✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ले गई दिल 'दुनिया' जापानकी..१४

स
स्वाती दिनेश यांनी
Fri, 03/27/2009 - 00:13  ·  लेख
लेख

Book traversal links for ले गई दिल 'दुनिया' जापानकी..१४

  • ‹ ले गई दिल 'दुनिया' जापानकी..१३
  • Up
  • ले गई दिल 'दुनिया' जापानकी..१५ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
20841 वाचन

💬 प्रतिसाद (34)

प्रतिक्रिया

घरबसल्या जपान!

सर्वसाक्षी
Fri, 03/27/2009 - 00:20 नवीन
स्वाती, नेहेमीप्रमाणेच अगदी तपशिलवार वर्णन आणि पूरक अशी चित्रे आहेत.
  • Log in or register to post comments

देर आये.. दुरूस्त आये..

प्राजु
Fri, 03/27/2009 - 00:25 नवीन
लाजवाब आहेत सगळेच फोटो. नेताजींचा पुतळा पाहून खूप बरं वाटलं. आणि डायट हौस बद्दल तुझे विचार अगदी पटले. मस्त लेख. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

नेहमीप्रम

रेवती
Fri, 03/27/2009 - 00:31 नवीन
नेहमीप्रमाणे ग्रेट लिहिलयस. सगळ्या स्थळांची माहीती थोडक्यात पण छान! बर्‍याच दिवसांनी हा भाग वाचायला मिळाला. धन्यवाद! रेवती
  • Log in or register to post comments

सु रे ख ले

विसोबा खेचर
Fri, 03/27/2009 - 00:38 नवीन
सु रे ख ले ख मा ला ...! अन्य शब्द नाहीत! तात्या.
  • Log in or register to post comments

देर आये दुरूस्त आये!!!

बिपिन कार्यकर्ते
Fri, 03/27/2009 - 00:41 नवीन
खूऽऽऽप उशिर झाला पण मस्तच लेख झालाय. अप्रतिम फोटो. आणि मस्त ओळख. जपानी राजकारण्यांचे डायट मस्तच.... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

वाङमय चौर्य..

प्राजु
Fri, 03/27/2009 - 00:44 नवीन
बिपिनदाने माझ्या प्रतिसादाची चोरी केली आहे..त्यावर कारवाई व्हावी. ;) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

+१

बिपिन कार्यकर्ते
Fri, 03/27/2009 - 00:55 नवीन
सहमत... (अरेरे, प्राजुने काय लिहिलंय हे न वाचताच चुकून सवयीने सहमत लिहिलं गेलं.) ;) (कंपूबाज) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

-

प्राजु
Fri, 03/27/2009 - 00:57 नवीन
=)) =)) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

मस्तच!! देर

भाग्यश्री
Fri, 03/27/2009 - 02:15 नवीन
मस्तच!! देर आये दुरुस्त आये! :)
  • Log in or register to post comments

वेंट्री आली वेंट्री!

चतुरंग
Fri, 03/27/2009 - 02:37 नवीन
स्वातीसान, आलीस ती एकदम बुलेटट्रेन घेऊनच!! झक्कास! नेहेमीच्या स्वातीटच शैलीतला फर्मास लेख. चित्रेही सुबक, नेटकी! :) शेवटून दुसर्‍या चित्रजोडीत, टॉवरबाहेरच्या काचांवर बहिर्गोल आरशात दिसाव्यात तशा दिसणार्‍या शेजारच्या आणि समोरच्या टॉवरच्या प्रतिमा लाजवाब आल्यात. सगळ्याच आभासी प्रतिमा एखाद्या द्रव पदार्थातून आकार घेताहेत असे वाटते! चतुरंग
  • Log in or register to post comments

+१

दशानन
Fri, 03/27/2009 - 11:31 नवीन
हेच म्हणतो ! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

अप्रतिम

सहज
Fri, 03/27/2009 - 11:55 नवीन
आहाहा! आठवणी ताज्या झाल्या........फोटो वर्णन मस्तच मस्त. एका उच्च लेखमालेतील अजुन एक उच्च लेख! आता बुलेट ट्रेन मधे तुमच्या सिटा वळवुन घेता येतात उदा वरच्या चित्रात दाखवलेल्या २ बाय २ आणी तुम्ही चौघेजण प्रवास करत असाल तर समोरासमोर अशी आसनव्यवस्था करु शकता. गाडी शेवटच्या स्टेशनमधे आली की एक माणुस पटकन आत शिरुन आतल्या सगळ्या सीटस परतीच्या प्रवासाच्या दिशेने करतो. ते बघायला पण मजा येते. गार्डदेखील गाडी सोडताना विशिष्ट लयीत झेंडे फिरवतो. शिवाय ज्याकाही १५ - २० बुलेटट्रेन पाहील्या सगळ्याच्या इंजीनाच्या डब्याचे आकार वेगवेगळे होते. राजवाड्या भोवतालच्या पाण्यातील हंस व मोठे मासे ऐकमेकांशी ब्रेडचे तुकडे बळकवताना झुंजत होते ते बघताना मौज वाटली. शिबुया क्रॉसींग - शिबुया चौकातील रस्ता ओलांडणे हा प्रकार देखील मस्त! टोकीयो मधील जाणवण्यासारखी अजुन एक महत्वाची गोष्ट प्रचंड म्हणजे जवळजवळ प्रत्येक रस्त्यावर अतिशय प्रचंड संख्येने असलेली शीतपेयाची व्हेंडींग मशीनस. नव्या व्हेडींग मशीनवरचा हा एक छोटा व्हिडीओ ही लेखमाला माझ्या जपान सहलीला काही अंशी नक्कीच कारणीभूत होती. अवांतर - जपान वाटते तितके महाग नाही आहे :-)
  • Log in or register to post comments

पार्लमेंट हाउस

अजय भागवत
Fri, 03/27/2009 - 08:18 नवीन
आम्हालाही लेखन्ट्रेनने जपानवारी घडवलीत. पार्लमेंट हाऊसच्या समोरची एकसारखी झाडांची छाटणी पाहून आपल्या "जगप्रसिद्ध" ताजमहालाच्या समोरच्या खुंटलेल्या, खुरटलेल्या, एकाच रेषेत नसलेल्या, कमी-जास्त उंची असलेल्या झाडांची आठवण आली. बुलेटट्रेन माशासारखी सुळ्ळकन आली हे विषेशण चपखल बसते. TGV ने प्रवास केलाय पण बुलेटट्रेनचा दिमाख काही औरच आहे असे ऐकुन आहे. विश मी लक.
  • Log in or register to post comments

टीजीव्ही आणि शिनकानसेन

स्वाती दिनेश
Sun, 03/29/2009 - 18:10 नवीन
अजय, टॉवरवर जाऊ देतात तर.. तेथूनच तर तोक्योचे विहंगन दर्शन घेतले आणि टीजीव्ही अपनी जगह,शिनकानसेन अपनी जगह.. तिचा दिमाख काही और हेच खरे. आय विश यू लक. स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजय भागवत

मस्तच लेख

यशोधरा
Fri, 03/27/2009 - 09:08 नवीन
मस्तच लेख गं स्वातीताई.
  • Log in or register to post comments

व्वा !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 03/27/2009 - 11:39 नवीन
पुन्हा एक सुंदर लेख ! सुंदर छायाचित्रे ! >>"मे आय हेल्प यू?" च्या पाटीखाली हेल्प करायला कोणीतरी असते. हा हा हा :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

यावे, यावे

श्रावण मोडक
Fri, 03/27/2009 - 12:46 नवीन
यावे. चांगल्या लेखाने पुनरागमन (प्रवासाचे). छायाचित्रे छानच. डायटवरची टिपणी आवडली. ती अगदी पाककृतीतज्ज्ञाला शोभेशीच.
  • Log in or register to post comments

खूप मस्त

क्रान्ति
Fri, 03/27/2009 - 13:15 नवीन
खूप मस्त लेख आणि खूप छान फोटो. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments

よこそ日本

गणा मास्तर
Fri, 03/27/2009 - 14:54 नवीन
よこそ日本 म्हणजे जपानमध्ये स्वागत. स्वातीताई लेख भारीच जमला आहे. माझे पण दोन येन टाकतो. शिनकानसेन म्हणजे बुलेट ट्रेन ३ प्रकारच्या असतात. नोझोमि म्हणजे 'आशा', हिकारी म्हणजे 'प्रकाश' आणि कोदामा म्हणजे 'प्रतिध्वनी'. अर्थात त्यांचा वेगही त्यांच्या नावाप्रमाणेच असतो.नोझोमि सर्वात फास्ट तर कोदामा सर्वात स्लो. तोक्यो टॉवर काय आणि फुजीसान काय दोन्ही पण दुरुनच चांगले दिसतात. हा तोक्यो टॉवर. Image removed. आणि हा जपानी लोकांचा लाडका फुजीसान. हे प्रकाशचित्र शिनकानसेन मधुनच काढले आहे. Image removed. इंप्मिरियल पॅलेस आणि तोक्यो रेल्वे स्टेशन याच्यामधला 'मारुनोचि' नावाचा भाग जगातला सर्वात महाग व्यापारी भाग आहे. आणि गिंझाच्या झगमागाटाची कहाणी औरच. हे स्वातीताईने उल्लेख केलेल्या आणि छायाचित्र डकवलेल्या सोनिच्या इमारतीचे रात्री काढलेले छायाचित्र. Image removed. आणि हा गिंझाचाच अजुन एक फोटो Image removed. आणि हे ओदाईबावरुन घेतलेले रेनबो ब्रिजचे छायाचित्र. मागे तोक्यो टॉवर दिसतो आहे. Image removed. - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments

सुंदर,

दशानन
Fri, 03/27/2009 - 15:07 नवीन
सुंदर, फोटो व माहीती ! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणा मास्तर

शिनकानसेन

अजय भागवत
Fri, 03/27/2009 - 16:02 नवीन
शिनकानसेनबद्दलची नवीन माहिती खजिन्यात टाकली! तोक्यो टॉवरवर पर्य्टकांना जाऊ देतात का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणा मास्तर

हो जाउ

गणा मास्तर
Fri, 03/27/2009 - 17:11 नवीन
हो जाउ देतात तर. दोन टप्पे आहेत. पहिल्या टप्यावर दुसर्‍या टप्प्याचे ति़किट मिळते. पहिल्या टप्प्यावर कॉफी शॉप , दुर्बिणी आहेत. दुसर्‍या टप्प्यावर ऑब्जर्वेटरी आहे. खाली पहिल्या मजल्यावर वॅक्स म्युझिअम आहे. आणि बॅन्ड असतात कधी कधी - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजय भागवत

२ येन

स्वाती दिनेश
Sun, 03/29/2009 - 18:12 नवीन
गणामास्तर, २ येन काय? बरेच येन झालेत की हे,:) माहिती आणि चित्रांसाठी अरिगातो गोझायमास. स्वाती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणा मास्तर

नोझोमि

बिपिन कार्यकर्ते
Fri, 03/27/2009 - 15:05 नवीन
नोझोमि म्हणजे 'आशा', हिकारी म्हणजे 'प्रकाश' आणि कोदामा म्हणजे 'प्रतिध्वनी'. अर्थात त्यांचा वेगही त्यांच्या नावाप्रमाणेच असतो.नोझोमि सर्वात फास्ट तर कोदामा सर्वात स्लो. यातली प्रतिकात्मकता अतिशय आवडली. 'आशा' सगळ्यात जास्त वेगवान असते.... 'आशाणाम् मनुष्यानाम्....' हे आठवले. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

सुंदर

सन्दिप नारायन
Fri, 03/27/2009 - 15:25 नवीन
स्वाती, तु चार पाच वर्शापुर्वीचे तपशिलवार वर्णन कसे काय करु शकतेस कुठे लीहुन ठेवले आहेस की काय? सन्दीप
  • Log in or register to post comments

स्वातीताई,

शाल्मली
Fri, 03/27/2009 - 16:08 नवीन
स्वातीताई, नेहमीप्रमाणेच खुमासदार वर्णन. छान माहितीपूर्ण लेख. तू टाकलेले आणि गणा मास्तरांनी टाकलेले फोटोही छानच! --शाल्मली.
  • Log in or register to post comments

मस्त!!!!

प्रमोद देव
Fri, 03/27/2009 - 16:51 नवीन
नेहमीप्रमाणे मस्त!!!!!!!!! आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
  • Log in or register to post comments

मस्तच !

शितल
Fri, 03/27/2009 - 18:09 नवीन
स्वातीताई, किती सुंदर, सहज प्रवास वर्णन करतेस तु खुप आवडते. फोटो ही सुरेख आहेत. :)
  • Log in or register to post comments

+१

मदनबाण
Sat, 03/28/2009 - 00:58 नवीन
सहमत... :) मदनबाण..... "If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल

अप्रतीम!

आळश्यांचा राजा
Sat, 03/28/2009 - 01:37 नवीन
सुरेख लिखाण आणि मांडणी! आळश्यांचा राजा
  • Log in or register to post comments

नेहमींप्रमाणेंच झकास. .....

सुधीर कांदळकर
Sat, 03/28/2009 - 09:55 नवीन
फोटो अप्रतिम. सहजरावांनीं आणि गणा मास्तरांनीं आनंद वृद्धिंगत केला. स्वातीताईंबरोबर दोघांनाहि धन्यवाद. सोनीच्या संस्थापकांनीं, नांव विसरलों आतां मेड इन जपान म्हणून पुस्तक लिहिलें आहे. दुसर्‍या महायुद्धानंतर बाँबफेकीनें उद्ध्वस्त झालेल्या इमारतीच्या अवशेषांत थाटलेलें कार्यालय आतां एवढें दिमाखदार झालेलें पाहून मनोमन कौतुक वाटलें. सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments

जपानी गुडिया ,

हरकाम्या
Sat, 03/28/2009 - 11:42 नवीन
झकास>
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

स्वाती दिनेश
Sun, 03/29/2009 - 18:14 नवीन
सर्वांना मनापासून धन्यवाद. स्वाती
  • Log in or register to post comments

झोकात पुनरागमन

ऋषिकेश
Sun, 03/29/2009 - 21:45 नवीन
वा!.. पुनरागमन झोकात आहे! वर्णन नेहेमीप्रमाणे भन्नाट! गाडीला मासोळीची उपमा विषेश आवडली... पहिला आणि शेवटचे दोन फोटु तर आयसिंगवरील चेरी! :) दुसर्‍या फोटुतल्या इंडीकेटरवर बाकी जपानी अक्षरे असताना आकडे विंग्रजी का? का जपानी लिपिमधे आकडेच नाहित? बाकी जगाला वेड लाऊ शकणारी स्वतःची अशी संस्कृती असणार्‍या देशातील जनता अमेरीकेमागे इतकी वेडी कशी हे मात्र कळत नाहि --ऋषिसान
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा