✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शब्दखेळ : विरंगुळा

ह
हेमंतकुमार यांनी
Sun, 05/24/2020 - 15:45  ·  लेख
लेख
शब्द्प्रेमींसाठी विरंगुळा खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा. प्रत्येक शब्द वै या अक्षरानेच सुरू व्हायला हवा. 1 ऐच्छिक : 2 अपूर्णता : 3 विष्णूचे स्थान : 4 वाचा : 5भिन्नता : 6काळी तुळस : 7 सावत्र : 8धन्वंतरी : 9कायदेशीर : 10 आश्चर्य : 11गरूड : 12 समृद्धी : 13 सीता : 14 ऐश्वर्य : 15 निष्फळता : 17 शत्रू : 18 चारा : 19 संन्यासी : 20 ओसाड : 21 कुबेर : २२. चतुर्वर्णापैकी एक : 23. विष्णूभक्त : 24 निज 25 सूड उगवणे : 26 लग्नाची एक पद्धत : 27 अग्नी :
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
भाषा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
148937 वाचन

💬 प्रतिसाद (523)

प्रतिक्रिया

मस्त...

ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 07/02/2020 - 09:24 नवीन
१. नागरीकांचे ३. विधानसभा पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

१, ३

हेमंतकुमार
गुरुवार, 07/02/2020 - 09:40 नवीन
बरोबर !
  • Log in or register to post comments

अरेरे...मी येई पर्यंत सगळीच कोडी सुटली आहेत :)

टर्मीनेटर
गुरुवार, 07/02/2020 - 10:59 नवीन
अरेरे...मी येई पर्यंत सगळीच कोडी सुटली आहेत! [अर्थात वरील पैकी एकाचेही उत्तर मला माहित नव्हते तो भाग वेगळा :)] आता पुढच्या नवीन शब्दखेळात सहभागी होतो.
  • Log in or register to post comments

टर्मिनेटर,

हेमंतकुमार
गुरुवार, 07/02/2020 - 11:16 नवीन
स्वागत ! तुम्हीच नवा खेळ घेऊन या की !
  • Log in or register to post comments

इतिहास झाला नागरीक शास्त्र झाले आता गणित कोडे

ज्ञानोबाचे पैजार
Fri, 07/03/2020 - 12:18 नवीन
१. एका संख्येला १७ ने भागले तर बाकी ११ उरते, त्याच संख्येच्या वर्गाला जर १७ ने भागले तर बाकी किती उरेल? २. ३५० मीटर लांबीची आगगाडी ३५० मीटर लांबीचा बोगदा सव्वा मिनिटात ओलांडते त्याच आगगाडीचा वेग जरा मिनिटाला ६० मीटर ने वाढवला तर पुढचा बोगदा ती दीड मिनिटात ओलांडते. तर पुढच्या बोगद्याची लांबी किती? ३. एका क्रिकेट स्पर्धेत ११ संघ सहभागी झाले होते प्रत्येक संघ दुसऱ्याशी एक सामना खेळला त्यातून चार संघ निवडले गेले त्यांनी प्रत्येक संघाबरोबर एक सामने खेळला, त्यातून निवडलेल्या दोन संघांनी अंतिम सामना खेळला तर एकूण किती सामने खेळले गेले? ४. एका शाळेत शिक्षक आणि विद्यार्थी यांची एकुण संख्या १६३२ आहे. त्या शाळेत प्रत्येक ५० विद्यार्थ्यांमागे एका शिक्षक असेल तर त्या शाळेत एकूण किती शिक्षक आहेत? ५. एक दुकानदार ५ रिकाम्या बाटल्यांच्या बदल्यात सरबताची एक भरलेली बाटली देतो. एका मुलाकडे ७७ रिकाम्या बाटल्या आहेत तर तो दुकानदारां कडून किती भरलेल्या बाटल्या मिळवू शकतो? ६. एका अंधाऱ्या खोलीत ३० निळे मोजे २० काळे मोजे आणि २५ पांढरे मोजे आहेत. तुम्हाला जर एक सारख्या रंगाची जोडी हवी असेल तर तुम्ही एका वेळेला त्या खोलीतून किती मोजे उचलाल? ७. पाच बगळे पाच मिनिटात पाच मासे खातात तर १० बगळे १० मिनिटात किती मासे खातील? ८. पुढील साखळीत शेवटचा आकडा कोणता येईल? २-३-१०-१५-२६-३५-५०-? ९. तुमच्या कडे ८ लिटर आणि ५ लिटरच्या बादल्या आहेत. पण तुमच्या मित्राला फक्त १ लिटर पाणी हवे आहे. कसे द्याला? १०. एका विमानास मुंबई ते नागपूर हे अंतर कापायला सव्वा तास लागतो मात्र परत येताना तेच विमान फक्त ७५ मिनिटात येते. असा फरक कशा मुळे होत असेल? पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

...

हेमंतकुमार
Fri, 07/03/2020 - 12:23 नवीन
एका विमानास मुंबई ते नागपूर हे अंतर कापायला सव्वा तास लागतो मात्र परत येताना तेच विमान फक्त ७५ मिनिटात येते. असा फरक कशा मुळे होत असेल? >>>> हे भारीच की ! ६० +१५ = ७५ !!! दोन्ही बी एकच की !
  • Log in or register to post comments

:)

ज्ञानोबाचे पैजार
Fri, 07/03/2020 - 12:34 नवीन
बरोबर पकडले आता १ ते ९ राहिले पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

५. १९ भरलेल्या बाटल्या मिळवू

पलाश
Fri, 07/03/2020 - 13:44 नवीन
५. १९ भरलेल्या बाटल्या मिळवू शकतो. ७५/५= १५ (७७-७५=२ उरल्या) १५/५= ३ ५/५= १ (३+ सर्वप्रथम उरलेल्या २ )
  • Log in or register to post comments

सही जबाब

ज्ञानोबाचे पैजार
Fri, 07/03/2020 - 14:21 नवीन
अभिनंदन पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पलाश

...

हेमंतकुमार
Fri, 07/03/2020 - 14:15 नवीन
७ = २० ८ = ६३
  • Log in or register to post comments

दोनो जबाब सही है..

ज्ञानोबाचे पैजार
Fri, 07/03/2020 - 14:22 नवीन
अभिनंदन पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

७. २०

पलाश
Fri, 07/03/2020 - 15:04 नवीन
७. २०
  • Log in or register to post comments

हे उत्तर दिलेलं दिसतं आहे. हे

पलाश
Fri, 07/03/2020 - 15:06 नवीन
हे उत्तर दिलेलं दिसतं आहे. हे रद्द.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पलाश

रद्द कशाला करता?

ज्ञानोबाचे पैजार
Fri, 07/03/2020 - 16:06 नवीन
गणिताचे उत्तर माहित असले तरी सुध्दा गणित सोडवायला मजा येते. जरी उत्तरे इथे आली असली तरी सुध्दा प्रत्येक गणित आपापले सोडवून पहायला हरकत नाही. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पलाश

२

आवडाबाई
Fri, 07/03/2020 - 15:05 नवीन
२=५८० ?
  • Log in or register to post comments

-१

ज्ञानोबाचे पैजार
Fri, 07/03/2020 - 15:41 नवीन
५८० हे चूकिचे उत्तर आहे परत एकदा प्रयत्न करा. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आवडाबाई

माझं उत्तर पण ५८० आलं पण

पलाश
Fri, 07/03/2020 - 16:09 नवीन
माझं उत्तर पण ५८० आलं पण बरोबर नाही हे कळलं. मुलांचा माध्यमिक शिष्यवृृत्ती चा अभ्यास घेत असताना गणितासाठीच्या पंढरिनाथ राणे यांच्या पुस्तकात अशा प्रकारच्या गणितांसाठी सोपी सूत्रे होती हे आठवलं. आता ती सूत्रे आठवत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

+१

ज्ञानोबाचे पैजार
Fri, 07/03/2020 - 16:22 नवीन
पंढरीनाथ राणे भारी पुस्तक आहे आता लॉकडाउन मधे मी माझ्या पुतणीकडून उसने घेउन सगळे सोडवले होते. शकुंतला देवींची पुस्तके सोडवायलाही भारी मजा येते.. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पलाश

१.

आवडाबाई
Fri, 07/03/2020 - 15:08 नवीन
१=२
  • Log in or register to post comments

+१

ज्ञानोबाचे पैजार
Fri, 07/03/2020 - 16:03 नवीन
अचुक उत्तर पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आवडाबाई

४. (१६३२/५१)= ३२ शिक्षक

पलाश
Fri, 07/03/2020 - 15:41 नवीन
४. (१६३२/५१)= ३२ शिक्षक
  • Log in or register to post comments

यस..

ज्ञानोबाचे पैजार
Fri, 07/03/2020 - 16:03 नवीन
बरोबर पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पलाश

२ = ५१०

हेमंतकुमार
Fri, 07/03/2020 - 16:16 नवीन
२ = ५१०
  • Log in or register to post comments

+१

ज्ञानोबाचे पैजार
Fri, 07/03/2020 - 16:24 नवीन
५१० बरोबर उत्तर आहे पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

कसे ?

आवडाबाई
Tue, 07/07/2020 - 14:41 नवीन
कसे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

आता सोडवले तर माझे उत्तरही ५८० मिटर येते आहे

ज्ञानोबाचे पैजार
Tue, 07/07/2020 - 16:33 नवीन
३५० मिटर लांबीची गाङी ३५० मिटर चा बोगदा १.२५ मिनिटात ओलांडते म्हणजे त्या गाडीला ७०० मिटर अंतर कापायला ७५ सेकंद लागतात. म्हणजे त्या गाडीचा वेग मिनिटाला ७०० / ७५ x ६० = ५६० मिटर प्रतिमिनिट आहे. जर हा वेग ६२० मिनिट प्रतिमिनीट केला तर ती आगगाडी दुसरा बोगदा दिड मिनिटात म्हणजे ९० सेकंदात ओलांडते म्हणजे गाडी नव्या वेगाने ९० सेकंदात ९३० मिटर अंतर कापते. गाडीची लांबी ३५० मिटर म्हणुन बोगद्याची लांबी ९३० -३५० = ५८० मिटर. तुम्ही दिलेले उत्तर बरोबर होते. क्षमा करा, मी तुमच्या बरोबर उत्तराला चूक म्हणालो. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आवडाबाई

नो प्रॉब्लेम

आवडाबाई
Wed, 07/08/2020 - 11:03 नवीन
होते असे, पण... प्रायश्चित्त म्हणून अजून एक गणिती कोडे येऊ द्या. हे सोडवायला मजा आली, वेळ मिळेल तसतसे सोडवत होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

रिकामी बादली...

हेमंतकुमार
Fri, 07/03/2020 - 17:37 नवीन
९. तुमच्या कडे ८ लिटर आणि ५ लिटरच्या बादल्या आहेत. पण तुमच्या मित्राला फक्त १ लिटर पाणी हवे आहे. >>>> त्यासाठी आम्हाला तिसरी रिकामी बादली घ्यायची परवानगी पाहिजे बुवा !नाहीतर आम्ही नाही देत पाणी जा …..:))
  • Log in or register to post comments

सोप्पय!

चांदणे संदीप
Fri, 07/03/2020 - 17:54 नवीन
१) ८ लिटरच्या बादलीत पूर्ण पाणी भरून घ्या ते ५ लिटरच्या बादलीत ओता आणि ती बादली पुन्हा बाहेर ओतून रिकामी करा. २) ८ लिटरच्या बादलीत ३ लिटर शिल्लक असेल ते ५ लिटरच्या बादलीत टाका. ३) ८ लिटरची बादली पुन्हा भरून घेऊन ते सर्व पाणी ५ लिटरच्या बादलीत टाका आतीबापुबाओरिक. ४) ८ लिटरच्या बादलीत ६ लिटर शिल्लक असेल ते ५ लिटरच्या बादलीत टाका. ५) ८ लिटरमध्ये आता १ लिटर शिल्लक असेल! टॅन्टॅडॅण! १३ लिटर पाणी ओतून दिलं पण १ लिटर काढलं का नाय! मित्रासाठी कायपण! सं - दी - प
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

वाया नाही घालवलं पाहिजे....

हेमंतकुमार
Fri, 07/03/2020 - 18:16 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

वाया नाही घालवलं पाहिजे....

हेमंतकुमार
Fri, 07/03/2020 - 18:16 नवीन
आता संदीप भाऊंनी पाणी ओतून देऊन जे उत्तर काढलं त्यासाठीच आम्ही सोळा लिटरची एक मोठी बादली मागत होतो. म्हणजे ते सगळे पाणी त्यात ओतता आले असते. हे पाणी वाया नाही घालवलं पाहिजे राव, पर्यावरण जपायला नको काय ! :)))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

बराबर

ज्ञानोबाचे पैजार
Fri, 07/03/2020 - 22:00 नवीन
एकदम बराबर पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

६. (कमीतकमी) कोणतेही ४ मोजे.

पलाश
Fri, 07/03/2020 - 17:58 नवीन
६. (कमीतकमी) कोणतेही ४ मोजे.
  • Log in or register to post comments

सही जबाब

ज्ञानोबाचे पैजार
Fri, 07/03/2020 - 22:02 नवीन
सही जबाब पैजारबुवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पलाश

३.

सत्यजित...
Fri, 07/03/2020 - 21:27 नवीन
६२ सामने
  • Log in or register to post comments

उत्तर बरोबर आहे

ज्ञानोबाचे पैजार
Fri, 07/03/2020 - 22:04 नवीन
उत्तर बरोबर आहे पैजारबुवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सत्यजित...

स्पष्टीकरण ...

हेमंतकुमार
Fri, 07/03/2020 - 21:53 नवीन
3 नंबर मध्ये प्रत्येक संघ दुसऱ्याशी खेळला ,याचा अर्थ प्रत्येक संघ प्रत्येकाशी खेळाला का ? हे स्पष्ट करावे
  • Log in or register to post comments

हो असेच गृहीत धरा

ज्ञानोबाचे पैजार
Fri, 07/03/2020 - 22:04 नवीन
सगळे संघ एकमेकांबरोबर खेळले पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

भलतीच रंगली मॅच...

ज्ञानोबाचे पैजार
Sat, 07/04/2020 - 08:18 नवीन
सामनावीर किताब पलाश आणि कुमार१ यांना विभागून दिला जात आहे पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

शनिवार रविवार येण्या अगोदरच

गणेशा
Sat, 07/04/2020 - 08:44 नवीन
शनिवार रविवार येण्या अगोदरच कोडे सोडवायला खुप वेग येतो हे पण एक कोडेच झाले आहे.. :-))
  • Log in or register to post comments

छान मजा आली ...

हेमंतकुमार
Sat, 07/04/2020 - 10:27 नवीन
ज्ञा पै, छान मजा आली धन्यवाद . गणेशा, खास तुमच्यासाठी म्हणून नागरिकशास्त्र भाग-2 कोडे तयार आहे सोडवणार का बोला !
  • Log in or register to post comments

नक्कीच आवडते मला सोडवायला, पण

गणेशा
Sat, 07/04/2020 - 11:41 नवीन
नक्कीच आवडते मला सोडवायला, पण खास माझ्या साठी नको.. मला समोर उत्तर दिसत असले तरी आठवत नाही नेमके काय उत्तर असेल ते.. सोडवण्याचा प्रयत्न करेल.. दुपारी 2 पर्यंत free आहे..:-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

देशाचा कारभार’...

हेमंतकुमार
Sun, 07/05/2020 - 10:43 नवीन
आता घेऊया ‘देशाचा कारभार’ हा विषय. खाली सहा निरर्थक वाक्ये दिलेली आहेत. त्यातील शब्दांचा क्रमही विस्कटलेला आहे. प्रत्येक वाक्यात दिलेल्या विषयाचा एक शब्द दडलेला आहे. योग्य ती अक्षरे उचलल्यावर तो तयार होईल. अशा प्रत्येक शब्दाची अक्षरसंख्या संबंधित वाक्याच्या शब्दसंख्येइतकी आहे. असे विषयाशी संबंधित सहा शब्द तयार करा. ते झाल्यावर आणि खालीलप्रमाणे मांडल्यावर असे अर्थपूर्ण वाक्य तयार होईल : (१ २ ३ ) आणि ( ४ ५ ६ ) आहे. ............................... १. स्वातीताईंच्या प्रभातकाळी यांच्यासाठी सुरवंटाचे पाठीमागच्या दिवसाकाठी. २. हटवादी तदनुसार विघटनशील मनेकाताई फरपटतात अतिसावध. ३. निशाचराच्या मकरंदराव दहीभातावर त्रिलोकेकर. ४. हरिहरन दणकट हिकमतीने प्रकाशराव दिल्याशिवाय. ५. मजल्यावरती सव्यसाचीला करावयास पूज्यदेवता सुस्थापित. ६. सबलीकरण कलीयुगात मावळताना घरातून लुकलुकले. .............................................................
  • Log in or register to post comments

२.

सत्यजित...
Sun, 07/05/2020 - 14:39 नवीन
घटकानुसार?
  • Log in or register to post comments

३.

सत्यजित...
Sun, 07/05/2020 - 14:39 नवीन
लोकशाही
  • Log in or register to post comments

...

हेमंतकुमार
Sun, 07/05/2020 - 14:57 नवीन
सत्यजित, ३. लोकशाही बरोबर. २. घटकानुसार >>> हा अपेक्षित शब्द नाही ,पण तुम्ही जर शेवटी संपूर्ण अर्थपूर्ण वाक्यात बसवू शकलात, तर माझी हरकत नाही ! अंतिम उत्तर शेवटीच राहील.
  • Log in or register to post comments

एक प्रश्न

सत्यजित...
Sun, 07/05/2020 - 16:56 नवीन
पूर्वीच्या कोड्यांप्रमाणेच,एका शब्दातून एकच अक्षर निवडणे अपेक्षित आहे का?
  • Log in or register to post comments

५.

सत्यजित...
Sun, 07/05/2020 - 17:08 नवीन
राज्यव्यवस्था
  • Log in or register to post comments

सत्यजित,

हेमंतकुमार
Sun, 07/05/2020 - 17:16 नवीन
होय. ५. राज्यव्यवस्था >>> बरोबर, छान !
  • Log in or register to post comments

पण,

हेमंतकुमार
Sun, 07/05/2020 - 17:19 नवीन
पण, समजा एखाद्याने कशाही प्रकारे ठराविक अक्षरांचा शब्द बनवला तरी चालेल. शेवटी ते अर्थपूर्ण वाक्य 6 शब्द घेऊन तयार झाले पाहिजे ही अट आहे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा