मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता

चकाट्या - २

ॐकार ·

प्रियाली 27/09/2007 - 23:33
कवितेची गुंफण लाजवाब! >>कुणी अडवले उडावयाला चुंबनमूर्ती ललनेला बिग शिश्टर शिल्पा! >>मुठीत घ्यावे जगास सांगे देशी कुबेर अलबेला मुकेश अंबानी! >>येतील गुलबट पक्षी , खाडीमध्ये झाडे लावू द्या शिवडीला येणारे फ्लेमिंगो >>ऊंच गणपती बुडवा, मिरवा! उत्सव ऐसा चालू द्या! अनंतचतुर्दशी! सर्व बातम्या म.टा.त होत्या. :-) चकाट्या मस्तच आहेत. अजून येऊ देत.

प्रवासी 30/09/2007 - 11:33
वा ॐकारराव, उपक्रम आवडला. आपला ('वृत्त'प्रेमी) प्रवासी

3

मजला बघ प्रीत तुझी कळली

रंजन ·

राजे 26/09/2007 - 20:58
"छळती तुज त्या जुन्या आठवणी जसे भृंग वनामधुनी सुमना फिरती तुझिया अवती भवती झुरते मुखकमल तुझे रमणी " जबरदस्त..... राजे (*हेच राज जैन आहेत)

मजला बघ प्रीत तुझी कळली बघतेस जरी मला तू सखये नयनात छबी दिसते दुसरी... चुकवी नजरेस सदा दडुनी कसली करते लपवा छपवी? छळती तुज त्या जुन्या आठवणी जसे भृंग वनामधुनी सुमना फिरती तुझिया अवती भवती झुरते मुखकमल तुझे रमणी कथिले गुज मी तुजला मनचे म्हणुनी झुकला सखये चरणी पडले पुढती किति मौक्तिकही.... अपुल्या पुढती बघता हसली वळुनी सखया झटकन वदली .... 'मजला बघ प्रीत तुझी कळली'

घर

सुवर्णमयी ·

राजे 25/09/2007 - 20:20
ही इथली माणस आहेत त्या जगाच्या चार कोपऱ्यात... संगणक मोबाईलने जोडलेली पण मनान कधीच दूर गेलेली... ऐका हो ऐका..घर हव आहे का? माणसाला माणूस हवा आहे का? (तशी प्रत्येक घराला लागली आहे एक घर घर कायमचीच!) क्या बात है, मस्तच. तशी प्रत्येक घराला लागली आहे एक घर घर कायमचीच! उत्तमच, अशी घरे पाहीली की खरोखर दुख: होते, शेजारी कोण आहे हे सोडाच पण आपली मुले घरी कधी आली व त्यांनी आपला आभ्यास केला की नाही केला ह्या खैर-खबर देखील नसलेली घरे {माणसे} मी पाहत आहे रोज ह्यांचे दुखः आहे की घर आपले घरपण विसरले आहे. एकदम समयसूचक कविता. राजे (*हेच राज जैन आहेत)

In reply to by राजे (verified= न पडताळणी केलेला)

शेजारी कोण आहे हे सोडाच पण आपली मुले घरी कधी आली व त्यांनी आपला आभ्यास केला की नाही केला ह्या खैर-खबर देखील नसलेली घरे {माणसे} मी पाहत आहे रोज ह्यांचे दुखः आहे की घर आपले घरपण विसरले आहे. खर आहे राजे. माणसं ग्लोबली जवळ आली पण लोकली लांब गेली. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

प्रियाली 25/09/2007 - 21:48
शेजारी कोण आहे हे सोडाच पण आपली मुले घरी कधी आली व त्यांनी आपला आभ्यास केला की नाही केला ह्या खैर-खबर देखील नसलेली घरे {माणसे} मी पाहत आहे रोज ह्यांचे दुखः आहे की घर आपले घरपण विसरले आहे. अगदी!! माणसं ग्लोबली जवळ आली पण लोकली लांब गेली. वाह! कविता मस्तच आहे! आवडली.

In reply to by प्रकाश घाटपांडे

राजे 25/09/2007 - 23:13
साहेब, अश्या ह्या घराच्या भिंती किती कमजोर असतात हे तुम्हाला माझी सफरच्या ८ / ९ भागात लक्षात येईल असे दोन भयानक अनूभव आहेत माझ्या जवळ की आज देखील काळजाचा थरकाप उडतो विचार केला की. ही ग्लोबल मंडळी देश विदेशाच्या वा-या करतात किंवा दिवस रात्र कंपनी मध्ये पैश्यासाठी राबतात पण येथे घरामध्ये त्यांच्या मुलाबाळांची काय अबाळ होते हे त्यांच्या लक्षात येण्यासाठी खुप मोठा काळ निघून जावा लागतो पण तो पर्यंत त्या भींती ढासळलेल्या असतात. राजे (*हेच राज जैन आहेत)

In reply to by प्रकाश घाटपांडे

सर्किट 25/09/2007 - 23:25
माणसं ग्लोबली जवळ आली पण लोकली लांब गेली. भारतात ऑर्कुट सारखी सोशल नेटवर्कस चालणार नाहीत अशी दहावर्षांपूर्वी मित्राशी पैज लावली होती. मी ती हरलो. कारण म्माणसांना ग्लोबल संबंधांचे असलेले आकर्षण. त्यासाठी लोकल संबंधांचा बळी पडतो, हे लक्षात सहसा येत नाही. - सर्किट

धनंजय 25/09/2007 - 21:35
पण हे कविता समजावून सांगणारे कडवे नसते तरीही कविता माझ्यासाठी तितकीच प्रभावी ठरली असती. > ही इथली माणस आहेत > त्या जगाच्या चार कोपऱ्यात... > संगणक मोबाईलने जोडलेली > पण मनान कधीच दूर गेलेली... ही कलाटणी फारच आवडली : > प्रवेश नाही ...कारण त्याच्याकडे > हवा तो सिक्रेटकोड नाही!

विसोबा खेचर 26/09/2007 - 07:40
लागला जर आसामचा चहा होईल तयार सेकंदात दहा सीएनएन पहा रवीशंकर ऐका तस हे घर ग्लोबल बर का..... ही इथली माणस आहेत त्या जगाच्या चार कोपऱ्यात... संगणक मोबाईलने जोडलेली पण मनान कधीच दूर गेलेली... वा! छान कविता. वरील दोन कडवी जास्त आवडली.. सोनाली, मिसळपाववर तुझं स्वागत. अजूनही लिही... तात्या.

सहज 26/09/2007 - 08:30
मला हे अस ग्लोबल घर खूपच आवडते. बर्गर एखादे दिवशीचा मेन्यू असेलच पण वरणभात, साजूक तूप, खाराची मिरची, साबूदाणा खिचडी हद्दपार नाही केली हो. खर सांगतो खरीखूरी ढेकर तेव्हाच येते पण मला माझे ग्लोबल घर खूप आवडते. अहो मी एकटाच नाही आलेले सगळेच म्हणतात, रेडीफवर स्वतात विमान टीकीटे वाचले की माझ्या इनबॉक्स इमेल असतो, की पुढच्या महीन्यात काय प्रोग्रम आहे का, नवीन घर घेतलेस एकले. आत योग येणार म्हणुन. सुट्यांच्या मोसमात, दहावी , बारावीच्या आद्ल्या/पुढच्या वर्षी कॉन्फरेन्सच्या वेळी घराचे कौतुक होतेच होते. मला "भिकारी" पेशानी किंवा मनानी नाही हो खरच आलेला आवडत, पण बर्‍याचदा तोही म्हणतो आतून खरच ग्लोबल घर खूपच छान आहे हो. बाकी काळाचा महीमा सिक्रेटकोड लावावा लागतो.( पण गंमत सांगतो, आमच्या दुसर्‍या एक्विपमेंट्स वर फ्री मिळाला हो. लेटेस्ट मॉडेल सिक्रेटकोड २००७ आहे . :-)) संगणक, मोबाइल ने "जोडलीच" ना माणसे? आणी कोणाच्या मनाचे काही सांगता येते काय? जाणारी व्यक्ति जेव्हा सांगते की "अगदी आपलेच घर आहे अस वाटल" तेव्हा माझ घर परमेश्वराला पण आवडल हे समजत. देवबाप्पा म्हणतो अरे घराच घरपण माणसातच असत. मला माझ ग्लोबलघर खूपच आवडत. -------------------------------------------------------------- सुवर्णमयी आपली कविता आवडली. मनात एकदा स्टॉकटेकींग करता आला बरे वाटले.

In reply to by सहज

सर्किट 26/09/2007 - 10:45
सहजराव, अपल्या प्रतिसादाने काही दालनांची दारे किलकिली केली. विचार शील आहे सध्या. ह्या विषयावर काही समग्र वगैरे लेखन व्हावे. - (ग्लोबल आणि लोकल) सर्किट

रंजन 26/09/2007 - 08:51
तशी प्रत्येक घराला लागली आहे एक घर घर कायमचीच! जबर्‍या.

प्रमोद देव 26/09/2007 - 08:51
जाणारी व्यक्ति जेव्हा सांगते की "अगदी आपलेच घर आहे अस वाटल.... ही आपुलकी शाब्दिकच ठीक असते.मात्र प्रत्यक्षात तसे वागायचे जर कुणी ठरवले तर ती आपत्तीच ठरेल हे सांगायला नको.मग अरब आणि उंट असे व्हायचे. उंट आत आणि अरब बाहेर!

In reply to by प्रमोद देव

सर्किट 26/09/2007 - 10:47
प्रमोदकाका, आपले म्हणणे आम्हालातरी अजीबात कळले नाही. उंट आत असला, आणि अरब बाहेर असला तर काय बिघडले ? उलट तसेच हवे. कारण आत आलेला अरब काहीही राडे घालू शकतो. - (बे-अरब) सर्किट

धोंडोपंत 14/10/2007 - 14:41
वा वा सोनालीताई, अप्रतिम कवितेबद्दल सर्वप्रथम हार्दिक अभिनंदन. बर्‍याच कालावधीनंतर तुमच्या कवितेला अभिप्राय लिहीण्याची संधी मिळाली. ह्या तात्याच्या मिसळपावामुळे जुने मित्रमंडळी पुन्हा येथे भेटतील असे मानावयास हरकत नाही. आपला, (आशावादी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

विसोबा खेचर 16/10/2007 - 01:08
ह्या तात्याच्या मिसळपावामुळे जुने मित्रमंडळी पुन्हा येथे भेटतील असे मानावयास हरकत नाही. प्रिय धोंड्या, थोडं करेक्शन करतो! मिसळपाव हे 'तात्याचं' नसून आपल्या सर्वांचं आहे आणि आपण सर्वांनी मिळूनच ते मोठं करायचं आहे, नावारुपाला आणायचं आहे! एकटा तात्या काहीच करू शकत नाही याची मला नम्र जाणीव आहे! आपला, ('साथी हाथ बढाना...' या गाण्यावर श्रद्धा असलेला!) तात्या.

घर "या, या ,हे घर तुमचच आहे इथे पाहुण्यांच स्वागतच आहे" अशा पाट्या लावून आता म्हणे जागोजागी घरे आहेत फेंग शुई नि वास्तुशास्त्र पिऊन मोठी घरे उभे आहेत रिमोटकंट्रोलवर चालणारे एक जग त्यामध्ये सज्ज आहे खा अमेरिकन बर्गर फाईन घ्या कधी इटलीयन वाईन जरा चघळा संस्कृतीचे किस्से शोधा आपल्या भाषेचे हिस्से लागला जर आसामचा चहा होईल तयार सेकंदात दहा सीएनएन पहा रवीशंकर ऐका तस हे घर ग्लोबल बर का..... ऐका इथे कशाची उणीव नाही! दारावरच्या भिकाऱ्याला येथे प्रवेश नाही ...कारण त्याच्याकडे हवा तो सिक्रेटकोड नाही!

मनात माझ्या तुझीच गीते लिहून गेलो...

रंजन ·

सर्किट 24/09/2007 - 22:00
असाच यावा भरून डोळा कधी ढगाचा.. तसाच मीही कधी अवेळी झरून गेलो... छान. खूप आवडल्या ह्या ओळी. - सर्किट

मनात माझ्या तुझीच गीते लिहून गेलो... अता उराशी कसा धरावा किरण तरी मी दिशादिशांचा प्रकाश मोठा बनून गेलो.. तुझ्याविना मी मुकाच येथे थिजून गेलो मनात माझ्या तुझीच गीते लिहून गेलो... मलाच कळते ..नसेच ही वाट ओळखीची ... तरी कशी पावलांस या ओढ लागलेली? पुन्हा पुन्हा मी इथेच येतो तुझ्याच दारी.. असाच चकवा मला तरी का छळून गेला? कशास बांधू उगाच त्या आठवांस आता?

या तुम नहीं या हम नहीं

पंकज ·

विसोबा खेचर 23/09/2007 - 20:58
पंकजराव, सदर कविता ही उर्दू असून तिचा आस्वाद येथील वाचकांनादेखील घेता यावा या हेतूने इथे देत आहे. हे अतिशय स्तुत्य आहे. हिंदी भाषा तर कानाला अतिशय गोड लागतेच परंतु ऊर्दू भाषेचा लहेजा आणि डौलही मनाला भावतो. आपल्याला फक्त एकच विनंती, की वरील कवितेतील उर्दू शब्दांचा अर्थही आपण किंवा चित्तोबांसारख्या जाणकारानी इथे दिल्यास बरे होईल.. आपला, (उर्दूप्रेमी) तात्या.

यारो सितम अब ना सहो खोलो जुबाँ चूप ना रहो फिरकापरस्तों से कहो करते रहो मश्के-सितम हम ने भी खायी है कसम या तुम नहीं या हम नहीं माना फुजूं है हौसला ये जंग का है मरहल्ला आसाँ नही है फैसला इतना तो होगा कम से कम या तुम नहीं या हम नहीं रुत अश्क बारी की गयी अब शोला बारी चाहिये हर हमला भारी चाहिये हर जर्ब कारी चाहिये सर हो के तलवार खम या तुम नहीं या हम नहीं तुम हो हिसार अंदर हिसार और अपनी सफ में इतशाद है खेल अभी जीत-हार हम को भी होने दो बहम या तुम नहीं या हम नहीं -कैफ़ी आज़मी सदर कविता ही उर्दू असून तिचा आस्वाद येथील वाचकांनादेखील घेता यावा या हेतूने इथे देत आहे.

प्रार्थना.

अशोक गोडबोले ·

सहज 23/09/2007 - 13:34
अहं न कळमं पूर्णम संस्कृतम. एखाद दुसरम कदाचीत शब्दम. कींतूम चलामी त्वं प्रयत्नम पाठींबस्य आहोत अस्मम कालाव्यहं करोमी च ठावम त्वं करोती क्षमा मतिमंदोऽहं मयम!

In reply to by सहज

सर्किट 24/09/2007 - 04:47
अरे, मला उचला रे कुणी !!! हसून हसून मुरकुंडी वळणे म्हणजे साधारणतः काय असते, त्याचा अनुभव आला ! जियो सहजराव !!! - सर्किट

गुंडोपंत 23/09/2007 - 14:56
"अहं न कळमं पूर्णम संस्कृतम. एखाद दुसरम कदाचीत शब्दम." कै च्या कै भन्नाट आहात सहजराव! मानलं!! आपला गुंडोपंत

धनंजय 24/09/2007 - 07:20
मराठीकरण पटते काय बघा - द्वंद्वा पार, त्रिगुणा पार दगडीं दगडीं महेश रूप । जाणे माया भेदा मी न हरि! सोडवी संसारी मीन । (इथे मध्येच विष्णूला आळवणी :-) एकच देव आहे वगैरे ठीकच आहे) मतिमंद मी पाप पथिक मी मुक्त वर मज दे रे स्वामी । {हे कडवे मला समजले नाही : जसे कमळे गेलेले स्वच्छ मानस [?मन? संस्कृतात मानस चा अर्थ मन असा होत नाही...] मुनीजनांविना हेच मानस सरोवर हंस नसल्यासारखे??? या कवितेत याचा संदर्भ काय?} शिवपद कमळीं शरणिं मनाच्या प्रभू! उद्धरीं चंचळ भुंग्या ॥ (या कडव्यात मुळात छंदोभंग आणि वेडेवाकडे संधी झाले आहेत असे वाटते. जिभेची अभावित लडखड होते, आणि अर्थाचा अनर्थ होतो - सहज ठीक करण्यासारखा, कदाचित टंकनदोष असावा. मी स्वतः वृत्त वगैरे नीट सांभाळलेले नाही, क्षमस्व. वाचक्नवींच्या सूचनेनुसार शेवटच्या कडव्यात एक बदल केला. अजून अर्थ लागत नाही म्हणता? मला तरी कुठे लागतो आहे?) शंकराचार्यानंतर या प्रकाराला भलतीच सद्दी आली आहे. चाल बसवली तर गोड गाणी बनतात, त्यामुळे माझी काही मोठी जळजळ नाही!

वाचक्नवी 24/09/2007 - 00:12
शेवटच्या ओळीतला प्रभोदय म्हणजे काय? प्रबोधय तर नाही? किंवा प्रोदय? मानस हे 'मनापासून उत्पन्‍न झालेले 'अशा अर्थाचे विशेषण आहे हे खरे. पण माझ्याकडच्या एका कोशात भागिनीविलास (१.११३)या काव्यात मन अशा अर्थाने हा शब्द वापरला आहे असा उल्लेख आहे. दुसरा अर्थ 'गर्भित संमती 'असा दिला आहे. इथे संदर्भ न लागल्यामुळे कुठलाच अर्थ लागू पडत नाही . तरीसुद्धा 'शिवपद कमळीं शरणा म्यां'--म्हणजे काय? म्यां म्हणजे 'मी 'ची तृतीया. म्हणजे कर्मणी प्रयोग हवा. क्रियापद कोणते? आणि शिवपद म्हणजे शंकराचे पद? शरणा हे कुठले रूप आहे? कमळींतल्या ळी वर अनुस्वार का? पदकमळाला असा अर्थ असेल तर द्वितीया हवी. द्वितीयेच्या जागी सप्तमी का? शरण‍ऐवजी लीन असते तर चालले असते. मूळ संस्कृत आणि मराठी रूपांतर दोन्हीमध्ये शंका आहेत.--वाचक्‍नवी

In reply to by वाचक्नवी

धनंजय 24/09/2007 - 00:31
> 'शिवपद कमळीं शरणा म्यां' टला ट रीला री शिघ्र मम यमके भोवणारी धनंजय

In reply to by वाचक्नवी

शेवटच्या ओळीतला प्रभोदय म्हणजे काय? प्रबोधय तर नाही? टंकलेखनाची सवय नसल्यामुळे चूक झाली. प्रबोधयच म्हणायचं आहे.

संस्कृत भाषेत या चार ओळी सुचल्या त्या इथे देत आहे.
-- प्रार्थना -- द्वंद्वातीतं त्रिगुणातीतम् प्रतिपाषाणे महेशरूपम् II धृ II नाहं जाने माया भेदम् हरे मुंचमाम् भवजलमीनम् II १ II मतिमंदोऽहं अघपथगामी मुक्तिवरं मे देहि स्वामी II २ II विगतवारिजं मानसविमलम् मुनिजनमानसहंसविहीनम् II ३ II शिवपदारविन्दे मनशरणम् प्रभो प्रभोदय चंचलभृंगम् II ४ II -- अशोक गोडबोले, पनवेल.

पुनश्च ह्या गंगेमधि - भाग ०

जगन्नाथ ·

व्यंकट 23/09/2007 - 09:48
"निश्चलता" म्हणजे ब्रह्म, किंवा खरे तर ब्रह्मकल्पना असे मर्ढेकरांनी का म्हटले असेल? ब्रम्ह निश्चल आहे का? की चल आहे? की चल + निश्चल मिळून आहे? की सर्वम खल्विदं ब्रम्ह आहे?

आपण दिलेल्या कवितेचा अर्थ आम्हाला सांगता येणार नाही आणि आम्ही ती कविता वाचलेली नाही पण मर्ढेकरांच्या बाबतीत ते इंग्लंडला जाऊन येईपर्यंत रविकिरण मंडळाच्या स्वप्नाळू आणि रोमॆंटीक कविता श्रेष्ठ होत्या मात्र इलियेट,ऒडेन आणि काही इतर पाश्चिमात्य कविंचा त्यांच्यावर परिणाम झाल्यामुळे त्यांची कविता जमिनीवर उतरुन चालू लागली, असे म्हणतात. नवे वास्तव त्यांनी मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला.साम्राज्यवाद आणि भांडवलशाही यांच्या दुष्पपरिणामुळे वैयक्तिक जीवनात येणारे दैन्य,लाचारी,स्वार्थ, ढोंग त्याचबरोबर आलेली यांत्रिकता,महायुद्धांचे परिणाम यांच्यामुळे याची प्रतिक्रिया म्हणून उपरोधाने,उपहासाने,तिरस्काराने आणि कारुण्याने त्यांची कविता मानवतेची बनली इतकेच आम्हाला माहित आहे.बुद्धांचा त्यांच्या विचारांवर प्रभाव होता का ? या बद्दल आमचे फारसे वाचन नाही. बाकी "निश्चलता" म्हणजे ब्रह्म, किंवा खरे तर ब्रह्मकल्पना, याचा विचार आम्हाला तरी तेव्हाच्या काळाच्या दृष्टीने अप्रस्तुत वाटतो ! (प्रतिसादाचा सूर हलकेच घ्या असा आहे.)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

"ह्या गंगेमधि" ही कविता थोडीफार बुचकळ्यात पाडणारी आहे असा अनुभव आहे. म्हणजे तिचा शेवट जो केला आहे तो पटत नाही. मग कोणकोण "एक सौंदर्यानुभव" म्हणून पुढे चौकशी करूच नये असे म्हणतात. तेही पटत नाही. आळशी असल्यामुळे मी ती सोडूनच दिली होती. पण अनेक वर्षांनी एक वेगळा विचार मनात आला. तो असा की बुद्धाचा स्पष्ट उल्लेख असून आपण "त्या" दृष्टीने कधी वाचलीच नाही. तसे कोणी केलेही असेल, पण मला ते माहीत नाही. जमेल तितपत स्वतःच करायला काय हरकत आहे? म्हणून इथे सुरुवात केली आहे. मर्ढेकरांच्या जीवनाबद्दलही मला विशेष अशी माहिती नाही.

एकमेकांसाठी (दुसरी आवृत्ती)

धनंजय ·

धनंजय 23/09/2007 - 00:20
[निकृष्ट असल्यास समीक्षणाने लेखन अधिक रटाळ होऊ शकते.] कुठल्याही स्नेहसंबंधात, अगदी बाप-लेकांच्यातही, दोघांचे स्थान आणि मान, मनुष्य म्हणून समसमान हवेत. भावनेच्या बाबतीत कोण ज्येष्ठ, कोण कनिष्ठ याची परिस्थितीनुसार अदलाबदल केली तर ते समानत्वच. कोणी एक सदासर्वकाळ शासक नको हे खरे, पण बळेच अष्टौप्रहर समानत्वाचा एकसुरीपणा नको.

विसोबा खेचर 23/09/2007 - 00:25
अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर तुझी कविता आपल्याला काय समजली नाय बा! साला, उगाच खोटं कशाला बोला? :) मात्र तुझी ही कविता तू आपलेपणाने मिसळपाववर प्रथम प्रकाशित केलीस याचा मात्र मनापासून आनंद वाटला! तात्या.

सहज 23/09/2007 - 07:21
आजकाल धनंजयांनी काही लिहिलेले वाचले की सर्व प्रथम, काय धागा आहे, काय विचारसरणी आहे (स्वसमीक्षण) ओळखूया असे होते मग त्यांच्या साहीत्याचा आस्वाद घ्यायचा. कवी कवीतेच्या वरचढ, होतोय का? :-) वाचले की लेखाचा / काव्याचा आनंद मिळाला पाहीजे म्हणजे डो़क्याला खूराक नको, गरजेपेक्षा जास्त वेळ चावून दात दुखतात. तुम्ही राव डायरेक्ट पी एच डी वाल्यांसाठी कवीता नका लिहू :-) मासेस साठी लिहा तुमचा क्लासच ए-वन आहे की ते काव्य देखील भारीच असेल. असो वर जो विचार व्यक्त केला हाच तुमच्या खर्‍या स्व-समीक्षण भाग तर नव्हे? कारण अजूनही एक मन सांगत आहे धनंजय कॅनॉट डू एनीथीन्ग राँग. :-) भवजलौघे म्हणजे?

धनंजय सेठ, कविता आवडली असा शेरा द्यायला आलो होतो,पण आज जरा शब्द खेचून आणल्यासारखे वाटले. ''झुंजतोस तू भवजलौघे, क्लांत जधी मी शांत तू करी, या शब्दांमुळे कवितेचा आस्वाद घेता येत नाही असे वाटते, पण टेन्शन घ्यायचे नाही,आम्हाला धनंजयच्या कविता आवडतात ! :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

राजे 23/09/2007 - 18:45
अहो कोणी तरी कवितेचा अर्थ तरी लिहा हो... मला तर काहीच कळाले नाही. पहलीच अल्प बुध्दी त्यात कवितेशी जन्मजात वावडे .....त्यात भरीस भर हे अवघड मराठी शब्द.. क्षमा असावी हा काही रोक वयक्तीक नाही आहे पण एक सुचना जसे काही जागी कविता लिहल्यानंतर भावार्थ दिला जातो त्या प्रमाणे येथे देखील भावार्थ लिहावा ही विनंती. जेणे करुन माझ्या सारख्या लोकांना त्याची मदत होईल व कवितेचा पुर्णपणे आनंद घेता येईल. [काही मंडळीच्या लक्षात आलेच असेल की मी कवितेला कधी प्रतिसाद का देत नाही ते :D] राजे (*हेच राज जैन आहेत)

प्राजु 23/09/2007 - 19:16
मला नाही झेपली ही कविता.... प्लिज याचा अर्थ सांगा कोणीतरी.. - प्राजु.

प्रमोद देव 23/09/2007 - 19:53
लहानपणी 'कडेवर' घेऊन वाढवले.....बाळाला त्याच्या (बाळाच्या)मोठेपणी वेळप्रसंगी त्याची 'कड' घेतली (बाजू घेतली) आणि स्वतःच्या(बाबा,आई जे कुणी असेल) म्हातारपणी तू(बाळा) 'आधार'(कड घेशील/खांदा देशील) देशील ना?

विसोबा खेचर 23/09/2007 - 20:28
धन्याशेठ, पहिले, दुसरे, तिसरे संस्करण या स्वरुपात एखाद्या कवितेची वाटचाल दाखवण्याचा तुझा प्रयत्न स्तुत्यच आहे हे आधी कबूल करतो आणि त्याबद्दल तुझ्या कल्पकतेला आणि प्रतिभेला सलामही करतो! अरे पण मी काय म्हणतो, की काव्याची कसली संस्करणं करता रे? :) अरे कविता कशी पाहिजे? सहज,सोपी, ओघवत्या शैलीतली. ती वाचताना जणू आपल्याला ती कुणी गाऊनच दाखवत आहे इतकी ती रसाळ आणि गेय हवी! आणि हो, ती संस्कारित स्वरुपातच जन्माला यायला हवी, किंबहुना कुठलिही उत्तम व गेय कविता ही संस्कारितच असते. काय म्हणतोस? आता उदाहरणार्थ, 'हिरवे हिरवे गार गालिचे हरिततृणांच्या मखमालीचे' बघ किती सुरेख आणि मुख्य म्हणजे समजायला किती सोप्या आहेत वरील ओळी! बरं आता तुला जरा अजून पिडतो. वरील ओळी हे आपण फायनल संस्करण समजू, तू या ओळींची आधीची दोन संस्करणे लिहून दाखव पाहू! :)) किंवा, रसाल मुले फले सेवुनी, रसाळता घ्या स्वरात भरुनी, अचुक घेत जा स्वरा मिळवुनी, लयतालाचे पाळा बंधन, गा बाळांनो श्रीरामायण या कडव्याची आधीची दोन संस्करणे लिहून दाखव पाहू! :) काय? कसा काय दिलाय तुला "घरचा अभ्यास?" :)) आपला, (साध्यासोप्या कवितांचा भुकेला!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

विसोबा खेचर 23/09/2007 - 20:37
बरं आता तुला जरा अजून पिडतो. वरील ओळी हे आपण फायनल संस्करण समजू, तू या ओळींची आधीची दोन संस्करणे लिहून दाखव पाहू! :)) किंवा अद्याप संस्करण सुरूच आहे असे समजून पुढचे संस्करण तरी लिहून दाखव पाहू! :) मी बालकवींच्या किंवा माडगुळकरांच्या ओळी एवढ्याच साठी घेतल्या की या ओळी लोकांच्या तोंडावर आहेत इतकंच. यात तुलना करण्याचा हेतू नक्कीच नाही. वाटल्यास 'गंगा जमुना डोळ्यात उभ्या का?' ही ओळ घेतलीस तरी चालेल. पण तू जे काही बापलेकाचं काव्य काढलं आहेस ना, ते इथे माझ्यासकट बर्‍याच जणांच्या डोक्यावरून जातंय रे! :) आपला, (कठीण कठीण काव्य प्रकारांना भुतापेक्षाही जास्त घाबरणारा! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

धनंजय 23/09/2007 - 21:51
बालकवींची सोयीची नव्हती, गोविंदाग्रजांची ही कविता घ्या (एक कडवे) : थांब जरासा बाळ ! सुंदर खाशा प्रभातकाळीं, चहूंकडे ही फुले उमललीं, बाग हांसते वाटे सगळी! शीतल वारा, या जलधारा कारंजाच्या छान ! थांब जरासा बाळ ! आता माझी (हे तिसरे संस्करण नव्हे, कारण ही गोविंदाग्रजांची, आणि केशवसुमारांची दुहेरी चोरी!) ********************** नीज जरा तू बाळ... निर्दय काळ्या संध्याकाळी कीट जिवाणू डसण्या टपली पांघरून तुज मी कवटाळी रक्षण करितो, तुज मी धरितो, भिस्त मजवरी टाक ! नीज जरा तू बाळ... भल्या थोरल्या वादळवेळी शक्ती जर ही कमती पडली सहानुभूती बहाल केली ! घेइ विसावा, जसा असावा, आधार मज तू मान... नीज जरा तू बाळ... कधि ही काया जर्जर झाली क्षीण मनाची रयाच गेली शोधिन तेव्हा तुझी सावली ! देइ सहारा, उचली भारा, मदतीसाठी धाव ! नीज जरा तू बाळ... ********************** पहिले संस्करण गेय नव्हते ते आधी ठरवून. ते संदिग्ध होते ते मुद्दामून - बापलेकांइतपतच ते प्रियकरांमधील बदलत्या शक्ति-समीकरणाबद्दल (पॉवर-इक्वेशन बद्दल) आहे. ते बरळलेले पिलो टॉक आहे, की अघळपघळ अंगाईगीत हेदेखील संदिग्धच. राग माहीत असून वर्ज्य स्वर आवर्जून घेतले आहेत. ते साहस कधीकधी काय, बहुतेक वेळा फसते, आणि श्रोते आपल्याला लगेच सांगतात. श्रोत्यांचे ऐकून, मनन करून पुन्हा तयारी करायला बसायचे. काय म्हणता? जोपर्यंत मला बेमालूम वर्ज्य वापरता येत नाही तोपर्यंत रागच कळला नाही! - असा तुमच्या विषयातला दाखला देऊन मी मोकळा!

In reply to by धनंजय

सर्किट 24/09/2007 - 04:50
धनंजयराव, हुकुमी कविता आवडली. आम्ही सध्या गद्याची टोपी घातली आहे. काही दिवसांतच पद्यची टोपी घालून आपल्या कवितेचे परीक्षण करू ! (पळा ! पळा !! कोण पुढे पळे तो !) - सर्किट

वाचक्नवी 23/09/2007 - 23:17
गेय नव्हते तरी पहिले संस्करण छान होते. समजायला अजिबात कठीण नव्हते. कोडी सोडवायची चतुराई अशी कधीकधी कामी येते! दुसरे आवडले नाही. तिसरे बाळबोध.--वाचक्‍नवी

In reply to by वाचक्नवी

धनंजय 24/09/2007 - 00:29
> गेय नव्हते तरी पहिले संस्करण छान होते. अंगाई गीताची ही अगदी बाळबोध चाल लावा, पटले तर बघा : (सर्व 'ग' कोमल) धरि तोऽ तुऽजऽ | माझ्या बाऽहूऽतऽ | बाऽळऽ राऽजाऽ रेमऽ नीऽसाऽ | रेमऽ नीऽसाऽ | रेरेऽ नीऽसाऽ अंगाईगीत हे चालीत अक्षरे कोंबताना जरा अघळपघळच असणार हे आलेच!

पहिले संस्करण बरे आहे पण जुनाट वळणाचे आहे. पहिल्या आवृत्तीतली जुनाट वळणे दूर करून बघावी, असे वाटते.

(दुसरे संस्करण ) आज माझ्या कडेवर तुला सांभाळतो, बाळ राजा... उद्या तुझ्या कडेशी तुला साथ देतो, बाळा माझ्या... कधी येईन कडेला, मला टेकू देतोस? माझ्या राजा... ****************** (पहिले संस्करण मुद्दामून इथेच ठेवतो आहे. पुढे पुन्हा संपादन करून काढून टाकीन.) धरितो तुज माझ्या बाहूंत बाळ राजा रक्षितो, जगी पीडा बहूत बाळ राजा झुंजतोस तू भवजलौघे बाळा माझ्या कडेला ये तू विसावा घे बाळा माझ्या क्लांत जधी मी शांत तू करी माझ्या राजा शक्ती दे तू, धीर मी धरी माझ्या राजा *******************

एक रात्र..

प्राजु ·

विसोबा खेचर 23/09/2007 - 00:01
मनोगतावर ही कविता आधी प्रकाशित झाली आहे. मनोगतासारख्या बलाढ्य संकेतस्थळावर ही कविता आधी प्रकाशित झाली असूनदेखील आपल्याला ती इथे प्रकाशित कराविशी वाटली ही आनंदाचीच गोष्ट आहे. कधितरी आपलं एखादं साहित्य आमच्या मिसळपाववर देखील प्रथम प्रकाशित करा हीच विनंती! अन्यथा, मनोगतावर प्रकाशित केलेलं साहित्य इथे प्रकाशित करत राहण्यास काहीच हरकत नाही. मिसळपावचा तोही सन्मानच असेल! धुंद जाहले गीत माझे चुंबुन घे तू अधरी एक रात्र सख्या आपुली घे लपेटून तनूवरी... कविता छान आहे हो. पुढील लेखनाकरता अनेकोत्तम शुभेच्छा! :) तात्या.

प्राजु 23/09/2007 - 02:13
धन्यवाद तात्या.. पण तुम्ही मागे मनोगतवर अर्धी ठेवलेली "शिंत्रे गुरूजी" इथे पूर्ण करा..प्लिज. - प्राजु.

In reply to by प्राजु

विसोबा खेचर 23/09/2007 - 07:09
पण तुम्ही मागे मनोगतवर अर्धी ठेवलेली "शिंत्रे गुरूजी" इथे पूर्ण करा..प्लिज. हो नक्की करतो, पण सध्या जरा रौशनीत अडकलो आहे. ती पूर्ण करतो मग शिंत्रेगुरुजींकडे पाहू..:) अहो प्राजु काय सांगू तुम्हाला आता? फक्त शिंत्रेगुरुजीच नाही, मनोगतावर माझं खूप काही राहून गेलं आहे! तात्या.

सिद्धू 12/12/2008 - 15:22
प्राजु, मी येत्या २ दिवसातच मिसळपाव वर आलो आहे. आणि लगेचच १ उत्तम कविता वाचायला मिळाली. अतिसुंदर...

आपला अभिजित 12/12/2008 - 23:27
`श्रुंगारा'च्या नावाखाली अतिशय अश्लील कविता लिहून आमच्यासारख्या निरागस, निष्पाप, कोवळ्या वयातील पिढीला बिघडवण्याचा प्रयत्न करणार्‍या तथाकथित कवयित्रींचा धिक्कार असो! (अवांतर : कवितेतील भावना या शिंडी क्रॉफर्डने तात्यांबद्दल व्यक्त केलेल्या असतील, तर तात्यांना शुभेच्छा आणि कवितेवरील भोचक अभिप्राय सपशेल मागे!)

आजानुकर्ण 13/12/2008 - 00:19
कवितेत नेत्र प्रणयातूर गात्र अधरी तनू हे फार अवघड शब्द आहेत. शृंगारिक कवितांसाठी शा. प्रभाकर यांच्या कवितांचा अभ्यास करा असे मी सुचवतो. आपला, (गंगू हैबती) आजानुकर्ण

आपला अभिजित 13/12/2008 - 00:35
(कवितेची प्रशंसा करणे बापजन्मी शक्य नसल्याने, कवितेची सहज सुचलेल्या शब्दांत वाट लावत आहे. हीच प्रतिक्रिया समजून घ्यावी!) एक "धुंद' रात्र सख्या मी होते बावरी बाराची वेळही उलटलेली घड्याळातल्या काट्यावरी भूकभावनेशी खेळ किती खेळावा तरी, काळजाला घोर माझ्या "बाटली' तुझ्या उरी भेदरलेले क्षण सारे ना थाऱ्यावर तुझे नेत्र "गटारा'तूर अंग जाहले, रस्त्यावर असे ना कुत्रं रस्त्यावरची धूळ सारी चुंबून घे अंगावरी एक रात्र सख्या तूही घे लपेटून "कोठडी'!

सोनम 13/12/2008 - 17:41
कविता सु॑दर आहे. आवडली चा॑गली आहे मैत्री ही करायची नसते कारण मैत्री ही होत असते मैत्री ही तोडायची नसते कारण मैत्री ही जपायची असते.

कविता मस्तच! छान वाटले, खूप दिवसानी छान कविता वाचायला मिळाली..:) अवांतरः तू गाणे खूप छान म्हणतेस...:) ऐकले मी यु ट्युब वर...:)

मनोगतावर ही कविता आधी प्रकाशित झाली आहे. एक धुंद रात्र सख्या मी होते बावरी सय तुझी ही दाटलेली या माझ्या अंतरी मूक भावनांचा खेळ किती खेळावा परी काळजातली हुरहूर तुझ्या दाटली माझिया उरी आतुरलेले क्षण सारे साद घालिती तुझे नेत्र प्रणयातूर जाहले मी सर्वत्र तुझेच गात्र धुंद जाहले गीत माझे चुंबुन घे तू अधरी एक रात्र सख्या आपुली घे लपेटून तनूवरी... - प्राजु.

चकाट्या

ॐकार ·

बाबुराव 21/09/2007 - 13:56
गमभन वाला माणूस बी गमतीदारच हाये ,मह्या मनात कविताच लिव्हली तुमी. इथं लै कविता अशाच येऊ राह्यल्या म्हून म्हणलं :) बातम्या पाहतो बरं का ? सकू आन ग आजचे पेपर सगळे हिकडं !

विसोबा खेचर 21/09/2007 - 14:50
बातमी एखाद दिवसाची शिळी असू शकेल. आपणांस कविता वाचून बातमी हुडकून त्याचा दुवा प्रतिसादात द्यायचा आहे. ओंकारराव, तुम्ही सुरू केलेला खेळ उत्तमच आहे हो. पण आम्हाला काही या खेळात भाग घेता यायचा नाही. कारण आमचं वृत्तपत्रांचं वगैरे फारसं वाचनच नाही. आम्ही फक्त शेअरबाजारातले भावांचे आकडे वाचणारी माणसं! :) तेव्हा तुम्हा मंडळींचं चालू द्या.. बाय द वे, लगे हाथ एक विनंती मात्र आपल्याला करू इच्छितो. आपण रेखाचित्र फार सुरेख काढता. तेव्हा आपलं एखादं उत्तमसं रेखाचित्र इथे चढवलंत तर बरं होईल आणि आम्हालाही त्या कलेचा आनंद घेता येईल... तात्या.

आजानुकर्ण 21/09/2007 - 14:53
सुंदर उपक्रम आहे. ही बातमी काही ओळखता आली नाही. पण प्रमोदकाका म्हणतात तशी तरणतलावासंबंधीची बातमी वाटते. आणि ते रेखाचित्राचंही बघा. ;)

जुना अभिजित 21/09/2007 - 15:02
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow.cms?msid=2387661 मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

ॐकार 21/09/2007 - 19:17
मला शंका होती कोणाला चकाट्यांमध्ये रस असेल की नाही याची. पण तसे काळजीचे काही कारण दिसत नाही. आम्ही फक्त शेअरबाजारातले भावांचे आकडे वाचणारी माणसं! :) तात्या , हे बरं नाही. तुमचा व्यासंग वाढावा असे नाही का हो वाटत तुम्हाला? ;) भेळेचे कागद वाचत चला सुरुवातीला, हळूहळू पूर्ण वर्तमानपत्राची सवय होईल ;) रेखाचित्रे सद्ध्या नवी नाहीत...:( एखाद दुसरे काढले की इथे चढवतो. हाटेलात फ्रेम करून ठेवा :ड तोवर जमल्यास शोधून इंजिनिअरिंगच्या दिवसांत पेनाने काढलेली चित्रे चढवता येतात का ते पाहतो. वर आलेला बातमीचा दुवा अचूक आहे.

In reply to by ॐकार

विसोबा खेचर 22/09/2007 - 00:51
भेळेचे कागद वाचत चला सुरुवातीला, हळूहळू पूर्ण वर्तमानपत्राची सवय होईल ;) हरकत नाही! त्यानिमित्ताने भेळ खाणे होईल..:) ...:( एखाद दुसरे काढले की इथे चढवतो. हाटेलात फ्रेम करून ठेवा :ड तोवर जमल्यास शोधून इंजिनिअरिंगच्या दिवसांत पेनाने काढलेली चित्रे चढवता येतात का ते पाहतो. चालेल, वाट पाहात आहे.. तात्या.

सर्किट 21/09/2007 - 23:59
छान प्रोजेक्ट आहे. त्यानिमित्तानी आम्हाला बातम्याही कळतील. - सर्किट