✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • लेख
  • भटकंती
  • कविता
  • नवीन लेखन
  • पाककृती
  • भटकंती
  • विशेषांक

स्स्स्साली वृत्ती नाही बदलली.!!!

आ
आगाऊ म्हादया...... यांनी
Tue, 07/28/2015 - 07:41  ·  लेख
लेख
मी जिथे काम करतो तेथील प्रसंग. इतके दिवस जुनाट कपाटं, कागद, वाळलेल्या पापडासारखी पोस्टर्स, निवांत सरकारी कामं, एका बाईचा तार सप्तकातला इरिटेटिंग स्वर अस एकंदर स्वरूप. परवा अचानक गडबड झाली, खडबडून जाग आली म्हणा ना...सगळी पोस्टर्स पुसून घ्यायला लावली...कुणाला?? संशोधकांना...आम्हाला देण्यात येणाऱ्या पगारात हे ही समाविष्ट असत वाटत. नवीनच कळलं. १ महिना रखडलेल्या पोस्टरच काम १ तासात उरकलं गेलं अन ते प्रिंट करायला धाडण्यात आलं. जुनी कपाटं नवीन दिसण्याचे दुबळे प्रयत्न करून झाले. कार्पेट नवीन, पायपुसणी नवीन एवढच काय तर चहाचे कपदेखील नवीन. अन तार सप्तकातला स्वर आणखीनच फाटक्या स्पीकर सारखा झाला. म्हटलं च्यायला झालं काय??? एक बाई येतीय, परदेशातून. फॉरीन बर का. कुलगुरुंपेक्षा महत्वाची लोकं. मग हे खराब आहे, इथे तिला आणायलाच नको, तिथे नको वगैरे planning झालं. मग water cooler आतून साफ केला गेला, please check it does not have mosquito larvae या शब्दात बोलून झालं. (इतके दिवस त्यातलंच पाणी पितोय आम्ही. पण आम्ही फॉरीनचे नाही ना. असली त्या संचालक बाईची अक्कल). सगळं कसं टापटीप. सुंदर. च्यायला ती काय अडाणी आहे का काय?? बांग्लादेशात काम केलय तीने. LMIC (low middle income countries) मध्ये काय अन कस चालत माहित नाही की काय तीला? हे असले आव कशाला आणायचे.? बर ती बाई काय funding वगैरे देणारे का? नाही..ते पण नाही. एकच कारण. बाई, अन त्यातून गोरी. कार्व्हर ने शोध लावलेच नाहीत. आपल्याकडील गोर्या कातडीचं आकर्षण संपत नाहीच. त्यांचे गुलाम म्हणून जगायचीच लायकी आहे वाटत तुमची. या सगळयाच मूळ कुठे आहे? आम्हाला संशोधन पद्धती शिकवतात न तिथेच. संशोधन म्हणजे फार नवीन अन फार मस्त असा प्रकार. नवीन शोध. अनेक पॉलीसी, आरोग्य सेवा यांच्या दर्जात भर टाकणारे शोध. लोकहिताचे. पण सुरुवात कुठून करायची?? पूर्वी केलाय कुणी असा अभ्यास?? नाही?? मग गोरे काय वेडे आहेत का? त्यांच्या डोक्यात नक्कीच आलं असेल. असा रिसर्च नाही ना झाला पूर्वी? मग होतंच नसेल...methodology मध्ये काहीतरी प्रोब्लेम असणार. तू असं कर, ४-५ सिमिलर रिसर्च शोध. आणि carry out is as it is. या सगळ्याला नवीन मी प्रश्न विचारतो, पण मग वेगळं काय करतोय आपण?? मग मला वेड्यात काढत उत्तर मिळत, "अरे स्टडी स्ट्रेन्थ मध्ये लिहायचं, हा भारतीय context मध्ये पहिला आहे"... म्हणजे काय झालं पुन्हा? जा...पाय चाटा गोऱ्यांचे!! स्स्स्साली वृत्ती नाही बदलली.!!!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
4459 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

अहो, निदान त्यानिमित्ताने

आनंदी गोपाळ
Tue, 07/28/2015 - 08:52 नवीन
अहो, निदान त्यानिमित्ताने स्वच्छता तर झाली! हेही नसे थोडके.
  • Log in or register to post comments

थोड़ी स्वच्छता तुम्हाला करायला

कैलासवासी सोन्याबापु
Tue, 07/28/2015 - 09:27 नवीन
थोड़ी स्वच्छता तुम्हाला करायला लागलेल्याचे तुम्ही ज़रा जास्त मनाला लावुन घेतलेत काय संशोधक सर??
  • Log in or register to post comments

हाहाहा...नाही हो.

आगाऊ म्हादया......
Tue, 07/28/2015 - 19:39 नवीन
मुद्दा वेगळाच आहे. स्वच्छता अभियान म्हणून बाकी काम फसक्लास झालं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

हज्जारवेळा सहमत!!!

तुषार काळभोर
Tue, 07/28/2015 - 09:36 नवीन
फ्रेंच येमेन्शीत असल्याने रोज दहा वेळा अशा गोष्टी बघतो.
  • Log in or register to post comments

म्हाद्या भाऊ

नाखु
Tue, 07/28/2015 - 09:39 नवीन
थोडा "आगाऊ पणा " करून सांगतो रागावू नका बरे !!!! तुम्ही या सगळ्याकडे "मोदी स्वच्छता अभियान" म्हणून बघा आणि टाका दोनचार सेल्फी आणि बसा लाईक मोजत !!! हा का नाका . न केलेल्या स्वच्चतेचे कवतीक होतयं तुम्ही तर खरेच केलीय.
प्वांईटाचा मुद्दा फक्त शेवटची ओळ : गोर्यांची गुलामी/धार्जीणगिरी याबद्दल काही ठोस आणि टिकाऊ लिहा.
तळटीप अवांतर : मोदींचे नाव आल्याने धागा पन्नाशीकडे वेगाने धावेल.
  • Log in or register to post comments

तळटीपेबद्दल :

आनंदी गोपाळ
Tue, 07/28/2015 - 09:58 नवीन
पूर्वी शंभरी गाठायचा म्हणे? आजकाल पन्नाशीकडे ओहोटी लागल्येय की काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

आमच्याकडे हेच. ओफिस( लॅब

कंजूस
Tue, 07/28/2015 - 10:48 नवीन
आमच्याकडे हेच. ओफिस( लॅब )मध्ये खिडकीतून कावळे यायचे केमिकलच्या बॅाटल्सवर बसून पाडायचे. वरती गच्चीवर जाऊन मी वरून दोय्रा सोडून काठ्या बांधल्या आडव्या (रेल्वे वाले बांधतात तसे ). त्याला काव ळे घाबरायचे.परंतू इकडे ओरड झाली mad bugger,mad chap .काही दिवसांनी एक जर्मन साहेबाने केवळ तिकडून ओझरते जातांना काठ्या पाहून रिमार्क मारला "crows ? goot! . मग काय उदो उदो .he appreciated it very much वगैरे.
  • Log in or register to post comments

पूर्वी केलाय कुणी असा अभ्यास?

काळा पहाड
Tue, 07/28/2015 - 12:46 नवीन
पूर्वी केलाय कुणी असा अभ्यास?? नाही?? मग गोरे काय वेडे आहेत का? त्यांच्या डोक्यात नक्कीच आलं असेल. असा रिसर्च नाही ना झाला पूर्वी? मग होतंच नसेल...methodology मध्ये काहीतरी प्रोब्लेम असणार. तू असं कर, ४-५ सिमिलर रिसर्च शोध. आणि carry out is as it is.
म्हाद्या साहेब, आम्हाला या गोष्टीचा विषाद वाटतंच नाही. विषाद या गोष्टीचा वाटतो की या हरामखोर सरकारी नोकर, युनिव्हर्सिटी प्राध्यापक वगैरे वाल्यांना (मिपावरच्यांनी स्वतःला वगळावे) सिक्स्थ आणि सेवंथ पे कमिशन हवं असतं. लायकी नसताना जास्त पगार हवा असतो. आणि वर वार्षिक सुट्ट्या पण हव्या असतात. या साठी सगळ्याच गोष्टींचं खाजगीकरण करणं गरजेचं आहे. मग तुमच्या त्या संचालकाला बॉस अशा लाथा घालेल की बस्स. म्हणजे अशा निरुत्साही खोंडांना नोकरीवर ठेवलं तरचं सांगतोय.
  • Log in or register to post comments

निरुत्साही नाहीत, पण असे आहेत न की...

आगाऊ म्हादया......
Tue, 07/28/2015 - 20:12 नवीन
खरय..खाजगीकरण कदाचित उपाय चांगला असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

चाटूगिरी ! युगानुयुगे चालत

वेल्लाभट
Tue, 07/28/2015 - 13:54 नवीन
चाटूगिरी ! युगानुयुगे चालत आलेली प्रंप्रा.
  • Log in or register to post comments

आपल्याकडे गोरेपणा आणि सौंदर्य

पद्मावति
Tue, 07/28/2015 - 15:05 नवीन
आपल्याकडे गोरेपणा आणि सौंदर्य हे दोन समानार्थी शब्द असल्यासारखे बरेच वेळी वापरल्या जातात. मग तो गोरा रंग परदेशी असेल तर त्याची इंटेन्सीटी जरा जास्तं वाढते इतकंच.
  • Log in or register to post comments

ते जरा

इरसाल
Tue, 07/28/2015 - 16:56 नवीन
यमीपेक्षा दहापट गोरी र्‍हायलयं, अ‍ॅडवा ना प्लीज !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति

कोण यमी ? असा प्रतिसाद नाही

उगा काहितरीच
Tue, 07/28/2015 - 17:22 नवीन
कोण यमी ? असा प्रतिसाद नाही दिला कुणी म्हणजे झालं !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

थोडी दुरुस्ती.

पद्मावति
Tue, 07/28/2015 - 15:25 नवीन
या लेखातील घटनेच्या संदर्भात मधे गोरेपणा आणि सौंदर्य यापेक्षा गोरेपणा आणि superiority हे अधीक योग्य वाटतय.
  • Log in or register to post comments

खरं आहे

वेल्लाभट
Tue, 07/28/2015 - 16:02 नवीन
खरं आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति

होय

आगाऊ म्हादया......
Tue, 07/28/2015 - 20:13 नवीन
होय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति

परदेसी आणि गोर्या बाईंचे

विवेकपटाईत
Tue, 07/28/2015 - 20:19 नवीन
परदेसी आणि गोर्या बाईंचे गुलाम होण्यात हि धन्यता असते.
  • Log in or register to post comments

हे असच आणखी बर्‍याच प्रसंगात

मनीषा
Tue, 07/28/2015 - 22:06 नवीन
हे असच आणखी बर्‍याच प्रसंगात म्हणता येईल ... पण मग आपल्या संस्कृतीच काय ? असा विचार करून गप्पं बसावे लागते.
  • Log in or register to post comments

मिपा बेष्ट

आगाऊ म्हादया......
Fri, 07/31/2015 - 20:49 नवीन
एकुणात मिपावर माझ्या भावना अगदी तंतोतंत पोहोचल्या. थोबाडपुस्तकावर मात्र एक धडा शिकायला मिळाला. शब्दातून भावना पोहोचतीलही, भूमिका नाही पोहोचू शकत.
  • Log in or register to post comments

कार्व्हर ने शोध लावलेच नाहीत.

द-बाहुबली
Sat, 08/01/2015 - 13:00 नवीन
कार्व्हर ने शोध लावलेच नाहीत. आपल्याकडील गोर्या कातडीचं आकर्षण संपत नाहीच.
=)) =)) =)) कडक. :)
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

आगाऊ म्हादया......
Tue, 08/04/2015 - 11:59 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा