पुरुष नसबंदी आणि समज गैरसमज
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
पुरुष नसबंदी आणि समज गैरसमज
पुरुष नसबंदी या विषयाबाबत आपल्या देशात अनेक गैरसमज आहेत. लोकशिक्षण करून ते गैरसमज दूर करावेत असेही कुणाला वाटत नाही. स्त्रियांच्या शस्त्रक्रियेच्या मानाने पुरुष नसबंदी फार सोपी, कमी वेळखाऊ वगैरे वगैरे फक्त जमेच्या बाजूच सांगितल्या जातात. पूर्ण माहीती स्वतः पेशंटला तरी असते की नाही शंका आहे. वास्तविक पेशंटला पूर्ण माहिती देऊन त्याने सारासार विचार करून निर्णय घ्यावा ही अपेक्षा आहे. पण जाहीरात अशी होते. यूं गया यूं आया, आल्यावरही तोच जोष कायम इ.
पुरुषावर नसबंदी केल्यावर पुढचे तीन महीने आतमधे वीर्य तसेच असल्याने गर्भधारणा होण्याची शक्यता असते. त्यानंतर तो आयुष्यात कधीही बाप होऊ शकत नाही. उद्या त्याची पहीली पत्नी गेली, त्याने दुसरे लग्न केले. त्या पत्नीला मूल हवे असेल तर तो स्वतः तिला मूल देऊ शकत नाही. पुरुष नसबंदी हा तात्पुरता उपाय नाही, तो कायमस्वरूपाचा आहे. जगात काही उदाहरणे घडली आहेत म्हणे(गूगल) जिथे ही शस्त्रक्रिया पुन्हा उलटवता आली आहे. पण शक्यता धूसर. या बाजू कुठेही सांगितल्या जात नाहीत.
पूर्वी तांबीबाबतही खूप जाहीरात होत असे. अगदी सरकारी बक्षिसेही दिली जात. मूल नको असेल तर तांबी बसवा. जेव्हा हवे असेल तेव्हा तांबी काढा. बाकी मुद्दे जनतेपर्यंत नीटपणे पोचवले जात नाहीत.
पुरुष नसबंदीही अशीच साधीसोपी असावी असा अनेकांचा समज करून दिला जातो. म्हणूनच याबाबतीतल्या सर्व उलट सुलट मुद्यांची जाणीव करून देणार्या लोकशिक्षणाची गरज आहे.
प्रतिक्रिया
मग तुम्ही त्यावर सविस्तर लिहा
एवढे का रागवताय
खरेकाका इत्यादींच्या
@खरेकाका इत्यादींच्या
मी तर बाबा अकुकाकांच्या
स्त्री आणि पुरुष यांच्या
गैरसमज
सत्यं ब्रूयात हा धागाही वाचला
गर्भनिरोधक या विषयात अजून
http://www.wikiwand.com/mr/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%