मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

छायाचित्रण

मृत्यु, जीवन अन निसर्ग!

Nile ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आपल्याला कळतं ते नैसर्गिक अन जे नही कळत ते अनैसर्गिक असं कीती सहजपणे आपण समजुन जातो ना? पण कधी कधी 'निसर्ग' अशा काही करामती करुन जातो की मग तो आपल्याकरता फक्त निसर्ग राहतं नाही! जन्म आणि मृत्युने मानवाच्या संशोधक वृत्तीला नेहमीच आव्हान दिलं आहे, आज क्लोनींगमुळे माणुस जन्मदात्याच्या बराच जवळ जाउन पोहोचला आहे, पण अजुन मृत्यु मात्र फारच दुर आहे. पण जन्मतः साक्षात मृत्युने दिलेल्या जीवनदानाला काय म्हणाल? हा विडीओ पहा अन तुम्हाला कळेल मला काय म्हणायचे आहे ते. :) आणि आता, मृत्युच्या अक्षरशः दाढेतुन सही सलामत परत येण्याला काय म्हणाल?

अनुवाद

लक्ष्मणसुत ·
आपण सर्वजण नेहमीच 'Photo' या इंग्रजी शब्दाचा मराठी अनुवाद करताना 'छायाचित्र' असा शब्दप्रयोग करतो. परंतु 'Photo' घेण्यासाठी (काढण्यासाठी) प्रकाशाचा वापर होतो. म्हणजे प्रकाशच नसेल तर 'Foto' काढताच येणार नाही. मग 'Photo'चा मराठी अनुवाद करताना 'प्रकाशचित्र' असाच व्हायला पाहिजे, असे माझे मत आहे. यावर जरूर विचार व्हावा.

पावसाळ्यातली नरसोबाची वाडी

श्रीमंत दामोदर पंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मिपाकरांनो.... माझा मिपावर काहीतरी लिहिण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे त्यामुळे चुकभुल दे.घे. :) नरसोबाची वाडी !!!! सांगलीपासुन साधारणतः ३० किमी अंतरावर वसलेलं एक छोटसं गाव... गावापेक्षाही नावाप्रमाणेच वाडी आहे... पण अतिशय प्रसिद्धीला आलं ते दत्त महाराजांच्या तिथल्या वास्तव्यामुळं.... तसा मी नेहमी वाडीला जाणारा... पण पावसाळ्याच्या सुरुवातीला तिथे जाण्यात जी मजा आहे ती कशातच नाही ( अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे. ) इतरवेळी संथ वाहणारी कृष्णामाई पावसाळ्यात मात्र रुद्र रुप धारण करुन वाहते. वाडीचं मंदिर अगदी नदीकाठी असल्यानी दरवर्षीच्या पुरात पाण्याखाली जातं.

सुर्यग्रहण २००९ - ताजी छायाचित्रे

पाषाणभेद ·
लेखनप्रकार
खग्रास (पुर्ण) सुर्यग्रहण फक्त ३.४० मिनीट चालले. यानंतर सुमार १५० वर्षांनंतरच खग्रास (पुर्ण) सुर्यग्रहण भारतात होणार आहे. (चु.भू.दे.घे.) डिस्के. खालील छाया. बघतांना गॉगल वैग्रे लावावा. डोळ्यांना ईजा झाल्यास धागालेखक जबाबदार नाही. :B छाया. १ सुर्यग्रहण सुरु होतांना छाया. २ छाया.

मडुरोडम्_बॉन्साय हॉलंडचे !

विशाल कुलकर्णी ·
लेखनविषय:
हॉलंडमधील मुक्कामाच्या दरम्यान कोणीतरी सांगितले की संपुर्ण हॉलंड प्रत्यक्ष बघणे जर शक्य नसेल तर मडुरोडमला भेट दे, तिथे हॉलंडच्या सर्व ऐतिहासिक स्थळे व इमारतींची मिनीएचर्स पाहायला मिळतील, म्हणुन मग मडुरोडमला भेट दिली. आणि तिथे ती मिनीएचर्स पाहिल्यावर ठरवले की अहं..या प्रत्येक ठिकाणी कधीनाकधी प्रत्यक्ष जायलाच हवे. काही ठिकाणी जावुन आलो. बाकीचे बघु पुढच्या भेटीत जमल्यास....

स्ट्रीट लाईट्स ....

विशाल कुलकर्णी ·
लेखनविषय:
काल काही कामानिमित्त वाशीला गेलो होतो. परत येताना साहजिकच पाम बिच रोड पकडला. संध्याकाळचे सहा वाजुन गेले होते. अंधार पडायला सुरूवात झाली होती. मध्येच पावसाने गाठले म्हणुन एका ठिकाणी थांबलो. पाम बिच रोडवर एका ठिकाणी डाव्या बाजुला एक छोटेसे तळे आहे. बहुदा खाडीचाच भाग आहे तो, तिथे थांबलो. अंधार आणि पाऊस यांच्या शिवणापाणीत रोडवरच्या लाईट्स एवढ्या छान वाटत होत्या की पुछो मत ! आणि पार्श्वभुमीवरचे मेघभारले आकाश ! मोह आवरला नाही.

विमानातून घेतलेली छायाचित्रे

विकास ·
लेखनविषय:
फेब्रुवारी मधे न्यूअर्क न्यूजर्सीवरून बॉस्टन, मॅसॅच्युसेट्स मधे येत असताना. खिडकी होती आणि स्वच्छ सूर्यप्रकाश होता...