मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शांतरस

इनो संपल्या नन्तर .....

विजुभाऊ ·

प्रकाश१११ 25/02/2011 - 12:14
विजू भाऊ - बहर माझा लिहिता लिहिता केंव्हाच सुकोनी गेला फ़ुका कौतुक होत होते...तेही आता अंतरले उरल्या कथा ;जेवण यादी .प्रतिसाद नाही मिपावरती विखार माझा फ़ुसका ठरला...अन विचार वैभव हरले मस्तच लिहिलेत. सुंदर.आवडेछे ..!!

टारझन 25/02/2011 - 12:25
जगदंब जगदंब .. सॉरी .. राव दंब राव दंब :) काही फॅक्ट्स : इनो हा इण्स्टंट अ‍ॅसिड ण्युट्रिलायझर आहे , त्यामुळे इणो घेतल्यावर तत्काळ बरे वाटत असले तरी पुन्हा अ‍ॅसिडिटी बाऊन्स बॅक होते आणि तिची तिव्रता अधिक असते. - टिनो मोरिया

हे काय नशीबी आले...हे भाग्य हे असले कसले बघ निघुन गेले सारे साथी...माझे मनोगतही फ़सले मी डोळे उघडुन बघतो..तेंव्हा माझे मला कळते घ्यायला घास मोठा गेलो ...तेंव्हा दंताडच हरवुनी बसले बहर माझा लिहिता लिहिता केंव्हाच सुकोनी गेला फ़ुका कौतुक होत होते...तेही आता अंतरले उरल्या कथा ;जेवण यादी .प्रतिसाद नाही मिपावरती विखार माझा फ़ुसका ठरला...अन विचार वैभव हरले आता शिव्या उरल्या ओठी...... पोटी परी जळजळणे ईनो घेउन.जिवंत रहाणे हेच नशिबी केवळ उरले उपक्रम एकटाच राबवीत बसलो ऐसा मीच मला म्हणूवूनी थोर..

कान्हा

कोमल ·

गणेशा 23/02/2011 - 20:24
कविता खुपच छान आहे .. २ दा वाचुन ही अजुन वाचाविशी वाटते आहे.. असेच लिहित रहा.. वाचत आहे .. अवांतर : सावला हा हिंदी शब्द आहे बहुतेक, सावळा हा मराठी.. म्हनुन सावला शब्द सावळा म्हनुनच वाचला .. छान वआटला. चु.भु.दे.घे.

श्रावणाच गाण तुझ्या ओठी सुरु होत, ऊन पावसाशी झिम्मा, मन खेळत बसतं॥ इन्द्रधनुच्या कमानीत तुझी कमनीय काया, माझ्या मनाला मोहते,तुझी सप्तरंगी छाया॥ ओठी बासरी तुझ्या, तिचे वेडे खुले सुर, चिंब पावसात भिजे, मन बनून मयूर॥ माथ्यावरी सजे मोरपिसं, जणू पाचूचा खड़ा, आला बघा गं सयांनो, माझा कान्हा-सावला॥ त्याच्या सोनेरी देहाची, सोन्या सारखी किरणे, तशी सोनेरी शेवंती, गाते पहाटेचे गाणे॥ माझ्या सावल्या देहात, "सावल्या"चेच चैतन्य, दर्पणात पाहे मी, माझ्या सावल्या चे बिंब॥ नाही मी राधा, अन मीरा ही नाही तरी तुझीच आस कान्हा धरून मी राही... तरी तुझीच वाट कान्हा पाहत मी राही॥

सार्‍या जातींना खड्यात जावूद्या

पाषाणभेद ·

प्रकाश१११ 23/02/2011 - 14:29
पाषाण भेदा - ह्या जातींनी काय नाय केलं माणसामाणसात भांडन लावून दिलं सख्खेशेजारी वैरी होती एकमेकांचे गळे कापती अगदी मस्त. वा ..छान ..!! पु.ले.शु.

जात कसली खड्ड्यात जातिय? जात आधारित जनगणना थांबवु शकता का? बुद्ध समाज हि जनगणनेत..धर्म बुद्ध ..जात महार असा लावु लागला आहे... बाकि कविता तुमच्या छान असतात.. पण हि जरा समता समाजवादी पठडीतली आहे.

