Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मंदार कात्रे on Wed, 05/06/2015 - 17:40
कोकणी माणसांच्या मनातील भूते. भूते ही दोन प्रकाराची असतात.१ ञास देणारी २ञास न देणारी.ही भूते जंगले ,स्मशान,रानमाळ, भरड अशा ठीकाणी वातव्य करतात. आज कोकणी मनातील भूते व त्यांचे प्रकार जाणून घेऊ. कोकणात १७ प्रकाराची भूते पहावयास मिळतात. १वेताळ २ब्रम्हग्रह ३ समंध ४देवचार ५ मुंजा ६ खवीस ७ गि-हा ८ चेटकीन ९ झोटिंग १० वीर ११ वायंग्या १२ म्हसोबा १३ जखिन १४ लावसट १५ हडळ १६ भानामति १७ चकवा. १ वेताळ: कोकणात वेताळाला भूतांचा राजा म्हणतात कोकणातील पिशाच्छ हे वेताळाच्या आधीन असतात.जो अंगातून भूत काढणा-याच्या देहात प्रवेश करतो. व त्याच्या कडून इतर ञास दायक भूतांना पाळवून लावतो. २ ब्रम्हग्रह / ब्रह्मराक्षस : हे भूत ब्राम्हणाचे मानले जाते.जो वेदात निपून आहे.पण ज्याला त्याच्या बुध्दीचा गर्व झाला. व त्यातच त्याचा अंत झाला. ३ समंध: ज्याची इच्छा पूर्ण न होता जो मरतो तो समंध होतो. हे भूत प्रमुख्यने गावाच्या वेशीवर जूनाट झाड किंव्हा तीठा अशा ठिकाणी पकडते.हे एक संतान नसलेला (र्निवंशी ) ज्याचे कोणी काही कार्य केलेले नसते.त्यापैकी असते. कोकणात सर्वात ताकदवान भूत मानले जाते. ह्याला जर कोणी देवथ्यानाच्या आड मार्गे केला तर देवथ्यान देखिल पुढे येत नाही. ४ देवचार : हे मागास वर्गीयांचे भूत आहे. जो लग्नांनंतर थोड्याच दिवसांत मरतो.ही भूते गावाच्या चारही बाजूला असतात.कोकणात ह्यांना डावे अंग म्हटले जाते.कोकणी माणसांच्या गा-हाण्यांत यांचा प्रामुख्यने उल्लेख होतो. ह्याची सहान भूती मिळवण्यासाठी दरवर्षी याला नारळ, साखर,कोंबडा द्यावा लागतो. ५ मुंजा: हे ब्राह्मणां पैकी भूत असते.जो ब्राह्मण मुलगा मुंज झाल्यानंतर सोड मुंज होण्याआधीच मरतो. हे त्याचे भूत असते.ह्याचे मुख्य थ्यान हे पिंपळाच्या झाडावर तसेच विहीरीवर असते. हे लोकांना छळत नाही पण घाबरवण्याचे काम करते. ६ खविस: हा प्रकार मुस्लिमांन मध्ये मोडतो.हे फार ञास दायक भूत असते.ज्याला अतिषय क्रुर रीत्या मारले जाते.तो मेल्यानंतर खविस होतो असा समज आहे. ७ गिर्या / गिर्हा - जो माणूस बूडून मेला किंव्हा ज्याचा खून झाला हे त्याचे भूत आहे.हे भूत पाण्याच्या आस-याला रहाते.हे फार ञास दायक असे भूत आहे.राञीच्या प्रहरात कोणी नदीपार खाडीपार करताना ह्याच्या तावडीत गावला तर ते त्याला खोल ठीकाणी घेऊन जाते. कोकणात राञीच्या वेळी जे कुर्ले ,मुळे पकडायला जातात त्यांना हमखास ह्या भूतांचा अनूभव आला असेल. कोकणात असे सांगीतले जाते की जो कोणी या भूताचा केस मिळवू शकला तर हा भूत त्याचा गुलाम बनतो.त्याला हवे ते आणून देतो.पण तो केस त्याला पुंन्हा मिळाला तर तो त्या मानसावर सर्व त-हेची संकटे आणून सोडतो. ८ चेटकीन : हे मागासवर्गीयांचे भूत असते.याला कोकणात डाव असेही संबोधले जाते. ९ झोटिंग: हे भूत खारवी किंवा कोळी समाजातील भूतांन मध्ये गणले जाते. १० विर : हे भूत क्षत्रीय समाजा च्या व्यकीचे असते. जो लग्न न होता मरण पावतो.याला निमा असेही म्हटले जाते. 11: लावसट - ओली बाळंतीण मरण पावल्यास तिचे रुपांतर मृत्यूनंतर लावसट मध्ये होते . 12: खुन्या - हे अतिशय क्रूर भूत असून हरिजन समाजातील असते 13: बायंगी - हे भूत विकत घेता येते. रत्नागिरी लांजा गोळवशी किम्वा मालवण चौक येथे सुमारे 10000/- रुपये खर्च केल्यास विकत मिळते .मालकाची भरभराट करुन शत्रूना त्रास देते 14 : चकवा - हे रात्री बेरात्री जंगलात किंवा पायवाटेने जाणार्या लोकांचा रस्ता चुकविते . सकाळ झाल्याशिवाय योग्य रस्ता सापडत नाही .... संग्राहित / संपादित *
  • Log in or register to post comments
  • 75724 views

प्रतिक्रिया

Submitted by उगा काहितरीच on Wed, 05/06/2015 - 23:48

In reply to आता राडा होणार! by अत्रुप्त आत्मा

Permalink

बाबौ ! पळून जाऊ का मग मी

बाबौ ! पळून जाऊ का मग मी गुरुजी ?
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Wed, 05/06/2015 - 23:59

In reply to बाबौ ! पळून जाऊ का मग मी by उगा काहितरीच

Permalink

नक्को! :-/

नक्को! :-/
  • Log in or register to post comments

Submitted by उगा काहितरीच on गुरुवार, 05/07/2015 - 08:24

In reply to बाबौ ! पळून जाऊ का मग मी by उगा काहितरीच

Permalink

अंदाज चुकला की तुमचा गुरुजी !

अंदाज चुकला की तुमचा गुरुजी ! काहीच तर राडा झाला नाही की.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 05/07/2015 - 16:47

In reply to अंदाज चुकला की तुमचा गुरुजी ! by उगा काहितरीच

Permalink

तो मी प्रतिसादातून आधीच काढुन

तो मी प्रतिसादातून आधीच काढुन नै का घेतला? ;) अच्च काय ते? :D
  • Log in or register to post comments

Submitted by रामपुरी on गुरुवार, 05/07/2015 - 02:33

Permalink

ऐला.. लै भारी.. घाऊक मध्ये

ऐला.. लै भारी.. घाऊक मध्ये भुतं विकत घेतली तर डिस्काऊंट मिळेल काय? थोडी तिकडे सीरीयात सोडीन म्हणतो. एक णाडी केंद्रात पण सोडायचंय. थांबा, आता लिष्टच करायला घेतो. ते डिस्काऊंटचं तेवढं बघा हां.. अंमळ जास्तच भूतं लागतील.
  • Log in or register to post comments

Submitted by चुकलामाकला on गुरुवार, 05/07/2015 - 07:58

Permalink

संकलन जबरी!

संकलन जबरी!
  • Log in or register to post comments

Submitted by चुकलामाकला on गुरुवार, 05/07/2015 - 08:06

Permalink

रच्याकने

विं दा करंदिकरांची, किर्र रात्री,सुन्न रानी ..... अशी भुतांवरची सुंदर कविता आहे, वर्षा भावे यांची चपखल चाल आहे, जरूर ऐका.
  • Log in or register to post comments

Submitted by कहर on गुरुवार, 05/07/2015 - 16:03

In reply to रच्याकने by चुकलामाकला

Permalink

'पिशी मावशीची भुतावळ'पण छान

'पिशी मावशीची भुतावळ'पण छान आहे
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Mon, 05/11/2015 - 11:20

In reply to रच्याकने by चुकलामाकला

Permalink

@ चुकलामाकला...

http://www.transliteral.org/pages/z71226074737/view
  • Log in or register to post comments

Submitted by चुकलामाकला on Sat, 06/06/2015 - 17:56

In reply to @ चुकलामाकला... by मुक्त विहारि

Permalink

हीच कविता! धन्यवाद!

हीच कविता! धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on गुरुवार, 05/07/2015 - 08:17

Permalink

लै भारी

भुतांविषयी इतकी वैविध्यपूर्ण माहिती प्रथमच वाचण्यास मिळाली :-) .
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on गुरुवार, 05/07/2015 - 08:41

Permalink

लहानपणी वारंवार कानावर पडणार्

लहानपणी वारंवार कानावर पडणार्‍या "गिर्याला गवसला" या शब्दप्रयोगाचा नेमका अर्थ आता कळला.
संग्राहित / संपादित *
हे लेख प्रकाशित करण्यासाठी योग्य जागा मला माहिती आहे. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by योगी९०० on गुरुवार, 05/07/2015 - 08:47

Permalink

हा हा..

खूप छान माहिती... भूतयोनीत सुद्धा मंडल आयोग लागू असावा असे उगाच वाटले. एका जातीच्या भूताने दुसर्‍या जातीच्या माणसाला त्रास दिला तर त्यांच्यात सुद्धा आपापसात जुंपत असावी. बाकी माझ्या जाती/धर्माची भूते माझे रक्षण करत असतील का हो? बादवे झोटींग, आग्यावेताळ हे काय असते? मा.बो. वर अमानवीय असा धागा आहे. त्यात बर्‍याच जणांच्या खर्‍याखुर्‍या अनुभवावर चर्चा आहे. त्यात बायंगीवर सुद्धा एक चर्चा आहे. या भुताला म्हणे कायम काही नेवेद्द्य द्यावा लागतो. आणि जर तुमच्या कडून आगळीक झाली तर तर हे भूत त्याने तुम्हाला जे दिले त्याच्या दसपट वसूल करून अक्षरशः तुम्हाला रस्तावर आणतो...असे लिहीले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on गुरुवार, 05/07/2015 - 11:01

In reply to हा हा.. by योगी९००

Permalink

माबोची लिंक मिळेल काय?

माबोची लिंक मिळेल काय?
  • Log in or register to post comments

Submitted by योगी९०० on Tue, 05/26/2015 - 17:02

In reply to माबोची लिंक मिळेल काय? by टवाळ कार्टा

Permalink

ही घ्या...

http://www.maayboli.com/node/49229
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देर्देकर on गुरुवार, 05/07/2015 - 08:49

Permalink

ज्या ने धागा टाकला तो मंका

ज्या ने धागा टाकला तो मंका बहुतेक उरलेल्या तीन १५) हडळ १६ भानामति १७ चकवा यांच्या तावडीत सापडला असावा. कारण धागा टाकुन तो गायबलाय.Image removed. आणि उका लेडिज भुत वेगळं कशाला पाहिजे ते पुण्याला असं रुमाल बांधुन Image removed. आजुबाजुला वावरत असतातच की तुम्ही सावध असा फक्त.
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on गुरुवार, 05/07/2015 - 08:54

In reply to ज्या ने धागा टाकला तो मंका by प्रमोद देर्देकर

Permalink

पुण्यातील लेडीज भूतांचा तुमचा

पुण्यातील लेडीज भूतांचा तुमचा सखोल अभ्यास दिसतो.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देर्देकर on गुरुवार, 05/07/2015 - 09:37

In reply to पुण्यातील लेडीज भूतांचा तुमचा by सतिश गावडे

Permalink

कस चं कस चं आम्ही आलो होतो

कस चं कस चं आम्ही आलो होतो तेव्हा काही मांत्रिक आमच्या अवतीभवती होते. त्यामुळे ती भुते आमच्या पासुन १० हात दुर वावरत होती. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by मंदार कात्रे on गुरुवार, 05/07/2015 - 09:45

In reply to ज्या ने धागा टाकला तो मंका by प्रमोद देर्देकर

Permalink

:)

:)
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on गुरुवार, 05/07/2015 - 08:56

Permalink

मंदार काञे

मंदार काञे, तुम्हाला तुमचा आयडी नीट लिहिता येतोय, म्हणजे हे ढकलपत्रातून आलेले समजून याच्यावर भानामती करू काय? म्हसोबा, हडळ आणि भानामती यांच्याबद्दल दुसर्‍या मेसेजमधे आले होते का? तो मेसेज पण पेस्ट करायचा त्रास घ्या जरा!
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on गुरुवार, 05/07/2015 - 09:08

In reply to मंदार काञे by पैसा

Permalink

तुम्ही भानामती वगैरे करता?

तुम्ही भानामती वगैरे करता?
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on गुरुवार, 05/07/2015 - 09:11

In reply to तुम्ही भानामती वगैरे करता? by सतिश गावडे

Permalink

हो ना

मिपावरच्या भुतांसाठी लै जालीम भानामती माहिती आहे. आणि भुताटकी उतरवणारा मांत्रिक पण!
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on गुरुवार, 05/07/2015 - 09:16

In reply to हो ना by पैसा

Permalink

ओ हो...

म्हणजे मिपावरची उपद्रवी भूते जेव्हा गायब होतात तेव्हा त्यांना मांत्रिकाकरवी बाटलीत भरले जाते तर.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on गुरुवार, 05/07/2015 - 09:17

In reply to ओ हो... by सतिश गावडे

Permalink

कसं बोल्लास!

कसं बोल्लास!
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on गुरुवार, 05/07/2015 - 09:18

In reply to कसं बोल्लास! by पैसा

Permalink

चलो इस बातपे (पुण्यात) एक चाय

चलो इस बातपे (पुण्यात) एक चाय हो जाय. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on गुरुवार, 05/07/2015 - 09:21

In reply to चलो इस बातपे (पुण्यात) एक चाय by सतिश गावडे

Permalink

कोण पाजणार? पुणेकार की

कोण पाजणार? पुणेकार की गोयंकार? =))
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on गुरुवार, 05/07/2015 - 09:31

In reply to कोण पाजणार? पुणेकार की by यशोधरा

Permalink

उत्तर तुम्ही स्वतःला पुणेकर

उत्तर तुम्ही स्वतःला पुणेकर समजता की कोकणी यावर अवलंबून आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on गुरुवार, 05/07/2015 - 09:47

In reply to उत्तर तुम्ही स्वतःला पुणेकर by सतिश गावडे

Permalink

आम्ही स्वत:ला मिपाकर समजतो.

आम्ही स्वत:ला मिपाकर समजतो.
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on गुरुवार, 05/07/2015 - 12:22

In reply to आम्ही स्वत:ला मिपाकर समजतो. by यशोधरा

Permalink

अरे वा. छान. आता मिपाकर या

अरे वा. छान. आता मिपाकर या नात्याने तुम्हीच चहा पाजा.
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on गुरुवार, 05/07/2015 - 12:26

In reply to अरे वा. छान. आता मिपाकर या by सतिश गावडे

Permalink

भेटा, चहा पाजण्यात यील.

भेटा, चहा पाजण्यात यील.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on गुरुवार, 05/07/2015 - 12:27

In reply to भेटा, चहा पाजण्यात यील. by यशोधरा

Permalink

मला पण.

मला पण.
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on गुरुवार, 05/07/2015 - 12:29

In reply to मला पण. by प्रचेतस

Permalink

भेटत तर नाय, आणि मलापण काय! =

भेटत तर नाय, आणि मलापण काय! =)) तुम्हीपण भेटा.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on गुरुवार, 05/07/2015 - 12:31

In reply to भेटत तर नाय, आणि मलापण काय! = by यशोधरा

Permalink

चला अक्षरधारा किंवा साधनला.

चला अक्षरधारा किंवा साधनाला. पुस्तके पण घेऊ.
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on गुरुवार, 05/07/2015 - 12:43

In reply to चला अक्षरधारा किंवा साधनला. by प्रचेतस

Permalink

हो चला. मृत्यूंजयाला पण सांगा

हो चला. मृत्यूंजयाला पण सांगा.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on गुरुवार, 05/07/2015 - 12:52

In reply to हो चला. मृत्यूंजयाला पण सांगा by यशोधरा

Permalink

हो. तो पण येईल.

हो. तो पण येईल.
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on गुरुवार, 05/07/2015 - 15:39

In reply to हो. तो पण येईल. by प्रचेतस

Permalink

मी तयार बसलो आहे. कधी जायचे

मी तयार बसलो आहे. कधी जायचे ते सांगा
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on गुरुवार, 05/07/2015 - 15:56

In reply to मी तयार बसलो आहे. कधी जायचे by मृत्युन्जय

Permalink

१६ मे, शनिवार संध्याकाळी ६

१६ मे, शनिवार संध्याकाळी ६ अक्षरधारा?
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on गुरुवार, 05/07/2015 - 16:31

In reply to १६ मे, शनिवार संध्याकाळी ६ by प्रचेतस

Permalink

अरे ए

माझ्या नावाने एक पुस्तक काढून ठेवा, नायतर तुमची सगळी पुस्तके लोक उधारीवर घेऊन जातील असा शाप देईन.
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on गुरुवार, 05/07/2015 - 22:37

In reply to अरे ए by पैसा

Permalink

नायतर तुमची सगळी पुस्तके लोक

नायतर तुमची सगळी पुस्तके लोक उधारीवर घेऊन जातील असा शाप देईन.
"आणि परत करणार नाहीत" हा महत्वाचा क्लॉज राहिला की शापामध्ये. लोकांनी पुस्तके परत केली तर काय उपयोग त्या शापाचा?
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on गुरुवार, 05/07/2015 - 22:40

In reply to नायतर तुमची सगळी पुस्तके लोक by सतिश गावडे

Permalink

होय!

खरंच की! तो पुरवणी शाप!
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on गुरुवार, 05/07/2015 - 22:42

In reply to नायतर तुमची सगळी पुस्तके लोक by सतिश गावडे

Permalink

"आणि परत करणार नाहीत" हा

"आणि परत करणार नाहीत" हा महत्वाचा क्लॉज राहिला की शापामध्ये. लोकांनी पुस्तके परत केली तर काय उपयोग त्या शापाचा?
आपली पुस्तके पुण्यातलेच लोक नेण्याची शक्यता जास्त असल्या कारणाने ते परत करणार नाहीतच हे गृहीत धरलं असावं त्यांनी!! आणि मेलेल्याला आणखी का मारा म्हणून क्लॉज मुद्दाम वगळला असेल.
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on गुरुवार, 05/07/2015 - 23:50

In reply to "आणि परत करणार नाहीत" हा by सूड

Permalink

तुम्ही पुण्यातले की

तुम्ही पुण्यातले की पुण्यातल्या लोकांचा "अनुभव" असलेले?
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on गुरुवार, 05/07/2015 - 23:48

In reply to अरे ए by पैसा

Permalink

कोण घेऊन जाईल? सरळ देत नाही

कोण घेऊन जाईल? सरळ देत नाही जा असं सांगू की आम्ही. पुणेरी स्पष्टवक्तेपणा कधी कामी यायचा? =))
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on गुरुवार, 05/07/2015 - 23:53

In reply to कोण घेऊन जाईल? सरळ देत नाही by यशोधरा

Permalink

ओ तै, सकाळी तुम्ही पुणेकर की

ओ तै, सकाळी तुम्ही पुणेकर की कोकणी असे विचारल्यावर "आम्ही मिपाकर" असे सांगितलेत. आणि पुणेरी स्पष्टवक्तेपणा वापरण्याच्या गोष्टी करुन तुम्ही पुणेकर असल्याचे सिद्ध करताय. हे चिटिंग आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on गुरुवार, 05/07/2015 - 12:46

In reply to चला अक्षरधारा किंवा साधनला. by प्रचेतस

Permalink

तिथे तुम्हाला कट मिळतो अशी

तिथे तुम्हाला कट मिळतो अशी अफवा उठवावी म्हणतो ;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on गुरुवार, 05/07/2015 - 12:51

In reply to तिथे तुम्हाला कट मिळतो अशी by टवाळ कार्टा

Permalink

हाहा.

हाहा. पुस्तकांची दुकाने आमची अवडती ठिकाणे. अत्रे सभागृह पण लिस्टात अ‍ॅड कर.
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on गुरुवार, 05/07/2015 - 13:01

In reply to हाहा. by प्रचेतस

Permalink

मॅजेस्टीकचे गोडाऊन राहिले ;)

मॅजेस्टीकचे गोडाऊन राहिले ;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on गुरुवार, 05/07/2015 - 13:03

In reply to मॅजेस्टीकचे गोडाऊन राहिले ;) by यशोधरा

Permalink

व्हय. :)

व्हय. :)
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on गुरुवार, 05/07/2015 - 13:03

In reply to मॅजेस्टीकचे गोडाऊन राहिले ;) by यशोधरा

Permalink

गोग्गोड चर्चा

:D
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on गुरुवार, 05/07/2015 - 13:09

In reply to गोग्गोड चर्चा by स्पा

Permalink

ह्यात काय गोगोड अहे मेल्या?

ह्यात काय गोगोड अहे मेल्या?
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com