✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. १

स
स्वाती दिनेश यांनी
गुरुवार, 09/20/2007 - 20:39  ·  लेख
लेख
  • ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. २
  • ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. ३
  • ले गई दिल 'दुनिया' जापानकी..४
  • ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. ५
  • ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. ५(अ)
  • ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. ६
  • ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. ७
  • ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. ८
  • ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. ९
  • ले गई दिल 'दुनिया' जापानकी..१०
  • ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. ११
  • ले गई दिल 'दुनिया' जापानकी..१२
  • ले गई दिल 'दुनिया' जापानकी..१३

Book traversal links for ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. १

  • ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. २ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
30536 वाचन

💬 प्रतिसाद (27)

प्रतिक्रिया

ग
गुंडोपंत Fri, 09/21/2007 - 07:22 नवीन

वा! अगदी छान!

"परीने ढगांतून अलगद खाली यावं ना,तसं आमचं विमान हाँगकाँगला उतरलं." वा! अगदी छान! "विमानाची चाकं जमिनीला लागली तरी अस्मादिक आकाशातच तरंगत होते." हे पण मस्तच! "छोटीशी शटल ट्रेन घेऊन " म्हणजे विमानतळावरच रेल्वे? अच्छा मोठाच असणार हा विमान तळ!""सर्टिफिकेट ऑफ एलिजिबिलिटी देऊन पासपोर्टावर शिक्का मारुन " म्हणजे काय असते बॉ? "तिथे असलेल्या अटेंडटनेच माझी बॅग र्ट्रॉलीवर घालून दिली " वा मजा आहे! आपला गुंडोपंत
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 09/21/2007 - 07:58 नवीन

छान

>>ओसाका कानसाई विमानतळाचे विहंगम दॄश्य फार सुंदर दिसते. अगदी. मधे डीस्कव्हरी का नॅ.जिओ. वर ह्या विमानतळाच्या बांधकामाची सूंदर फिल्म पाहीली होती. एक झलक म्हणजे पंतांना विमानतळावर ट्रेनचा अंदाज येईल. Image removed. बाकी जपान ह्या देशाचे मला नेहमीच कूतूहलमिश्रीत आर्श्चय वाटत आले आहे. तेथेपण मंत्रीमहोदयांच्या भ्रष्टाचाराच्या, भानगडींच्या बातम्या येते असतात पण समाजात काय स्वच्छता,शिस्त व प्रामाणीकपणा आहे. तुमची लॅपटॉप, मोबाइल असलेली बॅग जरी विसरली तरी ति कोणी घेणार नाही, ज्या जागी विसरलात तिथेच लगेच गेलात तर सापडेल किंवा नजीकच्या पोलीस स्थानकात. तुमचे हेल्मेट गाडीवर ठेवून बिनधास्त जा, कोणी घेणार नाही. बाय द वे स्वातीताई हे जपान नवीन घडामोडी का जर्मनीच्या आधीची गोष्ट? बाकी बघीतले पाहीजे सुभाषबाबूंनंतर जपान, जर्मनीमधे कार्य तुमचेच कि काय? :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुंडोपंत
ग
गुंडोपंत Fri, 09/21/2007 - 08:12 नवीन

काय विमानतळ आहे!

मस्त चित्र आहे हे सहजराव. सहजराव! नीटच कळलं आता तुम्हाला काय म्हणायचे आहे ते! वा! काय विमानतळ आहे! चक्क एक बेटच बांधून काढलंय म्हणाकी! कसं काय केलं असेल या लोकांनी... अचंबाच वाटतोय मला! जपानी मोठे कल्पक आहेत यात शंका नाही. शिवाय प्रामाणिक लोकं... म्हणजे तात्याने जपानी मिसळपाव (बिंतो बिंतो पाव डॉट कॉम? ;)) ) काढले, तर "कुणीही कोणतेही आयडी घेऊन, कुणाचेतरी लेखन त्यावर टाकणार नाही, म्हणता? वा वा! हे चित्र कुठे मिळालं? जरा जवळून काढलेले आहे का हो? आपला यष्टीष्टँडवाला गुंडोपंत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
च
चित्तरंजन भट Fri, 09/21/2007 - 11:49 नवीन

विचारायचे होते

स्वातीताई, छोटेखानी लेख उत्तम झाला आहे. मला एक विचारायचे होते. पुण्यातल्या बादशाही बोर्डिंगची टोक्योत शाखा आहे, असे खात्रीलायक सूत्रांकडून कळते. खरे का? दुसरे, जपानमध्ये 'मी तुला पार्टी देतो' असे कुणी म्हटले म्हणजे 'तू तुझे पैसे भर, मी माझे भरीन' असे त्याला म्हणायचे असते म्हणे. त्यामुळे जपानमध्ये कुणी पार्टी देतो म्हटले की कुणी खुश होऊ नये. पैसे काढण्याची तयारी ठेवावी. खरे का?
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 09/21/2007 - 11:43 नवीन

छान,

खिडकीतून बाहेर डोकावले. एकीकडे प्रशांत निळासागर आणि डोंगरातून विमान खाली झेपावत होते,सागराच्या लाटा खुणावत होत्या.समुद्राला लगटूनच हा विमानतळ आहे.परीने ढगांतून अलगद खाली यावं ना,तसं आमचं विमान हाँगकाँगला उतरलं वा स्वाती, छान लिहिलं आहेस.. औरभी लिख्खो! तात्या.
  • Log in or register to post comments
ब
बाबुराव Fri, 09/21/2007 - 13:52 नवीन

हेच

आजून लिव्हा ,बाबूरावला आवड्ला जपानाचं वर्णन. जापानमधी जेवा खावाचं बरं हाये नव्हं. म्हंजी भाकर बाजरीची,ज्येवारीची,चपाती तेच्याबद्दल बी लिव्हा भायेर लयी हाल होते म्हणते नीट जेवाला नसलं म्हंजी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
प
प्रमोद देव Fri, 09/21/2007 - 14:00 नवीन

मस्त!

जर्मनी काय! जपान काय! मजा आहे बुवा तुमची. पण एक गोष्ट आवडली तुमची की निदान तुम्ही आम्हाला तुमच्या अनुभवात तरी सामावून घेताय! नाहीतर आम्ही हे सगळे नकाशावरच बघणार! लेख आवडला.पुढचा लेख लवकर टाका.
  • Log in or register to post comments
ट
टीकाकार-१ Fri, 09/21/2007 - 17:15 नवीन

स्वाती ताई

स्वाती ताई तुम्ही भारतातील किती प्रेक्षणीय स्थळे बघीतलीत? त्यावर पण एक लेख लिहा.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Fri, 09/21/2007 - 17:22 नवीन

एक लेख

भारतात पाहिलेल्या प्रेक्षणीय स्थळांवर 'एक लेख'?एकच लेख कसा हो पुरेल? टीकाकार, टीकाही करा पण जरा जपून.. स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टीकाकार-१
ट
टीकाकार-१ Fri, 09/21/2007 - 17:32 नवीन

माफ करा हं

माफ करा हं ... 'किमानं एक' लिहा असं मला म्हणायच होतं. बरं... मी केलेली सुचना तुम्हाला टीका का बरे वाटली ते सन्गालं का जरा.. वा..वा... सुंदर.. वगैरे शब्द नव्हते म्हणुन?..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश
आ
आजानुकर्ण Fri, 09/21/2007 - 17:36 नवीन

तुमचे नाव टीकाकार असल्याने

तुमचा प्रत्येक प्रतिसाद ही टीकाच असते असे वाटत असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टीकाकार-१
ज
जुना अभिजित Fri, 09/21/2007 - 17:41 नवीन

जय हो

टीकाकारांच्या प्रतिभेला आमचा सलाम. अगदी शक्य नाही अशा ठिकाणीसुद्धा पिंक टाकतात. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
ट
टीकाकार-१ Fri, 09/21/2007 - 17:48 नवीन

"मिसळीवरची

"मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित " ही ओळ वाचुन तुम्ही बालवाडीत आहात असे वटते. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जुना अभिजित
ग
गुंडोपंत Sat, 09/22/2007 - 04:57 नवीन

आम्ही

अहो अभिजितच काय, आम्ही सगळेच बालवाडीत आहोत! तुम्ही मोठे झालात की तुम्हालापण येता येईल हं आमच्या वर्गात! आपला गुंडोपंत बालवाडी मिसळपाव बुद्रुक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टीकाकार-१
ट
टीकाकार-१ Fri, 09/21/2007 - 17:41 नवीन

अच्छा...अच्

अच्छा...अच्छा... नावावरून निष्कर्ष काढ्णारे महाभाग आहेत तर इथे.. तुम्हीपण सावध रहा..आजानुकर्ण साहेब..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
स
स्वाती दिनेश Fri, 09/21/2007 - 17:35 नवीन

कारण

कारण 'या' लेखाविषयी बरी वाईट कोणतीच प्रतिक्रिया न देता,तुम्ही मला मी भारतातली कोणती प्रेक्षणीय स्थळे पाहिली ? हे विचारलेत म्हणून मला तसे वाटले.तसे नसेल तर उत्तमच आहे. स्वाती
  • Log in or register to post comments
ज
जुना अभिजित Fri, 09/21/2007 - 17:44 नवीन

जपान

जपानला कोबे शहरात(?) नेताजींच्या रक्षा ठेवल्या आहेत.. त्यांच दर्शन घ्यायची मनापासून इच्छा आहे. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
  • Log in or register to post comments
र
राज जैन (verified= न पडताळणी केलेला) Fri, 09/21/2007 - 17:53 नवीन

जपानला

जपानला कोबे शहरात(?) नेताजींच्या रक्षा ठेवल्या आहेत.. त्यांच दर्शन घ्यायची मनापासून इच्छा आहे.. जाणे शक्य नाही आहे मला तरी पण एक ईच्छा आहे जर साध्या झालेच तर एक छायाचित्र जरुर येथे चिटकवावे ! ही मनपुर्वक विनंती. राज जैन (ज्या महामानवा विषयी वाचले आहे त्याला पाहण्याची जबरदस्त ईच्छा मनात आहे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जुना अभिजित
व
विकास Fri, 09/21/2007 - 18:34 नवीन

छान सुरवात

स्वाती, जपानवर्णनाची सुरवात आवाडलीे. पण अजून पुढे ऐकायची उत्सुकता आहे. मुख्य म्हणजे खाण्याच्या बाबतीत! असे ऐकून आहे की भारतीयांचे बर्‍यापैकी हाल होऊ शकतात... सुशी खाल्ल्यावर कसे वाटले? अजून पण काही प्रश्न विचारीन, विशेष करून तिथल्या माणसांचे अनुभव वगैरे... पण दुसरा लेख येऊदेत!
  • Log in or register to post comments
ग
गुंडोपंत Sat, 09/22/2007 - 04:59 नवीन

काय

"सुशी खाल्ल्यावर कसे वाटले?" म्हण्जे ???? सु आणी शी ? असाच शब्द आहे? बापरे! आपला गुंडोपंत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Fri, 09/21/2007 - 23:50 नवीन

छान !

पुढच्या भागांची उत्सुकता आहे. - सर्किट
  • Log in or register to post comments
च
चित्रा Sat, 09/22/2007 - 00:59 नवीन

स्वाती,

जपानमधल्या जुन्या डायर्‍या बाहेर काढलेल्या दिसतायत! प्रवासाचे वर्णन आवडले. अजून लिही. चित्रा अवांतर - मगाशी वर कुठेतरी "चित्तर" लिहीलेले पाहिले - चुकून चित्रा वाचले :-)
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Sat, 09/22/2007 - 19:56 नवीन

वा वा

स्वातीताई, छोटेखानी लेख मस्त आहे. पुढचे भाग वाचायची उत्सूकता आहे. -- लिखाळ. तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)
  • Log in or register to post comments
व
वर्षा Sun, 09/23/2007 - 05:10 नवीन

उत्सुक

मस्तं लिहिलंय. जपानविषयी वाचायला खूप आवडतं. ( मी तिथे काही काळ घालवल्याने जास्तच जिव्हाळ्याचा विषय आहे!!) पुढील भाग लवकर येऊ दे. -वर्षा
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 09/24/2007 - 12:09 नवीन

धन्यवाद

मंडळी, सर्वांच्या प्रतिसादांबद्द्ल मनापासून धन्यवाद. सहज, कानसाईचे चित्र इथे दिल्याबद्दल धन्यवाद्,त्यामुळे पंतच नव्हे तर सर्वांनाच त्याचा आनंद घेता आला. प्रमोदकाका, अहो,आमची काय गाड्यांबरोबर नळ्यांची यात्रा,त्या यात्रेत तुम्हा सर्वांना सामील करुन घेता येत आहे,त्याचा मलाही आनंदच आहे. चित्रा, हो ग्,जपानच्या डायर्‍या आवराआवरीत सापडल्या,म्हटलं,चला आता इथे त्यातले वर्णन लिहू या. विकास, सुशी आणि इतरही कितीतरी अनुभव आहेत्,लिहिणार आहे या मालिकेत. बाबूराव, जपानची भाकर लई वेगळी आस्ते हो,लिवते हाये त्याबद्दल फुडे.. अभिजित,राज कोबे मध्ये सुभाष बाबूंचे खूप मोठे असे स्मारक काही मला आढळले नाही.त्यामुळे थोडी निराशाच झाली.सुभाषबाबूंच्या अस्थी रेंकोजी टेंपल्-टोकियो येथे आहेत. पुढचा भाग लवकरच टाकते, तात्या,लिखाळ,गुंडोपंत,सर्किट,चित्तर,कर्ण,वर्षा ,टीकाकार सर्वांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद.
  • Log in or register to post comments
अ
अम्रुताविश्वेश Fri, 03/26/2010 - 00:37 नवीन

मस्त

मी जपान ला जाऊन जवळ जवळ १२ वर्ष झाली. पुन्हा एकदा जाऊन आल्यासारख वाटल. खूपच छान केल आहे वर्णन. मी जपान च्या नरीटा विमानतळावर उतरले होते. टोक्यो आणि योकोहामा फिरले. पण ओसाका ला जाण्याची सन्धी मिलाली नाही. :)
  • Log in or register to post comments
श
शुचि Wed, 03/31/2010 - 20:55 नवीन

>>समुद्राला

>>समुद्राला लगटूनच हा विमानतळ आहे>> मस्तच!!! मजाच मग तर. लेख आवडला. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ हम नहीं वह जो करें ख़ून का दावा तुझपर बल्कि पूछेगा ख़ुदा भी तो मुकर जायेंगे
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा