✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

हे असे का असावं?

त
तमराज किल्विष यांनी
Mon, 08/05/2019 - 11:05  ·  लेख
लेख
लहान असल्यापासून मी जरा एकलकोंडा मनुष्य आहे. फक्त नातेवाईक, शेजारपाजारच्या लोकांशी मनमोकळेपणाने मिसळू शकतो पण नवीन लोकांशी बोलायला, कुणाच्या घरी जायला मन तयार होत नाही. शाळेत, कॉलेजमध्ये एवढी अडचण आली नाही. ठराविक मित्रांबरोबर सुट झालो. नोकरी मध्ये सुद्धा आपण भलं आणि आपलं काम भलं. जास्त संबंध कुठे वाढविले नाही, सासरच्या लोकांशी संबंध आलेल्यांचे स्वागत, चाललेल्यांचे आभार असे ठेवले. बालपणापासून वाचनाची खूप आवड लागली, मिळेल ते वाचून काढले. बऱ्याचदा पुस्तकांमध्ये इतका गढून जायचो की आजूबाजूला कोण काय करतं, बोलतंय हे कळायचं नाही. कुणी किती हाका मारल्या तरी ऐकू यायच्या नाही. यामुळे मला कल्पना रंजन करत राहण्याची सवय झाली. कोणत्याही देव, संत, खेळाडू, देशभक्त, राजे, ग्रंथ यांचं नाव कानावर पडताच मनात लगेच विचारचक्र सुरू होतं, ते लवकर थांबतच नाही. सिनेमा पाहिला तर किमान आठवडाभर त्याचं विश्लेषण मनात सुरू राहतं. प्रयत्न करूनही विचार थांबत नाहीत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आजकाल बॅकग्राऊंड ला जसं संगीत चालू असते. तसे सारखे दोन किंवा जास्त व्यक्ती संभाषण करत आहेत हे जाणवत राहते. अनेकदा अतर्क्य जे कधीच ऐकले, वाचले नाही असे संभाषण पाहून मीच आश्र्चर्यचकित होतो. रात्री हा प्रकार खूपच ठळक ऐकू येतो. खूप प्रयत्न करुन या संवादातील एखादं वाक्य नीट लक्षात घेऊन हे काय आहे हे पाहिले तर संदर्भहीन, असंबद्ध वाक्य असल्याचं ध्यानात येते. मुन्नाभाई एमबीबीएस मधील केमिकल लोच्या सारखा हा प्रकार आहे का असे वाटते. आजपर्यंत कुणा डॉक्टरला मी याविषयी विचारले नाही. पण आता मनाची शक्ती फारच ड्रेन झाल्यासारखी वाटते. कृपया हा मानसिक आजार आहे, की आणखी काय आहे आणि याला उपाय काय हे सहानुभूतीने समजावून सांगावे ही विनंती. प्रश्नोत्तरे विभागात जाता न आल्याने इथे लिहीलं आहे.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
आरोग्य
लेखनप्रकार (Writing Type)
सल्ला

प्रतिक्रिया द्या
32623 वाचन

💬 प्रतिसाद (70)

प्रतिक्रिया

समजायला काय जाते ?

जॉनविक्क
Sun, 08/11/2019 - 09:56 नवीन
हवं तर तुम्हाला डॉनल्ड ट्रम्प सुधा समजू...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तमराज किल्विष

काय म्हणता ?

जॉनविक्क
Sun, 08/11/2019 - 11:22 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क

की किम जोंग उन समजायची प्रोसेस सुरू करायची ?

जॉनविक्क
Sun, 08/11/2019 - 11:30 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क

जॉन विक्क भाऊ एवढे विक होऊ

तमराज किल्विष
Mon, 08/12/2019 - 07:43 नवीन
जॉन विक्क भाऊ एवढे विक होऊ नका. माझ्या लेखणाचा त्रास करून घेण्यापेक्षा तुम्ही संन्यास घ्या. तूमचा तणाव ३०० टक्के वाढलाय असं दिसतं.
  • Log in or register to post comments

तुमचा धागा तुम्हाला मार्गदर्शन हवंय म्हणून, अन्यथा

जॉनविक्क
Mon, 08/12/2019 - 12:05 नवीन
तुम्ही काय करावे हे सांगायचा मला अधिकार नाही परंतु आपला त्रास कमी व्हावा असे मनापासून वाटत असल्याने मी फक्त आपलं निरीक्षण नोंदवले. मिपावर तुम्ही आम्हाला हवेच आहात. पण त्यासाठी तुम्ही तुमच्यामानसिक आरोग्याचा बळी द्यावा हे पटत नाही हो :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तमराज किल्विष

तमराजजी,

मराठी कथालेखक
Mon, 08/12/2019 - 13:03 नवीन
तमराजजी, तुम्ही हे गांभीर्याने लिहिलं आहे असं गृहीत धरुन मी प्रतिसाद देत आहे. एक शक्यता म्हणून हे विचारात घ्या तुम्ही जिथे राहता तिथे जवळपास वा काही दूर खरेच काही कोलाहल असू शकतो.. तो आवाज क्षीण असेल आणि इतरांना ऐकू येत नसेल पण तुम्हाला ऐकू येतो. याचा अर्थ तुमच्या कानांची क्षमता प्रचंड वाढलेली आहे असे असू शकते. दिवसा संभाषणांच्या आवाजाखेरीज असे अनेक आवाज तुम्हाला ऐकू येत असतील आणि त्यामुळे संभाषणाच्या आवाजाचा त्रास होत नसेल वा ते फारसे जाणवत नसतील. पण रात्री इतर आवाज कमी झाल्याने संभाषणांचे आवाज तुम्हाला जास्त जाणवत असतील.. तुम्ही ही शक्यता तपासून बघण्याकरिता खालील गोष्टी करु शकता १) संभाषणांच्या आवाजाव्यतिरिक्त इतर काही दूरचे आवाज (जसे बस, ट्रेनचे, भांड्यांचे ई ई) ऐकू येतात का ते बघा २) जिथे दूरदूर पर्यंत खरंच खूप शांतता आहे अशा एखाद्या ठिकाणी रात्री संभाषणांचे आवाज ऐकू येतात का ते बघा.. एखाद्या साउंडप्रुफ खोलीत हे तपासा जर ही शक्यता खरी निघाली तर या गोष्टीकडे समस्या म्हणून बघू नका.. ही एक निसर्गाची देणगी आहे. (मी दैवी वगैरे म्हणत नाही... हे फक्त व्हेरिएशन आहे) . जमिनीत एखाद्या ठिकाणी विहीर(वा बोअरवेल) खणली तर पाणी लागेल की नाही हे सांगू शकणारे काही विशिष्ट लोक असतात त्याबद्दल तुम्ही ऐकले आहे का ? त्यात अंधश्रद्धा वगैरे नाहीये तर त्या लोकांची श्रवणक्षमता इतर सामान्य माणसांच्या तुलनेत खूप जास्त असते. जसं कुत्र्याची त्यातही श्वानपथकात असतात त्या जातीच्या कुत्र्यांची गंध समजण्याची क्षमता अतिप्रचंड असते आणि माणसांच्या दृष्टीने तर तो केवळ एक चमत्कारच.. तसंच काहीस काही माणसांच्या श्रवणक्षमतेबाबत असावं...
  • Log in or register to post comments

ही शक्यता भारीच आहे

राजेंद्र मेहेंदळे
Tue, 08/13/2019 - 17:47 नवीन
बराच वेळ प्रतिक्रिया वाचत होतो, पण हा मुद्दा म.क.नी नवीनच काढला. १. रात्री झोपताना कानात पोहताना घालायचे रबराचे स्टॉपर घालुन झोपा. २. झोपायच्या आधी ध्यान किवा जप करायची सवय असेल तर उत्तमच, नसल्यास लावुन घ्या ३. सकाळी किवा संध्याकाळी, जेव्हा वेळ असेल तेव्हा जॉगिंग करा, जॉगिंग करताना शरीराला पळवत ठेवुन आणि मन वेगळे विचार करत राहते असे मला जाणवते. कधी कधी काही समस्यांची उत्तरेही सापडतात तेव्हाच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

मराठी कथालेखक जी असा मी विचार

तमराज किल्विष
Tue, 08/13/2019 - 14:11 नवीन
मराठी कथालेखक जी असा मी विचार केलेला नाही. पण बऱ्याचदा ओळखीच्या लोक प्रत्यक्ष बोलल्या प्रमाणे त्यांचं एखादं वाक्य गपकन कानावर येते. तसेच समोरासमोर बोलताना समोरच्या माणसाच्या मनात असलेला प्रश्नाला मी उत्तर देतो तर तो आपण याला विचारले नाही तरी याने हा विषय कसा काय काढला हे पाहून आश्र्चर्यचकित होतो हे मी नेहमी पाहतोय. थोडीफार इंट्युशनची देणगी मला आहे. काही साधना मी केल्या आहेत. पण हे संभाषणं निरूपद्रवी असली तरी हे काय चाललंय ते न कळल्याने अस्वस्थता वाटते.
  • Log in or register to post comments

समोरच्या माणसाच्या मनात

जॉनविक्क
Tue, 08/13/2019 - 14:45 नवीन
समोरच्या माणसाच्या मनात असलेला प्रश्नाला मी उत्तर देतो तर तो आपण याला विचारले नाही तरी याने हा विषय कसा काय काढला हे पाहून आश्र्चर्यचकित होतो हे मी नेहमी पाहतोय.
ओह माय गॉड, तुम्हाला इतरांच्या मनातले विचार आवाज स्वरुपात ऐकू येतात होय... हे तर एकदम अगोबाई अरेच्चा सारखे प्रकरण वाटत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तमराज किल्विष

वैधानिक इशारा : त्यांना

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 08/13/2019 - 19:31 नवीन
वैधानिक इशारा : त्यांना तुमच्या मनातली सगळी गुपितं दिसण्या-ऐकू येण्याअगोदर, थांबा ! ;) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क

:) हे मात्र खरच :D :D :D

जॉनविक्क
Tue, 08/13/2019 - 22:31 नवीन
थोडीफार इंट्युशनची देणगी मला आहे.
तकी सेठ आपल्याकडे अक्यूमनची दैवी देणगी असेल तर बोला ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

आपल्या मनात खौचट उकळ्या फुटत

तमराज किल्विष
Wed, 08/14/2019 - 09:23 नवीन
आपल्या मनात खौचट उकळ्या फुटत आहे हे कळलं मला इंट्यूशननं. _/\_
  • Log in or register to post comments

We lose a touch with reality

तमराज किल्विष
Fri, 08/16/2019 - 16:48 नवीन
We lose a touch with reality and start living in fantasy if we overdo the reading. >> हा संदेश मला श्री उन्मेष दिक्षीत सरांनी पाठवला आहे व मला तो सर्वात जास्त आवडला आहे. त्यांचे जाहीर आभार मानतो. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

उन्मेष जी

जॉनविक्क
Fri, 08/16/2019 - 17:00 नवीन
We lose a touch with reality and start living in fantasy if we overdo the reading.
आवडले.
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

तमराज किल्विष
Fri, 08/16/2019 - 21:06 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments

थँक्स

उन्मेष दिक्षीत
Fri, 08/16/2019 - 21:43 नवीन
किल्विष , विक्क. सर म्हणु नका हो एवढा मोठा (वयाने) नाही मी :)
  • Log in or register to post comments

नक्कीच म्हटलं नसते

जॉनविक्क
Fri, 08/16/2019 - 22:00 नवीन
पण वाचनाची गोडी पाहिजे, वाचनाची गोडी पाहिजे चे तूणतूणे लावणाऱ्याना तुम्ही वास्तवाची जी खणखणीत चपराक दिली त्यामुळे खरोखर मजा आ गया :) तयासाठी सर हा बहुमान आपणास द्यायलाच हवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उन्मेष दिक्षीत

हाहाहा

उन्मेष दिक्षीत
Sat, 08/17/2019 - 09:55 नवीन
वाचनाची गोडी मात्र पाहिजेच हं ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क

तर काय :)

जॉनविक्क
Sat, 08/17/2019 - 11:30 नवीन
फक्त इडियट बॉक्स प्रमाणे वाचनाच्या अतिरेकाचेही दुष्परिणाम असतात हे देखील अधोरेखित होणे महत्वाचे आहे आणि आपण त्याची सुरूवात केलीत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उन्मेष दिक्षीत

ह्या ह्या कोणाचं काय तर

तमराज किल्विष
Sat, 08/17/2019 - 07:30 नवीन
ह्या ह्या कोणाचं काय तर कोणाचं काय? आपल्या मतलबाप्रमाणे अर्थ काढायचा दुसरं काय.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा