✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कोकणी भुते

म
मंदार कात्रे यांनी
Wed, 05/06/2015 - 17:40  ·  लेख
लेख
कोकणी माणसांच्या मनातील भूते. भूते ही दोन प्रकाराची असतात.१ ञास देणारी २ञास न देणारी.ही भूते जंगले ,स्मशान,रानमाळ, भरड अशा ठीकाणी वातव्य करतात. आज कोकणी मनातील भूते व त्यांचे प्रकार जाणून घेऊ. कोकणात १७ प्रकाराची भूते पहावयास मिळतात. १वेताळ २ब्रम्हग्रह ३ समंध ४देवचार ५ मुंजा ६ खवीस ७ गि-हा ८ चेटकीन ९ झोटिंग १० वीर ११ वायंग्या १२ म्हसोबा १३ जखिन १४ लावसट १५ हडळ १६ भानामति १७ चकवा. १ वेताळ: कोकणात वेताळाला भूतांचा राजा म्हणतात कोकणातील पिशाच्छ हे वेताळाच्या आधीन असतात.जो अंगातून भूत काढणा-याच्या देहात प्रवेश करतो. व त्याच्या कडून इतर ञास दायक भूतांना पाळवून लावतो. २ ब्रम्हग्रह / ब्रह्मराक्षस : हे भूत ब्राम्हणाचे मानले जाते.जो वेदात निपून आहे.पण ज्याला त्याच्या बुध्दीचा गर्व झाला. व त्यातच त्याचा अंत झाला. ३ समंध: ज्याची इच्छा पूर्ण न होता जो मरतो तो समंध होतो. हे भूत प्रमुख्यने गावाच्या वेशीवर जूनाट झाड किंव्हा तीठा अशा ठिकाणी पकडते.हे एक संतान नसलेला (र्निवंशी ) ज्याचे कोणी काही कार्य केलेले नसते.त्यापैकी असते. कोकणात सर्वात ताकदवान भूत मानले जाते. ह्याला जर कोणी देवथ्यानाच्या आड मार्गे केला तर देवथ्यान देखिल पुढे येत नाही. ४ देवचार : हे मागास वर्गीयांचे भूत आहे. जो लग्नांनंतर थोड्याच दिवसांत मरतो.ही भूते गावाच्या चारही बाजूला असतात.कोकणात ह्यांना डावे अंग म्हटले जाते.कोकणी माणसांच्या गा-हाण्यांत यांचा प्रामुख्यने उल्लेख होतो. ह्याची सहान भूती मिळवण्यासाठी दरवर्षी याला नारळ, साखर,कोंबडा द्यावा लागतो. ५ मुंजा: हे ब्राह्मणां पैकी भूत असते.जो ब्राह्मण मुलगा मुंज झाल्यानंतर सोड मुंज होण्याआधीच मरतो. हे त्याचे भूत असते.ह्याचे मुख्य थ्यान हे पिंपळाच्या झाडावर तसेच विहीरीवर असते. हे लोकांना छळत नाही पण घाबरवण्याचे काम करते. ६ खविस: हा प्रकार मुस्लिमांन मध्ये मोडतो.हे फार ञास दायक भूत असते.ज्याला अतिषय क्रुर रीत्या मारले जाते.तो मेल्यानंतर खविस होतो असा समज आहे. ७ गिर्या / गिर्हा - जो माणूस बूडून मेला किंव्हा ज्याचा खून झाला हे त्याचे भूत आहे.हे भूत पाण्याच्या आस-याला रहाते.हे फार ञास दायक असे भूत आहे.राञीच्या प्रहरात कोणी नदीपार खाडीपार करताना ह्याच्या तावडीत गावला तर ते त्याला खोल ठीकाणी घेऊन जाते. कोकणात राञीच्या वेळी जे कुर्ले ,मुळे पकडायला जातात त्यांना हमखास ह्या भूतांचा अनूभव आला असेल. कोकणात असे सांगीतले जाते की जो कोणी या भूताचा केस मिळवू शकला तर हा भूत त्याचा गुलाम बनतो.त्याला हवे ते आणून देतो.पण तो केस त्याला पुंन्हा मिळाला तर तो त्या मानसावर सर्व त-हेची संकटे आणून सोडतो. ८ चेटकीन : हे मागासवर्गीयांचे भूत असते.याला कोकणात डाव असेही संबोधले जाते. ९ झोटिंग: हे भूत खारवी किंवा कोळी समाजातील भूतांन मध्ये गणले जाते. १० विर : हे भूत क्षत्रीय समाजा च्या व्यकीचे असते. जो लग्न न होता मरण पावतो.याला निमा असेही म्हटले जाते. 11: लावसट - ओली बाळंतीण मरण पावल्यास तिचे रुपांतर मृत्यूनंतर लावसट मध्ये होते . 12: खुन्या - हे अतिशय क्रूर भूत असून हरिजन समाजातील असते 13: बायंगी - हे भूत विकत घेता येते. रत्नागिरी लांजा गोळवशी किम्वा मालवण चौक येथे सुमारे 10000/- रुपये खर्च केल्यास विकत मिळते .मालकाची भरभराट करुन शत्रूना त्रास देते 14 : चकवा - हे रात्री बेरात्री जंगलात किंवा पायवाटेने जाणार्या लोकांचा रस्ता चुकविते . सकाळ झाल्याशिवाय योग्य रस्ता सापडत नाही .... संग्राहित / संपादित *
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
75719 वाचन

