मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शेअर मार्केट क्लासेस

dadabhau · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
आजकाल शेअर मार्केट क्लासेस चा खूपच सुकाळ झालाय. मी ही गेले वर्षभर कमीत कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये... जवळजवळ फुकटात खूप लवकर अतिश्रीमंत होण्यासाठी अश्या क्लासेस चे बरेच सेमिनार ( eye opener वगैरे ...) अटेण्ड केलेत... so called अध्यात्मिक बाबा,बुवा ,देव्या.. आणि हे मार्केटगुरु ह्यांच्या मोडस ऑपरेंडी मध्ये बरेच साम्य आढळले ( जसे टार्गेटेड market - मंदी च्या भीतीने आणि असे ही सदैव नोकरी गमावण्याची भीती वाटत असलेले IT वाले गिर्हाईकं ... सुरुवात ५-१० हजाराच्या module पासून करून हळूहळू लाखोंचे कोर्स गळ्यात मारणे .... - मला माहित असलेला एक कोर्स १६ लाखाचा आहे !!!) ह्या गुरूंना whatsapp ग्रुप्स , telegram channels , zoom सारखे ब्रॉडकास्टींग apps मुळे आपला धंदा आणि संप्रदाय वाढवणे खूप सोपे झालेय.. तर प्रश्न असा आहे की मिपाकरांच्या पाहण्यात असे इंट्रा-डे ट्रेडिंग करून करोडपती ( ३-४ सेमिनार अटेंड केल्यामुळे आपण लाखोपती तर एकदम छाटछूट समजतो !!!) झालेले मराठी माणसे माहित आहेत का? एक गुरु तर कमीत कमी १०० कि १००० मराठी माणसांना करोडपती बनवायला निघालाय ( नाव लिहीत नाही काहींना समजले असेलच...). दुसरे म्हणजे ट्रेडिंग मध्ये गमावलेला पैसे हे लोक क्लास मध्ये कमावतात असांज अंदाज आहे.. खरे असावे का? मिपाकरांना अश्या क्लासेस चे...गुरूंचे..त्यांच्या शिष्यांचे ( हा MLM सारखा च प्रकार आहे.. किती ही उल्लू बनले तरी शिष्य गुरुची प्रशंसा च करतात !!!) काही अनुभव असतील ( positive आणि negative ) तर share (!!!) करावेत ही विनंती ...knowledge मध्ये भर पडून हा मार्ग सोडावा कि धरून चालावा हे ठरवता येईल...

वाचन 46024 प्रतिक्रिया 0