बग आली माझ्या कोडा
लेखनविषय:
काव्यरस
- Read more about बग आली माझ्या कोडा
- 14 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
धाव धाव टीम लिडरा
बग आली माझ्या कोडा
किती आता गुगलावे?
एआय मदतीला घ्यावे?
डेडालाईन मृत्यू भासे
चहा कॉफी नरडी डाचे
आता उद्धरण्या केवळ
तूच येई धावत सबळ
पाषाणाच्या चुकल्या कोडी
टेस्टर, क्यू.ए. इग्नोर करी
- पाभे
२६.०३.२०२४