मला भेटलेले रुग्ण - २
मला भेटलेले रुग्ण
त्या बाईंच्या चेहेऱ्यावर ईतकं मोठं प्रश्न चिन्ह होतं की प्रश्न छोटा पडावा !!
बाई : डॉक्टर हा दमा नाही म्हणून सांगा (बोलतांनाही दम लागतोय ) मला दमा नकोय हो....
मी : अहो तपासणी तर करू द्या ना , मगच ठरेल दमा आहे किंवा नाही ... आणि १००% आटोक्यात आणू तुमचा त्रास ..
बाई : मला ते inhaler वगैरे काही नको नुसत्या गोळ्या औषधी द्याल हो... (परत दम लागतोय)
मी : बरं बघू ,रिपोर्टस् आल्यावर ... (आणि लागणाऱ्या तपासणीची चिठ्ठी त्याच्या हातात दिली)
Spirometry ही तपासणी लागते श्वसनविकारांच्या निदानासाठी (त्यावर नंतर सविस्तर लिहीणार आहेच) आणि Xray अश्या केवळ दोनच तपासण्या होत्या ... शेवटची पेशंट होती म्हणून २५ मिनीटातच झाल्या tests...
परत केबिन मधला सीन...
मी : तपासणी दरम्यान तुम्हाला nebuliser द्वारे वाफ दिली औषधाची .. आता थोडं बरं वाटतंय ?
बाई : हो बरच बरं वाटतंय (बोलतांना लागणारा दम एकदम कमी झाला होता !)
मी : हा तुमचा जो काही श्वासाचा त्रास आहे ना तो दमाच आहे ....
बाई : अहो डॉक्टर पण मला दमा नको होता ना !!!
मी : नको होता म्हणजे ( माझ्याकडे काही बोलायलाच उरलं नव्हतं, पण उसनं अवसान आणून पुढे बोललो) अहो दमा आहेच .... आपण त्याची योग्य treatment करूयात..
बाई : बरं ठिक आहे.... मला inhaler तरी नका देऊ मग ...
मी : हे बघा inhaler तर तुम्हाला लागणार आहेच आणि बाकी कोणतही औषध त्याईतकं आराम नाही देऊ शकणार... माझ्या prescription मध्ये सर्वप्रथम inhaler च असणार आहे...
पुढची १० मिनीट्स फक्त inhaler चा वापर का जरूरीचा आहे , side effects कसे टाळायचे, सवय का लागत नाही inhaler ची, शरीरावर अपाय होत नाहीत हे सांगण्यात गेले तरीसुध्दा बाईंच्या चेहेऱ्यावरचा अविश्वास कमी नव्हता झाला....मग मी सगळं prescription लिहून झाल्यावर आमच्या दवाखान्याद्वारे घेतल्या जाणाऱ्या patient education program ची वेळ आणि तारिख दिली ....
पेशंट बाहेर पडल्यावर थकलेला मेंदू घेऊन मी पण आवरू लागलो....
________________•________________
ते तिघं जणं केबिन मध्ये बसले होते...
आई म्हणते की हिला २०-२५ दिवसांपासून कोरडा खोकला आहे बरीच औषधं झाली देऊन पण फरक पडत नाहीये, यंदा १०वी वर्ष आहे ना आजारी नको पडायला फार ....(माझी १० वी आठवून शहारे आले !!)
मी आपलं नेहमी प्रमाणे History घेतली आणि पुढच्या तपासण्या करून घ्यायला सांगितलं..
रिपोर्ट्स हातात आल्यावर तिघांना केबिन मध्ये बोलावून रिपोर्टस् समजावून सांगितले आणि inhalers व औषधी आणून घ्यायला सांगीतली... तेव्हाच पेशंटची आई रिपोर्टस् हातात घेऊन म्हणते की काय काय दिलं आहे ? मला क्षणभर कळलंच नाही की प्रश्न काय आहे नेमका ...
मी : inhaler आणि anti-allergic औषधं आहेत ...
पे.आई : त्याचे contents काय आहेत ?
मी : inhalational steroids आणि bronchodilator (श्वासनलिका मोकळी करणारी औषधी)आहेत.
पे.आई : हिचे वडील केमिस्ट्रीचे Phd आहेत आणि मला देखील त्रास आहे म्हणून आम्ही नेहेमी औषधांचे contents बघतो .
आतापर्यंत काहीच न बोललेले पेशंटचे वडील चष्मा काढून prescription वाचू लागले ( माझं handwriting चांगल आहे बरं का , म्हणजे पेशंट वाचू शकतात)
मला लक्षात आलं कि dicussion वेगळ्या दिशेला चाललं आहे.
मी : हि औषधी safe आहेत आणि ईतकंच काय तर WHO नी पण मान्यता दिलेली आहेत...
पे.आई : अहो पण ईतक्या लहान वयात steroids कशाला द्यायची ? ( आता तर हा प्रश्न steroids ना पण पडत असेल)
मी : अहो inhaler मध्ये औषध micrograms मध्ये असतं, जे खायला दिल्या जाणाऱ्या औषधांपेक्षा हजारपटींनी कमी आहे... त्याहूनही महत्वाचं की हे औषध direct श्वासनलिकेत जाऊन ३ऱ्या मिनीटाला काम करणं सुरू करतं... शिवाय रक्तात अतिशय कमी प्रमाणात जातं त्यामुळे side effects फारच नगण्य किंवा negligible आहेत.
पे.आई : मान्य आहे हो ; पण हि बरीच लहान आहे ना ?
मी : माझ्या ३ महिन्याच्या मुलीला खोकला होता तेव्हा मी inhalers वापरूनच कमी केला होता...
आता कुठे थोडं समाधान दिसलं आई वडीलांच्या चेहेऱ्यावर...
मी : आता काय काय पथ्य पाळणार ?
( पेशंटपेक्षा नातेवाईकांचा आवडता भाग)
पे.आई : सांगा बरं हिला काहीच ऐकत नाही ही खाण्याच्या बाबतीत.... (तक्रारीच्या सुरात)
मी : बरोबर करते आहे ती !!
मुलगी एकदम खुश झाली ना ! आणि आई-वडील दोघही परेशान ;))
मी : श्वासाचा त्रास आहे म्हणून तुम्ही दही,भात, आबंट , केळी आणि लिंबू हे सगळंच बंद केलंय (almost सगळे पेशंट करतातच) पण काय फरक पडला ? झाला का खोकला बरा ? दुधानी कफ तयार होतो अस म्हणत दुध बंद केल पण कफ पडायचा काही कमी नाही झाला ना ?
पेशंट आणि आई-वडील सगळेच विचारात पडले होते...।
मी : त्यामुळे हिने सगळं म्हणजे सगळं चालू करायचं , १५ दिवसांनंतर आयस्क्रीम पण ट्राय करायला हरकत नाही !!
पेशंटच्या चेहेऱ्यावरचा आनंद ह्यॅ क्षणी मी मांडू शकत नाही .... शद्बातीत !!
केबीन मधून बाहेर पडतांना पेशंट हसत हसत तर आई-वडील कफ्युजन घेऊन होते....
_________________________________
Book traversal links for मला भेटलेले रुग्ण - २
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रतिक्रिया
हाही भाग वाचायला आवडला.
हाही भाग वाचायला आवडला.
हाही भाग वाचायला आवडला.
हाही भाग वाचायला आवडला.
???
एस एस एस एस... चारदा एस !
हाही भाग वाचायला आवडला.
हाही भाग वाचायला आवडला.
हाभावाआ
मस्त!
हाही भाग वाचायला आवडला.
अरे अरे अरे.....
जबरदस्त! पुभाप्र!
किस्से आवडलेले आहेत.
.
आता एक डॉक्टरचा किस्सा सांगतो
पेशंट हुशार असतात....
निदान
पहीला प्रसंग हा तसा सर्व
हाही भाग वाचायला आवडला.
छान लिहिलंय डॉक. असेच अजून
छान लिहिलंय
भारी हो डॉक
हाही भाग वाचायला आवडला.
हाही भाग वाचायला आवडला.
छान लेखन (नेहमी प्रमाणे)
मस्तं किस्से.
एसभाऊंशी सहमत.........
मस्त लिहिता आहात. लवकर टाका
मस्त किस्से!
thank you so much doctor!!
Welcome आणि थॅंकू
आवल्डे
अरेच्चा! माझे प्रतिसाद इतक्या
हाही प्रतिसाद वाचायला आवडला.
:-))
ईतके उस्फुर्त प्रतिसाद पाहून
छान किस्से,
येऊद्यात अजून,
प्रवाहाच्या विरुद्ध
दम्यात काहीच पथ्य नसतं???
आजपासून खायला सुरू करा....
छानच लिहिताय तुम्ही. सगळे भाग
"हाही भाग वाचायला आवडला.