💬 प्रतिसाद (163)

प्रतिक्रिया

13: बायंगी - हे भूत विकत घेता

टवाळ कार्टा
Wed, 05/06/2015 - 17:44 नवीन
13: बायंगी - हे भूत विकत घेता येते. रत्नागिरी लांजा गोळवशी किम्वा मालवण चौक येथे सुमारे 10000/- रुपये खर्च केल्यास विकत मिळते .मालकाची भरभराट करुन शत्रूना त्रास देते
फक्त १०००० हजारात?...होलसेल मध्ये आर्डर देउया का मिपाकरांसाठी ;) बाकी एक अतृप्त आत्मा इथेच आहे ;)
  • Log in or register to post comments

;)

मंदार कात्रे
Wed, 05/06/2015 - 17:46 नवीन
;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

@बाकी एक अतृप्त आत्मा इथेच

अत्रुप्त आत्मा
Wed, 05/06/2015 - 18:57 नवीन
@बाकी एक अतृप्त आत्मा इथेच आहे ;) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

तुमचा भुतांचा अभ्यास भारी आहे

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 05/06/2015 - 17:47 नवीन
तुमचा भुतांचा अभ्यास भारी आहे ! :) भुतांतही इतके वर्गीकरण आणि जातपात असेल असे वाटले नव्हते ;)
  • Log in or register to post comments

जखिन, हडळ, भानामति? त्यांचं

सूड
Wed, 05/06/2015 - 17:52 नवीन
जखिन, हडळ, भानामति? त्यांचं काय? बा द वे, चेटकीणीला डाव म्हणतात म्हणजे दिसायला बरी असते का?
  • Log in or register to post comments

ऑ..

योगी९००
गुरुवार, 05/07/2015 - 08:38 नवीन
बा द वे, चेटकीणीला डाव म्हणतात म्हणजे दिसायला बरी असते का? का हो? रातच्याला वाड्यावर बोलावून डाव टाकायचा विचार हाय काय? (पत्त्याचा डाव हो..)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

रातच्याला वाड्यावर बोलावून

टवाळ कार्टा
गुरुवार, 05/07/2015 - 10:58 नवीन
रातच्याला वाड्यावर बोलावून पत्ते खेळणार??? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

हो!! येतोस का तू पण? पाच-तीन

सूड
गुरुवार, 05/07/2015 - 14:14 नवीन
हो!! येतोस का तू पण? पाच-तीन-दोन खेळू या. आणखी कोणी आलं तर मेंढीकोट, चाराहून जास्ती असल्यास रम्मी खेळूया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

मी येतो ... पण जेवायचे पण बघ

गणेशा
गुरुवार, 05/07/2015 - 14:24 नवीन
मी येतो ... पण जेवायचे पण बघ हा.. नाहीतर डावा मध्ये उगा जेवन विसरायला नको..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

तू नको येऊस बाबा, खेळायला

सूड
गुरुवार, 05/07/2015 - 14:27 नवीन
तू नको येऊस बाबा, खेळायला बोलवतोय जेवायला नाही. =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

बदलापुर बुदुक ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 05/07/2015 - 21:30 नवीन
बदलापुर बुदुक ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

एक नंबर धागा!

आदूबाळ
Wed, 05/06/2015 - 17:53 नवीन
एक नंबर धागा!
  • Log in or register to post comments

त्रास = ञास हे आता ऑफिशियल

असंका
Wed, 05/06/2015 - 17:54 नवीन
त्रास = ञास हे आता ऑफिशियल आहे का?
  • Log in or register to post comments

१५. १६. १७. उडले का काञीत

असंका
Wed, 05/06/2015 - 17:58 नवीन
१५. १६. १७. उडले का काञीत सापडून?
  • Log in or register to post comments

मस्त लेख

एक एकटा एकटाच
Wed, 05/06/2015 - 18:00 नवीन
भुतांचा आभ्यास चांगलाय ह्या सगळ्या भुतांमध्ये एक महत्त्वाचे भुत राहिलं संशयाच भुत = हे फार लबाड भुत असते. ज्याच्या मानगुटीवर बसते त्याचे होत्याचे नव्हते करून टाकते. आणि सगळ करून सवरुन पछडलेल्याला देशोधडीला लावल्या शिवाय त्याला सोडत नाही
  • Log in or register to post comments

आयला भारीच!!!! देशावरचीही अशी

बॅटमॅन
Wed, 05/06/2015 - 18:27 नवीन
आयला भारीच!!!! देशावरचीही अशी लिष्ट करून पाहिली पाहिजे.
  • Log in or register to post comments

मुस्लीमांत असलेला "जिन" हा

कानडाऊ योगेशु
Wed, 05/06/2015 - 18:37 नवीन
मुस्लीमांत असलेला "जिन" हा प्रकार नक्की काय आहे? भूताचाच प्रकार असतो का हा? त्याच्याशी समांतर असा हिंदुधर्मीयातला प्रकार कोणता? म्हणजे हिंदू लोकांना "जिन" लागु शकतो का? लागलाच तर त्यानंतरचे जे खटाटोप करायचे ते मुसलमानी असतील का हिंदु? (घाबरट)योगेशु.
  • Log in or register to post comments

आपल्याकडं भूत म्हणजे टिपिकली

बॅटमॅन
Wed, 05/06/2015 - 18:43 नवीन
आपल्याकडं भूत म्हणजे टिपिकली मनुष्ययोनीतल्याच जीवाचे मरणोत्तर रूप. जिन म्हणजे अगोदरपासूनच अमानवी असलेले दुसरे जीव. यांना आपल्या भुतांप्रमाणेच सुपर पॉवर्स असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

मुस्लीमांत असलेला "जिन" हा

टवाळ कार्टा
Wed, 05/06/2015 - 18:56 नवीन
मुस्लीमांत असलेला "जिन" हा प्रकार नक्की काय आहे? भूताचाच प्रकार असतो का हा? त्याच्याशी समांतर असा हिंदुधर्मीयातला प्रकार कोणता? म्हणजे हिंदू लोकांना "जिन" लागु शकतो का? लागलाच तर त्यानंतरचे जे खटाटोप करायचे ते मुसलमानी असतील का हिंदु? (घाबरट)योगेशु.
बलबन का मकबरा वाचा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

काही "मुलभूत" प्रश्न !!!

माम्लेदारचा पन्खा
Wed, 05/06/2015 - 18:38 नवीन
१) भुतांच्या प्रतीप्रमाणे वर्गवारी करायची झाली तर ते काम कोण करू शकेल ? २) ही सगळी माहिती कोणी संकलित केली असेल ? ३) बायांग्या ह्या भुताचे दुकान नक्की कुठे आहे? त्याचे पैसे कुणाला द्यायचे? ते परत करायचे म्हणजे काय करायचे? त्याला साखळी घालून देतात का? ४) भूतयोनीतसुद्धा जाती असतील तर त्यांच्यात आणि आपल्यात वेगळेपणा काय आहे? तिथेही कुठली संस्था आहे का? ५) कोकणात भूतांना "टाईमपास" काय असतो? (टाईमपास २ नव्हे !!) ६) आशा राहिलेला माणूस भूत होतो तर मग भारतात 'आशाळभूतपणे' सगळीकडे पाहणाऱ्यांना काय म्हणावे? बाकी चालू द्या…. !!!!
  • Log in or register to post comments

हा हा..

योगी९००
गुरुवार, 05/07/2015 - 08:43 नवीन
जबरी प्रश्न...!! तर मग भारतात 'आशाळभूतपणे' सगळीकडे पाहणाऱ्यांना काय म्हणावे? ह्या प्रश्नातच उत्तर आहे. त्यांना आशाळभूत असे म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

LOL...

एस
Wed, 05/06/2015 - 18:38 नवीन
एकवेळ कोकणी भुतं परवडली, पण गोव्याची भुतं खूपच डेन्जरस असतात. सारखीसारखी चहा मागतात. (सर्व भुताखेतांनी क्रुपया ह. घे.) :-D
  • Log in or register to post comments

सारखंसारखं मिसळपाव मागणारी

सस्नेह
Wed, 05/06/2015 - 18:53 नवीन
सारखंसारखं मिसळपाव मागणारी भुतं कुठची बरं मग !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

चहा मागतात ती रत्नांग्री

सूड
Wed, 05/06/2015 - 19:44 नवीन
चहा मागतात ती रत्नांग्री-तळकोकणातली, हिते वर रायगडात आलात की दुदु दुदु मागणारी भुतं असतात. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

काय चालत नै हो!

पैसा
गुरुवार, 05/07/2015 - 08:52 नवीन
पुणेकर मांत्रिकांपुढे कोकणी भुतांनी सुद्धा हात टेकले!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

आपल्याकडे याचा का ही विदा आहे

मृत्युन्जय
Wed, 05/06/2015 - 18:43 नवीन
आपल्याकडे याचा का ही विदा आहे का?
  • Log in or register to post comments

अशाच प्रकारच काहितरी

होबासराव
Wed, 05/06/2015 - 19:00 नवीन
इतक्यात चेपु वर किंवा आणखी कुठेतरी वाचलय. शिर्षक बहुधा कोकणातील भुते कि काहिस होत. तिथे भुताचा पहिलाच प्रकार mention केला आहे तो cheda आहे. ति लिंक शोधायाला आताच आमच्या जिनि ला पाठवलेय :)
  • Log in or register to post comments

कोन त्यो आमच्याव धागा काढितो?

अत्रुप्त आत्मा
Wed, 05/06/2015 - 18:54 नवीन
कोन त्यो आमच्याव धागा काढितो??? Image removed.
  • Log in or register to post comments

१३वाले भूत किती जणांना पायजे

अजया
Wed, 05/06/2015 - 18:57 नवीन
१३वाले भूत किती जणांना पायजे ते पैसाताईला सांगा.तिच्या घराजवळ विकत मिळतंय बहुतेक.ती पयसे गोळा करायला जाणार आहे.घेऊन टाकेल सगळ्यांसाठी=))
  • Log in or register to post comments

मला पाहिजेत चार. फायदा झाला

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 05/06/2015 - 19:04 नवीन
मला पाहिजेत चार. फायदा झाला तर पैसाताईंना पैसे देउ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

८ चेटकीन : हे मागासवर्गीयांचे

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 05/06/2015 - 19:03 नवीन
८ चेटकीन : हे मागासवर्गीयांचे भूत असते.याला कोकणात डाव असेही संबोधले जाते.
डाव. ह्म्म!!!
  • Log in or register to post comments

ते

धर्मराजमुटके
Wed, 05/06/2015 - 19:33 नवीन
ते फिल्ममधे हिरो हिरोईन रोमांस करत असतात किंवा हिरोईन आंघोळ करताना मधेच येते त्या भूताला काय म्हणतात ? मेलं नीट एखादा चांगला सीन पुरे करु देईल तर शप्पथ.
  • Log in or register to post comments

सेन्सॉर बोर्ड

आदूबाळ
Wed, 05/06/2015 - 19:42 नवीन
सेन्सॉर बोर्ड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

=))

आनन्दिता
गुरुवार, 05/07/2015 - 08:58 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

ह्म्म

होबासराव
Wed, 05/06/2015 - 19:42 नवीन
रामसे ब्रदर्स च्या मुव्हीज चे फॅन दिसताय
  • Log in or register to post comments

रामसे ब्रदर्स

धर्मराजमुटके
Wed, 05/06/2015 - 19:50 नवीन
मोदिंनी सांगीतलेला 'मेक इन इंडिया' हा मंत्र अंमलात आणणारे ते एक आद्य उद्योजक होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव

रामसे बंधु कडे याच्यापेक्षा

जेपी
Wed, 05/06/2015 - 19:44 नवीन
रामसे बंधु कडे याच्यापेक्षा जास्त व्हरायटी मिळते.. आठवा zee horror show
  • Log in or register to post comments

मस्त आठवणींना उजळणी दिलीत.

एक एकटा एकटाच
Wed, 05/06/2015 - 22:06 नवीन
मस्त आठवणींना उजळणी दिलीत. मी शाळेत होतो तेव्हा. साला त्यातला "दस्तक" चा एपिसोड सॉल्लिडच होता. जाम फ़ाफ़ललेली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

सिरीयसली ...'हॉरर' ???

पगला गजोधर
गुरुवार, 05/07/2015 - 15:09 नवीन
'झी कॉमेडी शो'... म्हणायचं का तुम्हाला ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

हा हा हा

एक एकटा एकटाच
गुरुवार, 05/07/2015 - 21:27 नवीन
बरोबर बोललात नंतर कॉमेडी शो झाला तो पण सुरुवातीचे काही एपिसोड चांगले दाखवलेले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

अर्रे! हा नुसता भूतजातीवाचक

यशोधरा
Wed, 05/06/2015 - 20:15 नवीन
अर्रे! हा नुसता भूतजातीवाचक सर्व्हे हाय काय! मला वाटलं मस्तपैकी कोकणातल्या श्टोरी असतील भुतांच्या! मज्जा येते ऐकायला. सांगा कोणाला माहिती असतील तर.
  • Log in or register to post comments

+१

किसन शिंदे
गुरुवार, 05/07/2015 - 12:24 नवीन
अगदी अगदी.. मलाही तेच वाटले. निराशा झाली.. स्पावड्या कुठे ग्येला रे??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

हा काय आलाय! पां डुब्बा!

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 05/07/2015 - 12:28 नवीन
हा काय आलाय! पां डुब्बा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

अरे काय भुतांची चेष्टा

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 05/06/2015 - 20:21 नवीन
अरे काय भुतांची चेष्टा चालवलीय ?! जरातरी भूतदया दाखवा की ! :)
  • Log in or register to post comments

८ चेटकीन : हे मागासवर्गीयांचे

मोहनराव
Wed, 05/06/2015 - 20:26 नवीन
८ चेटकीन : हे मागासवर्गीयांचे भूत असते.याला कोकणात डाव असेही संबोधले जाते.
पुण्यात डाव हा शब्द चुकीच्या अर्थाने वापरतात मग!! ;)
  • Log in or register to post comments

एक उत्सुकता: बायंगीसाठी

आदूबाळ
Wed, 05/06/2015 - 21:38 नवीन
एक उत्सुकता: बायंगीसाठी ग्राहकाने दिलेले दहा हजार रुपये त्या भुताला कसे मिळतात?
  • Log in or register to post comments

त्याच खाण-पिणं वेगळच असतं....

नन्दादीप
गुरुवार, 05/07/2015 - 13:57 नवीन
त्याच खाण-पिणं वेगळच असतं..... हे १०,००० त्या बायंगी च्या मूळ मालकाला दिले जातात. एक ठराविक कालावधि झाला की बायंगी मूळ मालकाकडे परत....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

तुम्ही वर्णिलेली भुते त्रास देणारी का न देणारी ?

सौन्दर्य
Wed, 05/06/2015 - 22:47 नवीन
तुम्ही वर्णिलेली भुते त्रास देणारी का न देणारी ? त्रास देणारी कोणती आणि न देणारी कोणती हे कसे ओळखायचे ? बाटलीतून (मुख्यत्वे समुद्रकिनारी बुच लावलेल्या बाटलीतून) निघते ते भूत कोणते ? परदेशी असावे बहुतेक. स्त्री भूतांची माहिती कुठे सापडेल ? जनावरांची भुते असतात का ?
  • Log in or register to post comments

एक लेडिज भुत पाहिजे . कोणतही

उगा काहितरीच
Wed, 05/06/2015 - 23:16 नवीन
एक लेडिज भुत पाहिजे . कोणतही रूप धारण करता येणारे . ;-) (कोटेशन व्यनि ने पाठवून द्या )
  • Log in or register to post comments

आता राडा होणार!

अत्रुप्त आत्मा
Wed, 05/06/2015 - 23:40 नवीन
आता राडा होणार! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा