कोकणी माणसांच्या मनातील भूते.
भूते ही दोन प्रकाराची असतात.१ ञास देणारी २ञास न देणारी.ही भूते जंगले ,स्मशान,रानमाळ, भरड अशा ठीकाणी वातव्य करतात.
आज कोकणी मनातील भूते व त्यांचे प्रकार जाणून घेऊ.
कोकणात १७ प्रकाराची भूते पहावयास मिळतात.
१वेताळ २ब्रम्हग्रह ३ समंध ४देवचार ५ मुंजा ६ खवीस
७ गि-हा ८ चेटकीन ९ झोटिंग १० वीर ११ वायंग्या
१२ म्हसोबा १३ जखिन १४ लावसट १५ हडळ १६ भानामति १७ चकवा.
१ वेताळ: कोकणात वेताळाला भूतांचा राजा म्हणतात
कोकणातील पिशाच्छ हे वेताळाच्या आधीन असतात.जो अंगातून भूत काढणा-याच्या देहात प्रवेश करतो. व त्याच्या कडून इतर ञास दायक भूतांना पाळवून लावतो.
२ ब्रम्हग्रह / ब्रह्मराक्षस : हे भूत ब्राम्हणाचे मानले जाते.जो वेदात निपून आहे.पण ज्याला त्याच्या बुध्दीचा गर्व झाला. व त्यातच त्याचा अंत झाला.
३ समंध: ज्याची इच्छा पूर्ण न होता जो मरतो तो समंध होतो.
हे भूत प्रमुख्यने गावाच्या वेशीवर जूनाट झाड किंव्हा तीठा अशा ठिकाणी पकडते.हे एक संतान नसलेला (र्निवंशी )
ज्याचे कोणी काही कार्य केलेले नसते.त्यापैकी असते. कोकणात सर्वात ताकदवान भूत मानले जाते. ह्याला जर कोणी देवथ्यानाच्या आड मार्गे केला तर देवथ्यान देखिल पुढे येत नाही.
४ देवचार : हे मागास वर्गीयांचे भूत आहे. जो लग्नांनंतर थोड्याच दिवसांत मरतो.ही भूते गावाच्या चारही बाजूला असतात.कोकणात ह्यांना डावे अंग म्हटले जाते.कोकणी माणसांच्या गा-हाण्यांत यांचा प्रामुख्यने उल्लेख होतो.
ह्याची सहान भूती मिळवण्यासाठी दरवर्षी याला नारळ, साखर,कोंबडा द्यावा लागतो.
५ मुंजा: हे ब्राह्मणां पैकी भूत असते.जो ब्राह्मण मुलगा मुंज झाल्यानंतर सोड मुंज होण्याआधीच मरतो. हे त्याचे भूत असते.ह्याचे मुख्य थ्यान हे पिंपळाच्या झाडावर तसेच विहीरीवर असते. हे लोकांना छळत नाही पण घाबरवण्याचे काम करते.
६ खविस: हा प्रकार मुस्लिमांन मध्ये मोडतो.हे फार ञास दायक भूत असते.ज्याला अतिषय क्रुर रीत्या मारले जाते.तो मेल्यानंतर खविस होतो असा समज आहे.
७ गिर्या / गिर्हा - जो माणूस बूडून मेला किंव्हा ज्याचा खून झाला हे त्याचे भूत आहे.हे भूत पाण्याच्या आस-याला रहाते.हे फार ञास दायक असे भूत आहे.राञीच्या प्रहरात कोणी नदीपार खाडीपार करताना ह्याच्या तावडीत गावला तर ते त्याला खोल ठीकाणी घेऊन जाते. कोकणात राञीच्या वेळी जे कुर्ले ,मुळे पकडायला जातात त्यांना हमखास ह्या भूतांचा अनूभव आला असेल.
कोकणात असे सांगीतले जाते की जो कोणी या भूताचा केस मिळवू शकला तर हा भूत त्याचा गुलाम बनतो.त्याला हवे ते आणून देतो.पण तो केस त्याला पुंन्हा मिळाला तर तो त्या मानसावर सर्व त-हेची संकटे आणून सोडतो.
८ चेटकीन : हे मागासवर्गीयांचे भूत असते.याला कोकणात डाव असेही संबोधले जाते.
९ झोटिंग: हे भूत खारवी किंवा कोळी समाजातील भूतांन मध्ये गणले जाते.
१० विर : हे भूत क्षत्रीय समाजा च्या व्यकीचे असते. जो लग्न न होता मरण पावतो.याला निमा असेही म्हटले जाते.
11: लावसट - ओली बाळंतीण मरण पावल्यास तिचे रुपांतर मृत्यूनंतर लावसट मध्ये होते .
12: खुन्या - हे अतिशय क्रूर भूत असून हरिजन समाजातील असते
13: बायंगी - हे भूत विकत घेता येते. रत्नागिरी लांजा गोळवशी किम्वा मालवण चौक येथे सुमारे 10000/- रुपये खर्च केल्यास विकत मिळते .मालकाची भरभराट करुन शत्रूना त्रास देते
14 : चकवा - हे रात्री बेरात्री जंगलात किंवा पायवाटेने जाणार्या लोकांचा रस्ता चुकविते . सकाळ झाल्याशिवाय योग्य रस्ता सापडत नाही ....
संग्राहित / संपादित *
प्रतिक्रिया
8 May 2015 - 2:25 pm | सूड
>>हा तुमचा समज आहे . चालु दे तुमचे निरर्थक अत्मरंजन !
जिल्बीपीठीय व्याकरणदृष्ट्या हे वाक्य चुकीचं आहे. योग्य वाक्य येणेप्रमाणे:
>>हातु मचास मज आहे . चा लुदेतु मचेनि रर्थक अत्म रंजन !
8 May 2015 - 12:56 am | बॅटमॅन
बाकी कर्नाटकचा समुद्रकिनारा आणि केरळ हे भागही भौगोलिकदृष्ट्या आपल्या कोकणाशी तसे बरेच सिमिलर आहेत. तिकडेही अशाच भूतकथा असतात का, हे पाहिले पाहिजे. म्हणजे महाराष्ट्रात कसे, कोकणी भूतकथा विशेष फेमस आहेत तसे कर्नाटकातही त्याच भागातली भुते फेमस आहेत की विजापूरकडची की धारवाडकडची की म्हैसूरबेंगलोरकडची हे पाहिले पाहिजे.
8 May 2015 - 1:19 pm | वेल्लाभट
साला तिथली माणसं काय कमी भुतासारखी दिसतात?
एक किस्सा आठवला. कामानिमित्त मदुराई ला गेलो होतो. रात्री दहाची वेळ. मिनरल वॉटर आणायला हॉटेलच्या खाली उतरलो. अरुंद अशा त्या रस्त्यावरून एका बाजूने डक्कटकर डक्कटकर डक्कटकर असे ढोलकीचे आवाज आले. बघतो तर एक पन्नास एक लोकांचा जमाव धावत येत होता. सगळ्यात पुढे एक बाई होती. केस मोकळे कुंकू पसरलेलं भयंकर अवतार. तिच्यामागे एक जण ढोलकी वाजवत धावतोय. ती ढोलकी टिपिकल तिथली होती... त्या वाद्याला अजून काही म्हणत असतील तर ठाऊक नाही. आणि मागे बाकी जमाव. मधूनच विचित्र आवाजात ती बाई किंचाळत होती. अंगात आलं होतं बहुदा. मी शिस्तीत एका बंद दुकानाच्या इथे सावधान उभा राहिलो. म्हटलं साला आली रोखाने धावत तर लफडाच नको. तो सगळा लवाजमा गेला आणि पुन्हा ती अरुंद गल्ली सुन्न झाली. अजूनच सुन्न वाटायला लागली ती तेंव्हा.
8 May 2015 - 1:57 pm | स्पा
=))
8 May 2015 - 3:38 pm | बॅटमॅन
अंमळ रेसिस्ट प्रतिसाद.
11 May 2015 - 10:19 am | वेल्लाभट
भुतांच्या 'जातीं'बद्दल माहिती आहे.
प्रतिसाद रेसिस्टच होणार.
8 May 2015 - 12:19 pm | अमित मुंबईचा
फ्लिपकार्ट आणि आमज़ॉन वाले अजुन यांच्यापर्यंत पोहोचले कसे नाहीत.
8 May 2015 - 3:16 pm | काळा पहाड
एक सांगाल का? मागासवर्गीय ओली बाळंतीण मरण पावल्यास तिचे रुपांतर मृत्यूनंतर चेटकीन मधे होईल की लावसट मधे होईल?
8 May 2015 - 3:21 pm | सूड
ते आता तिलाच विचारावं लागेल!! दुसरं कोण सांगणार, नै का?
8 May 2015 - 3:39 pm | आदूबाळ
या भुताखेतांचा (सिरियस) ज्ञानकोश वगैरे आहे का? (गजाणण बुक डेपोवाला नाही. खरंच सिरियस.)
7 Jun 2015 - 11:20 am | खटपट्या
"कोकणातल्या गावर्हाटी" असे एक पुस्तक आहे ते वाचा. त्यात सर्व भुतखेत तसेच गावातल्या देवतांच्या व्याख्या दीलेल्या आहेत. घाडीगावकर का कोणीतरी लेखक आहेत. मी बरेच वर्षापुर्वी घेतले होते हे पुस्तक. शोधतोय. मिळाले की येथे फोटो डकवतो.
10 May 2015 - 12:05 am | एक एकटा एकटाच
हा भुताकटीचा धागा
आताच whatsapp वर रिसीव्ह झाला.
पण दुर्दैवाने खाली लेखकाच नाव नाहीय.
हां कुठल्या भुताटकीचा प्रकार समजायचा????
11 May 2015 - 1:22 pm | बाळ सप्रे
व्हॉटसॅपवरुन इथे आला असेल हीदेखिल शक्यता आहे !!