✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

उतारवय ही संकल्पना हळुहळू बाद होतेय

अ
अजय भागवत यांनी
Sun, 06/11/2017 - 18:05  ·  लेख
लेख
हया शतक़ातील सर्वात मोठी क्रांति जर कोणती असेल तर ती, “वयोमानातील वाढ” ही मानावी लागेल. आपण आपल्या आजी-आजोबांच्या काळातील नागरिकांपेक्षा २५-३० वर्षे अधिक जगत आहोत. ही वाढीव वर्षे खूप मोठा कालावधी आहे - अगदी एक आख्खे दुसरे आयुष्य वाढल्यासारखेच आहे. परंतू, आपण अजुनही आयुष्याकडे पूर्वीच्याच नजरेने पाहतोय का? म्हणजे असं की, आयुष्य म्हणजे, जन्म, मग तारुण्यातील आपल्या जीवनाची चढती कमान आणि मग पन्नाशीनंतर शारीरिक-मानसिक उतार... ह्याच विचारसरणीत आपण अडकून तर पडलेलो नाही ना?  पुढील वाचन कृपया येथे करा -https://drive.google.com/file/d/0B8a9AFSuwpEsdWpoaFBDbTlkWEU/view?usp=sharing ppt डाउनलोड करून पाहावी.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
लेखनप्रकार (Writing Type)
मत

प्रतिक्रिया द्या
12190 वाचन

💬 प्रतिसाद (38)

प्रतिक्रिया

पुढील वाचन इकडेतिकडे करत

एस
Sun, 06/11/2017 - 19:04 नवीन
पुढील वाचन इकडेतिकडे करत बसण्याइतका रिकामा वेळ नाही. क्षमस्व. - (चिरतरुण) एस. ;-)
  • Log in or register to post comments

एस, माझे ही 2-4 ब्लॉग इत्यादी

दशानन
Sun, 06/11/2017 - 19:18 नवीन
एस, माझे ही 2-4 ब्लॉग इत्यादी आहेत.. काय म्हणता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

तुमचे वय झाले असेल, म्हणून

दशानन
Sun, 06/11/2017 - 19:17 नवीन
तुमचे वय झाले असेल, म्हणून लिंक्स! ;) असो, भेटू अजून 100 एक वर्षाने.
  • Log in or register to post comments

सध्या उठावदार वयात (उमेदीच्या

जेम्स वांड
Sun, 06/11/2017 - 20:22 नवीन
सध्या उठावदार वयात (उमेदीच्या वयात, कोण रे तो अश्लील अश्लील ओरडतोय) असल्यामुळे उतारवयाबद्दल वाचून अवलक्षण करून घ्यायचा मानस नाहीये, त्यामुळं आमचा पास.
  • Log in or register to post comments

मिपाकडून ब्लॉगवर नेणारा

माम्लेदारचा पन्खा
Sun, 06/11/2017 - 20:30 नवीन
हा झैराती उतार भयावह आहे . . . आम्ही मिपा सोडून कुठ्ठंकुठ्ठं जात नै . . . .
  • Log in or register to post comments

मिपाकडून ब्लॉगवर नेणारा

माम्लेदारचा पन्खा
Sun, 06/11/2017 - 20:31 नवीन
हा झैराती उतार भयावह आहे . . . . आम्ही मिपा सोडून कुठ्ठंकुठ्ठं जात नै . . . .
  • Log in or register to post comments

संकल्पना बाद झाली असली तरी

अरूण गंगाधर कोर्डे
Sun, 06/11/2017 - 20:59 नवीन
उतारवय ही संकल्पना बाद झाली असली तरी वृद्धांशी वागण्याची पद्धत मात्र पूर्वी पेक्षाही जास्त विचित्र असल्याचे अनुभवीत आहे. नाइलाजास्तव असे लिहावे लागत आहे. या गोष्टी लिहिणं चांगलं की वाईट कळत नाही. याबाबत भिन्नता असू शकेल.
  • Log in or register to post comments

वृद्धांशी वागण्याची पद्धत

अजय भागवत
Mon, 06/12/2017 - 17:31 नवीन
माझा अनुभव ह्याबाबतीत निरीक्षणावर आधारित आहे व वृत्तपत्रामध्ये अधूनमधून दिल्या जाणाऱ्या बातम्या ह्या नातेसंबंधाचा आरसा दाखवतात. माझयाकडे असा काहीही विदा -डाटा नाही जेणेकरून मी काहीही खात्रीपूर्वक सांगू शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरूण गंगाधर कोर्डे

दुसर्‍या स्लाईडमधला भारताचा

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 06/11/2017 - 21:22 नवीन
दुसर्‍या स्लाईडमधला भारताचा नकाशा चुकीचा आहे. निदान भारतिय नागरिकाने तरी संपूर्ण काश्मीरसह भारताचा नकाशा वापरणे योग्य व वैध असते.
  • Log in or register to post comments

नाही सर !

अजय भागवत
Mon, 06/12/2017 - 17:28 नवीन
सर, तो नकाशा योग्यच आहे. कोणत्याही अधिकृत नकाशात पाकच्या अधिपत्याखालील भाग व चीनने गिळलेला भाग अशाच पद्धतीने दाखवतात. भारताची सीमारेषा त्या नकाशात स्पष्ट दिसत आहे, त्यामुळे मी तुमच्या मताशी सहमत नाही. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

भारताचा अधिकृत नकाशा कोणता

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 06/12/2017 - 18:32 नवीन
सर, तो नकाशा योग्यच आहे. कोणत्याही अधिकृत नकाशात पाकच्या अधिपत्याखालील भाग व चीनने गिळलेला भाग अशाच पद्धतीने दाखवतात. हा गैरसमज आहे. भारताचा अधिकृत नकाशा कोणता आहे हे ठरविण्यासाठी व प्रसिद्ध करण्यासाठी सरकारने अधिकृत केलेली संस्था "सर्व्हे ऑफ इंडिया" हीच एक आहे. इतर कोणा भारतिय वा अभारतिय संस्थेला किंवा परदेशी सरकारला तो अधिकार नाही. भारताचा चुकीचा नकाशा प्रसिद्ध करणे हा भारतिय कायद्याप्रमाणे दंडनिय गुन्हा आहे. अधिक माहितीसाठी "सर्व्हे ऑफ इंडिया"चे संस्थळ आणि विशेषत: त्यातील खालील पान पाहिल्यास बरेच प्रबोधन होईल... http://www.surveyofindia.gov.in/pages/display/190-public-awareness Image removed. (वरील चित्र सर्व्हे ऑफ इंडियाच्या संस्थळावरून साभार)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजय भागवत

भारताचा राज्यांच्या सीमांसहीत

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 06/12/2017 - 18:48 नवीन
भारताचा राज्यांच्या सीमांसहीत अधिकृत नकाशा... Image removed. (mapsofindia.com च्या सौजन्याने)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

माहितीसाठी धन्यवाद.

अत्रे
Tue, 06/13/2017 - 07:13 नवीन
माहितीसाठी धन्यवाद. एक शंका - कोणी अखंड भारत म्हणून - भारत पाकिस्तानचा एकत्र नकाशा दाखवत असेल तर तिला/त्याला शिक्षा होऊ शकते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

असहमत

अजय भागवत
Tue, 06/13/2017 - 07:23 नवीन
मी ह्यावर फार वेळ वाया घालवणार नाही. तुम्ही मी दिलेला नकाशा नीट पाहावा. त्यात भारताचा नकाशा आपल्या आंतरराष्ट्रीय सीमारेषांचा स्पष्ट चित्रण करून दाखवल्या आहेत. ज्या भागातील डेटा त्यांच्याकडे आहे, तेथील भाग त्यांनी रंगवले आहेत. इतकेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

वा वा ! तुमच्या व्यस्ततेचे

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 06/13/2017 - 14:17 नवीन
वा वा ! तुमच्या व्यस्ततेचे कौतुक आहे ! :) (स्वतःच्या ब्लॉगची झैरात करण्यासाठी) मिपावर धागा टाकण्याइतका वेळ तुमच्याकडे होता, तेव्हा, केवळ 'एका मिपाकराने दुसर्‍या मिपाकराला उपयोगी माहिती द्यावी' याच उद्देशाने नकाशाच्या वैधतेबद्दल माहिती दिली होती. असो. त्या संस्थळावर दिलेल्या इमेल अ‍ॅड्रेसवर जर कोणी तक्रार केली तर मात्र ती निस्तरायला व्यस्ततेतून नक्की वेळ काढावा लागेल, हे तुम्हाला माहीत आहेच, त्यामुळे ते सांगण्याची तसदी घेण्याची गरज नाही म्हणा ! ;) शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजय भागवत

का वेळ वाया घालवत आहात?

दशानन
Tue, 06/13/2017 - 14:58 नवीन
का वेळ वाया घालवत आहात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

काय जाहीर केलय आत?

अत्रुप्त आत्मा
Mon, 06/12/2017 - 07:17 नवीन
काय जाहीर केलय आत? वरती वरण खालती भात! :p
  • Log in or register to post comments

गुगल डॅाक्स अँड्राइड फोनवरच

कंजूस
Mon, 06/12/2017 - 07:25 नवीन
गुगल डॅाक्स अँड्राइड फोनवरच चालते. इकडेच लिहा काय ते लवकर ,वेळ थोडा आहे. :)
  • Log in or register to post comments

तुमची पीपीटी पण मराठीतच आहे.

अत्रे
Mon, 06/12/2017 - 07:29 नवीन
तुमची पीपीटी पण मराठीतच आहे. मग सरळ तिकडून इकडे कॉपी पेस्ट का नाही करत?
  • Log in or register to post comments

ही कल्पना बलराज साहनी यांनी

रातराणी
Mon, 06/12/2017 - 12:25 नवीन
ही कल्पना बलराज साहनी यांनी कधीच बाद करून ठेवली आहे. आठवा बरं जरा, ए मेरी जोहरजबी ;)
  • Log in or register to post comments

होय खरंच की !

अजय भागवत
Mon, 06/12/2017 - 17:24 नवीन
सहमत ! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

माझ्या प्रतिसादाचं वाचन कृपया

आदूबाळ
Mon, 06/12/2017 - 17:38 नवीन
माझ्या प्रतिसादाचं वाचन कृपया इथे करा.
  • Log in or register to post comments

दू दू बाळ!

अत्रुप्त आत्मा
Tue, 06/13/2017 - 06:46 नवीन
दू दू बाळ! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

तुमचा पुर्ण लेख इथे दिला असता

धर्मराजमुटके
Mon, 06/12/2017 - 17:39 नवीन
अवांतर विनोद : उतारवय ही संकल्पना दारुचे व्यसन असणार्‍यांनी फार अगोदरपासूनच बाद केलेली आहे. दारुचे व्यसन असणारा कधीही म्हातारा होत नाही. तो तरुणपणातच स्वर्गवासी होतो. असे कोणातरी लेखकाचे प्रसिद्ध वचन आहे. असो. आता ऑन सिरियस नोट : तुमचा पुर्ण लेख इथे दिला असता तर अजुन जास्त चांगले झाले असते. पुर्ण लेख लिहून खाली हा लेख अमुक अमुक ब्लॉगवरदेखील प्रकाशित केलेला आहे असे लिहिले असते तर जास्त योग्य दिसले असते. तुमच्या लेखाचा कंटेंट पाहून ज्यांना आवडला असता त्यांनी आवर्जुन तुमच्या ब्लॉगला देखील भेट दिली असती. असो. पुढील वेळी असे करता आले तर पहा.
  • Log in or register to post comments

गुगल डॉक ब्लॉग नव्हे

अजय भागवत
Tue, 06/13/2017 - 07:21 नवीन
प्रतिसादाबद्दल आभारी आहे. गुगल डॉक हे ब्लॉग नाही. माझी ppt मी तेथुन शेयरली आहे. येथील "लेख" प्रकारात गुगल डॉक इन्सर्ट करता आले असते तर मी केले असते. ppt ची एक मजा अशी आहे की, त्यातील ऍनिमेशन तुम्हाला ppt तच व्यवस्थित पहाता येईल व ते अधिक परिणामकारक असेल. तसेच एखाद्याला ह्याच ppt चा वापर करायचा असेल तर ते विनासायास करू शकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

पहिल्या स्लाईडवरील तुमचे नाव

सतिश गावडे
Tue, 06/13/2017 - 11:56 नवीन
पहिल्या स्लाईडवरील तुमचे नाव आणि ईमेल आयडी डिलीट केले तर चालेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजय भागवत

का?

अजय भागवत
गुरुवार, 06/15/2017 - 10:05 नवीन
तसे का करायचे आहे तुम्हाला ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

मी तिथे माझे नाव आणि ईमेल

सतिश गावडे
गुरुवार, 06/15/2017 - 10:18 नवीन
मी तिथे माझे नाव आणि ईमेल आयडी टाकून ते गुगल डॉकवर टाकेन आनि इथे त्याच्याबद्दल चार ओळी खरडेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजय भागवत

:-)

अजय भागवत
गुरुवार, 06/15/2017 - 19:09 नवीन
:-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

ppt हवीच

कपिलमुनी
Tue, 06/13/2017 - 17:18 नवीन
ppt चा प्रेझेन्टशेन काही खास वाटला नाही. चित्रासहीत लेख दिला असता तरी चालले असते . असो !
  • Log in or register to post comments

नेमके सांगा

अजय भागवत
गुरुवार, 06/15/2017 - 10:06 नवीन
नेमके सांगितले तर पुढील वेळी सुधारणा करता येतील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

भारताचा चुकीचा नकाशा

कपिलमुनी
Tue, 06/13/2017 - 17:21 नवीन
भारताचा चुकीचा नकाशा टाकल्याबद्दल निषेध
Image removed.
  • Log in or register to post comments

सहमत

प्रचेतस
Tue, 06/13/2017 - 17:49 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

मला तरी वाटत नाही,

प्रसाद_१९८२
Tue, 06/13/2017 - 19:12 नवीन
कि तो नकाशा चुकीचा आहे म्हणून. भारताची आंतरराष्ट्रीय सीमा त्या पीपीटी मधील नकाशात व्यवस्थित दाखविली आहे. पाकव्याप्त व चिनव्याप्त काश्मिरमधून lifespan चा जो डेटा त्यांना हवा आहे, तो आता घेता येत नसल्याने तेवढा वादग्रस्त भाग सोडून, भारतात येणार्‍या काश्मिरच्या भागाला एका विशिष्ठ रंगामध्ये दाखविले आहे, असे मला तरी वाटते.
  • Log in or register to post comments

स्पष्टीकरण

कपिलमुनी
Tue, 06/13/2017 - 21:26 नवीन
कोणत्याही अधिकृत नकाशात पाकच्या अधिपत्याखालील भाग व चीनने गिळलेला भाग अशाच पद्धतीने दाखवतात
इथे त्यांनी जे लिहिला आहे त्यावरून lifespan चा जो डेटा त्यांना हवा आहे, तो आता घेता येत नसल्याने नकाशा चुकीचा दाखवला आहे असे म्हणता येत नाही। तो नकाशा चुकीचा आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२

धन्यवाद प्रसाद !

अजय भागवत
गुरुवार, 06/15/2017 - 10:04 नवीन
तुम्ही म्हणालात तेच माझेही मत आहे.
  • Log in or register to post comments

काश्मीर साठी वेगळा रंग टाकून

सप्तरंगी
गुरुवार, 06/15/2017 - 19:46 नवीन
काश्मीर साठी वेगळा रंग टाकून ''डेटा उपलब्ध नाही'' असे सांगायला हवे होते, ते योग्य ठरले असते काही (६एक ) ठिकाणी फोटो आणि लिखाण overlap होते आहे. त्यामुळे काही slides वाचता आल्या नाहीत - उदा. पेशी पुनर्जन्म घेतात वाली slide power of ९ things- यात धर्माचे पालन केल्याने आयुष्यमान कसे वाढेल ते नाही कळले चाचणी प्रश्न गंमतशीर आहेत
  • Log in or register to post comments

वयोमान वाढुन काय उपयोगhttp:/

मराठी_माणूस
Fri, 06/16/2017 - 14:37 नवीन
वयोमान वाढुन काय उपयोग http://timesofindia.indiatimes.com/city/delhi/44-of-indias-aged-treated-badly-in-public-survey/articleshow/59152175.cms
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा