Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Tue, 11/07/2017 - 23:47
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
प्रेरणा : अठ्ठावीस लक्ष रुपये, त्यात उद्धृत केलेले एका नियतकालिकात प्रसिद्ध झालेले एक वाचकाचे पत्र, तत्सम विषयांवरचे इतर लेख व त्यांच्यावरची चर्चा. वर लिहिलेल्या लेखातला सगळा प्रकार, धार्मिक अंधश्रद्धा नसून... (अ) एका लोभी माणसाच्या लालचीचा (कमी वेळात पैसे अनेक पटींनी वाढवणे) फायदा घेऊन दुसर्‍या बेरकी माणसाने त्याला फसवले किंवा (आ) एका भ्रष्ट माणसाच्या मानसिक असुरक्षिततेचा फायदा घेऊन, भ्रष्ट मार्गाने कमावलेली संपत्ती (हवाला मार्गे) कायदेशीर बनवून देतो, असे सांगून दुसर्‍या बेरकी माणसाने त्याला फसवले असाच जास्त दिसतो. याप्रकारे, असुरक्षित मनस्थिती असलेल्या एखाद्या भ्रष्ट नास्तिक माणसालाही दुसर्‍या एखाद्या चलाख आस्तिक/नास्तिक माणसाने फसवणे सहज शक्य आहे, नाही का? त्याचा धर्म अथवा श्रद्धा यांच्याशी ओढून ताणून संबंध लावल्यासारखेच दिसत आहे. धर्म किंवा श्रद्धा यांच्याबद्दल वेगवेगळी मते असणे योग्य आहे पण अयोग्य प्रकारे त्यांचे समर्थन अथव खंडन करणे नक्कीच निषिद्ध असते. या लेखातला, लेखकाचा मूळ हेतू योग्य आहे असे जमेस धरूनही, लेखातच दिलेल्या मजकूरावरून त्या उदाहरणामध्ये... (अ) त्या साधूला कोणी धर्ममार्तंड समजणे किंवा तसा दावा करणे, (आ) फसलेली व्यक्ती धार्मिक व्यक्ती आहे आणि एक लखपती उद्योजक असून तिने केवळ अंधश्रद्धेने त्या साधूला पैसे दिले असे समजणे, (इ) आणि त्या दोघांमधला व्यवहार केवळ धर्मिक/अंध-श्रद्धेवर अवलंबून झाला होता, असे समजणे हे काही फार मोठ्या विचारशक्तीचे लक्षण आहे, असे म्हणणे धाडसाचे होईल, यात शंका नाही ! अशी बाळबोध गृहितके धरून पोलिस जर अश्या केसेस सोडवायला लागले तर 'कालचा गोंधळ बरा होता' अशी परिस्थिती निर्माण होईल ! मला वाटत नाही की तसे होईल ! *************** माणसात आणि (आपल्याला सर्वात जवळ असलेल्या चिंपॅझीसह) इतर सर्व प्राण्यांत एक फार महत्वाचा फरक आहे, तो म्हणजे... संकल्पना (किंवा साध्या शब्दांत आपल्या मनातली गोष्ट दुसर्‍याला पटेल अश्या प्रकारे) सांगण्याची पात्रता... याला साध्या इंग्लिशमध्ये "स्टोरी टेलिंग" असेही म्हणतात. माणसांचा विशेष समजल्या जाणार्‍या आस्तिक/नास्तिक, देव/धर्म/जात, राज्य/राष्ट्र/संस्था या सर्व संकल्पना आहेत आणि त्यांच्यासाठी निर्माण केलेले नियम, भौगिलिक सीमारेखा, ध्वज, राष्ट्र/संस्था यांच्या घटना (constitution)/ प्रघात/मिशन/व्हिजन/पॉलिसी/प्रोसिजर, इ इ इ सर्वच संकल्पना आहेत... हे सर्व इतर प्राण्यांमध्ये शक्य नाही, फक्त माणसांतच शक्य असते. त्याच स्टोरी टेलिंगच्या बळावर माणसे एकत्र आणता येतात आणि त्यांच्याकरवी काम करवून घेता येते, केले गेले, केले जात आहे आणि भविष्यातही केले जाईल. या संकल्पनांच्या अभावात माणूस आणि इतर प्राण्यांतला फरक खूपच कमी होईल. मुख्य म्हणजे, या संकल्पना वेळेबरोबर बदलत गेलेल्या आहेत... विकसित होत आहेत. गंमत अशी आहे की, (वर्तमानपत्र किंवा मिपासारख्या इतर) माध्यमांत मानवी व्यवहारसंबंधी गंभीरपणे लेख लिहितानासुद्धा... (अ) मानवी व्यवहारांसंबंधीचे (ह्युमन बिहेवियर) शास्त्रिय ज्ञान असणे आवश्यक असते किंवा (आ) सबळ पुरावे (केवळ आपल्याला "खरे वाटणारे" आणि म्हणून ठासून सांगितलेले ठोकाताळे नव्हे) आवश्यक असतात आणि विशेषत: (इ) जनमानसात रुजलेल्या बर्‍यावाईट समजूती दूर करताना त्यांच्या जागी भौतिक आणि मानसिक अश्या दोन्ही स्तरांवर परिणामकारक ठरणारा पर्याय देणे आवश्यक असते, कारण, संकल्पनेच्या अभावात माणसाची अवस्था एका असुरक्षित गोंधळलेल्या प्राण्याप्रमाणे होते हे तथाकथित विचारवंत विसरतात आणि केवळ वादविवादाचे धनी होतात. म्हणजे त्याचा प्रयत्न फायदेशीर ठरण्याऐवजी उलटतो (counter productive होतो). त्यातही, सर्वात महत्वाचे म्हणजे, अयोग्य समजूती दूर करताना, भावनेच्या भरात वाहून जात, बळेच ओढून ताणून सत्याचा विपर्यास करणारी उदाहरणे देण्याने, आपणच आपल्या प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह उभे करत असतो आणि आपल्या विचारशक्तीबद्दल दुसर्‍यांच्या मनात प्रश्न निर्माण करत असतो (व ही कृती अत्यंत अशास्त्रिय असते) हे सहजपणे विसरले जाते. आपल्याला शास्त्रिय आणि समतोल विचाराचा समजाणार्‍याने, प्रथम सर्व तथ्यांचे सर्व दिशांनी प्रामाणिकपणे विष्लेशण करून मगच त्यावरून निष्कर्ष काढणे अपेक्षित असते. प्रथम निष्कर्ष ठरवायचा आणि मग तथ्यांना त्याच्या दिशेने हवे तसे वाकवायचे हे निषिद्ध असते... तसे करण्याला फारतर सोईस्कर राजकारण म्हणता येईल, शास्त्रिय विचार नक्कीच नव्हे आणि समाजकारण तर नव्हेच नव्हे. पूर्णविराम. *************** मी स्वतःला अज्ञेयवादी समजतो. मला स्वतःला यनावालांसारख्या समाजसुधारणेचे व्रत घेतले आहे असा दावा करणार्‍या व्यक्तींबद्दल बर्‍यापैकी आदर आहे आणि मी सुद्धा माझ्या वकुबाप्रमाणे ते जमेल तसे करतो. मात्र, तसे करताना, चुकीची उदाहरणे / ओढून-ताणून बनवलेल्या कथा / एखाद्या प्रसंगाचे स्वतःला सोईस्कर असे ओढून-ताणून बनविलेले विश्लेषण, इत्यादी कटाक्षाने टाळतो. कारण, तसे केल्याने, केवळ आस्तिकच काय पण अशिक्षित मंडळींनाही त्यांच्यातला विसंवाद सहजपणे समजतो. सर्वसामान्य लोक बर्‍यापैकी हुशार असतात, ते तो विसंवाद सांगतिलच असे नाही, किंवा सांगायला गेले तर त्यांना शास्त्रिय पद्धतिने प्रतिवाद करता येईलच असे नाही. पण, त्यामुळे आपल्याला शिकविण्याचा आव आणणारी व्यक्ती भोंदू आहे असा त्यांचा ठाम (व योग्य) ग्रह होत जातो आणि त्यांचे स्वतःचे (कदाचित चुकीचे) मत अधिक पक्के होत जाते. हे सर्व समजून-उमजून मगच आपले म्हणणे योग्य रितीने मांडणार्‍या व्यक्तीच आपल्या प्रयत्नांत यशस्वी होतील. तसेही, चुकीच्या पद्धतीने केलेले शास्त्रिय कामाची अशास्त्रिय कामातच गणना केली जाईल. असे करण्याने, योग्य रितीने सामाजिक काम करणार्‍या इतर लोकांच्या कामावरही बोळा फिरविला जातो, ते वेगळेच. मानवी संकल्पना आणि त्यांचे योग्य रितीने विष्लेशण करणारी शास्त्रे सद्या खूप विकसित झालेली आहेत आणि त्यांच्या कक्षा दिवसेदिवस विस्तारत आहेत. मानवी व सामाजिक व्यवहारांत आणि विकासात, मानसशास्त्र आणि मानवी संकल्पना यांचे अनन्यसाधारण महत्व आहे. त्यांचा विचार न करता समाजाचा विकास करणे हे अंधारात दगड मारण्यापेक्षा फार वेगळे नाही. या वर्षाचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार "behavioral economics" या विषयासंबंधिच्या संशोधनाबद्दल दिला गेला आहे, यावरून हे म्हणणे अधोरेखित व्हावे. यासाठीच, आपल्या प्रयत्नात यश मिळविण्यासाठी समाजसुधारणेचे व्रत घेतलेल्या व्यक्तींनी... (अ) मानवी मानसशास्त्र आणि मानवाच्या वैचारिक विकासाच्या वाटचालीचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे आणि (आ) समाजसुधारणेच्या प्रयत्नांमध्ये वापरलेली साधने (उदाहरणे, इ) आणि विष्लेशणासाठी वापरलेली पद्धत, प्रामाणिक व शास्त्रिय असणे आवश्यक आहे मानवी जीवनाचा विकास, मानसशास्त्र आणि मानवाच्या वैचारिक विकासाच्या वाटचालीवर मानली गेलेली अनेक संशोधनपर पुस्तके व असंख्य शोधनिबंध आहेत. त्यातील, सर्वसामान्यांसाठी कळायला तुलनेने सोपी, रोचक भाषाशैलीत लिहिलेली व मला आवडलेल्या काही पुस्तकांची/लेखकांची नावे खाली देत आहे... The Third Chimpanzee : Jared Diamond The God Delusion : Richard Dawkins The Extended Phenotype : Richard Dawkins Selfish Gene : Richard Dawkins The Blind Watchmaker : Richard Dawkins The Greatest Show On Earth : Richard Dawkins Unweaving the rainbow : Richard Dawkins Sapiens, A brief history of Humankind : Yuval Noah Harari हा विषय वाचायला-समजायला आयुष्य पुरे पडणार नाही... मात्र, वरच्या पुस्तकांपासून चांगली सुरुवात करता येईल. यातील काही लेखकांच्या व्हिडिओ क्लिप्स यु ट्युबवर उपलब्ध आहेत... त्या बघणे ज्ञानार्जन करण्यास उपयोगी तर आहेतच पण त्यांत "आपले मत जडजंबाळ शास्त्रिय भाषा न वापरता... आणि मुख्य म्हणजे आपला गर्व व दुसर्‍याबद्दलचा तिरस्कार यांचे हिडिस प्रदर्शन न करता... प्रभावी पद्धतीने कसे मांडावे" याचा वस्तूपाठही बघायला मिळेल.
  • Log in or register to post comments
  • 26985 views

प्रतिक्रिया

Submitted by तर्राट जोकर on Fri, 11/10/2017 - 14:36

In reply to जसे यनावालांचे फॅन चिडले आणि by arunjoshi123

Permalink

इतरांचे माहित नाही, बट आय अ

इतरांचे माहित नाही, बट आय अ‍ॅम नोबडी'ज फॅन. कोणाचा कैवार घेण्याची गरज नाही. दुसरी बाजू मांडत असतो. पण लोक हवं तेच वाचतात, हवं तेच समजतात. इथे आनंदा अध्यात्मातल्या ज्ञानाबद्दल बोलत होते. अध्यात्म हा शोध आहे, साधना ही त्या शोधाची प्रक्रिया आहे, अध्यात्मात श्रद्धेचे कोणतेही अस्तित्व नसते हेही त्यांना माहित नाही. आता अशा लोकांना काय समजवणार?
  • Log in or register to post comments

Submitted by arunjoshi123 on Fri, 11/10/2017 - 15:08

In reply to काय आहे ना डॉक्टरसाहेब, by तर्राट जोकर

Permalink

संदर्भ लक्षात घ्या.

तुमचेच औषध तुम्हाला देण्याचा छोटासा प्रयत्न होता तो.
खोले मॅडॅम चूक आहेत. दत्तमंदिरात जाणे चूक आहे. भोंदू बाबाला अक्षय पात्रासाठी पैसे देणे चूक आहे. तो वाद नाहीच. पण ज्या ज्या अर्थानं हे सगलं चूक म्हणून सूचित केलं जात आहे ते ही चूक आहे. ================================== नुकसान (वेळेचे, पैश्याचे, इ) मंदिरात जाण्यानेच होते असे नाही. कॉलेजमधे जाण्याने देखील होते. यनावालासारख्या असंबंधित प्राध्यापकाचे फिसमधून, करामधून घर चालते, त्याने शिकवलेल्या विषयाचा व्यवहारात यत्किंचितही उपयोग होत नाही आणि हाताखालून निघणारी कितितरी मंडळि आयुष्यभर बेकार राहतात. हे नुकसान २८ लाख पेक्षा कैक पट आहे. शिक्षण म्हणजे बेकारांचे लोंढे उत्पन्न करणारी संस्था. उच्चशिक्षण मंजे महाबेकार निर्माण करणारी संस्था. काही ठिकाणि तर प्राध्यापक विद्यार्थ्यांचा खून करतात, बलात्कार करतात, लैंगिक शोषण करतात, आर्थिक फसवणूक करतात, ट्यूशन चालवतात, खोट्या डिग्र्या देतात, मुद्दाम आतल्या परीक्षांत नापास करतात, पार्शलिटी करतात, प्रमोशन मिळावे म्हणून काही विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष देतात, चूकिचे शिकवतात, पेपर फोडतात, सिलॅबस चूकिचा ठेवतात, लफडी करतात, दारू पिउन शिकवायला येतात, संस्कार करत नाहीत, विद्यार्थ्यांना बोर मारतात, पोपटपंची शिकवतात, मूळ संकल्पना शिकवत नाहीत (ज्यातून वैज्ञानिक नास्तिक पैदा होतात.), लोकांची काम करून पैसे कमवायची पहिली २५ वर्षे नासवतात, विचित्र मानसिकता असलेले नागरिक पैदा करतात, युनियन करून भांडणार्‍या टोळ्या पैदा करतात, कॉपी रोखू शकत नाहीत, अशा गोष्टी शिकवतात कि उपयुक्त गोष्टी नंतरच शिकाव्या लागतात कमवतका?अस्लं फालतू शिकवतात, एक पिढी उच्चमध्यमवर्गीय असलेल्या लोकांना देखील फि माफ, राखीव जागा असले प्रकार करतात, ज्यांना आरक्षण अभिप्रेत होते त्या दलितांना जंगलातच आणि गावातच ठेवतात, नै का? दत्ताच्या निर्जीव तीन तोंडी मूर्तीपेक्षा रिस्की लोक!! हे खरं आहे ना? शिक्षणाला चूक म्हणायचं धारिष्ट्य आहे का? यनावालांना राजीनामा मागता का? सगळी पगार सरकारमधे परत भरायला (व्याजासह) सांगाल का? ========================================================= धर्म असो वा शिक्षण वा अशी कोणतीही व्यवस्था, त्यांचे मूळ उद्देश, निर्माते, तत्त्वे हे बर्‍यापैकी बरं आहे. त्यातलं एकच फार वाईट नि दुसरी व्यवस्था फार छान असं अजिबात नाही. म्हणून व्यवस्थांच्या सदुद्देशप्रेरित तत्त्वांना अव्वाच्या सव्वा नावं ठेऊ नयेत. यनावाला यांना शास्त्र, तर्क, भाषा, मानसशास्त्र, इ इ मधे काही गती नाही (किंवा ते बुद्धाप्रमाणे प्रश्न अनुत्तरित ठेवत असावेत.) पण त्यांना पाठींबा देणार्‍या मिसळपावकरांना आहे. विधाने मर्यादित करावीत आणि कोणी अनक्वालिफाइड विधाने केली तर पुरोगामीतेच्या फॅशनसाठी त्यांना डोक्यावर घेऊ नये. मला प्रामाणिक, मूल्यपूर्ण नास्तिकतेचा आदर आहे. कोण्याही (रिजनेबल) अस्तिकाला देखील असेल. पण यनावालीय नास्तिकता जिच्यात निर्बुद्धता, अहंकार आहे वर इतरांना बेअक्कल म्हणणं आहे, इतरांना अप्रामाणिक नि समाजविघातक म्हणणं आहे हे अशोभनीय आहे कोणत्याही सामाजिक मंचावर. ============================= यनावालांनी एक अजून खूप खतर्‍या चिकित्सक, नास्तिकी काम केलं आहे ते म्हणजे फक्त त्यांची लेखातली मते ज्यांना छान वाटली त्यांचे आभार मानले. आणि ज्यांनी (यनावालांना एक सज्जन प्रोफेसर मानून) प्रश्न विचारले त्यांना संस्कृती नाही आणि त्यांचे मानसिक स्वास्थ्य नीट नाही इतकेच म्हटले. उत्तरे दिली नाहीत. ही काय नास्तिकी संवादाची पद्धत आहे? ======================== डॉक्टरांना लिहिण्यापूर्वी या गोष्टी लक्षात घ्यायला हव्या. बाकी डॉक्टर फॅन बनवाने के काबिल है, हम बननके काबिल है क्या नही यही सवाल है.
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Fri, 11/10/2017 - 12:55

In reply to तुम्ही कट्टर उजवे दिसता. by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

मी या वादात बोलण्याचे कारण

मी या वादात बोलण्याचे कारण सांगतो. या संपूर्ण यनावाला प्रकरणात खटकलेली गोष्ट आहेत ती अशी की यनावाला हिणवतात ना मग त्यांना आपण हिणवा.... आता याला कितीही सुसंस्कृतपणाचा, उच्चभ्रूपणाचा, आदरसन्मानाचा वगैरे वगैरे मुलामा द्यायचा प्रयत्न केला तरी ते शेवटी ठरले नळावरचे भांडणच. यनावाला आस्तिकांची अक्कल काढतात का तर मग आम्ही त्यांना स्वयंघोषित सुधारक म्हणून त्यांची पात्रता-प्रामाणिकपणा वगैरे काढणार. शेवटी दोन्ही पार्टीज एकमेकांचे चारित्र्यहनन व प्रतिमाहनन करण्यात स्वारस्य ठेवून आहे असे दिसून आले. खर्‍याखुर्‍या चर्चेसारखं काही दिसलं नाही. परत एकदा धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Fri, 11/10/2017 - 21:07

In reply to मी या वादात बोलण्याचे कारण by तर्राट जोकर

Permalink

यनावाला हिणवतात ना मग त्यांना

यनावाला हिणवतात ना मग त्यांना आपण हिणवा.... आता याला कितीही सुसंस्कृतपणाचा, उच्चभ्रूपणाचा, आदरसन्मानाचा वगैरे वगैरे मुलामा द्यायचा प्रयत्न केला तरी ते शेवटी ठरले नळावरचे भांडणच. यनावाला आस्तिकांची अक्कल काढतात का तर मग आम्ही त्यांना स्वयंघोषित सुधारक म्हणून त्यांची पात्रता-प्रामाणिकपणा वगैरे काढणार. शेवटी दोन्ही पार्टीज एकमेकांचे चारित्र्यहनन व प्रतिमाहनन करण्यात स्वारस्य ठेवून आहे असे दिसून आले. खर्‍याखुर्‍या चर्चेसारखं काही दिसलं नाही. ही गोष्ट तुम्हाला, म्हणजे तर्राट जोकर यांना खटकलेली आहे का..?
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Fri, 11/10/2017 - 23:30

In reply to यनावाला हिणवतात ना मग त्यांना by मोदक

Permalink

म्हणजे?

म्हणजे?
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Sat, 11/11/2017 - 20:40

In reply to म्हणजे? by तर्राट जोकर

Permalink

माझ्या प्रश्नात न

माझ्या प्रश्नात न समजण्यासारखे काय आहे..?
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Sun, 11/12/2017 - 11:29

In reply to माझ्या प्रश्नात न by मोदक

Permalink

ते तुम्हीच शोधा

ते तुम्हीच शोधा
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Mon, 11/13/2017 - 12:46

In reply to ते तुम्हीच शोधा by तर्राट जोकर

Permalink

नेहमीप्रमाणे दांभीकपणा

नेहमीप्रमाणे दांभीकपणा लपवण्यासाठी कोलांट्याउड्या मारण्यापेक्षा मी विचारलेला प्रश्न समजणे सोपे असावे. तुम्ही वरती विचारवंताचा आव आणून "चर्चा कशा असाव्यात?" हे आदर्शवादी विचार लिहिले आहे त्यातले १% तरी स्वतः अनुसरून वागता का हे पहा. इतकेच सांगायचे होते. रोज छाप काटा करून आज कोणत्या भूमीकेने / कोणत्या पातळीत लिहायचे हे ठरवत असलात तर तसे सांगा.
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Tue, 11/14/2017 - 19:29

In reply to नेहमीप्रमाणे दांभीकपणा by मोदक

Permalink

ए सायकल... ट्रिंग ट्रिंग....

ए सायकल... ट्रिंग ट्रिंग.... डुगु डुगु डुगु डुगू
  • Log in or register to post comments

Submitted by ट्रेड मार्क on Fri, 11/10/2017 - 23:14

In reply to मी या वादात बोलण्याचे कारण by तर्राट जोकर

Permalink

तजो

यनावालांच्या बहुतेक धाग्यांवर बऱ्याच जणांनी न हिणवता प्रश्न विचारले आहेत. आधी माझी समजूत होती की ते धागा टाकतात आणि परत फिरकत नाहीत. पण नंतर जाणवलं की ते प्रतिसाद वाचतात पण त्यांना अडचणीच्या प्रश्नांना उत्तरं देत नाहीत. फक्त कोणी त्यांचं कौतुक केलं किंवा त्यांच्या विचाराशी सुसंगत बोललं की मग प्रतिसाद टाकतात. फक्त मीच सांगतो ते बरोबर असा अट्टाहास का असावा? बहुतेक जणांना नास्तिकतेवर आक्षेप नसून ज्या पद्धतीने ते तो विचार मांडतात आणि त्यात सर्व आस्तिकांना मूर्ख ठरवतात त्यावर आक्षेप असतो. कित्येक उच्चशिक्षित, नामांकित व यशस्वी लोक आस्तिक असतात किंवा अज्ञेयवादी असतात. बहुतेकांची कोणावर ना कोणावर श्रद्धा असते, हे सगळेच सरसकट मूर्ख का ठरवायचे? त्यांच्या लेखातून ते अंधश्रद्धांविरुद्ध न बोलता श्रद्धांविरुद्ध बोलतात. त्यांना देव नसेल मानायचा आणि कोणावरही श्रद्धा ठेवायची नसेल तर नको ठेऊ दे. त्यांना कोणी त्याबद्दल नको ती विशेषणं देत नाहीये. ते चिकित्सा करून विश्वास ठेवावा म्हणतात. पण अठ्ठावीस लक्ष या लेखात ते म्हणतात लोकसत्ता सारख्या पेपरमध्ये बातमी आली म्हणून विश्वासार्ह आहे. त्यांनी फक्त पेपरवर विश्वास ठेऊन बातमीत जे लिहिलंय ते १००% सत्य आहे आणि ते तसंच घडलंय असा विश्वास ठेवला. मग हा अंधविश्वास का नाही म्हणायचा? यावर प्रश्न विचारल्यावर ते उत्तर देत नाहीत. वर एकजात सर्व श्रद्धाळू मूर्ख आणि बिनडोक आहेत असं म्हणतात. याला काय म्हणाल? त्यांच्याकडून या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. हिणवणं बाजूला ठेऊया, वर आणि बाकी ठिकाणी पण बरेच जणांनी बरेच प्रश्न विचारलेत. तुमच्याकडे त्यावर काही उत्तरं/ स्पष्टीकरण आहे का? मुळात श्रद्धा काही एका दिवसात बसत नाही. आधी अविश्वास असतोच मग काही कारणाने विश्वास बसू लागतो आणि मग कालांतराने श्रद्धा बसू लागते. जगाच्या इतिहासात असे कुठल्या ना कुठल्या गोष्टीला बळी पडलेले लोक असंख्य आहेत. एका कॉन मॅनने अगदी आयफेल टॉवर सुद्धा २ वेळा विकायचा पराक्रम केलेला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Fri, 11/10/2017 - 23:27

In reply to तजो by ट्रेड मार्क

Permalink

तुमचा नक्की आक्षेप कशावर आहे

तुमचा नक्की आक्षेप कशावर आहे ते नेमकं सांगाल का? मला तुमच्या प्रतिसादात अनेक वेगवेगळे मुद्दे दिसत आहेत.
  • Log in or register to post comments
Profile picture for user Duishen

Submitted by Duishen on Fri, 11/10/2017 - 20:38

In reply to म्हात्रे साहेब, मी by तर्राट जोकर

Permalink

सगळ्यात जास्त मोठी समस्या ...

"ह्या जगात सगळ्यात जास्त मोठी समस्या काही असेल तर ती आहे ऑफेन्ड होणार्‍यांची. ....पण हेच चिकित्सक प्रश्न ते आपल्या आजूबाजूला रोज घडणार्‍या घटनांमध्ये विचारतात का? तर्राटजी, योग्य मत मांडत आहात. वाढ-विवादात खरे तर आशय आणि त्यानुसार चर्चा महत्त्वाची असते. जर सर्वजण रोजच्या आयुष्यात असे प्रश्न विचारार्थ घेत गेल्यास प्रा. यनावालजी सारख्या व्यक्तींना लेख लिहिण्याची वेळ वा समाजमनाविषयी लिहिण्याची वेळ येणारही नाही... कदाचित यनावाला किंवा त्यांच्या अनेक प्रतीपाक्ष्यांचे शब्द पटणारे नाशीत पण त्यातून नेमके काय सांगितले, का सांगितले याकडे पाहणे उपयुक्त असेल. खरेतर "मनुस्मृती" या शरदजीच्या धाग्यात त्यांची भूमिका विचारण्याचे प्रयत्न झाले... त्यांनीही भूमिका स्पष्ट करण्याचे प्रयत्न केले... काहींना रुचले आणि काहींना नाही. तसेच यनावाल यांनीही आपली भूमिका स्पष्ट करण्याचे प्रयत्न केले; काहींना रुचतील काहींना नाही... या पार्श्वभूमीवर तुमचे वरील विधान मला महत्त्वाचे जाणवते.
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Fri, 11/10/2017 - 21:39

In reply to सगळ्यात जास्त मोठी समस्या ... by Duishen

Permalink

धन्यवाद!

धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Submitted by arunjoshi123 on Sat, 11/11/2017 - 18:57

In reply to सगळ्यात जास्त मोठी समस्या ... by Duishen

Permalink

यनावाल यांनीही आपली भूमिका

यनावाल यांनीही आपली भूमिका स्पष्ट करण्याचे प्रयत्न केले
?????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????
  • Log in or register to post comments
Profile picture for user Duishen

Submitted by Duishen on Tue, 11/14/2017 - 16:58

In reply to यनावाल यांनीही आपली भूमिका by arunjoshi123

Permalink

यानावालाजी यांचा प्रतिसाद

अरुणजी, ???????????????? आपल्या या प्रश्नांसाठी खालील प्रतिसाद... माझी भूमिका 8 Oct 2017 - 1:28 pm | यनावाला माझ्या या लेखनाचा हेतू काय हे "माझी भूमिका" या लेखात स्पष्ट केले आहे. तो लेख इथे वाचता येईलः-- http://www.misalpav.com/node/33826
  • Log in or register to post comments

Submitted by स्वधर्म on Mon, 11/13/2017 - 12:43

In reply to सगळ्यात जास्त मोठी समस्या ... by Duishen

Permalink

शरद यांची भूमिका?

खरेतर "मनुस्मृती" या शरदजीच्या धाग्यात त्यांची भूमिका विचारण्याचे प्रयत्न झाले... त्यांनीही भूमिका स्पष्ट करण्याचे प्रयत्न केले... काहींना रुचले आणि काहींना नाही.
दुश्येन सर, मी मनुस्मृतीवरील लेखात श्री शरद यांची भूमिका विचारली होती. त्यावर त्यांनी तिथेच उत्तर न देता, प्रिय स्वधर्म या शिर्षकाचा वेगळाच धागा काढला. त्यात मला तरी काही त्यांच्या भूमिकेचा उलगडा झाला नाही. त्यावर त्यांची भूमिका मला अजूनही समजलेली नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
  • Log in or register to post comments
Profile picture for user Duishen

Submitted by Duishen on Tue, 11/14/2017 - 15:07

In reply to शरद यांची भूमिका? by स्वधर्म

Permalink

स्वधर्मजी.. खरे आहे..

त्यांनी वेगळा धागा काढला हे खरे आहे. एकतर त्यांनी प्रयत्न केले असे माझे म्हणणे आहे आणि त्यांचे प्रयत्न काहीना रुचले काहींना रुचले नाही. तुमच्या नावाने जो धागा काढला आहे त्यात त्यांनी काहीही भूमिका स्पष्ट केली आहे असे मला देखील वाटत नाही. अनेक जागी तर ते मनुस्मृतीचे समर्थन करतात असे वाटण्यास पुरेसा वाव आहे. शरदजीनी तुम्हाला दिलेल्या प्रत्युत्तरात तर मला अनेक प्रक्षोभक मुद्दे जाणवतात. पण त्यांनी प्रतिक्रिया देण्याचे थांबवले हा त्यांचा निर्णय! तसेच मनुस्मृती भाग २ मधे त्यांनी एका जागी प्रतिक्रिया जी दिली (1 Aug २०१७) ती रुचणारी / पटणारी आहेच असे नाही. व्यक्तिश: मला त्यांनी त्यांची स्पष्ट भूमिका मांडली असे वाटत नाही. मीही त्यांना मनुस्मृती धागा १ मधे त्यांच्या भूमिकेबाबत विचारून पहिले पण मला कुठेही समाधानकारक असा प्रतिसाद आजतागायत मिळाला नाही....
  • Log in or register to post comments

Submitted by स्वधर्म on Wed, 11/15/2017 - 15:04

In reply to स्वधर्मजी.. खरे आहे.. by Duishen

Permalink

दुर्दैवी

इतकेच नव्हे, तर मनुस्मृती भाग १ मध्ये त्यांनी मनुस्मृतीचा धिक्कार करणार्यांचा तीव्र उपहास केला अाहे. तो का? मनुस्मृती हा एक महान ग्रंथ अाहे असे अापण मानता का? अशा प्रश्नांवर त्यांनी मौन बाळगणे, हे दुर्दैवी अाहे.
  • Log in or register to post comments

Submitted by पुंबा on Wed, 11/15/2017 - 15:23

In reply to स्वधर्मजी.. खरे आहे.. by Duishen

Permalink

++११

++११ कुणाच्याच प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली गेली नाहीत. वेगळ्या काढलेल्या धाग्याने संशय अधिक बळावला.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Sun, 11/12/2017 - 10:52

In reply to म्हात्रे साहेब, मी by तर्राट जोकर

Permalink

'माझ्यामते' खरी समस्या

'माझ्यामते' खरी समस्या यनावालांकडून दुखावले जाणे ही आहे, त्याच्या विरोधात सगळे प्रतिक्रिया देत आहेत. यनावाला इर्रीलिवंट असते तर इतर अनेक समाजजागृती, समाजशिक्षण धाग्यांसारखे पाच सहा प्रतिसादाबाहेर काही झाले नसते.
अगदी सहमत
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Mon, 11/13/2017 - 15:41

In reply to 'माझ्यामते' खरी समस्या by प्रकाश घाटपांडे

Permalink

इतरांचं माहित नाही, पण निदान

इतरांचं माहित नाही, पण निदान मी तरी दुखावला वगैरे गेलेलो नाही. यनावाला माझ्या दॄष्टीने इररिलिव्हंटच आहेत. चौथ्या कॅटेगरीतील प्रत्येक जण माझ्यासाठी इररिलिव्हंटच असतो. यनावालांनी यापूर्वी याच विषयावर अनेक धागे पाडले होते. त्यापैकी एकाही धाग्यावर मी प्रतिसाद दिलेला नाही. श्रद्धावंतांचे तत्वज्ञान या त्यांच्या शेवटून दुसर्‍या धाग्यात त्यांनी बरेच ज्ञान पाजळले. त्यांच्या अतार्कित दाव्यांना कधीतरी उत्तर देणे गरजेचे होते. म्हणून मी त्या धाग्यावर प्रतिसाद देऊन त्यांचे दावे खोडून काढले. माझ्या प्रतिसादांवर अर्थातच त्यांच्याकडे उत्तर नाही. त्यामुळे त्यांनी मला व इतरांना एकही उत्तर दिलेले नाही. आपला मूर्खपणा उघड पाडणारे बरेच जण मिपावर आहेत हे आता त्यांच्या लक्षात आले असेलच. अर्थातच त्यानंतर त्यांच्या आलेल्या २८ लक्ष यावर धाग्यावर मी एकही प्रतिसाद दिलेला नाही व भविष्यातील कोणत्याही धाग्यावर देणार नाही, कारण ते जे अतार्किक दावे करीत आहेत त्यावर कोणतेही स्पष्टीकरण ते देऊ शकत नाहीत. भविष्यात त्यांचे येणारे धागे कोणत्या विषयावर असतील हे सांगता येईल. "तीर्थस्थानी दर्शन घेऊन परत येताना झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यु", "प्रसादाच्या जेवणात विषबाधा झाल्याने ४० जण रूग्णालयात दाखल" अशा बातम्या घेऊन, श्रद्धेमुळे जीवनात कसे वाईट होते व श्रद्धावंतांनी तीर्थस्थानी जाण्याचा किंवा देवळात जाऊन प्रसाद घेण्याचा मूर्खपणा केला नसता त्यांना या वाईट प्रसंगांना तोड द्यावे लागले नसते. या अपघातांसाठी अंधश्रद्धाच कारणीभूत आहे. श्रद्धावानांची बुद्धी बधीर होउन त्यावर श्रद्धेचा गंज चढल्यामुळे ते सारासार विवेकबुद्धी हरवून बसले आहेत . . . अशा अर्थाचे लेख ते पाडणार.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Sun, 11/12/2017 - 11:10

In reply to म्हात्रे साहेब, मी by तर्राट जोकर

Permalink

. खर तर प्रत्येक श्रद्धा ही

. खर तर प्रत्येक श्रद्धा ही अंधश्रद्धाच असते. अंधश्रद्धा म्हणजे पिवळा पितांबर म्हटल्यासारखे आहे. सश्रद्ध व अश्रद्ध या दोन्ही कडे अतिरेकी प्रवृत्तीचे लोक आहेत. सुप्रसिद्ध साहित्यिक विजय तेंडुलकर एकदा म्हणाले होते ," माणुस अंधश्रद्ध असतो कारण अंधश्रद्ध असणे ही त्याची गरज असते." ( संदर्भ - तिमिरातून तेजाकडे पृष्ठ ३८४ ले. नरेंद्र दाभोलकर) नुकतेच डॉ मिलिंद वाटवे यांच्या विज्ञानातील अंधश्रद्धा या विषयावरील व्याखानाला गेलो होतो. त्यात त्यांनी अंधश्रद्धा टिकून राहण्याचे कारण त्याची उपयुक्तता हा मुद्दाही मांडला होता. जिज्ञासूंनी सुबोध जावडेकरांच्या मेंदुच्या मनात पुस्तकातील अंधश्रद्धा व मेंदुविज्ञान हे प्रकरण ही वाचावे. तसेच या ज्योतिषाच काय करायचं? हे पण वाचावे
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Mon, 11/13/2017 - 21:44

In reply to म्हात्रे साहेब, मी by तर्राट जोकर

Permalink

खरी समस्या यनावालांकडून

खरी समस्या यनावालांकडून दुखावले जाणे ही आहे ??? खरे दु:ख खालीलप्रमाणे आहे हे ध्यानात येईल तो सुदिन असेल... १. (याच नव्हे तर त्यांच्या बहुतेक सर्व लेखनात) स्पष्ट असलेली अनेक उदाहरणे टाळून, त्याऐवजी चुकीची उदाहरणे वापरून व त्यांची ओढूनताणून केलेली चुकीची विश्लेषणे करून यनावाला सतत त्यांचा स्वतःचाच मूळ हेतू पराभूत करत आहेत आणि २. हे करण्याने, ते स्वतः कुचेष्टेचे धनी होत आहेत... हा योग्य नसला तरी त्यांचा स्वत:चा निर्णय असू शकतो पण ३. असे करताना, ते इतर साधनशुचिता पाळून प्रामाणिकपणे समाजबदल करण्याचा प्रयत्न करणार्‍या लोकांच्या योग्य कामावरही बोळा फिरवित आहेत... हे योग्य नव्हे आहे... आणि याबाबत त्यांच्यावर टीका करण्याचा हक्क इतरांना जरूर आहे. हे वरचे सगळे यनावालांसारख्या प्राध्यापकाला पुरेपूर माहित असायला हवे आणि आहे असेच दिसते. कारण ते फक्त त्यांच्याशी सहमत असलेल्या प्रतिसादांवर धन्यवाद व्यक्त करण्यासाठी हजर होतात. पण, त्यांच्याशी सहमत नसलेल्या, पुरावे व विश्लेषणांसह असलेल्या प्रतिसांदांवर, एखादीही प्रतिक्रिया देण्याचीही तसदी घेत नाहीत... अशी एकेरी व एकदिशा कृती समाजसुधारणा करण्याचा दावा करणार्‍या व्यक्तीला परवडणारी नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Mon, 11/13/2017 - 23:43

In reply to खरी समस्या यनावालांकडून by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

इतर साधनशुचिता पाळून

इतर साधनशुचिता पाळून प्रामाणिकपणे समाजबदल करण्याचा प्रयत्न करणार्‍या लोकांच्या योग्य कामावरही बोळा फिरवित आहेत... >> तुमचे हे विधान विदा-पुराव्यानिशी केलेले आहे काय? असेल तर कृपया विश्लेषण देऊ शकाल?
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Tue, 11/14/2017 - 21:31

In reply to इतर साधनशुचिता पाळून by तर्राट जोकर

Permalink

एखाद्याच्या कामावर टिका

एखाद्याच्या कामावर टिका करण्यासाठी, "बघा तुमच्यातील काही जण कशी चलाखी करून कसे लोकांना फसवत असतात. तुम्ही पण त्यातलेच कशावरून नाही ?" असे चलाख विरोधकांतर्फे म्हटले जाते... ही नेहमी दिसणारी वस्तूस्थिती तुमच्यासारख्या हुशार व्यक्तीला सांगायला लागेल असे वाटले नव्हते ! खरे तर राजकारणी विरोध करायचाच म्हटले तर काही पुरावे लागत नाहीत, हे विनापुरावा लेबले लावली जातात तेव्हाही दिसतेच. तर मग, यनावालांसारख्यांनी निवडलेल्या चुकीच्या उदाहरणांचा आणि ओढूनताणून केलेल्या छद्मी विश्लेषणाचा पुरावा हातोहाती मिळाल्यास काय होईल हे काय सांगायलाच हवे काय ?! हे आपल्या आजूबाजूला सतत होताना दिसते. मोकळ्या मनाने डोळसपणे विचार केल्यास, हा निष्कर्ष सारासारविवेक आणि पूर्वानुभवांवर सहजपणे काढता येतो. पण असो.
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दा on Wed, 11/08/2017 - 08:26

Permalink

काय आहे, आपण ज्यांना सुधारणार

काय आहे, आपण ज्यांना सुधारणार आहोत, त्यांना समजून घेणं आधी आवश्यक आहे. आणि आपण जी उदाहरणे घेत आहोत विवेचनासाठी टी बेस्ट फिट आहेत हे बघणे त्याहून महत्वाचे असते. नाहीतर काय होतं, विवेचनाचा गाभा पोकळ राहतो. आणि माझ्यासारख्याच्या एखाद्या धक्क्यानेदेखील सारा डोलारा कोसळू शकतो. आता पहा, मी आस्तिक आहे काय? तर आहे, पण त्याच बरोबर वैज्ञानिक दृष्टीकोन पण ठेवून जगात डोळसपणे वावरतो. आस्तिकतेमधील विसंगती मला चटकन दिसते, आणि तशीच नास्तिकतेमधील देखील. माझा बुद्धीवादी स्वभाव मला एकिकडे आस्तिकतेकडे ओढत असतो, तर बुद्धीअगम्य अनुभव आस्तिकतेकडे. माझ्या बुद्धीअगम्य अनुभवांचे स्पष्टीकरण मला कुठेतरी मिळेल या हेतूने मी जमेल तितके विज्ञानवादी, विवेकवादी लिखाण वाचतो, पण यांच्या लिखाणात इतकी विसंगती आणि एकांगीपणा असतो, की मी यांना आस्तिकता कधी कळणारच नाही असा विचार करून अधिकाधिक आस्तिकतेकडे झुकत जातो. आणि प्रश्न विचारल्यावर तर हे लोक अश्या प्रकारे अंगावर येतात की जसे काही आधुनिक युगातील महाराजच. पण त्यांना बिचार्यांना हे कळत नाही की अशाने त्यांचीच विश्वासार्हता कमी होते. कोणत्याही विचारधारेच्या प्रसारात वाद चर्चा करून तत्वज्ञानात्मक विचार करणाऱ्याला आपले मत पटवून देणे महत्वाचे असते. कारण हाच वर्ग नंतर आपल्या विचाराचा अधिक प्रसार करतो. इथे अश्या प्रकारे लिहिणारे लेखक नेमके याच वर्गात आपला जनाधार गमावून बसतात. तस्मात आपण समोरच्यावर चिखल उडवणार असलो तर आपण आधी रेनकोट, ग्लोव्हज घालणे महत्वाचे आहे, नाहीतर आपले चिखलाने बरबटलेले हात पण दिसतात, कसें?
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Wed, 11/08/2017 - 15:22

In reply to काय आहे, आपण ज्यांना सुधारणार by आनन्दा

Permalink

आता पहा, मी आस्तिक आहे काय?

आता पहा, मी आस्तिक आहे काय? तर आहे, पण त्याच बरोबर वैज्ञानिक दृष्टीकोन पण ठेवून जगात डोळसपणे वावरतो. आस्तिकतेमधील विसंगती मला चटकन दिसते, आणि तशीच नास्तिकतेमधील देखील. माझा बुद्धीवादी स्वभाव मला एकिकडे आस्तिकतेकडे ओढत असतो, तर बुद्धीअगम्य अनुभव आस्तिकतेकडे. यावरून, तुम्ही अज्ञेयवादी आहात ! :) माझ्या मते, मानवाच्या सद्य आकलनशक्तीचा "विकास आणि सीमा" पाहता, मानवाने अज्ञेयवादी असणेच जास्त योग्य, शास्त्रिय आणि प्रामाणिकपणाचे आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दा on Wed, 11/08/2017 - 15:51

In reply to आता पहा, मी आस्तिक आहे काय? by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

ह्म्म.. खरे आहे. मला

ह्म्म.. खरे आहे. मला अज्ञेयवादीच म्हटले पाहिजे, पण माझा कल आस्तिकतेकडे आहे म्हणून मी स्वतःला अस्तिक मानतो.
  • Log in or register to post comments

Submitted by arunjoshi123 on गुरुवार, 11/09/2017 - 14:49

In reply to काय आहे, आपण ज्यांना सुधारणार by आनन्दा

Permalink

माझ्या बुद्धीअगम्य अनुभवांचे

माझ्या बुद्धीअगम्य अनुभवांचे स्पष्टीकरण मला कुठेतरी मिळेल या हेतूने मी जमेल तितके विज्ञानवादी, विवेकवादी लिखाण वाचतो, पण यांच्या लिखाणात इतकी विसंगती आणि एकांगीपणा असतो, की मी यांना आस्तिकता कधी कळणारच नाही असा विचार करून अधिकाधिक आस्तिकतेकडे झुकत जातो.
या पायरीला गेलेले खूप कमी लोक असतात. स्पष्टिकरण असो, पण किमान आशावादी तरी ठेवायला पाहिजे वाचकाला. आपल्याला वाटणार्‍या अपूर्णता, विसंगती त्यांना दिसतच नाही. कदाचित दोन प्रकारचे मेंदू उत्क्रांत झाले असावेत.
  • Log in or register to post comments

Submitted by mayu4u on Wed, 11/08/2017 - 09:34

Permalink

अत्यन्त समयोचित लेख!

आणि नेहमीप्रमाणेच सुंदर विवेचन! जर एक्का काकांनी सांगितलेली सगळी पुस्तकं वाचायला जमत नसतील, तर किमान "द गॉड डिल्युजन" तरी वाचावं ही इच्छुकांना विनंती!
  • Log in or register to post comments
Profile picture for user Duishen

Submitted by Duishen on Fri, 11/10/2017 - 22:27

In reply to अत्यन्त समयोचित लेख! by mayu4u

Permalink

"द गॉड डिल्युजन"...

पुस्तकाचे नाव सुचविल्याबाबत धन्यवाद. डॉ. म्हात्रेजीनी दिलेल्या यादी सोबत हे ही पुस्तक जोडतो.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Wed, 11/08/2017 - 12:05

Permalink

धागा लेख संपुर्ण वाचणे झाले

धागा लेख संपुर्ण वाचणे झाले नाहीतरी धागा लेखक काय म्हणू इच्छितो त्याचा गोषवारा लक्षात आला बर्‍यापैकी पटलाही. जाताजाता: बाकी मागच्या काही धागाचर्चांपासून गापैंच्या प्रतिसादात सकारामक नोंद घ्यावी असे बदल पाहून बरे वाटले याची जाताजाता नोंद करतो.
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Wed, 11/08/2017 - 16:13

Permalink

सहमत !

सरळ सरळ मूर्खपणा आणि फसवणुकीच्या केसमध्ये श्रद्धा आणि धर्म आणणे म्हणजे साप म्हणून काठी धोपटण्याचाच प्रकार !
  • Log in or register to post comments

Submitted by दीपक११७७ on Wed, 11/08/2017 - 16:20

Permalink

समजा

समजा एखाद्याने पोलिसांचा वेष धारण करुन चोरी-लुट केली तर आपण पोलिस हा प्रकार चुकीचा आहे त्यांना लोक आपले मदत करणारे समजतात व फसतात तेंव्हा पोलिस हा प्रकार रद्द केला पाहीजे किंवा पोलिस हा प्रकार घातक असुन तो बंद केला पाहीजे असे कोणी म्हंण्टले तर. त्याला काय उत्तर द्यायचे?
  • Log in or register to post comments

Submitted by arunjoshi123 on गुरुवार, 11/09/2017 - 14:51

In reply to समजा by दीपक११७७

Permalink

+१

यनावालांनी न फसवणारा चांगला बाबा काय कामाचा असा प्रश्न विचारला पाहिजे होता.
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Wed, 11/08/2017 - 18:11

Permalink

दावा केला नाहीये

डॉक्टर सुहास म्हात्रे,
जो दुसर्‍याला शिकवायचा दावा करतो त्याला (अ) आपल्या मताच्या खरेखोटेपणाबद्दल शास्त्रिय प्रक्रियेने मत बनवता आले पाहिजे आणि (आ) ते मत बनवताना वापरलेल्या साधनशुचितेची खात्री करण्याइतपत तरी पात्रता आणि प्रामाणिकपणा त्याच्यात असायला हवा...
एक तत्त्व म्हणून हे विधान मान्य. पण यनावाला दुसऱ्याला शिकवायचा दावा करंत नाहीयेत. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दा on Wed, 11/08/2017 - 19:27

In reply to दावा केला नाहीये by गामा पैलवान

Permalink

जरा स्पष्ट करा प्लीज

जरा स्पष्ट करा प्लीज
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Wed, 11/08/2017 - 23:07

In reply to दावा केला नाहीये by गामा पैलवान

Permalink

पण यनावाला दुसऱ्याला शिकवायचा

पण यनावाला दुसऱ्याला शिकवायचा दावा करंत नाहीयेत. १. ???!!! तुम्ही यनावालांचे "मूळ लेखन" आणि "मुख्यतः त्यांच्याशी सहमत असलेल्या प्रतिसादांवर असलेले त्यांचे अत्यंत कमी संख्येचे प्रतिसाद" परत नीट वाचणे जरुरीचे आहे, इतकेच सुचवतो ! त्याचबरोबर... २. (अ) आपल्या मताच्या खरेखोटेपणाबद्दल शास्त्रिय प्रक्रियेने मत बनवता आले पाहिजे आणि (आ) ते मत बनवताना वापरलेल्या साधनशुचितेची खात्री करण्याइतपत तरी पात्रता आणि प्रामाणिकपणा त्याच्यात असायला हवा... हे तर कोणत्याही माध्यमात लिहिणार्‍या कोणत्याही लेखकाने स्वतःची किमान पत राखण्यासाठी पाळले पाहिजे, नाही का ?
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Wed, 11/08/2017 - 22:17

Permalink

काय फायदा...

एक्का सर, तुम्ही कितीही अंजन चोळा रेडीओवर... त्याला फरक पडत नाहि. रेडीओ फक्त बोलु शकतो, ऐकु शकत नाहि, बघु शकत नाहि.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Wed, 11/08/2017 - 23:18

In reply to काय फायदा... by अर्धवटराव

Permalink

अनुभव हेच सांगतो की तुमचे

अनुभव हेच सांगतो की तुमचे म्हणणे खरे आहे ! :) ;) पण, या लेखाचा एक मुख्य हेतू, माझी लेखातली मते, इतर मिपाकरांबरोबर वाटून घ्यावी हा सुद्धा होता.
  • Log in or register to post comments

Submitted by arunjoshi123 on गुरुवार, 11/09/2017 - 12:14

In reply to काय फायदा... by अर्धवटराव

Permalink

रेडिओ

१. रेडिओ म्यूट करता येतो. २. रेडिओ बंद करता येतो. ३. चॅनेल बदलता येतो. ४. चॅनेलचा अपप्रचार करता येतो. ५. चॅनेलवर बहिष्कार टाकता येतो. ६. आकाशवाणीचे अधिकारी, कार्यक्रम बदलता येतात. ७ सरकार बदलून रेडिओची मॅनेजमेंट बदलता येते. ८. रेडिओ फोडून टाकता येतो. ================================= पण रेडिओ चालावा, दर्जेदार पद्धतीनं चालावा हे कधीही चांगलं.
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Fri, 11/10/2017 - 12:10

In reply to रेडिओ by arunjoshi123

Permalink

१...८

पण त्याचं आंधळं-बहिरंपण नाहि जाणार.
पण रेडिओ चालावा, दर्जेदार पद्धतीनं चालावा हे कधीही चांगलं.
अर्थात.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Wed, 11/08/2017 - 22:33

Permalink

चनावाल्यांच्या नमित्ताने का

चनावाल्यांच्या नमित्ताने का होईना एक्का काका लिहिते झाले :D
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 11/08/2017 - 23:26

Permalink

खूप मुद्देसूद व संतुलित लेख

खूप मुद्देसूद व संतुलित लेख आहे.
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on गुरुवार, 11/09/2017 - 00:46

Permalink

शिकवण्याची भूमिका

डॉक्टर सुहास म्हात्रे, १.
हे तर कोणत्याही माध्यमात लिहिणार्‍या कोणत्याही लेखकाने स्वतःची किमान पत राखण्यासाठी पाळले पाहिजे, नाही का ?
यनावाला यांना आधुनिक विज्ञानाच्या इतिहासाची जराही माहिती नाही. त्यामुळे त्यांच्याशी विज्ञानाच्या विकासाविषयी चर्चा होऊ शकंत नाही. ही त्रुटी त्यांना पुरेपूर माहिती आहे. भले त्यांना ती जाणवली असेल, पण ते मान्य करीत नाहीत. म्हणून त्यांच्या लेखाची किमान पत बऱ्याचदा शंकास्पद (=questionable) असते. २.
तुम्ही यनावालांचे "मूळ लेखन" आणि "मुख्यतः त्यांच्याशी सहमत असलेल्या प्रतिसादांवर असलेले त्यांचे अत्यंत कमी संख्येचे प्रतिसाद" परत नीट वाचणे जरुरीचे आहे, इतकेच सुचवतो !
माझ्या अंदाजाप्रमाणे स्वत:च्या लेखाची किमान पत न राखता आल्यामुळे ते ठाम दावे न करता फक्त श्रद्धेविरुद्ध मोघम विधाने करतात. माझ्या मते ही शिकवण्याची भूमिका नव्हे. मात्र प्रत्येकास आपापलं मत बाळगण्याचा अधिकार आहे. आ.न., गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by arunjoshi123 on Fri, 11/10/2017 - 17:45

In reply to शिकवण्याची भूमिका by गामा पैलवान

Permalink

त्यामुळे त्यांच्याशी

त्यामुळे त्यांच्याशी विज्ञानाच्या विकासाविषयी चर्चा होऊ शकंत नाही.
ते करत नाहीत की करू शकत नाहीत हे एक मस्त गूढ ठेवलं आहे त्यांनी. पण मी लिहिलेला एकही प्रतिसाद त्यांना झेपत नाही हे सुनिश्चित. कारण प्रेमाने, सन्मानाने, खवचटपणे, वैतागून, गंभीरपणे, इ इ दिलेल्या कोणत्याही उत्तरांना अर्थ आहे असं म्हणावं असं काही त्यांनी लिहिलेलं नाही. ते प्राध्यापक नसून प्राचार्य असावं कदाचित.
  • Log in or register to post comments

Submitted by arunjoshi123 on गुरुवार, 11/09/2017 - 14:55

Permalink

आवडेश

लेखाचा आशय अत्यंत उत्तम आहेच, पण एखादा किचकट आशय नि:पक्षपातीपद्धतीनं कसा मांडावा याचा हा लेख वस्तुपाठ आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by गंम्बा on गुरुवार, 11/09/2017 - 16:11

Permalink

डॉक्टरसाहेब, मुळात

डॉक्टरसाहेब, मुळात मनुष्यप्राणी स्वार्थी आहे. म्हणजे त्याला त्याच्या फायद्याचे काय आहे हे बरोबर कळते आणि फायदा होत असल्याशिवाय कोणी काही करत नाही. हां, प्रत्येकाच्या फायद्याची व्याख्या वेगवेगळी असते. त्यामूळे कोणी माणुस श्रद्धा कुठल्याही प्रकारात बाळगत असेल ( म्हणजे देव, बुवा, बाबा, पूजा, जादुटोना , नास्तिकता ) तर ती स्वार्थासाठी आणि जाणुन बुजुन केलेली गोष्ट असते. पुजा, सत्संग, सत्यनारायण करुन त्या व्यक्तीला काय मिळत असेल हे दुसर्‍यांना समजणार नाही. काहीतरी मिळते म्हणुनच सर्व गोष्टी केल्या जातात. यनावालांना सरसकट जनता मूर्ख वाटते पण खरे असे आहे की जनता व्यवहारी असते. यनावालांना मनुष्य स्वभावातले काहीच कळत नाही असे त्यांच्या लेखावरुन वाटते. किंवा त्यांचा स्वभाव "हम करे सो कायदा" अश्या प्रकारचा हुकुमशाही असावा.
  • Log in or register to post comments

Submitted by arunjoshi123 on Fri, 11/10/2017 - 15:15

In reply to डॉक्टरसाहेब, मुळात by गंम्बा

Permalink

मुळात मनुष्यप्राणी स्वार्थी

मुळात मनुष्यप्राणी स्वार्थी आहे.
हे पटवताना थकल्यावर शेवटी पर्मार्थालाच एक स्वार्थाचा प्रकार म्हणायचं.
  • Log in or register to post comments

Submitted by arunjoshi123 on Fri, 11/10/2017 - 15:18

In reply to डॉक्टरसाहेब, मुळात by गंम्बा

Permalink

काहीतरी मिळते म्हणुनच सर्व

काहीतरी मिळते म्हणुनच सर्व गोष्टी केल्या जातात.
असं असेल तर मग यनावाला म्हणत आहेत ते योग्य आहे ----------- श्रद्धा = लोभ. नै का?
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com