आह्वाने का स्वीकारता येत नाही हे सगळ्यांना कळले नाही तरी थोड्या लोकांना कळेल. ० चक्रवाढीने केलेल्या गुंतवणुकीचे १०००चे १कोटी कसे होतात, हे सांगण्यासाठी एक दुवा देण्यात आला आहे. या दुव्याचा फारसा उपयोग नाही. कारण या ठिकाणी केलेल्या गणितामध्ये तिन महत्त्वाच्या गोष्टींचा अंतर्भाव नाही. हे घटक असे - ० ब्रोकरेज आणि exchange चे टॅक्सेस ० short term capital gains tax ० सर्वात महत्त्वाचे म्हणजे strategy चा सक्सेस रेट (जो परिस्थितीनुसार बदलतो)- सोप्या strategy चा सक्सेस रेट back testing करुन सहज काढता येतो. पण इथे प्रत्येक टप्प्यावर, विशेषत: PDP विश्लेषण करताना १० वर्षे जुना विदा विचारात घेतला जातो. शिवाय मी दोन वेगवेगळी सॉफ्टवेअर वापरत असल्याने विदा एकातून दूस-यात पाठवून तपासण्यात भरपूर वेळ जातो. prediction कन्फर्म करण्यासाठी मी जे न्युरल नेट तंत्रज्ञान वापरतो, ते पण अतिशय वेळ खाउ असल्याने strategy चे back testing करुन सक्सेस रेट काढणे शक्य झालेले नाही. याशिवाय सुबोध खरे मला १००० रुपडे देणार म्हणजे सुरुवातीला मला अनेक संधी (१००० खाली किंमत असलेले समभाग विकत घ्यावे लागणार) गमवाव्या लागणार. या शिवाय इतक्या कमी गुंतवणुकीसाठी ब्रोकरेज जास्त द्यावे लागते, हे वेगळेच. असो. हे सगळे मूर्खासारखी आह्वाने देणारांना समजावे अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. तेव्हा डॉ० सुबोध खरे माझा आदर पूर्वीच गमावला आहे, पण ही व्यक्ती माझ्यासाठीतरी एक toxic person ठरली आहे.
  • Log in or register to post comments

त्यांनी तुमच्याच लेखांवर

प्रचेतस
Sat, 04/03/2021 - 08:07 नवीन
त्यांनी तुमच्याच लेखांवर आधारित साधे आव्हान दिले होते, आता ते अंगाशी येत असलेले पाहून तुम्ही गोलमाल विधाने करत आहात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

तुम्ही पण त्यांच्या पंगतीत

युयुत्सु
Sat, 04/03/2021 - 08:10 नवीन
तुम्ही पण त्यांच्या पंगतीत बसण्यास योग्य आहात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा