आनंदाचे डोहीं आनंद तरंग।
१
Khaled - C'est La Vie
नव्वदच्या दशकात भारतात आंतरराष्ट्रीय पॉप संगीताचे पर्व सुरु झाले तेव्हा 'दि दि' ह्या लोकप्रिय गाण्याने आपल्या परिचयाचा झालेला नायजेरियन गायक खालीद् ह्याचे फ्रेंच आणि अरबी भाषेतील हे गाणे श्रवणीय आणि प्रेक्षणीय असून गाण्यातली उर्जा थक्क करणारी आहे.
२
Shakira - Waka Waka
खेळाडूंच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेची कसोटी पाहणाऱ्या फुटबॉल सारख्या खेळाच्या २०१० सालच्या फिफा वर्ल्डकपचे अधिकृत गीत म्हणून मान्यता मिळालेले आणि उत्तमरित्या चित्रीत केलेले कोलंबियन गायिका आणि नृत्यांगना शकीराचे हे गाणे.
3
सेनोरीटा
हृतिक रोशन, फरहान अख्तर आणि अभय देवल ह्या तिघांनी गायलेले आणि त्यांच्यावरच चित्रित केलेले, 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' ह्या चित्रपटातील स्पॅनिश आणि हिंदी भाषेतील हे गाणे ऐकायला आणि बघायला फार छान वाटते.
4
मल्हारी - बाजीराव मस्तानी
बाजीराव मस्तानी चित्रपटातील, रणवीर सिंग ह्या अभिनेत्यावर चित्रित केलेल्या ह्या गाण्यातला, नाचताना त्याने दाखवलेला जोश वाखाणण्याजोगा आहे.
५
झिंगाट - सैराट
अबालवृद्धांना आपल्या तालावर थिरकायला लावणारं सैराट चित्रपटातील हे गाणं माहित नसेल अशी व्यक्ती महाराष्ट्रात विरळाच असेल. मला हा चित्रपट आवडला नसला तरी हे गाणं मात्र आवडतं.
६
तुफान आलयां - पाणी फाउंडेशन
'पाण्याचे दुर्भिक्ष' अशा गंभीर विषयावर आधारित असूनही, अजय-अतुल ह्यांचे संगीत, गुरु ठाकूर ह्यांचे शब्द, किरण राव आणि अजय गोगावले ह्यांचा आवाज, नागराज मंजुळे ह्यांचे दिग्दर्शन लाभल्याने आणि नामवंत कलाकारांचा सहभाग असल्याने हा व्हिडिओ मनाला चांगलाच भावतो.
7
गुन गुन गुना रे - अग्निपथ
पुनर्निर्मित 'अग्निपथ' ह्या चित्रपटातील हृतिक रोशन आणि प्रियांका चोप्रा ह्यांचा सहभाग असलेले हे गाणं आधी नुसते ऐकले होते तेव्हा आवडले नव्हते, पण चित्रपटात बघितल्यावर मात्र फार आवडले.
८
गल्लां गुडीयां - दिल धडकने दो
दिल धडकने दो ह्या चित्रपटातील, अनिल कपूर, प्रियांका चोप्रा, रणवीर सिंग, फरहान अख्तर अशा दिग्गज कलाकारांवर चित्रित केलेले आणि सुखविंदर सिंग व शंकर महादेवन ह्यांच्या दमदार आवाजातील हे गाणं बघताना पाय आपोआपच ठेका धरतात.
९
झल्ला वल्लाह - इशकजादे
इशकजादे चित्रपटातील ह्या गाण्यात गौहर खान आणि परिणीती चोप्रा या दोन्ही अभिनेत्रींनी आपल्या नृत्याने आणि हावभावांनी बहार आणली आहे. हे गाणंही चित्रपट पाहिल्यानंतर आवडायला लागलं.
१०
रूबरू - रंग दे बसंती
रंग दे बसंती चित्रपटातील आमिरखान, अतुल कुलकर्णी, शर्मन जोशी, माधवन, सिद्धार्थ, कुणाल कपूर, सोहा अली खान असे सहभागी कलाकार आणि त्याला ए.आर.रेहमानच्या संगीताची जोड लाभलेले, मैत्री आणि अवखळ तरुणाईचे दर्शन घडवणारं असं हे सुदर गाणं.
११
मच गया शोर - खुद्दार
ऐशीच्या दशकातील खुद्दार चित्रपटातील अमिताभ बच्चन आणि परवीन बॉबी वर चित्रित केलेले हे सदाबहार गाणे केवळ दहीहंडीच्या दिवशीच नाही तर कधीही ऐकायला/बघायला मजा येते.(युट्युब वर ह्या गाण्याचा चांगल्या प्रतीचा व्हीडीओ उपलब्ध नाहीये.)
१२
PSY - GANGNAM STYLE
१५ जुलै २०१२ रोजी युट्युब वर प्रदर्शित झालेल्या, साय (PSY) नावाच्या दक्षिण कोरियन नर्तक-गायकाच्या ह्या धमाल व्हीडीओने, डिसेंबर २०१२ मध्ये युट्युबच्या इतिहासात सर्वप्रथम १०० कोटी व्ह्यूज मिळवण्याचा विक्रम नोंदवला आहे.
प्रतिक्रिया
गाण्यांवर डान्स ही केला तर
लेखाला धन्यवाद द्यायचे राहून
छान संग्रह
सर्वप्रथम माफी मागतो सर्व मिपाकरांची!
धन्यवाद तमराज किल्विष आणि कुमार१ साहेब.
चांगलं कलेक्शन, विशेषतः क्रमांक दोन
धन्यवाद चामुंडराय. क्रमांक १ बघितल्या नंतरचे आपले मत
टर्मिनेटर भाऊ तो १ नंबरचा व्हीडिओ टर्मिनेट झाला कि हो.
@ चामुंडराय
बॉब डिलनच BLOWIN IN THE WIND
अप्रतिम कॉलेकशन. मलाही आवडतात
अप्रतिम कॉलेकशन. मलाही आवडतात
मै तुजसे मिलने आजाऊ क्या और बोल मै हलगी बजाऊ क्या
खूप मस्तं लेख आणि संग्रह. 3,4
गल्लां गुडिया - दिल धडकने दो.
संग्रह आवडला.
सर्व प्रतीसादकांचे मनःपूर्वक आभार!
बदला है बहुत कुछ यहां
मान गये आपकी पारखी नजर को!
:) CSS च बदलली असल्याने आख्खे पेजच बदलले.
आत्ता हा व्हिडिओ पुन्हा पहिला
चले जैसे हवाए...
आनंदाचे डोहीं आनंद तरंग निर्माण होणे म्हत्वाचे
@जॉनविक्क
मस्त धागा आणि मस्त कलेक्शन !
@ दुर्गविहारी
वाहवा टर्मीनेटरजी काय लिहिलं आहेत
@ जेम्स वांड