✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

गीतगुंजन - १० : Raindrops Keep Falling On My Head

प
प्रास यांनी
Mon, 01/09/2012 - 12:57  ·  लेख
लेख
गीतगुंजन - १ गीतगुंजन - २ गीतगुंजन - ३ गीतगुंजन - ४ गीतगुंजन - ५ गीतगुंजन - ६ गीतगुंजन - ७ गीतगुंजन - ८ गीतगुंजन - ९
आपल्या या धाग्यावर अनेक उत्तमोत्तम इंग्लिश गाण्यांची माहिती आपण घेत आहोत, आता यातच आणखी एका अवीट गाण्याची भर पडत आहे. हॅल डेव्हिड आणि बर्ट बकाराक यांनी १९६९ मध्ये लिहिलेलं आणि बिली जो थॉमस ने गाऊन प्रसिद्ध केलेलं "Raindrops Keep Falling On My Head" हे गाणं त्यावेळच्या 'Butch Cassidy and the Sundance Kid' या अप्रतिम चित्रपटात वापरण्यात आलं. या गाण्याला त्या वेळचा सर्वोत्कृष्ट गाण्याबद्दलचा आणि ओरिजिनल संगीताचा 'ऑस्कर' पुरस्कार मिळाला. मला वाटतं की या गाण्याचं आणि 'Butch Cassidy and the Sundance Kid' चित्रपटाचं एकमेकांशी नक्कीच काहीतरी नातं असावं. नाही तर रे स्टेवेन्सला त्याच्या चित्रपटासाठी देऊ केलेलं हे गाणं त्याने नाकारलंच नसतं. त्याने नाकारलं आणि या चित्रपटाने स्विकारलं. ते म्हणतात ना, रेस्ट इज हिस्ट्री.... पॉल न्यूमन, रॉबर्ट रेडफोर्ड आणि कॅथरीन रॉस अभिनित या नितांत सुंदर चित्रपटात या गाण्याचं 'पिक्चरायझेशन' सुद्धा पॉल न्यूमन आणि कॅथरीन रॉस यांच्यावर फारच छान केलेलं आहे. या गाण्याची दोन व्हर्जन्स आहेत. एक, बी. जे. थॉमसचं मूळ सिंगल व्हर्जन आणि 'Butch Cassidy and the Sundance Kid' चित्रपटासाठीचं खास नव्याने ध्वनिमुद्रित झालेलं दुसर. चित्रपटातल्या व्हर्जनमध्ये बी. जे. थॉमसचा आवाज काहीसा जड वाटतो. काही ठिकाणी तो चिरकतोही. या व्हर्जनच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळी थॉमसला लॅरिंजायटीसचा त्रास होत असल्यामुळे असं घडलेलं पण ते ही ऐकायला छान वाटतं. पॉल न्यूमन करत असलेल्या सायकलवरील कसरतीसाठी गाण्यात इन्स्ट्रुमेन्टल ब्रेक घेण्यात आलाय पण या ब्रेकमुळे गाण्याची आणि सादरीकरणाची खुमारी अधिकच वाढलीय असं मला वाटतं.
१९७० साली हे गाणं युरोप आणि अमेरिकेतल्या चार्टसमध्ये १ल्या क्रमांकावर पोहोचलं. २००८ साली बिलबॉर्ड हॉट १०० ऑल टाईम टॉप गाण्यांच्या क्रमवारीत हे ८५व्या क्रमांकावरचं प्रसिद्ध गाणं बनलं. या श्रवणीय गाण्याचा आनंद घेणे वादातीत आवश्यक आहे. प्रेक्षणियतेच्या दृष्टीने 'Butch Cassidy and the Sundance Kid' मधलंच ऐकू या! हे गीत - Raindrops keep fallin' on my head And just like the guy whose feet are too big for his bed Nothin' seems to fit Those raindrops are fallin' on my head, they keep fallin' So I just did me some talkin' to the sun And I said I didn't like the way he got things done Sleepin' on the job Those raindrops are fallin' on my head, they keep fallin' But there's one thing I know The blues they send to meet me won't defeat me It won't be long till happiness steps up to greet me Raindrops keep fallin' on my head But that doesn't mean my eyes will soon be turnin' red Cryin's not for me 'Cause I'm never gonna stop the rain by complainin' Because I'm free Nothin's worryin' me [trumpet - Instrumental break] Raindrops keep fallin' on my head But that doesn't mean my eyes will soon be turnin' red Cryin's not for me 'Cause I'm never gonna stop the rain by complainin' Because I'm free Nothin's worryin' me छायाचित्रे आंतरजालावरून साभार....
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संगीत
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
2793 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

अजून एक उत्तम गाण्याची ओळख!

बिपिन कार्यकर्ते
Mon, 01/09/2012 - 13:07 नवीन
अजून एक उत्तम गाण्याची ओळख! धन्यवाद प्रास! :)
  • Log in or register to post comments

+१ हेच म्हणते

पियुशा
Mon, 01/09/2012 - 13:14 नवीन
+१ हेच म्हणते :)
  • Log in or register to post comments

So I just did me some talkin'

गवि
Mon, 01/09/2012 - 13:15 नवीन
So I just did me some talkin' to the sun And I said I didn't like the way he got things done Sleepin' on the job Those raindrops are fallin' on my head, they keep fallin'
गाण्याच्या शब्दांत गोडवा.. चालीत गोडवा.. वरच्या कडव्यात एक निरागस गोड विचार आणि लगेच खालच्या कडव्यात दुर्दम्य आशावाद..
But there's one thing I know The blues they send to meet me won't defeat me It won't be long till happiness steps up to greet me
हे गाणं म्हणजे उत्कृष्ट लिरिक्सचा आणि उत्कृष्ट संगीताचा नमुना आहे. या गाण्याचं पॅरडी साँग स्पाय हार्ड या स्पूफपटात घेतलं होतं. अगदी सायकलच्या सीनसह. ;) लगे रहो प्रासभाय.. यादों की बारात, असं नाव द्यायला हवं तुझ्या लेखमालेला...
  • Log in or register to post comments

अतिशय आवडतं गाणं !! सुंदर

इष्टुर फाकडा
Mon, 01/09/2012 - 15:19 नवीन
अतिशय आवडतं गाणं !! सुंदर माहितीबद्दल धन्यवाद :)
  • Log in or register to post comments

ह्या गाण्या वरुन "तेरे मेरे

मराठी_माणूस
Mon, 01/09/2012 - 19:57 नवीन
ह्या गाण्या वरुन "तेरे मेरे सपने" मधले "ए मैने कसम ली " हे गाणे आठवले
  • Log in or register to post comments

चलते चलते चित्रपटातील " दुर

राजा
Tue, 01/10/2012 - 14:40 नवीन
चलते चलते चित्रपटातील " दुर दुर तुम रहो" हे ते गाणे आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

हे ही गाणं छान आहे

जाई.
Mon, 01/09/2012 - 22:03 नवीन
हे ही गाणं छान आहे
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा