लाजवाब आहेत सगळेच फोटो.
नेताजींचा पुतळा पाहून खूप बरं वाटलं.
आणि डायट हौस बद्दल तुझे विचार अगदी पटले.
मस्त लेख.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
आहाहा! आठवणी ताज्या झाल्या........फोटो वर्णन मस्तच मस्त.
एका उच्च लेखमालेतील अजुन एक उच्च लेख!
आता बुलेट ट्रेन मधे तुमच्या सिटा वळवुन घेता येतात उदा वरच्या चित्रात दाखवलेल्या २ बाय २ आणी तुम्ही चौघेजण प्रवास करत असाल तर समोरासमोर अशी आसनव्यवस्था करु शकता. गाडी शेवटच्या स्टेशनमधे आली की एक माणुस पटकन आत शिरुन आतल्या सगळ्या सीटस परतीच्या प्रवासाच्या दिशेने करतो. ते बघायला पण मजा येते. गार्डदेखील गाडी सोडताना विशिष्ट लयीत झेंडे फिरवतो. शिवाय ज्याकाही १५ - २० बुलेटट्रेन पाहील्या सगळ्याच्या इंजीनाच्या डब्याचे आकार वेगवेगळे होते.
राजवाड्या भोवतालच्या पाण्यातील हंस व मोठे मासे ऐकमेकांशी ब्रेडचे तुकडे बळकवताना झुंजत होते ते बघताना मौज वाटली.
शिबुया क्रॉसींग - शिबुया चौकातील रस्ता ओलांडणे हा प्रकार देखील मस्त!
टोकीयो मधील जाणवण्यासारखी अजुन एक महत्वाची गोष्ट प्रचंड म्हणजे जवळजवळ प्रत्येक रस्त्यावर अतिशय प्रचंड संख्येने असलेली शीतपेयाची व्हेंडींग मशीनस. नव्या व्हेडींग मशीनवरचा हा एक छोटा व्हिडीओ
ही लेखमाला माझ्या जपान सहलीला काही अंशी नक्कीच कारणीभूत होती.
अवांतर - जपान वाटते तितके महाग नाही आहे :-)
आम्हालाही लेखन्ट्रेनने जपानवारी घडवलीत.
पार्लमेंट हाऊसच्या समोरची एकसारखी झाडांची छाटणी पाहून आपल्या "जगप्रसिद्ध" ताजमहालाच्या समोरच्या खुंटलेल्या, खुरटलेल्या, एकाच रेषेत नसलेल्या, कमी-जास्त उंची असलेल्या झाडांची आठवण आली.
बुलेटट्रेन माशासारखी सुळ्ळकन आली हे विषेशण चपखल बसते. TGV ने प्रवास केलाय पण बुलेटट्रेनचा दिमाख काही औरच आहे असे ऐकुन आहे. विश मी लक.
अजय, टॉवरवर जाऊ देतात तर.. तेथूनच तर तोक्योचे विहंगन दर्शन घेतले आणि टीजीव्ही अपनी जगह,शिनकानसेन अपनी जगह.. तिचा दिमाख काही और हेच खरे. आय विश यू लक.
स्वाती
よこそ日本 म्हणजे जपानमध्ये स्वागत.
स्वातीताई लेख भारीच जमला आहे. माझे पण दोन येन टाकतो.
शिनकानसेन म्हणजे बुलेट ट्रेन ३ प्रकारच्या असतात. नोझोमि म्हणजे 'आशा', हिकारी म्हणजे 'प्रकाश' आणि कोदामा म्हणजे 'प्रतिध्वनी'.
अर्थात त्यांचा वेगही त्यांच्या नावाप्रमाणेच असतो.नोझोमि सर्वात फास्ट तर कोदामा सर्वात स्लो.
तोक्यो टॉवर काय आणि फुजीसान काय दोन्ही पण दुरुनच चांगले दिसतात. हा तोक्यो टॉवर.
आणि हा जपानी लोकांचा लाडका फुजीसान. हे प्रकाशचित्र शिनकानसेन मधुनच काढले आहे.
इंप्मिरियल पॅलेस आणि तोक्यो रेल्वे स्टेशन याच्यामधला 'मारुनोचि' नावाचा भाग जगातला सर्वात महाग व्यापारी भाग आहे.
आणि गिंझाच्या झगमागाटाची कहाणी औरच. हे स्वातीताईने उल्लेख केलेल्या आणि छायाचित्र डकवलेल्या सोनिच्या इमारतीचे रात्री काढलेले छायाचित्र.
आणि हा गिंझाचाच अजुन एक फोटो
आणि हे ओदाईबावरुन घेतलेले रेनबो ब्रिजचे छायाचित्र. मागे तोक्यो टॉवर दिसतो आहे.
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
हो जाउ देतात तर.
दोन टप्पे आहेत. पहिल्या टप्यावर दुसर्या टप्प्याचे ति़किट मिळते.
पहिल्या टप्प्यावर कॉफी शॉप , दुर्बिणी आहेत.
दुसर्या टप्प्यावर ऑब्जर्वेटरी आहे.
खाली पहिल्या मजल्यावर वॅक्स म्युझिअम आहे. आणि बॅन्ड असतात कधी कधी
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
नोझोमि म्हणजे 'आशा', हिकारी म्हणजे 'प्रकाश' आणि कोदामा म्हणजे 'प्रतिध्वनी'.
अर्थात त्यांचा वेगही त्यांच्या नावाप्रमाणेच असतो.नोझोमि सर्वात फास्ट तर कोदामा सर्वात स्लो.
यातली प्रतिकात्मकता अतिशय आवडली. 'आशा' सगळ्यात जास्त वेगवान असते.... 'आशाणाम् मनुष्यानाम्....' हे आठवले.
बिपिन कार्यकर्ते
फोटो अप्रतिम. सहजरावांनीं आणि गणा मास्तरांनीं आनंद वृद्धिंगत केला.
स्वातीताईंबरोबर दोघांनाहि धन्यवाद.
सोनीच्या संस्थापकांनीं, नांव विसरलों आतां मेड इन जपान म्हणून पुस्तक लिहिलें आहे. दुसर्या महायुद्धानंतर बाँबफेकीनें उद्ध्वस्त झालेल्या इमारतीच्या अवशेषांत थाटलेलें कार्यालय आतां एवढें दिमाखदार झालेलें पाहून मनोमन कौतुक वाटलें.
सुधीर कांदळकर.
वा!.. पुनरागमन झोकात आहे!
वर्णन नेहेमीप्रमाणे भन्नाट! गाडीला मासोळीची उपमा विषेश आवडली... पहिला आणि शेवटचे दोन फोटु तर आयसिंगवरील चेरी! :)
दुसर्या फोटुतल्या इंडीकेटरवर बाकी जपानी अक्षरे असताना आकडे विंग्रजी का? का जपानी लिपिमधे आकडेच नाहित?
बाकी जगाला वेड लाऊ शकणारी स्वतःची अशी संस्कृती असणार्या देशातील जनता अमेरीकेमागे इतकी वेडी कशी हे मात्र कळत नाहि
--ऋषिसान
प्रतिक्रिया
घरबसल्या जपान!
देर आये.. दुरूस्त आये..
नेहमीप्रम
सु रे ख ले
देर आये दुरूस्त आये!!!
वाङमय चौर्य..
+१
-
मस्तच!! देर
वेंट्री आली वेंट्री!
+१
अप्रतिम
पार्लमेंट हाउस
टीजीव्ही आणि शिनकानसेन
मस्तच लेख
व्वा !
यावे, यावे
खूप मस्त
よこそ日本
सुंदर,
शिनकानसेन
हो जाउ
२ येन
नोझोमि
सुंदर
स्वातीताई,
मस्त!!!!
मस्तच !
+१
अप्रतीम!
नेहमींप्रमाणेंच झकास. .....
जपानी गुडिया ,
धन्यवाद.
झोकात पुनरागमन