सार्‍या जातींना खड्यात जावूद्या आपल्या देशाची प्रगती होवूद्या ||धृ|| नका कुणी हो जातपात मानू नव्या कल्पना अंमलात आणू जुने विचार मसणात जावूद्या आपल्या देशाची प्रगती होवूद्या ||१|| ह्या जातींनी काय नाय केलं माणसामाणसात भांडन लावून दिलं सख्खेशेजारी वैरी होती एकमेकांचे गळे कापती मी उच्च तू निच ते म्हणती असलं वाईट वागणं तुम्ही थांबवा या जातींना खड्यात जावूद्या ||२|| ब्राम्हण, मराठा, शिंपी, सोनार तेली तांबोळी कुणगर, महार कोळी कोष्टी कोकणा भामटा भिल्ल रामोशी मातंग बेमटा किती जात

मैत्री...

कोमल ·
दोन मनांना सांधाणारा पूल म्हणजे मैत्री.. ग्रीश्मातालं शेवंतीच फूल म्हणजे मैत्री.. अवघड वळणावर मारलेला 'कट' म्हणजे मैत्री.. आयुष्यातली गोड्गुलाबी पहाट म्हणजे मैत्री.. तुटत्या तार्र्याकड़े मागितलेली इच्छा म्हणजे मैत्री.. रिकाम्या बेंच वर केलेली प्रतीक्षा म्हणजे मैत्री.. परिक्षेआधी मारलेली नाईट म्हणजे मैत्री.. प्रिंटआउट वरून झालेली फाईटही मैत्रीच.. गालावरचा अश्रु अन खळी सुद्धा मैत्री.. हाडाहुन राकट अन मनाहुन हळवी अशी ... ही तुझी माझी मैत्री...

किती दिवस झाले माहेराला गेले नाही

पाषाणभेद ·

प्रकाश१११ 17/02/2011 - 14:41
पाषाणभेदा -ही छानच कविता आहे तो नदीचा काठ अन आंबा मोहरलेला हाळात जनावरं येती पाणी प्यायला धुनं धुतल्यानंतर सावलीला तेथेच जाई किती दिवस झाले माहेराला गेले नाही ||१|| आवडली रे मित्रा ..!!

मंडळी, आज वेळ मिळाला म्हणून लगोलग दोन कविता डोक्याला दोन कवीता सुचवू दिल्यात. (आपल्यावर होणार्‍या अन्यायाबद्दल क्षमस्व.)
किती दिवस झाले माहेराला गेले नाही

दारासमोरचा रस्ता

अवलिया ·

टारझन 15/02/2011 - 13:23
वाह नाना .. जबरा कवीता .. आता "पांदीकडचा रस्ता " ही येऊ द्या .. बघा पायाला अजुन काही लागतं का !! आजकाल त्या चार भिंती आल्यामुळे 'तो' टच .. 'ते' फिलिंग काळाच्या पडद्या आड हरवलंय कुठेसं .

In reply to by अवलिया

टारझन 15/02/2011 - 13:33
कवितांचे विडंबन करण्या सारखा सुमार प्रांत आमचा णाही :) गणेशा किंवा प्रकाश१११ किंवा पाषाणभेद गेला बाजार ओगले काका ह्यांनी हे षिवधणुष्य उचलावं असं वाटतं !! डॉ. दिवटेंनीही 'शेतीला सोनखत' कसं द्यावं ह्यावर मार्गदर्शनपर कविता द्यावी असे जाता जाता णमुद करतो :)

मिपावरच्या सदस्यत्वावर पडलेले अनेक चट्टे काही अवांतर केल्यावर पडलेले पालथे धंदे करताना काही तर काही बळंच प्रेमीला मटेरीयलसाठी तयार केलेले. चुकार धागे मधुनच इंचा इंचाने बोर्डाला टोचत आणि चिखलफेक अंगावर उडवत लुत्फ उठवताना वेळेचे भान नसे. लाळेचे डबके झालेल्या जळजळीनी भरलेल्या खमंग धाग्यावर मारलेल्या मजा अन् हाताला लागलेला इनो किबोर्डभर पसरत असे. आता प्रतिमा परिवर्तन झाल्यावर मऊसुत धाग्यावर प्रतिसादताना उगाचच पालथे धंदे आठवतात खरडवही दिसते आणि मालकांची खरड आल्याचा भास जाता जात नाही.

In reply to by परिकथेतील राजकुमार

मृत्युन्जय 15/02/2011 - 16:10
परा धागा हॅक करायची मकीची सवय लागली तुला. अवलियासेठ आता परासाठी पण एक गजरा आणि शाल (चुकुन पैठणी लिहिणार होतो पण वेळीच लक्षात आले) तयार करा ५ व्या भागात.

पैसा 15/02/2011 - 22:34
अवलियांची कविता, आणि पराचा प्रतिसाद, दोन्ही दाद देण्यासारख्या मस्त जमल्यात!

ज्ञानेश... 16/02/2011 - 10:31
पर्‍या आणि टार्‍याचे प्रतिसाद वाचून सकाळ सार्थकी लागली. नानासाहेबांचे काव्य उत्तमच.

मैत्र 16/02/2011 - 10:41
नाना साहेब... पराने त्यावर षटकार मारला आहे पण मूळ डाव सुरू करण्याचं आघाडीच्या फलंदाजाचं श्रेय त्याला देता येत नाही... केवळ जबरा!

दारासमोरचा रस्त्यावर असलेले अनेक खड्डे काही लहानपणी गोट्या खेळतांना पडलेले क्रिकेटचे स्टंप लावतांना काही तर काही असेच काळाच्या खुणा बाळगण्यासाठी तयार झालेले. चुकार दगडं मधुनच वर येत पायाला टोचत आणि धुळमाती अंगावर उडवत खेळतांना वेळेचे भान नसे. पावसाळ्यात डबके झालेल्या रस्त्यावर थपथप भरलेल्या पाण्यात मारलेल्या उड्या अन् पायाला लागलेला चिखल घरभर पसरत असे. आता डांबरीकरण झाल्यावर मऊसुत रस्त्यावरुन चालतांना उगाचच पाय कुठेतरी ठेचकाळतो काहीतरी टोचतं आणि चिखल लागल्याचा भास जाता जात नाही.

मैत्रीचे गणित -

विदेश ·
मैत्रीमधे वजाबाकी दोषांची करावी मैत्रीमधे बेरीज ती गुणांची करावी मैत्रीत हवा गुणाकार मैत्रीत नको भागाकार मैत्रीच्या गणितांमधे शून्याला नकोच आधार ! खेळता खेळता आकड्यांनी मैत्रीचे धागे विणावे विणता विणता धाग्यांनी जाळे सुंदरसे बनवावे मैत्रीच्या जाळ्यात खूप खूप गुरफटावे मैत्रीचे नंतर गणित आयुष्यात ना सुटावे !!

मुलीची आई

शुचि ·

स्पंदना 11/02/2011 - 09:57
एक ओळ वाचली होती, माधवी देसाईंच्या मुलीच्या कवितेते. ' जन्म देण्या पेक्षा ही जास्त वेदना दायक असत मुलीच्या डोळ्यात दुसर्‍या बद्दल प्रेम पहाण' त्या नंतर भिडलेली ही दुसरी कवीता. सासुबाईंना नमस्कार सांग एका मुलीच्या आईचा!

जोशी 'ले' 11/02/2011 - 10:54
मुलीची जात नाही रहाणार घरात जाईल परक्यात, पण नांदेल सुखात ||६|| खुप भरुन आले .....बापातल्या आई ला कधि एकदा संध्याकाळी घरी जाउन लेकिला कुशित घेतोय असे झालंय

माझ्या सासूबाईंनी केलेली कविता खाली देत आहे - मुलगी जन्मली सगळे म्हणाले लक्ष्मी आली घरी खूप बरं वाटलं, कारण आईच ना मी ||१|| अंगणातल्या चिमण्या घरीदारी नाचतात तरी घरट्याकडे वळतात, सांजेच्या वेळात ||२|| झगे परकरपोलके झाले साड्याचोळ्या ल्याल्या पहातापहाता जरा मोठ्याच दिसू लागल्या ||३|| शिकल्या सवरल्या स्वावलंबी झाल्या आणि मन पोखरू लागल्या, उदासी सावल्या ||४|| आईचं काळीज धडधडू लागलं पण कर्तव्याची जाण मन खाऊ लागलं ||५|| मुलीची जात नाही रहाणार घरात जाईल परक्यात, पण नांदेल सुखात ||६|| तेव्हा वाटलं आत्या व्हावं मावशी व्हावं भावाबहीणींची व्हावं ताई,पण कठीण होणं मुलीची आई

गंध मायेचे..

मेघवेडा ·

असुर 10/02/2011 - 05:19
मेव्या!!! वेड्या, काय लिहीलं आहेस रे! मायेचा श्लेष आवडलाच एकदम!!! फार्फार सुंदर!!!! गोमयाने नटविते जमिनीस माय प्रेमभावे स्पर्श तो मांगल्यदायी भूमिलाही ओढ लावे मला सर्वाधिक आवडलेल्या ओळी! आणि तो 'गोमय' शब्द, खूप दिवसांनी वाचला! आणि गंध रिप्रेझेंट करणारा याहून छान आणि नादमय शब्द नाही आठवला मग!! आणि मायेबद्दल काय बोलू?? उगाच फार आठवणी जाग्या करु नकोस रे, जीव जायचा अशाने एक दिवस!! --असुर

प्रकाश१११ 10/02/2011 - 05:29
गाय गोठ्यातून घाली साद, सत्वर माय धावे वासरा गोंजारूनी मग कौतुकाने सोडी दावे गोमयाने नटविते जमिनीस माय प्रेमभावे स्पर्श तो मांगल्यदायी भूमिलाही ओढ लावे प्रचंड मस्त लिहिलेस मित्रा

नंदन 10/02/2011 - 15:19
सुरेख आणि चित्रदर्शी कविता. असुर्‍या म्हणतो त्याप्रमाणे गोमय, श्लेष हे सारंच आवडलं. शेवटचं कडवंही खासच. अवांतर: मदत - किंवा खरं तर सूचनाच - एक दोन शब्दांपुरतीच. बाकी सर्व श्रेय कवी मेघवेडा यांचेच :)

गणेशा 10/02/2011 - 16:56
शब्द न शब्द आवडला .. मस्त कविता विशेष करुन खालील दोन कडवी जास्त आवडली. परसदारी बांव निर्मळ, माय म्हणते माय तीतें थेंबही त्या पाझराचा तृप्त करितो लेकरांतें एक क्षणही माय नसता, पोरक्या त्या चार भिंती गंध मायेचे, घराच्या घरपणाचे बंध होती --------- अवांतर : बांव या शब्दाचा अर्थ मला माहित नाही . प्लीज सांगता का ?

रामप्रहरी माय न्हाणी चेतवी, हो धूम्रसंधी मायमायेनेच होई धूरही इतका सुगंधी! गाय गोठ्यातून घाली साद, सत्वर माय धावे वासरा गोंजारूनी मग कौतुकाने सोडी दावे गोमयाने नटविते जमिनीस माय प्रेमभावे स्पर्श तो मांगल्यदायी भूमिलाही ओढ लावे देवचाफ़ा, मोगरा, जास्वंद, प्राजक्ता; अनंता वाही सादर रोज माय, घे सुगंधा भाग्यवंता माय घाली नित्य फ़ेरे अंगणी वॄंदावनाला गंध मायेच्याच मायेचाच येतो मंजिरीला परसदारी बांव निर्मळ, माय म्हणते माय तीतें थेंबही त्या पाझराचा तृप्त करितो लेकरांतें एक क्षणही माय नसता, पोरक्या त्या चार भिंती गंध मायेचे, घराच्या घरपणाचे बंध होती बोरकरांच्या ’खूप या वाड्यास दारे’ या कवितेने

वाटंतं....

अज्ञात ·
चांदण्यारात्री गवताच्या पात्यावरच्या दवाबिंदुला फुंकर मारून त्या ओघळणार्या मोत्यांना पाहताना... वार्याच्या खोड्यांमुळे नदीच्या हलणाऱ्या चंदेरी पदराला पाहून... पहाटेच्या गार वार्यात कासेला बिलगून पच पच आवाज करून दुध पिताना वासराला पाहून... मंदिराच्या धुपाने भरलेल्या गाभार्यात घंटानादात मंद तेवणाऱ्या सामायीला पाहून... सांजवेळी वाळूत हळुवारपणे पावलांना शिवून परत मागे पळून जाणार्या अल्लड लाटांना पाहून... एखाद्या तेजोवालायाधारी तपास्वीसारखा स्वतःच्या द्वैताची आहुती देऊन अद्वैत दिनकरला सागरात विलीन होताना साक्ष देताना... वाटतं आयुष्य इथेच थांबावं...