✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

दिवाळी आणि दिवाळी अंक २०१८

य
यशोधरा यांनी
Sat, 11/03/2018 - 13:35  ·  लेख
लेख
मराठी घरांमधून फटाके, फराळ, रांगोळ्या, देवता पूजन, आका़शकंदील, गोडधोड ह्यांसोबत दिवाळी अंक घरात आल्याखेरीज दिवाळी सुफळ संपूर्ण साजरी झाल्यासारखी वाटत नाही. आजच्या जमान्यात नेहमीच्या पारंपारिक अंकसोबत ऑनलाईन दिवाळी अंकही उपलब्ध असतील. ह्या वर्षी मात्र मला अजून एकही दिवाळी अंक घेता वा बघता आलेला नाही - अगदी ऑनलाईन अंकही. फारच वाईट! तरी अंकांविषयी उत्सुकता आहेच. जास्तीत जास्त दिवाळी अंक वाचायला मिळावेत म्हणून ग्रंथालयाचे सदस्यत्व घ्यायचाही विचार आहे, म्हणजे घेईनच. जसजसे वाचेन, तसे इथे लिहीन. तुम्ही कोणी पारंपारिक अंक विकत घेतलेत का? किंवा ऑनलाईन अंक पाहिलेत, वाचलेत का? तर इथे त्या अंकांविषयी लिहा, ही विनंती. मिपाचा दिवाळी अंकही लवकरच प्रकाशित होईल, तोही वाचायचा आहेच. अंकांच्या किंमतीही भरमसाट वाढल्या आहेत म्हणा. तरीही एका तरी अंक दिवाळीच्या निमित्ताने घरी आणावासा वाटतो. एकच दिवाळी अंक घरी आणायचा, असं ठरलं तर तुम्ही कोणता अंक आणाल?
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
माध्यमवेध
मत

प्रतिक्रिया द्या
31756 वाचन

💬 प्रतिसाद (64)

प्रतिक्रिया

तसे उत्तर

हेमंतकुमार
Sat, 11/03/2018 - 14:05 नवीन
अवघड आहे पण गतवर्षी चा लोकमत चा अंक आवडला होता. एका विशिष्ट कल्पनेवरील लेख होते. त्यांच्या जाडजूड अंकात जाहिरातींच्या पानांचा मात्र भडक भडिमार असतो !
  • Log in or register to post comments

हो, गेल्या वर्षीचा लोकमत

यशोधरा
Sat, 11/03/2018 - 14:18 नवीन
हो, गेल्या वर्षीचा लोकमत सुरेख होता. आत्ताच लोकमत अंकाच्या ऑनलाईन आवृत्तीची जाहिरात पाहिली. दोनशे रुपये किंमत आहे. काही लेख चांगले असतील, असं वाटतं आहे जाहिरातीतील टीझर्स पाहून. अजून एक दोन ऑनलाईन दिवाळी अंक पाहिले, पण ह्या वर्षी ऑनलाईन अंकही विकत मिळत आहेत. मला वाटते ऑनलाईन अंकाच्या संकल्पनेने जशी पकड घेतली, तशी ही विक्रीची कल्पना निघालेली दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

मी दर वर्षी खालील दिवाळी अंक विकत घेतो...

मुक्त विहारि
Sat, 11/03/2018 - 15:42 नवीन
१९९२ पासूनचे अंक घेत आहे. लिस्ट खाली देत आहे. १. आवाज (मधूकर पाटकर ह्यांचा) २. शतायुषी ३. किस्त्रीम ४. जत्रा (रविवारची) ५. अक्षर ६. माहेर ७. कथाश्री ८. मेनका ९. श्री व सौ १०. अमृत (सध्या बंद झालेले आहे.) ११. धनंजय १२. सकाळ १३. महाराष्ट्र टाइम्स १४. लोकसत्ता १५. आवाज (दुसरा) १६. जत्रा (दुसरा) पुर्वी ताजे दिवाळी अंक विकत घेत असे.(त्यावेळी वलसाड आणि चिपळूणला रहात असल्याने, शिळ्या अंकांचा पर्याय उपलब्ध न्हवता.त्यामुळे अंक विकत घेणे भाग होते.शिवाय एजंट ओळखीचा असल्याने, आगावू नोंदणी केली आणि अ‍ॅडव्हान्स पैसे दिले की, १०% कन्सेशन पण मिळायचे.) पण सध्या दिवाळी अंक, सार्वजनिक दिवाळी अंक, मार्च-एप्रिल मध्ये स्वस्तात विकायला काढतात.२५०० ते ३०००चे दिवाळी अंक २००-३०० रुपयात मिळतात.
  • Log in or register to post comments

इतके स्वस्त कुठे मिळतात?

यशोधरा
Sat, 11/03/2018 - 15:59 नवीन
इतके स्वस्त कुठे मिळतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

तुम्हाला कुठले अंक हवे आहेत?

मुक्त विहारि
Sat, 11/03/2018 - 20:59 नवीन
ते सांगा.फक्त मार्च-एप्रिल पर्यंत वाट बघायला लागेल. स्वगत : आम्ही उगाच नाही म्हणत की, डोंबोली हे जगाचे मध्यवर्ती ठिकाण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

डोंबोली हे जगाचे मध्यवर्ती

यशोधरा
Sat, 11/03/2018 - 21:47 नवीन
डोंबोली हे जगाचे मध्यवर्ती ठिकाण >> ते ठरवू हो नंतर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

दिवाळी अंक वाचायला मजा येते .

वरुण मोहिते
Sat, 11/03/2018 - 17:40 नवीन
अनेक विषय त्यात हाताळले जातात. आता माझ्याकडे धनंजय, अक्षरधारा, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स ,उत्तम अनुवाद,लोकप्रभा, माहेर, सामना, झी मराठी , लोकमत इत्यादी अंक आहेत . अजून घेईन मग उद्या परवा.
  • Log in or register to post comments

ह्यातले कोणते वाचायला सुरुवात

यशोधरा
Sun, 11/04/2018 - 09:13 नवीन
ह्यातले कोणते वाचायला सुरुवात केलीत? काय काय वाचलेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते

अजून तरी फक्त

वरुण मोहिते
Sun, 11/04/2018 - 16:02 नवीन
धनंजय वाचत आहे. लोकसत्ता वरवर वाचला अंक चांगला आहे. डिजिटल संस्कृती मधील स्थित्यंतरे वर चांगले लेख आहेत. मटा जास्त करून व्यक्ती चित्रांवर लेख आहेत. पुलं, नौशाद, गदिमा , अमृता प्रीतम . इत्यादी. बाकी मार्क्स आजही हा लेख बरा आहे. झी मराठी मध्ये श्री राज ठाकरे ह्यांना भेटायला गेलो होतो (टीम ग्रंथाली तर्फे)अतिशय वेगळ्या अंगाने त्यांनी मुलाखत दिली( माणूस हुशार आहे हे माझे वैयक्तिक मत) अनिल अवचट ह्यांचाही लेख उत्तम आहे. बाकी अजून वाचायचे आहेत . अपडेट करतो मग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

मला ‘कथाश्री’ आवडतो. एक कथा व

वन
Sat, 11/03/2018 - 18:14 नवीन
मला ‘कथाश्री’ आवडतो. एक कथा व एक लेख असे एक आड एक छापलेले असतात. त्यामुळे मजा येते.
  • Log in or register to post comments

ह्या वर्षी बघेन कथाश्री. कधी

यशोधरा
Sun, 11/04/2018 - 09:14 नवीन
ह्या वर्षी बघेन कथाश्री. कधी वाचल्याचे आठवत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वन

झीचा अंक मागच्या वर्षी पाहिला

कंजूस
Sun, 11/04/2018 - 06:55 नवीन
झीचा अंक मागच्या वर्षी पाहिला. चानेलवरच्याच मुलाखती,गोष्टी पुन्हा असतात कलाकारांच्या. पण पण पण कलाकार म्हणजे सर्व मराठी मनोरंजनाचे नाहीत, फक्त झीचे. काही कामाचे नाही. कालनिर्णय अंक जुनासुद्धा वाचला तरी चालतो. बाकी दिवाळी अंकांत नेहमीचे यशस्वी लेखक बटाटेवडे शिळे गरम डब्बलफ्राइ करतात. नवीन लेखकांचे साहित्य वाचावे.
  • Log in or register to post comments

बापरे! इतका राग कशाला म्हणे

यशोधरा
Sun, 11/04/2018 - 09:13 नवीन
बापरे! इतका राग कशाला म्हणे तो दिवाळी अंकांवर! ऑलमोस्ट अंकांना तुच्छ लेखल्यासारखे वाटतेय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

नाही तुच्छ लेखत. पण झालय काय

कंजूस
Sun, 11/04/2018 - 12:06 नवीन
नाही तुच्छ लेखत. पण झालय काय टिव्हि चानेलसवर अगोदर मनोरंजन झालेले असते. कथा कादंबऱ्यांतल्या सर्व घटनांचे संभाव्य पर्याय रोजच्या चाळीसेक मालिकांतून मांडले जात असतात. राजकीय चर्चा साडेनवाला तीन दाढीवाले आणि दोन बिन दाढीवाले रोजच्या रोज घडवतात. पाककृती (गूळ सोडून) सर्व जिन्नस घालून केलेल्या दाखवल्या जात असतात. कलाकार आतला आवाज थांब म्हणेपर्यंत ऐकवत असतात. आरोग्याचे सल्ले सतत फोनइनमधून सुरूच असतात. दिवाळी अंकांसाठी वेगळे काही उरतच नाही. लेखकांना एक चेक येतो मानधनाचा.
  • Log in or register to post comments

हो, काही अंशी तुम्ही म्हणता

यशोधरा
Sun, 11/04/2018 - 13:00 नवीन
हो, काही अंशी तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, तरीही काही अंक चांगलं साहित्यही देतात. आता मंगळवारी ग्रंथालयात जाऊन अंक आणणार, मग सांगते कोणत्या अंकात काय आवडलं ते. तुम्ही आणले का अंक? असल्यास कोणते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

नकारात्मक प्रतिसाद उगाचच

कंजूस
Sun, 11/04/2018 - 12:10 नवीन
नकारात्मक प्रतिसाद उगाचच दिला अगोदर. -- कंदिल कसा बनवायचा लेख टाकण्याचा विचार होता पण लक्षात आलं कुणाला हाती बनवायचा उत्साह राहिला नाही. बाजारातून आवडलेला घेऊन येतात.
  • Log in or register to post comments

कंकाका,‌ मी बनवला घरीच कंदील.

यशोधरा
Sun, 11/04/2018 - 12:59 नवीन
कंकाका,‌ मी बनवला घरीच कंदील. :) आता अजून कल्पना सुचली आहेत, त्या वापरून पुढील दिवाळीत बनवेन. तुम्ही टाका धागा, आवडेल पहा, वाचायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

दिवाळी अंक

कपिलमुनी
Sun, 11/04/2018 - 13:28 नवीन
आमच्या लायब्ररीमध्ये दिवाळी अंक ची स्पेशल स्कीम असते. 4 महिने 100 ₹ फी मध्ये 2 महिने अंक वाचायला मिळतात. त्यानंतर मार्च नंतर ते सर्वांसाठी उपलब्ध होतात. या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळतो. ( पाकृ ची पाने फाडून ठेवणाऱ्या काकू सोडल्या तर बाकी अंक व्यवस्थित असतो )
  • Log in or register to post comments

मीही मराठी ग्रंथ वाचनालयाच्या

यशोधरा
Sun, 11/04/2018 - 16:27 नवीन
मीही मराठी ग्रंथ वाचनालयाच्या स्कीममध्ये नाव नोंदवले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

धनंजयचा दिवाळी अंक एकदोनदा

प्रचेतस
Sun, 11/04/2018 - 15:29 नवीन
धनंजयचा दिवाळी अंक एकदोनदा विकत घेऊन वाचला होता तेव्हढेच. बाकी दिवाळी अंक वाचायला फारसे आवडत नाहीत त्यामुळे कधी वाचले जात नाहीत.
  • Log in or register to post comments

तुमच्यासाठी गड, किल्ले, लेणी,

यशोधरा
Sun, 11/04/2018 - 16:26 नवीन
तुमच्यासाठी गड, किल्ले, लेणी, इत्यादि विषयांना वाहिलेला दिवाळी अंक हवा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

तसेही अंक आहेत पण खास वाटत

प्रचेतस
Sun, 11/04/2018 - 17:26 नवीन
तसेही अंक आहेत पण खास वाटत नाहीत इतके.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

अर्र!!

यशोधरा
Sun, 11/04/2018 - 17:30 नवीन
अर्र!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

भटकंती अंक पुर्वी चांगला होता

कंजूस
Sun, 11/04/2018 - 16:55 नवीन
भटकंती अंक पुर्वी चांगला होता. आता ते मासिकसुद्धा बहुतेक बंद झाले॥ पर्यटनाविषयी लेख चांगले असायचे. परंतू आता पर्यटन हे आयोजकांतर्फे ,टुअरमधून करण्याचे प्रमाण फार वाढले आहे. माहिती मिळूनही त्याचा उपयोग करणारे कमीच. स्वत: जाणारेही ट्रिपअडवाइजर, इबिबो इत्यादिंवर विसंबून तेचतेच पाहतात ,ठराविक हॅाटेलांत राहतात. साहस,हुरहुर संपली आहे. मग काही वेगळे लेख आले तर बरे.
  • Log in or register to post comments

भटकंती कधीच बंद झाले!

यशोधरा
Sun, 11/04/2018 - 17:31 नवीन
भटकंती कधीच बंद झाले!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

गड, किल्ले, लेणी,इत्यादि तीच

कंजूस
Sun, 11/04/2018 - 17:02 नवीन
गड, किल्ले, लेणी,इत्यादि तीच असतात आणि आमच्या वर्णनांतला गमतीदारपणा जाऊन भारंभार ऐतिहासिक टिपणं देऊन वाचकांस बेजार करण्याची कठीण शैली शिरू लागली आहे. पंधरावीस वयोगटातली मुलं जाऊन फार गंमतीदार लिहितात, फोटो टाकतात ते वाचायला सर्वांनाच आवडते.
  • Log in or register to post comments

दिवाळी अंक

तुषार काळभोर
Sun, 11/04/2018 - 20:21 नवीन
अक्षरनामाचा ऑनलाईन आहे. त्यांच्या प्रवृत्तीप्रमाणे थोडा डावीकडे झुकलेला आहे पण काही लेख वाचनीय आहेत. कालनिर्णय १४० रुपये अनुक्रमणिका अक्षरधाराची यादी
  • Log in or register to post comments

अ धा च्या यादीत बरेच अंक

यशोधरा
Mon, 11/05/2018 - 10:37 नवीन
अ धा च्या यादीत बरेच अंक दिसतात. त्यांना इतके डिस्काउंट द्यायला कसे परवडते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

प्रत्यक्षात

तुषार काळभोर
Mon, 11/05/2018 - 14:35 नवीन
तिथे गेल्यावर पण इतकाच डिस्काउंट मिळण्याची शक्यता आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

उलट कमी वाटतोय

भीडस्त
गुरुवार, 11/15/2018 - 23:17 नवीन
बव्हंशी अंकांना दहा टक्के दिसतोय. पंचवीस टक्के तर एखाद-दुसऱ्या अंकालाच दिसतोय.. दिवाळी अंक घ्यावेसे वाटले की सरळ पुणे गाठतो. अप्पा बळवंत चौकात पूनम एजन्सीत जातो. याही वर्षी गेलो होतो, पार दिवाळी संपल्यावर.काही मिळणार नाही असं वाटलं होतं. त्यांनी दिलेल्या यादीवर खुणा करून दिल्या.. एकवीस अंक झाले. सगळे उपलब्ध होते डिस्काउंट/सूट वगैरे मागायची नाही.बिल आलं. ४१२० फेस व्हॅल्यू होती ३०९० देय रक्कम होती. सरळ पंचवीस टक्के कमिशन आहे फक्त काही अंकांचे परत दहा रुपये प्रत्येकी वाढवले. ते अंक म टा, लोकप्रभा,अक्षर दिसताहेत... पुण्यात दिवाळी अंकांची सगळयात जास्त उलाढाल करणारा दुकानदार मारवाडी/गुजराती असावा हा काव्यगत न्याय आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

हैला, हे माहीत नव्हते!

यशोधरा
गुरुवार, 11/15/2018 - 23:27 नवीन
हैला, हे माहीत नव्हते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भीडस्त

मी नवीन दिवाळी अंक वाचत नाही

अविनाशकुलकर्णी
Mon, 11/05/2018 - 08:16 नवीन
मी नवीन दिवाळी अंक वाचत नाही आमच्या रद्दी च्या दुकानात जुने दिवाळी अंक मिळतात किंमत १० रु यास एक काल १० अंकविकत आणले आता चकली चिवड्या सोबाबत जुन्या अंकाचे वाचन २०० रु एक नवा अंक परवडत नाही आणि खार म्हणजे वर्थ पण नसतो साहित्यिक दृष्टीने जुने अंक वाचून झाले की त्याला परत देतो तो एका अंकास एक रुपया दराने परतावा देतो
  • Log in or register to post comments

खुद्द अकुकाका ह्या धाग्यावर!

यशोधरा
Mon, 11/05/2018 - 10:35 नवीन
खुद्द अकुकाका ह्या धाग्यावर! धागा धन्य झाला की! :) कोणते जुने अंक वाचलेत मग अकुकाका? कोणते लेख आवडले, जरा बैजवार लिहा की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

रद्दीवाल्याशी

नाखु
Sat, 11/10/2018 - 22:41 नवीन
संपर्क करुन देणे काही अंक प्रकाशित होतानाच रद्दड असतात त्यामुळे रद्दी भावाने खरेदी केली तर कुठलेही पातक लागणार नाही. काही निवडक (अर्थात मागील अंक) संग्रही असलेला जुनाट नाखु वाचकांची पत्रेवाला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

मी दरवर्षी दोन दिवाळी अंक

समीरसूर
Mon, 11/05/2018 - 15:09 नवीन
मी दरवर्षी दोन दिवाळी अंक विकत घेतो. त्यापैकी एक 'धनंजय' असतोच. यावर्षीदेखील घेतला. मजा येते वाचायला. यावर्षी झी मराठीचा 'उत्सव नात्यांचा' घेतला आहे. भेट म्हणून द्यायला देखील हा अंक (अजून दोन प्रती) घेतला आहे. चांगला आहे असे वाटते. मागच्या वर्षी मी 'धनंजय' आणि 'मेनका' घेतले होते. त्या आधी 'धनंजय' आणि 'लोकमत' घेतले होते. 'प्रपंच'देखील घेतला आहे २-३ वेळा. पुण्यात आयडियल कॉलनीमध्ये 'पुस्तक पेठ' नावाचे प्रशस्त दुकान आहे. सगळे दिवाळी अंक तिथे उपलब्ध आहेत. बहुतेक सगळे सवलतीत उपलब्ध आहेत. आणि हिंदी, मराठी, इंग्रजी पुस्तकांची अक्षरशः रेलचेल आहे तिथे. मजा आ जाता हैं. एक-दोन तास कसे निघून जातात कळत नाहीत.
  • Log in or register to post comments

माहेर मधला....

मुक्त विहारि
Tue, 11/06/2018 - 16:36 नवीन
माहेर मधला, गोपाळ जोशी, ह्यांच्यावरचा लेख मस्त आहे. लेखिकेचे नांव विसरलो.
  • Log in or register to post comments

आज लोकमत हातात आलाय.

यशोधरा
Tue, 11/06/2018 - 16:43 नवीन
आज लोकमत हातात आलाय. प्रथमदर्शनी भरगच्च अंक वाटतोय. राहुल गांधी ह्यांचा एक लेख आहे, तो जरा मिठाच्या चिमटी सकट वाचावा म्हणते. पहिलाच लेख रागाचा म्हणून जरा ऑं असं झालंय खरं. आता बाकी लेख बघते.
  • Log in or register to post comments

लोकमतमध्ये

समीरसूर
Tue, 11/06/2018 - 16:46 नवीन
लोकमतमध्ये जाहिराती खूप असतात. बरीचशी पाने जाहिरातीतच जातात. पण कागदाचा दर्जा मस्त असतो. मागे कुठल्यातरी वर्षी शाहरुख खान, विद्या बालन वगैरे अभिनेत्यांचे लेख छान होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

स्थानिक मराठी मंडळाचा दिवाळी विशेषांक

जुइ
Sat, 11/10/2018 - 21:54 नवीन
उत्तम धागा अन प्रतिसाद. तीन तारखेला आमच्या स्थानिक मराठी मंडळाचा दिवाळीनिमित्तचा सोहळा पार पडला. त्यावेळी मंडळाच्या दिवाळी विशेषांकाची छापील आवृत्ती मिळाली. अंक वैविध्यपूर्ण अन वाचनीय आहे. ऑनलाईन आवृत्तीचा दुवा - हितगुज.
  • Log in or register to post comments

डालो होत नाहीये जुइ हा अंक :(

यशोधरा
Sun, 11/11/2018 - 18:20 नवीन
डालो होत नाहीये जुइ हा अंक :( मला ई कॉपी पाठवतेस का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जुइ

ई कॉपी

जुइ
Mon, 11/12/2018 - 05:26 नवीन
दुवा देते आहे हितगुज
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

धन्यवाद....

मुक्त विहारि
Mon, 11/12/2018 - 09:52 नवीन
धन्यवाद..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जुइ

ग्रंथालयातून लोकमत आणला होता.

यशोधरा
Sat, 11/10/2018 - 22:15 नवीन
ग्रंथालयातून लोकमत आणला होता. अंक एकुणात बरा वाटला.मला सगळेच लेख आवडले. त्यातल्या त्यात डावे वाटलेले म्हणजे - भैय्या, क्यू सुने? - राहुल गांधी ह्यांचं नाव लेखक म्हणून आहे पण त्यांनी लिहिलेलं नसावं. लेखाची सुरुवात वाचतानाच, खरंच असा ( आणि इतका) विचार करत असतील का, असं वाटलं. करत असतील तर, त्याचा काही प्रत्यय घडणाऱ्या राजकारणात का दिसत नाही, असं वाटलं. तेव्हा हा लेख बाद. दुबारा पूछो आणि परतीची सुंदर वा ट - दिपीकाच डिप्रेशन आणि मन्सूर अलीच फार्म हाऊस, हे अनुक्रमे विषय. ह्या दोघांचं कौतुक आहेच पण ह्यांच्यापेक्षा कठीण परिस्थितीमध्ये कित्येक जण असतात, झगडतात आणि यशस्वी होतात, काही जण वाईट हरतात. त्यांच्या विषयी का नाही लिहित? हे म्हणजे गुळगुळीत दू:खांना अजून गोंजारल्यासारख वाटतं, म्हणून इतके नाही आवडले. ठीक आहेत.
  • Log in or register to post comments

धनंजय वाचतेय. अंक छान आहे.

विनिता००२
Mon, 11/12/2018 - 10:05 नवीन
धनंजय वाचतेय. अंक छान आहे. क्रांती अग्रणी पर्वमधे लघुकथा आहेत. अंक चांगला आहे :)
  • Log in or register to post comments

दिवाळी अंक आणि बूकगंगा

रंगासेठ
Mon, 11/12/2018 - 14:23 नवीन
मी बूकगंगा वर पाहिले, धनंजय्/कथाश्री/मौज असे दिवाळी अंक सध्या उपलब्ध नाहीत. अन्य कुठली वेबसाइट आहे का जिथून अंक मागवता येतील?
  • Log in or register to post comments

धनंजयचा त्यांच्याकडून मागवता

विनिता००२
Sat, 11/17/2018 - 16:47 नवीन
धनंजयचा त्यांच्याकडून मागवता येईल. राजेंद्र प्रकाशनला फोन करावा. नंबर हवा असल्यास देईन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रंगासेठ

इथेच टाका नंबर.

यशोधरा
Sat, 11/17/2018 - 18:13 नवीन
इथेच टाका नंबर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनिता००२

उत्सव नात्यांचा - एकदम मस्त!

समीरसूर
Mon, 11/12/2018 - 17:12 नवीन
सगळ्यात जास्त खपतोय आजकाल हा अंक. मी २ दिवसात संपूर्ण वाचला. छान आहे. धनंजय - सुरुवात केलीये. हा माझा नेहमीचा आवडता अंक. अ‍ॅमेझॉनवर अंक मिळतात बहुतेक.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

रंगासेठ
Mon, 11/12/2018 - 18:22 नवीन
अ‍ॅमेझॉन वर पाहतो. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

बुकगंगा, अक्षरधारा ह्यांच्या

यशोधरा
Mon, 11/12/2018 - 18:33 नवीन
बुकगंगा, अक्षरधारा ह्यांच्या पोर्टल्स वर देखील मिळतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रंगासेठ
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा