मी आज केलेला व्यायाम...!!
नमस्कार,
गेली दोन वर्षे मी जमेल तसे सायकलवर भटकत आहे आणि शक्य त्या राईडचे लेख लिहीत आहे. यादरम्यान एक गोष्ट लक्षात आली, मिपावरील लेख वाचून किंवा आपल्या मित्रांच्या संगतीने अनेक लोकांना सायकल चालवावीशी वाटली आणि बहुदा अशा एखाद्या ट्रिगर मुळे अनेक लोक उत्साहाने आणि नियमीतपणे सायकल चालवत आहेत. मला व्यनीमधून अनेकांनी सायकलबाबत प्रश्न विचारले आणि तेथेही पुढील प्रगती कळवत आहेत.
व्यायामाचे फायदे येथे कोणाला समजावून सांगावेत अशी परिस्थिती नक्कीच नाही. तसेच आपल्या सर्वांच्या व्यस्त दिनक्रमामुळे अनेकदा इच्छा असूनही व्यायाम होत नाही हे ही तितकेच खरे आहे. मग आपण या धाग्यावर "आज केलेला व्यायाम" नोंदवत राहूया.
व्यायाम करणे आवश्यक आहे मग तो कोणत्याही प्रकारे करा.
सायकल चालवा, सकाळी फिरायला जा, पळा, सूर्यनमस्कार घाला, योगासने करा, जिम मध्ये घाम गाळा पण नियमीतपणे काहीतरी करा आणि येथे नक्की नोंदवा.
आपल्यामुळे आणखी बरेच लोक प्रोत्साहन घेतील आणि व्यायामाला नक्की सुरूवात करतील.
मग... आज किती व्यायाम केला..?
**************************************************************
काही डिस्क्लेमर्स.
१) या धाग्याचा उद्देश "जास्तीतजास्त लोकांनी व्यायाम करावा" इतकाच आहे.
२) आपल्या व्यायामाच्या अनुषंगाने अनेकांना अनेक शंका असू शकतात त्या येथे बिन्धास्त विचारा. मिपाकर भरपूर उत्साही आहेत आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारात निष्णात आहेत. माझीही शँपेन (उर्फ चंपाग्ने) हाफ / फुल मॅरेथॉन पळतो, वेल्लाभट नियमीतपणे जिम करतो, शैलेंद्र, प्रशांत मालक, डॉ श्रीहास, आनंदराव, (शेफ) केडी असे अनेक मुरलेले सायकलिस्ट लोक आहेत. डॉक्टर खरे आणि एक्काकाका वैद्यकीय सल्ले देतातच. अशा अनेक अनुभवी लोकांना आपले पेटारे उघडण्यासाठी उद्युक्त करूया.
३) ही कोणतीही स्पर्धा नाहीये त्यामुळे स्वतःशी प्रामाणिक राहून येथे नोंदी करा. फायदा तुम्हालाच मिळणार आहे. :)
**************************************************************
टीप - येथे अवांतर पोस्ट शक्यतो टाळाव्यात. बाकी संपादक मंडळ व चालक-मालक समर्थ आहेतच. :)वर्गीकरण
प्रतिक्रिया
मी आज १ तास शवासन केले
त्यात काय विशेष ...
बेस्ट
अनुमोदन
आठवड्याचे कमीत कमी तीन दिवस
_/\_
रविवारची सुट्टी सत्कारणी
झकास...
तुम्ही इतकं सायकलिंग आवडीने
सायकलिंगसारखा व्यायाम नियमित
सायकलिंगसारखा व्यायाम नियमित करुनही एक विशिष्ट अॅथलेटिक लूक, म्हणजे बघून ही व्यक्ती निदान काहीतरी व्यायाम करत असावी असं वाटत नाही. बर्याच लोकांची सुटलेली पोटं तिंबलेल्या कणकेसारखी कमरेवरुन खाली ओघळण्याच्या बेतात असतात.हे वर्णन तंतोतंत मला लागू पडते. :p याला अनेक कारणे आहेत. एक म्हणजे सायकल चालवणे हा फक्त लोअर बॉडीचा व्यायाम आहे. वरच्या शरीराला फारसे कष्ट पडत नाहीत. सोबत पळणे, जिम वगैरे गोष्टीही आवश्यक आहेत. (अधिक माहिती तज्ञ लोक देतीलच) दुसरे म्हणजे खाण्यावर कंट्रोल हवा. तसा अनेक जणांचा नसतो (माझा तर आजिबात नाहीये) त्यामुळे जळालेल्या कॅलरीच्या तुलनेत पोटात भरलेल्या कॅलरी जास्त असतात आणि पोट वगैरे कमी होत नाही. बाकी फायदा म्हणाल तर सायकलिंग मुळे स्टॅमिना (दमसास) भरपूर वाढतो. सध्याची प्रगती म्हणजे आजिबात न थांबता किमान दोन ते अडीच तास आमच्या स्किलसेटचे बॅडमिंटन सलग खेळू शकतो.सगळं काही पोटासाठी ....
माझा दृष्टीकणन
सुटलेली पोटं,अवाढव्य वाढलेली
अजुन काही उत्तरं
अजून लिहीण्याचा यत्न करणार आहे जसे प्रश्न येतील किंवा काही सुचेल
पोहून वजन वाढते. कारण घाम येत
माझ्या अल्पमतिनुसार सांगतो
ॲासमच ना एकदम ....
पोहून वजन वाढते. कारण घाम येत
ते दुप्पट भूक बर्याचदा
नाही. चारचैघांनी कशाला
देशी उपाय हवा असेल तर भाकरी
कायतरी देशी घाटी सुचवा ना
बेगल सोडून सोडा हो. साधं अमूल
ज्जे बात !! लै आभार सर :)
प्रोटीन साठी व्हे प्रोटीन शेक
व्हे प्रोटीन नाहीच तर मग अंडी
Thanks डॉक्टर
As you are losing weight,
डॉक साहेब, तुम्ही म्हणताय
http://www.mensfitness.com
धन्यवाद!
जॉन साहेब
सर जी,
हणुमोदन
डॉक्टर, दुधात अंडे फोडून ते
लोल आप्प्पा रोक्स
अगदी बरोबर
अॅमिनो अॅसिड्स?
हायेस्ट क्वालिटी म्हणजे काय ?
चुकताय.
कच्चं की उकडलेले?
मलाही हाच प्रश्न पडतो.
अंडं दुधात टाकलं आणि जोडीला
बेगल आणि चीज़, पीनिट बटर
खूप जास्ती कार्ब्स आणि फॅट
विंजीनेर, प्रतिसाद पटला तुमचा
डॉक्टर साहेब
लगे राहो...
सायकलवरुन जास्तीत जास्त ४८