नवापुर - (हो तेच ते बर्ड फ्लू वाले) हे महाराष्ट्र आणि गुजरात या राज्याच्या हद्दीवर वसलेले तालूक्याचे ठिकाण आहे. येथूनच राष्ट्रीय महामार्ग ६ (नागपूर- सुरत) जातो. ते नंदुरबार या आदिवासी जिल्ह्यात मोडते. स्वतंत्र महाराष्ट्र होण्यापुर्वी हे गाव गुजरात मध्ये जाणार होते. त्या वेळी तेथील लोकांनी ठराव करून हे गाव महाराष्ट्रात आणले. (गुजरात मधील सुब्बत्ता बघुन त्यांचे आत्मे आता पस्तावत असतील.) या गावात मराठी तसेच गुजराथी लोक गुण्यागोवींदाने राहतात. शहरात नगरपालिका स्वच्छ्तेची विषेश काळजी घेते असे दिसले.
हे गाव उकाई धरणाच्या पाण्याच्या फुगवट्याच्या (मराठीत आपले 'बॅक वॉटर' हो)जवळ आहे.