मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

धम्मालपंती प्रवेशिका – ३

साहित्य संपादक · · स्पर्धा
पॉपकॉर्न यांची कन्या अक्षदा गणेश पवार (वय ६) हिने काढलेली पाच चित्रं

वाचने 10526 वाचनखूण प्रतिक्रिया 15

ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 02/11/2021 - 12:47
बाहुलीचा एक डोळा कुठे गायब झाला? पहिल्या चित्रावर तर तिने सही सुध्दा केली आहे. मजा आली सगळी चित्रे पहाताना.. छान आहेत. मिपाचा हा आगळा वेगळा उपक्रम आवडला पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

पॉपकॉर्न Fri, 02/12/2021 - 16:46
बाहुलीचा एक डोळा कुठे गायब झाला? >> मला देखिल हाच प्रश्न पडला होता. त्यावर कन्येचे उत्तर होते- "पप्पा तुम्हला काही कळतच नाही, एक डोळा बंद केला आहे बाहूलीने" ;)

In reply to by पॉपकॉर्न

दुसर्‍या डोळ्याच्या पापण्या खालच्या बाजूला दाखवल्या आहेत... माझ्या लक्षातच नाही आले पहिल्यांदा पहाताना... डोळा मारणारी अक्षदा आवडली... पैजारबुवा,

चांदणे संदीप गुरुवार, 02/11/2021 - 18:34
ह्या लहान मुलांच्या डोक्यात काय चाललेलं असतं हे असं चित्रातून पाहताना विशेष गंमत येते. सर्वच चित्रे आवडली. सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

शा वि कु Fri, 02/12/2021 - 18:51
शाळेच्या सगळ्या वह्या मागून भरत यायच्या अश्याच चित्रांनी. छान चित्रं! - (नॉस्टॅल्जिक) शाविकु.